काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 04, 2014

मिनीट्रेनमधून दोन लाख साठ हजाराचा नफा

मिनीट्रेनमधून दोन लाख साठ हजाराचा नफा

अलिबाग- पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन या वर्षाच्या शेवटच्या हंगामात डौलात धावली . मिनीट्रेन मधून एक दिवसात प्रवास केलेल्या पर्यटकाकडून मिळालेले उत्पन्न हे देशातील सर्व छोट्या मार्गावरील धावणाऱ्या गाड्यामध्ये सर्वाधिक ठरले . रविवारी तब्बल दोन लाख साठ हजार रुपये प्रवाशी तिकीट विक्रीतून रेल्वेला मिळाले .

मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी गेली दहा दिवस पर्यटकांनी गर्दी केली आहे . रविवार 29 डिसेंबर रोजी नेरळ येथून माथेरान ला जाण्यासाठी नेरळ -माथेरान मिनी ट्रेन मधून जाण्यासाठी आणि माथेरान येथून नेरळ येण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती . रविवार असल्याने मिनीट्रेन च्या सर्व सहा फेऱ्या हाउसफुल होत्या . याशिवाय माथेरान -अमन lodge स्टेशन आणि अमन lodge ते माथेरान स्टेशन या दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेन च्या शटल गाडीतून प्रवास करण्यासाठी देखील गर्दी होती . या सर्व मार्गावरील मिनी ट्रेन मधून दिवसभरात सर्व गाड्या हाउसफुल धावल्या . माहिती त्यातून रेल्वे ला तब्बल दोन लाख साठ हजार रुपये एवढे प्रचंड उत्पन्न प्राप्त झाले . यापूर्वी मे महिन्यात मिनी ट्रेन च्या शटल सेवेतून एक लाख नव्वद हजार एवढे उत्पन्न रेल्वे ला मिळाले होते .

रविवार 29 डिसेंबर ला झालेले प्रवाशी उत्पन्नातून मिळालेले उत्पन्न हे देशातील रेल्वेच्या सर्व छोट्या मार्गावरील एका दिवसातील उत्पन्नातील सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे ,हि माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे . वर्षाच्या शेवटच्या हंगामात मिनी ट्रेन ची एकही फेरी रद्द झाली नाही ,त्यामुळे पर्यटकांना विनासायास मिनी ट्रेन मधून प्रवास करता आला ,अशी माहिती कार्यालयाने दिली .

Friday, January 03, 2014

चंद्रपूर विभाग १५ कोटींच्या तोट्यात!

चंद्रपूर विभाग १५ कोटींच्या तोट्यात!

चंद्रपूर- 'आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या' अशा स्थितीला तोंड देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ नवनवीन उपक्रम अंमलात आणत असले तरी राज्य परिवहन महामंडळाचे चंद्रपूर विभाग वर्षाकाठी तब्बल १५ कोटीच्या तोट्यात आहे.
येथील वर्षाचा सरासरी २0 कोटीने खर्च वाढला आहे. यास डिझेलची झालेली भाववाढ, कामगार करार व सोबतच खासगी प्रवाशी वाहतूक मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे. राज्य परिवहन महामंडळाने महसूल वाढीसाठी नव्या वर्षापासून प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचा नवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाहक प्रवाशांसाठी उद्घोषणा करून नमस्कार, मी बसचा वाहक आपले स्वागत करतो आदींसह एस.टी.मध्ये सौजन्याचे स्वर ऐकण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला असला तरी वर्षाकाठी एस.टी. महामंडळाला होणारा तोटा सरासरी भरून निघणारा नाही. चंद्रपूर विभागात चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी, अहेरी या आगारांचा समावेश होता. या सर्व आगारांमध्ये १ हजार ४३ चालक तर १ हजार १0 वाहक आहेत. यात ५३७ बसेसचा समावेश आहे.
चंद्रपूर विभागाला या सर्व आगारातून एप्रिल ते नोव्हेंबर २0१३ पर्यंत चालू वर्षात १२७ कोटी ३५ लाख खर्च आला. तर ९८ कोटी ४ लाख उत्पन्न झाले. हेच मागील वर्षात १0७ कोटी १४ लाख खर्च तर ९२ कोटी ९६ लाख उत्पन्न होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५ कोटीने उत्पन्नात भर पडली असली तरी वर्षाकाठी सरासरी २0 कोटीने खर्च वाढला आहे. चंद्रपूर विभागातील बहुतांश ग्रामीण भागात बसफेर्‍यांची कमतरता व तुलनेत खासगी प्रवाशी वाहतूक सर्वाधिक आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाची बस रिकामीच फेर्‍या मारत असल्याचे चित्र बरेचदा दिसून येते. यासोबतच शासनाने केलेली डिझेलची भाववाढ, कामगार करार, बससाठी लागणारे स्पेअर पार्ट्स, टायर, ऑईल आदी खर्चही या तोट्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरले आहेत. कर्मचार्‍यांवर १ कि.मी. अंतरासाठी साधारणत: ९ रु. ५0 पैसे खर्च होतात. मात्र त्या तुलनेत आवक मात्र नगण्यच असते. त्यामुळेही चंद्रपूर विभाग तोट्यातच चालला. ही स्थिती एकट्या चंद्रपूर विभागाची नाही तर सर्व राज्यातील विभागातीलच असल्याची माहिती चंद्रपूर विभागातील एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍यानी लोकशाही वार्ताशी बोलताना दिली. खासगी प्रवाशी वाहतूकही चंद्रपूर विभागाअंतर्गत मोठय़ा प्रमाणात आहे. खासगी प्रवाशी वाहतूकदार बस सुटण्याच्या वेळातच आपली वाहने सोडतात. या सोबतच काही दिवसांमध्ये ते तिकीटदामध्ये सुट करतात. तर मध्यंतरीच वाढवितात. मात्र परिवहन विभागात तसे होत नाही. त्यामुळे प्रवासीही बसकडे दुर्लक्ष करीत आहेत. एकंदरीत खासगी प्रवाशी वाहतूक परिवहन महामंडळ तोट्यात येण्यास मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहेत
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आज उदघाटन

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आज उदघाटन

सासवड (जि. पुणे) : ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त येणार्‍या सारस्वतांच्या अन् रसिकांच्या स्वागतासाठी सासवडवासीय सज्ज झाले आहेत. सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे.

पुण्याहून दिवेघाट चढून गेलं की दूरवर पसलेल्या डोंगर रांगा आणि त्यांच्या द-याखो-यात बहरलेल्या चिकू, सीताफळ आणि अंजीरांच्या बागा दिसायला लागतात.पुरंदरच्या याच निसर्गसंपन्नतेमुळे त्याला पुण्याचा कॅलिफॉर्निया म्हटलं जातं. सासवडची ओळख करून द्यायची तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. अत्रेंनी आत्मचरित्राला ज्या नदीवरून ` क-हेचं पाणी` असं नाव दिलं तीच ही सासवाड्ची क-हा नदी. अत्रेंनी क-हेचं पाणी हे आत्मचरित्र याच संगमेश्वर मंदिराच्या आवारात बसून लिहिलंय. सासवडमध्ये आज फक्त अत्र्यांचं हे जन्मघरच शाबूत आहे. मात्र त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. 

अत्र्यांच्या सहवासामुळे सासवडला साहित्यिक वारसा मिळालाय. आणि याच सासवडनगरीला आणखी पावन केलंय ते सोपान महाराजांच्या या समाधी स्थळामुळे.संत सोपान महाराजांची समाधी आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम यामुळे इथे बाराही महिने हरिनामाचा जयघोष ऐकू येतो. सासवडचं पेशवाईशी नातं सांगणारी ही पेशव्यांची कचेरी. बाळाजी विश्वनाथांची समाधी आणि जुने वाड्यांचे हे अवशेष अजूनही त्या काळाची आठवण सांगत उभे आहेत.

अशा या ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि साहित्यिक महत्त्व असलेल्या सासवडमध्ये आता साहित्याचा मेळा भरतोय. क-हेचा काठ या साहित्य संमेलनानंतर आणखी समृद्ध होणार आहे.
पालखी मैदानावरील मुख्य मंडप, ग्रंथनगरी, भोजनगृह, निवास व्यवस्था, वाहतूकव्यवस्था पूर्ण झाली.
१५ जानेवारीपासून युवा सेनेचे राज्यव्यापी शिबीर

१५ जानेवारीपासून युवा सेनेचे राज्यव्यापी शिबीर

रायगडमध्ये युवाशक्तीचा गजर


उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

अलिबाग (प्रतिनिधी) -  येथे १५ जानेवारीपासून युवा सेनेचे दोन दिवस ‘युवा सेना लक्ष्य २०१४’ हे राज्यव्यापी शिबीर होत आहे. या शिबिराची जोरदार तयारी सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो युवासैनिक उपस्थित राहणार असल्याने रायगड जिल्ह्यातील कडेकपार्‍यात युवाशक्तीचा गजर घुमणार आहे.
अलिबाग येथील हॉटेल साईइन येथे दोन दिवस होणार्‍या या शिबिरासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित राहणार असल्याने तरुणांमध्ये उत्सुकता आहे. युवा सेना प्रवक्ता राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली. शिबिरात युवासैनिकांसाठी निवडणूक प्रक्रिया, प्रचार, सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचा प्रचार, निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक काम अशा विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. शिबिरात युवा सेनेची सक्रिय कार्यकारिणी, जिल्हा युवाधिकारी, उपजिल्हा युवाधिकारी, तालुका युवा अधिकारी, शहर युवाधिकारी, मुंबईतील विधानसभा युवाधिकारी, युवा सेनेच्या संलग्न संघटना युवा ब्रिगेड, सोशल मीडिया सेल, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
आदर्श प्रकरणी सरकारची निव्वळ धुळफेक

आदर्श प्रकरणी सरकारची निव्वळ धुळफेक

मुंबई :- आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था चौकशी आयोगाच्या शिफारशींवर सरकारने घेतलेला निर्णयम्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठनेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे. श्री.खडसे पुढे म्हणाले की, आदर्श प्रकरणी आज झालेल्यामंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा अहवाल अंशत: स्विकारुन जनतेचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्रीअप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या राजकीय व्यक्तींना संरक्षण देत आहेत. वस्तुत: आदर्श प्रकरणात चौकशीआयोगाने काढलेल्या निष्कर्षावरुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनादेण्याची आवश्यकता होती, असे झाले असते तर खरोखरच सरकारने आदर्श प्रकरणाचा फेरविचार केला आहे, असेदिसले असते व मुख्यमंत्र्यांच्या मिस्टर क्लिन या प्रतिमेस जनमानसात तडा गेला नसता. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळदबावाखाली काम करीत आहे. राहुल गांधींच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी आदर्श प्रकरणाच्या अहवालाचा फेरविचारकरण्याचा निर्णय घेतला. आता उद्या जर सोनिया गांधींनी आदेश दिला तर सरकार एखाद्या व्यक्तीला वाचविण्यासाठीहा निर्णय पुन्हा फिरवणार का, असा सवाल श्री.खडसे यांनी केला. आदर्श प्रकरणाचा अहवाल जर स्विकारायचा नव्हता व न्यायमुर्ती सारख्या व्यक्तींनी केलेल्या चौकशीअहवालाच्या शिफारशी जर सरकारला अमान्य असतील तर मग या आयोगावर 7 कोटीपेक्षा जास्त रक्कम का खर्चकेली व आयोग नेमलाच कशाला, असा सवाल श्री.खडसे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातीलजनतेवर 8 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा वाढला आहे याची जबाबदारी सुध्दा सरकारने स्विकारली पाहिजे, अशीमागणी श्री.खडसे यांनी केली. आदर्श प्रकरणी भारतीय जनता पार्टी गावागावात रस्त्यारस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन छेडणार आहे, असा इशारा श्री.खडसे यांनी शेवटी दिला.

Thursday, January 02, 2014

तातडीने मदत द्या

तातडीने मदत द्या

माळशेज घाटात एस.टी. बसला झालेल्या अपघातातील जखमी  मृतांच्यानातेवाईकांना सरकारने तातडीने मदत द्यावी
-- एकनाथराव खडसे यांची मागणी

मुंबई, दि.2 - ठाणे येथुन अहमदनगरकडे जाणारी एस.टी. बस माळशेज घाटात कोसळुन झालेल्या अपघाताबद्दल विधानसभेतील विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातातील जखमी  मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदतउपलब्ध करुन द्यावी अशी मागणी श्री.खडसे यांनी केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई करा अशीमागणीही त्यांनी केली.
घाटात एसटी कोसळून 27 प्रवाशांचा मृत्यू

घाटात एसटी कोसळून 27 प्रवाशांचा मृत्यू

आळेफाटाहून अर्नाळाकडे जात असलेली एसटी बस आज (गुरूवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास माळशेज घाटात कोसळून झालेल्या अपघातात एसटीतील 27 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 महिला आणि आठ पुरूषांचा समावेश आहे. 
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशेज घाटात टोकावडे येथे हा अपघात झाला. ठाणे आगाराची ही बस असून, ती अर्नाळाकडे जात असताना एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. या बसमधून सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला. घटनास्थळी ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. त्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढत, जखमींना मुरबाड़ आणि टोकावडे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे गिर्यारोहकांनीही बचावकार्यात मदत केली.
मुख्याधिकार्‍यांच्या कक्षाला कुलूप ठोकले

मुख्याधिकार्‍यांच्या कक्षाला कुलूप ठोकले


बल्लारपूर : 
बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ हे नेहमी गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित लोकांची कामे अडून पडतात. या कारणाने संतापून बसपाच्या नगरसेवकांनी आज गुरुवारी दुपारी मुख्याधिकारी यांच्या कक्षाला कुलूप ठोकले. 
मुख्याधिकारी वाहूरवाघ हे शनिवारपासून बाहेरगावी आहेत. आजही ते कार्यालयात गैरहजर होते. बसपाचे नगरसेवक राजू झोडे, विकी दुपारे आणि गटनेते संपत कोरडे आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या कक्षाला कुलूप लावले. तसेच 'बसपा नगर सेवकांनी मुख्याधिकार्‍यांच्या कार्यालयाला ताला लावला' अशा शब्दात लिहिलेली सूचना दारावर चिपकवली. या संदर्भात गटनेते संपत कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्याधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे लोकांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. शहराच्या विकासावर त्याचा परिणाम पडत आहे. 
मुख्याधिकार्‍यांचे विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष आहे. तसेच कर्मचार्‍यांवर त्यांचा वचक नसल्याने व्यवस्थापन बिघडत चालले आहे. या सर्व बाबी विकास कार्याच्या आड येत आहेत. वाहूरवाघ यांची बदली करा अन्यथा आम्ही मुख्याधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. वाहूरवाघ यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला असता ते म्हणाले, लोकांचे वा नगरपरिषदेचे कोणतेही काम मी अडवून ठेवले नाही.
बॅंक अध्यक्षांना मारहाण प्रकरण : कर्मचार्‍यांनी नोंदविला निषेध

बॅंक अध्यक्षांना मारहाण प्रकरण : कर्मचार्‍यांनी नोंदविला निषेध

चंद्रपूर :
निलंबित महिला कर्मचार्‍याला पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांसह काही महिला कार्यकर्त्यांनी येथील कन्यका नागरी सहकारी बॅंकेत सोमवारी राडा केला. बॅंकेचे अध्यक्ष प्रफुल्ल भास्करवार यांच्या अंगावर शाई फेकून त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी मनसे शहर अध्यक्षासह आठजणांना मंगळवारी अटक केली. 
मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, शहर अध्यक्ष संदीप गायकवाड, शहर सचिव भरत गुप्ता, राजू कुकडे, प्रकाश चंदनखेडे, मनोज तांबेकर, सुजय अवतरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या कर्मचार्‍यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली. यासोबतच विदर्भ अर्बन बॅंक को-ऑपरेटिव्ह असोसिएशननेही या घटनेचा निषेध नोंदविला आहे. बॅंकेतील मुख्य शाखेत घडलेल्या या घटनेनंतर मंगळवारी जिल्ह्यातील ११ शाखांतील कामकाज दिवसभर बंद होते. कर्मचार्‍यांनी बॅंकेसमोर निषेध फलक लाऊन आपला रोष व्यक्त केला.
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली असा आरोप याच बॅंकेतील निलंबित महिला कर्मचार्‍याने केला होता. यावरून मनसेच्या पदाधिकार्‍यांनी बॅंकेत जाऊन अध्यक्ष प्रफुल्ल भास्करवार यांना याबाबत जाब विचारला. महिला कर्मचार्‍याला पुन्हा नोकरीवर रुजू करून घ्या, अशी मागणी केली. चर्चेतून मनसे कार्यकर्त्यांंचे समाधान झाले नाही. यातून शाब्दिक चकमक उडाली. भास्करवार यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली व त्यांच्या अंगावर शाई फेकली होती.
16 जानेवारीपासून व्याघ्र गणना

16 जानेवारीपासून व्याघ्र गणना


संरक्षित आणि प्रादेशिक वनात 16 ते 23 जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना करण्यात येणार आहे. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून, एनटीसीए नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनात दर चार वर्षांनी ही गणना करण्यात येते. 
वाघ असलेल्या 17 राज्यांमध्ये ही गणना होत आहे. यंदा प्रथमच गोवा आणि नागालॅण्ड राज्याचा समावेश यात केला आहे. रेषा विभाजन (ट्रान्झीट लाइन) पद्धतीने ही व्याघ्र गणना करण्यात येणार आहे. 2006 पासून या प्रकारने गणना सुरू झाली आहे. 2006 मध्ये देशातील वाघांची संख्या 1411 तर 2010 मध्ये 1706 वाघांची नोंद झाली होती. यंदा प्रथमच गोवा, नागालॅण्ड, गडचिरोली, धुळे परिसरात व्याघ्र गणना करण्यात येत असल्याने आश्‍चर्यकारण आकडा समोर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

पहिल्या टप्प्यात वनविभागाने 5500 बीटमध्ये तृणभक्षकांची गणना केली आहे. प्रत्येक बीटमध्ये एक रेषा विभाजन पद्धती लावण्यात आली होती. वनमंत्र्यांनी राज्यात 200 पेक्षा अधिक वाघ असून, चंद्रपूर जिल्ह्यात 100 वाघ असल्याचे स्पष्ट केले आहे. 2005 मध्ये राज्यात 268 वाघ होते. ती संख्या 200 वर आल्यामुळे गेल्या आठ वर्षांत 68 वाघांची संख्या कमी झाली आहे. यामुळे शिकाऱ्यांनी वाघांना लक्ष्य केले आहे. 2010 मध्ये अनेक बीटमध्ये व्याघ्र गणना करण्यात आलेली नव्हती यंदा त्या बीटमध्येही गणना केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील गणनेत भारतीय वन्यजीव संस्थानचे चमू येणार असून, काही नमुनेही गोळा केले आहेत. आता आठ दिवसांच्या कालावधीत प्राथमिक स्तरावर ही माहिती गोळा करण्यात येणार आहे
एसटीचे कर्मचारी देणार सौजन्यपूर्ण वागणूक!

एसटीचे कर्मचारी देणार सौजन्यपूर्ण वागणूक!

चंद्रपूर, ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ अशा स्थितीला तोंड द्यावे लागत असलेले एसटी महामंडळ आता प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देणार आहे. महसूल वाढीच्या या नव्या प्रयत्नाला नव्या वर्षीच सुरुवात होत आहे.

त्यात महत्त्वाच्या १६ टिप्स चालक-वाहकांना पाठ कराव्या लागणार आहेत. नमस्कार, मी बसचा वाहक असून, आपले स्वागत करीत आहे. माझे सहकारी हे या बसचे चालक आहेत. ही बस इतक्या वाजता सुटून इतक्या वाजता पोहोचेल. आपली बस या मार्गाने जाणार, शेवटचे ठिकाण, मार्गात कुठे-कुठे ही बस थांबेल, यासह अन्य बाबींचा समावेश आहे.
चंद्रपूर- गडचिरोली विभागात सात डेपो आहेत. त्यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, चिमूर, वरोरा, गडचिरोली आणि अहेरी या डेपोंचा समावेश आहे. या सर्व डेपोतून दररोज बसगाड्यांच्या अडीच हजार फेर्‍या होतात. मात्र, डिझेलच्या वाढत्या किमती, टायर, मेंटेनन्स, कर्मचार्‍यांचे वेतन याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात चालले आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी ‘वाहकांचे प्रवाशांना सौजन्य- अभिवादन’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. चंद्रपूर-गडचिरोली विभागात ५३७ बसगाड्या आहेत. चालक एक हजार ४३, तर वाहक एक हजार दहा आहेत. या उपक्रमातून महामंडळाच्या उत्पन्नवाढीस मदत होईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी एस. एस. डाबरसे यांनी दिली.
रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यु

रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यु

वर्धा - धावत्या गाडीतून पडल्याने रेल्वेने कटून अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. सदर इसमाचे अंदाजे वय २0 वर्ष आहे. ही घटना काल (दि. ३१) रोजी सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरात घडली. तो दुरांतो एक्स्प्रेसमधून पडला.

Wednesday, January 01, 2014

शस्त्र बाळगणा-या दोघांना अटक

शस्त्र बाळगणा-या दोघांना अटक

चंद्रपूर,

 रामनगर पोलिसांनी अवैधरीत्या शस्त्र बाळगणा-या दोघांना अटक केली. आरोपींना अटक केलेले स्थळ आणि बाबूपेठ परिसरातील प्रत्यक्षदर्शी यांच्या म्हणण्यात बरीच तङ्कावत आहे. त्यामुळे एवढी मोठी कारवाई केल्यानंतरही पोलिसांना नेमके काय लपवायचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमवारी (ता. ३०) रात्री ७.४० वाजताच्या दरम्यान जुनौना चौकातील हनुमान मंदिराजवळ संतोषqसग जितqसग टाक (वय २५) आणि मुकुंदqसग खजाजqसग टाक (वय २६) यांना अटक करण्यात आली. या दोघांसह सहा जण शस्त्रानिशी दरोडा घालण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याच गुप्त माहितीच्या आधारे पोलिस त्यांना पकडण्यासाठी गेले. तेव्हा हे सर्व पळायला लागले. यात रामगनगरचे पोलिस निरीक्षक थोरात यांच्या पथकावर या गुंडांनी हल्ला केला. थोरात यांना जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलिस पथकातील काही कर्मचारी जखमी झाले. अटकेतील दोन आरोपींकडून लोखंडी सुरा, तलवार, मिरची पावडर हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
इन्ङ्को
गोकुल बारमध्ये नेमके झाले काय?
परिसरातील जनता त्रस्त असलेल्या गुंडांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बाबूपेठ जुनोना परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी मगोकुल बारङ्कमध्ये घडलेली घटना लपविण्याचा प्रयत्न का केला, असा सवालही त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. गोकुल बारमधील कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी बारचे शटर बंद केले. गुंडांना चोप दिला आणि अटक केली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी येथेच या दोघांना अटक केली. मात्र, ही माहिती पोलिस दडवीत आहे. जुनोना चौकाजवळील हनुमान मंदिराजवळ यांना अटक केल्याचे त्यांच्याकडून सांगितले  जात आहे. ज्या गोकुल बार परिसरातील शेकडो लोकांनी ही घटना याचि देही याचि डोळा बघितली असल्याने पोलिसांच्या सांगण्यानुसार ते आता खोटे ठरले आहे.
------------------------