काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 20, 2013

Monday, August 19, 2013

जोरदार पावसाची शक्यता

जोरदार पावसाची शक्यता

पूर्व विदर्भात वरुणराजा पुन्हा परतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गोंदिया, ब्रम्हपुरी, कुरखेडा येथे जोरदार पावसाची शक्यता आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमढा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सावली-चारगाव मार्गावर पाणी होते. त्यात सावलीहून चारगावकडे जाणारे चरणदास ढेकलू दरांजे (४०) हे वाहून गेले. त्यांना शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान , यंदाच्या पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एक जण वाहून गेला. गडचिरोली जिल्ह्यातील दोनशे एकर शेती धोक्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया , गोरेगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पुजारीटोला , कालीसरार व शिरपूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. संततधार पावसामुळे बाघ नदी व वैनगंगेला पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२०० एकरावर रेती , दगडाचा थर गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पावसाची नोंद सिरोंचा तालुक्यात झाली आहे. दरम्यान , २०० एकर शेतजमिनीवर चार फूट रेती आणि दगडाचा थर जमा झाला आहे.

सिरोंचा तालुक्यात बामणी , टेकडा , रोमपल्ली , जाफ्राबाद या भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नाल्यांमधून पाण्यासोबत वाळू आल्याने शेतात तब्बल तीन ते चार फुटाचा थर जमा झाला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी शेतीची पाहणी केली. शेतातील ही वाळू काढण्यासाठी मोठा खर्च येणार आहे.
सिकलसेलबाबत जनसुनावनी 21 ऑगष्टला

सिकलसेलबाबत जनसुनावनी 21 ऑगष्टला


     चंद्रपूर दि.19- सिकलसेलसंबंधी 21 ऑगष्टला दुपारी 3 वाजता बचत साफल्य भवन चंद्रपूर येथे जनसुनावणी आयोजित केली आहे.     बाल हक्क संरक्षण आयोग मुंबईचे सचिव अ.ना.त्रिपाठी हे या जनसुनावनीस उपस्थित राहणार आहेत.  तरी संबंधितांनी लेखी निवेदनासह व आवश्यक त्या पुराव्यासह 21 ऑगष्ट रोजी दुपारी 3 वाजता बचत साफल्य भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
                            


21,22 व 23 रोजी संच मान्यता शिबीराचे आयोजन

     चंद्रपूर दि.19- शिक्षण विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हयातील उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाचे संच मान्यता शिबीराचे 21, 22 व 23 ऑगष्ट 2013 ला सरदार पटेल महाविद्यालय, गंजवार्ड चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.   हे शिबीर पंचायत समितीनिहाय राहणार असून त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे.  21 ऑगष्ट रोजी पंचायत समिती मूल, भद्रावती, राजूरा, गोंडपिपरी व जिवती , 22 ऑगष्ट रोजी चिमूर, चंद्रपूर, बल्लारपूर, सिंदेवाही व नागभिड, तर 23 ऑगष्ट रोजी ब्रम्हपूरी, वरोरा, पोंभूर्णा, कोरपना व सावली या पंचायत समितीचे शिबीर असणार आहेत.
या शिबीरात जिल्हयातील अनुदानीत/विना अनुदानीत व कायम विना अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यानी संबंधित लिपीकासह दाखल खारीज रजिस्टर, टी.सी.फाईल, विद्यार्थी हजेरी रजिस्टर सन 2012-13 व 2013-14 व इयत्ता 11 वी ची मुल्यमापन पंजी 2012-13 व प्रपत्र फ ची माहिती व प्रपत्र अ, ब व क मध्ये माहिती DVB-TTSurekh या लिपीमध्ये तयार करुन हार्डकापीसह उपस्थित राहावे.  हे मान्यता शिबीर  या शैक्षणिक सत्रात फक्त एकदाच होत असल्याने कोणीही अनुपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच या संच मान्यता शिबीरात उपस्थित न झाल्यास नंतर आपले कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करुन देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.चंद्रपूर यांनी कळविले आहे.
                                          


  शासकीय आरे सरीता बुथ केंद्राचे वाटप

     चंद्रपूर दि.19- चंद्रपूर शासकीय दूध योजनेअंतर्गत सर्व शासकिय दूध वितरकांना या कार्यालयामार्फत चंद्रपूर व बल्लारशहा शहरात असलेल्या शासकिय दूध वितरकांना आरे सरीता पूर्णवेळ दूध विक्री केंद्र बूथ भाडे तत्वावर शर्ती व अटीच्या अधिन राहून वितरीत करण्यांत येणार आहे.  तरी जे इच्छुक वितरक बूथ घेण्यास तयार असतील त्यांनी आपले बूथ मागणी विषयीचे अर्ज या कार्यालयात 23 ऑगष्ट 2013 पर्यंत सादर करावे.  त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची वितरकांनी नोंद घ्यावी असे शासकीय दूध योजना चंद्रपूर दूग्धशाळा व्यवस्थापक एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
१५ वर्षो से बहाकर ले जा रहा उपजाऊ भूमि

१५ वर्षो से बहाकर ले जा रहा उपजाऊ भूमि


वेकोली के नाले से तटवर्ती किसान हलाकान
पल्ला झाड रहे वेकोलि अधिकारी

चंद्रपुर- भद्रावती तहसील के चारगांव स्थित तेलवासा ओपनकास्ट खदान ने वेस्टेज पानी वर्धा नदी में छोडने हेतु वर्ष १९९८ में नाला बनाया था. परंतु नाले के निर्माण में उचित तकनीकी का तथा सही ढंग से न होने के कारण नाला नदी में तब्दील हो गया है. जिसके कारण नाले के तट पर के खेतों को काफी नुकसान हो रहा है. संबंधित किसानों ने वेकोलि से खेतभूमि अधिग्रहित करने तथा नुकसान भरपाई देने की मांग की है परंतु वेकोलि प्रशासन अडियल रवैय्या अपनाते हुये कृषि भूमि वेकोलि के नाले से खराब न होने की बात कहकर अपना पल्ला झाड रहा है.
भद्रावती तहसील के ग्राम चारगांव के पास से वर्ष १९९८ के पहले किसी भी प्रकार का नाला अस्तित्व में नही था. परंतु १९९८ से वेकोलि ने चारगांव की खेतभूमि अतिग्रहित कर विस्तार बढाने का कार्य शुरू किया तबसे यहां के किसानों की परेशानियां बढती जा रही है. वेकोलि के नियोजन शून्य कार्य, मिट्टी के टीले (ओवरबर्डन), धूल तथा दिनभर की डम्परों की यातायात से खेतों की फसले नष्ट होती जा रही है. जिससे किसानों का काफी नुकसान हा रहा है. वर्ष १९९८ में तेलवासा ओपनकास्ट प्रोजेक्ट ने काम शुरू कर दिवान आसुटकर की सर्वे क्रमांक २३४, विठ्ठल आसुटकर की सर्वे क्रमांक २३३, संभाजी सातपुते की सर्वे क्रमांक २२५ व मधुकर सातपुते की सर्वे क्रमांक २२४ की भूमि भुमि अधिग्रहित कर वेकोलि का वेस्टेज पानी वर्धा नदी में छोडने हेतु नाला बनाया गया. इस नाले से भद्रावती, गवराला तथा ढोरवासा ओपनकास्ट का पानी वर्धा नदी में छोडा जाता है. परंतु यह नाला वर्ष १९९८ से कुछ किसानों के लिए सिरदर्द बन गया है. पिछले १५ वर्षो से तेलवासा ओपनकास्ट द्वारा बनाए गए नाले की दोनों ओर दीवार न बनाने तथा उचित तकनीक का प्रयोग न करने की वजह से हर बरसात  में उपजाऊ खेतों की मिट्टी बहाकर नदी में ले जा रहा है. जिसका खामियाजा नाले के तट पर स्थित किसान उध्दव दिना सातपुते की सर्वे क्रमांक २३२/१,  अल्पभूधारक कमलेश उध्दव सातपुते सर्वे क्रमांक २६१ तथा अल्पभूधारक प्रमिला दिना सातपुते सर्वे क्रमांक २३२/२, नागो टेकाम सर्वे क्रमांक २४९ व शामराव गोंड सर्वे क्रमांक २४७ को सहना पड रहा है. पिछले कई वर्षो से  बरसात के दिनों में तथा इस वर्ष ४ बार हुई अतिवृष्टि के चलते यह नाला ३० फिट गहराई की नदी में तब्दील हो गई. जिससे संबंधित किसानों की कई एकड खेतों का नुकसान हो रहा है.
किसानों की मांग
वर्ष १९९८ के पहले नाला नहीं होने के कारण किसी भी खेत को नुकसान नही होता था. परंतु नाले के बनते ही कई किसानों की खेतों की मिट्टी बहती जा रही है. संबधीत नाले को पुरी तरह से बंद किया जाए अन्यथा नाले के तट पर स्थित भूमि को अधिग्रहण करने की मांग की जा रही है.  
पल्ला झाड रहे वेकोलि अधिकारी
वेकोलि सर्वेक्षण विभाग के अधिकारी ने बताया कि यह खेत भूमि वेकोलि के नाले से नही बह रही है. तथा खेतभुमि को लेने हेतु खेत में कोयला होना आवश्यक है तथा कंपनी का विस्तार होना आवश्यक है. इसलिये वेकोलि अधिकारी अपना पल्ला झाड रहे है किंतु नाले से किसानों की उपजाऊ भूमि के साथ मिट्टी बहकर जा रही है.

Saturday, August 17, 2013

नागभीड न्यायालयातून आरोपी पळाला

नागभीड न्यायालयातून आरोपी पळाला

नागभीड येथील कारागृहातील आरोपी दीपक बंडू शेंडे  (वय २८) रा. नवेगाव हुंडेश्वर याला वाहनचोरीसह तीन प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याची १९ ऑगस्टपर्यंत कोठडी होती. १६ ऑगस्ट रोजी नागभीड येथील प्रथम श्रेणी दंडाधिका-यांच्या न्यालयालय हजार करण्यात आले. परत आणत असताना न्यायालयाच्या परिसरातून त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला.
चिमूर - नागभिडला नगर परिषदेचा दर्जा

चिमूर - नागभिडला नगर परिषदेचा दर्जा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा

पूरग्रस्तांच्या पूनर्वसनासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखणार

जिल्हा नियोजनचा 15 टक्के निधी पूरग्रस्तांसाठी राखीव



चंद्रपूर - चिमूर व नागभिड ग्राम पंचायतला नगर पालिकेचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज चिमूर येथे केली. राज्यातील इतर जिल्हा निर्मितीचा विचार होईल तेव्हा चिमूर जिल्हयाला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. चिमूर येथे आयोजित शहिद स्मृती दिन सोहळयात मुख्यमंत्री बोलत होते.

पालकमंत्री संजय देवतळे, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, खासदार मारोतराव कोवासे, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार, आ.सुभाष धोटे, आ.डॉ.नामेदव उसेंडी, आ.दिपक आत्राम व कॉग्रेसचे महाराष्ट्राचे सहायक प्रभारी बाला बच्‍चन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वातंत्र सैनिकांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार केला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किल्ला परिसरातील शहिद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर तहसिल कार्यालय येथे चिमूर शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदीकरणासह सिमेंट क्रांकीट रस्त्याचे भूमिपूजन, एकात्मिक प्रकल्प कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व भिसी-चिमूर-मासळ-कोलारा रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, पूरपरिस्थितीमुळे नागरिकांवर वारंवार विस्थापीत होण्याची वेळ येवू नये म्हणून पूरग्रस्तांच्या पूनर्वसणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखली जाईल. रेड लाईन व ब्ल्यु लाईन तसेच नदीच्या पात्रात नागरिकांनी घर बांधू नये असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. चंद्रपूर जिल्हयातील 29 मामा तलावाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून यासाठी 5 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. दुरुस्तीचे प्रस्ताव प्राप्त होताच आणखी तरतूद करण्यात येईल.
विदर्भातील नदयाच्या खोलीकरणाची महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येणार असून यासाठी निरीकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. यात चंद्रपूर येथील इरई व झरपट नदीचा समावेश आहे. नदी खोलीकरणासाठी नागपूर व अमरावती येथे 10 कोटी रुपये किंमतीची ड्रेझर मशिन ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे चंद्रपूरसह विदर्भात मोठया प्रमाणात शेत पिकाचे व घरांचे नुकसान झाले असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा नियोजनमध्ये 15 टक्के निधी राखून ठेवण्यात येणार आहे. या संबंधिचा शासन निर्णय निर्गमीत केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हयातील पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांना प्रशासनाने मदत करण्यात येत असून मृतकांच्या नातेवाईकांना आपण स्वत: मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपयाची अतिरीक्त मदत केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या समतोल विकासाचा अभ्यास करण्यासाठी केळकर समितीची स्थापन केल्याचे सांगून विदर्भाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात विदर्भाला झुकते माप दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मिहान मध्ये जागतिक किर्तीच्या कंपन्या येण्यास सुरवात झाली असून यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतक-यांना सरळ हाताने मदत करण्याची भूमिका शासनाने स्विकारली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. तातडीची मदत म्हणून 400 कोटी , रस्ते व शासकीय इमारतीच्या दुरुस्तीसाठी 600 कोटी व कायमस्वरुपी पूनर्वसणासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद अधिवशेनात घोषित केलेल्या पॅकेजमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. कायमस्वरुपी पूनर्वसणासाठी जिल्हा व तालुक्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री संजय देवतळे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोहयोमंत्री नितीन राऊत, खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार नामदेव उसेंडी व बाला बच्‍चन यांची यावेळी भाषणे झाली. चिमूर जिल्हा निर्मितीसह चिमूर,नागभिड ग्राम पंचायला नगर पालिकेचा दर्जा दयावा अशी मागणी कार्यक्रमाचे आयोजक आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रास्ताविकात केली.

तहसिल कार्यालय येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, आदिवासी अप्पर आयुक्त पल्लवी दराडे, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर व अधिक्षक अभियंता बळवंत लुगे याचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बक्षीस वितरण सोहळा १८ आगस्त रोजी

बक्षीस वितरण सोहळा १८ आगस्त रोजी


चंद्रपूर : ऑर्बिट सायन्स अ‍ॅकडमी ऑफ एज्युकेशनच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या आठवी ते दहावीच्या विद्याथ्र्यांसाठीच्या विज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १८ आगस्त रोजी सुजल डीएड कालेज रामाला तलाव रोड येथे होत आहे
कार्यक्रमाचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी बडकेलवार यांच्या हस्ते होत असून, अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कुक्कु सहानी राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑर्बिट सायन्स अ‍ॅकडमी ऑफ एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक पुरषोत्तम चौधरी, बहुजन लल्कारचे संपादक डी के आरीकर, चंद्रपूर टाईम्स चे संपादक राजेश सोलापण, नगरसेवक धनंजय हूड, समाजसुधारकचे प्रमुख नितीन पोहाणेसंपादक शंकरभाऊ झाडे, प्रा. अविनाश काळे, स्वप्नील दोन्तुलवार यांची उपस्थिती राहील.  
चंद्रपूर तालुका सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने संचालित येथील आर्बिट सायन्स अकॅडमी ऑफ एज्युकेशनच्या वतीने १९ मे रोजी स्थानिक मातोश्री विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आठवीनववी आणि दहावीच्या सुमारे २५० विद्याथ्र्यांना सहभाग घेतला होता. विद्याथ्र्यांना भावी शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षाप्रवेश पूर्व परीक्षांचा सराव होण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गणितविज्ञान आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेचा निकाल नुकताच संस्थेने जाहीर केला आहे. यात वर्ग आठवीतून प्रथम यश अविनाश बांगडेद्वितीय ओशीन यशवंत पाचभाईतृतीय शिवानी राजीव धकातेवर्ग नववीतून प्रथम रुपमदिलीप वासेकरद्वितीय गायत्री राजीव विठोलकरतृतीय गौरव लभानेवर्ग दहावीतून प्रथम नितीन रघुनाथ पेंदामद्वितीय स्नेहा पांडुरंग बोढाणेतृतीय सोमेश विनोदराव आदेवार यांचा समावेश आहे. प्रथम क्रमांकांच्या यशस्वी विद्याथ्र्यांस दोन हजार ५१ रुपयेद्वितीय एक हजार ५१ आणि तृतिय क्रमांकाच्या विद्याथ्र्यांस ५५१ रुपये बक्षिसासह सन्मानचिन्ह देण्यात येईल. सहभागी विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे..

Friday, August 16, 2013

पावसाने जिल्ह्याला झोडपले

पावसाने जिल्ह्याला झोडपले

चंद्रपूर- आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु केलाय. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे.

अचानक सुरु झालेल्या कोसळधारेने नागरिकांना उसंत घेऊ दिली नाही. या पावसाने चंद्रपूर- बल्लारपूर वळण मार्गावर पाण्याचे लोंढे आल्यानं वाहतूक विस्कळीत झालीय. तर शहरातून वाहणा-या झरपट नदीनं विशाल रूप धारण केलंय. या नदीच्या किना-यावर राहणा-या नागरिकांना रात्रीच अन्यत्र आश्रयासाठी जावं लागलंय.

काही भागात पोहचणंच अशक्य असल्याने या भागातील शाळांना नाईलाजानं सुटी जाहीर करावी लागलीय. शहरातल्या अनेक भागात पावसाच्या तडाख्यानं शेकडो घरं कोसळल्याच्या घटना पुढे येत असून या पावसानं चंद्रपूरचं जनजीवन विस्कळीत झालंय.

चंद्रपूर- १५०
मुल  २३
गोंडपिपरी-१६७
सिसदेवाही-७६
राजुरा-९८
बल्लारपूर-७०
पोंभुर्णा ११२
जिवती- १४५
पूरग्रस्तांना मदत करण्यास शासन कटिबध्द - पालकमंत्री

पूरग्रस्तांना मदत करण्यास शासन कटिबध्द - पालकमंत्री

चंद्रपूर- जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समांरभात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, खासदार हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भाषणाच्या सुरवातीला उत्तराखंड येथील घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना आणि बचाव व राहत कार्य करतांना शहिद झालेल्या सैनिकांना त्यांनी श्रध्दाजंली अर्पण केली. जिल्हयात अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियाप्रती संजय देवतळे यांनी सांत्वना व्यक्त केली.

पूरपरिस्थितीमुळे शेतक-यांच्या 1 लाख 98 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर 15 हजार 512 घरांचे अंशत: किंवा पूर्णत: नुकसान झाले आहे. या सर्वांच्या पाठीशी शासन उभे असून नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत वाटप सुरु आहे. अतिवृष्टीमुळे 25 नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतकांच्या नातेवाईकांना 37 लाख 50 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री निधीतून 1 लाखाची अतिरीक्त मदत घोषित करण्यात आली असून मृतांपैकी 18 व्यक्तिंच्या वारसांना 18 लाखाचे वाटप करण्यात आले तर उर्वरित वाटप निधी प्राप्त होताच करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हयात चिमूर, मूल व गोंडपिपरी हे तीन नवीन महसूल उपविभागीय कार्यालय 15 ऑगष्टपासून म्हणजे आजपासून कार्यान्वित होत आहेत. यापूर्वी ब्रम्हपूरी, चंद्रपूर, वरोरा व राजूरा हे उपविभागीय कार्यालय होते. नवीन तीन कार्यालय झाल्यामुळे कामकाजात सुसुत्रता येवून नागरिकांना अधिक चांगल्या सोईसुविधा पुरविण्यात मोलाची मदत होणार असल्याचे देवतळे म्हणाले.

सन 2013-14 साठी सर्वसाधारण योजना 136 कोटी, आदिवासी उपयोजना 126 कोटी 11 लाख 84 हजार व अनुसूचित जाती उपयोजना 49 कोटी 98 लाख असा एकूण 312 कोटी 9 लाख 84 हजार रुपये नियतव्यय मंजूर असून या निधीमधून जिल्हयाच्या विकासाच्या विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



चंद्रपूर जिल्हयाच्या प्रदूषण समस्या दुर करण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शास्त्रीय दृष्टया कृती आराखडा शासन तयार करणार आहे. तो राज्यातील सर्व जिल्हयांना मार्गदर्शक ठरेल असा बनविला जाणार आहे. पालकमंत्री संजय देतवळे यांनी विविध विभागानी जिल्हयात केलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी भाषणातून घेतला. यावेळी विविध पुरस्काराचे वितरण पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांचा विशेष पदक देवून पालकमंत्री संजय देवतळे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमास स्वातंत्र सैनिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Sunday, August 11, 2013

वन्यजीव प्रेमींनी श्रमदानातून बांधला बंधारा!!

वन्यजीव प्रेमींनी श्रमदानातून बांधला बंधारा!!



चंद्रपूर- आजूबाजूला असलेल्या जंगलातील प्राणी पान्या अभावी उन्हाळ्यात शहरी वस्तीकडे धाव घेतात. परिणामी मनुष्य-प्राणी संघर्षामुळे अनेकदा मनुष्य किंवा प्राणी निशाकरण बळी ठरतात. यासाठी जंगलातील जलसाठे संपूर्ण उन्हाळाभर कसे सुरक्षित ठेवता येतील यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते.

लोहारा जवळील जंगलात रेल्वे रूळा लागत मोठा नैसर्गिक तलाव आहे. हा तलाव लोहारा जुनोना मार्गावरील घनदाट जंगलातील वन्य प्राण्यांची तहान भागविणारा एक महत्वाचा जलसाठा आहे. वर्षभर येथे लक्षणीय प्रमाणात संरक्षित प्रजातीच्या वन्य प्राण्यांची भ्रमंती सुरु असते. यामुळे हा तलाव एक महत्वाचे स्थळ आहे. पण प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातील काळात हा तलाव पूर्ण पाने आटतो.
या तलावाचे पाणी संपल्यावर उन्हाळ्यात प्राणी येथून पाण्याच्या शोधत बाहेर पडतात. जवळच असलेल्या लोह खनिज कारखाना व अष्टभुजा मदिर परिसरातील वस्ती मध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्या सोबत मानव संघर्ष होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या होत्या. जर जंगलातील पाणी साठे वर्षभर पुरले तर प्राणी बाहेर येणार नाहि. यामुळे मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष टळेल. दोन वर्षापूर्वी अष्टभुजा मंदिर परिसरात एका बिबट्याच्या पिल्लाला संतप्त जमावाने काठ्या व दगडांनी ठेचून मारले.

हे सर्व प्रकार बघता जंगलातील जलसाठे वर्षभर टिकविणे हे गरजेचे आहे.
या तलावाची खोली वाढविण्याच्या दृष्टीने या आधी विचार करण्यात आला पण तो प्रत्यक्षात होऊ शकला नाहि. अखेर सोपा व त्वरित उपाय म्हणून चंद्रपूर येथील ग्रीन प्ल्यानेट सोसायटी च्या कार्यकर्त्यांनी या तलावाची फुटलेली एक बाजू बुजवून पाणी अडविण्याचे ठरविले.
या योजनेवर दोन दिवस टप्प्या टप्प्याने काम करून अखेर तलावाचे पाणी वाहून जाणे थांबविण्यात आले. जवळच असलेले दगड व मुरूम याचा वापर करून येथे ९ ऑगस्ट ला बंधारा बांधण्यात आला.
जेथून एक मोठा पाण्याचा लोट वाहून जात होता त्या ठिकाणी बांध अडवणूक केल्याने पाणी जाणे बंद झाले आहे. परिणामी जलसाठ्यामध्ये ६ ते ८ इंच वाढ झाली असून हे पाणी जून च्या दुसर्या आठवड्या पर्यंत पुरावे अशी आशा व्यक्त होत आहे.
ग्रीन प्लानेट सोसायटी चे प्रा. सुरेश चोपणे व प्रा. सचिन वझलवार यांच्या सोबत दिनेश खाटे, तुषार लेनगुरे, जितु नोमुलवार, सचिन अटकारे, मंगेश येल्ललवार, विवेक शेंडे व इतर तरुणांनी श्रम दानातून हा बंधारा निर्माण केला.
नव्या जिल्ह्यांची निर्मिती व्हावी

नव्या जिल्ह्यांची निर्मिती व्हावी

चंद्रपूर- विदर्भातील अकरा जिल्ह्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २ कोटी ३० लाख आहे. नागपूरमधून काटोल, अमरावतीमधून अचलपूर, यवतमाळमधून पुसद, बुलडाण्यातून खामगाव, चंद्रपूरमधून ब्रह्मपूरी व चिमूर, वर्ध्यातून आष्टी तर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी या नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी आक्रमकपणे पुढे आली आहे. राज्यात युती शासनाच्या काळात १४ वर्षांपूर्वी गोंदिया व वाशीम या जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्यानंतर एकही नवा जिल्हा अस्तित्त्वात आलेला नाही.
 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी विशेष परिमाण नसते. प्रशासकीय दृष्टीने सोईचे जावे म्हणून जिल्हा मुख्यालयापासून त्या जिल्ह्यातील गावांचे अंतर, लोकसंख्या, गावे, सुपिक जमीन, आर्थिक स्थिती हे घटक लक्षात घेतले जातात. एखादा भाग घनदाट जंगल किंवा माओवाद्यांच्या समस्यांनी प्रभावित असेल तर तेथे प्रशासकीय समन्वय हा मुद्दा महत्वाचा समजून छोट्या जिल्ह्यांची निर्मिती होते. 
छोटी राज्ये विकासासाठी अनुकुल असतात, क्षेत्र मर्यादित असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते असे म्हणत वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे. त्याच वेळी जिल्ह्यातील प्रशासन सुकर व्हावे म्हणून मोठ मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजनाचा प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायमच आहे. विदर्भाचाच विचार केला तर आठ नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीकडे जनता डोळे लावून बसली आहे.
तेलंगणा राज्य निर्मितीचा विषय ऐरणीवर आल्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला गती मिळाली आहे. छोटे राज्य प्रशासनासाठी उत्तम असतात असा युक्तिवाद केला जात आहे. त्याच वेळी विदर्भातील प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यांकडे आणि त्यांच्या विभाजनाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांना महाराष्ट्राच्या राजधानीपेक्षा देशाची आणि छत्तीसगड व मध्यप्रदेशाची राजधानी जवळ आहे. यवतमाळ आणि गडचिरोली हे दोन जिल्हे असे आहेत की ज्यांचे क्षेत्रफळ गोव्यासारख्या राज्यापेक्षा अधिक असावे.
विदर्भातील अकरा जिल्ह्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २ कोटी ३० लाख आहे. नागपूरमधून काटोल, अमरावतीमधून अचलपूर, यवतमाळमधून पुसद, बुलडाण्यातून खामगाव, चंद्रपूरमधून ब्रह्मपुरी व चिमूर, वर्ध्यातून आष्टी तर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी या नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी आक्रमकपणे पुढे आली आहे. राज्यात युती शासनाच्या काळात १४ वर्षांपूर्वी गोंदिया व वाशीम या जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्यानंतर एकही नवा जिल्हा अस्तित्त्वात आलेला नाही.

मागण्यांचे निकष...

नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी विशेष परिमाण नसते. प्रशासकीय दृष्टीने सोईचे जावे म्हणून जिल्हा मुख्यालयापासून त्या जिल्ह्यातील गावांचे अंतर, लोकसंख्या, गावे, सुपीक जमीन, आर्थिक स्थिती हे घटक लक्षात घेतले जातात. एखादा भाग घनदाट जंगल किंवा माओवाद्यांच्या समस्यांनी प्रभावित असेल तर तेथे प्रशासकीय समन्वय हा मुद्दा महत्त्वाचा समजून छोट्या जिल्ह्यांची निर्मिती होते.

Friday, August 09, 2013

चिमूर क्रांती जिल्हयाच्या मागणीसाठी तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा

चिमूर क्रांती जिल्हयाच्या मागणीसाठी तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा

चिमूर/ प्रतिनिधी :- मागील ३७ वर्षापासून चिमूर क्रांती जिल्हयाच्या मागणीसाठी विविध आंदोलने सुरुच असून २००२ साली भव्य मोर्चाचे रुपांतर तहसिल जाळपोळ प्रकरणात झाली होती व त्यानंतरही ऐतीहासीक व स्वातंत्र्यापुर्व स्वातंत्र्याचा उपभोग घेणाèया चिमूर क्रांतीला जिल्हा घोषीत करण्यात यावे यासाठी विविध आंदोलन करण्यात आली. परंतु सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला व स्थानिक लोकप्रतिनिधींना जिल्हा करण्यात यश न आल्याने चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचा आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकला.

चिमूर जिल्हा कृती समितीव्दारे आयोजीत सर्वपक्षीय मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, सुनिल मैंद, अरुण लोहकरे, सुनिल दाभेकर, राजेंद्र कराळे, राजु लोणारे, सुधीर पंदीलवार, डॉ. दिलीप शिवरकर, जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजुकर, गजानन बुटके, सुधीर जुमडे, सौ. अथरगडे, सौ. वर्षा शिवरकर, सुमनताई qपपळापूरे, जि. प. सदस्या अल्का लोणकर, धनराज मुंगले, वसुधा नाकाडे, प्रदिप बंडे, संतोष महाकाळकार, जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे गुरुजी, सचिन पचारे, भाउराव दांडेकर आदी हजारों नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

मोर्चाची सुरुवात दुपारी १२ वाजता स्थानिक श्रीहरी बालाजी महाराज मंदिरासमोरुन मोर्चाला सुरुवात झाली. स्वातंत्र लढयात प्रथम स्वातंत्र्याची फळे चाखणाèया चिमूर क्रांतीभुमीत शहीदांना नमन करण्याकरीता तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरqसहराव, तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार qशदे अनेक मंत्री व राज्यमंत्री यासह अनेक मंत्र्यानी या चिमूर भुमीत येवुन आश्वासने दिलीत. तर सध्या राज्यात व देशात काँग्रेसची सरकार असल्याने तसेच नुकतेच तेलंगणा राज्याची निर्मितीची घोषणा काँग्रेसने केल्याने विदर्भ राज्यासह चिमूर जिल्हयाच्या जुन्या मागणीला पुन्हा जनआंदोलनाचे रुप प्राप्त होत असून १ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत साखळी उपोषण व आज ९ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. चिमूरचे तहसिलदार निलेश काळे हे मोर्चाला सामोरे जावुन शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले. आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारच्या आश्वासनाने चिमूर परिसरातील जनतेत असंतोष खदखदत असून आंदोलन तिव्र करण्याचा मानस चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीने केला असून १३ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.
२०१४ मध्ये चिमूर जिल्हा : क्रांती दिन सोहळा

२०१४ मध्ये चिमूर जिल्हा : क्रांती दिन सोहळा

चिमूर-भगतqसग, राजगुरु, सुखदेव व इतर थोर क्रांतीकारकांच्या त्याग बलीदानातुन देशाला मिळालेले स्वातंत्र्य आबादीत राखण्याची लायकी केंद्र व राज्य सरकारची नसल्याने देशात सिमेच्या आत येवुन पाकीस्तानने भारतीय सैनिकांनी केलेली हत्या हे केंद्र सरकारचे नाकर्तेपणा होय असे प्रतिपादन आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी चिमूर क्रांती सोहळयात आपले प्रमुख मार्गदर्शनात केले तर २०१४ मध्ये भाजप-सेनेची सरकार सत्तेवर येणार असून चिमूर जिल्हा घोषीत झालेला दिसेल असे आश्वासन दिले.
चिमूर क्रांतीदिन कृती समिती व युवाशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत क्रांती दिन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा वनराईचे अध्यक्ष गिरीष गांधी, कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, प्रमुख अतिथी आमदार मितेशजी भांगडीया, आ. सुधीर पारवे, चंद्रपूरचे जि. प. अध्यक्ष संतोष कुमरे, जि. प. गडचिरोलीचे अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, माजी आमदार अशोक नेते, अर्थ व बांधकाम सभापती गुणवंत पाटील कारेकार, जि. म. स. चे संचालक सुरेश दहीकार, युवाशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास बानबले, जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रभाकरराव जोशी, सोनकुसरे, जेष्ठ नेते डॉ. दिपक यावले, दत्ता बोरीकर, मजहर शेख, स्त्रीशक्ती संघटनेचे मनीषा कावरे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

शहीदांना विनम्र श्रध्दांजली अर्पण करुन जेष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिक प्रभाकरराव जोशी, सोनकुसरे यांचा सत्कार, गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार, सामाजिक कार्यात कार्य करणाèया जेष्ठ नागरिकांचा सत्कार, तिन रुग्णवाहिकेचे लोकार्पण, वृक्षरोपन, वृक्षqदडी आदी कार्यक्रमाने क्रांती दिन सोहळा संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना सामाजिक कार्यकर्ते गिरीष गांधी म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला कोणत्याही पक्षावर विश्वास राहीलेला नसून मी समाजासाठी काय करतो, मी काय केले पाहीजे हे अत्यंत महत्वाचे असून माणसाच्या मनातील विचार बदललेले पाहीजे तेव्हाच गावाचा व परिसराचा विकास होईल अशा आशावाद दिर्घ सामाजिक बांधीलकेतुन गिरीष गांधी यांनी व्यक्त केला.

तर कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते विनोद तावडे म्हणाले की, दिल्लीतील बलात्कार असो वा गल्लीतील. माणसाची विचारक्षमता कमकुवत असली की असे प्रकार वाढत जाते. तर स्वातंत्र्य हे त्याग, बलीदानातुन मिळालेले असून यासाठी भगतqसग, राजगुरु, सुखदेव व इतर थोर क्रांतीकारकांसह चिमूरचे शहीद बालाजी रायपुरकर यांच्या बलीदानातुन मिळालेले स्वातंत्र आज देशातील सरकार टिकविण्याचे लायकीचे नसून दुश्मन असलेला पाकीस्तान भारताच्या हद्दीत घुसुन भारतीय जवानांची हत्या करतो, आणि करंटे सरकार बघ्याची भुमिका घेतात, सडोतोड उत्तर देण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही तर ज्या क्रांतीभुमीने स्वातंत्राची ज्योत पेटवुन देशाला स्वातंत्र मिळवुन दिले. त्या भुमीची अवस्था काय आहे ते ही पाहता आले. चिमूर क्रांती जिल्हयाची मागणी ही करंटे सरकार करु शकले नाही. तेव्हा २०१४ मध्ये भाजपा-सेना युतीचे सरकार सत्तेवर येईल व चिमूर जिल्हा घोषीत करु असे आश्वासन विनोद तावडे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

याप्रसंगी भाग्यश्री आत्राम जि. प. अध्यक्ष गडचिरोली, आमदार मितेशजी भांगडीया, डॉ. दिपक यावले आदी मार्गदर्शनपर भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजहर शेख यांनी केले तर आभार माजी सभापती प्रकाश वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय सैन्यांना व उत्तराखंडातील शहीदांना मौन श्रध्दांजली वाहुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.