সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 25, 2017

SBI ग्राहकांना खुशखबर..


प्रतिनिधी:
भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना खात्यावर ठेवाव्या लागणाऱ्या शिल्लक रकमेची अट कमी करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या ग्राहकंसाठी सुट देखील दिली आहे.5 हजार ऐवजी कमीत कमी 3 हजार रुपये ग्राहकांना आपल्या खात्यावर ठेवावे लागणार आहे.मेट्रो आणि अर्बन शहरांना आता एकाच नियमात ठेवण्यात आले आहे.तसेच किमान शिल्लक रक्कम शुल्कातही 20 ते 50 टक्के कपात करण्यात आली आहे.मिनिमम बॅलेन्स चार्जही 20 ते 50 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.निमशहरी आणि ग्रामीण भागात तो 20 ते 40 रुपयांदरम्यान असेल.तर मेट्रो आणि अर्बन सिटीमध्ये तो 30 ते 50 रुपयांदरम्यान असेल.

बॅंक आता अल्पवयीन मुले,पेन्शनधारक आणि अनुदानासाठी खाते उघडणाऱ्यांकडूनही किमान शिल्लक रकमेसाठी दंड वसूल करणार नाही.एसबीआयने याचा 5 कोटी ग्राहकांना फायदा होईल असे म्हटले आहे.
तसेच खाते कन्वर्ट केल्यावर कोणत्याच प्रकारचे चार्ज लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हा नियम ऑक्टोबर महिन्यापासून लागू होईल. बॅंकेच्या नव्या नियमांचा फटका गरिबांना बसत असल्याने त्यावर विविध स्तरावरुन टीका होत होती. त्या नंतर हा निर्णय घेण्यात आला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.