সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 26, 2017

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

सावली: मानधनाबाबत असलेल्या टास्क कन्फ र्मेशन या जाचक अटीमुळे मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संगणक परिचालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सावली तालुक्यातील संगणक परिचालक २५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले. यासंदर्भात संवर्ग विकास अधिकाºयांना निवेदनही देण्यात आले.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातंर्गत कार्य करणाºया ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांना फे ब्रुवारी २०१७ पासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली. टास्क कन्फ र्मेशन म्हणजे परिचालकाला स्वत: केलेल्या संपूर्ण कामाची माहिती कंपनीला दिल्यानंतरच मानधन मंजूर होईल. मात्र सहा महिने झाले, तरी समस्या सुटली नाही. कंपनीने टास्कबाबतचे प्रशिक्षण देऊनही ंसगणक परिचालकाचे मानधन मागील सहा महिण्यांपासून देण्यात आले नाही. याबाबत संबंधीत विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कमी केलेल्या परिचालकांना कामावर घ्यावे, सामाजिक सुरक्षा द्यावे, संग्राम प्रकल्पामध्ये सर्व स्तरावरील संगणक परिचालकांना सामावून घ्यावे, टास्क कन्फ र्मेशन अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संगणक परिचालक संघटनेतर्फे सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व संगणक परिचालक सहभागी झाले आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.