সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 25, 2017

राजकारणाचा नैतिकतेशी संबंध ?

     'सत्ता ही अशी क्षमता आहे की ज्याद्वारे इतरांवर आपली इच्छा लादणे आणि आज्ञापालन न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करता येते' ही शोरजन बर्गन यांची सत्तेची व्याख्या विद्यमान भाजप सरकारच्या सत्तेला तंतोतंत लागू पडते. 'भारताचे'(?) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातील राजकारणाचे मेरू मणी श्री शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची विचारणा केली आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन शुवसेनेचे खासदार व सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हंटले आहे, हे शिवसेनेचे इंद्रिय भ्रम आहे की चित्त भ्रम? हा बुद्धिजीवींना पडलेला प्रश्न आहे कारण यात तथ्य के ते मोदी, पवार आणि राऊतांनाच माहीत. शिवसेनेचे म्हणजे त्या लहापणीच्या 'लांडगा आलरे लांडगा आला' गोष्टीप्रमाणे होऊ नये म्हणजे झालं, जेंव्हा पासून केंद्रात आणि राज्यात भाजप ची सत्ता आली आहे तेंव्हा पासून शिवसेना वेळोवेळी सांगत आहे, "भाजप आणि राष्ट्रवादी मिळालेरे मिळाले " पण अद्याप पर्यंत तर असे 'उघडपणे'(?) काही झालेच नाही, आणि आगामी काळात जर आसे झालेच तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर चालणाऱ्या शिवसेनेचे काय होईल हे चांगल्या प्रकारे आपल्याला व शिवसेनेलाही माहीत आहे. म्हणून हे आशा प्रकारचे भ्रम शिवसेनेला होत असतील कारण शरद पवार व सुप्रिया सुळे मात्र या वर काहीही बोलत नाहीत.
                        त्यापेक्षा उलट स्थिती ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीची घोषणा केली जाते यातून तर राऊत साहेब म्हणतात हे तथ्य असेल तर भाजपच्या केंद्रीय व राज्याच्या नेतृत्वात मत भेद आहेत म्हणायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायला भाजप च्या राज्यातील काही नेत्यांनी टाळले आहे कारण त्यांनी निवडणूकच राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस वर भ्रष्टाचाराचे स्वैर आरोप व टीका करून जिंकले आहेत आणि याना पर्याय म्हणूनच तर महाराष्ट्राने जवजवळ एकहातीच भाजपला सत्तेवर बसवले आहे. आणि जर त्यांनाच जर सत्तेत सामील करून घेतले किंवा आगामी काळात हातमिळवणी केली तर महाराष्ट्राच्या जनाधाराचा अवमानच म्हणावे लागेल. पण शिसेनेचे सत्तेत राहूनही वेळोवेळी होत असलेल्या विरोधाच्या नौटंकी ला कंटाळलेले भाजपच्या केंद्रीय सुत्रधरांची राष्ट्रवादीशी वाढत चालली जवळीक आपल्याला अवघड होऊ नये म्हणून तर भाजपातील काहींना व शिवसेनेला खपत नसेल म्हणून तर सुनील तटकरे ची चौकशी होणार हे जाहीर करून भाजपच्या केंद्रीय नेत्रत्वाला सावधानतेचा इशारा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपने केला आहे. हे सगळे युती आघाडीचे 'खेळ' पाहून अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ओरबेन यांनी लिहिलेले वाक्य आठवतो व ते खरही आहे, "Illegal aliens have always been a problem in the United States. Ask any Indian."
                            'कोणाला कशाचे तर बोडकीला केसाचे' या म्हणी प्रमाणे शिवसेनेला तर फक्त सत्तेचंच पडलेलं आहे कुठल्याही परीस्थितीत भाजप आम्हाला सोडू नये याची पूर्ण काळजी सेना नेतृत्व मागच्या काही वर्षांपासून घेत आलेलं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवेळेस जे घडले आहे ते आपल्याला सर्वांना माहीत आहे तरी सेना भाजपलाच चिटकून आहे , भाजपच्या प्रत्येक उपक्रमाचा विरोध करणार, त्यांच्या नेत्यांवर टीका करणार, त्यांच्याच विरोधातील आंदोलनात सहभागी होणार, तरीही भाजपलाच चिटकून राहणार हे केवळ सत्तेपायी नाही तर काय? आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजीली आहे ती म्हणजे मोठमोठ्या नेत्यांच्या पक्षांतराने, काही नेते असे आहेत की ज्यांना सत्तेचं पांघरून पांघरल्याशिया झोपच येत नाही, त्या मुळे ते ज्या पक्षाची सत्ता आहे किंवा ज्यांची सत्ता येण्याची शक्यता असते त्या पक्षात सगळी नैतिकता विसरून खुशाल येण्यास तयार होतात यांच्यात सध्या अग्रेसर आहेत नारायण राणे. भाजपला ही अता सेना नकोशी झाली आहे त्यामुळे राणे सारख्या थोडेफार जनसमुदाय पाठीमागे असणाऱ्या नेत्यांची गरज आहे. करण भाजपात पूर्वीपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते खूप कमी व आयात केलेले आणि मोदी लाट पाहून पक्षांतर केलेले नेतेच जास्त आहेत. 'निष्ठावान' हे शब्द राजकीय करकीर्दीती राणे साहेबांनी किती खरा ठरविला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता नांदेड महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत मागच्या काही महिन्या पासून तेथेही बरेच विद्यमान नगरसेवक पक्षांतर करत आहेत, तेही भजपातच आणि भाजपलाही त्यांच्या शिवाय पर्याय नाही. दोन्ही काँग्रेस च्या बड्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी म्हणजे 'कोपऱ्याला गुळ लावल्यागत आहे जेणेकरून त्या इसमाला गुळ खतही येऊनये पण त्याच्या जवळ माश्या हमखास राहायला पाहिजे. या प्रमाणेच भाजप महाराष्ट्रातील जनतेसोबत वागत आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मधील बऱ्याच बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे  सदैव आरोप करणारी भाजपवासी मंडळी चौकशी का करत नाहीत उदाहरण घ्यायचे असतील तर भरपूर आहेत, जसे अजित पवार, अशोक चव्हाण, नारायण राणे, धनंजय मुंडे, सुरेश कलमाडी, सुनील तटकरे आशा किती तरी लोकांवर आरोप करत भाजप ने सत्ता मिळविली आणि आता त्यांनाच पक्षात या किंवा आम्ही म्हणतो ते मंत्रिपद घ्या म्हणत आहेत अन्यथा आम्ही चौकशी करू. हे असे सत्ते साठी राजकीय नेते व पक्ष लोकांचा 'अंध' विश्वासघात करून, फक्त संगण्यापूरतेच असलेले तत्व, विचारधारना, सिद्धांत, जाहीरनामे व आश्वासने यांचा काचेचा मनोरा पायदळी तुडवून इकडून तिकडे धावपळ करतात. हे सर्व गढूळ प्रकार पाहून इटलीचे राज्यकर्ते व तत्त्ववेत्ते निकोलो यांनी सांगितलेली ओळ अगदी खरी आहे असे वाटते ते म्हणतात, "Politics have no relation to morals."  

लेखक- शिवाजी बळीराम जाधव
            दावनगीरकर- ७५८८२१०१४३

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.