সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 14, 2013

गोंडकालीन नगरीला दुर्गंधीचा घेरा

बल्लारपूर : एक ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर
आदिवासी गोंड राजे बल्लाळशाह यांच्या नावावरून ओळखले जाणारे बल्लारशा आता बल्लारपूर म्हणून प्रचलित आहे. १३२२ ते १४९७ या काळात सात गोंड राजांनी याच राजधानीतून राज्यकारभार केला. त्या दृष्टीने प्राचीन ऐतिहासिक वारसा या शहराला लाभला आहे. हे शहर चंद्रपूरच्या आग्नेयेस १६ किमी., नागपूर-मद्रास लोहमार्गावर, वर्धा नदीकाठी वसले आहे. येथील कागद कारखाना, कोळसा खाणी व लाकडाची बाजारपेठ, यामुळे हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. रेल्वेस्थानक, वनविभाग आगार, वनविकास महामंडळाच्या नावात जुने मबल्लाळशाङ्क हेच नाव आजही कायम आहे.


गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह             
गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह याच्या कारकिर्दीत गोंड राज्याची राजधानी (इ. स. १४३७ ते ६२) येथे होती. येथील झरपट नदीच्या पाण्यामुळे या गोंड राजाच्या अंगावरील व्रण व खांडके गेली आणि म्हणून या गावी त्याने आपली राजधानी वसविली, अशी एक दंतकथा रूढ आहे. खांडक्या बल्लाळशाहच्या कारकिर्दीत शहराची भरभराट झाली होती. येथील ऐतिहासिक किल्ला, राजवाडा, बल्लाळशाह व त्याच्या राणीच्या स्मारकाचे अवशेष इ. गोष्टी गतकालीन वैभवाची साक्ष देतात. वर्धा नदीच्या काठावर भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. शहरामधील वस्तीच्या एका बाजूला असलेला किल्ला मुख्य रस्त्यापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे. प्रवेशद्वारापासून जवळच केशवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेली; पण मूळ शिशाची असलेली केशवनाथाची मूर्ती होती. इ. स. १८१८ च्या वेळी झालेल्या युद्धाच्या धामधुमीमध्ये ही मूर्ती चोरीला गेली. तेव्हा भोसल्यांनी तेथे नेमलेल्या कमावीसदार पुंजपाटील मोरे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन दगडी मूर्ती बसवली.
बल्लारपूर किल्ल्याच्या पहिल्या दारातून आत शिरल्यावर दुसरा दरवाजा लागतो. या दरवाजावर कमळ तसेच qसहांची शिल्पे आहेत. या दरवाजामधून आत गेल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी पायèयांचा मार्ग केलेला आहे. या मार्गाने दरवाजाच्या वरही जाता येते. येथील तटबंदीचे बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे.
साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्यातील मुख्य वाड्याची वास्तू इंग्रजांनी पाडून टाकली असल्यामुळे हा भाग मातीच्या ढिगाèयांमधे लुप्त झाला होता. तोही सध्या साङ्क करण्याचा प्रयत्न चालू आहे. या ढिगाèयांमधे काही तळघरे दिसतात. तसेच नदीकाठाकडील बांधकाम सुस्थितीमध्ये असून, नदीकडे जाणाèया दरवाजात पायèयांचा मार्ग केलेला आहे. या पायèयांनी नदीच्या पात्रापर्यंत जाता येते. या बाजूने तटबंदीची भक्कम बांधणी पाहायला मिळते. बल्लारपूरच्या किल्ल्याला तीन बाजूंना प्रवेशमार्ग आहेत. किल्ल्यामध्ये राजवाड्याचे अवशेष, तळघरे, भुयारे, तसेच निरीक्षणासाठी सज्जा, अशा रचना पाहायला मिळतात. बल्लारपूरचा किल्ला आदिया ऊङ्र्क खांडक्या बल्लाळqसह या गोंड राजाने बांधला. त्यांनी शिरपूरवरून आपली राजधानी बल्लारपूर येथे आणल्याचा इतिहास आहे.
--------
किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यातून ५५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, qभतीच्या डागडुजीशिवाय अन्य एकही काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
--------
शोभेची वास्तू झाले बाजारातील ओटे
येथे दर रविवारी ङ्कार मोठा आठवडी बाजार भरतो. या बाजारास जागा कमी पडत असल्याने आता जुन्या वस्तीतही लांबवर रस्त्यांच्या दुतङ्र्का त्याचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. सभोवतालच्या ग्रामीण विभागातून शेतमालासोबतच बागायती माल विक्रीस येतो. नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून आठवडी बाजाराच्या ठिकाणी सिमेंट ओटे बांधले. परंतु, रविवारच्या आठवडी बाजाराव्यतिरिक्त इतर दिवशी हे महागडे सिमेंट ओटे शोभेची वास्तू ठरले आहेत. त्यामुळे येथे जनावरे आणि भिकारी वास्तव्य करतात. या ओट्यांच्या बाजूला लोखंडी जाडीचे ट्री गार्ड तयार करून झाडे लावण्यात आली. मात्र, संगोपन न झाल्याने झाडे नष्ट झाली. उरलेल्या ट्री गार्डमध्ये कापलेल्या कोंबड्या टाकण्यात येतात. दैनिक भाजीबाजार चंद्रपूर मार्गावरील श्रमिक भवनाच्या बाजूला भरतो. मात्र, तिथेही चिखल आणि अंधार असल्याने नागरिकांची गैरसोय होते. याच परिसरात इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने असल्याने येथे भाजीबाजार भरविण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
-------------------
नगरपालिकेकडे नियोजनाचा अभाव
बल्लारपूर येथे १९४९ पासून नगरपालिका आहे. १९७१ मध्ये लोकसंख्या ३४,२६८ होती. आज ही संख्या एक लाख २० हजारांवर पोहोचली आहे. मात्र, नियोजनाअभावी शहराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बल्लारपूर शहरात सुरवातीला ग्रामपंचायत असलेल्या गावांची लोकसंख्या वाढल्यानंतर नोटिङ्काइड एरियाचे रूपांतर १९४९ साली पालिकेत झाले. पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान प्रभुदास टांक यांना मिळाला. शहराचा विस्तार लक्षात घेता नगरपालिका भवन शहराच्या मध्यभागी असावे, ही कल्पना जनप्रतिनिधींपुढे आली. त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. १९६३ मध्ये ६० हजार रुपये खर्च करून भवनाची निर्मिती करण्यात आली. आज पालिकेला ६२ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे.
नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर मान्यवरांचे राजकारण विशेषत: नगर परिषदेच्या क्षेत्रातच घोटाळत राहिले. आजतागायत या नगर परिषदेला २५ नगराध्यक्ष लाभले. प्रथम नगराध्यक्ष पी. एम. टांक होते तर, रजनीताई मुलचंदानी सध्या नगराध्यक्षा आहेत. अनेक राजकीय पक्षांनी सत्ता स्थापित करूनही या शहराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. आता नगरप्रशासनास रस्ते, विद्युत, पाणी आदी अत्यावश्यक सुविधा देणे क्रमप्राप्त झाले आहे.
-----------------------
पालिकेचे ग्रंथालय केव्हा सुधारणार?           
पालिका ग्रंथालयाला सुशोभित इमारतीची गरज आहे. मात्र, ती अनेक वर्षांपासून दूर झालेली नाही. शहरात सुशिक्षित वर्ग असून, नागरिक वाचनालयाचे सदस्य आहेत. सकाळ-सायंकाळी अनेक नागरिक वाचनालयाच्या कक्षात वर्तमानपत्राचे वाचन करण्यासाठी येतात. परंतु, मागील अनेक वर्षांपासून नवीन पुस्तकांची खरेदी झालेली नाही. या इमारतीची साधी रंगरंगोटीही न झाल्याने दमट वास येत असतो. वाचनालयातील ङ्कलकही अतिशय जीर्ण झाले आहेत. वर्तमानपत्र आणि पुस्तकांचा साठा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी साहित्याची कमतरता आहे. वाचनालयाच्या प्रवेशद्वारासमोरच सतत पाणी वाहत असल्याने चिखल तुडवीत प्रवेश करावा लागतो. मागील पाच वर्षांच्या तुलनेत वाचकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात पालिकेचे एकमेव वाचनालय असून, या वाचनालयाकडे पालिकेने लक्ष देऊन या ठिकाणी बौद्धिक केंद्र करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
------
बगीचांची स्थिती बकाल                
वृद्ध व्यक्ती, लहान मुलांना विरंगुळा तसेच पर्यावरणात समतोल राहण्याच्या दृष्टीने नगरपालिकेने आठ बगीचांची निर्मिती केली. त्यात गणपती वॉर्ड, विवेकानंद वॉर्ड, डॉ. झाकिर हुसैन वॉर्ड, कन्नमवार वॉर्ड, साईबाबा वॉर्ड, शिवाजी वॉर्ड, बालाजी वॉर्ड, येथे बगीचांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, आज यातील विवेकानंद व कन्नमवार वॉर्डातील बगीचे वगळता इतर बगीचे बकाल झाले आहेत. मागील काही वर्षांपासून पालिकेचे या बगीचांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवस्था दयनीय झाली आहे.
--------
लोकसंख्या वाढली; वस्ती फुगली                
मागास आणि जंगलव्याप्त प्रदेशात दूरवरून येणाèया लोकांकरिता सर्वाधिक अर्थार्जन व सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात बल्लारपूर हे आकर्षण केंद्र असल्याने येथे नोकरदारांची पावले वळली. एकाच वेळी दहा हजार कामगार व मजूर  उद्योगात आल्याने लोकसंख्येत झपाट्याने भर पडली आहे. राष्ट्रीयीकरणानंतर येथील कोळसा खाणींचेही विस्तारीकरण व प्रमुख उद्योगांच्या अनुषंगाने निर्मित लहान पूरक विविध उद्योग आणि त्याकरिता लागणारी श्रमशक्ती, भारत-पाक ङ्काळणी व बांगला देश निर्मितीनंतर निर्वासितही मोठ्या प्रमाणावर आल्याने शहराच्या लोकसंख्येत उत्तरोत्तर वाढ झाली.
कोळसा खाणींच्या कामावर शेजारच्या आंध्रप्रदेशातून आलेले तेलगू भाषक मजूर कित्येक वर्षांपासून आता येथेच स्थायिक झाले आहेत. जंगलातून लाकूड कटाई, तेंदूपत्ता संकलन, पॉवर हाउस, दादाभाई पॉटरीज, रेल्वेचा मालधक्का, लाकडी कोळशांचे डेपो, बीटीएस कंपनी, वीटभट्टी, शेती आदी कामांवर स्थानिक लोकांना मजुरीची कामे मिळत असतात. शिवाय बल्लारपूर कोळसा क्षेत्रात आता बिहारी, उत्तरप्रदेश येथील श्रमिकांचा भरणा मोठ्या प्रमाणात असल्याने येथील लोकसंख्या वाढली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील बल्लारशामध्ये तुरळक मान्यवर लोकांचा शेती व्यवसाय, व्यापार असला, तरी बहुतांश सर्वसामान्य लोक मोलमजुरी व नोकरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. 

शेतीचे अधिग्रहण                
कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बल्लारपूर कोळसा क्षेत्रांतर्गत अनेक खुल्या आणि भूमिगत कोळसा खाणी सभोवतालच्या क्षेत्रात निर्माण झाल्या. उच्चप्रतीचा कोळसा असल्याने अनेकांच्या शेतजमिनी कोळसा खाणींनी अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यामुळे बल्लारपूर हे एक कोळसा निर्यातीचे प्रमुख केंद्र बनले. सोबतीला वनविकास महामंडळ, प्लायवूड कारखाना (सध्या बंद), चिनी माती पाइप कारखाना, खंडेलवाल उद्योग समूह, वाहतूक व्यवसाय येथे आहेत. 
-----
आरोग्य सुविधा                 
वाढत्या लोकसंख्येबरोबरच आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न येथे कायम आहेत. ४० वर्षांपूर्वी गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र होते. आठ ते दहा जुनी डॉक्टरमंडळी खासगी प्रॅक्टिस करायची. आता प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र स्थानांतरित करण्यात येऊन त्या जागी अद्ययावत ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी आहे.  पेपरमिल, कोळसा खाणी यांची स्वतंत्र रुग्णालये आहेत. याशिवाय, आता विविध प्रकारच्या आजारांकरिता तज्ज्ञ डॉक्टरांसह एकूण ८० पेक्षा जास्त डॉक्टर्स रुग्णसेवा करीत आहेत. अनेकांनी चिकित्सालयासोबतच नर्सिंग होम उभारले आहेत. अत्यंत गंभीर आणि निवडक आजारांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा बल्लारपुरात उपलब्ध आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकाèयांच्या कमतरतेमुळे उपचारासाठी चंद्रपूर, नागपूरला धाव घ्यावी लागते.

शैक्षणिक सुविधा             
स्वातंत्र्यपूर्व काळात आठव्या वर्गांपर्यंत शिक्षण देणारी केवळ एकच शाळा होती. नगर परिषदेने नंतरच्या काळात १९ प्राथमिक शाळा व दहावीपर्यंतच्या शिक्षणाच्या सोयीकरिता महात्मा गांधी विद्यालयाची स्थापना केली. याच सुमारास चांदा शिक्षण मंडळाच्या जनता विद्यालयाची शाखा येथे सुरू करण्यात आली, तर पेपरमिल वसाहतीत qहदी व इंग्रजी माध्यमाचे हायर सेकंडरी स्कूल सुरू करण्यात आले. पुढे त्याचेच रूपांतर कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. १९७१ मध्ये विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेचे गुरुनानक विज्ञान महाविद्यालय व महात्मा जोतिबा ङ्कुले महाविद्यालय सुरू करण्यात आले. आता शहरात १७ प्राथमिक शाळा व एक विद्यालय नगर परिषद संचालित तर, इंग्रजी माध्यमाच्या सहा खासगी शाळा, तेलगू, उर्दू व qहदी माध्यमाची एक, मराठी माध्यमाच्या चार शाळा, सहा कनिष्ठ महाविद्यालये, तीन महाविद्यालये, तीन औद्योगिक प्रशिक्षण विद्यालये, डी.एड. व बी.एड. महाविद्यालय एक, उच्च तंत्रशिक्षण देणारी संस्था एक, याप्रमाणे प्री- नर्सरी ते पदव्युत्तर तसेच, उच्च तंत्रशिक्षणापर्यंतची संपूर्ण सोय उपलब्ध आहे. संगणकीय शिक्षणही येथे आता मिळू लागले आहे.

दळणवळणाची सुविधा            
१९२० मध्ये येथे रेल्वेलाइन आल्यानंतर मालवाहू गाड्या धावू लागल्या. त्यातून कोळसा, लाकूड, कागद, लाकडी कोळसा वाहतूक सुरू झाली. एक पॅसेंजर गाडी या स्थानकापासून घुग्घुसपर्यंत ङ्कक्त एकदाच ये-जा करीत असे. आज मात्र मध्य रेल्वे, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे व दक्षिण-मध्य रेल्वेच्या संगमावरील बल्लारशा या अद्ययावत रेल्वेस्थानकाचे महत्त्व वाढले आहे. या रेल्वेस्थानकावरून आता सर्वच दर्जाच्या १०५ प्रवासी गाड्या तर, ४५ मालगाड्या धावतात. सर्वच प्रवासी गाड्यांना येथे थांबा देण्यात आला आहे. तसेच ५० वर्षांपूर्वी बल्लारशा ते चंद्रपूरकरिता केवळ एकच खासगी सी. पी. सीख कंपनीची प्रवासी बस चालत असे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या १९७० च्या आसपास सुरू झाल्या. आज या बसस्थानकावरून रोज ७०० बसगाड्यांची ये-जा होत असते. पूर्वीच्या केवळ एक शेड असलेल्या बसस्थानकाचे स्थानांतरण शहराच्या मध्य भागात मुख्य मार्गावर प्रशस्त जागी करण्यात आले असून, सर्व प्रवासी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, शहरातून चौपदरी मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी जाणवू लागली आहे. पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त असतात. त्यामुळे कोंडी कायम असते.
अतिक्रमण वाढले                 
पेपरमिलची जुनी वसाहत अपुरी पडायला लागल्याने नव्या वसाहतीकरिता समोरील रस्त्यांच्या पलीकडील टेकडी विभागातील वनविभागाची विस्तीर्ण जागा अधिग्रहीत करण्यात येऊन त्या ठिकाणी नवी वसाहत वसविण्यात आली. याच परिस्थितीचा ङ्कायदा उठवून या नव्या वसाहतीला समांतर अशी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करीत स्थानिकांनी विस्तीर्ण जमीन बेकायदेशीररीत्या बळकावली. तातडीने हक्काची झोपडीवजा घरकुले उभारण्यात आली. पाहता पाहता रस्त्याच्या पलीकडील दोन किलोमीटर पूर्वेचे जंगल नष्ट होऊन त्या ठिकाणी मोठी नागरी वसाहत निर्माण झाली आहे. मुख्य मार्गावर दुतङ्र्का अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली. यादरम्यान बीटीएस कंपनी बंद पडून त्या जागी वाहतूकदारांचे मोठमोठे गॅरेजेस व कार्यालये थाटण्यात आली आहेत. पॉवर हाउसजवळच एक नवी झोपडपट्टी निर्माण झाली. गेल्या चाळीस वर्षांत बल्लारशा या लहानशा गावाचे झपाट्याने विस्तारीकरण होऊन एक शहर उदयास आले.
-----------
न. प. स्थापना वर्ष : १९४९लोकसंख्या : ९५ हजार ९९८क्षेत्रङ्कळ : १६५१ हेक्टर
एकूण वॉर्ड : ३२
नगरसेवक : ३२ अधिक ३ स्वीकृत सदस्य, एकूण ३५
पहिले नगराध्यक्ष : प्रभुदास टांकविद्यमान नगराध्यक्ष : रजनीताई मुलचंदानी

आपल्या समस्या यांना सांगाव्या :
===================
आमदार : सुधीरभाऊ मुनगंटीवार : ९८२२२२३१०२नगराध्यक्ष : रजनीताई मुलचंदानी :९३२६१३९३४१मुख्याधिकारी : श्री. वाहुरवाघ :तहसीलदार : विद्यासागर चौहान : ८००७६७१९९९पोलिस निरीक्षक : यशवंत ओंबासे :९८२३०३८२५६कार्यालय : ०७१७२-२७७१०२
----------------
उद्योगांचा भरणा
शहरालगत १८७१ मध्ये कोळशाची खाण सापडली; त्याचप्रमाणे लोहखनिजही उपलब्ध असल्याने शहराचा विकास होऊन बल्लारपूर हे खाणकामाचे एक केंद्र बनले. कोळशाच्या विपुलतेमुळे औष्णिक वीजनिर्मितीसही मदत झाली. मबल्लारशाह पेपर अ‍ॅण्ड स्ट्रॉ बोर्ड मिलङ्क या नावाने भारतभर प्रसिद्ध असलेला कागद कारखाना येथेच आहे. आता या कंपनीच्या नावात मबिल्ट ग्राङ्किक्स पेपर कंपनीङ्क असा बदल झाला आहे. शहराच्या परिसरात जंगल असल्याने बल्लारपूर हे शहर इमारती लाकडांची प्रमुख बाजारपेठ बनले आहे. शहराजवळ उत्तम प्रकारची माती असल्याने मृत्पात्री व इतर घरगुती उद्योगांचा विकास झालेला आहे.
लाला करमचंद थापर या पंजाबकडील उद्योजकाने १९५२ मध्ये कागद उद्योग सुरू केला. त्याकरिता लागणारे पाणी, कोळसा, कच्चा माल, बांबू, ऊर्जा, मालवाहतुकीकरिता रेल्वेची सुविधा सुरू झाली. संपूर्ण देशातील विविध राज्यांतील कामगार, मजूर, तंत्रज्ञ व अधिकाèयांकरिता आकर्षणाचे केंद्र बनले.
-----------
प्रशासकीय कार्यालये
गेल्या पाच वर्षांत नगर परिषद इमारतीचे विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले असून, विदर्भातील सर्व नगर परिषदेच्या तुलनेत या नगर परिषद इमारतीचा प्रथम क्रमांक लागू शकेल. सुरवातीला वस्तीत भाड्याच्या घरात असलेली नगर परिषद कालांतराने गावाबाहेर स्वमालकीच्या इमारतीत स्थानांतरित करण्यात आली. त्यासमोरच पोलिस ठाण्याची इमारत तयार होऊन गावातील पोलिस ठाणे या इमारतीत स्थानांतरित करण्यात आले. नगर परिषदेच्या मागील बाजूस प्रशस्त असे बचतभवन सभागृह आहे. त्याजवळच नगर परिषदेच्या मालकीचे वसंत वाचनालय आहे. शहरास तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यावर तहसीलदार कार्यालय, उपकोषागार, पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, दिवाणी व ङ्कौजदारी न्यायालय, कृषी कार्यालय भाड्याच्या घरात थाटलेले आहे.
-------------
बहुभाषिक आणि बहुधर्मीय उत्सव
मूळ आदिवासींचे संख्याबळ दखल घेण्यासारखे असले, तरी संस्कृतीचे मात्र स्थित्यंतर दक्षिणेकडील जंगलव्याप्त प्रदेशात झाल्याचे दिसून येते. त्या जागी आता बल्लारपुरात मिश्र संस्कृतीचे दर्शन होते. देशातील सर्व जाती, पंथ, धर्माच्या लोकांचे एकत्रीकरण बल्लारपुरात विशेषत्वाने जाणवते. दसरा, दिवाळी, होळी, पोळा, गणेशोत्सव, ख्रिसमस, ईद, गुरुनानक जयंती, आंबेडकर जयंती, झुलेलाल जयंती, रामजन्मोत्सव आदी सण शहरात उत्साहात साजरे होतात. पॉवर हाउसजवळील मशेख ङ्करीद बाबांचा दर्गाङ्क हे एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ, पेपरमिल व कागद निर्मिती प्रक्रिया, वर्धा नदीच्या पश्चिम तीरावरील रामतीर्थ, व्यंकटेश्वर बालाजी मंदिर, वनविभागाच्या आगारातील जगातील सर्वांत मोठे लाकूड, गोंडराजांचा ऐतिहासिक किल्ला, बल्लाळशा बाबा मंदिर, नवनिर्मित जलतरण तलाव, भूमिगत कोळसा खाण, ही शहरातील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
---------------
प्रदूषणाची समस्या
अलीकडच्या काळात प्रदूषणाची समस्या उग्ररूप धारण करून आहे. बल्लारपुरात कोळसा खाण, पेपरमिल आणि मध्यभागी असलेल्या पाइपनिर्मिती कंपन्यांमुळे प्रदूषण वाढलेले आहे. त्याचे दुष्परिणाम थेट नागरिकांना जाणवू लागले आहेत. बल्लारपूर परिसरात पूर्वी कोळसा खाणीची धूळ, कच्च्या रस्त्यावरील धूळ, पेपरमिलद्वारा होणारे जल, वायुप्रदूषण होते. मात्र, लोकवस्ती व कारखान्याचे अंतर संपूर्ण जंगलव्याप्त प्रदेश, वाहती वर्धा नदी, वाहनांची वर्दळ, यामुळे प्रदूषणाचा थोडा ङ्कार त्रास झाला, तरी तेव्हाचे लोक त्याकडे दुर्लक्ष करीत होते. वृक्षतोड, प्रचंड वर्दळ, कोळसा खाणी, शहरापलीकडील उद्योगांतील सिमेंटची शहरातून होणारी वाहतूक, या सर्वांचा एकत्रित परिणाम जनस्वास्थ्यावर होऊ लागल्याने ती एक मोठीच समस्या झाली आहे. वापरलेले पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे घाणेरडा वास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक उपाय कागदोपत्रीच असल्याने शंभर टक्के प्रदूषणनियंत्रण झाले नाही.


बायपासची गरज
चंद्रपूर-राजुरा मार्गावरील वाहतूक सध्या शहराच्या मुख्य वस्तीतून सुरू आहे. आधीच अरुंद रस्ते असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक गावाबाहेरून व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. बामणी ते चंद्रपूर हा मार्ग बायपास झाल्यास ही कोंडी सुटू शकते. पण, झुडपी जंगलामुळे वनकायदा आड येत आहे.
----------
पाणीपुरवठा
बल्लारपूर शहराला मागील अनेक वर्षांपासून प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेने ग्रासले आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. ही योजना नगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यास वार्षिक ८२० रुपये बिल देण्यासाठी नागरिक तयार आहेत. दरम्यान, ही योजना हस्तांतरित झाल्यास प्राधिकरणाकडे कार्यरत ५२ कर्मचाèयांचे समायोजन पालिकेकडे व्हावे, अशी अट घालण्यात आली. पण, नगरपालिकेला ही अट मान्य नसल्याने हस्तांतरणाचा प्रश्न कायम आहे.
--------
स्वच्छतागृहे गेली कुठे?
शहरातील नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना सोयीचे व्हावे म्हणून ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. मात्र, काही काळातच ती गायब झाली. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
-------
एक लाख २० हजार लोकसंख्या असलेल्या शहरात मृत्यूची संख्याही मोठी आहे. अंत्यसंस्कारासाठी शहरात केवळ एकच स्मशानभूमी आहे. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष कनकमकुमार येलय्या यांनी जी जागा प्रस्तावित केली, तिथेही वनकायद्याच्या झुडपी जंगलाने आडकाठी आणली. त्यामुळे स्मशानभूमीची समस्या कायम आहे.
---------
शहरात भालेराव कॉन्व्हेंटच्या मागील परिसरात क्रीडांगणाचा विकास करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील २५ लाख रुपये प्राप्त झाले. त्यातून क्रीडांगणाच्या संरक्षण qभतीचे काम करण्यात आले. मात्र, उर्वरित कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत.

आयटीआयऐवजी बांधले धान्यकोठार
स्थानिक गौरक्षण वॉर्डातील वनविकास महामंडळाच्या शेजारी शैक्षणिक वातावरणस्थळी शासकीय औद्योगिक संस्थेची इमारत बांधण्यात येणार होते. मात्र, त्या ठिकाणी शासकीय धान्यकोठार बांधकामाला सुरवात करण्यात आली. त्यावर नगरपालिकेने आक्षेप घेऊन बांधकाम थांबविण्याची मागणी जिल्हाधिकाèयांकडे केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.