সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 29, 2013

3 मार्च ला जिल्हाभरात महा लोक अदालत


* न्याय आपल्या दारी
* प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार
* कुठलीही फी आकारली जाणार नाही

चंद्रपूर दि.29- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 3 मार्च 2013 रोजी चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात महा लोक अदालतचे आयोजन करण्यात आले असून न्यायालयात प्रलंबित असलेली व दाखलपूर्व प्रकरणे झटपट निकाली काढण्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही.
ही महालोक अदालत, जिल्हा न्यायालय, सहधर्मदाय आयुक्त न्यायालय, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, शाळा न्यायाधिकरण व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे 3 मार्चला आयोजित केली जाणार आहे.
न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे (प्री लिटीगेशन) यांचा याप्रसंगी निपटारा करण्यात येणार आहे. महालोक अदालतमध्ये जास्तीत जास्त वाद संपुष्टात यावे यासाठी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांना विधी न्याय सेवातर्फे माहिती देण्यात आली असून त्यांनी आपल्या जिल्हयातील तसेच परिसरातील नागरिकांनी यासाठी मदत करावी असे सुचविले आहे.
सामंजस्याने वाद मिटविणे यातच खरे शहाणपण, त्यासाठी तुम्हाला मदत करेल महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण असे ब्रिद असलेल्या या महालोक अदालतमध्ये प्रकरणे मिटविण्यासाठी न्यायाधिश, वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे. यासाठी कुठलीही फी आकारली जाणार नसून केवळ एक साधा अर्ज करायचा आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती उषा ठाकरे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.