সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 31, 2013

नक्षलबंदचा फटका- दुर्गम भागातील ५0 बसफेर्‍या बंद

 गडचिरोली व अहेरी आगाराचे एक लाखाचे नुकसान
गडचिरोली- नक्षलवादी संघटनांनी आज पुकारलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारातून दुर्गम भागात जाणार्‍या ५0 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. यात छत्तीसगड राज्यात जाणार्‍या आंतरराज्यीय बसफेरीचाही समावेश असून बसफेर्‍या बंद राहिल्याने दोन्ही आगारांचे प्रत्येकी ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काही बसफेर्‍या परत बोलाविण्यात आल्याची माहिती आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे दोन आगार आहेत. या दोन्ही आगारातून जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात बसफेर्‍या सोडल्या जातात. गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यात जाणारी मानपूर व राजनांदगाव या दोन बसफेर्‍या सोडल्या जातात. आज नक्षलवाद्यांनी बंद पुकारल्यामुळे या दोन्ही बसफेर्‍यांसह जारावंडी, कुरखेडा, एटापल्ली, भामरागड या गडचिरोली आगारातून सुटणार्‍या बसफेर्‍या बंद ठेवण्यात आल्या. मुरुमगाव बसफेरीही केवळ धानोरापर्यंतच सोडण्यात आली. गडचिरोली आगारातून सुटणार्‍या ३0 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या.
तर अहेरी आगारातील अहेरी- भामरागड, कोठी, व्यंकटापूर, छल्लेवाडा, खांदला (राजाराम), झिंगानूर, रेगुंठा आदी बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. एटापल्ली, देचलीपेठा मार्गावरील खासगी वाहतुकही बंद होती. काल भामरागडला गेलेली बस आज सकाळी परत आली. मात्र त्यानंतर एकही बसफेरी या मार्गावर सोडण्यात आली नाही. या आगारातून सुटणार्‍या २0 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्याची माहिती अहेरी आगार प्रशासनाने दिली आहे. एटापल्ली-कसनसूर-जारावंडी, गेदा, गट्टा आदी मार्गही बंद होते.
जिमलगट्टा येथील व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. रांगी येथील बाजारपेठही आज बंद ठेवण्यात आली होती. एटापल्ली परिसरात अनेक ठिकाणी नक्षल पत्रके आढळून आली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.