সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 14, 2013

विद्या नगरीची पाठी कोरी


ब्रह्मपुरी शहर इंग्रजकाळापासून तालुक्याचे ठिकाण आहे. इंग्रजकाळातील ५२ दरवाजे आणि ५६ खिडक्यांचे भव्य असे तहसील कार्यालय येथे आहे. तसेच येथे टेनिस क्लब, इतिहास काळापासून मध्यकाळापर्यंतचे अवशेष या शहरात वसलेले आहेत. जुन्या लोककथेनुसार येथे ब्रह्माची वस्ती होती. त्यावरूनच या शहराला ब्रह्मपुरी हे नाव पडले. ब्रह्मपुरी शहरातील जुना परिसर म्हणजे धुमनखेडा, पेठ वॉर्ड, जानी वॉर्ड, बालाजी वॉर्ड व गेल्या दशकात निर्माण झालेल्या नवीन ले-आउटने शहराचा विस्तार झाला आहे.

पूर्व विदर्भात शिक्षणनगरी म्हणून प्रसिद्ध असणारे हे शहर वैद्यकीय आणि क्रीडानगरी म्हणूनही नावारूपास आले आहे. ब्रह्मपुरी तालुका हा वैनगंगा नदीच्या काठावर आहे. ब्रह्मपुरी येथून चंद्रपूर शहराचे अंतर १२० कि.मी., तर नागपूर ११५ कि.मी., तर गडचिरोली ६५ कि.मी. अंतरावर आहे. ब्रह्मपुरीजवळून भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्याच्या सीमा असून, शहर उंच व पठारी भागावर वसले असल्याने सर्वांत उष्णतेचे शहर म्हणूनही ओळख आहे.

शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा म्हणजे मुबलक खनिज साठा. बारमाही पाण्याची व्यवस्था ही जमेची बाजू असली, तरी औद्योगिक विकास व शहर विकासात बराच मागे आहे.
...............

पुरातन मंदिर शहराचे श्रद्धास्थान
ब्रह्मपुरी शहरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. रेणुका माता मंदिर, भवानी माता मंदिरात भक्तांची नेहमीच रीघ असते. नवरात्रोत्सव, चैत्राला घोडायात्रा या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मातामाय मंदिर, विठ्ठल मंदिरात दरवर्षी कार्तिकीला पूजा होते. राम मंदिरात रामजयंती उत्सव साजरा होतो. साई मंदिरात साई उत्सव होतो. पटेलनगर येथील पुरातन हनुमान मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सर्वांत पुरातन असलेल्या भवानी वॉर्डातील खंडोबा देवस्थानाची अवस्था बिकट आहे.
.........................
गुजरी भरते भर रस्त्यावर
शहरातील जनतेला कितीही त्रास झाला, तरी चालेल. मात्र, येथील रस्त्यावर रोज भरत असलेला भाजीबाजार मात्र अनेक दिवसांपासून हटलेला नाही. शहरविकास आणि नियोजनात येथील प्रशासन कुचकामी ठरले आहे. येथील मुख्य रस्ता शिवाजी चौक ते सावरकर चौक मुख्य मार्केटपर्यंत रस्त्यावर दुभाजकालगत ट्रॉलीवाले असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. तसेच गुजरी वॉर्डात जाण्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांनी आपले दुकान थाटले. त्यामुळे या रस्त्याने पायी चालणे गैरसोयीचे ठरत आहे.
याच मार्गावर रुग्णालये, गॅस एजन्सी असल्याने येणे-जाणे कठीण झाले आहे. येथे आठवडी बाजार भरतो. लाखो रुपये खर्च करून बाजार चौकात ५० ते ६० ओटे बांधण्यात आले आहेत. मात्र, त्याचा कुणीही वापर करीत नाहीत. त्यांची उंची जास्त असल्याने वापर होत नसल्याचे सांगून विक्रेते रस्त्यावर बसतात. पोस्ट ऑङ्किस, पोलिस ठाणे व नगर परिषदेसमोरही बाजार भरतो. त्यामुळे बाजाराच्या दिवशी या मार्गावरून जाणे कठीण होते.
................................                                                                        
वाहतुकीची कोंडी
शिक्षणासाठी व नोकरीच्या निमित्ताने येणाèयांमुळे वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच अरुंद रस्ते वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
अनेक वर्षांपासूनच्या आकारमानाच्या रस्त्यावरूनच शहराची वाहतूक सुरू आहे. सावरकर चौक ते कॉलेज रोड व सावरकर चौक ते बाजार चौक हे रस्ते अरुंद असल्याने मोठी वाहने जात नाहीत. याच रस्त्यावर सराङ्कालाइन, कापड मार्केट आहे. त्यामुळे दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. परंतु, आजपर्यंत नगर परिषदेने त्यावर उपाय शोधले नाहीत.
................................                                                                        
दुर्लक्षित वस्त्या

शहरातील काही वॉर्डांत रस्ते, नाल्यांचे बांधकाम झाले. मात्र, अनेक वस्त्या विकासापासून कोसो दूर आहेत. या ठिकाणी नाली, रस्ते, वीजखांब व नागरी सुविधा देण्यास प्रशासन कमी पडले आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय कार्यालयात नोकरी, शिक्षणाची उत्तम सोय, उत्तम अशी वैद्यकीय सेवा यामुळे लोकवस्ती व घरांची संख्या वाढत आहेत. ब्रह्मपुरी शहरात एकूण दोन मोठी महाविद्यालये आहेत. शासकीय तंत्रनिकेतन व दोन खासगी तंत्रनिकेतन, दोन बीएड कॉलेज, चार डी.एड. कॉलेज, अनेक शाळा व कॉन्व्हेंट असल्याने बाहेरील विद्यार्थी येथे वास्तव्य करीत असतात.
................................                                                                        
बहुमोल तलावांकडे दुर्लक्ष
शहरात तीन तलाव आहेत. येथील पाण्याची पातळी कायम राहण्यासाठी तलावाचे पाणी उपयुक्त ठरते. पण, अनेक वर्षे होऊनही तलावाच्या विकासाकडे दुर्लक्षच होत आहे. नगर परिषदेलगत असलेला कोंट तलाव पुरातन आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकांनी आश्वासने दिलीत. मात्र, अजूनही त्यांचे सौंदर्यीकरण झाले नाही. पर्यावरण मंत्रालयातङ्र्के या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी चार कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला. पण, कामाला प्रारंभ झालेला नाही. याशिवाय लेंडारी व बारई तलाव आहेत. सध्या बारई तलाव विकल्याची चर्चा आहे. पण, नगरपालिकेने तो तलाव आपल्या ताब्यात घेऊन येथे एखादा बगीचा करावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे, तर कोट तलावाच्या सभोवताल अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे.
................................                                                                        
क्रीडांगणाकडे दुर्लक्ष
येथील गांधीनगर परिसरात लाखो रुपये निधी देऊन क्रीडांगण बांधण्यात आले. १० वर्षांचा कालावधी लोटूनही केवळ एकच सभागृह बांधण्यात आले. त्यात बॅडqमटनचे मैदान आहे. काम अपूर्णच असल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.
................................                                                                        
स्मशानभूमीत असुविधा
शहरापासून तीन ते चार कि.मी. भूतीनाल्यावर असलेल्या स्मशानभूमीत अनेक असुविधा आहेत. शेड बांधले. पण, यातील शवचावीच गायब आहे. शवरथासाठी निधी आला. पण, खरेदी झालेली नाही. स्मशानभूमीत सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य आहे. याच जागेवर शेतकèयांनी अतिक्रमण केल्याने स्मशानभूमीची जागा दिवसेंदिवस कमी होत आहे. टिनाचे शेड उडाले आहे.
................................                                                                        
शहरात झोपडपट्टीचे अतिक्रमण
गेल्या दशकात शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे. काही राजकीय पक्ष यांना प्रोत्साहन देताना दिसतात. मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक आणि शहरातील नागरिकांनी पहिले अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या. कालांतराने त्याच जागी पक्की घरे बांधून ते राहू लागले आहेत. पण, या अतिक्रमणाच्या विरोधात नगरपालिका प्रशासन शांत आहे.
विशेषत: गांधीनगर, वाल्मिकीनगर, ङ्कुलेनगर, हनुमाननगर या सर्व वस्त्या अतिक्रमण करून बांधलेल्या आहेत. भविष्यात मैदानावरही अतिक्रमण होईल, अशी स्थिती आहे.
................................                                                                        
घनकचरा प्रकल्प
शहरातील घाण व कचèयाचे निवारण करण्यासाठी गांधीनगर येथे घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकाणी कचरा टाकला जातो. मात्र, प्रक्रिया होत नसल्याने सर्वत्र डुकरांचे वास्तव्य असते. लगतच ने. हि. महाविद्यालयाचे पटांगण आहे. बाजूलाच डॉ. आंबेडकर महाविद्यालय असल्याने या घाणीचा त्रास सहन होत आहे.
................................                                                                        
मोठा बैलबाजार
दर रविवारी येथे सर्वांत मोठा बैलबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरतो. यात बèयाच आजूबाजूच्या तालुक्यातील बैल, म्हशी, गाई विकण्यासाठी येतात. यात लाखो रुपयांची उलाढाल होते.
................................                                                                        
मटण मार्केट
शहरात भरत असलेले मटण मार्केट प्रसिद्ध आहे. यात रोज हजारो कोंबड्या व बकèयांची विक्री होतेच. परंतु, विविध तलाव व नदीतील ताज्या मासोळ्यासुद्धा मिळतात. परंतु, नव्यानेच तयार करण्यात आलेल्या मटण मार्केटमध्ये अनेक सुविधांचा अभाव असल्याने घाणीचे साम्राज्य आहे.
................................                                                                         
मूत्रीघर व शौचालयाचा अभाव
तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. शुक्रवारी आठवडी बाजार भरत असून, संपूर्ण तालुक्यातून खरेदी- विक्रीकरिता धान्य, कडधान्य, भाजीपाला या ठिकाणी आणला जातो. याशिवाय रोज भरणाèया गुजरीतही अनेक खेड्यांमधून माल विक्रीकरिता आणला जातो. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्व कार्यालयीन कामे येथील तहसील व पंचायत समितीमध्ये होत असतात. त्यामुळे दूरवरून दररोज असंख्य जनता येथे वेगवेगळ्या कामांकरिता येत असते. मात्र, शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत असूनही कुठेही शौचालये वा मूत्रीघरे यांची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना आडोशाला जावे लागते. महिलांची स्थिती यापेक्षाही लाजीरवाणी ठरते. अनेकदा पालिकेत प्रस्ताव ठेवण्यात येतो. मात्र, मूत्रीघर व शौचालयाच्या प्रस्तावाला योग्य मार्ग न मिळू शकल्याने प्रस्ताव रखडूनच आहे.
................................                                                                        
पाणपोयांची अवस्था बिकट
शहरातील वर्दळ लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथील मुख्य चौकांमध्ये करावयास हवी होती. मात्र, तसे न करता लोकसहभागातून सुरू केलेल्या पाणपोया नगरपालिकेकडे हस्तांतरित करूनही त्यांची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. येथील सावरकर चौक, शिवाजी चौक मुख्य बसस्थानक तसेच पालिकेच्या अगदी शेजारी अशा चार पाणपोयांची व्यवस्था लोकसहभागातून सुरू करण्यात आली. त्या पालिकेकडे हस्तांतरीय करण्यात आल्या. मात्र, आज शिवाजी चौक, नगरपालिकाशेजारील व बसस्थानकाजवळील तिन्ही पाणपोया बंद आहेत. सावरकर चौकस्थित पाणपोईची निगा लोकवर्गणीतून ठेवली जाते.
................................                                                                        
नगरपालिकेचा चांगला निर्णय
शहरातील बारई तलाव विकला गेल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, येथील बारई तलाव नगर परिषदेला अधिग्रहण करण्याचा ठराव घेण्यात आला. भविष्यात पाण्याची व शहराला एक चांगला बगीचा देण्याच्या दृष्टीने चांगला पालिकेने निर्णय घेतला आहे. शहरात पाण्याची कमतरता नाही. शहरात घंटागाडी वॉर्डावॉर्डात ङ्किरते.
................................                                                                        
मच्छरांचा त्रास
सर्वत्र उघड्या नाल्या, घाण, नाल्यांचे उतार व्यवस्थित नसल्याने शिक्षणनगरीचे नाव मच्छरनगरी असेच म्हणावे लागते. वॉर्डावॉर्डांतील नाल्यांची सङ्काई होत नसल्याने दुर्गंधी कायम आहे. जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा प्रभाव वाढला आहे. पण, प्रशासनातङ्र्के कोणतीही ङ्कवारणी केली जात नाही.
................................                                                                        
निर्माणाधीन बगीचा अविकसित
दिवसेंदिवस विकसित होत असणाèया व लोकसंख्या वाढत असणाèया ब्रह्मपुरी शहरात कुठेही बगीचाची व्यवस्था नाही. येथील वडसा मार्गावरील हुतात्मा स्मारकाचे सौंदर्यीकरण करून बगीचाचे स्वरूप देण्याचा केविलवाणा प्रकार करण्यात आला. मात्र, त्या ठिकाणी प्रेमियुगुलांचा वाढता शिरकाव व अशोभनीय दृष्य नेहमीच नजरेस पडत असल्याने ते त्रासदायक झालेले आहे. शिवाय खासदार व आमदार यांच्या निधीतून नागपूर मार्गावर ख्रिस्तानंद चौकालगत आरक्षित जमिनीवर निर्माण होत असलेल्या बगीचांची कामे गेली चार वर्षांपासून रखडली आहेत. मागील वर्षी आलेल्या हलक्याशा वादळाने तेथील मुख्य व भव्य असे प्रवेशद्वार निकृष्ट साहित्य वापरल्याने कोसळले. तेव्हापासून त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यावर खर्च करण्यात आलेला निधी वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
................................                                                                         
रहदारी, पार्किंगची समस्या
येथील मुख्य ख्रिस्तानंद चौकापासून सावरकर चौकापर्यंत दुभाजक निर्माण करण्यात आला. गडचिरोलीकडे जाणाèया एस. टी. बसगाड्या एका बाजूला उभ्या राहिल्याने मागील वाहनांची ख्रिस्तानंद चौकात मोठी रीघ नेहमीच पहावयास मिळते. शिवाय शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्याने भररस्त्यात वाहने, दुचाकी, चारचाकी उभ्या ठेवल्या जातात. सावरकर चौक ते रेणुका माता चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक अतिक्रमित दुकाने असल्याने रस्ता ङ्कारच अरुंद आहे. याच रस्त्यावरून शहरवासींना जावे लागत असल्याने होणारी कोंडी ही दैनिक समस्या बनली आहे.
................................                                                                        
गुंठेवारीने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा
येथील काही भूखंडमाङ्कियांनी शहरातील तब्बल ७२ एकर जागा मगुंठेवारी अधिनियम २००१ङ्क चा ङ्कायदा घेत बेकायदेशीर गुंठेवारी करून अकृषक केली. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उजेडात आले.
................................                                                                        
अग्निशमन वाहनाची प्रतीक्षा
आगीवर नियंत्रण करण्यासाठी नगरपालिकेकडे एक अग्निशमन वाहन होते. त्यात बिघाड झाल्याने लिलावात विकण्यात आले. तेव्हापासून येथे वाहनाची प्रतीक्षा आहे. शहरात आग लागली, तर टँकरचा आधार घ्यावा लागतो.
................................                                                                        
दृष्टिक्षेपात ब्रह्मपुरीक्षेत्रङ्कळ : २१.९२ चौ.कि.मी.लोकसंख्या : ४०,०००न. प. स्थापना : १० जानेवारी १९९०वॉर्डांची संख्या : १९साक्षरता प्रमाण : ६० टक्केतलाव : ३
........................
यांना समस्या सांगा
उपविभागीय अधिकारी : अरुण झलके : ९४२१०३४४३३
आमदार : प्रा. अतुल देशकर : ९४२२८९११९६
तहसीलदार : आशीष वानखेडे : ९४२१३१४६२८
नगराध्यक्ष : पवन मगरे : ९७६५२२०६१९
उपाध्यक्ष : शब्बीरअली जिवानी : ८८८८३३६१६१
मुख्याधिकारी : रूपेश चव्हाण : ८६००८७३९५१
पोलिस निरीक्षक : मनीष दिवटे : ९८२३८६२९४४
उपविभागीय पोलिस अधिकारी : प्रदीप हरमळकर : ९८७०२५००१६

माहिती संकलन
अरविंद चुनारकार  ९४२०१४२२५४

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.