काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 27, 2018

तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने केला आजोबाचा खून

तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने केला आजोबाचा खून

गडचिरोली/प्रतिनिधी:
  तंबाखू न दिल्यानं नातवानं आजोबाची हत्या केल्याची संतापजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात घडली आहे. सोमनपल्ली गावात नातवानं तंबाखू देण्यास नकार दिल्यानं आजोबाची कुऱ्हाडीनं वार करत निर्घृण हत्या केली.
राजम तलांडी असं आजोबाचं नाव आहे. आरोपी नातू सुभाष तलांडी याला पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोलीत तंबाखू सेवनाबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येतीये. डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वात व्यसनमुक्तीसाठी अभियानही राबवले जातात. मात्र तहीही व्यसनाचं प्रमाण काही कमी होत नाही आहे.तलांडी कुटुंबातील २७ वर्षीय मुलाने आपल्या ७० वर्षाच्या राजम तलांडी नामक आजोबाची निर्घृण हत्या केली. केवळ तंबाखू सेवनाची सवय असलेल्या नातवाने आजोबांकडे त्याची मागणी केली. आजोबाने ती नाकारली. रागाने पिसळलेल्या आरोपी नातवाने घरातून कुऱ्हाड आणून आजोबावर वार केले. आणि त्यांचा जीव घेतला.
गडचिरोली जिल्हा तंबाखू आणि खर्रा या २ व्यसनांच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आली होती. मुखाचा आणि इतर कर्करोगाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण नेमके हेच दर्शवीत होते. आपल्या आसपासच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करणा-या धानोरा तालुक्यातील डॉ. बंग दाम्पत्याच्या शोधग्राम प्रकल्पात याची सविस्तर नोंद घेण्यात आली. आणि येथेच तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी 'मुक्तिपथ' अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली.मुक्तिपथच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक सर्वेक्षणात जिल्ह्यातील लाखो नागरिक तंबाखूच्या विळख्यात अडकले असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. 'खर्रा' हा या भागात सुपारीत चुना-सुगंधित तंबाखू मिसळून घोटून तयार केला जाणारा लोकप्रिय पदार्थ.
पण अशा या व्यसनातून तर नात्यांचा जीव घेतला जाणार असेल तर अशी व्यसनं काय कामाची हे सर्वसामान्यांना समजणं गरजेचं. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

प्लास्टिक बंदी उठणार?

प्लास्टिक बंदी उठणार?

प्लास्टिक बंदीवरून यू टर्न, आता छोट्या दुकानदारांना पिशव्या वापरण्याची परवानगीमुंबई/प्रतिनिधी:
प्लास्टिक बंदीवरून अवघ्या पाच दिवसांमध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यू टर्न घेतला आहे. दुकानदारांची नाराजी ओढवल्यानं गुरूवारपासून छोट्या दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे संकेत कदम यांनी दिले आहे.
या निर्णयामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडणार हे आता स्पष्ट झालं आहे. अपुरी तयारी आणि अकार्यक्षमता यामुळं एका चांगल्या निर्णयाचा बोजवारा उडणार हे आता स्पष्ट झालंय.प्लास्टिक बंदी करताना त्याला पर्याय काय असेल याची सरकारनं पुरेशी तयारी केली नाही.
छोटे दुकानदार, किरकोळ भाजी विक्रेते,दुध विक्रेते, हॉटेल चालक यांनी पर्याय देण्याची मागणी सरकारकडे केली होती. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने या दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळं सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका झाली होती.नाराजी वाढत असल्याने आणि त्याचं राजकारण होत असल्याने रामदास कदम यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

अंधाऱ्या रात्री महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने खंडित वीजपुरवठा पुर्ववत

अंधाऱ्या रात्री महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने खंडित वीजपुरवठा पुर्ववत

नागपूर/प्रतिनीधी:
सोमवारचा दिवस संपून मंगळवार दिवस लागला होता, अश्यावेळी रात्री 12 वाजून 28 मिनिटांच्या सुमारास कॉग्रेसनगर येथील ऑल इंडीया रिपोर्टर्स, मेडीकल कॉलनीम तकीया या भागातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला, सर्वत्र अंधाराचे साम्राज्य वैतागलेली लोकं रस्त्यावरील कुत्र्याला दगड मारत होती आणि ते विव्हळत असल्याचे त्याच्या विचित्र आवाजावरून भासत होते. शांततेचा भंग करत महावितरण कार्यालयातील फोनची बेल सतत वाजत होती पण उचलायला वेळ नव्हता आणि समजा फोन उचलला तरी अपेक्षित प्रश्नच. ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु होता, कदाचित समोरच्याला ते पटणार नसेल कारणही तसच होत, पाऊस लांबल्याने वाढलेल्या अंगाची लाही-लाही करणा-या गर्मीमुळे शहरी माणसाचे अवघड झालेलं जगणं इकडे फोनवरून वाहिनीवरील बिघाड शोधत फिरणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून परिस्थितीचा वेध जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु होता.
लोकांचं देखील बरोबर होत, पण त्यांना काही समजून सांगावं आणि त्यांनी समजून घ्यावं अशी परिस्थिती सदैव नसते. 33/11 केव्ही उपकेंद्रातून निघणा-या 11 केव्ही ऑल इंडीया रिपोर्टर्स या वीज वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे प्रोटेक्शनला असणारे 10 एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्रातील रोहीत्रही ओव्हर करंट्मुळे एनकमरसह ट्रीप झाले. वीजपुरवठा सुरळीत करायला महावितरण कर्मचारी कंत्राटदाराच्या कर्मचा-यांसमवेत बिघाड शोधण्यास झटत होती. 12 वाजून 31 मिनिटाला रोहीत्र आणि एनकमर यशस्वीरित्या चार्ज करण्यात येऊन वाहीनी नादुरुस्त असल्यावे जाहीर करण्यात आले आणि वाहीनीच्या प्रत्येक खांबावरील इन्स्युलेटरची तपासणी सुरु झाली यात सुळे गल्लीजवळील सर्वात अखेरच्या खांबावरील इन्स्युलेटर फ़ुटलेले आढळले, ते बदलण्याची प्रक्रीया सुरु केली तर अखेरचा खांब असल्याने तेथील वीज वाहक तार (Conductor) अधिक तानलेली असल्याने जोर लावूनही नादुरुस्त डिस्क इन्स्युलेटर वीजखंबाला घट्ट चिकटल्याने काढता येणे अशक्य होते. गर्मीमुळे हैराण झालेले तेथे एकत्र जमलेले नागरिक मदतीला आले, त्यांनीही वीज वाहक तारेला ओढण्यासाठी कार्यरत कर्मचा-यांना मदत केली तरीही ते निघता-निघत नव्हते. त्यामुळे उपस्थितांची चलबिचल वाढली होती अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून खांबाला चिकटलेल्या डिस्कपुढे दुसरी डिस्क लावण्यात येऊन ट्रायल घेण्याचे ठरले, काळजी वाढत चाललेली, रात्रीचे 1 वाजून 58 मिनिटे झाली, पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करून बघूया. अधिकाऱ्यानी निर्णय घेतला. शांतता पसरली होती. बटन दाबल्यावर कशाचाही आवाज झाला नाही. आनंदाची झुळूक मनात उठली होती. डोळे ताडकन उघडले प्रकाश सर्वदूर पसरलेला होता. रात्रीच्या अंधारात प्राणाची बाजी लावीत सतत दीड तास सुरु असलेल्या प्रयत्नांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या ग्राहकांनी वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी चाललेले प्रयत्न बघून महावितरणप्रती आभार व्यक्त केले.
महावितरणचे कर्मचारी, अधिकारी आपले कर्तव्य बजावून सेवा देत असतात. वादळ वारा, वीज यांमुळे पावसाळयात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढते. पण महावितरण दिवसेंदिवस आपल्या सेवेत सुधारणा करतेय. म्हणूनच तर पूर्वी सारखे भारनियमन नाही किंवा वीज गेल्यावर जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही. एरव्ही आजवर न झालेली अत्युच्य मागणी, उन्हाळ्यात भारनियमन न करता महावितरणने पूर्ण केलेली आहे आणि हीच महावितरणच्या कामाची पावती आहे. महावितरण कर्मचा-यांचा ग्राहकांशी थेट संबंध येत असल्याने ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागते. बरेचदा मारहाण होते. काहींनी सेवा देतांना आपले प्राण देखील गमावले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास थोडावेळ वाट पाहावी आणि बाजू समजून घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


चिमूरच्या नगराधक्षांच्याच प्रभागात पाण्याची भिषण टंचाई

चिमूरच्या नगराधक्षांच्याच प्रभागात पाण्याची भिषण टंचाई

नगर परिषद चिमूर यांचे दुर्लक्ष नगर परिषदेवर महिलांचा धड़क मोर्चा
चिमूर/ तालुका प्रतिनिधी:
चिमूर नगर परिषद मध्ये येत असलेल्या नवीन वस्ती पिंपळनेरी प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या ६ वर्षे पासून पिण्याच्या पाण्याचा नाहक त्रास जनतेला होत असून या संबंधित कित्येक वेळा नगर सेवकाशी तोंडी तक्रारी केल्या व नगर परिषद येथे लेखी तक्रारी महिला पुरुष यांच्या स्वाक्षरी दिल्या गेल्या असून या पाण्याच्या समस्या अजून पर्यत सोडविण्याचा प्रयत्न नगर परिषद करीत नसून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिन्यातून एकदा टँकर येत असून समस्त नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही व या ठिकाणी असलेली सार्वजनिक विहीर हि जुन्या काळातील असून ती ५ वर्षयागोदार खसली असून या विहिरीतील गाळ उपसून पक्या दर्जाचे काम करून देण्यात यावे याकरिता अगोदर ग्रामपंचायत मध्ये अनेक तक्रारी व ग्रामसभेत चर्चा करण्यात आल्या परंतु सरपंच व सचिव यांनी कुठलाही तोडगा या विषयावर काढला नसून मागील अडीच वर्षे पासून पिंपळनेरी हे गाव नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून या समस्सेकडे नगर सेवक व नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी ,पाणी पुरवठा विभाग यांचे दुर्लक्ष होतांना दिसून आले असून या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता पिंपळनेरी प्रभाग क्रमांक . २ मधील ३० महिलांनी मिळून मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय चिमूर येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्से विषयी निवेदन देण्यात आले .
    चिमूर नगर परिषद मध्ये कांग्रेस चे गोपाल झाडे हे नगराध्यक्ष असून त्यांच्या स्वतः च्या प्रभागात भीषण पाणी टंचाई असताना मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिला वर्गात त्रीव संताप ची लाट पसरली आहे विशेष सत्तेतील एका नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी नारू ची समस्या तसेच आठवडी बाजार ची व्यवस्था बाबत आवाज उठवून घरचा अहेर दिला होता नगराध्यक्ष गोपाल झाडे हे कोणती कारवाई करून समस्या सोडविते या कडे लक्ष लागले असून नगराध्यक्ष वर लक्ष ठेवून पाठी मागून कारभार करणारा तो नगरसेवक कोण याची सुद्धा चर्चा रंगत आहे.

चंद्रपुरात महसूल कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

चंद्रपुरात महसूल कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

चिमूर (जि. चंद्रपूर):
वाळूतस्करीत जप्त केलेले ट्रॅक्‍टर घेऊन येताना वाळूतस्कराने महसूल कर्मचारी आणि ट्रॅक्‍टरवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायब तहसीलदार वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला. ही घटना येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली.महसूल कर्मचाऱ्यांना वाळूची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, चालक दत्तात्रय देवराव कडपे यांनी गांधी चौक गाठले. वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्‍टर थांबविले. मात्र, ट्रॅक्‍टरचालक घटनास्थळावरून पळून गेला. महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ट्रॅक्‍टर जप्तीची कारवाई केली. चालक देवराव कडपे जप्त केलेले ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयात नेण्यासाठी निघाले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाळूतस्कर मनोज खुशाल नागपुरे आणि त्याच्या एका सहकाऱ्याने ट्रॅक्‍टर अडविले. सोबत आणलेले पेट्रोल ट्रॅक्‍टर आणि चालक कडपे यांच्यावर ओतले आणि आगीची काडी फेकली. मात्र, तेवढ्यात नायब तहसीलदार राजमाने आणि इतर महसूल कर्मचारी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
चालक दत्तात्रय कडपे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वाळूतस्कर मनोज नागपुरे आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तलिहिस्तोवर वाळूतस्कराला अटक झाली नव्हती.

बिबट्याने दिली झोपलेल्या युवकाच्या कानाखाली

बिबट्याने दिली झोपलेल्या युवकाच्या कानाखाली

बिबट साठी इमेज परिणामचंद्रपूर/चिमूर:
 रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे. रामदेगी हे पर्यटनस्थळ आहे. येथेच पद्माकरचे छोटेसे दुकान आहे. सोमवारी रात्री त्याला उशीर झाला. त्यामुळे त्याने दुकानाशेजारी असलेल्या झाडाच्या आडोशाचा आसरा घेत अंथरून टाकले. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्याने त्याच्या कानशिलात पंजा मारला. त्याने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार जागे झाले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सकाळी जखमी पद्माकरला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.

आपुलकीने दाखविली आपुलकी;वर्धा जिल्ह्यातील ४०० गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप

आपुलकीने दाखविली आपुलकी;वर्धा जिल्ह्यातील ४०० गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप

वर्धा/आर्वी /राजेश सोळंकी:
जिल्ह्यात शेतीकामांना सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याची पेरणीची लगबग दिसून येत आहे. पण पावसाच्या गैरहजेरीमुळे काही ठिकाणी पेरण्या लांबल्या तर काही ठिकाणी शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाला समोर जातो  आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत परिस्थिती बघता,शेतकऱ्यांसाठी नेहमीच पुढाकार घेवून काम करत असलेल्या आपुलकी सामाजिक संस्थेने या वर्षी जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा संकल्प केला आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना गुरुवार दि.२८ जून २०१८ रोजी वर्धा जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात येणार  असल्याचे आपुलकीचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभिजीत फाळके पाटील यांनी सांगितले.
     शेतीकरिता होणारा खर्च शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर जात असताना नैसर्गिक आपत्ती मुळे हवालदिल शेतकऱ्यांना मदत पोहचवणे हा समाजाचे कर्तव्य आहे. सध्याचे पेरणीचे संकट लक्षात घेऊन आपुलकीचे अध्यक्ष श्री.अभिजीतदादा फाळके पाटील यांनी आपुलकी सामाजिक संस्था आणि केमफॅब अल्कलीज लिमिटेड 
च्या संयुक्त वतीने वर्धा जिल्ह्यातील कारंजा,उमरी,मदनी,सावळी,ठाणेगाव,नारा,चिंचोली,धामणगाव,वायफाड,
आमला,तीगाव,दहिगाव,भूगाव,जऊळगाव,अल्लीपूर,तळेगाव,इंजाला,दानापूर,पिंपळखुटा,आमगाव,चांदणी,जामणी,तामसवाडा,म्हसळा,खैरी येथील ४०० शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचे ठरविले आहे.यात त्यांनी सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांचा समावेश केला आहे.याप्रकारची मदत करून शेतकऱ्यांना थोडा दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न ते या माध्यमातुन करीत आहेत.अशा प्रकारची मदत करून शेतकऱ्यांविषयी फक्त कोरडी सहानुभूती न बाळगता त्यांना स्वाभिमानाने जगण्यास ही संस्था मदत करत आहे.
आपुलकीने यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम जिल्ह्यात राबविले आहे.देशी बियाणे वाटपासोबतच कृषी अवजार बँक,शेतकी कार्यशाळा,फवाऱ्याच्या सेफ्टी किट चे वाटप,सौरदिव्यांचे वाटप यासारखी शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी रचनात्मक कामे आपुलकी समाजीक संस्थेने केली आहेत.
  शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या हितासाठी नेहमीच समोर असणाऱ्या श्री. अभिजीत फाळके पाटील यांनी उचललेले हे पाऊल अतिशय महत्वाचे आहे.१२९ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्यानंतरचा आपुलकी सामाजिक संस्थेचा हा आणखी एक मोठा उपक्रम आहे.भविष्यात शेतकऱ्यांसाठी आणखीही मोठे काम उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. हया उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपुलकी सामाजिक संस्थेचे रितेश घोगरे, नंदू गावंडे, योगेश घोगरे, प्रवीण उगेमूगे, अतुल तिमांडे , नितीन सेलकर , नितीन भोयर, मनोज भांगे, संदीप शेळके, विशाल चौधरी ,सचिन घोडे , उमेश कामटकर, प्रवीण काटकर,अतुल पाळेकर , प्रशांत भोसले, किशोर मुटे, अविनाश महल्ले अथक परिश्रम घेत आहेत.


वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

Shivsena's Rastaroko movement for farmers' questions in Wardha | वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलनवर्धा/प्रतिनिधी:
 स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या रेटून लावण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार विलास कातोरे यांनी स्वीकारले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून एक वर्षांचा कालावधी होत आहे. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांना सदर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. विविध बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून बँकांच्या अधिकाऱ्यांना पीक कर्ज वितरणाबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात यावे. गत वर्षी गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सदर नुकसानीपोटी देण्यात येणारी शासकीय मदत जाहीरही करण्यात आली. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांना ही शासकीय मदत मिळाली नसून ती त्वरित देण्यात यावी. याकालावधीत सुमारे ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु, त्यापैकी केवळ २८ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. राज्यातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब तात्काळ बंद करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियोजन बद्द कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करावी, या मागण्या सदर रास्तारोको आंदोलनादरम्यान रेटून लावण्यात आल्या होत्या. तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, माजी आमदार अशोक शिंदे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, महिला आघाडीच्या सुधा शिंदे, गणेश इखार आदींनी केले. मोर्चासह रास्तारोको आंदोलनात महिला व पुरुष शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
सरकारविरोधी केली घोषणाबाजी
आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेनेच्या काही पुढाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी भाजपा सरकार सध्या कसे शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे याची माहिती दिली. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

वर्ध्यात १०० किलो प्लास्टिक जप्त

वर्ध्यात १०० किलो प्लास्टिक जप्त

100 kg plastic seized | १०० किलो प्लास्टिक जप्तवर्धा/प्रतिनिधी:
राज्य शासनाने प्लास्टिक बंदी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या अंतर्गत वर्धा शहरात नगर पालिकेतर्फे व्यवसायिकांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी न.प.च्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून भामटीपूरा भागातील हिरा सेल्स या व्यावसायिक प्रतिष्ठानातून एक दोन नव्हे तर तब्बल १०० किलो कमी कमी जाडीचे प्लास्टिक व थर्माकोल जप्त केले. शिवाय सदर व्यावसायिकाला पाच हजारांचा दंड ठोठावून त्याची वसूली केली.
शनिवारी व रविवारी प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविल्यानंतर सोमवारचा खंड देत मंगळवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, स्वच्छता व आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, गुरूदेव हटवार, सतीश पडोळे, स्रेहा मेश्राम, नवीन गुणाडे, मनीष मानकर आदींनी शहरातील विविध भागातील व्यावसायिकांना कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल अशा सूचना दिल्या. ही मोहीम राबविताना भामटीपूरा भागातील हिरा सेल्से या व्यावसायिक प्रतिष्ठाणात बंदीच्या नियमाकडे पाठ करीत कमी जाडीच्या प्लास्टीकचा व थर्माकोलचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने ते जप्त करण्यात आले. शिवाय ६ हजारांचा दंड ठोठावून तो वसूल करण्यात आला.
वारंवार सुचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई
कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. शिवाय जो कुणी सदर प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करताना आढळेल त्याच्यावर दंडात्मक तर जो वारंवार सुचना देऊनही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानेल त्याच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे.
कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्याने सध्या काही प्रमाणात कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांसह व्यापाºयांकडून केल्या जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांसह व्यावसायिकांनीही कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन न.प.च्यावतीने करण्यात आले आहे.

चंद्रपुरातील भीषण समस्या

चंद्रपुरातील भीषण समस्या

The terrible problem that took place in the Chandrapur of encroachment | अतिक्रमण बनली चंद्रपुरातील भीषण समस्याचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरचे भाग्य केव्हा उजळेल, या प्रश्नाला घेऊनच चंद्रपूरकर एकेक दिवस समोर रेटत आहे. भाग्य उजळेल, तेव्हा उजळो, पण जी वर्तमानातली देण आहे, तीदेखील टिकविणे स्थानिक राज्यकर्त्यांना जमलेले दिसत नाही. चंद्रपुरातील मोकळ्या जागा, सुमारे ६० टक्के रस्ते, पटांगण, बाजारपेठा आणि चक्क नद्यांवरही नागरिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव तयार करणाऱ्यांच्या डोळ्यासमोरच शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने चंद्रपूरकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरकरांच्या समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस त्या वाढत जात आहेत. आता तर चक्क शहरालाच ग्रहण लागणे सुरू झाले आहे. शहर म्हटले की अतिक्रमण आलेच, हे कुणालाही पटण्यासारखे आहे. मात्र या अतिक्रमणाविरोधात स्थानिक प्रशासनाने कारवाईच करू नये, हे पटण्यासारखे नाही. अतिक्रमणाची समस्या चंद्रपूरला पूर्वीपासूनच चिकटली आहे. चंद्रपूरचे गौरी तलाव, घुटकाळा तलाव असेच अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. आज या ठिकाणी पाण्याचा लवलेशही नाही. निव्वळ सिमेंट-काँक्रीटचे जंगल उभे झाले आहे. बाहेरची व्यक्ती सोडा; चंद्रपूरच्याच नव्या पिढीला या ठिकाणी तलाव होते असे सांगितले तर खरे वाटणार नाही.
नगर रचना विभागाने टाऊन प्लॉन तयार करताना चंद्रपुरातील मुख्य रस्ते किती फुटाचे असावे, याविषयी ठळकपणे नमूद केले आहे. मात्र एकही रस्ता टाऊन प्लॉनच्या आकडेवारीत ‘फिट’ बसत नाही. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग हे चंद्रपुरातील प्रमुख मार्ग आहेत. मात्र या मार्गावरही व्यावसायिकांनी व नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. फेरीवाले, चारचाकीवाले, फुटपाथवर बसलेले किरकोळ व्यावसायिक यांनी केलेले अतिक्रमण केव्हाही काढता येईल. मात्र अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर पक्के बांधकाम केले आहे. ते अतिक्रमित आहे, हे माहित असतानाही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. येथील गोलबाजाराला तर अतिक्रमणाने पार बरबटून टाकले आहे. फेरीवाल्यांचे व दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे येथून ग्राहकांना पायदळही चालणे कठीण होते.
प्रमुख मार्गासह वॉर्डावॉर्डातील अंतर्गत रस्त्यावरही नागरिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. एकीकडे लोकसंख्या वाढून वाहतूकही वाढली आहे.
मात्र दुसरीकडे रस्ते अतिक्रमणामुळे आकूंचन पावत आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या उभी ठाकली आहे. आधी रस्त्यालगत घराचे बांधकाम केले जाते. त्यानंतर रस्त्यावर अतिक्रमण करून घराला लागूनच दुकान थाटले जाते. असा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येतो.
मनपा प्रशासनाला ही बाब माहित नाही, असे नाही. मात्र कारवाईचा बडगा उगारण्यात प्रशासन अपयशी ठरले असावे वा मला काय त्याचे, असे म्हणत हात झटकण्याचा प्रकार असावा, असेच परिस्थितीवरून दिसून येते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी संजिव जयस्वाल यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अब्दूर रहमान यांच्या सहकार्याने अतिक्रमित इमारतींवर बुलडोजर चालविला होता. त्यावेळी अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. मात्र त्यानंतर अशी ठळक कारवाई कधीच होऊ शकली नाही.
नद्यांवरही अतिक्रमण
चंद्रपूरकरांची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीवरही वेकोलिने अतिक्रमण केले आहे. मोठमोठे ओव्हरबर्डन इरई नदीच्या पात्रात दिमाखाने उभे असलेले दिसते. खुद्द मनपा प्रशासनानेच भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी इरई पात्रात इमारत बांधून ठेवली आहे. झरपट नदीच्या पात्रात तर रहिवासी वस्त्या तयार झाल्या आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाली की या वस्त्यातील नागरिकांना इतरत्र हलविले जाते. मात्र अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखविले जात नाही.
मोठे नालेही इमारतीखाली
रस्त्यावर, मोकळ्या जागेवर तर अतिक्रमण होत आहेच. शहरातून वाहणाºया मोठ्या नाल्यांनाही अतिक्रमणधारकांनी सोडले नाही. अनेक ठिकाणी या नाल्यांवर नागरिकांनी पक्के बांधकाम केले आहे. एका महाविद्यालयाने तर हा नालाच आपल्या प्रिमायसेसमध्ये गडप केला आहे. त्यामुळे जेसीबी लावूनही या नाला पूर्णत: साफ केला जात नाही. परिणामी शहराला बॅक वॉटरचा दरवर्षी सामना करावा लागतो.(लो.से)
चंद्रपुरात सुरु होणार प्लास्टिक संकलन केंद्र

चंद्रपुरात सुरु होणार प्लास्टिक संकलन केंद्र

प्लास्टिक साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विविधस्तरावर अभ्यास सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यातील बाबींची अंमलबजावणी करण्याबरोबरच घरी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची कशा प्रकारे विल्हेवाट लावता येईल, यासाठी योजना आखण्याचे काम सध्या पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच मनपातर्फे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू होणार आहे.
व्यापारी संघांची बैठक सोमवारी मनपा सभागृहात आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शंभर टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची तयारी महानगरपालिकेने सुरू केली असून चंद्रपूरकरांना आपल्या घरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावता यावी, यासाठी पालिकेच्या तिनही झोन कार्यालयांमधे प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
बहुतेक घरी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, अन्य वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. नागरिक घरातील प्लास्टिक वस्तू या केंद्रावर जमा करू शकतात. तसेच शहरात प्लास्टिक वस्तू जमा करण्यास फिरते ‘कचरा संकलन वाहन’ सुरु करण्यात येणार आहे. जमा झालेल्या प्लास्टिक वस्तूंची मनपातर्फे शासन निर्देशाप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. व्यापारी, नागरिकांनी संकलन केंद्र किंवा फिरते वाहन यात प्लास्टिक जमा करावे. तसे न केल्यास व साठा किंवा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. प्लास्टिकमुक्त मोहिमेस व्यापारी मंडळे व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शितल वाकडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन कापसे व सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्वछता अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

On the very first day, the locals locked the three schools | पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूपचंद्रपूर/प्रतिनिधी:
 २०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची घंटा वाजली. वाजत गाजत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले गेले. प्रभात फेरी, शाळेत पुष्पगुच्छ व विविध साहित्य वाटप करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र भद्रावती तालुक्यातील चिरादेवी शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी तर सावली व राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे शाळा इमारतीसाठी गावकºयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शिक्षण विभागासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
पहिल्याच दिवसापासून सावलीच्या दोन शाळा बेमुदत बंद
सावली : येथील दोन जि. प. शाळा इमारतीचे निर्लेखन करण्यात आले. परंतु, गत चार वर्षांपासून इमारत बांधण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी इमारत बांधकामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शाळांमध्ये १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. त्या शाळेतील विद्यार्थी शाळा क्र. २ येथे विद्यार्जनासाठी येत असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना साधारणपणे तीन किमी पायपीट करावी लागत आहे. या कारणाने संतप्त झालेल्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे अर्ज देऊन टीसी मागितली आहे. अशाच प्रकारचे आंदोलन सहा महिन्यापूर्वी झाले होते. मात्र आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी आंदोलन केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सावलीचे संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, नगराध्यक्ष विलास यासलवार आदींनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहील, यावर पालक ठाम आहेत.
संतप्त पालकांनी विहिरगाव शाळेलाही ठोकले टाळे
विरुर (स्टे.): 
राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत पाडून नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र दोन वर्षानंतरही बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. विहिरगाव गावात जि.प. प्राथमक शाळा असून येथे वर्ग १ ते ५ आहे. या सत्रात शाळेत १५० च्या जवळपास पटसंख्या आहे. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शिक्षकवर्ग आले. तसेच विद्यार्थीही आले. मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांना बाहेरच रहावे लागले. वर्गखोलीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विरुर पोलसांना पाचारण करण्यात आले. ही बाब वरिष्ठांना कळविण्यात आली. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही.
शिक्षकासाठी चिरादेवी शाळेत पालकांचे ठिय्या आंदोलन
भद्रावती :
 शिक्षकांसह पालकांनी सुद्धा शिक्षण विभागाला विनंती अर्ज करुनही चिरादेवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची आॅनलाईन पद्धतीने बदली झाली. त्यामुळे शिक्षकाची बदली रद्द करा व पुन्हा त्यांना चिरादेवी शाळेतच नियुक्तीच्या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेला कुलूप ठोकून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत त्या शिक्षकाला रुजू करुन घेणार नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवून ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा येथील पालकांनी घेतला आहे. चिरादेवी शाळेत गेल्या चार वर्षापूर्वी बंडू दडमल हे शिक्षक रुजू झाले. त्यांची शिकवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. त्यांच्यामुळे ही शाळा संपूर्ण डिजीटल असून उन्हाळ्याच्या सुट्यातही येथील शिक्षकाने इंग्रजी व गणित या विषयाचे विद्यार्थ्यांना धडे दिले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली. शिक्षण विभागाकडे आपली बदली करू नये, असा विनंती अर्ज शिक्षकाने केला होता. परंतु, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी या विनंती अर्जाला केराची टोपली दाखवली व बंडू दडमल यांची आॅनलाईन पद्धतीने सिंदेवाही तालुक्यातील पागळी गावात बदली केली. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापन कमिटीने बदली झालेले शिक्षक पुन्हा आमच्या शाळेत रुजू होत नाही, तोपर्यंत शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. गटशिक्षणाधिकारी संजय हेडाऊ यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. परंतु पालकांनी शाळेचे दार उघडू दिले नाही. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्का मंगाम, उपाध्यक्ष अंकुश दर्वे, सदस्य तुळशिराम बदखल, शंका आत्राम, माधुरी वासेकर, ज्योती राजूरकर तसेच पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
हेच का अच्छे दिन? विरोधकांचा सवाल
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्याचे फर्माण सोडण्यात आले. मात्र दाखलपात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोली नसल्याने रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागणे, ही दुदैवी बाब आहे. इमारत बांधकामासाठी निधी देण्याची मागणी वारंवार जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आली. मात्र सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, परिणामी शिक्षण विभागाचा १.२८ कोटींचा निधी परत जाणार आहे, असल्याचा आरोप काँग्रेसचे जि.प. गटनेते डॉ. सतीश वारजुकर यांनी केला आहे.
नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले

नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले

In Nagpur in two hour three ATMs were smashed | नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले
नागपूर/प्रतिनिधी:
पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (एमएच १२/ ८९१२) मध्ये आलेल्या लुटारूंनी पॉवरग्रीड चौकाजवळच्या स्टेट बँकेच्या एटीएमवर धडक दिली. पहाटे २ च्या सुमारास एटीएममध्ये शिरलेल्या या लुटारूंनी गॅस कटरसह अन्य हत्यारांचा वापर करून २० मिनिटात दोन मशीन फोडल्या. तेथून त्यांनी ११लाख, ३५ हजार, ७०० रुपये लुटले. त्यानंतर हे लुटारू एसबीआयच्याच पाटणकर दुसऱ्या एका एटीएममध्ये पोहचले. तेथून चोरट्यांनी २७ लाख, २४ हजार, ३०० रुपये तसेच तिसºया एटीएममधून १६ लाख, १० हजार, ६०० रुपयांची रोकड लंपास केली. अशा प्रकारे तीन एटीएममधून चोरट्यांनी ५४ लाख, ७० हजार ६०० रुपयांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी एटीएम फोडण्याच्या या घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. बँक व्यवस्थापक सुधीर बाबूराव माटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
आंतरराज्यीय गुन्हेगार
एटीएम मशीन फोडून रोकड लंपास करणाऱ्या टोळ्या दक्षिण भारत तसेच उत्तर भारतात आहे. गेल्या वर्षी प्रतापनगर, एमआयडीसीतील एटीएम फोडून या टोळ्यांनी अशाच प्रकारे लाखो रुपये लुटून नेले होते.या टोळ्या एवढ्या सराईत आहेत की एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या आपले चेहरे दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतात. त्यांनी वापरलेली कारचा नंबरही बनावट असावा, असा संशय आहे.