काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 02, 2014

तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद.

तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद.

वाल्याचा वाल्मिकी होणार असेल,
तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद

अहमदनगर, दि. २.४.२०१४.
सध्या लोकशाहीचा निवडणुकीरूपी कुंभमेळा चालू आहे. या कुंभमेळात पवित्र होण्यासाठी हौसे-नवसे-गवसे-भ्रष्टाचारी-गैरव्यवहारात अडकलेले सर्वजण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत. खरेतर, वाल्यांचे वाल्मिकी होऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असतील तर, श्री. हजारे यांचे अशा प्रत्येक उमेदवाराला आशीर्वादच आहेत.
प्रत्येक लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणाèया बहुतांशी उमेदवारांना अचानक अण्णांची आठवण होते. त्यांचे आशीर्वाद घेण्याची गरज वाटते. एरवी हे उमेदवार अण्णांच्या देशहिताच्या कुठल्याही आंदोलनात कधीही सहभागी नसतात. तसेच अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या प्रश्नांशी या उमेदवारांना कुठलेही कर्तव्य नसते. ते संपुर्णत: आलिप्त असतात. ऐन निवडणुकीतच अशा उमेदवारांना अण्णांची आठवण होते. अण्णांची भेट घेऊन, फोटो काढून बातम्या छापुन आणण्यासाठी खटाटोप केला जातो. परंतु आता जनता जागृत झालेली आहे. असे ढोंगी उमेदवार त्यामुळे जनतेस फसवू शकत नाहीत. अण्णांच्या जनहिताच्या लढयात कधीही नसलेले हे संधीसाधू आता अण्णांची भेट घेण्याकरीता मिनतवारी करतांना दिसतात.
काही उमेदवार तर केवळ असे नाटकच करत नाहीत, तर मतदारांमध्येही अण्णांच्या पाqठब्याचा आभास निर्माण करतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खा. दिलीप गांधी. खा. गांधी यांनी नुकतीच अण्णांची भेट घेतली. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘अण्णा हजारे यांनी माझ्या कामाची चौकशी केली, तुम्ही चांगले काम केले आहे. तुम्ही या पुढेही चांगले काम करत रहा,ङ्क असे पत्रकारांना सांगितले. त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या. मंत्री आणि खासदार पद भुषिविलेल्या खा. गांधी यांनी निर्लज्जपणे किती खोटे बोलावे, आणि अण्णांच्या भेटीचे आणि त्यांनी न बोललेल्या वाक्यांचे कसे भांडवल करावे, याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. नगर अर्बन बँकेतल्या घोटाळयांविषयीचे सर्व तपशील आणि त्यातील खासदार महोदयांची मर्दुंमकी अण्णांना आणि सर्वांनाच ठाऊक आहे. या बाबत चौकशी आणि कारवाईसाठी अण्णांनी शासनाशी पत्रव्यवहारही केलेला आहे. इतकेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर व ईतर नेत्यांनी भ्रष्टाचाराबद्दल कारवाईची मागणी शासनाकडे केलेली आहे. श्री. हजारे यांच्यावर बेलगाम व खोटे आरोप करणारे जळगावचे माजी मंत्री सुरेश जैन व खा. गांधी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यावेळेस अ.नगर येथे खा. गांधी यांच्याकडेच सध्या भ्रष्टाचाराबद्दल तुरूंगवासी असलेल्या सुरेश जैन यांची उठबस होती. कुठल्याही पक्षाशी अथवा उमेदवाराशी आम्हाला काहीही घेणे देणे नाही. परंतू दिलीप गांधी वृत्तपत्रातून गैरसमज पसरविल्याने आधिक स्पष्टीकरणाकरिता आम्हाला हे सांगण्याची आवश्यकता वाटत आहे. वृत्तपत्रांशी बोलतांना खा. गांधी यांनी असेही सांगितले की, ‘ नरेंद मोदी यांना पाqठब्याबाबत अण्णा काहीही बोलले नाहीत. कदाचित मोदी स्वच्छ असतीलही परंतू भाजपने उमेदवारी दिलेले येडूरप्पा qकवा खा. गांधी यांसारखे उमेदवार जर निवडून आले तर मोदी भ्रष्टाचारमुक्त-समर्थ भारत कसा निर्माण करू शकतील, अशी शंका अण्णांनी वाटली.
खरेतर अशा उमेदवारांनी अण्णा यांची भेट घेऊन फोटो आणि कथित आशीर्वादाच्या बातम्या छापून आणण्याकरीता खटाटोप निरर्थक आहे. त्याऐवजी खèया अर्थाने लोकशाही रूजविण्याकरिता भ्रष्टाचार निर्मुलन, नागरीकांची सनद, नापसंतीचे मत नोंदविण्याबाबत, अकार्यक्षम लोकप्रतिनिधीला परत बोलविण्याचा अधिकार, ग्रामविकास, व्यवस्था परिवर्तन याकरिता सदर उमेदवार काय करणार आहेत, याची माहिती मतदारांना देणे गरजेचे आहे. तसेच हे उमेदवार अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या १७ मुद्यांबाबतही सोईस्कररित्या मौन बाळगुन आहेत. श्री. हजारे यांची भुमिका स्पष्ट असून उमेदवार कुठल्याही पक्षाचा अथवा गटातटाचा पुरस्कार अण्णा करीत नाहीत. तर जो उमेदवार चारित्र्यसंपन्न, आणि खèया अर्थाने सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्नशील असेल त्यास जनतेने निवडुन दयावे, असे अण्णांचे आवाहन आहे. ज्या मतदारसंघात मत देण्यायोग्य एकही उमेदवार नसेल तेथे नापसंतीचे मत नोंदवावे. परंतू राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येकाने मतदान आवश्य करावे, असे आवाहन अण्णांनी केले आहे.
‘‘सुर्य कुणाच्याही कोंबडयाच्या अरवण्याने उगवू दया,
परंतू तो आता उगवू दया.
बारवकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी कर

बारवकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी कर

 विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांची मागणी

जळगांव, दि. 2 :- पुणे जिल्ह्यातील चाकणमधील विविध जमिन घोटाळयांसदर्भातआवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विलास दत्तात्रय बारवकर यांनी 25 मार्च2014 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या चार पानी आत्महत्यापत्रात (सुसाईड नोट) आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेते, काहीनातेवाईक यांचेसह 75 जणांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. बारवकर यांच्याआत्महत्येमुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेआहे. बारवकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सी.बी.आय. अथवा सी.आय.डी. मार्फतचौकशी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनीकेली आहे. त्यासंदर्भात श्री.खडसे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच गृहमंत्रीआर.आर.पाटील यांना पत्र लिहुन बारवकर यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याचीमागणी केली आहे.
निवडणूकी आधीच मोदींनी बांशिग बांधले : शरद पवार

निवडणूकी आधीच मोदींनी बांशिग बांधले : शरद पवार

शरद पवारांची राजच्या पाठीवर कौतुकाची थाप; मात्र उद्धवला चिमटा


अलिबाग- अलिबाग आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरेंच्या प्रचार सभेत शरद पवार म्हणाले आजपर्यंत खुप निवडणूका बघितल्या पण असे निवडणूकी आधी पीएम पदाचा उमेदवार कधी जाहीर केला नव्हता. निवडणूकी आधीच मोदींनी बांशिग बांधले आहे. संसदीय लोकशाही मोदींना आणि भाजपला मान्य नाही. संसदीय लोकशाहीत निवडणूका आणि त्यानंतर नेता निवडला जातो. त्याला पीएम पदाची शपथ देतात, हेच मोदींना आणि भाजपला माहित नाही. काँगेसमुक्त भारत म्हणजे गमतीची गोष्ट स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केलेल्या पक्षाला कसे करणार मुक्त असा टोला लावला. मोदी इतिहास बदलयाला निघाले आहेत मोदी काँग्रेसचा खासदाराच्या घरी सांत्वनाला गेले नाहीत मोदी जातीयवादी असल्याचा मोठा पुरावा आणखी कोणता , असेही ते म्हणले. 
गेल्या निवडणुकीत झालेले मतदान आणि पुणे व जुन्नर या दोन ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता मनसेला 'लाईटली' घेता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय जाहीरपणे चर्चा करण्यासारखा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांची पुण्यात आणि जुन्नरमध्ये झालेली सभा मी दूरचित्रवाहिनीवर बघितली. या सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मनसेला 'लाईटली' घेता येणार नाही. त्या पक्षाला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आकड्यांवरूनही हे स्पष्ट होते, असे शरद पवार म्हणाले.

आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचार सभेला पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, नारायण राणेभाषण उपस्थित होते.  
नारायण राणें म्हणाले, आम्ही विकासाच्या नावाखाली मते मागतो ते व्यक्तिगत टीका करून मत मागत आहेत. आघाडी सरकारने कायमच विकासचे राजकारण केले. भाजपकडे विकासाची दृष्टी नाही अन्नसुरक्षा योजना आणून केंद्राने गरीबांचा विचार केला आहे आघाडी सरकारने आणि शरद पवारांनी मोठे कार्य केले राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्य़कर्त्यांनी मतभेद ठेवू नये मनातील कलह निवडणूकीत मध्ये आणू नका, असे आवाहन केले.





शरद पवारांची राजच्या पाठीवर कौतुकाची थाप; मात्र उद्धवला चिमटा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुकाची थाप मारली आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, असे पवार यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी उद्धव यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष वाढवला असताना उद्धव ठाकरेंना मात्र शिवसेना वारसाहक्काने मिळाल्याचे पवार यांनी म्हटले आहे. 'फेसबुक'वरील आपल्या पेजवर शरद पवार यांनी अवघ्या काही वाक्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे आपले मत मांडले आहे.
ते म्हणतात, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, उद्धव यांना पक्ष वारसाहक्काने मिळाला; हा या दोघांमधील मूलभूत फरक आहे. यामुळे राज यांनी महायुतीत जावं किंवा मोदीला पाठींबा द्यावा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचाच आहे. राहिला प्रश्न उद्धव यांचा, तर त्यांचे वक्तव्य मला नोंद घेण्याच्याही योग्यतेचे वाटत नाही.
आपलं सरकार

आपलं सरकार

आपलं सरकार

बोल बच्चन @ देवनाथ गंडाटे
----------------------------


लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच मुंबईच्या चित्रनगरीत सध्या एकच चर्चा चाललीय. ती म्हणजे पक्षप्रवेश आणि लोकसभा उमेदवार म्हणून नामांकन भरल्याची. सारेच उठसूठ राजकारणात जाऊ लागलेत. त्यामुळं दिग्दर्शक-निर्मात्यांना चित्रपटांची चिंता वाटू लागली आहे. सारेच राजकारणात गेले तर कसं होईल आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे, असा प्रश्न त्यांच्या मनात सतावू लागलाय. त्याचाच हा किस्सा.
एका चित्रपटाच्या अनुषंगाने एक दिग्दर्शक निर्मात्याला काही नायक-नायिका हव्या होत्या. त्यासाठी तो ड्रीमगर्ल हेमामालिनीकडे गेला. मॅडम, आपलं सरकार चित्रपटासाठी आपण भूमिका कराल काय? अशी विचारणा केली. मात्र, हेमाजींनी नकार देत, अभी तो मेरे पास टाईम नही, मोदीजीको पीएम बनाना है. निराश झालेल्या दिग्दर्शकाने मग, दिपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीची भेट घेतली. चित्रपटाचे कथानक सांगितले. ऐकून ती भारावली. दिग्दर्शकही खूश झाला अन मन मे लड्डू फूटा. पण, झाले ते उलटे. दिपालीने आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नगरची उमेदवारी मिळविली. निराश झालेल्या दिग्दर्शकाने फोन करून दिपालीला विचारले. का हो मॅडम. तुम्ही तर होकार दिला होता ना. मग, काय झाले?. त्यावर ती म्हणाली, तुम्हीच तर म्हणाले आपलं सरकारमध्ये काम करा. मग, सरकार बनण्यापूर्वी खासदार बनायला नको. हिरमुसल्या मनानं परतलेल्या दिग्दर्शकानं अभिनेत्रींचा नाद सोडला आणि अभिनेत्यांना शोधणे सुरू केले. परेश रावल यांची भेट घेतली. सारं समजावून सांगितलं. दोन दिवसांत कळवितो, असे रावल बोलले. पण, दुस-याच दिवशी वृत्तपत्रात परेश रावल भाजपचे उमेदवार म्हणून बातमी झळकली. दिग्दर्शकाने ओ मॉय गाड म्हणत डो्क्यावर हात ठेवला. पुढे, महेश मांजरेकर यांच्याकडे विनवणी सुरू केली. पण, काही फायदा झाला नाही. त्यांनीही मनसेच्या उमेदवारीत व्यस्त असल्याचे सांगत डॉ. कोल्हेंकडे जाण्याचा सल्ला दिला. बंगल्यातून चहा-पाण्याविना परतलेल्या दिग्दर्शकाने त्यांची जागा डॉ. अमोल कोल्हे भरून काढतील, या आशेनं त्यांच्याकडे गेले. पण, बघतात तर काय त्यांनी हातात शिवधनुष्य घेतला होता. शेवटचा पर्याय नंदू माधव होते. त्यांनी होकार दिला. हरकत नाही, असे सांगत त्यांनीही दिपाली सय्यदचा किस्सा गिरविला. आपलं सरकार आणू. पण आधी लोकसभा जिंकू. मग, या दिग्दर्शकाने राखी सावंतला गाठले. पण, तिची भाषाच निराळी. का, कशासाठी? असे टर्रकविणारे प्रश्न करीत राहील. आपलं सरकार ना. नक्कीच साकार करू. पण, ते राष्ट्रीय आम पक्षाच्या तिकिटावर. तिच्यापुढे काय बोलावे, तिला कसं समजवावं, हे त्या दिग्दर्शकाच्या नाकीनऊ आले होते. पण, ती हट्टी आणि जिद्दी स्वभावाची. या देशात दोनच गोष्टी मोठ्या. एक मीडिया आणि मी (राखी), अशी ती बडबडत होती. एक नंबरची ऑयटमबाज ही राखी एकदिवस दिल्लीतही गेली होती. मै दिल्ली की चाय पिने आयी हू, अशी जोराजोरानं ओरडत कमळाचं फूल मागत होती. काय म्हणावं या पोरीला.


या राजकारणामुळे वैतागलेल्या दिग्दर्शकानेही आपलं सरकार या चित्रपटाचा नाद सोडलाय म्हणे. पण, या अभिनेत्यांच्या डो्नयातील राजकारणाचं भूत उतरल्यावर चित्रपटाचे चित्रिकरण करणार असल्याचे समजते.

Sunday, March 30, 2014

नरेंद्र मोदी- नांदेळ

नरेंद्र मोदी- नांदेळ

-श्री चिदंबरम Nirbhaya फंड वर राष्ट्र उत्तर द्या: नांदेड मध्ये नरेंद्र मोदी
मोदी: अंतिम बजेट शासकीय Nirbhaya फंड,
महिलांसाठी सुरक्षा सुधारण्यासाठी खर्च नसतो एकच पैसा सह अप आले, ते दिशाभूल लोक आहेत

आप मुझे मौका दो, कला धन आएगा और इसको गरीब लोगों की भलाई में लगा दूंगा - श्री
काँग्रेस दिल्लीला बलात्काराची राजधानी बनवत आहे: नरेंद्र मोदी
काळा पैसा ज्यांच्याकडे नैसर्गिकरित्या काळा पैसा यायचं करू नका. भारत काळा पैसा परतावा मागणी:
काळा पैसा परत किंवा नाही यावे. प्रत्येक पैसा परत आणला पाहिजे:
दोषी नेत्यांवर कारवाई करताना सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करणार नाही-
दिल्ली मध्ये शासकीय त्या पैसे परत आणण्यासाठी नाराज आहेत
सात जणांचा मृत्यू

सात जणांचा मृत्यू

अमरावती शहरातील परतवाडी येथील टीळक चौकातील एका कपड्याच्या दुकाणाला रात्री उशीरा आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Saturday, March 29, 2014

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

प्रत्येक कुटूंबाला तीन शेळ्यांची मदत. ६३ कुटूंबांना मिळणार याचा लाभ

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुका येथे मुंडल गाव आहे. इथले गावकरी शेतमजूरी करून आपला ऊदरनिर्वाह करतात. विदर्भातील यवतमाळ जिल्हयाला सदैव दुष्काळाने ग्रासलेले आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आपले भीषण रूप घेउनच उभा ठाकत असतो. यंदा अवकाळी पाऊस आणि
गारपीटीने शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाले आहेत. गारपीटीत अनेक जनावरे, कोंबड्या, शेळ्यांचा जीव
गेला. अनेक समस्यांना सामोरे जाणा-या या गावाची मुलभूत गरज ओळखून मैत्रेय फाऊन्डेशन,
समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (कृषी समृद्धी) आणि छखथउधऊ नागपूर यांच्या पुढाकाराने यवतमाळ
मधील मुंडल गावात दुभत्या शेळ्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधूनिक भारतातील
या गावाची ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मैत्रेय फाऊन्डेशनने हे गाव दत्तक घेतले आहे. या दत्तक
योजनेच्या शुभारंभी गावातील प्रत्येक कुटूंबाला तीन दुभत्या शेळ्या देण्यात आल्यात. प्रत्येक शेळीचा विमा
काढलेला आहे. तसेच दहा दिवसात शेळी अनावधानाने का असेना मरण पावली तर त्या बदली दुसरी शेळी
त्या कुटूंबाला देण्यात येईल. दत्तक योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आज दि. २८ मार्च रोजी मुंडल येथे झाला. कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अधिकारी प्रभाकर सुरेश मिश्रा, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ब्रँच व्यवस्थापक साहू, सेंद्रिय शेतीचे तज्ञ श्रीकांत बयंकरम म्हैसूर. प्रामुख्याने उपस्थित होते. मैत्रेय विदर्भ प्रतिनिधी पांडुरंग बंडगर, गुरूदत्त शेणॉय, मैत्रेय फाऊन्डेशनच्या प्रतिनिधी अनिता खुडे आणि समस्त गावकरी कार्यक्रमाला उपस्थिती होते. गावाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन शेळी पालन व्यवसाय गावक-यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आहे. 
मल्हार सेनेचे कोणालाच समर्थन नाही

मल्हार सेनेचे कोणालाच समर्थन नाही

चंद्रपूर, : येत्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात धनगर समाजाचे मत निर्णायक ठरणार आहे. आजवर सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केले आहे. ही बाब लक्षात घेवून धनगर समाज जय मल्हार सेनेने अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाला पाठींबा दिलेला नाही, असे जय मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संजय कन्नावार यांनी कळवले आहे.
आज जारी केलेल्या एका पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, जय मल्हार सेनेला आजवर सर्वच पक्षांनी आश्वासने दिली. आम्ही आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले. हिवाळी अधिवेशनावर समाजाचा मोर्चाही काढण्यात आला. मात्र आमच्या समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळाव्या यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने प्रयत्न केले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात जय मल्हार सेनेच्या कार्यकत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Friday, March 28, 2014

गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा- राहुल गांधी

गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा- राहुल गांधी

गडचिरोली- गुजरात मॉडेल'पेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल अधिक पटीने चांगले आहे, गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा देवू असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) येथे म्हटले आहे. 

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "देशात सध्या गुजरातच्या विकासाचे मार्केटिंग सुरू आहे. परंतु, 'गुजरात मॉडेल'पेक्षा महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल अधिक चांगले आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची टक्केवारी गुजरातपेक्षाही अधिक असून, महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.' 
सन 2004 व 2009 मध्ये नागरिकांनी 'भाजप'च्या मार्केटींगचा फुगा फोडला आहे. यावेळीही नागरिक नक्कीच 'भाजप'च्या सध्या सुरू असलेला 'गुजरात मॉडेल'चा फुगा फोडून कॉंग्रेसला पसंती देतील, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. कॉंग्रेसने 'मनरेगा' सारखी महत्त्वपूर्ण योजना राबवून खेड्यातील गरीब जनतेचे रोजगाराचे प्रश्ने सोडविले. मात्र, दुसरीकडे 'भाजप'कडून विकासाच्या नावे जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे.'

Thursday, March 27, 2014

पक्ष, उमेदवार  आणि चिन्ह

पक्ष, उमेदवार आणि चिन्ह

पक्ष, उमेदवार  आणि चिन्ह 

  1. हंसराज गंगाराम अहिर, भारतीय जनता पार्टी (कमळ),
  2.  हंसराज गुलाब कुंभारे, बहुजन समाज पार्टी (हत्ती),
  3.  संजय वामनराव देवतळे, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
  4.  अशोक विठोबाजी खंडाळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (पतंग),
  5. कुरेशी म.इकलाख म.युसूफ, सोशालिस्ट पार्टी (इंडिया) (बॅटरी टॉर्च),
  6. रोशन जांबुवंतराव घायवन, रिपब्लीकन पार्टी (खोरीप) (शिवणयंत्र), 
  7. वामनराव सदाशिव चटप, आम आदमी पार्टी (झाडू),
  8. नितीन वंसत पोहाने, लोकभारती (पाटी), 
  9. नंदकिशोर गंगाराम रंगारी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (कोट),
  10. पंकजकुमार अजाबलाल शर्मा, ऑल इंडिया तृणमुल काँग्रेस (फुले व गवत),
  11. फिराज उस्मान खान पठाण, बहुजन मुक्ती पार्टी (खाट), 
  12. सिद्धार्थ रमेशचंद्र राऊत, प्रबुद्ध रिपब्लीकन पार्टी (दूरदर्शन).
  13. अतुल अशोक मुनगीनवार (नारळ),
  14. कार्तीक गजानन कोडापे (करवत),
  15. नामदेव मानिक शेडमाके (ॲटोरिक्शा), 
  16. प्रमोद मंगरुजी सोरते (बॅट),
  17. विनोद दिनानाथ मेश्राम (छताचा पंखा) 
  18. संजय निळकंठ गावंडे (कपबशी) 

--------------------
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ

  1. भारतीय जनता पार्टीचे अशोक महादेवराव नेते, 
  2. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव आनंदराव कन्नाके,
  3. इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी, 
  4. बहुजन समाज पक्षाचे रामराव गोविंदा नन्नावरे, 
  5. आम आदमी पार्टीचे डॉ. गजबे रमेशकुमार बाबुरावजी, 
  6. बहुजन मुक्ती पार्टीचे दिवाकर पेंदाम, 
  7. आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव मोनबा नन्नावरे,
  8. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ॲड. प्रभाकर महागुजी दडमल, 
  9. समाजवादी पार्टीचे विनोद अंकुश नन्नावरे,
  10. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे सतीश गोकुलदास पेंदाम 
  11. अपक्ष दांडेकर बाबुराव लक्ष्मण
मांसाहार व शाकाहार जेवणाची लज्जत वाढवणारा सफेद कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे.
PHOTO, samir molade
उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या

उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या

मैत्रेयच्या पुढाकाराने मनाडीवासीयांना 
उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या

अकोला - अकोल्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेले मनाडी गाव स्वातंत्र्याच्या साठ वर्षाच्या काळानंतरही मुलभूत सोयीसुविधांपासून उपेक्षीतच असावे ही खरोखरच शोकांतीकाच म्हणावी. त्यातच यंदाच्या गारपीटीने शेतक-यांना मोठं नुकसान भोगावं लागतंय. गारपीटीत अनेक जनावरे, कोंबळ्या, शेळ्यांचा जीव गेला. अनेक समस्यांना सामोरे जाणा-या या गावाची मुलभूत गरज ओळखून मैत्रेय फाऊन्डेशन, समन्वयीत कृषी विकास प्रकल्प आणि छखथउधऊ नागपूर यांच्या पुढाकाराने अकोल्यातील मनाडीवासीयांना दुभत्या शेळ्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गावात एकूण चाळीस कुटूंबांचे वास्तव्य आहे. येथे ना पाण्याची सोय, ना शाळा, ना पक्की घरे. शेतमजूरी करणारी ही कुटूंब कसाबसा दिवस काढत जगतात. आधूनिक भारतातील या गावाची ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मैत्रेय फाऊन्डेशनने हे गाव दत्तक घेतले आहे. या दत्तक योजनेच्या शुभारंभी गावातील प्रत्येक कुटूंबाला तीन दुभत्या शेळ्या देण्यात आल्यात. प्रत्येक शेळीचा विमा काढलेला 
आहे. तसेच दहा दिवसात शेळी अनावधानाने का असेना मरण पावली तर त्या बदली दुसरी शेळी त्या कुटूंबाला देण्यात येईल. दत्तक योजनेचा शुभारंभ कार्यक्रम काल दि. २६ मार्च रोजी मनाडी येथे झाला. कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महमंडळचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, अकोला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रशांत गावंडे, मैत्रेय फाऊन्डेशनच्या प्रतिनिधी अनिता खुडे, पत्रकार सुर्यकांत 
भारतीय यांनी यावेळी गावक-यांना मार्गदर्शन केले. चाळीस कुटूंबाच्या या गावी प्रत्येक कुटूंबाला तीन शेळ्या देण्यात आल्या. अशा एकशे वीस शेळ्यांचे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक 
कुटूंबातील स्त्री ही वेगवेगळ्या बचतगटाला जुडलेली आहे. बचतगटातील महिलेनीच त्यांची ही गरज स्थानीक अधिका-यांकडे व्यक्त केली आणि मैत्रेय फाऊन्डेशन आणि स्थानिक अधिका-यांच्या पुढाकाराने गावक-यांना त्यांच्या हक्काच्या मुलभूत सुविधा पुरविण्याचे योजले.गावाची एकूण पकरिस्थिती लक्षात घेऊन शेळी पालन व्यवसाय मनाडीवासीयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आहे असे दिसते. मनाडी गावातील प्रमिला वासुदेव इंगळे यांचा नवरा शेतमजुरी करतो. कसंबसं दोन वेळची भ्रांतही निघणं कठीण. परंतू जवळ असलेल्या दोन शेळ्यांमुळे त्यांना थोडीशी मदत झाली. प्रमिलातार्इंनी शेळ्यांच्या सहाय्यानेच मुलीचं लग्न, मोठ्या मुलाचं डी एड आणि लहान मुलाचही शिक्षण त्या करू शकत आहेत. दोन्ही मुलं विज्ञान शाखेतून दरवर्षी प्रथम येण्याचाच मान पटकावित आलेत. लहान अमर सध्या १२ वी ला शिकतोय 
पुढे त्याला उच्च शिक्षणं घेण्याचं स्वप्न आहे मात्र परिस्थितीने त्याचा तो स्वप्न पाहण्याचाही अधिकार हिरावून घेतलाय. शासनाकडे त्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला समस्त गावकरी, मैत्रेयचे चंद्रकांत सानप शेगाव, अमोल बैस इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Wednesday, March 26, 2014

क्षयरोग  दिन

क्षयरोग दिन

क्षयरोग  दिन  कार्यक्रम  दिनांक  २४  मार्च  रोजी  आयोजित  सिकलसेल  शिबीर , विशेष  रोगनिदान  शिबीर  (गरोदर  माता , स्तनदा  माता , कुपोषित  बालकांच तपासणी ) या  आयोजित  कार्यक्रमाला  बालरोग  तज्ञ  ड. भावेश  मुसळे   डा   कविता  गांधी , हे  प्रामुख्याने  उपस्थित  होते  यांच्या  उपस्थीत  येथील  रुग्णांची  तपासणी  करण्यात  आली .
या  कार्यक्रमाला  एकूण   रुग्ण  २०४ , तर  गरोधार  माता  ३८ , 27  लहान  बालकांची  तपासणी  करण्यात  आलि.
कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  आणि  उद्घाटक  मानून  बालविकास  आरोग्य  अधिकारी  संगीता  भांगरे  तर  प्रमुख  पाहुणे  मानून  कोउशल्ल्य  आडवाणी  ह्या  उपस्थित  होत्या , कार्यक्रमाच्या  याश्श्वितेसती  दुर्गापू र  आरोग्य  केडरचे  प्रमुख  द्र.  माधुरी मेश्राम ,  डा  प्रफुल हुल्के  & कर्मचारी  वृन्दानी  अथक  परिश्रम  घेतले.