काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 07, 2014

बल्लारपुरातील व्यापार्‍याचा संशयास्पद मृत्यू

बल्लारपुरातील व्यापार्‍याचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपूर: बल्लारपुरातील एका व्यापाराचा येथील अष्टभुजा वॉर्डातील रेल्वे पुलाजवळ संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. रामनगर पोलिसांनी तुर्तास अपघाताची नोंद केली असली तरी मृताच्या शरिरावर जखमा असल्याने व त्याच्या वाहनाची स्थिती बघता, हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला असून ते शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.
जगदीश पंजवानी (३0)असे मृत व्यापार्‍याचे नाव असून ते बल्लारपुरात बसस्थानक परिसरातील रहिवासी होते. बल्लारपुरातील सातनल चौकात त्यांचे किराणा दुकान आहे. पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडे येत असलेल्या राहुल लोहकरे नामक व्यक्तीला अष्टभुजा रेल्वे पुलाजवळ एक व्यक्ती पडून असलेला दिसला. त्यांनी याची सूचना रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताजवळ असलेल्या मोबाईलवरून फोन केल्यानंतर ते जगदीश पंजवानी असल्याची ओळख पटली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून चौकशी सुरू केली आहे. मात्र मृताच्या शरिरावर जखमा असल्याने त्यांची हत्या तर करण्यात आली नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह आणि घटनास्थळाची स्थिती पाहता पोलीसही संभ्रमात आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय काहीच सांगता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Monday, January 06, 2014

पत्रकारांना प्रोत्साहन देणारा पत्रकार दिन सोहळा

पत्रकारांना प्रोत्साहन देणारा पत्रकार दिन सोहळा

12.jpg प्रदर्शित करत आहे


सामाजिक कामात पत्रकारांनी योगदान द्यावे

कम्युनिस्ट नेते गणपतराव अमृतकर यांचे प्रतिपादन 

चंद्रपूर -जिल्हा पत्रकार संघच्या वतीने पत्रकारा दिनाचा सोहळा ६ जानेवारी २०१४ ला उत्साहात झाला. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या पत्रकार दिन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीधरराव बलकी होते. 
कम्युनिस्ट नेते गणपतराव अमृतकर,  माजी कामगार नेता विश्वासराव लहामगे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोरभाऊ जोरगेवार, महाराष्ट्र बहुभाषीय पत्रकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष यशवंतराव दाचेवार प्रमुख वक्ते होते. पाहुण्याचे स्वागत  दीप प्रज्वलन, मालाअर्पण केल्यानंतर काङ्र्मक्रमाला सुरूवात झाली. पाहुण्यांचे पुष्प गुच्छांनी स्वागत करण्यात आले. धुन्नाजींनी पत्रकारितेतील अडचणी व व्यथा कथन करून शासनाने जिल्हा वृत्तपत्रांना सहयोग द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यशवंतराव दाचेवार यांनी जिल्ह्यातील विविध संघ व संगटनांनी एकत्र येऊन शासनावर दबाव आणावा असे मनोगत वर्तविले.
प्रमुख पाहुणे गणपतराव अमृतकर यांनी सामाजिक काङ्र्र्मातील पत्रकारांच्या योगदानावर भर दिला. किशोरभाऊ जोरगेवार यांनी पत्रकारांच्या अडचणी व गृहनिर्माण योजनेसाठी सहकाङ्र्म देण्यावर शब्द दिला. विश्वासराव लहामगे यांनी कामगार क्षेत्र व सामाजिक वांधिलकी यात पत्रकारांचे भरीव योगदानावर प्रकाश टाकला. मराठी पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण दिनी ६ जानेवारी ला पत्रकारितेत भरीव योगदान देणाèया पत्रकारांचा गौरव करण्यांत आला. दै. लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर यांना दर्पण पुरस्कार तर दै. लोकसत्ताचे राजुरा तालुका प्रतिनिधी अनिल बाळसराङ्क यांना टिळक स्मृती पुरस्कार, दै. भास्कर चे चंद्रपूर प्रतिनिधी मुकेश वाळके यांना मा.सा. कन्नमवार पुरस्कार, दै. देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रकाश देवगडे यांना पा. ना. भिमनवार पुरस्कार आणि दै. लोकशाहीचे भद्रावती तालुका प्रतिनिधी तथा न.प. भद्रावतीचे आरोग्य सभापती राजुभाऊ गैनवार यांना तु. ना. काटकर पुरस्काराचा सन्मान लाभला.
व्यासपिठावर पाहुणे आणि पुरस्कार प्राप्त पत्रकारांना शाल, श्रीङ्कळ, पुष्पगुच्छ तसेच स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संत गाडगेबाबा सामाजिक बांधिलकी पुरस्काराचा मान कामगार नेता विश्वासराव लहामगे यांना देण्यात आला. सर्व पुरस्कार प्राप्त महानुभावांनी मनोगत व्यक्त केले. काङ्र्मक्रमाचे संचालन प्रा. कु. आरती दाचेवार यांनी तर आभार प्रदर्शन सरचिटणीस प्रकाश चांभारे यांनी केले. या प्रसंगी पत्रकार बांधवांसोबत ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विजय चंदावार, इतिहास संशोधक टी.टी जुलमे, राम नायडू, गौरव बडकेलवार यांचे सह हरचरणqसह वधावन, सैय्यद रमजान अली, अशोक कोटकर,  अनिल देठे, राजेश सोलापन, प्रभाकर आवारी, शेख गुरूजी, अनवर मिर्जा, श्याम पाथोडे, यशवंत निखुरे, पुंडलिक निनावे, भोले, एम.के. सेलोटे, दिपील मांढरे, यांचे सह जिल्ह्यातील अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.  
आधुनिक माध्यमांच्या युगात वर्तमानपत्र अग्रगण्य

आधुनिक माध्यमांच्या युगात वर्तमानपत्र अग्रगण्य

6 जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त


वर्तमानपत्र हे आज अत्यंत आवश्यक व गरजेचे बनलेले आहे. आजही लोकांना सकाळचा पहिला चहा हा वर्तमानपत्राबरोबरच घ्यायला आवडतो. भारतीय पत्रकारितेचा उदय ब्रिटीश राजवटीच्या काळात झाला. व्यावसायिकतेच्या उद्दिष्टाने ही पत्रकारिता सुरु झाली नव्हती. तर पाश्चात्य शिक्षणातून आधुनिकतेची झालेली ओळख आपल्या समाजाला करुन देण्याचा  ध्येय  त्यामागे होता.
मराठी वृत्तपत्रामध्ये पाहिले वर्तमानपत्र दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी केली.हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठीमध्ये होते. त्याचे इंग्रजी नाव दि बॉम्बे दर्पण  होते. या वृत्तपत्राची पाक्षिक म्हणून सुरुवात होऊन मे 1832 रोजी ते साप्ताहिकात रुपांतरित झाले. मात्र आर्थिक समस्येमुळे 1840 साली ते बंद पडले. 4 जुलै, 1840 रोजी मुंबई अखबार या वृत्तपत्राची सुरुवात  झाली . संपूर्णपणे मराठीतील पहिले वृत्तपत्र म्हणून या वृत्तपत्राचा उल्लेख होतो. दर शनिवारी हे पत्र प्रकाशित केले जात असे. मात्र वर्षभरातच हे वर्तमानपत्र बंद पडले. प्रभाकर या वृत्तपत्राची 24 ऑक्टोबर 1841 रोजी भाऊ महाजन यांनी सुरुवात केली. या वृत्तपत्रातून प्रकाशित केलेली लोकहितवादीची शतपत्रे  मोठ्या प्रमाणात गाजली. याशिवाय भाऊ महाजनांनी 1853 साली धुमकेतू  नावाचे साप्ताहिक 1854 साली ज्ञानदर्शन नावाचे त्रैमासिक सुरु केले. 
यावृत्तपत्रांप्रमाणे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र काढले. ते 100 वर्षांपेक्षा अधिक काळ चालले. 1862 साली सुरु झालेल्या इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे हेाते. सुबोध पत्रिका  हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. 1873 मध्ये या पत्राची सुरुवात झाली. समाज व धर्मासंबंधी सुधारणाविषयक चर्चा या पत्रातून झाली. प्रार्थना समाजाचे धर्मासंबंधीचे विचार प्रसृत करणे आणि त्यावरील आक्षेपांना उत्तर देणे हा यामागील हेतू होतो. 
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1874 साली निबंधमालेची सुरुवात केली. यातून त्यांनी हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, रुढी यांचे पुनरुज्जीवन करणारे लेखन केले. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली पुण्यात दीनबंधू पत्राची सुरुवात केली. विचार जागृतीची, समतेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी स्वत:च्या खर्चाने हे पत्र सुरु केले.बहुजनवादी वृत्तपत्रांमध्ये दीनमित्र विटाळ-विध्वंसक सत्यप्रकाश मूकनायक बहिष्कृत भारत जनता इतयादी वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली. 
लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करण्याच्या व समाज परिवर्तनासाठी -जनजागृतीचा एक महत्वाचा भाग या विचारांनी 4 जानेवारी 1881 मध्ये केसरी  हे वृत्तपत्र सुरु केले. केसरीचे प्रथम  संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी 1887 पर्यंत काम केले. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनविषयक लिखाणावर भर दिला. समाजसुधारणांच्या मूलगामी विचारातून सामाजिक सुधारणा वेग धरु शकतील याबाबत त्यांनी जागरुकतेने सामाजिक सुधारणावर आग्रही राहून केसरी त लिखाण केले. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता वाढली खरी परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे 1888 पासून केसरीचे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. केसरीने राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचे कामही  केले. 
आज मराठी पत्रकारितेमध्ये खूप बदल झाले आहेत. एकेकाळी ज्या प्रक्रियेने वृत्तपत्र छापले जात होते. त्या प्रक्रियेत विद्युत यांत्रिकीकरणामुळे प्रचंड बदल  झालेला आहे. वर्तमानपत्रांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. लोकशाही समाज व्यवस्थेतील चार स्तंभापैकी पत्रकारिता हा एक स्तंभ आहे. समाज प्रबोधनाचे काम करणारे वर्तमानपत्र हे आगामी शतकानो शतक आपले स्थान टिकवून ठेवणार आहे. यात काही शंका नाही.
---------------
शैलजा देशमुख
विभागीय माहिती कार्यालय,
 कोंकण विभाग, नवी मुंबई 

Sunday, January 05, 2014

राज्य ग्रंथालय संघाचे 11 पासून अधिवेशन

राज्य ग्रंथालय संघाचे 11 पासून अधिवेशन

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे 52 वे अधिवेशन 11 आणि 12 जानेवारीला दापोलीत आयोजित केल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रवींद्र कालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यामध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्याचा मान दापोलीला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त दोन दिवस विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

दापोलीच्या हरी केशव गोखले वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कालेकर बोलत होते. दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्‍वरैया सभागृहात अधिवेशन होणार आहे. यावेळी राज्यभरातील ग्रंथालयांचे सुमारे दोन हजार दोनशे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 10 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता नियामक मंडळाची सभा, रात्री 8 वाजता महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा होणार असल्याचे श्री. कालेकर यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 11 जानेवारीला सकाळी 8 वाजल्यापासून राज्यातून आलेल्या विविध प्रतिनिधींची नोंदणी होणार आहे. सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडी, त्यानंतर विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल. सकाळी 10 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन होईल. हरी केशव गोखले वाचनालयाचे अध्यक्ष अशोक वैद्य प्रास्ताविक करणार आहेत. अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू भूषविणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर असतील.

कार्यक्रमाला आमदार सूर्यकांत दळवी, नगराध्यक्षा सौ. विनिता शिगवण, कुलगुरू डॉ. किसन लवांडे, रत्नागिरी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, ग्रंथालय संचालक डॉ. बा. ए. सनान्से, प्रमुख कार्यवाह राम देशपांडे, ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गंगाधर पटणे, माजी अध्यक्ष हरिदास टेंबुर्णे, कोकण विभाग अध्यक्ष मनोज गोगटे, हरी केशव गोखले वाचनालयाचे विश्‍वस्त रवींद्र भिडे, सौ. गीतांजली भिडे आदी उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात 11 तारखेलाच द्वितीय सत्रात दुपारी 3 ते 5 या वेळेत "ग्रंथालयाशी ऋणानुबंध'वर रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सौ.जयश्री करकरे-बर्वे, "ग्रंथालय चळवळीच्या दिशा' वर जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचे अध्यक्षपद दापोलीचे सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप भूषविणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता "सार्वजनिक ग्रंथालये- संस्थात्मक कार्य-वर्तमान व भविष्य' या विषयावरील चर्चासत्रात प्रा. एन. जे. पाटील, प्रा. हरिदास रणदिवे, सूर्यवंशी, राजू बेलेकर, दि. बा. साबळे, डॉ. गजानन कोटेवार, मुरलीधर बोरसूतकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रवींद्र कालेकर भूषविणार आहेत. रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.

अधिवेशनात दुसऱ्या दिवशी 12 जानेवारीला सकाळी 6 वाजता सौ. रमा जोग "योग व प्राणायाम, आनंदी शरीर व मन' या विषयावर, तर सकाळी 9 वाजता होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. शांता सहस्रबुद्धे "ग्रंथ वाचनाने मला काय दिले' या विषयावर, "ग्रंथालय- आनंदनिधान' या विषयावर फोंडा येथील डॉ. कृष्णाजी कुलकर्णी व अशोक नायगावकर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता या अधिवेशनाचा समारोप होईल. यावेळी ग्रंथालयासंबंधी सर्व काही व खुले अधिवेशन असणार आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे मार्गदर्शन करणार आहेत. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू असतील. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रंथालय संचालक डॉ. बा. ए. सनान्से, सहायक ग्रंथालय संचालक (मुंबई विभाग) श्री. द. मंगलपल्ली, काका कोतवाल, नंदा जाधव, शिवकुमार शर्मा, श्रीकृष्ण साबणे, नेमिनाथ सातपुते, अनिल बोगमवार उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष जयवंत जालगावकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे कोशाध्यक्ष गजानन कालेकर, हरी केशव गोखले वाचनालयाचे अध्यक्ष अशोक वैद्य आदी उपस्थित होते.

Saturday, January 04, 2014

टेकामांडवा साठवण तलाव योजनेस मान्यता

टेकामांडवा साठवण तलाव योजनेस मान्यता

मुंबई,दि.4 : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील टेकामांडवा साठवण तलाव योजनेच्या कामासाठी 1 कोटी  88  लाख  2 हजार 821 इतक्या अंदाजित खर्चास काही अटी व शर्तींवर द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस जखमी

दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस जखमी

बल्लारपूर: दारू विक्रेत्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याच्या प्रयत्नात येथील डी.बी. पथकाचे प्रमुख दिवाकर पवार जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास येथील बुद्धनगर परिसरात घडली. 
अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

चंद्रपूर: ट्रॅव्हल्सने मोटारसायकलला धडक देवून झालेल्या अपघातात प्रिती रामभाऊ मत्ते (१९) या विद्यार्थिनी जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालविणारा तिच्या नात्यातील एक युवक किरकोळ जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मूल-मार्गावरील वलनी बसथांब्याजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाला अटक केली आहे.
मृत प्रिती मत्ते ही वडगाव परिसरातील रहिवासी होती. आज सकाळी ती दुर्गापूर परिसरातील अभिजित दादाजी तुराणकर (२३) या युवकासोबत मोटारसायकलने महाविद्यालयीन कामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे जात होती. मात्र वलनी थांब्याजवळ मूलवरून येणार्‍या भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रितीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. अभिजितला किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक मंगल नत्थूजी शेरकी (३५) रा. गडचिरोली याला अटक केली आहे.
आरोपींना १६ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

आरोपींना १६ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

ब्रह्मपुरी : गुंठेवारी प्रकरणातील मुख्य सूत्रधार विलास विखार, नगरसेवक सिचन राऊत व नंदू पिसे यांना ब्रह्मपुरीच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले असता, १६ जानेवारीपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
७२एकर कृषक जमिनीच्या गुंठेवारी प्रकरणात आतापर्यंत ३२ आरापींना अटक करण्यात आली आहे. २९ आरोपींना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी देऊन जामिन मंजुर करण्यात आला. परंतु विलास विखार, सचिन राऊत व नंदू पिसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यांना १८ डिसेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तात्पुरत्या जामिनासाठी ब्रह्मपुरीच्या कनिष्ठ न्यायालयात अर्ज सादर केला असता, ब्रह्मपुरी न्यायालयाने तो नामंजूर करीत ३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज तिनही आरोपिंना न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १६ जानेवारीपर्यंत वाढ करुन करण्यात आली.
मिनीट्रेनमधून दोन लाख साठ हजाराचा नफा

मिनीट्रेनमधून दोन लाख साठ हजाराचा नफा

अलिबाग- पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन या वर्षाच्या शेवटच्या हंगामात डौलात धावली . मिनीट्रेन मधून एक दिवसात प्रवास केलेल्या पर्यटकाकडून मिळालेले उत्पन्न हे देशातील सर्व छोट्या मार्गावरील धावणाऱ्या गाड्यामध्ये सर्वाधिक ठरले . रविवारी तब्बल दोन लाख साठ हजार रुपये प्रवाशी तिकीट विक्रीतून रेल्वेला मिळाले .

मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी गेली दहा दिवस पर्यटकांनी गर्दी केली आहे . रविवार 29 डिसेंबर रोजी नेरळ येथून माथेरान ला जाण्यासाठी नेरळ -माथेरान मिनी ट्रेन मधून जाण्यासाठी आणि माथेरान येथून नेरळ येण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती . रविवार असल्याने मिनीट्रेन च्या सर्व सहा फेऱ्या हाउसफुल होत्या . याशिवाय माथेरान -अमन lodge स्टेशन आणि अमन lodge ते माथेरान स्टेशन या दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेन च्या शटल गाडीतून प्रवास करण्यासाठी देखील गर्दी होती . या सर्व मार्गावरील मिनी ट्रेन मधून दिवसभरात सर्व गाड्या हाउसफुल धावल्या . माहिती त्यातून रेल्वे ला तब्बल दोन लाख साठ हजार रुपये एवढे प्रचंड उत्पन्न प्राप्त झाले . यापूर्वी मे महिन्यात मिनी ट्रेन च्या शटल सेवेतून एक लाख नव्वद हजार एवढे उत्पन्न रेल्वे ला मिळाले होते .

रविवार 29 डिसेंबर ला झालेले प्रवाशी उत्पन्नातून मिळालेले उत्पन्न हे देशातील रेल्वेच्या सर्व छोट्या मार्गावरील एका दिवसातील उत्पन्नातील सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे ,हि माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे . वर्षाच्या शेवटच्या हंगामात मिनी ट्रेन ची एकही फेरी रद्द झाली नाही ,त्यामुळे पर्यटकांना विनासायास मिनी ट्रेन मधून प्रवास करता आला ,अशी माहिती कार्यालयाने दिली .

Friday, January 03, 2014

चंद्रपूर विभाग १५ कोटींच्या तोट्यात!

चंद्रपूर विभाग १५ कोटींच्या तोट्यात!

चंद्रपूर- 'आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या' अशा स्थितीला तोंड देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ नवनवीन उपक्रम अंमलात आणत असले तरी राज्य परिवहन महामंडळाचे चंद्रपूर विभाग वर्षाकाठी तब्बल १५ कोटीच्या तोट्यात आहे.
येथील वर्षाचा सरासरी २0 कोटीने खर्च वाढला आहे. यास डिझेलची झालेली भाववाढ, कामगार करार व सोबतच खासगी प्रवाशी वाहतूक मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे. राज्य परिवहन महामंडळाने महसूल वाढीसाठी नव्या वर्षापासून प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचा नवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाहक प्रवाशांसाठी उद्घोषणा करून नमस्कार, मी बसचा वाहक आपले स्वागत करतो आदींसह एस.टी.मध्ये सौजन्याचे स्वर ऐकण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला असला तरी वर्षाकाठी एस.टी. महामंडळाला होणारा तोटा सरासरी भरून निघणारा नाही. चंद्रपूर विभागात चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी, अहेरी या आगारांचा समावेश होता. या सर्व आगारांमध्ये १ हजार ४३ चालक तर १ हजार १0 वाहक आहेत. यात ५३७ बसेसचा समावेश आहे.
चंद्रपूर विभागाला या सर्व आगारातून एप्रिल ते नोव्हेंबर २0१३ पर्यंत चालू वर्षात १२७ कोटी ३५ लाख खर्च आला. तर ९८ कोटी ४ लाख उत्पन्न झाले. हेच मागील वर्षात १0७ कोटी १४ लाख खर्च तर ९२ कोटी ९६ लाख उत्पन्न होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५ कोटीने उत्पन्नात भर पडली असली तरी वर्षाकाठी सरासरी २0 कोटीने खर्च वाढला आहे. चंद्रपूर विभागातील बहुतांश ग्रामीण भागात बसफेर्‍यांची कमतरता व तुलनेत खासगी प्रवाशी वाहतूक सर्वाधिक आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाची बस रिकामीच फेर्‍या मारत असल्याचे चित्र बरेचदा दिसून येते. यासोबतच शासनाने केलेली डिझेलची भाववाढ, कामगार करार, बससाठी लागणारे स्पेअर पार्ट्स, टायर, ऑईल आदी खर्चही या तोट्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरले आहेत. कर्मचार्‍यांवर १ कि.मी. अंतरासाठी साधारणत: ९ रु. ५0 पैसे खर्च होतात. मात्र त्या तुलनेत आवक मात्र नगण्यच असते. त्यामुळेही चंद्रपूर विभाग तोट्यातच चालला. ही स्थिती एकट्या चंद्रपूर विभागाची नाही तर सर्व राज्यातील विभागातीलच असल्याची माहिती चंद्रपूर विभागातील एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍यानी लोकशाही वार्ताशी बोलताना दिली. खासगी प्रवाशी वाहतूकही चंद्रपूर विभागाअंतर्गत मोठय़ा प्रमाणात आहे. खासगी प्रवाशी वाहतूकदार बस सुटण्याच्या वेळातच आपली वाहने सोडतात. या सोबतच काही दिवसांमध्ये ते तिकीटदामध्ये सुट करतात. तर मध्यंतरीच वाढवितात. मात्र परिवहन विभागात तसे होत नाही. त्यामुळे प्रवासीही बसकडे दुर्लक्ष करीत आहेत. एकंदरीत खासगी प्रवाशी वाहतूक परिवहन महामंडळ तोट्यात येण्यास मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहेत
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आज उदघाटन

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आज उदघाटन

सासवड (जि. पुणे) : ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त येणार्‍या सारस्वतांच्या अन् रसिकांच्या स्वागतासाठी सासवडवासीय सज्ज झाले आहेत. सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे.

पुण्याहून दिवेघाट चढून गेलं की दूरवर पसलेल्या डोंगर रांगा आणि त्यांच्या द-याखो-यात बहरलेल्या चिकू, सीताफळ आणि अंजीरांच्या बागा दिसायला लागतात.पुरंदरच्या याच निसर्गसंपन्नतेमुळे त्याला पुण्याचा कॅलिफॉर्निया म्हटलं जातं. सासवडची ओळख करून द्यायची तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. अत्रेंनी आत्मचरित्राला ज्या नदीवरून ` क-हेचं पाणी` असं नाव दिलं तीच ही सासवाड्ची क-हा नदी. अत्रेंनी क-हेचं पाणी हे आत्मचरित्र याच संगमेश्वर मंदिराच्या आवारात बसून लिहिलंय. सासवडमध्ये आज फक्त अत्र्यांचं हे जन्मघरच शाबूत आहे. मात्र त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. 

अत्र्यांच्या सहवासामुळे सासवडला साहित्यिक वारसा मिळालाय. आणि याच सासवडनगरीला आणखी पावन केलंय ते सोपान महाराजांच्या या समाधी स्थळामुळे.संत सोपान महाराजांची समाधी आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम यामुळे इथे बाराही महिने हरिनामाचा जयघोष ऐकू येतो. सासवडचं पेशवाईशी नातं सांगणारी ही पेशव्यांची कचेरी. बाळाजी विश्वनाथांची समाधी आणि जुने वाड्यांचे हे अवशेष अजूनही त्या काळाची आठवण सांगत उभे आहेत.

अशा या ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि साहित्यिक महत्त्व असलेल्या सासवडमध्ये आता साहित्याचा मेळा भरतोय. क-हेचा काठ या साहित्य संमेलनानंतर आणखी समृद्ध होणार आहे.
पालखी मैदानावरील मुख्य मंडप, ग्रंथनगरी, भोजनगृह, निवास व्यवस्था, वाहतूकव्यवस्था पूर्ण झाली.
१५ जानेवारीपासून युवा सेनेचे राज्यव्यापी शिबीर

१५ जानेवारीपासून युवा सेनेचे राज्यव्यापी शिबीर

रायगडमध्ये युवाशक्तीचा गजर


उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

अलिबाग (प्रतिनिधी) -  येथे १५ जानेवारीपासून युवा सेनेचे दोन दिवस ‘युवा सेना लक्ष्य २०१४’ हे राज्यव्यापी शिबीर होत आहे. या शिबिराची जोरदार तयारी सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो युवासैनिक उपस्थित राहणार असल्याने रायगड जिल्ह्यातील कडेकपार्‍यात युवाशक्तीचा गजर घुमणार आहे.
अलिबाग येथील हॉटेल साईइन येथे दोन दिवस होणार्‍या या शिबिरासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित राहणार असल्याने तरुणांमध्ये उत्सुकता आहे. युवा सेना प्रवक्ता राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली. शिबिरात युवासैनिकांसाठी निवडणूक प्रक्रिया, प्रचार, सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचा प्रचार, निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक काम अशा विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. शिबिरात युवा सेनेची सक्रिय कार्यकारिणी, जिल्हा युवाधिकारी, उपजिल्हा युवाधिकारी, तालुका युवा अधिकारी, शहर युवाधिकारी, मुंबईतील विधानसभा युवाधिकारी, युवा सेनेच्या संलग्न संघटना युवा ब्रिगेड, सोशल मीडिया सेल, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
आदर्श प्रकरणी सरकारची निव्वळ धुळफेक

आदर्श प्रकरणी सरकारची निव्वळ धुळफेक

मुंबई :- आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था चौकशी आयोगाच्या शिफारशींवर सरकारने घेतलेला निर्णयम्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठनेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे. श्री.खडसे पुढे म्हणाले की, आदर्श प्रकरणी आज झालेल्यामंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा अहवाल अंशत: स्विकारुन जनतेचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्रीअप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या राजकीय व्यक्तींना संरक्षण देत आहेत. वस्तुत: आदर्श प्रकरणात चौकशीआयोगाने काढलेल्या निष्कर्षावरुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनादेण्याची आवश्यकता होती, असे झाले असते तर खरोखरच सरकारने आदर्श प्रकरणाचा फेरविचार केला आहे, असेदिसले असते व मुख्यमंत्र्यांच्या मिस्टर क्लिन या प्रतिमेस जनमानसात तडा गेला नसता. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळदबावाखाली काम करीत आहे. राहुल गांधींच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी आदर्श प्रकरणाच्या अहवालाचा फेरविचारकरण्याचा निर्णय घेतला. आता उद्या जर सोनिया गांधींनी आदेश दिला तर सरकार एखाद्या व्यक्तीला वाचविण्यासाठीहा निर्णय पुन्हा फिरवणार का, असा सवाल श्री.खडसे यांनी केला. आदर्श प्रकरणाचा अहवाल जर स्विकारायचा नव्हता व न्यायमुर्ती सारख्या व्यक्तींनी केलेल्या चौकशीअहवालाच्या शिफारशी जर सरकारला अमान्य असतील तर मग या आयोगावर 7 कोटीपेक्षा जास्त रक्कम का खर्चकेली व आयोग नेमलाच कशाला, असा सवाल श्री.खडसे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातीलजनतेवर 8 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा वाढला आहे याची जबाबदारी सुध्दा सरकारने स्विकारली पाहिजे, अशीमागणी श्री.खडसे यांनी केली. आदर्श प्रकरणी भारतीय जनता पार्टी गावागावात रस्त्यारस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन छेडणार आहे, असा इशारा श्री.खडसे यांनी शेवटी दिला.