काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 02, 2015

५ हजार पोलिसांचा ताफा

५ हजार पोलिसांचा ताफा

हिवाळी अधिवेेशन

नागपूर, - ७ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून पोलिस बोलविण्यात आले असून ५ हजार पोलिस अधिकारी आणि शिपायांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे.
या बंदोबस्तासाठी बाहेरून २ अप्पर पोलिस आयुक्त, १५ पोलिस अधीक्षक, २९ सहायक पोलिस आयुक्त, ७५ पुरुष पोलिस निरीक्षक, १० महिला पोलिस निरीक्षक, ३०० फौजदार, ७० महिला फौजदार, २७०० पुरुष शिपाई आणि ५०० महिला शिपाई येणार आहेत. यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे १२०० जवान, राज्य राखीव बलाच्या ६ कंपन्या, फोर्स वनची तुकडी राहणार आहे. याशिवाय शहरातील २ ते २५०० अधिकारी आणि शिपायांना तैनात करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांची वीज मंडळ, केंद्रीय राखीव पोलिस बल, कृषिकुंज येथील विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्तांची अमरावती मार्गावरील निंबूवर्गीय वसतिगृह, सातपुडा, वेणा, ओराई प्रशिक्षण केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकांची राष्ट्रीय अग्निशमन दलाच्या वसतिगृहात व्यवस्था केली आहे. बंदोबस्ताला आलेल्या महिलांना मानकापूर येथील क्रीडा संकुलात थांबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिपायांसाठी २७ मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. प्रत्येक मंगल कार्यालयात ५० ते ७५ शिपायांना थांबविण्यात येणार आहे. बंदोबस्ताला येणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४५० वाहनांची मागणी करण्यात आली असून अजूनपर्यंत वाहने मिळाली नाहीत. परंतु, दोन-तीन दिवसात ही वाहने मिळतील अशी आशा आहे.
पोलिस कर्मचार्‍यांना ४० रुपयात जेवण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही कंत्राटदारांशी बोलणी करून त्यांना जेवणाचे कंत्राट दिले आहेत. बंदोबस्ताला जाणार्‍या आणि बंदोबस्ताहून येणार्‍या कर्मचार्‍यांना हे कंत्राटदार जेवणाचे पाकिटे देणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आणि शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीचे दिवस असल्याने कर्मचार्‍यांना गादी, उशी, चादरी आणि ब्लँकेट देण्यात येणार आहेत. बंदोबस्ताला येणार्‍या कुणाही कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही शहरातील ५ मोर्चे पॉईंट ठेवण्यात आले आहेत. मोर्चेकर्‍यांनी काही गडबड करू नये यासाठी खाजगी गणवेशात पोलिसांना तैनात करून मोर्चेकर्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येणार आहेत.
मागील वर्षी शेवटच्या दिवसापर्यंत ९९ मोर्चे विधानभवनावर काढण्यात आले होते. आतापर्यंत १८ संघटनांनी मोर्चाची परवानगी मागितली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस आणि आदिवासींचे मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. याशिवाय अपंग, अंगणवाडी, विना अनुदानित शाळा, शिक्षक, मजदूर, झोपडपट्टीधारक, रॉकेल विक्रेते यांचेही मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत.

Tuesday, December 01, 2015

 सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष

सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष




चंद्रपूर, ता.३०: जिल्हयातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला एक, तर भाजपला दोन ठिकाणी सत्ता मिळाली.
सावली नगरपंचायतीच्या निवडणुकीत १० जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. तेथे राष्ट्रवादीला ५, तर बसपा व अपक्षास प्रत्येकी एक जागा मिळाली होती. पोंभुर्ण्यात भाजपने १० जागा जिंकून सर्वांना चीत केले होते.चिमूर नगरपंचायतीत भाजपला ६ जागेवर विजय संपादन करता आला होता. काँग्रेसला ५ , शिवसेना २ तर अपक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या.
भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी आपल्या परिवारासह नुकतीच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला, तो क्षण

Saturday, November 28, 2015

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

मुंबई - दारू विक्रीवर कधीही लवकरच  बंदी होणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारू बंदी घोषणा केल्यानंतर एकसमान बंदी महाराष्ट्रातील लागू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, शिवसेना आमदार नीलम गो-हे, भाजपचे आशिष देशमुख यांनी केली होती
तथापि, महाराष्ट्र सरकारने दारू विक्रीतून सशक्त महसूल मिळतो म्हणून राज्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही, असे सांगितले आहे.

"राज्य फक्त दारू विक्रीतून सुमारे Rs18,000 कोटी महसूल प्राप्त करतो. सरकारने दारू विक्री बंदी साठी म्हणून, शक्य होणार नाही. महसूल पर्यायी स्रोत आढळल्यास दारू विक्री प्रतिबंध शक्य असल्याचे "राज्याचे महसूल आणि अबकारी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

बिहार सरकारने 1 एप्रिल पासून राज्यातील दारू बंदी निर्णय घेतला. मात्र चालू आर्थिक वर्षात किमान, तो बंदी शक्य होणार नाही, "ते म्हणाले. राज्य आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. "
चंद्रपूर, वर्धा व गडचिरोलीत गेल्या काही वर्षांपासून दारू विक्री प्रतिबंधित आहे. ती कायम राहणार आहे
अबकारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दारू विक्रीवर राज्य व्यापी बंदी लागू करण्यासाठी प्रस्ताव आली नाही असे स्पष्ट केले.
तथापि, गाव पातळीवर दारू विक्रीवर घालण्यात आलेली बंदी स्थानिक संस्था मध्ये एक ठराव पास करता येते. महिला सक्षम करण्यासाठी प्रक्रिया सोपी करण्यासाठी प्रशासन निर्देश दिले. महिला बहुसंख्य या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दारू विक्री गावांमध्ये बंदी घातली जाईल.

Wednesday, November 18, 2015

दगड घालून खून

दगड घालून खून


आज सकाळी सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेत जुगार, दारु आणि पैशाच्या वादातून दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. रवि प्रकाश डुले (२६) रा. गोपालनगर आणि बंटी उर्फ संदीप शरद आटे (२९) अशी मृतकांची नावे आहेत. या प्रकरणात पोलीसांनी आरोपी मनोज भारद्वाज (२५) यास अटक केली आहे. रवि हा बर्डीवर ऑटोरिक्षा चालवितो. तर आरोपी मनोज आणि बंटी हे सेन्ट्रींगचे काम करतात. काही दिवसांपूर्वी मनोजने रविकडून हिरो प्लेजर कंपनीची दुचाकी मागितली होती. रविने आपल्या नातेवाईकाची दुचाकी मनोजला दिली. परंतु मनोजने रविकडून घेतलेली दुचाकी स्वत:च्या फायद्याासाठी दुसºयाकडे तारण ठेवली होती. याची माहिती मिळताच रवि हा मनोजला दुचाकी परत करण्याचे किंवा दुचाकी सोडविण्यासाठी पैशाची मागणी करीत होता दरम्यान काल, मंगळवारच्या रात्री ९ च्या सुमारास रवि हा बंटी, मनोज आणि इतर पाच ते सहा मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरातील बाजाराच्या ठिकाणी विदेशी दारु पित आणि जुगार खेळत बसला होता. रात्री ११.३० पर्यंत ते दारु पित होते. त्यानंतर एक-एकजण घरी जाऊ लागले. त्या सुमारास त्यांची दारुही संपली. शेवटी रवि, बंटी आणि मनोजच त्या ठिकाणी थांबले होते. तिघांनाही पुन्हा दारुची आवश्यकता होती. त्यामुळे दारु कोण आणणार याच्यातून रवि आणि मनोजमध्ये वाद झाला. या वादातून दुचाकीचा मुद्दा आला असता मनोजने दुचाकी आणली आणि रविला दिली. परंतु त्यानंतरही भांडण सुरुच होते. त्यामुळे ११.३० च्या सुमारास मनोजने दारुच्या नशेत शेजारचे सिमेंटचे पत्रे घेऊन रविच्या डोक्यावर मारले. यात रवि रक्तबंबाळ झाला असता बंटी आरडाओरड करु लागला. त्यामुळे मनोजने बंटीच्या डोक्यातही दगड घातला. यानंतर रवि आणि बंटी गतप्राण झाले असता मनोजने त्याना संपविण्याच्या उद्देशाने पुन्हा त्यांच्या डोक्यात दगड घातले. रवि आणि बंटीचा मृत्यू झाल्यानंतर मनोज हा दुचाकी घेऊन घटनास्थळावरुन पळून गेला. सकाळी नैसर्गिक क्रियेसाठी जाणाºया रहिवाशांना बाजारपेठच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा दिसला आणि काही अंतरावर दोन मृतदेह पडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीतील एका युवकाने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन खुनाविषयी माहिती दिली. यानंतर सकाळी ६ वाजता सोनेगाव, राणाप्रतापनगर येथील पोलीस घटनास्थळी पोहाचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आणि आरोपी मनोजला सकाळी ९.३० च्या
सुमारास त्याच्या घरुन अटक केली. मनोजने एकट्यानेच खून केला की त्याच्यासोबत कुणी होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यासोबत दारु पिणाºया काहींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु मनोजने आपण एकट्यानेच दोघांनाही संपविल्याची कबुली पोलीसांना दिली.

Saturday, November 14, 2015

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

चंद्रपूर-  चंद्रपुरातील जटपुरा गेटच्या वाहतुकीची कोंडी फोडण्याचा श्रीगणेशा शेवटी शनिवारी गेटजवळच आयोजित जनसभेने झाला. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जटपुरा गेटची वाहतूक सुरळीत करण्याचे दीर्घकालीन, तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय चर्चिले गेले. तात्पुरत्या उपायांवर लगेच कार्यवाही करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांना दिले.
मुख्य रस्त्याचे पथमार्ग लहान करणे, रामनगरच्या वनवेबाबत विचार करून तशा सूचना मागवणे, नो पार्किंग झोन तयार करून पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून देणे, शहरातून बाहेर पडणारे अन्य वळण मार्ग शोधणे, रस्त्याचे दुभाजक तोडून ते वाहतुकीला सुव्यवस्थित होईल, असे करणे आदी विषयांवर सूचना देण्यात आल्या. या सार्‍या बाबींवर विचार करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. 
शिवाय दीर्घकालीन उपायायोजना करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत पत्र लिहून त्यांना पाचारण करणे आणि प्रत्यक्ष जटपुरा गेट दाखवणे, त्यांच्यासोबत ही समस्या सोडविण्यासाठी चर्चा करणे, असे ठरले. 
सुधीर मुनगंटीवार हे स्वत: या कामासाठी पुढाकार घेणार आहेत. ते म्हणाले, जटपुरा गेट तोडणे हा काही शाश्‍वत मार्ग नाही. कारण किल्ला ही या शहराची ओळख आहे. या मार्गावरची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सारे मार्ग शोधून त्यावर काम करावे लागेल. रस्त्यांवरील विजेचे खांब काढून वाहिन्या भूमिगत कशा करता येईल, ते बघावे लागेल. 
तत्पूर्वी, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण यांनी, गेटच्या शेजारची भिंत तोडण्यासाठी पुरातत्व विभागाला परवानगी देण्यास काही हरकत नसावी. कारण आम्ही या वास्तूचे विद्रुपीकरण करीत नसून, उलट त्याचे सौंदर्यीकरणच करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ती परवानगी घ्यावी, अशी सूचना केली. तर, डॉ. गोपाल मुंधड यांनी, जटपुरा गेटवरील वाहनांची कोंडी लक्षात घेता जटपुरा गेटची भिंत तोडावी आणि मनपाच्या मालकीच्या दुकानलाईनचा काही भाग तोडून त्या दुकानदारांना मागचा भाग देण्यात यावा, असे सूचवले. विनोद दत्तात्रय यांनी, अद्ययावत स्थापत्य तंत्रज्ञानाचा वापर करून तुकड्यामध्ये गेट उचलून बाजूला उभा करावा, जेणेकरून तो रस्त्याच्या मधे येईल आणि सुुंदरही दिसेल, असे सांगितले. मेघनाद जानी, तसेच सदानंद खत्री यांनी, जटपुरा गेटची भिंत तोडून दहा व चौदा फूट रुंदीचे दोन रस्ते तयार करावे. गेटच्या मधून चारचाकी जातील आणि उर्वरित रस्त्यावरून दुचाकी आणि ऑटो जातील, अशी व्यवस्था तयार करावी, असे सूचवले. रामनगर माार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे आणि या मार्गाला वनवे करावे, अशीही सूचना आली. या सार्‍या सूचनेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष गेट आणि रस्त्याची पाहणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Thursday, November 12, 2015

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

मेजवाणी 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक फेरीला प्रारंभ

शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने आयोजित 55 व्या हौशी मराठी नाटय स्पर्धाचे आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होत असुन यंदा एकुण 13 नाटकं चंद्रपुर केंद्रावर, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कत्रतिक सभागत्रहात सादर होत असुन दिनांक 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक
पफेरीला प्रारंभ होणार आहे.
येत्या 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हि स्पर्धा रंगणार असुन रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहे. स्पर्धेचे वेळापऋाकाप्रमाणे दिनांक 18 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता श्री. सिध्दीविनायक प्रतिष्ठान, यवतमाळ या संस्थेचे नाटक १अभिनेऋाी२, लेखक - गिरीश जोशी, दिग्दर्शक - कल्पना जोशी, दिनांक 19 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, गडचिरोजी या संस्थेचे नाटक १परिवर्तन२, लेखक, दिग्दर्शक - राजरतन देवीदास पेटकर, दिनांक 20 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १तप्त दाही दिशा२, लेखक
- डाॅ. राजेन्द्र धामणे, दिग्दर्शक - राजाभाउफ भगत, दिनांक 21 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता डाॅ. श्यामाप्रसाद सार्वजनिक वाचनालय, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १हणम्याची मरीमाय२, लेखक - विजय खानविलकर, दिग्दर्शक - श्रीनिवास मुळावार, दिनांक 22 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता कामगार मनोरंजन केंद्र, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १देवाशपथ खोट सांगेन२, लेखक - डाॅ. मोहन पानसे, दिग्दर्शक - मोहन जोशी, दिनांक 23 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता कलावैभव नाटय व सांस्कत्रतिक संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १खेळ२, लेखक - अनिल दांडेकर, दिग्दर्शक - अविश वत्सल, दिनांक 24 नोव्हेंबर, मंगळवार, सायंकाळी 7 वाजता कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन मंडळ, यवतमाळ या संस्थेचे नाटक १आसरफबा२, लेखक - सुनिल देशपांडे, दिग्दर्शक - प्रशांत गोडे, दिनांक 25 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता अस्मिता रंगायतन, यवतमाळ या संस्थेचे नाटक १माझाा खेळ मांडु दे२, लेखक - सई परांजपे, दिग्दर्शक - अशोक आष्टीकर, दिनांक 26 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता पफुलोरा सामाजिक विकास
संस्था, वर्धा या संस्थेचे नाटक १घर तिघांचं हवं२, लेखक - रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक - विकास पफटिंगे, दिनांक 27 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता नवोदिता, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १ज्याचा त्याचा प्रश्न२, लेखक - अभीराम भडकमकर, दिग्दर्शक - डाॅ. जयश्री कापसे-गावंडे, दिनांक 28 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता कल्पतरफ बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १हीच तर प्रेमाची गंमत आहे२, लेखक - अशोक पाटोळे, दिग्दर्शक - विलास राखे, दिनांक 29 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता अध्ययन भारती, वर्धा या संस्थेचे नाटक १श्रीकांत प्रभुणेची प्रेमकथा२, लेखक - श्याम पेठकर, दिग्दर्शक - चैतन्य आठले, दिनांक 30 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता आदिवासी लोकरंग कलामंच बहुउद/देशीय संस्था, वणी, जिल्हा यवतमाळ या संस्थेचे नाटक १कातरवेळ२, लेखक - डाॅ. माणिक वडयाळकर, दिग्दर्शक - आनंद गेडाम
तरी 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा रंगणार असुन रसिकप्रेक्षकांनी मोठया संखेने आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हाहन महाराष्ट! शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने समन्वयक सुशील सहारे यांनी केले आहे.

Thursday, October 29, 2015

माजी सभापतींमध्ये धक्काबुक्की!

माजी सभापतींमध्ये धक्काबुक्की!

चंद्रपूर - स्थायी समितीच्या माजी सभापतींनी एक-दुसर्‍यांवर शिव्यांची लाखोळी वाहत धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवार, २८ ऑक्टोबरला मनपाच्या आमसभेत घडला. यावेळी अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करीत दोन्ही सभापतींची समजूत काढल्याने प्रकरण निवळले. मात्र, या प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Saturday, October 17, 2015

द्धाने केला पत्नाी, भाचाचा खून

द्धाने केला पत्नाी, भाचाचा खून

नागपूर-चारित्र्यावरील संशयातून ६० वर्षीय वृद्धाने पत्नाी आणि मेहुण्याच्या मुलाचा कुर्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तक्षशीलानगर येथे शुक्रवारच्या रात्री ३ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे वस्तीमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपी शरनू उर्फ अन्नाजी कांबळे यास अटक केली आहे.
गोपीबाई शरनू उर्फ अन्नाजी कांबळे (५०) आणि चेतन मधुकर रामपुरे (१०) अशी मृतकांची नावे आहेत. अन्नाजी कांबळे यास दारुचे व्यसन असून तो हातमजुरीचे काम करतो. तर गोपीबाई बाजारांमध्ये भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करायची. त्यांना तीन मुली असून तिघिंचेही लग्न झाले आहे. त्यांच्या तीनही मुली पुणे येथे राहतात. घरात दोघेच म्हातारे असल्याने गोपीबाई यांनी त्यांचा भाऊ मधुकर रामपुरे रा. उमरगांव (उस्मानाबाद) यांचा मुलगा चेतन यास दोन वर्षांपूर्वी नागपुरात आणले. तो नारी वस्ती येथील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत चौथ्या वर्गात शिकत होता. अन्नाजी हा दररोज दारु पिऊन दररोज घरी यायचा आणि गोपीबाई यांच्याशी भांडण करायचा. काल शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास गोपीबाई भाचा चेतनसोबत वस्तीतील दुर्गादेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर ते घरी परतले असता अन्नाजी याने गोपीबाईशी भांडण केले. आज पहाटे पाचच्या सुमारास शेजारचे काही परिवार कोराडी येथील देवीच्या दर्शनाला जाणार होते. त्यांच्यासोबत गोपीबाई ‘ाा चेतनला घेऊन जाणार होत्या. त्याची माहिती रात्रीच अन्नाजीला दिली होती. त्यामुळे अन्नाजी हा गोपीबाईवर रागावलेला होता. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास सर्वजन झोपेत असताना अन्नाजीने गोपीबाईच्या मानेवर कुर्हाडीचे घाव घातले. त्यामुळे गोपीबाई किंचाळली असता चेतन झोपेतून उठला. त्यानंतर चेतनही किंचाळून दरवाजा उघडून बाहेर पळण्याचा प्रयत्ना करीत असताना अन्नाजीने त्याच्यावरही कुर्हाडीने वार केला. कुर्हाडीच्या घावाने दोघेहीजण जागीच ठार झाले. गोपीबाई आणि मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारचा अमित गणेश भगत (२५) आणि त्याच्या घरातील सदस्य उठले. त्यांनी गोपीबाईचा दरवाजा ठोठावला असता अन्नाजीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच अमित हा घरात शिरला असता त्याला गोपीबाई आणि चेतन जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि अन्नाजीच्या हातात कुर्हाड होती. अन्नाजी अशात अवस्थेत घराच्या उंबरठ्यावर बसून काही वेळ बसून होता. त्यानंतर अमितने ताबडतोब जरीपटका पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खुनाचा गुन्हा नोंदविला आणि अन्नाजीला अटक केली. गोपीबाईच्या मुली, जावई आणि चेतनचे आईवडिल रात्री उशीरा नागपुरात पोहोचले. तोपर्यंत त्यांचे मृतदेह मेयो रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रातच पडून होते.
चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय एका महिन्यात

चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय एका महिन्यात

चंद्रपूर - राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची घोषणा केली. त्यानंतर येथील जिल्हा लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 16) सुनावणीदरम्यान दारूबंदी निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत एका महिन्यात या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले. त्यामुळे दारूबंदीचा चेंडू आता उच्च न्यायालयात पोहोचला.

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची घोषणा करून 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. शासनाच्या या निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उच्च याचिका दाखल केली. तथापि, उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली नाही. त्यामुळे लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, या संदर्भातील सुनावणी दोन-तीन महिने लांबणीवर गेल्याने दारूविक्रेत्यांसह जिल्ह्यातील जनतेचे न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. शुक्रवारी दारूबंदी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी ऍड. सुब्रमण्यम यांनी जिल्हा लिकर असोसिएशनची बाजू मांडली. न्यायालयाने दारूबंदी निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले.

Thursday, October 08, 2015

 नातीसमोरच आजीची हत्या

नातीसमोरच आजीची हत्या

नागपूर-  घरात चिमुकल्या नातीसोबत असलेल्या एका आजीची अज्ञात मारेकर्‍याने गळा आवळून हत्या केली. ही अंगावर शहारे आणणारी घटना प्रतापनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या तात्या टोपे नगरातील प्लॉट नं. २६ गुरुकृपा अपार्टमेंट येथे बुधवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.
वसुंधरा आनंद बाळ (वय ६९ वर्षे) रा. तात्या टोपेनगर असे मृत आजीचे नाव आहे. नीरीत शास्त्रज्ञ म्हणून कार्य केलेल्या डॉ. आनंद बाळ यांच्या त्या पत्नी होत्या. डॉ. आनंद बाळ यांच्या निधनानंतर वसुंधरा बाळ या त्यांचा मुलगा आदित्य आनंद बाळ, सून नीलम आदित्य बाळ व ९ महिन्याची आद्या नावाच्या नातीसोबत गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह मुंबईत राहतो. तर आदित्य बाळ हा बुटीबोरी येथील एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी नीलम ही मारुती सेवा शोरूममध्ये नोकरी करते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आदित्य आणि त्याची पत्नी कामावर निघून गेले. त्यावेळी घरी वसुंधरा आनंद बाळ आणि त्यांची नात उपस्थित होती. चिमुकली नात नेहमीच आजीला आवडती होती म्हणून वसुंधरा बाळ तिच्यासोबत खेळत मग्न व्हायच्या. बुधवारला सकाळी १०.१५ च्या सुमारास आदित्य बाळ यांच्याकडे घरकाम करणारी शीला इंगळे आली. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. तिने आवाज दिला परंतु घरातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शीलाने ग्रीलमधून हात टाकला आणि दरवाजा उघडला. आता नेहमीचेच घर असल्याने शीला बिनधास्त घरात घुसली आणि आता काम करायचा विचार करीत होती. पण आत गेल्यावर वसुंधरा बाळ किचनरूम ते बेडरूमच्या पॅसेजमध्ये निपचित पडून दिसल्या. तर चिमुकली नात आजीला अशी निपचित पडल्याचे पाहून ओक्साबोक्सी रडत असल्याचे दिसले. ते दृश्य पाहून शीलाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि भेदरलेल्या अवस्थेत तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. तातडीने बाळ यांच्या फॅमिली डॉक्टरला सांगण्यात आले. तेव्हा प्रतापनगर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

Friday, October 02, 2015

विकासकामावरून भाजपा-कॉंग्रेस आमने-सामने

विकासकामावरून भाजपा-कॉंग्रेस आमने-सामने

राजुरा शहरातील समस्या व विकास कामावरून आजी-माजी आमदारांत आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे. शहर कॉंग्रेस कमेटी व राजुरा भारतीय जनता युवा मोर्चाने लावलेल्या बॅनरमुळे सध्या शहरात राजकीय वातावरण  तापले आहे.

शहर कॉंग्रेस कमेटीने काही दिवसांपूर्वी शहरात ‘कुठे नेऊन ठेवलाय राजुरा माझा?’ या शिर्षकाखाली शहरातील समस्यांना वाचा फोडली आहे. त्यामध्ये ‘पावसाचा थेंब जमिनीवर पडत नाही, तर लाईट जाते, झाडाच पान हालत नाही, तरी लाईट जाते’, ‘राजुरा ते बामणी फक्त ७ कि. मी. रस्ता परंतु सध्या तो इतका सुंदर आहे, की तो पार करायलाच अर्धा तास लागतो’, ‘वर्धा नदीवरील पूल, तर सध्या तेथील खड्ड्यांमुळे स्विमिंग पूल झाला आहे, मासे नदीत राहण्याऐवजी त्या पुलावरील खड्ड्यातच राहतात’, ‘रेल्वे ओवरब्रिज, तर विचारूच नका पूल बनवत आहे, की जगातल आठवा आश्‍चर्य हेच कळत नाही’, अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये हे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसने या विविध समस्यांवर केलेल्या टिकात्मक प्रश्‍नांना भाजयुमोनेही बॅनरच्या माध्यमातूनच चोख उत्तर दिले आहे. त्यावर माजी आमदारांच्या कार्यकाळात त्यांनी खर्च केलेल्या ५०० कोटींच्या निधीवर आक्षेप घेतला आहे. ‘५०० कोटी खर्च केले असते, तर रस्त्याची ही हालत झाली नसती’ या शिर्षकाखाली चक्क माजी आमदारांच्या विकासकामांना आव्हान दिले आहे. राजुर्‍याची वाढती विज पुरवठ्याची मागणी लक्षात घेता फक्त राजुरा शहरासाठी वेगळे विद्युत केंद्र उभे केले असते, विद्युत अधिकारी व कर्मचारी दिले असते, तर वार्‍याने लाईन गेली नसती, असा टोला लगावला आहे. रस्ते दुरुस्ती व विजेची कामे आम्ही अवश्य करू असेही या बॅनरमध्ये नागरिकांना आश्‍वासन देण्यात आले आहे.

जेथे कॉंगेसने बॅनर लावले आहे, तेथे भाजपानेही आपले बॅनर लावले आहे. त्यामुळे बॅनरच्या माध्यमातून आजी-माजी आमदार आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा शहर विकासासाठी १०० कोटींचा निधी २००९ ते २०१४ मध्ये खर्च केल्याचा दावा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ६६६ कुटुंबीयांना घरकुल मंजूरी, राजुरा-बल्लारपूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, राज्य सरोवर व संवर्धन योजनेंतर्गत न. प. राजुरा तलाव सौंदर्यीकरण, वनोद्यान सौंदर्यींकरण, प्रशासकीय इमारत बांधकाम, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह बांधकाम, सोमेश्‍वर मंदिराचे जतन व दुरुस्ती, ११ खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, राजुरा शहराच्या विविध विकासकामांकरिता कोट्यवधीचा निधी तसेच राजुरा विधानसभेत ५०० कोटी निधींचा खर्च एवढे विकासकामे पाठिशी असूनही राजुरा विधानसभेत कॉंग्रेसला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्या तुलनेत राजुरा विधानसभेत पहिल्यांदा सत्तेत आलेल्या भाजपाची कासवगतीने विकासकामांकडे वाटचाल होत आहे. कामांना गती देण्याचे आश्‍वासन पूर्णत्वास नेण्याचे आमदार ऍड. संजय धोटे यांचे म्हणणे आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, त्यात कॉंग्रसने केलेल्या दाव्यात काही अंशी सत्यता असली तरी पहिल्यांदा सत्तेत आालेल्या भाजपाने या सर्व समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

एकूणच राजुरा विधानसभेत माजी आमदार सुभाष धोटे यांच्या विकासकामांचा झंझावात असताना अचानक सत्ता परिवर्तनानंतर समोर आलेल्या समस्यांमुळे रंगलेली ‘पोस्टर’वॉर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरीकडे नुकत्याच सत्तेत आलेल्या भाजपाने कासवगतीने केलेली सुरुवात कॉंग्रेसच्या रडारवर आहे. त्यामुळे पुढेही अशीच ‘पोस्टर’वॉर मोठ्या प्रमाणात रंगणार असल्याची चर्चा शहरात जोमाने सुरू आहे.