आज सकाळी सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेत जुगार, दारु आणि पैशाच्या वादातून दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. रवि प्रकाश डुले (२६) रा. गोपालनगर आणि बंटी उर्फ संदीप शरद आटे (२९) अशी मृतकांची नावे आहेत. या प्रकरणात पोलीसांनी आरोपी मनोज भारद्वाज (२५) यास अटक केली आहे. रवि हा बर्डीवर ऑटोरिक्षा चालवितो. तर आरोपी मनोज आणि बंटी हे सेन्ट्रींगचे काम करतात. काही दिवसांपूर्वी मनोजने रविकडून हिरो प्लेजर कंपनीची दुचाकी मागितली होती. रविने आपल्या नातेवाईकाची दुचाकी मनोजला दिली. परंतु मनोजने रविकडून घेतलेली दुचाकी स्वत:च्या फायद्याासाठी दुसºयाकडे तारण ठेवली होती. याची माहिती मिळताच रवि हा मनोजला दुचाकी परत करण्याचे किंवा दुचाकी सोडविण्यासाठी पैशाची मागणी करीत होता दरम्यान काल, मंगळवारच्या रात्री ९ च्या सुमारास रवि हा बंटी, मनोज आणि इतर पाच ते सहा मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरातील बाजाराच्या ठिकाणी विदेशी दारु पित आणि जुगार खेळत बसला होता. रात्री ११.३० पर्यंत ते दारु पित होते. त्यानंतर एक-एकजण घरी जाऊ लागले. त्या सुमारास त्यांची दारुही संपली. शेवटी रवि, बंटी आणि मनोजच त्या ठिकाणी थांबले होते. तिघांनाही पुन्हा दारुची आवश्यकता होती. त्यामुळे दारु कोण आणणार याच्यातून रवि आणि मनोजमध्ये वाद झाला. या वादातून दुचाकीचा मुद्दा आला असता मनोजने दुचाकी आणली आणि रविला दिली. परंतु त्यानंतरही भांडण सुरुच होते. त्यामुळे ११.३० च्या सुमारास मनोजने दारुच्या नशेत शेजारचे सिमेंटचे पत्रे घेऊन रविच्या डोक्यावर मारले. यात रवि रक्तबंबाळ झाला असता बंटी आरडाओरड करु लागला. त्यामुळे मनोजने बंटीच्या डोक्यातही दगड घातला. यानंतर रवि आणि बंटी गतप्राण झाले असता मनोजने त्याना संपविण्याच्या उद्देशाने पुन्हा त्यांच्या डोक्यात दगड घातले. रवि आणि बंटीचा मृत्यू झाल्यानंतर मनोज हा दुचाकी घेऊन घटनास्थळावरुन पळून गेला. सकाळी नैसर्गिक क्रियेसाठी जाणाºया रहिवाशांना बाजारपेठच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा दिसला आणि काही अंतरावर दोन मृतदेह पडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीतील एका युवकाने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन खुनाविषयी माहिती दिली. यानंतर सकाळी ६ वाजता सोनेगाव, राणाप्रतापनगर येथील पोलीस घटनास्थळी पोहाचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आणि आरोपी मनोजला सकाळी ९.३० च्या
सुमारास त्याच्या घरुन अटक केली. मनोजने एकट्यानेच खून केला की त्याच्यासोबत कुणी होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यासोबत दारु पिणाºया काहींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु मनोजने आपण एकट्यानेच दोघांनाही संपविल्याची कबुली पोलीसांना दिली.