नागपूर- घरात चिमुकल्या नातीसोबत असलेल्या एका आजीची अज्ञात मारेकर्याने गळा आवळून हत्या केली. ही अंगावर शहारे आणणारी घटना प्रतापनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या तात्या टोपे नगरातील प्लॉट नं. २६ गुरुकृपा अपार्टमेंट येथे बुधवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.
वसुंधरा आनंद बाळ (वय ६९ वर्षे) रा. तात्या टोपेनगर असे मृत आजीचे नाव आहे. नीरीत शास्त्रज्ञ म्हणून कार्य केलेल्या डॉ. आनंद बाळ यांच्या त्या पत्नी होत्या. डॉ. आनंद बाळ यांच्या निधनानंतर वसुंधरा बाळ या त्यांचा मुलगा आदित्य आनंद बाळ, सून नीलम आदित्य बाळ व ९ महिन्याची आद्या नावाच्या नातीसोबत गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह मुंबईत राहतो. तर आदित्य बाळ हा बुटीबोरी येथील एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी नीलम ही मारुती सेवा शोरूममध्ये नोकरी करते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आदित्य आणि त्याची पत्नी कामावर निघून गेले. त्यावेळी घरी वसुंधरा आनंद बाळ आणि त्यांची नात उपस्थित होती. चिमुकली नात नेहमीच आजीला आवडती होती म्हणून वसुंधरा बाळ तिच्यासोबत खेळत मग्न व्हायच्या. बुधवारला सकाळी १०.१५ च्या सुमारास आदित्य बाळ यांच्याकडे घरकाम करणारी शीला इंगळे आली. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. तिने आवाज दिला परंतु घरातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शीलाने ग्रीलमधून हात टाकला आणि दरवाजा उघडला. आता नेहमीचेच घर असल्याने शीला बिनधास्त घरात घुसली आणि आता काम करायचा विचार करीत होती. पण आत गेल्यावर वसुंधरा बाळ किचनरूम ते बेडरूमच्या पॅसेजमध्ये निपचित पडून दिसल्या. तर चिमुकली नात आजीला अशी निपचित पडल्याचे पाहून ओक्साबोक्सी रडत असल्याचे दिसले. ते दृश्य पाहून शीलाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि भेदरलेल्या अवस्थेत तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. तातडीने बाळ यांच्या फॅमिली डॉक्टरला सांगण्यात आले. तेव्हा प्रतापनगर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.