काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, April 10, 2014

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान ठार

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान ठार

छत्तीसगड:
लोकसभा निवडणुकीत अडथळे आणण्यासाठी नक्षलवादी कारवाया करत आहेत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर इतर 3 जवान जखमी झाले आहेत. राज्यात उद्या मतदान होणार आहे. मतदानाच्याचं पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी आज हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे.

Wednesday, April 09, 2014

मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना ; चंद्रपूर लोकसभेसाठी 1983 मतदान केंद्र

मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना ; चंद्रपूर लोकसभेसाठी 1983 मतदान केंद्र

मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना ; चंद्रपूर लोकसभेसाठी 1983 मतदान केंद्रबुधवार, ०९ एप्रिल, २०१४
चंद्रपूर : 10 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पोलिंग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाली असून गुरुवार 10 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात मतदान होणार आहे. मतमोजणी 16 मे 2014 रोजी सकाळी 8 वाजेपासून नवीन उद्योग भवन रेल्वे स्टेशन रोड चंद्रपूर या ठिकाणी होणार आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील पोलिंग पार्टीला सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय दैने व तहसिलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत 336 मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशिन व साहित्य वाटप करण्यात आले. साहित्यासह आज पोलिंग पार्टी आपआपल्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या.

जिल्ह्यातील 70-राजूरा, 71-चंद्रपूर, 72-बल्लारपूर, 73-ब्रम्हपुरी, 74-चिमूर व 75-वरोरा या विधानसभा मतदारसंघासाठी तसेच 76-वणी व 80-आर्णी या मतदारसंघातही सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत साहित्य वितरित करुन पोलिंग पार्टी रवाना करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्याकरिता 1950 मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून 5850 मतदान अधिकारी आहेत. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता 1983 मतदान केंद्र असून 1983 मतदान अधिकारी नियुक्त केले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा विधानसभा मतदारसंघात 350, चंद्रपूर 336, बल्लारपूर 340, ब्रम्हपुरी 312, चिमूर 305 व वरोरा 307 मतदान केंद्र आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1950 मतदान केंद्रे असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 1983 मतदान केंद्र आहेत. 4081 बॅलेट युनिट व 2446 कंट्रोल युनिट उपलब्ध असून त्याचे वितरण करण्यात आले. तर वणी विधानसभा मतदारसंघाकरिता 676 बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि आर्णी विधानसभा मतदारसंघाकरिता 756 बॅलेट युनिट व 378 कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत.
रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आता 10 उमेदवार

रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आता 10 उमेदवार

रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आता 10 उमेदवारबुधवार, ०९ एप्रिल, २०१४
अलिबाग : 32-रायगड लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 32-रायगड लोकसभा मतदार संघात 10 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

32-रायगड लोकसभा मतदार संघात आता 10 उमेदवार असून त्यांची माहिती व पक्ष पुढीलप्रमाणे आहेत.

अ.क्र. उमेदवारांची नावे, पक्ष, मिळालेले चिन्ह :

1.  अनंत गीते, शिवसेना, धनुष्यबाण
2. तटकरे सुनिल दत्तात्रय,  नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी , घड्याळ
3. यशवंत जयराम गायकवाड,  बहुजन समाज पार्टी,  हत्ती
4 . डॉ.अपरांती संजय यशवंत,   आम आदमी पार्टी , झाडू
5.  आजीज अब्दूल कादीर मुकादम,  समाजवादी पार्टी , सायकल
6.  डॉ.घोणे आदेश यशवंत,  बहुजन मुक्ती पार्टी , खाट
7.  रमेशभाई कदम , पीझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया,  कपबशी
8.  संदिप पांडूरग पार्टे,  हिन्दुस्तान जनता पार्टी,  शटल
9.  मुज्जफर जैनुदिन चौधरी उर्फ मोदी,  अपक्ष,  हॅट
10.  सुनिल तटकरे,  अपक्ष,  पेनाची निब सात किरणांसह
चंद्रपूर प्रचार थांबला : उद्या मतदान

चंद्रपूर प्रचार थांबला : उद्या मतदान

चंद्रपूर प्रचार थांबला : उद्या मतदान


१७,५0,७८१ मतदार बजावणार हक्क
१,९८३ मतदान केंद्र : ४९ संवेदनशिल
१९,९00 अधिकार्‍यांचा ताफा
एसटी बसेससह ५४५ वाहने तैनात
सुरक्षेसाठी ३,६७0 पोलिसांचे बळ
अधिक मतदानासाठी ग्रामपंचायतींना पुरस्कार


आजची रात्र वैर्‍याची : उमेदवारांची धडधड वाढली

Tuesday, April 08, 2014

18 उमेदवारांचे भाग्य आज मशीनबंद

18 उमेदवारांचे भाग्य आज मशीनबंद

गडचिरोली-चिमूर मतदार संघातही चोख सुरक्षा
चंद्रपूर :
१0 एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवरील चमू साहित्यांसह गंतव्य स्थळी पोहोचली आहे. तर, १ हजार ९८३ राखिव कर्मचारी-अधिकार्‍यांची फळीही सज्ज आहे.
गुरूवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालेल. त्यानंतर ही प्रक्रिया बंद केली जाईल. तत्पूर्वी केंद्रांवर रांगेत असलेल्या सर्व मतदारांची नोंद करून त्यांना संधी दिली जावी, अशा सूचना मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघात ३३६ मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशिन व साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, ७२ बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या विधानसभा मतदार संघासाठी तसेच वणी व आर्णी या मतदार संघातही सहायक निवडणूक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत साहित्य वितरित करुन पोलींग पार्टी रवाना करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्याकरिता १ हजार ९५0 मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त असून ५ हजार ८५0 मतदान अधिकारी आहेत. तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता १ हजार ९८३ मतदान केंद्र असून तेवढेच मतदान अधिकारी नियुक्त आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जिल्हा उद्योग भवनात स्ट्राँग रूम तयार करण्यात आले आहे. मतदानानंतर परत आलेले सर्व बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट येथे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी कडक सुरक्षा ठेवली जाणार आहे. पोलिसांसोबतच निवडणुकीच्या कर्तव्यावरील अधिकार्‍यांच्याही पाळ्या लावल्या जाणार आहेत. मतमोजणीच्या तारखेपर्यंत सतत २४ तास या स्थळाचे चित्रीकरण केले जाणार आहे.
राजुरा विधानसभा     ३५0
चंद्रपूर विधानसभा     ३३६
बल्लारपूर विधानसभा     ३४0
ब्रह्मपुरी विधानसभा     ३१२
चिमूर विधानसभा     ३0५
वरोरा विधानसभा     ३0७
चंद्रपूर जिल्ह्यात     १,९५0
चंद्रपूर लोकसभा मतदार संघ १,९८३ बॅलेट युनिट ५,५१३
■ जिल्ह्यातील मतदार संघात
४,0८१ बॅलेट युनिट व २,४४६ कंट्रोल युनिट
■ वणी विधान. मतदार संघात
६७६ बॅलेट युनिट
■ आर्णी विधान. मतदार संघात
७५६ बॅलेट युनिट व ३७८ कंट्रोल युनिट गडचिरोली-चिमूर मतदार संघातही चोख सुरक्षा ■ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातही चोख सुरक्षा ठेवली जाणार आहे. नक्षलग्रस्त असलेल्या या मतदार संघातील १ हजार ७९४ मतदान केंद्रंपैकी १८४ केंद्र अतिसंवेदनशील आहेत. येथे संवेदनशील तालुक्यात मतदानाची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
■ उमेदवार -११ ■ मतदार -१४, ६९, ६५0
■ मतदान केद्र -१,७९४ ■ संवेदनशिल केंद्र -१८४
■ निवडणूक कर्मचारी -९,000    ■ पोलीस बळ -११ हजार
१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काऊंट डाऊन

१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काऊंट डाऊन

१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आता उमेदवारही काऊंट डाऊन करायला लागले आहेत. मतदारांची अंतीम यादी तयार झाली असून त्यात सुमारे ३0 हजार मतदारांची वाढ झाली आहे. १७ लाख ५0 हजार ७८६ मतदारांची संख्या असून त्यात स्त्री मतदार ८ लाख ३0 हजार ९८९ तर पुरूष मतदार ९ लाख १९ हजार ८९७ आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये एक हजार ९५९ मतदान केंद्र असून सहाय्यकारी केंद्र ंमिळून ही संख्या एक हजार ९८३ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या चार विधानसभा मतदार संघांमिळून ४ हजार ८१ बॅलेट युनिट आणि २ हजार १३६ कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या विधानसभा मतदार संघांमध्ये यवतमाळच्या जिल्ह्या प्रशासनाने आवश्यकतेनुसार इव्हीएम मशिनची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यातील ९ हजार २३६ कर्मचार्‍यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच एक हजार ४३६ राखीव कर्मचारीही तैनात ठेवण्यात आले आहेत. ९ एप्रिलला मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांची चमू नियोजित मतदान केंद्रावर पोहोचणार आहे. त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांतून मतदान यंत्र आणि निवडणूक कर्मचार्‍यांना केंद्रावर पोहचविण्याची आणि परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Monday, April 07, 2014

प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात

प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात

भारतीय स्टेट बँकेने आज भारतातील आपल्या सर्व शाखांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण १८३७ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील ७५८ पदे खुल्या वर्गासाठी असणार आहेत.   या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीप्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची परिक्षा घेण्यात येणार आहे. यातून निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत नियुक्ती केले जाईल.   प्रोबेशनरी ऑफिसरसाठी किमान वय २१ तर कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असणार आहे. तर एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सुट मिळणार आहे. या पदासाठी १ एप्रिल २०१४ चे वय ग्राह्य धरण्यात येईल.   या पदासाठी फक्त ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यासाठीची लिंक आजपासून सुरू करण्यात आली आहे. २४ एप्रिल पर्य़त अर्ज करता येणार आहे. खुल्या आणि ओबीसी गटातील उमेदवारांसाठी ५०० रूपये फी असून एससी आणि एसटी उमेदवारांना १०० रूपये फी आहे.  

अधिक माहितीसाठी स्टेट बँकेची वेबसाईट
 http://www.sbi.co.in/user.html  किंवा https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/SBI_PO_RECRUITMENT_ADVERTISEMENT_ENGLISH.pdf
या लिंकवर क्लिक करा.

मंगळवारी प्रचार थांबणार

मंगळवारी प्रचार थांबणार

१६ व्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. मतदानाला केवळ चार दिवस उरले आहेत. या अखेरच्या दिवसात उमेदवारांपासून तर राजकीय पक्ष आणि शासकीय यंत्रणेची आता अखेरच्या टप्प्यातील धावपळ सुरू झाली आहे. निवडणुकीतील जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता थांबणार आहे. त्यानंतरचे दोन दिवस सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यामुळे या काळात यंत्रणेवरचा ताण अधिकच वाढलेला राहणार आहे.

Saturday, April 05, 2014

लोक बिरादरी

लोक बिरादरी

सप्रेम नमस्कार ……….
आदिवासी बांधवानकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. जवळपास रुपये ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. अजूनही ५० लाख रुपये जमवायचे आहेत.

स्व. बाबा आमटेंचे हे जन्म-शताब्दी वर्ष. २६ डिसेंबर २०१४ रोजी नविन दवाखान्याच्या इमारतीचा लोकार्पण सोहोळा व्हावा असा संकल्प आहे. आमचे प्रयत्न सुरु आहेत.
आपणा सारख्यांच्या मदतीने व आशीर्वादाने आम्हा कार्यकर्त्यांचा कार्य करण्याचा उत्साह दुप्पटीने वाढतो. प्रकल्पाला भेट दिल्यास आनंद होईल.
सोबत जोडलेले माहिती पत्रक कृपया तुमच्या संपर्कांना पाठवावेत.
लोभ असावा.

अनेक शुभेच्छानसह,


Aniket Prakash Amte
Lok Biradari Prakalp,
At: Hemalkasa, Post & Taluka: Bhamragad,
District: Gadchiroli, Pin code: 442 710, M.S. India.
Mobile: 9423208802 / 7588772860
Website: www.lokbiradariprakalp.org & www.lbphemalkasa.org.in

Friday, April 04, 2014

देवी महाकालीच्या यात्रेला प्रारंभ

देवी महाकालीच्या यात्रेला प्रारंभ

चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांसोबत मराठवाड्यातील भाविक मोठय़ा संख्येने येतात. त्यांच्या सुविधांसाठी प्रशासनानेही आपली तयारी सुरू केली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दुसरीकडे हजारो भाविक चंद्रपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे.
देवी महाकालीच्या यात्रेला ५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. जवळपास महिनाभर चालणार्‍या यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक हजेरी लावतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. भाविक प्रवासी वाहनांसह माल वाहतूक करणार्‍या वाहनातूनही येतात. आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी वाहनातून बसून येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडतात. यात्रा सुरक्षित पार पडावी, यासाठी अधिकृत प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनासाठी कोल्हापूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर, आंधप्रदेशातील भाविकही हजेरी लावतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने बहुतांश अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
चंद्रपूर हि एक तीर्थ भूमी : नरेंद्र मोदी

चंद्रपूर हि एक तीर्थ भूमी : नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे
मी चंद्रपूरच्या या मातीशी संबंध ठेवून आहे . हे मला श्री मोहन भागवत याचे कडून  बाळकडू मिळाले. ते या जमीनिवारचे आहे . माझ्यासाठी  हि एक तीर्थ भूमी आहे. माता महाकाली यांचे आशीर्वाद घेवून मी इथे माझ्या सभेला प्रारंभ केला आहे .
 

शेतकर्याचे ते नांगर धरा तर या जमीन प्रगतीचे रंग दाखवू लागेल : नरेंद्र मोदी

शेतकरी आत्महत्या आहेत पण काँग्रेस सजग नाही . शेतकरी आपापसांत उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे . आमच्या अहिर जीनी कोळसा घोटाळा विरुद्ध लढाई केली. तो कॉंग्रेस चा चेहरे अंधकारमय झाला : अनेक वर्षे काँग्रेस ने फक्त मत मागितले. ते वगळता आदिवासीसाठी काय केले ? अटलबिहारीजी ने आदिवासी साठी एक मंत्रालयाने तयार केले. लातूर मध्ये काय घडले ते तंदूर केसपासून आहे , महिलांना काँग्रेस ' बांधिलकी अतिशय स्पष्ट आहे : मी महाराष्ट्रात आहे आणि आपण्च सांगू शकाल सध्या लातूर मध्ये काय झाले? एक युवक ने काँग्रेस महिल्या नेत्याची हत्या केली. ज्यांनी काँग्रेस लोकांच्या नजरेत धूळ फेकणे होईल. वेळ आली आता ते पुढे एक पाऊल गेले आणि ते मिरपूड स्प्रे ठेवले : सोनिया आपण खोट्या माहिती देत आहात. महिलांसाठी दिशाभूल केली जात आहे. नरेंद्र मोदी : टाप टेन 10 मध्ये दोन्हीपैकी भाजपा किंवा एनडीए राज्य आहेत . 

सोनिया मॅडम आपण एक स्त्री आहेत . पण आपण महिलांना दिशाभूल करीत आहेत . राष्ट्र काही विषयांवर उत्तरे इच्छित आहे: नक्षलवादी रक्त संद्वित आहेत.


एक आणि महाराष्ट्र EC प्रख्यात आहेत तर मला माहीत नाही . काँग्रेस नेते गडचिरोली भागात सुरक्षा कापू असे अभिवचन दिले आहे की एक बातमी आहे.

Wednesday, April 02, 2014

 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण

मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण

गडचिरोली विधानसभा क्षेत्र
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या एकूण 1408 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामकाजविषयक प्रशिक्षण आज पार पडले.

गडचिरोलीतील बसस्थानकाजवळील कारमेल विद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणाची पाहणी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी केली. यावेळी कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी आर.जी. खजांची, तहसीलदार बी. जी. जाधव, नायब तहसिलदार एस.बी. राठोड यांची उपस्थिती होती.

कारमेल विद्यालयात एकूण 36 खोल्यांमध्ये राखीव मतदान प्रतिनिधींसह एकूण ३५२ पथकातील १४०८ मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये इव्हीएम मशीन वापराबाबत संपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर मतदान केंद्रातील सुरक्षा व्यवस्था नेमून दिलेली कामे, मतदान प्रक्रिया, निवडणूक विषयक कागदपत्रे, मार्गदर्शक तत्त्वे आदींसह निवडणूक कामकाजाची माहिती देण्यात आली. निवडणूक कामकाजविषयक माहिती छापील मजकुरासह पॉवरपॉइंट आणि दृश्यस्वरूपातही प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. प्रशिक्षणासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
कर्तव्य भावनेतून शंभर टक्के मतदान करा - डॉ. दिपक म्हैसेकर

कर्तव्य भावनेतून शंभर टक्के मतदान करा - डॉ. दिपक म्हैसेकर

चंद्रपूर : लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार नागरिक व युवकांनी कर्तव्य भावनेने वापरुन शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी व सरदार पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालयात घेण्यात आला, त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. उपविभागीय अधिकारी संजय दैने, तहसिलदार गणेश शिंदे, उपप्राचार्य डॉ. एल.डी. शेंडे व डॉ. आर.पी. इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने देशभर अभियान सुरु केले असून या अभियानाचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मतदान वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 1 जानेवारी 2014 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण तरुणींना 10 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात सहभागी होता येईल. मतदान करणे हा आपला अधिकार असून तो प्रत्येकाने बजावावा, असेही त्यांनी सांगितले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 58.59 टक्के मतदान झाले होते. 10 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत ही टक्केवारी 80 टक्क्यांवर जावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मतदान वाढविण्यासाठी डॉक्टर व वकील यांची बैठक घेऊन त्यांना आवाहन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्यांचे नाव यादीत आहे त्यांना मतदान करता येईल, परंतु ज्यांचे नाव यादीत नाही अशा तरुण तरुणींना आपले कुटुंबीय, शेजारी व परिचित यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाने मतदानाची वेळ एक तासाने वाढविली असून आता सकाळी 7 ते 6 या वेळेत मतदान करता येईल. या निवडणुकीत प्रथमच आयोगाने नोटा (यापैकी पसंत नाही) हा पर्याय उपलब्ध करुन दिला असून हा शेवटचा पर्याय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.

श्री. दैने म्हणाले, सर्वांचे मत महत्त्वाचे असून हा अधिकार आपण जाणीवपूर्वक वापरला पाहिजे. जास्तीत जास्त मतदान होणे हे लोकशाहीच्या हिताचे असून मतदानाचा अधिकार वापरलाच पाहिजे असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. मतदानाच्या दिवशी सहलीवर न जाता आधी मतदान करावे, असे आवाहनही श्री. दैने यांनी केले.

मतदानाचा अधिकार हा घटनेने दिलेला सर्वोच्च अधिकार असून मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे व ते बजावावे, असे आवाहन डॉ. शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.आर.पी. इंगोले यांनी मानले.