সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 30, 2017

काव्यशिल्प हेडलाईन्स

काव्यशिल्प हेडलाईन्स

● राष्ट्रपतींच्या कार्यक्रमामुळे रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीत साई दर्शन भक्तांसाठी बंद राहणार, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांची माहिती

●BJP Vs MNS बुलेट ट्रेन करणारच, राज ठाकरेंना काय करायचं ते त्यांनी ठरवावं : चंद्रकांत पाटील

●लालफितीचा कारभार रेल्वेतून हद्दपार करणार, सर्व लोकलमध्ये CCTV लावणार- रेल्वे मंत्री

●पंजाब पोलिसांना मोठे यश, बब्बर खालसाच्या 7 दहशतवाद्यांना लुधियानातून अटक

●अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 11 दिवसांच्या आशिया दौऱ्यावर; भारतात येणार नाही, मोदींची भेट घेणार

●कुवैतमध्ये कैद 15 भारतीयांचा मृत्यूदंड जन्मठेपेत परिवर्तित, सुषमा स्वराज यांची माहिती

●नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात युवतीचा विनयभंग

●नाशिक होणार सायकलिंग सिटी
रोहिंग्यांना आश्रय देशासाठी धोका

रोहिंग्यांना आश्रय देशासाठी धोका

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे स्पष्ट मत

नागपूर - नमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात दिला.
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हा इशारा दिला. याप्रसंगी सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री रविदास साधू संप्रदाय सोसायटीचे प्रमुख निर्मलदास महाराज उपस्थित राहणार होते. परंतु वेळेवर प्रकृती अचानक बिघडल्याने ते हजर राहू शकले नाही. त्यांचा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकार्यवाह भैय्याजी जोशी होते.
या विजयादशमी कार्यक्रमाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. सरसंघचालकांनी 1 तास 10 मिनिटांच्या भाषणात देशाची आर्थिक धोरण, कृषी धोरण व आंतरिक सुरक्षा, काश्‍मीर मुद्दा, गोरक्षा आदी विषयांवर सविस्तर विवेचन केले.
भाषणाच्या सुरूवातीला डॉ. भागवत यांनी मुंबईत शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्याबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या. डॉ. भागवत यांनी म्यानमारमधील दहशतवादी रोहिंगण्यांना आश्रय देण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. रोहिंग्यांना म्यानमारमधून कां हाकलले, याची समीक्षा आधी व्हायला हवी. रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे सामाजिक सलोखा धोक्‍यात येईल. बांगलादेशमधून घुसखोरी सुरूच आहे. त्यांना आवरणे कठिण झाले आहे. हा धोका लक्षात घेऊनच रोहिंग्यांना वेळीच सरकारने आवर घालावा, असे आवाहन त्यांनी केले.
आर्थिक धोरणांमध्ये बदल आवश्‍यक
देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी यावेळी केले. काही दिवसांपूर्वी माजी अर्थमंत्री व भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी देशाची आर्थिक स्थिती डबघाईस जात असल्याचा आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आर्थिक धोरणाबाबत सरसंघचालकांनी व्यक्त केलेल्या मतांना महत्त्वाचे मानले जात आहे. केवळ मोठ्या उद्योजकांचे हित पाहणे म्हणजे विकास नसून लघु, मध्यम व कारागिरांच्या विकासाकडे लक्ष गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विदेशी आर्थिक धोरण समोर ठेऊन देशाचा सम्रग विकास होऊ शकत नाही. प्रत्येक देशाने आपले आर्थिक धोरण करण्याची आवश्‍यकता असल्याचे. कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात अनेक शेतकरी अल्प भूधारक आहे. कर्जात बुडालेला आहे. त्याच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्‍यकता आहे.
गोरक्षा व हिंसेचा संबंध नाही
गोरक्षा व हिंसेचा संबंध जोडू नये, असे सांगून ते म्हणाले, गोरक्षेच्या नावावर हिंसा खपवून घेऊ नये. अनेक मुसलमानही गोरक्षेच्या काम करीत आहे. गोरक्षा करणारे हिंसा करू शकत नाही. यासाठी कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
काश्‍मीरमध्ये अनेक विस्थापित हिंदू आहे. देशाच्या फाळणीनंतर हे लोक हिंदू बनून राहण्यासाठी पाकिस्तानातून आले. त्यांना काश्‍मीरमध्ये आश्रय दिला आहे. त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. त्यांना नागरिकत्वही दिलेले नाही. त्यांना त्वरित नागरिकत्व बहाल, अशी मागणी त्यांनी केली.

Friday, September 29, 2017

दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत

दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत


मुंबई /प्रतिनिधी: मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 22 कुटुंबांचा आधार हरपला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मिळून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत गेलेल्या माणसाची उणीव भरुन काढणारी नाही.

चेंगराचेंगरीत कांजूरमार्ग येथील दोन मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला. कंजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये राहणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री होती. दोघी मूळच्या कर्नाटकच्या आहेत. सणाच्या निमित्ताने दोघी फुलांची खरेदी करण्यासाठी एकत्र जात असत.

शुभलता शेट्टी आणि सुजाता शेट्टी दसऱ्याच्या निमित्ताने फुलं आणण्यासाठी एकत्र परेलला गेल्या होत्या. मात्र फुलं खरेदी करुन परतताना एल्फिन्स्टनच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि यातच दोघींचाही मृत्यू झाला.

नवरात्री निमित्य विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाचे काही खास छायाचित्र फक्त तुमच्यासाठी

नवरात्री निमित्य विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाचे काही खास छायाचित्र फक्त तुमच्यासाठी



कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाकडे महामातृक क्षेत्र म्हणून पाहिले जाते. नवरात्र काळात देशभरातील लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. सध्या करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. आज आम्ही तुमच्यासाठी या मंदिराचे खास फोटो घेऊन आलो आहोत.
(सर्व फोटो : साभार देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर)


करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराचे दैदिप्यमान दर्शन, पाहा खास फोटो

एल्फिन्सटन स्टेशन चेंगराचेंगरीत 22 ठार,

एल्फिन्सटन स्टेशन चेंगराचेंगरीत 22 ठार,






मुंबई - येथील वेस्टर्न रेल्वे लाइनवरील एल्फिन्सटन स्टेशनवर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय रेल्वेमत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील कार्यक्रम रद्द करुन केईएम हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे.
- एल्फिन्सटन रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत.
24136051
24107020
24131419
- मिळालेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीची घटना सकाळी 10.45 वाजता घडली. या पुलावर सामान्यपणे रोज सकाळच्या वेळी गर्दी जास्त असते. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेला जोडणारा हा पुल असल्यामुळे येथे नेहमी गर्दी असते. दरम्यान, उद्या दसरा असल्यामुळे दादर स्टेशनवर गर्दी जास्त असेल, यामुळे अनेक प्रवासी हे एलफिन्स्टन आणि परळ स्टेशनवर उतरत होते. त्यातच पुलाचा एक भाग कोसळल्याची अफवा पसरली आणि भयभीत लोकांनी पुलावरुन उडी मारण्याच्या प्रयत्न केला आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली.
- अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस आणि स्थानिक लोकप्रतनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे एलफिन्स्टन स्टेशनजवळ पोहोचले आहेत.
- पुल कोसळला, शॉर्ट सर्किट झाले अशा अफवा पसरल्यामुळे लोकांनी धावाधाव केल्याचे सरवणकरांनी सांगितले. या अफवांमुळे चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी अशा प्रकारची घटना झाली आहे. आता तरी केंद्र सरकार सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबई लोकलकडे लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
- हा पूल रेल्वेचा असून अरुंद पुलामुळे सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी होते. परळ भागात कार्यालयांची संख्या मोठी असल्याने या स्थानकावर उतरणाऱ्यांची संख्या जास्त असते. पुलावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मदत घेतल्या जाते.
- तीन वर्षापूर्वी या पुलाचे रुंदीकरण करण्याचे ठरले होते पण अजूनही ते कागदावरच आहे. हा पूल मध्य रेल्वेच्या परळ आणि पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन स्टेशनला जोडणारा आहे. या पुलावरुन रोज लाखो प्रवासी ये-जा करतात.
आता रक्तदात्याची माहिती एका क्लिकवर..

आता रक्तदात्याची माहिती एका क्लिकवर..


नवी दिल्ली-फेसबुक आता एक असे फिचर लाँच करणार आहे ज्यामुळे रक्ताची गरज असलेली व्यक्ती आणि रक्तदाता एकमेकांशी संपर्क साधू शकतील.हे अनोखे फिचर जागतिक रक्तदान दिनाच्या दिवशी अर्थात 1 ऑक्टोबर रोजी सुरु होईल.हे फिचर सुरु झाल्यानंतर यूजर्स तिथे आपले रजिस्ट्रेशन करु शकतील.यामुळे रक्ताआभावी होणारे मृत्यू कमी होण्यास मदत होईल.

यूजर्स करु शकणार रजिस्ट्रेशन
-फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने एका पोस्टमध्ये स्वतः याचा खुलासा केला आहे.
-त्याने म्हटले आहे,की भारतात सुरक्षित रक्ताची कमतरता आहे.येथे अनेक कुटुंब हे सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदात्यांचा शोध घेत असतात.यामुळे कंपनीने हे फिचर सादर केले आहे.यामुळे रक्तदाते,हॉस्पिटल आणि रुग्ण एकमेकांशी जोडले जातील.यामुळे जवळच्या रकतदाताशी संपर्क करणे सोपे होईल.

Thursday, September 28, 2017

चक्क गॅस सिलेंडरची निघाली अंतयात्रा

चक्क गॅस सिलेंडरची निघाली अंतयात्रा


सावली/प्रतिनिधी:
वाढत्या महगाईला विरोध करत सावली येथे आज चक्क गॅस सिलेंडरचीच अंतयात्रा काढण्यात आली.भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या कमवकुत धोरणामुळे राज्यभरात महागाईच्या भस्मासुर दिवसेंदिवस वाढत असून याचा परिणाम गोरगरीब व सामान्य जनतेच्या जनजीवनावर होत असून जनतेला जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्य, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणारी भरमसाठ वाढ,व विजेचे भारनियमन यामुळे जनता व शेतकरी बांधव त्रस्त आहेत. तसेच शेतकऱ्यांना त्वरित कर्ज माफी देवून न्याय देण्यात यावा या सर्व मागणीसाठी गुरवारी सावली (जिल्हा चंद्रपूर) येथे सरकारला डिवचनी देत सरकारच्या अच्छे दिना च्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने लॉलीपॉप मोर्चा व सिलेंडरची अंतयात्रा काढून विरोध दर्शविला.

या मोर्च्यात गावातील नागरिकांना लॉलीपॉप चे वाटप करण्यात आले. तसेच गॅससिलेंडर ची अंतयात्रा व शेतकरी आत्महत्येचे देखावेही गावातुन मिरविन्यात आले.नागरिकांनी देखील या मोर्च्याला उत्पुर्त प्रतिसाद दिला.या आंदोलनाचे आयोजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. संदिपभाऊ गड्डमवार यांच्या नेतृत्व करण्यात आले असून शशिकांत देशकर, राजेंद्र वैद्य, सुरेश रामगुंड, डी. के. आरीकर, सुनील काळे, ॲड.गणेश गिरधर, निमेश मानकर, प्रशांत चिप्पावर, आनंद अडबाले, जैस्वाल, प्रशांत गाडेवार, मनोहर ठाकरे, यशवंत ताडाम,अनिल स्वामी, प्रवीण उरकुडे, आशिष मनंबततूनवार, बंडू मेश्राम, भास्कर उरकुडे, आकाश बुरीवार, रमेश खेडेकर,किशोर मलोडे,जीवन कांबळे,गुनू सुरमवर,मनोज धर्मपवार, राजू व्यास,विवेक सुरमवार,सचिन संगीडवार, प्रकाश सुरमवार, प्रकाश लोंनबले, प्रमोद गेडाम, तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
अमिताभ बच्चन यांची चौकशी होण्याची शक्यता

अमिताभ बच्चन यांची चौकशी होण्याची शक्यता


पिटीआय वृत्तसंस्था/
जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) लवकरच त्यासाठी बच्चन कुटुंबीयांना नोटीस बजावली जाऊ शकते. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. गेल्यावर्षी पनामा पेपर्स घोटाळा उघड झाल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. जगभरातील अनेक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींनी परदेशात बोगस कंपन्या स्थापन करून आपल्याकडील काळा पैसा त्याठिकाणी गुंतविल्याची माहिती समोर आली होती.
‘पीटीआय’च्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी ‘ईडी’कडे याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्यामुळे आता ‘ईडी’ बच्चन परिवारातील इतर सदस्यांनाही चौकशीसाठी पाचारण करणार असल्याचे समजते. याशिवाय, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक विभागानेही यापूर्वीच बच्चन कुटुंबीयांकडे त्यांनी परदेशात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे तपशील मागितले होते. त्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी ही माहिती ‘ईडी’पुढे सादर केली होती. आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पनामा पेपर्स घोटाळ्यात अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आल्यानंतर आयकर खात्यानेही तपासाला सुरूवात केली होती. त्यांच्याकडूनही बच्चन यांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी सुरू झाली होती.
जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्समध्ये नमूद केल्याप्रमाणे आपला कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही, असा दावा अमिताभ यांनी केला होता. मात्र, त्यानंतर अमिताभ यांच्याविरोधात काही पुरावे समोर आले होते. पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे १९९३ ते १९९७ या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. मात्र, हे वृत्त प्रसिद्ध झाल्याच दुसऱ्याच दिवशी अमिताभ यांनी त्याचा इन्कार करत आपल्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या माहितीमुळे त्यांच्या दाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

Wednesday, September 27, 2017

 आरोपी सापडला, सुजल सापडेना

आरोपी सापडला, सुजल सापडेना

कामठी : खेळता खेळता बेपत्ता झालेल्या लिहिगाव येथील सुजल नेपाल वासनिक या नऊ वर्शीय विद्याथ्र्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. अपहरण कत्र्यांनी प्लॅनिंग करूनही खंडणीचा प्रयत्न असफल झाला असून, मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार करूनही कामठी पोलीसांनी दुर्लक्ष केले असल्याने स्मार्ट व हायटेक होत असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या षहर पोलीसांच्या कार्यप्रनालीवर प्रष्नचिन्ह निर्माण होत आहेत.
     सुजल हा स्थानिक जिल्हा परिशदच्या षाळेमध्ये चवथ्या वर्गात षिकतो. त्याचे वडील नेपाल वासनिक हे षेतमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता तर आई गृहिणी आहे. त्याला लहान भाऊ आहे. 16 सप्टेंबरला षनिवारी सकाळची षाळा असल्याने सुजल नेहमीप्रमाणे सकाळी षाळेत गेला व दुपारी 11 वाजता षाळेतून घरी आला. व दप्तर घरी ठेवून ग्रामपंचायत षेजारी झेंडयाजवळ मित्रांसोबत खेळायला गेला. सुजल मित्रांसोबत खेळाच्या थुंदीमध्ये असताना आईने त्याला जेवण करण्याकरीता बोलावून आणले व दोन्ही मुलांना जेवण दिले परंतू खेळाच्या धुुंदीमध्ये असलेला सुजल आईची नजर चुकवून पुन्हा खेळायला गेला. त्यामुळे आईन लक्ष देण्याचे टाळले. परंतू दुपारी 3 वाजेपर्यंत मुलगा घरी न आल्याने आईने सुजलचा षोध घेणे सुरू केले. रात्री उषिरापर्यंत घरी परतलाच नाही. सुजल बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या आई-वडिलांनी षोध घ्यायला सुरूवात केली. तो कुठेही न गवसल्याने षेवटी नेपाल वासनिक यांनी नातेवाईकासोबत जावून रात्री 11 वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादवी 363 अन्वये गुन्हा दाखल केला परंतू पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने मनावर घेतले नाही. आईवडीलांनी मुलगा बेपत्ता असल्याचे पत्रके छापली व ती पोलीसांना दिली.  तरी देखील सुजल यांचा कोणताही सुगावा नातेवाईक व पोलीसांना लागला नाही याकडे लक्ष दिले नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नेपाल वासनिक यांच्या घराषेजारी राहणा-या सागर बागडे यांच्या मोबाईलवर रामदास बाबुलाल मडावी यांचा फोन आला त्याने सुजलच्या आई वडीलांषी बोलायचे असल्याची सुचना केली. त्यावेळी सुजलची आई एकटीच घरी होती. सुजल हवा असल्यास दहा लाखांची खंडणी द्यावी लागेल असे फोन करणा-यांने सांगितले. खंडणी न दिल्यास मुलगा विकणार असल्याचे व विकत घेणारा सुध्दा तयार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार सुजलच्या आईने त्याच्या वडीलाला सांगितले. पोलीसांना सांगितल्यास सुजलला जिवे मारण्याची धमकी दिली. दुस-या दिवषी सोमवारला सकाळी नऊ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत सतत फोन येत राहिल्याने षेवटी फोनवरच वाटाघाटी करत चार लाख रूपयांमध्ये हा सौदा ठरला. त्यानंतर या फोनकाॅल्सची पोलीसांना माहिती देवून नातेवाईकांनीच सापळा रचला. फोन करणा-याने तारसा भागात पुलाजवळ पैसे व मोबाईल ठेवण्यास सांगितले. पैसे मिळाल्यानंतर दोन किमी अंतरावर पेट्रोलपंपावर सुजल असेल असेही त्याने सांगितले. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तारसा मार्गावरील पुलाजवळ रेनकोटची बॅगसदृश्य कागदानी भरलेली बॅग तयार करून नेपाल वासनिक यांनी पुलाजवळ ठेवली. त्यातच लपून बसलेला रामदास मडावी हा आजूबाजूला कुणीही नसल्याची खात्री पटताच पैसे घेण्यासाठी बाहेर आला. बॅग घेवून  तो मोटरसायकलने निघाला. सुजलच्या नातेवाईकांनी त्याचा पाठलाग केला तर टनय नातेवाइक पेट्रोल पंपाकडे गेले तेथे सुजल आढळला नही. पाठलाग करून ग्रामस्थंाच्या मदतीने नातेवाईकांनी मडावीला पकडले. झाडाला बांधून त्याला चोप दिला व पोलीसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनील नवनाथ मेश्राम (38) यालाही अटक केली. चैकषी दरम्यान मडीवी याला ओळखत नसल्याचे मेश्राम याने सांगितले. मंगळवारी दुपारी पोलिस दोघांना कामठी येथील उपजिल्हा रूग्णालयात मुलायजा करायला नेणार होते. त्यानंतर न्यायालयात हजर करणार होते. तोच दुपारी बारा वाजताच्या सुमारास मडावी हा पोलिस कोठडीतीलच षौचालयात गेला तेथे त्याने आत्महत्या करण्याच्या उद्येषाने स्वतःच स्वतःचा ब्लेडने गळा चिरला. तब्बल 15 मिनिटे तो रक्ताच्या थारोळयात षौचालयातच पडला होता. यावेळी बंदीगृहामध्ये असलेल्या दुस-या प्रकरणातील आरोपीने आरडाओरड केल्याने पोलिसांना माहिती झाले. लगेच पोलिसांनी त्याला येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता नेले त्याला खाजगी रूग्णालयात नेण्याचा डाॅक्टरांनी पालिसांना सल्ला दिला. नंतर पोलीसांनी त्याला आधी खाजगी व नंतर समोरील उपचाराकरीता नागपूरच्या मेयो हाॅस्पिटलला दाखल केले. त्याची प्रकृती     सध्या स्थिर आहे. षौचालयात ब्लेडसारखे धारदार षस्त्र किंवा वस्तू कसे काय आले असा प्रष्न निर्माण होत आहे.  सुनिल याची 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. मडावी यांच्याविरूध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा सुजलचा षेजारी जीममध्ये झाला कर्जबाजारी
रक्कम घेण्यासाठी रामदास मडावी हा बाहेर आला त्याला पाहताच नेपाल वासनिकसह इतरांना नवल वाटले. कारण रामदास हा लिहिगाव मध्ये वासनिक यांच्या षेजारी राहतो. षिवाय सुजल बेपत्ता झाल्यानंतर तोही सुजलच्या नातेवाईकांसोबत सुजल याचा षोध घेत होता. सुजल याचा कोणताही सुगावा नातेवाईक व पोलिसांना लागलेला नाही. मडावी याने काही महिन्यापूर्वीच परिसरातील गुमथळा येथे जीम सुरू केला त्यासाठी त्याने अनंेकांकडून कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्याने अपहरण केल्याची षक्यता आहे षिवाय पे्रयसीसोबत लग्न करण्यासाठीही त्याला पैसे हवे होते असे कळते. तसेच नरसाळा जवळील खंडाळा येथे त्याची बहीण राहत असून षनिवार व रविवारला मडावीला तेथे नागरिकांनी बघितले हाते. तसेच सुनिल मेश्राम यांने एक पिकअप मालवाहक वाहन खरेदी केले होते व ते जप्ती झाले होते. त्यामुळे त्याच्यावरही कर्जाचा डोंगर साचला होता.
चार लाख रूपये मिळणार होते. 
सुनिल मेश्राम त्याचा सहका-याने मला फोन करायला सांगितला दहा लाखांची खंडणी माग चारलाख तू घे व उर्वरित सहा लाखांपैकी प्रत्येकी तीन लाख रूपये आम्ही घेवू असे सुनील याने सांगितल्याचे बयाण मडावी याने पोलिसांना दिले आहे. मात्र सुजलबाबत दोघांनही पोलिसांना काहीही सांगितलेले नाही मडावी हा खोटे बोतल असल्याचा दावा सुनील याने केला आहे. आपण त्याला ओळखत नसल्याचेही तो सांगत आहे.

षेती विक्रीतून मिळाले तीस लाख
सुजलचे वडील नेपाल वासनिक हे तिन भाऊ व दोघ्या बहिनी आहेत. नेपालच्या आईला त्यांच्या वडीलाची दोन एकर षेती मिळाली होती. लहानपणातच आईचे निधन झाल्याने मोठे भाऊ जयपाल यादवराव वासनिक यांच्या नावावर ही षेती होती. ते ग्रामपंचायतमध्ये चपराषी पदावर कार्यरत आहेत. या षेतीबाबत परिवारीक काही वादविवाद नव्हता. काही दिवसांपूर्वी तीस लाखांमध्ये ही षेती विकली होती. व त्याची या परिवारामध्ये हिस्सेवाटी झाली हाती. यातून त्यांना भरपूर पैसा मिळाला या पैषावर गावातील काहींचा डोळा होता. याबाबत गावक-यांना माहिती होती. मडावी व सुनिललाही याची माहिती होती.        
321 निसर्ग पर्यटनस्थळांची निवड

321 निसर्ग पर्यटनस्थळांची निवड

मुंबई- राज्यात २०१५ साली महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर ३२० निसर्ग पर्यटनाची निवड करण्यात आली असून, त्यापैकी ११६ स्थळांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी समितीची मान्यता देखील प्राप्त झाली आहे,  अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज जागतिक पर्यटन दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निसर्ग पर्यटनासंबंधी माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात वनक्षेत्रालगत असलेल्या निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास करणे, त्या माध्यमातून स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे, पर्यटनस्थळाच्या ठिकाणी निसर्गाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेत पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळामार्फत केले जात आहे. त्याअंतर्गत ११६ पर्यटनस्थळांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, या ठिकाणच्या विकासकामांसाठी वन खात्याच्या राज्य पर्यटन विकास निधीमधून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
निसर्ग पर्यटन स्थळांपैकी वन्यजिवांकरिता संरक्षित क्षेत्र ही महत्त्वाचे आहेत. राज्यात ६ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय उद्याने, ४८ अभयारण्ये आणि ६ संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. त्यापैकी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबईचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचे नियोजित आहे. याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती येथे ही पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वन्यजिवांकरिता असलेल्या संरक्षित वनक्षेत्राशिवाय वनक्षेत्रामध्ये येणारे किल्ले, काही देवस्थाने, पाणस्थळे  व जैव विविधता संवर्धन उद्यान यांचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येत आहे. जैवविविधता संवर्धन उद्यानामध्ये विसापूर उद्यानाकरिता ४० कोटी रुपयांचा निधी सन २०१७-१८ करिता नियोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे महादेव वनाची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. त्याकरिता जवळपास २४४.१४  लाख रुपयांचा निधी आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ येथे वनोद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी १६६ . ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सामाजिक वनीकरणांतर्गत राज्यात ६८ ठिकाणी स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानाची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यासाठी चालू वर्षी २६.८६ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. रायगड किल्ला परिक्रमा, नाशिक जिल्ह्यातील ३ ऐतिहासिक किल्ले (राजदेर, ईंद्राई अणि कोल्दर किल्ला), यांच्या विकासाकरिता  ७ कोटी रुपयांचे प्रकल्प आराखडे  महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केले आहेत, त्याकरिता ही निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय पंढरपूर येथील तुळशी वनोद्यानाचे काम प्रगतिपथावर आहे.

चंद्रपूर येथील झोपला मारूती, बिलोलीचे दत्तमंदिर,  अंबेजोगाईचे रेणुका माता मंदिर, धामणगावचे संत मुंगसाजी महाराज समाधी स्थळ, देऊळगावचे महालक्ष्मी संस्थान या काही देवस्थानाजवळ निसर्ग पर्यटन विकासाची कामे करण्यात येत आहेत. या सर्व कामांसाठी चालू वर्षी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाकरिता १३६ कोटी रुपयांचा नियतव्यय राज्य योजनेमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
सरदार सरोवर केवळ अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतीसाठी - मेधा पाटकर

सरदार सरोवर केवळ अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतीसाठी - मेधा पाटकर

नागपूर - नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा प्रकल्प हा केवळ उद्योगपतींसाठी आहे. कोका-कोला कंपनीला ३० लाख लीटर, नव्याने येऊ घातलेल्या कार कंपनीसाठी ६० लाख लिटर आणि अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींच्या कंपन्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, केवळ यासाठी या धरणाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले आहे. त्यातून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला एक थेंबही पाणी मिळणार नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक आणि नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
म्यूर मेमोरीअल रुग्णालय येथील सभागृहात विविध संघटनांच्या बैठकीसाठी त्या आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी गोसीखुर्द प्रखल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे उपस्थित होते.
मेधा पाटकर म्हणाल्या, १३९ मीटरची भिंत बांधून झाली म्हणजे प्रकल्प पूर्ण झाला असे म्हणताच येत नाही. सरदार सरोवर प्रकल्पातील ४० हजार प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन अजून झालेले नाही. गेल्या ३१ जुलै पर्यंत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, असे न्यायालयाचे आदेश होते. पुनर्वसन न करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पाचे लोकार्पण केले. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही आणि त्यांना पर्यायी जमिन उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील, असेही त्यांनी जाहीर केले.
केवळ उद्योगपतींना हे पाणी मिळावे आणि येणा-या गुजरातच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी लोकार्पण केले. त्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केले होते. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री सोडले एकाही राज्याचे मुख्यमंत्री सहभागी झाले नाही. कार्यक्रमासाठी ८० मोठे रथ आणले जाणार होते. आम्ही हजारो प्रकल्पग्रस्त धरणे देत होतो. कार्यक्रमाला न जाण्याचे आवाहन केले हाते. त्यामुळेच कुणी सहभागी झाले नाही. हा कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 - नदी-जोड प्रकल्पही ‘कार्पोरेट’च्याच हिताचे
सरदार सरोवर आता आऊटडेटेड झाला आहे. अमेरिका सुद्धा त्यांच्या कडील मोठमोठी धरणे आता तोडत आहे. अशा वेळी नदी-जोड प्रकल्प सुद्धा याला पर्याय होऊ शकत नाही. हा प्रकल्प कार्पोरेट लोकांनीच आनलेला आहे. नदी-जोड प्रकलपमुळे सुद्धा सामान्य नागरिक व शेतक-यांचे हित होणार नसून केवळ उद्योगपतींच्याच हिताचे आहे. देशातील सर्व नद्याही आपल्या ताब्यात राहाव्यात असा उद्योगपतींचा घाट असल्याचेही मेधा पाटकर म्हणाल्या.
- नितीन गडकरींनी संवादाची दारे उघडी ठेवावी
सध्या नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा मंत्रालय आले आहे. तेव्हा त्यांनी या प्रकल्पासंबंधात संवादाची दारे उघडी ठेवावी, चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
- पंतप्रधानांना आव्हान
नर्मदा सरोवर लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘झेंडा उंचा करणाºयांनी हा प्रकल्प आजवर होऊ दिला नाही. त्यांचे कच्चे-चिठ्ठे आपल्याकडे आहे,’ असे जाहीर केले होते. त्याबाबत , ‘आमचे कच्चे-चिठ्ठे त्यांनी जरुर आणावे आम्हीही त्यांचे पक्के-चिठ्ठे आणतो, ’ आणि यावर खुली चर्चा होऊ द्या असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेधा पाटकर यांनी थेट आव्हान सुद्धा दिले.
- गुजरातचा विकास पाहायला याच
गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून सांगितले जाते. गुजरातमध्ये पर्यावरण व सामाजिक न्यायाची अवहेलना कशी केली जाते. तेच त्यांचे विकासाचे मॉडेल आहे, ते पाहायला नक्की या तसेच नर्मदा बचाओ आंदोलनच्यावतीने सुरु असलेली कामे पाहायला या, असे आवाहनही त्यांनी विविध संघटनांच्या बैठीकीत कार्यकर्त्यांना केले. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत सुजाता भोंगाडे, समीक्षा गणवीर, एकनाथ गजभिये, रमेश पाटणे, विलास शेंडे, जम्मू आनंद, श्याम पांढरीपांडे, अनंत अमदाबादकर आदी ‘उपस्थित होते.
शासनाच्या उदासिनतेने आदिवासी शेतक-यांवर सरकारी दुष्काळ

शासनाच्या उदासिनतेने आदिवासी शेतक-यांवर सरकारी दुष्काळ

सावली= हा दुष्काळ पावसामुळे नसून सरकारच्या उदासिनतेचा आहे असा आरोप  श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. श्रमिक एल्गारने काढलेल्या आदिवासी शेतकरी मोर्चासमोर बोलत होत्या. सावली तालुक्यातील मेटेगांव तलावाचे दुरूस्ती सावली तहसिल प्रशासनाने थांबवल्यामुळे त्या परिसरातील शेतक-यांना सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यांने मेटेगांव, चक मानकापूर, मानकापूर या गावातील कोणत्याही शेतक-यांना रोवणे करता आले नाही त्यामुळे शेतक-यांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकरीता शेतक—यांना भरपायी द्यावी व मेटेगांव तलाव दुरूस्तीचे काम तातडीने करावे या मागणीसाठी आज श्रमिक एल्गारच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यांत आलेला होता.
मेटेगांव, मानकापूर व चक मानकापूर हे तीनही गाव आदिवासी गाव आहेत. या गावाला सिंचनाची सुविधा नाही. मात्र मेटेगांवला मोठा माजी मालगुजारी तलाव आहे.  हा तलाव नादुरूस्त असल्यांने, या तलावाची दुरूस्ती झाल्यास शेकडो शेतक-यांच्या शेतीला सिंचन सुविधा होवू शकते.  सहा महिण्यापूर्वी  शासनाने मगांग्राहयोतून तलावाचे दुरूस्तीचे काम सुरू केले मात्र कोणत्याही ठोक कारणाशिवाय काम बंद केले.  यावर्षी पावसाचे पाणी कमी झाल्यांने, या परिसरातील एकाही शेतक=यांने रोवणे रोवले नाही. परिणामी गावातील आदिवासी शेतक-यांवर उपासमारीची पाळी आली आहे. व त्याकरीता तेथील शेतकरी स्थलांतरीत होण्यांच्या मार्गावर आहेत.  एकाही शेतक-यांना रोवणे करता न आल्यांने, या शेतक=यांना शासनाने भरपायी द्यावी व तसेच मेटेगांव तलावाची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी घेवून मूल येथील उपविभागीय कार्यालयावर दुपारी 12 वाजता मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विभागीय अधिकारी सरवदे साहेब यांनी हे प्रकरण 7 दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिले. व सबंधित विभागातील अधिका—यांसोबत चर्चा करून नहराचे काम सुरू करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले आहे. यावेळी मोर्चाला अनिल मडावी, दिनेश घाटे, अशोक दळांजे, प्राजंली दळांजे, मुक्ता गेडाम, लहानु कळाम, अरविंद गेडाम, अमर कड्याम, रवी नैताम, संगिता गेडाम, फरजाना शेख, मोनी कुळमे​थे यांनी मार्गदर्शन केले. तर बाळू मडावी, राणी भोयर, विशाल नर्मलवार, अमित राऊत व मोर्चात तीनही गावचे चक मानकापूर, मानकापूर, पेंढरी येथील शेतकरी मोर्चाला उपस्थित होते. मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  मूल येथील श्री.साई मित्र परिवार तर्फे विवेक मुत्तलवार यांनी केली होती.
क्लीन सिटीत प्रसाधनगृहांचे डर्टी पिक्चर

क्लीन सिटीत प्रसाधनगृहांचे डर्टी पिक्चर

क्लीन सिटी म्हणून देशात ७६ वा क्रमांक व राज्यात सहावा क्रमांक मिळविणाऱ्या चंद्रपूर शहरात महिलांच्या स्वच्छतागृहांचा अभाव दिसून आला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे नुकत्याच क्लीन सिटीचा "शेरा" मिळालेल्या शहरातील महिलांसाठी हि लाजीरवाणी बाब समोर आली आहे.
केंद्र सरकारने नुकताच स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला.यात महाराष्ट्रातील एकूण ४४ शहरे स्वच्छ अल्याचा अहवाल समोर आला .यात चंद्रपूर शहराने विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांपैकी प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील ४४ जिल्ह्यातून ६ वा क्रमांकावर आपले स्थान पक्के केले आहे याबद्दल चंद्रपूरचे स्वागत केले पाहिजे.असे असले तरी देखील शहरात असे अनेक ठिकाण आहेत जिथे महिलांसाठी स्वतंत्र मुत्रीघर,स्वच्छतागृह नाहीत, *राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रात असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर* यांचे मूळ शहर असलेल्या चंद्रपूर शहरात दरवर्षी विकास कामांसाठी करोडो रुपयाचा निधी आणला जातो मात्र मुख्य रस्त्यांवर व चौकांत सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा सर्वांना सोयीस्कर विसर पडला असल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून आले आहे .

चंद्रपूर शहराला उद्योग नगरी म्हणून संबोधले जाते .अश्या या उद्योगनगरीत कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा शहरात होऊ लागली आहे. त्यातून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत .अनेक महिलांना युरिनचा त्रास असतो. काहींना दर दोन तासांनी लघुशंकेला जावे लागते. तसे न केल्याने त्याचा गर्भाशयावर ताण पडतो.तसेच मूतखडा, मासिक पाळीदरम्यान त्रास होतात. यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य संघटनेने सर्वेक्षण केले असून, तीन महिलांमागे एका महिलेला युरिन इन्फेक्शनचा त्रास असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. तीन तासांतून एक लिटर पाणी शरीरासाठी आवश्यक असते. मात्र, घराबाहेर युरिनला जावे लागूच नये, म्हणून महिला पाणी पिणे टाळतात. त्याचे आरोग्याच्यादृष्टीने विपरित परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर क्लीनसिटीत शहरातील मुताऱ्या आणि शौचालयांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे.
शहरातील बाजारपेठेत दररोज शेकडो महिला रोजगारासाठी, तर हजारो महिला खरेदीसाठी येतात. मात्र स्वच्छतागृहाअभावी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.लघुशंकेने अटकलेला चेहरा आणि,अवघडलेली स्थिती आणि सर्वत्र पुरुष वर्ग, विचारावं तरी कुणाला ?असा प्रश्नच याठिकाणी महिलांपुढे उपस्थित होत असतो.महिलांची हि संकुचित अवस्था गेल्या कित्तेक वर्षांपासून अश्याच प्रकारे थंड बस्त्यात पडलेली आहे.
जानेवारी २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसांपासून चंद्रपूर शहराची पाहणी करण्याकरिता केंद्रीय समिती आलेली होती . त्या समितीद्वारे *स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर* शहराची पाहणी करून पुरस्कारासाठी गुणही दिले गेले.मात्र या समितीने महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहाला "मार्क" न करताच गुण देऊ केले असे यातून निशपन्न होते.स्वच्छ शहरासाठी निकष ठरविण्यात आले होते. यात स्वच्छता,घनकचरा व्यवस्थापन ,खाजगी व सार्वजनिक शौचालये ,स्वच्छता अभियानात नागरिकांचा सहभाग,स्वच्छते विषयी जनगागृती,विकासकामे,अश्या विविध विषयांचा यात समावेश होता.

ज्यात संपूर्ण महाराष्ट्रात *चंद्रपूरने ६ वा क्रमांक प्राप्त केला* . महिलांना ५० टक्के आरक्षण असुनसुद्धा सार्वजनिक व व्यवसायिक जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही. हि बाब म्हणजे महिलांसाठी लज्यास्पदच आहे .या मागणीसाठी *काँग्रेस नगरसेविका सुनीता लोढिया* यांनी शेकडो महिलांना घेऊन मनपा आयुक्त संजय काकडे यां रीतसर निवेदनही दिले होते .त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुकीत महिला स्वच्छतागृहाचा मुद्दा घेऊन अनेकांनी आपल्या पोळ्या शेकायला सुरवात केली.

*दारूबंदीच्या जिल्ह्यात महिलांकडून चांद्यापासून तर बांद्या परियंत व गल्ली पासून तर दिल्ली परियंत रान पेटवणाऱ्या महिलांनासाठी त्यांच्याच शहरात अश्या प्रकारच्या समस्सेला तोंड द्यावे लागणार असेल तर हा महिलांचा अपमानच.*




एकीकडे *"निर्मल भारत"* अभियानाशी जोडली गेलेली प्रसिद्ध महिला अभिनेत्री विद्या बालन संपूर्ण देशापुढे *"जहाँ सोच वाह शौचालय"* चा मूल मंत्र माध्यमांच्या मार्फत घराघरात पोहचवत आहे मात्र स्थानिक प्रशासन याला पायदळी तुटवत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत आहे.मग या ठिकाणी सोचच नाही म्हणून शौचालय देखील नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही.




*पुरुष मुताऱ्या उघड्यावर*

महिला असो व पुरुष शहरात दोघांचीही स्थिती एकच आहे.मात्र यांच्या दोघांच्याही वागणुकीत फरक असल्याने पुरुषांना त्यातथोडी सूट असते .पुरेशी स्वच्छतागृहे असती तर त्यांनी उघडय़ावर लघुशंका करण्याचा मार्ग स्वीकारला नसता, याचे भान पुरुषांना आणि प्रशासनालाही आले पाहिजे.चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या मनपाच्या नवीन ईमारतील लागूनच पुरुषांनी खुल्या मुतारीची सोय करून घेतली .चित्रात दिसणारे हे उदाहरण तिथलेच आहे.मात्र हा परिसर गजबजलेला असल्याकारणाने हे चित्र अतिशय विद्रूपीय तसेच लज्यास्पद आहे. शहरात सार्वजनिक शौचालये नसल्याने पुरुषांनी मानपाच्याच ईमारतील *"टार्गेट"* करीत त्याठिकाणी मुतारी घडवून आणली.या परिस्थितीला वर्ष उलटून गेला मात्र याकडे कोणीच गांभीर्याने बघितले नाही.त्यामुळे शहराचा कारभार ज्या ईमारतींतून चालतो त्याच ईमारतीत अश्या प्रकारचे दृश्य दिसत असेल तर *'स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूर'* म्हणावं तरी कस हाच प्रश्न निर्माण झाला आहे.




शहराला आजपरियंत सलग एकामागे एक अश्या *३ महिला महापौर लाभल्या* ,मात्र यातील दोन महिला महापौरांनी गेल्या पाच वर्षात महिलांच्या या समस्सेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहेत .नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महापौर पदी निवड झालेल्या नवमहापौर अंजली घोटेकर यांचा महापौर पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला ,मात्र अश्या या नुकत्याच शहराला लाभलेल्या ह्या तिसऱ्या महिला महापौर महिलांच्या या सार्वजनिक समस्सेकडे लक्ष देतील का? कि महिलांची कुचंबणा हि नेहमीचीच समस्या बनून राहणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.






*या उपाययोजनांची गरज*

खासगी संस्थांचा विचार

बंगळुरू, कर्नाटक ,केरळसारख्या ठिकाणी जाहिरात तत्त्वावर उत्पन्न मिळवून देण्याच्या बदल्यात खासगी संस्थांकडे स्वच्छतागृह व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.




*मूलभूत सुविधा अल्पच*

महापालिकेमार्फत मुताऱ्या शौचालयांत पाणी, स्वच्छता डागडुजी अशा मूलभूत सुविधा योग्य प्रकारे पुरविण्यात आल्या नसल्याने खूप कमी महिलांकडून शौचालयांचा वापर होतो.




*जागेचे आरक्षण असणे गरजेचे*

मुताऱ्या किंवा शौचालय बांधण्यास परिसरातील नागरिक विरोध करतात. त्यामुळे विकास आराखड्यातच शौचालय, मुताऱ्यांसाठी आरक्षण असायला हवे .




*नव्या मुतारीची सक्ती*

शहरातील सार्वजनिक शौचालये आणि मुताऱ्या पाडण्यापूर्वी त्याच परिसरात ५० ते १०० मीटरवर दुसरे शौचालय आणि मुतारी बांधण्याच्या सक्तीचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता . त्यामुळे शौचालय मुताऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.चंद्रपूर महापालिकेनेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा.व संख्या वाढवावी







*स्वच्छता व पाणीही हवे*

शहरातील बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पुरेसे पाणी, औषध फवारणी स्वच्छता नसते. तसेच सीट्सचीही मोडतोड झालेली असते.अश्या शौचालयांची देखभाल सुलभ तसेच *"पे अँड यूज"* तत्त्वावर करता येऊ शकते .




*दुजाभाव दूर व्हावा*

पुरुषांइतकीच महिलांचीही संख्या शहरातील रस्त्यांवर आणि गजबजलेल्या भागांमध्ये दिसते. परंतु, महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या मात्र बोटावर मोजण्या ईतकी आहे . महिलांप्रति महापालिका असा दुजाभाव व *'लेट लतीफ पणा'* का करते, असा प्रश्न निर्माण होतो.




*निकषांचे व्हावे पालन*

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार प्रत्येक १०० पुरुषांमागे चार शाैचालय असावेत तर, १०० महिलांमागे पाच शौचालये असावेत. या निकषांचे पालन करून महापालिकेने शाैचालय बांधकामास प्राधान्य द्यावेत.




अश्या या सर्व नियमांचे पालन करून लवकरात लवकर शहराची हि समस्या मार्गी लावण्यात नवमहापौर अंजली घोटेकर यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.असे न झाल्यास शासनाने ही मोहीम राबवून केवळ कागदोपत्री अहवाल तयार केला व *"स्वच्छ भारत' व शहरे हि मोहीम फक्त कागदावरच अधोरेखित केल्या गेली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.*

*ललित सुनील लांजेवार,*

चंद्रपूर.

९१७५९३७९२५



.
 गोंदियात "आय लव पाकिस्तान"चे फुगे विक्रिला

गोंदियात "आय लव पाकिस्तान"चे फुगे विक्रिला

गोंदिया/प्रतिनिधी:
भारताचा कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तानकचे गुणगान गाणारा किस्सा सद्या विदर्भातील गोंदियात घडला असला असल्याची माहिती एका ऑनलाईन वृत्त साईट कडून मिळत आहे.गोंदियात ‘आय लव्ह पाकिस्तान’ लिहिलेले फुगे विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय युवा सेनेच्या तरुणांना लहान मुलं अशाप्रकारचे फुगे विकताना आढळली आहेत.

मुलांना चौकशी करुन सोडून देण्यात आलंय. मात्र अशाप्रकारचे फुगे विकण्याचं काम कोण करत आहेत?, याचा पोलीस शोध घेत आहेत.
शहरातील फुगे विक्रेत्यांना पोलिसांनी बोलावल होत यानंतर पोलिस विभागाला फुग्यावरील लोगो तपासून पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.तपासाअंती पोलिस दोषीवर क़ाय करवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
कर्मचा-यांवर गोळ्या झाडून हल्ला

कर्मचा-यांवर गोळ्या झाडून हल्ला


कामठी मधील वेकोली कर्मचारी जगदीश श्रावणकर यांचावर आज सकाळी ६च्या सुमारास ड्युटीवर जातेवेळी कांद्री बस स्टॉप समोर पल्सर वर येऊन दोन अज्ञात आरोपींना गोळ्या झाडून बोरडा रोड नी पसार झाले.
झाडलेल्या दोन गोळ्या पैकी एक गोळी हवेत व दुसरी जगदीश यांच्या कमरेवर लागली आहे आशा नर्सिंग होम मधे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
चंद्रपुरात भाजपला टोचन्या देत काँग्रेसची ब्यानरबाजी

चंद्रपुरात भाजपला टोचन्या देत काँग्रेसची ब्यानरबाजी


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात शहरात कांग्रेस पक्ष सद्या रोज ना-ना विविध कारणांवरुण माध्यमात चांगलाच गाजत आहे. असाच
आणखी एक नवीन कारनामा चंद्रपूरच्या चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यापासून सरकार कडून गॅसची दरवाढ सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात थेट चंद्रपूर बसस्थानक ऊड्डाणपुल परिसरात
मोठा ब्यानरच लावलेला दिसतो आहे.आज परियंत येथे शहरातील कोचिंग क्लासेस,आभूषण विक्री,खाजगी जहिरातीचे ब्यानर लागत होते .मात्र आज तिथे सरकार विरोधातील ब्यानर दिसत असल्याने शहरभर या काँग्रेसच्या ब्यानरबाजीची चांगलीच चर्चा सुरु आहे.

या ब्यानरवर सरकारला टोचन्या देत ठळक अक्षरात लिहिले आहे की ज्या काँग्रेस सरकारला गॅसचे भाव 396 रुपये करण्यासाठी 45 वर्ष लागली त्या तुलनेत या सरकारला भाववाढ करण्यासाठी फक्त 3 वर्ष लागली ,3 वर्षात भाजप सरकारने  रूपयाचा गॅससिलेंडर 784 रुपये केल्याबद्दल सरकारला उलटा टोमना देत महगाई कमी केल्याबद्दल व सामान्यांना अच्छे दिन दाखविल्या बद्दल अभिनंदन,आभार,आणि धन्यवाद करत आहे, असे लिहण्यात आले आहे. सरकारने समान्यांचा व गरीबांचा विचार करत भाववाढ नियंत्रित केली पाहिजे,मात्र या सरकारला कमीत कमी जनाची नाही तर मनाची लाज नाही !!!!!! अश्या आशयाचा हा ब्यानार सद्या शहरातील नागरीकांसाठी चर्चेचा विषय बनला असून ब्यानर लागलेल्या ठिकाणी शहरातील नागरीक थांबुन वाचू लागले आहे.

त्यामुळे ही कोंग्रेसची सरकार विरोधी पोस्टरबाजी चंद्रपूर शहरात क़ाय बदल घडवुन आणते.हेच बघने योग्य ठरणार आहे.
अंगणवाडी महिला संतप्त

अंगणवाडी महिला संतप्त



कोरची : मानधन वाढीच्या विषयावर अंगणवाडी महिला कर्मचाºयांचा राज्यव्यापी संप सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातही या संपाची तीव्रता अद्यापही कायम आहे. अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या समस्यांच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने भामरागड तालुका मुख्यालयी व कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान संतप्त झालेल्या अंगणवाडी महिला कर्मचाºयांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
भामरागड येथे अंगणवाडी महिला संघटनेच्या पदाधिकारी सुनंदा बावणे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मागणी न करताही आमदार, खासदारांच्या मानधनात हजारो रूपयांची वाढ केल्या जाते. त्यांचे भत्तेही वाढविल्या जातात. मात्र अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीसाठी महिलांना रस्त्यावर उतरावे लागते. हे महाराष्टÑाचे दुर्देव आहे, असे ते म्हणाले.यावेळी संध्या रापर्तीवार, उषा मेश्राम, सुनंदा उईके, ज्योती धुर्वाे, राधा मांजी, पावर्ती सिडाम आदी उपस्थित होते.
कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे वंदना टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी करूणा कावळे, वनिता सहारे, उषा शेंडे आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी शासन धोरणाचा निषेध करीत सत्ताधाºयांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या मानधनवाढीसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांना संप पुकारावा लागला. संपामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद आहे. त्यामुळे बालविकास प्रकल्प कार्यालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे, असे प्रा. दहीवडे म्हणाले.
‘अच्छे दिन’चा अभिनव पद्धतीने निषेध

‘अच्छे दिन’चा अभिनव पद्धतीने निषेध

बल्लारपूर: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची दिशाभुल केली. पेट्रोल, डिझेल, गॅस व वीज बिलात भरमसाठ वाढ करून जनतेला वेठीस धरले. शेतकºयांच्या आत्महत्या रोखू शकत नाही. भाजपचे सरकार जनघातकी धोरण राबवित असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने भाजपचे अच्छेदिन पण, जनतेचे काय? या कार्यक्रमातर्गत बल्लारपूर येथील नगरपालिका चौकात अच्छे दिनचा निषेध करण्यासाठी जनतेला गुलाब पुष्प भेट देण्यात आला. बल्लारपूर येथील कार्यक्रमात मजदूर महासभेचे महासचिव वसंत मांढरे, माजी नगरसेवक नासीरखान, नगरसेवक भाष्कर माकोडे, अ‍ॅड. पवन मेश्राम, अ‍ॅड. मेघा भाले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ टोंगे, माजी उपसभापती अनकेश्वर मेश्राम, नाना बुंदेल, रामदास वाग्दरकर, गजानन दिवसे,बाबुराव जुमनाके, महेश सदाला,जयकरणसिंह बजगोती,मयूर परसूटकर उपस्थित होते.

Tuesday, September 26, 2017

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

सावली: मानधनाबाबत असलेल्या टास्क कन्फ र्मेशन या जाचक अटीमुळे मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संगणक परिचालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सावली तालुक्यातील संगणक परिचालक २५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले. यासंदर्भात संवर्ग विकास अधिकाºयांना निवेदनही देण्यात आले.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातंर्गत कार्य करणाºया ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांना फे ब्रुवारी २०१७ पासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली. टास्क कन्फ र्मेशन म्हणजे परिचालकाला स्वत: केलेल्या संपूर्ण कामाची माहिती कंपनीला दिल्यानंतरच मानधन मंजूर होईल. मात्र सहा महिने झाले, तरी समस्या सुटली नाही. कंपनीने टास्कबाबतचे प्रशिक्षण देऊनही ंसगणक परिचालकाचे मानधन मागील सहा महिण्यांपासून देण्यात आले नाही. याबाबत संबंधीत विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कमी केलेल्या परिचालकांना कामावर घ्यावे, सामाजिक सुरक्षा द्यावे, संग्राम प्रकल्पामध्ये सर्व स्तरावरील संगणक परिचालकांना सामावून घ्यावे, टास्क कन्फ र्मेशन अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संगणक परिचालक संघटनेतर्फे सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व संगणक परिचालक सहभागी झाले आहेत.
साखरेच्या दरात वाढ

साखरेच्या दरात वाढ


गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

पेट्रोल, डिझेल, गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली.

साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय गोरगरीब जनतेवर घाला घालणारा असून गरीब कुटुंब चिंतेत आहे. शासनाने हा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहे.
केंद्र सरकारकडून बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना स्वस्त दरात साखर वितरित करण्यासाठी अनुदान मिळत होते. परंतु केंद्राने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान दिले जाईल, असे राज्य सरकारला कळविले. केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने त्याचा बीपीएल कुटुंबांना फटका बसला आहे. रास्तभाव दुकानांतून त्यांना आता साखर मिळणार नाही.
अंत्योदय योजनेतील कुटुंबांची साखरही महागली आहे. त्यांना आता प्रतिकिलो १५ रुपयांऐवजी २० रुपये मोजावे लागणार आहेत. खुल्या बाजारात सध्या साखरेचे भाव ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबांना २० रुपये दराने साखर खरेदी करणे परवडणारे नाही. दुसरे असे की, पूर्वी दरमहा मानशी ५०० ग्रॅम साखर मिळत होती. त्यातही कपात करण्यात आली आहे.
आता एका कुटुंबाला एका महिन्याला फक्त एक किलो साखर दिली जाणार आहे. म्हणजे पूर्वी एका महिन्याला एका कुटुंबाला किमान दोन ते अडीच किलो साखर उपलब्ध व्हायची, ती आता फक्त एकच किलो मिळणार आहे. दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणाच्या तोंडावरच गरिबांची साखर बंद करण्याचा व दर वाढविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय गोरगरीब जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने हा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून जोर धरीत आहे

केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने राज्यातील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना रास्तभाव दुकानांतून मिळणारी साखर बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता फक्त अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार आहे. मात्र त्याचाही दर पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे.
नवमतदार नोंदणीमध्ये राज्यात भंडारा उत्कृष्ट

नवमतदार नोंदणीमध्ये राज्यात भंडारा उत्कृष्ट

भंडारा : ५ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात तीनही विधानसभा मतदारसंघात २०, ७१५ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. १६,२६० मतदार विविध कारणाने वगळण्यात आले असून यात ११ हजार ४६४ मृत मतदारांचा समावेश आहे. या विशेष कार्यक्रमानंतर जिल्ह्यात ९ लाख ९८ हजार ९४ इतकी मतदार संख्या झाली आहे. नवमतदार नोंदणीमध्ये राज्यात ज्या जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केलेले आहे त्यात भंडारा जिल्ह्याचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
१ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम त्यांनी यावेळी जाहीर केला. ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध मतदार यादीनुसार तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा मतदार संघातील १९९० मतदान केंद्रात एकूण ९ लाख ३९ हजार ६३९ मतदार होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ही संख्या ९ लाख ९८ हजार ९४ मतदार इतकी झाली. यात वाढलेले मतदार २० हजार ७१५ व वगळलेले मतदार १६ हजार २६० यांचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या विधानसभा मतदारसंघात १ जानेवारीला आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्राप्त झालेला असून कार्यक्रमाचे वेळापत्रक याप्रमाणे आहे.
३ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, ३ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत मतदार यादीमधील संबंधित भागाचे, सेक्शनचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्लूए सोबत बैठक आणि नावाची खातरजमा करणे, ८ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबरपर्यंत विशेष मोहिम, ५ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे व ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.
१ जानेवारी २०१८ रोजी ज्यांचे वय १८ वर्षांचे आहे अशा व्यक्तींनी नमुना ६, मतदार यादी नाव नोंदणीकरिता नमुना ७, मतदार यादीतील नाव वगळणीसाठी नमुना ८, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्तीसाठी व नमुना ८ अ विधानसभा मतदार संघात पत्ता बदलासाठी तहसील कार्यालयात असलेल्या मतदार मदत केंद्रावर असलेल्या बिएलओकडे आवश्यक दस्ताऐवजा सह भरून द्यावा. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बुथ लेवल एजंट नेमावेत. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रमाचा फलक त्यांचे कार्यालयासमोर लावावा व या कार्यक्रमास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.
  पेट्रोल, गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

पेट्रोल, गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

नागपूर - गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली.शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन केले. दरवाढीसाठी केंद्र सरकारचा निषेध करणारे, तसेच कर लादून राज्य सरकारने केलेली वाढ या विरोधात पो
स्टर्स झळकविण्यात आले.  महाराष्ट्रात विविध प्रकारचे कर आकारले जात आहेत. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत इंधनाच्या दरात ११ रुपयांनी वाढ झालेली आहे. राज्य सरकारने लावलेले कर परत घ्यावे, अशी मागणी  विकास ठाकरे यांनी केली.
एक आॅक्टोबरला बल्लारपुरात अंनिसचे शिबीर

एक आॅक्टोबरला बल्लारपुरात अंनिसचे शिबीर

बल्लारपूर - अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती तालुका शाखा बल्लारपूर च्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्शण शिबीर येत्या 1 आॅक्टोबर (रविवार)ला येथील मारोतराव हजारे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
शिबीराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता बल्लारपूरच्या माजी नगराध्यक्शा तथा जेश्ठ सामाजसेवीका डाॅ. रजनीताई हजारे यांचे हस्ते होत असुन प्रमुख अतीथी म्हणून पोलीस निरीक्शक प्रदिप शिरस्कर तर अध्यक्शस्थानी अ.भा.अंनिसचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्श प्रदिप अडकिने यांची उपस्थिती राहणार आहे.
सकाळी 10 वाजता सुरू होणाÚया या शिबीरात जादूटोना विरोधी कायदा, बुवाबाजी, चमत्कार, भूत-भानामती, देवी अंगात येणे, अघोरी प्रथा, तंत्र-मंत्र, करणी तसेच चमत्कार, भंडाफोड प्रात्यक्शिके इत्यादी विशयावर अ.भा.अंनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंके, विदर्भ संघटक तथा चंद्रपूर-गडचिरोली संपर्क प्रमुख हरिभाऊ पाथोडे, राज्य युवा संघटक पंकज वंजारे, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे मार्गदर्शन करणार आहेत.
जनमानसात वैज्ञानिक दृश्टीकोन रूजवून आनंददायी, मानूसकीपूर्ण व विवेकी समाज निर्माण करण्याचे सोबतच प्रभावी व्यक्तीमत्व विकासासची संधी उपलब्ध असलेल्या या महत्वपूर्ण शिबीरात नागरीकांनी विशेशताह महिला आणि विद्यार्थी-युवा वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्रमिक एल्गारचा आज मूल येथे आदिवासी शेतकरी मोर्चा

श्रमिक एल्गारचा आज मूल येथे आदिवासी शेतकरी मोर्चा

सावली-  तालुक्यातील मेटेगांव तलावाचे काम शासनाने बंद केल्यांने आणि सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यांने मेटेगांव, चक मानकापूर, मानकापूर या गावातील कोणत्याही शेतक-यांना रोवणे करता आले नाही त्यामुळे या शेतक-यांना भरपायी द्यावी व मेटेगांव तलाव दुरूस्तीचे काम तातडीने करावे या मागणीसाठी आज श्रमिक एल्गारच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यांत येणार आहे.
श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी या मोर्चाचे नेतृत्व करणार असून मोर्चात तीनही गावचे शेतकरी राहणार आहेत.
मेटेगांव, मानकापूर व चक मानकापूर हे तीनही गाव आदिवासी गाव आहेत. या गावाला सिंचनाची सुविधा नाही. मात्र मेटेगांवला मोठा माजी मालगुजारी तलाव आहे. हा तलाव नादुरूस्त असल्यांने, या तलावाची दुरूस्ती झाल्यास शेकडो शेतक-यांच्या शेतीला सिंचन सुविधा होवू शकते. सहा महिण्यापूर्वी शासनाने मगांग्राहयोतून तलावाचे दुरूस्तीचे काम सुरू केले मात्र कोणत्याही ठोक कारणाशिवाय काम बंद केले. यावर्षी पावसाचे पाणी कमी झाल्यांने, या परिसरातील एकाही शेतक-यांने रोवणे रोवले नाही. परिणामी गावातील आदिवासी शेतकरी स्थलांतरीत होण्यांच्या मार्गावर आहे. एकाही शेतक-यांना रोवणे करता न आल्यांने, या शेतक-यांना शासनाने भरपायी द्यावी व तसेच मेटेगांव तलावाची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी घेवून मूल येथील उपविभागीय कार्यालयावर दुपारी 12 वाजता मोर्चा नेण्यात येणार आहे.

शेतकरी वाघाचा हल्ल्यात गंभीर जखमी

शेतकरी वाघाचा हल्ल्यात गंभीर जखमी


प्रतिनिधी /वर्धा
कारंजा घा - तालुक्यातील मेठ हिराजी येथील शेतकरी मनोहर कुळमते वय 50 हा शेतकरी बैल घेऊन शेतात जात असताना मागून वाघाने हल्ला केला यात 15 ते वीस मिनिट शेतकरी वाघासोबत झुंज केली त्यानंतर वाघावर बैल धावल्याने वाघाने पळ काढला यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती केले असून नागपूर येथे हलविण्यात येणार आहे तातडीने कारंजा वनविभाग कर्मचारी घटनास्थळ वर दाखल झाले आहे. 
राजकीय-सामाजिक महिला पदाधिका-यास अटक

राजकीय-सामाजिक महिला पदाधिका-यास अटक


चंद्रपूर - येथील एका जोडप्यांना त्यांचा वाद मिटवून देण्या साठी खंडणी मागितल्याप्रकरणी शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली.
शहरातील एका जोडप्याचे एकमेकांसोबत पटत नव्हते. त्यांचा हा वाद महिला तक्रार निवारण केंद्राकडे समुपदेशनासाठी दाखल झाला होता. त्यात या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिला पदाधिकार्‍यांनी जोडप्यांना संपर्क साधून वाद मिटविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील अशी बतावणी केली आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली. यासंदर्भात पीडित जोडप्यांनी महिला तक्रार निवारणकडे विचारणा केली. तेव्हा पोलिसांनी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या मदतीने सापळा रचून खंडणी मागणा-या या महिलेस अटक केली. अटकेतील ही महिला आंबेडकरी चळवळीतील मोठ्या दिवंगत नेत्याची नातलग असल्याची माहिती आहे. 
२७ सप्टेंबरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन

२७ सप्टेंबरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असून येत्या २७ सप्टेंबरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळा होईल. याबाबत सोमवारी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे राहतील.
पत्रपरिषदेला स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, अ‍ॅड. आनंद फुलझेले, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार उपस्थित होते.
उद्या महिला परिषद
दीक्षाभूीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याची सुरुवात बुधवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महिला परिषदेद्वारे होणार आहे. २८ तारखेला सायंकाळी ६ वाजता ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे नाटक सादर करण्यात येईल. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. विलास गजघाटे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने पंचशील झेंड्याला मानवंदना दिली जाईल. त्याच दिवशी सायंकाळी धम्मपरिषद होईल. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी राहतील.
गुरुवारपासून धम्मदीक्षा
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. त्यात दरवर्षी हजारो लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. यंदाही २८ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपासून धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू होईल. ३० तारखेपर्यंत तो चालेल.
मुख्य समारंभाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण
३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाचे थेट प्रसारण दूरदर्शनसह लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया आणि यूसीएन या नागपुरातील वाहिन्यांवरून होणार आहे.

दीक्षाभूमी येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी संपूर्ण भारतातून येणाºया लाखो बौद्ध अनुयायांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, तसेच संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा होईल. या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच दीक्षाभूमी परिसरातील चारही बाजूंनी विशेष फूड झोन तयार करावे, त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच अन्नाची नासाडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्न व औषध प्रशासनाने अन्नाची तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या.
दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त आयोजनाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला, त्यावेळी अधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, माजी मंत्री नितीन राऊत, स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, प्रवीणसिंह परदेशी, स्मार्तना पाटील, महानगरपालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे आदी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी येथे दिनांक २८ ते ३१ सप्टेंबरपर्यंत महानगर पालिकेने अस्थायी शौचालय, स्नानगृह, पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरते नळ, चौवीस तास स्वच्छता, संपूर्ण परिसरात विजेची व्यवस्था, अंबाझरी घाट येथे लाईफगार्ड नियुक्त करावे, तसेच येथे पुरेशी विद्युत व्यवस्था करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध विभागांकडे जबाबदाºया सोपविल्या असून त्यानुसार विभाग प्रमुखांनी दिलेली कामे तात्काळ पूर्ण करावी, संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध सोईसुविधांबाबत यावेळी माहिती दिली.
नियंत्रण कक्ष
दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून, या नियंत्रण कक्षात सर्व विभागाचे अधिकारी यांची नियुक्त करण्यात येत आहे. या नियंत्रण कक्षात नियुक्त केलेल्या अधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक व नावे कळवावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. पावसाचा व्यत्यय आल्यास अनुयायांसाठी सभोवतालच्या शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्यवस्था करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
२२० नळ, १० टँकर
महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी २२० अस्थायी नळ, १० टँकर, तात्पुरते शौचालय तसेच मोबाईल शौचालय, स्नानगृह, २३५ फ्लड लाईट तसेच तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी सांगितले.
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस ३५० बसफेºया
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेससाठी ३५० बस फेºया करण्यात येणार आहेत. तसेच मोरभवन व इतर ठिकाणावरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या भागात बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात राहतात तेथून दीक्षाभूमीसाठी विशेष बसव्यवस्था करावी, असेही बैठकीत ठरले.
माता कचेरी येथे सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था
दीक्षाभूमीवर येणाºया बौद्ध-आंबेडकरी अनुयायांना आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली जाते. आरोग्य विभागातर्फे यंदाही माताकचेरी येथे सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
१२०० पोलीस तैनात
सुरक्षेच्या दृष्टीने दीक्षाभूमी परिसरात १२०० पोलीस तैनात राहणार असून २४ तास या संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून वाहतूक व्यवस्था, बाहेरून येणाºया बसेस व जीप थांबण्यासाठी पार्किंग झोन तयार करावे तसेच दीक्षाभूमी परिसर व दीक्षाभूमीच्या बाहेरील संपूर्ण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
‘पेंच’मधून मिळणार सिंचनासाठी पाणी

‘पेंच’मधून मिळणार सिंचनासाठी पाणी


नागपूर : पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागपूर शहरासाठी पाणी पुरवठ्याची तरतूद केल्यानंतर खरीप हंगामातील पिकांसाठी एका पाळीचे १५० दशलक्ष घनमीटर पाणी देणे शक्य असल्यामुळे लाभक्षेत्रातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिली.
पेंच लाभक्षेत्रातील प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाºयांसोबत जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी समन्वय साधून एक पाळी पाणी सोडण्याचा कालावधी व तारीख निश्चित करावी. त्याप्रमाणे पिकांसाठी पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या. जिल्हा पाणी नियोजन समितीने लाभ क्षेत्रातील पिकांना एक पाळी पाणी देण्याचा निर्णय घेतला असून प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा मर्यादित असल्यामुळे शेतकºयांनी पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे व पाण्याचा अपव्यव टाळावा.
पाणी हे राष्ट्रीय संपत्ती असल्याची जाणीव ठेवून सिंचन शांततेत पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्येजून ते आॅगस्टपर्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे तसेच मध्य प्रदेशात चौराई सिंचन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे या प्रकल्पात अत्यल्प जलसाठा झाला आहे. त्यामुळे नागपूर शहरास पिण्याचे तसेच लाभक्षेत्रातील सिंचनाचे पाणी देण्यासाठी शाश्वत जलसाठा उपलब्ध न झाल्याने पेंचच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमान समाधानकारक झाल्यामुळे एक पाळीसाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

Monday, September 25, 2017

SBI ग्राहकांना खुशखबर..

SBI ग्राहकांना खुशखबर..


प्रतिनिधी:
भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना खात्यावर ठेवाव्या लागणाऱ्या शिल्लक रकमेची अट कमी करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या ग्राहकंसाठी सुट देखील दिली आहे.5 हजार ऐवजी कमीत कमी 3 हजार रुपये ग्राहकांना आपल्या खात्यावर ठेवावे लागणार आहे.मेट्रो आणि अर्बन शहरांना आता एकाच नियमात ठेवण्यात आले आहे.तसेच किमान शिल्लक रक्कम शुल्कातही 20 ते 50 टक्के कपात करण्यात आली आहे.मिनिमम बॅलेन्स चार्जही 20 ते 50 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.निमशहरी आणि ग्रामीण भागात तो 20 ते 40 रुपयांदरम्यान असेल.तर मेट्रो आणि अर्बन सिटीमध्ये तो 30 ते 50 रुपयांदरम्यान असेल.

बॅंक आता अल्पवयीन मुले,पेन्शनधारक आणि अनुदानासाठी खाते उघडणाऱ्यांकडूनही किमान शिल्लक रकमेसाठी दंड वसूल करणार नाही.एसबीआयने याचा 5 कोटी ग्राहकांना फायदा होईल असे म्हटले आहे.
तसेच खाते कन्वर्ट केल्यावर कोणत्याच प्रकारचे चार्ज लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हा नियम ऑक्टोबर महिन्यापासून लागू होईल. बॅंकेच्या नव्या नियमांचा फटका गरिबांना बसत असल्याने त्यावर विविध स्तरावरुन टीका होत होती. त्या नंतर हा निर्णय घेण्यात आला.
–  २०१९ पर्यंत घरोघरी २४ तास वीज देणार

– २०१९ पर्यंत घरोघरी २४ तास वीज देणार

 
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी ‘सौभाग्य’ योजना राष्ट्राला अर्पण केली. अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश असलेली ही योजनाही देशभरातील महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच सादर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिले जाणार असून, यात पाच एलईडी बल्ब, पंखा आणि सौर ऊर्जेचा संच दिला जाणार आहे.
जनगणनेच्या आधारावर ही सुविधा दिली जाणार आहे. १६,३२० कोटी रुपयांची ही योजना असून, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि ओडिशा या राज्यातील सर्वसामान्य जनतेला सौभाग्य योजनेचा मोठा फायदा होणार आहे.ओएनजीसीच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी ही योजना घोषित केली. पंतप्रधान मोदी गरीब जनतेसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सकाळीच दिली होती.
विशेष म्हणजे, या योजनेला पं. दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात वीज देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेचा फायदा होणार आहे.स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही कोट्यवधी लोकांच्या घरात अद्यापही वीज उपलब्ध झालेली नाही. थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लावून १२५ वर्षे लोटली, मात्र भारतात आजही अनेकांच्या घरात बल्बचा प्रकाश दिसत नाही. त्यांच्या घरात मेणबत्ती आणि कंदिलाचाच उजेड दिसतो. याचा परिणाम घरातील महिलांवर होत आहे. या योजनेद्वारे सरकार लोकांच्या घरी येऊन वीज कनेक्शन देणार आहे. वीज कनेक्शनसाठी गरिबांना आता सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाही. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. गरिबांच्या सौभाग्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आर्थिक जनगणना आधार
२०११ च्या आर्थिक जनगणनेत ज्यांचे नाव आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. ज्यांचे नाव या योजनेत नाही, त्यांना ५०० रुपये भरुन योजनेचा फायदा घेता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या भारताच्या निर्मितीचा आमचा संकल्प आहे आणि या नवभारतात प्रत्येक घरात केवळ वीजच पोहोचणार नाही, तर वीज कनेक्शनही उपलब्ध करण्यात येणार आहे. कारण, आता आपण वीज संकटापासून वीज निर्मितीकडे निघालो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
सूचना विचार होईल
वेबसाईट आणि ऍपच्या माध्यमांतून यासंदर्भात येणार्‍या सूचनांचा आपले सरकार विचार करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी चार टप्प्यांवर काम केले जाणार आहे. विजेवर चालणार्‍या शेगड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ओएनजीसीने पुढाकार घ्यावा, तसेच अशा प्रकारच्या शेगड्यांसाठी ओएनजीसीने तरुणांना संशोधनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.३१ मार्च २०१९ पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याबाबतही योजनेत तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
हिंगणघाट फेस्टिवल थाटात

हिंगणघाट फेस्टिवल थाटात

प्रतिनिधी /हिंगणघाट -  नवरात्रीच्या पावनपर्वावर मनसे चे वर्धा जिल्हाअध्यक्ष असलेल्या अतुल वांदिले यांच्या आधार प्रतिष्ठाण तर्फे पुणे फेस्टिवल च्या धर्तीवर हिंगणघाट येथे भव्यदिव्य असा महाराणी कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे काल या ठिकाणी सुप्रसिद्ध सिने व टी व्ही कलावंत डॉ निशिगंधा वाड यांनी हजेरी लावली उत्स्फूर्त गर्दी लाभलेल्या या कार्यक्रमात निशिगंधा वाड यांचे सोबत मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, सभापती संध्या उमाठे,डॉ खेतल, तसेच मनसे चे अजय हेडाऊ राहुल वाढोनकर, शुभम दांडेकर, नागपूर च्या मनीषा पापडकर, संगीता सोनटक्के, श्याम पुनियानी, विक्की कोरडे व अन्य उपस्थित होते.
राजकारणाचा नैतिकतेशी संबंध ?

राजकारणाचा नैतिकतेशी संबंध ?

     'सत्ता ही अशी क्षमता आहे की ज्याद्वारे इतरांवर आपली इच्छा लादणे आणि आज्ञापालन न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करता येते' ही शोरजन बर्गन यांची सत्तेची व्याख्या विद्यमान भाजप सरकारच्या सत्तेला तंतोतंत लागू पडते. 'भारताचे'(?) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातील राजकारणाचे मेरू मणी श्री शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची विचारणा केली आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन शुवसेनेचे खासदार व सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हंटले आहे, हे शिवसेनेचे इंद्रिय भ्रम आहे की चित्त भ्रम? हा बुद्धिजीवींना पडलेला प्रश्न आहे कारण यात तथ्य के ते मोदी, पवार आणि राऊतांनाच माहीत. शिवसेनेचे म्हणजे त्या लहापणीच्या 'लांडगा आलरे लांडगा आला' गोष्टीप्रमाणे होऊ नये म्हणजे झालं, जेंव्हा पासून केंद्रात आणि राज्यात भाजप ची सत्ता आली आहे तेंव्हा पासून शिवसेना वेळोवेळी सांगत आहे, "भाजप आणि राष्ट्रवादी मिळालेरे मिळाले " पण अद्याप पर्यंत तर असे 'उघडपणे'(?) काही झालेच नाही, आणि आगामी काळात जर आसे झालेच तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर चालणाऱ्या शिवसेनेचे काय होईल हे चांगल्या प्रकारे आपल्याला व शिवसेनेलाही माहीत आहे. म्हणून हे आशा प्रकारचे भ्रम शिवसेनेला होत असतील कारण शरद पवार व सुप्रिया सुळे मात्र या वर काहीही बोलत नाहीत.
                        त्यापेक्षा उलट स्थिती ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीची घोषणा केली जाते यातून तर राऊत साहेब म्हणतात हे तथ्य असेल तर भाजपच्या केंद्रीय व राज्याच्या नेतृत्वात मत भेद आहेत म्हणायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायला भाजप च्या राज्यातील काही नेत्यांनी टाळले आहे कारण त्यांनी निवडणूकच राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस वर भ्रष्टाचाराचे स्वैर आरोप व टीका करून जिंकले आहेत आणि याना पर्याय म्हणूनच तर महाराष्ट्राने जवजवळ एकहातीच भाजपला सत्तेवर बसवले आहे. आणि जर त्यांनाच जर सत्तेत सामील करून घेतले किंवा आगामी काळात हातमिळवणी केली तर महाराष्ट्राच्या जनाधाराचा अवमानच म्हणावे लागेल. पण शिसेनेचे सत्तेत राहूनही वेळोवेळी होत असलेल्या विरोधाच्या नौटंकी ला कंटाळलेले भाजपच्या केंद्रीय सुत्रधरांची राष्ट्रवादीशी वाढत चालली जवळीक आपल्याला अवघड होऊ नये म्हणून तर भाजपातील काहींना व शिवसेनेला खपत नसेल म्हणून तर सुनील तटकरे ची चौकशी होणार हे जाहीर करून भाजपच्या केंद्रीय नेत्रत्वाला सावधानतेचा इशारा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपने केला आहे. हे सगळे युती आघाडीचे 'खेळ' पाहून अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ओरबेन यांनी लिहिलेले वाक्य आठवतो व ते खरही आहे, "Illegal aliens have always been a problem in the United States. Ask any Indian."
                            'कोणाला कशाचे तर बोडकीला केसाचे' या म्हणी प्रमाणे शिवसेनेला तर फक्त सत्तेचंच पडलेलं आहे कुठल्याही परीस्थितीत भाजप आम्हाला सोडू नये याची पूर्ण काळजी सेना नेतृत्व मागच्या काही वर्षांपासून घेत आलेलं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवेळेस जे घडले आहे ते आपल्याला सर्वांना माहीत आहे तरी सेना भाजपलाच चिटकून आहे , भाजपच्या प्रत्येक उपक्रमाचा विरोध करणार, त्यांच्या नेत्यांवर टीका करणार, त्यांच्याच विरोधातील आंदोलनात सहभागी होणार, तरीही भाजपलाच चिटकून राहणार हे केवळ सत्तेपायी नाही तर काय? आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजीली आहे ती म्हणजे मोठमोठ्या नेत्यांच्या पक्षांतराने, काही नेते असे आहेत की ज्यांना सत्तेचं पांघरून पांघरल्याशिया झोपच येत नाही, त्या मुळे ते ज्या पक्षाची सत्ता आहे किंवा ज्यांची सत्ता येण्याची शक्यता असते त्या पक्षात सगळी नैतिकता विसरून खुशाल येण्यास तयार होतात यांच्यात सध्या अग्रेसर आहेत नारायण राणे. भाजपला ही अता सेना नकोशी झाली आहे त्यामुळे राणे सारख्या थोडेफार जनसमुदाय पाठीमागे असणाऱ्या नेत्यांची गरज आहे. करण भाजपात पूर्वीपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते खूप कमी व आयात केलेले आणि मोदी लाट पाहून पक्षांतर केलेले नेतेच जास्त आहेत. 'निष्ठावान' हे शब्द राजकीय करकीर्दीती राणे साहेबांनी किती खरा ठरविला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता नांदेड महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत मागच्या काही महिन्या पासून तेथेही बरेच विद्यमान नगरसेवक पक्षांतर करत आहेत, तेही भजपातच आणि भाजपलाही त्यांच्या शिवाय पर्याय नाही. दोन्ही काँग्रेस च्या बड्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी म्हणजे 'कोपऱ्याला गुळ लावल्यागत आहे जेणेकरून त्या इसमाला गुळ खतही येऊनये पण त्याच्या जवळ माश्या हमखास राहायला पाहिजे. या प्रमाणेच भाजप महाराष्ट्रातील जनतेसोबत वागत आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मधील बऱ्याच बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे  सदैव आरोप करणारी भाजपवासी मंडळी चौकशी का करत नाहीत उदाहरण घ्यायचे असतील तर भरपूर आहेत, जसे अजित पवार, अशोक चव्हाण, नारायण राणे, धनंजय मुंडे, सुरेश कलमाडी, सुनील तटकरे आशा किती तरी लोकांवर आरोप करत भाजप ने सत्ता मिळविली आणि आता त्यांनाच पक्षात या किंवा आम्ही म्हणतो ते मंत्रिपद घ्या म्हणत आहेत अन्यथा आम्ही चौकशी करू. हे असे सत्ते साठी राजकीय नेते व पक्ष लोकांचा 'अंध' विश्वासघात करून, फक्त संगण्यापूरतेच असलेले तत्व, विचारधारना, सिद्धांत, जाहीरनामे व आश्वासने यांचा काचेचा मनोरा पायदळी तुडवून इकडून तिकडे धावपळ करतात. हे सर्व गढूळ प्रकार पाहून इटलीचे राज्यकर्ते व तत्त्ववेत्ते निकोलो यांनी सांगितलेली ओळ अगदी खरी आहे असे वाटते ते म्हणतात, "Politics have no relation to morals."  

लेखक- शिवाजी बळीराम जाधव
            दावनगीरकर- ७५८८२१०१४३

Sunday, September 24, 2017

शाळेच्या स्टाफने केला गँगरेप, विद्यार्थिनीने मोदींना लिहिले पत्र

शाळेच्या स्टाफने केला गँगरेप, विद्यार्थिनीने मोदींना लिहिले पत्र


गोहाना (हरियाणा) : येथील एका विद्यार्थिनीने शाळेच्या स्टाफवर तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप केला आहे. याबद्दल तिने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे आणि न्याय देण्याची मागणी केली आहे. पत्रात लिहिले आहे की, ती बदनामीच्या भीतीमुळे पोलिसांत तक्रार देत नाहीये. तथापि, पत्रात तिने शाळा आणि आरोपींची नावे लिहिली आहेत.
जिंद रोडवर आहे ही शाळा असून ओम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असल्याचे सांगितले आहे. स्कूलच्या नॉन टीचिंग स्टाफचे दोन जण सुखबीर आणि कर्मवीरने तिला पोर्न व्हिडिओ दाखवून गँगरेप केला. आता सातत्याने तिला टॉर्चर करण्यात येत आहे. कधी शाळेच्या पीआरओ ऑफिसमध्ये तर कधी दुसऱ्या ठिकाणी तिची छेडछाड केली जात आहे.

एकदा तर आरोपी तिला घेऊन गोहानामधील हॉटेलमध्येही गेले. हद्द म्हणजे आरोपींनी तिला तिच्या एका वर्गमैत्रिणीला सोबत आणण्याचे सांगितले. वर्गशिक्षिकेला सांगितले, त्या म्हणाल्या- प्रिन्सिपलशी बोलते, पण काहीच कारवाई झाली नाही.आरोप असाही आहे की, पुन्हा पुन्हा विचारल्या वर्गशिक्षिका म्हणाल्या की, प्रिन्सिपल म्हणाले हे तर होतच असते.पीडितेने पत्रात लिहिले की, मी शाळा संचालकांशी बोलण्याचा विचार केला, पण वाटले काहीच फायदा होणार नाही. यानंतर तुम्हाला (पंतप्रधान) पत्र लिहीत आहे.
हे पत्र पंतप्रधानांशिवाय मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि सोनिपतच्या एसपींनाही लिहिण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांनुसार, पत्र मिळताच शनिवारी गोहानचे एसआयटी इंचार्ज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पथक शाळेत गेले. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तथापि, पोलिसांकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.हा सर्व प्रकार घडल्यानंतर प्रिंसीपल म्हणाले,हा शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहेआम्हाला पोलिस तपास व्हावा असे वाटते, यामु

Saturday, September 23, 2017

आमदाराच्या गाड़ीवर नागपुरात हल्ला

आमदाराच्या गाड़ीवर नागपुरात हल्ला


प्रतिनिधी/वाडी -
अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कारवर नागपूरमध्ये हल्ला करण्यात आला.या हल्यात त्यांच्या कारवर दगड़फेक आणि शाही फेकण्यात आली. या घटनेनंतर वाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून हल्ला कोणी केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. हल्ला झाला त्यावेळी आमदार रवी राणा कारमध्ये नव्हते.
अमरावतीमधील आमदार रवी राणा यांच्या कारवर शनिवारी हल्ला करण्यात आला. शनिवारी दुपारी रवी राणा नागपूर विमानतळावर येणार होते. त्यांना घेण्यासाठी राणा यांचा कारचालक आणि काही कार्यकर्ते कारने अमरावतीहून नागपूर विमानतळाकडे जात होते. अमरावती रोडवर वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी कार थांबवली. त्यांनी कारवर दगड फेकला आणि तिथून पळ काढला. या घटनेच्या वेळी राणा कारमध्ये नव्हते. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, रवी राणा हे भाजप समर्थक आमदार असून शुक्रवारी त्यांनी शिवसेनेविषयी महत्त्वपूर्ण विधान केले होते. शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. शिवसेनेचे २० ते २२ आमदार वर्षा बंगल्यावर भाजपत प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला होता. या घटनेत आमदार रवि राणा यांचा ड्रायव्हर थोडक्यात बचावले
महत्वाचे

महत्वाचे

  • आमदार रवी राणा यांच्या गाडीवर वाडीजवळ दगडफेक करून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न
  • यवतमाळ : तेलंगणातून अकोला येथे जाणाऱ्या गांजा तस्करीची कडी गवसली. यवतमाळ शहर पोलिसांनी पांढरकवडा बाय पास वर सापळा रचून कार घेतली ताब्यात. कारमध्ये सापडला 1 क्विंटल गांजा. चालकासह एका महिलेला अटक.
  • नागपूर : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचा मोर्चा. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पेट्रोल 80 रुपयांवर पोहोचले, हेच का अच्छे दिन, शिवसैनिकांचा सवाल.
  • पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा
चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच पोलीसात तक्रार

चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच पोलीसात तक्रार

चिमूर/प्रतिनिधी -
चिमूर एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या शासकिय आदीवासी मुलांच्या वस्तीगृहात गृहपालाच्या अनागोंदी कारभाराविषयी वस्तीगृहातील नियमीत विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्रकल्प अधिकाऱ्या कडे चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच चिमूर पोलीसात तक्रार केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला असुन यामुळे मुलांचे शैक्षणिक आयुष्य उद्धवस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे .

चिमूर येथील शासकीय आदीवासी मुलांच्या वस्तीगृहात प्रवेशा विषयी अनियमितता , गृहपालाचा पक्षपाती पणा आणी सोयी सुविधा विषयी वस्तीगृहातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी सन विद्यार्थी संघटना चिमूर यांचे कडे अर्ज केला होता.न्याय मिळवुन देण्याच्या उद्देशाने या तक्रारी वरुन सन संघटने द्वारा एकात्मीक आदीवासी प्रकल्प अधिकारी यांचे कडे या अनागोंदी कारभारा विषयी चौकशी करून गृहपालास निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. यामुळे प्रशासनाने निवेदका सोबत चर्चा न करता सरळ निवेदन देणाऱ्या विद्याथ्र्या विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याविषयी चिमूर पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आल्याने विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने मानसीक तणावात आहेत.

या वस्तीगृहात मागील सत्रात झालेल्या तांत्रीक चुकीमुळे तिन विद्यार्थी वस्तीगृहाच्या प्रवेशा पासुन वंचित राहावे लागले होते. गोरगरीब आदीवासी विद्यार्थांना आर्थीक तान  पडू नये व त्यांना वस्तीगृहात सामील करण्यात यावे अन्यथा आंदोलन करू अशी भुमीका सन विद्यार्थी संघटनेने घेतल्याने तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांनी संबधित विद्यार्थी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या तिन विद्यार्थ्यांना वस्तीगृहात राहु देण्याचे व उपलब्ध सोयी सुविधा देण्याची सुचणा गृहपालास केली होती. त्याप्रमाणे विद्यार्थी वस्तीगृहात राहत होते .  

मात्र त्या प्रकल्प अधीकाऱ्याची बदली झाली. नवीन प्रकल्प अधीकारी रुजु होवून दोन महीन्याचा कालावधी झाला तरी ते विद्यार्थी वस्तीगृहातच राहत होते. प्रकल्प अधीकाऱ्याने वस्तीगृहमध्ये प्रवेशीत असनाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दयावे बाहेरील विद्यार्थ्यांना होस्टेल मध्ये प्रवेश देवू नये अशी नोटीस काढली. होस्टेल मधील समस्ये विषयी निवेदन देताच या मुलांना बाहेर जाण्याचे फर्माण सोडण्यात आले. वस्तीगृहातील समस्या ज्या मुलांनी सामोर आनल्या अशा मुलांवर मानसीक दडपण अधीकारी गृहपाल टाकत आहे.त्यांना वस्तीगृहातुन बाहेर करण्याची धमकी देण्यात आली. त्यामूळे विद्यार्थी प्रंचड मानसीक तणावात विद्यार्थी आहेत. चिमूर येथील होस्टेल मध्ये पहील्यांदाच असा प्रका.
आणखी एका बाबाला अटक:बाबा फलहारी

आणखी एका बाबाला अटक:बाबा फलहारी


जयपुर:
राजस्थानमधील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी कौशलेंद्र प्रपन्नचारी फलाहारी महाराज यांना बलात्कार प्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राजस्थानमधील अलवर येथे फलाहारी बाबाचा आश्रम आहे. बाबाचे लाखो अनुयायी असून बाबाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप छत्तीसगडमधील एका २१ वर्षीय तरुणीने केला होता. तरुणी बाबाची भक्त होती. बाबावर निस्सीम श्रध्दा असल्याने पहिला पगार बाबाला अर्पण करण्यासाठी ती ७ ऑगस्टला त्याच्या आश्रमात गेली होती. पण बाबाने खोलीत बोलवून आपल्यावर बलात्कार केला व याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी राजस्थानमधील अलवर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले. तक्रारीची माहिती मिळताच तब्येत बरी नसल्याचे कारण सांगत हा बनेल बाबा आधीच रुग्णालयात दाखल झाला. पण बाबाची तब्येत व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र रूग्णालयाने दिल्याने शनिवारी त्याला अटक करण्यात आली.
मराठी मराठी खेळू

मराठी मराठी खेळू

चल राजकारण्या आपण
मराठी मराठी खेळू

स्वार्थापायी मराठीला नग्न तुम्ही केलं
सत्तेपायी मराठीला भग्न तुम्ही केलं
भावनेचा खेळ हा भावनेशी खेळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

हिंदी माझी माय आणि मराठी माझी मावशी
ना घर कि ना घाट कि मावशी आजच्या दिवशी
देशोधडी लावू तिला अशी हळूहळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

परप्रांतीयांचा येथे वाहतो सुसाट वारा
माय माउली मराठीला नाही येथे थारा
मुकेपणी मराठीचे आसू लगे गळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी अस्मितेचा भगवा हा रंग
राजकारणात मग झाला की हो दंग
पाठीमागे मराठीची पाठ लागे पोळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी नेत्यांचा हा जुनाच आजार
मराठी मतांचा मराठी बाजार
राजकारणाचा धागा लोका लागे कळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

राजकारणात जसा शिरकाव झाला
मराठीचा नवा सुरु लपंडाव झाला
त्यांचा झाला खेळ आणि देश लागे जळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी जपून मनी अरमान करू
मराठीच ही नव निर्माण करू
मराठीचा गड आता लागलाय ढळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू



                                    भिमराव तांबे
                              आदर्शगाव दानोळी,कोल्हापूर
                             📱 8691918025
निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

प्रतिनिधी/नांदेड :- सोशियल मीडिया वरून साहित्य क्षेत्रात जनप्रसिद्धि मिळविलेल्या साहित्य स्पंदन,कुही या साहित्याकांच्या व्हाट्स अँप ग्रुपने गेल्या काही वर्षांपासून साहित्य क्षेत्रातील विविध स्पर्धेचे आयोजन करत आलेत,तसेच जगतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिना निमित्त ,"ऐसें कैसे झाले भोंधु",या विषयांवर लेखमाला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतें, तर नुकतेच प्रसिद्धी पत्राद्वारे निकाल जाहीर करण्यात आला.
जागतिक अंधश्रध्दा निर्मूलन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऐसे कैसे झाले भोंदू याविषयावरील निबंध स्पर्धेचा निकाल नुकतेच जाहिर करण्यात आले ,या स्पर्धेत महाराष्ट्र भरतील अनेक नामवंत लेखकांनी सहभाग नोंदवला होता. ज्यात नागपुरच्या अंकुश शिंगाडे यांच्या निबंधास सर्वोत्कृष्ट तर स्नेहलता कुलथे यांचे निबंध उत्कृष्ट ठरले. सदरील निबंध स्पर्धेत स्तंभलेखक नागोराव सा.येवतीकर यांच्या निबंधास प्रथम तर अनिल चांडक, हनुमंत सोपान, मनिषा क्षिरसागर यांच्या निबंधास अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले असल्याचे साहित्य स्पंदन समुहाचे मुख्य संचालिका प्रा. वैशाली देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. सर्व विजेत्या साहित्यकांना ग्राफिक्सकार संतोष शेळके यांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या विजयी प्रमाणपत्र ऑनलाइन देऊन गौरविण्यात आले. सदरील स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी समूह संयोजिका वृषाली वानखेडे, सहसंयोक कवी अनिल रेड्डी आणि कवी निखिल खराबे यांनी अथक परिश्रम घेतले.