चंद्रपूर-ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवनाला शुक्रवारी ६२ वर्षे पूर्ण होत आहेत .बाबांनी उभ्या केलेल्या या सामा जिक संस्थेचीजबाबदारी आता आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीकडेआहे . त्यामुळे आनंदवन आता केवळ आश्रम नव्हेतर श्रमतीर्थ ठरत आहे . महारोगी सेवा समितीची स्थापना झाल्यानंतर राज्यसरकारने वरोराजवळील ५० एकर जागा आनंदवनआश्रमासाठी दिली . दत्तपूरच्या कुष्ठधामातूनकुष्ठरोगांच्या सेवेच्या कार्याला सुरुवात झाली .साधनाताई आमटे , डॉ . विकास आमटे , डॉ .प्रकाश यांच्यासह बाबांनी या कामाला सुरुवात केली .२१ जून १९५१ रोजी आचार्य विनोबा भावे तेलंगणाकडेभूदान पदयात्रेसाठी रवाना झालेत . त्याआधीआनंदवनाचे उद्घाटन आचार्यांच्या हस्ते पार पडले . पूर्वी काटेरी वनात असलेली ही संस्था आताकुष्ठरूग्णांसाठी कार्य करणारे वटवृक्ष ठरली आहे . बाबा आमटे यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळत असते . बाबांनी श्रमगीताच लिहिली आणिप्रत्यक्षात कृतीत आणली . आनंदवनसाठी कार्य करतानाचा अनुभव वेगळाच होता , असे ज्येष्ठकार्यकर्ते तथा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी ' मटा ' शी बोलताना सांगितले ....