मुंबई, दि. ३०- उच्चशिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल बुधवारी सकाळी जाहीर झाला. यंदा राज्यातून ७२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. तर कोकण...
राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७९.९५ टक्के उत्तीर्ण । निकालात मुलींची बाजी । ८४.६ टक्के मुली उत्तीर्ण । ८५.८८ टक्के निकाल देणारा कोकण विभाग राज्यात अव्वल ।६ जूनला मिळणार गुणपत्रिका...
पुणे - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा संप, उशिरा सुरू झालेले उत्तरपत्रिका तपासणीचे काम, अशी आव्हाने पेलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल...
चंद्रपूर दि.२८ (प्रतिनिधी):क्षुल्लक वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एका मित्राने दुसèया मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णनगर येथे मंगळवार,...
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली, ताडोबा व कोळसा या तिन्ही
परिक्षेत्रातील १५२ पाणस्थळावर २५ व २६ मे रोजी प्राणिगणना करण्यात आली. वनविभागाचे
अधिकारी, कर्मचारी आणि १५९ वन्यप्रेमी...
चंद्रपूर - जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका खुनाच्या कैद्यावर दुस-या एका कैद्याने दाढी करण्याच्या धारदार वस्त-याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. जखमी स्थितीत या कैद्याला...
रायपूर - कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी शनिवारी (ता. 25) सायंकाळी केलेल्या हल्ल्यानंतर अपहरण करण्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह आज (रविवार)...
चंद्रपूर- आदर्श व्यसनमुक्त, सुसंस्कृत समाज
घडविण्याच्या उद्देषातून सुरू करण्यात आलेल्या समाजसुधारक न्यासतर्फे देशभरात
अभिनव उपक्रम सुरू आहे. याच उपक्रमातून माननीय नितीन पोहाणे यांच्या
वाढदिवासानिमीत्य...
चंद्रपूर- ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रात वन्यप्राणी प्रगणना केली जाणार आहे . यासाठी वनविभागाचे सुमारे २५० अधिकारी - कर्मचारी या कामासाठी गुंतले असून...
चंद्रपूर- बुधवारपर्यंत विदर्भाला घट्ट पकडून असलेला उष्णतेच्या लाटेचा विळखा आता हळूहळू सैल होत आहे . गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही पाऱ्यात हलकी घसरण झाली . नागपूरपेक्षाही विक्रमी उच्चांक नोंदविणारा चंद्रपूरचा...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.