সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, July 21, 2010

पेरणी आटोपली, रोवणी सुरू

Sunday, July 18, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: rain, chandrapur, vidarbha


चंद्रपूर - जून-जुलैच्या महिनाभरात जिल्ह्याच्या सर्व भागातील पेरणीची कामे आटोपण्याच्या मार्गावर असून, भातपट्ट्यात रोवणीला वेग आला आहे. मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आणि चिमूर या तालुक्‍यात भाताच्या रोवणीला सुरवात झाली आहेत.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनने हजेरी लावल्यानंतर भात, कापूस, सोयाबीनची पेरणी सुरू झाली. भातपट्ट्यात चांगला पाऊस असल्याने शेतकरी समाधानी आहे. या पावसात तलाव, जलाशये भरली नसली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला. जून-जुलै महिन्यात 404.1 मिमी पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात 94.2 टक्के पाऊस झाला. जूनअखेरपर्यंत 142.4 मिमी पाऊस झाल्याने निम्म्यापेक्षा जास्त पेरणीची कामे आटोपली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 17 जुलैपर्यंत 238.3 मिमी इतका पाऊस झाला असून, दोन्ही महिन्यांत 380.7 मिमी पाऊस झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस असल्याने पेरणी आणि रोवणी वेळेत सुरू झाली आहे. सुरवातीला वरोरा तालुक्‍यातील अंजनगाव, महालगाव, खांबाडा येथे उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने रजा घेतल्याने रोवणी जोरात आहे. मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आणि चिमूर या तालुक्‍यात भाताची रोवणी सुरू आहे. मूल तालुक्‍यात भात रोवणीचे क्षेत्र 14 हजार 500 हेक्‍टर असून, यंदा 18 हजार 200 हेक्‍टरवर लागवड होण्याची अपेक्षा आहे. सद्य:स्थितीत एक हजार 638 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. भात पऱ्ह्याचे क्षेत्र एक हजार 450 हेक्‍टर असून, एक हजार 15 हेक्‍टरवर पेरणी करण्यात आली. सोयाबीन पेरणी दोन हजार 110 हेक्‍टरवर असून, 20 हेक्‍टरवर कापूस आहे. याशिवाय 16 हेक्‍टरवर मका, 280 हेक्‍टरवर तूर, 40 हेक्‍टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. मूल तालुक्‍यात एकूण 15 हजार 500 हेक्‍टर आर सरासरी क्षेत्र पिकाचे असून, यंदा 22 हजार 585 अपेक्षित क्षेत्रापैकी आतापर्यंत चार हजार 143 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.
चिमूर तालुक्‍यात एक हजार 250 हेक्‍टरवर कापसाची पेरणी झाली. भाताच्या 30 हजार 300 हेक्‍टरपैकी 10 हजार 300 हेक्‍टरवर रोवणी सुरू आहे. 25 हजार 440 हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी आहे. भिसी परिसरात भाताची रोवणी जोरात सुरू असून, मजुरांचे दर 120 रुपये प्रतिदिन आहे. मागील सहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना रोवणी करण्यास सोयीचे ठरले आहे.
सिंदेवाही तालुक्‍यात पाऊस कमी झाल्याने तलाव अद्यापही कोरडेच आहेत. पेरणीची कामे पूर्णत: आटोपली. मात्र, पाण्याअभावी रोवणी थांबली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.