সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 01, 2010

17 कोटी 81 लाखांचा पीकविमा

सकाळ वृत्तसेवा

Tuesday, June 29, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: governance, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - दुष्काळ आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत अर्थसाहाय्य मिळावे म्हणून गत खरीप हंगामात जिल्ह्यातील 27 हजार 409 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून पीकविमा काढला. त्यानुसार 17 कोटी 80 लाख 94 हजारांची रक्कम प्राप्त झाली, ती जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, 

गेल्या काही वर्षांपासून विमा कंपन्यांकडून पीकविमा काढला जात आहे. यात राज्य शासनाचाही सहभाग असतो. गेल्या वर्षी खरिपातील पावसाचे प्रमाण 55 टक्‍क्‍यांनी घटल्याने दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली. तब्बल 1 हजार 400 गावांची आणेवारी 50 पैशांपैकी कमी झाली. सोयाबीन आणि धानाच्या उत्पादनात 40 ते 55 टक्के घट झाली. मागील वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 27 हजार 409 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून पीकविमा काढला होता. यात सोयाबीनउत्पादक शेतकरी 4 हजार 922 असून, त्यांना 3 कोटी 88 लाख 50 हजार 842 रुपये; तर 22 हजार 487 भात उत्पादक शेतकऱ्यांना 13 कोटी 92 लाख 44 हजार 558 रुपयांची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम येत्या जूनअखेर बॅंकेला प्राप्त होईल. त्यानंतर महिन्याभराच्या आत ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.