সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 01, 2010

चंद्रपूरच्या आनंदने मिळविली अमेरिकेत 'हिऱ्याची अंगठी'

Thursday, July 01, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: anand gajbhiye, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - मूळचा चंद्रपूरचा असलेला एक 24 वर्षीय विद्यार्थी अमेरिकेतील टेक्‍सास शहरातील ट्युम विद्यापीठात मास्टर इन सायन्समध्ये पहिला आला. आनंद धनराज गजभिये असे त्याचे नाव असून, त्याला विद्यापीठातर्फे 50 लाख किमतीची "हिऱ्याची अंगठी' समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसारख्या शहरातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे घेऊन घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्याने विदेशात यशोशिखर गाठणे, ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. शहरातील नगिनाबाग येथे धनराज गजभिये राहतात. त्यांचा मुलगा आनंद याने दहावीपर्यंतचे शिक्षण विद्यानिकेतन हायस्कूल येथून घेतले, तर बारावी नेहरू महाविद्यालयातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तो गुणवत्ता यादीत झळकला होता. त्यानंतर त्याने मुंबईच्या व्हीजेआयटी विद्यापीठातून बीई केले. यातही तो प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल विद्यापीठाने साडेतीन लाखांची शिष्यवृत्ती दिली. सिव्हिल इंजिनिअर पदवी घेतलेला आनंद शिक्षणात थांबला नाही. चक्क विदेशवारी करून त्याने अमेरिका गाठली. टेक्‍सास शहरातील ट्युम विद्यापीठात त्याने मास्टर इन सायन्समध्ये प्रवेश घेतला. हे विद्यापीठ जगातील नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. प्रथम वर्षी अव्वल आल्यानंतर जिद्द आणखीनच वाढली आणि यंदा तृतीय वर्षात त्याने विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला. हे यश त्याच्यासाठी उत्तुंग आहे. विद्यापीठाच्या वतीने त्याला लवकरच 50 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी देणार असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.



नकाशांची निवड

आनंदने तयार केलेली रचना आणि नकाशांची कोरिया देशात बांधण्यात येणाऱ्या एका नामांकित इमारतीसाठी निवड करण्यात आली आहे. आनंद सध्या सॅमसंग कंपनीत कार्यरत आहे.

प्रतिक्रिया

On 7/1/2010 11:58 AM swati said:

शाबास आनंद तू असच पुढे जात रहा आणि प्रगती करत रहा पण आपल्या लोकांना कधीही विसरू नको.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.