काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, July 06, 2013

वैद्यकीय महाविद्यालय लांबणीवरच

वैद्यकीय महाविद्यालय लांबणीवरच

चंद्रपूर - येत्या शैक्षणिक सत्रापासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल,या काही नेत्यांच्या घोषणा निराधार असल्याची बाब आता समोर आली आहे

शनिवार, 6 जुलै 2013 - वाचा sakal today

Thursday, July 04, 2013

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संपकरी ६४२ एनआरएचए‘ कर्मचा-यांचे सरसकट निलंबन

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संपकरी ६४२ एनआरएचए‘ कर्मचा-यांचे सरसकट निलंबन

जिल्हा परिषद प्रशासनाचा धक्कादायक निर्णय , आंदोलक संतापले
चंद्रपूरदि.०४ (प्रतिनिधी):
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संपकरी ६४२ एनआरएचए‘ कर्मचा-यांचे सरसकट निलंबन, जिल्हा परिषद प्रशासनाचा धक्कादायक निर्णय , आंदोलक संतापले आहे.
२००५ पासून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर काम करणा-या २२ हजार कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १ जुलै पासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांवर कार्यरत कंत्राटी कर्मचारी संपूर्ण राज्यात गेल्या अनेक वर्षापासून अस्थाई स्वरूपात काम करीत आहेत. राज्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावल्यास या कर्मचाèयांचे मोठे योगदान आहे. असे असतानाही या कर्मचाèयांवर शासनाकडून अन्याय केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ एनआरएचएमच्या शेकडो कर्मचèयांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले
२००५ पासून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर काम करणा-या २२ हजार कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १ जुलै पासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील संपात सहभागी होणा-या चंद्रपूर जि. प. शी संलग्न एनआरएचए‘ कर्मचा-यांवर नोकरी गमाविण्याची वेळ आली आहे.  बेमुदत संप पुकारल्यामुळे काल संध्याकाळी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी खोडे यांनी ६६२ पैकी ६४२ कर्मचा-यांना निलंबित केले आहे. या आदेशा विरोधात संतप्त कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली आणि सरकारचा निषेध केला. सरकारी सेवेत कायम करण्यात यावे, सर्व कंत्राटी कर्मचाèयांचे सेवापुस्तक तयार करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण लागू करण्यात यावे, वाढत्या महागाईमुळे मानधनात ४० टक्के वाढ करण्यात यावी, २० वैद्यकीय रजा, ३० अजिर्त रजा व वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात यावा, महिला कर्मचाèयांना ६ महिन्यांपर्यत पूर्ण पगारी प्रसृती रजा देण्यात यावी, शासकीय भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचारी वयोर्मयादा ४८ करुन भरतीत ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, आयपीएचएस व नगरपालिका क्षेत्रात काम करणाèया कंत्राटी कर्मचाèयांचे समायोजन करण्यात यावे, डाटा एन्टड्ढी आपरेटर व चालक यांचे खासगीकरण रद्द करण्यात यावे, अशा गटप्रवर्तकांना भत्ता न देता ७ हजार मासिक मानधन देण्यात यावे  आणि इतर मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राकेश नाकाडे, सचिन पोडे, राकेश बनकर, प्रकाश मोहुर्ले, चंद्रशेखर लोणारे, मेर्शाम, संगीता माहूरकर यांच्यासह शेकडोच्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते. परंतु आज  या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील ६४२ कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज जिल्हा परिषद प्रशासनाने या सर्वच संपकरी कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी खोडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद आठल्ये यांनी कर्मचा-यांचा रोष बघता जिल्हा परिषदेतून रवाना होणे पसंत केले.  राज्य सरकार व छठकच चे संपकरी कर्मचारी यांच्यात मंत्रालय स्तरावर चर्चा सुरु असताना चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाने संपकरी कर्मचारी संतप्त झाले आहेत. हा तिढा कसा सुटेल याकडे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.

 नवे जिल्हाधिकारी डा. दीपक मैसेकर

नवे जिल्हाधिकारी डा. दीपक मैसेकर

चंद्रपूर चे नवे जिल्हाधिकारी डा. दीपक मैसेकर यांची नियुक्ती… कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी पदावरून पदोन्नती  
मनसेने आणली महिला भजनमंडळी

मनसेने आणली महिला भजनमंडळी

चंद्रपूर : जिल्ह्यात कधी नव्हे आता मनसेने महिला सेनेची कार्यकारिणी गठित केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर महिलांचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एका नगरसेवकाने चक्क वॉर्डातील महिला भजन मंडळाच्या कार्यकत्र्यांना आणल्याचा प्रकार दिसून आला.
जिल्ह्यात दोन दिवस आढावा बैठक झाल्यानंतर बुधवारी जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात प्रथमच महिला सेनेच्या दोन जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार होती. मात्र, मनसेकडे महिला कार्यकत्र्याच नसल्याने पक्षश्रेष्ठींपुढे गोची होऊ नये म्हणून इंदिरानगरच्या नगरसेवकाने महिलांना आणण्याची शक्कल लढविली. दुपारी दोन वाजता कार्यक्रम असल्याचे सांगून त्यांनी वॉर्डातील सुमारे २० महिलांना ऑटोत बसवून आणले. त्या श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आल्या. यात काही तरुणींपासून वृद्धाही होत्या. आपण कशासाठी आलात, याची विचारणा केली असता, एकाही महिलेकडे उत्तर नव्हते. भजन मंडळाच्या महिला असल्याचे सांगून नगरसेवकाने आपल्याला आणल्याचे त्या सांगत होत्या. या महिलांच्या खांद्यावर मनसेचे दुपट्टे आणि हातात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याणच्या सभापतींचे व्हिजिqटग कार्ड देण्यात आले होते. एकूणच पक्षश्रेष्ठींपुढे आपले वजन आणि महिला कार्यकत्र्यांचेही पाठबळ असल्याचे दाखविण्यासाठी मनसेला भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागले, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सर्वांधिक युवकांना संधी देणारा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांनी निर्माण केलेला मनसे होय. या पक्षात स्थानिक पातळीपासून तर राज्यस्तरावरील राजकारणात तरुणांचा ओढा दिसतो. पक्षात तसे महिला संघटनेला वाव नव्हताच. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५0 टक्के आरक्षण दिल्याच्या पार्श्‍वभूमिवर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच महिला संघटनेची स्थापना केली. दरम्यान, स्थानिक पदाधिकार्‍यांनी जिल्हा संपर्क अध्यक्ष नंदू घाडीगावंकर यांना प्रभावित करण्यासाठी चक्क वृद्ध महिला पदाधिकार्‍यांचा वापर केल्याची बाब निदर्शनास आली. 
ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास संपादन करणारा वर्ग म्हणजे तरुण वर्ग होय. ठाकरे यांचा मराठी बाणा सर्वाधिक तरुण वर्गात चर्चिल्या जातो. राज्यात कुठेही भाषण असले तरी त्यांच्या भाषणाची चर्चा किमान दिवसभर रंगते. मुंबई - नाशीककडे मनसेची काय 'क्रेझ' असेल ती असो. परंतु, चंद्रपुरात या पक्षाचा कायम फज्जा उडाला आहे. मनसे जिल्हा पदाधिकार्‍यांमुळे या पक्षाचे वरिष्ठ नेते त्रस्त झाले होते. त्यामुळे दोन

दिवसांपूर्वी आ. प्रवीण दरेकर यांनी जिल्हा पदाधिकार्‍यांच्या कानपिचक्या घेतल्या आणि आंदोलने करा, पण ते वैयक्तिक लाभासाठी नको, असे खडसावून सांगितले. असे असताना आज संपर्क अध्यक्ष नंदू घाडीगावंकर यांनी नव्याने जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. 
चंद्रपूर - गडचिरोली र्शमिक पत्रकार भवनात झालेल्या घोषणेत जिल्हय़ातील महिला संघटनांची प्रतिमा वाढविण्यासाठी चक्क वृद्ध महिलांचा वापर करण्यात आला. एका ७0 वर्षिय वृद्ध महिलेला येथे कशासाठी आली गं! असे विचारले असता, ती म्हणाली, वार्डातील नगरसेवकाने चला म्हटले म्हणून वार्डातील २0 ते ३0 महिला आलोत. कशासाठी आणले हे तर आम्हाला सांगितल्या गेले नाही. पण हे कार्ड आमच्या हातात दिले., अशी माहिती देत ती वृद्ध महिल म्हणाली, बापू, या कार्डच्या आम्हाला काही फायदा आहे का? यावर उपस्थित अचंबित झाले आणि कार्ड बघू लागले. तर ते जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अमृता सूर यांचे होते. मनसेत दोन दिवसांपूर्वी महिला संघटनेची बांधणी करण्यात आल्यानंतर एकाच दिवसात इतक्या महिला कशा? असा प्रश्न सर्वांना पडू लागला. एकू ण तेथील महिलांवरून स्थानिक मनसे पदाधिकार्‍यांनी राजकारणाशी कुठलाही सबंध येत नसल्याने महिलांचाही पक्षाची प्रतिमा वाढविण्यासाठी वापर केल्याची बाब स्पष्ट झाली.
ट्रॅव्हल्स-दुचाकी अपघातात एक ठार

ट्रॅव्हल्स-दुचाकी अपघातात एक ठार


संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली
नागभीड : तालुक्यातील पांजरेपार ङ्काट्याजवळ बुधवारी (ता. ३)  सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका दुचाकीला ट्रॅव्हलसने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी आहे. या घटनेनंतर पांजरेपार येथील संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली.
मृतामध्ये संजय कृष्णा उरकुडे (वय ४८) तर जखमीचे सुनील हरिभाऊ उरकुडे (वय ३२) असे नाव आहे. ब्रह्मपुरी मार्गावरील कोरबा गावाजवळ पांजरेपार ङ्काटा आहे. या मार्गाने नागपूरहून वडसाकडे जाणारी ट्रॅव्हल्स येत होती. याच वेळी ब्रह्मपुरीहून पांजरेपारकडे येणाèया दुचाकीला ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात संजय उरकुडे हा जागीच ठार झाला. तर सुनील उरकुडे जखमी आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सला रोखले आणि आग लावली. या घटनेनंतर आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनी बराचवेळ रस्ता रोखून धरला. नागभिड पोलिसांनी पोलिस कुमक पाठवून रस्ता मोकळा केला.

Wednesday, July 03, 2013

रामेडवार, मराठे मनसेचे जिल्हाध्यक्ष

रामेडवार, मराठे मनसेचे जिल्हाध्यक्ष


नवी कार्यकारिणी : विद्यार्थी आणि महिला सेनाही जाहीर

चंद्रपूर  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यांची दोन दिवस बैठक घेतल्यानंतर बुधवारी (ता. तीन) पक्षश्रेष्टींनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. जिल्हाध्यक्षपदी दिलीप रामेडवार आणि विजय मराठे, जिल्हा सचिवपदी राजू कुकडे, बळीराम शेळके, जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप चन्नवार, प्रवीण सूर, चंद्रपूर तालुकाध्यक्ष सचिन भोयर, चंद्रपूर शहर अध्यक्षपदी संदीप सिडाम, महिला सेना जिल्हाध्यपदी सुनीता गायकवाड, अमृता सूर, विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहूल बालमवार आणि मनदीप रोडे यांचा समावेश आहे.
 टेकामची नक्षल्याने केली हत्या

टेकामची नक्षल्याने केली हत्या

गडचिरोली- धानोरा येथे ग्राम पंचायत सदस्य नंदलाल मेहरसिंग  टेकामची नक्षल्याने केली हत्या 
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात रेंगा येथील ग्रामपंचायत सदस्य नंदलाल मेहरqसग टेकाम यांची नक्षल्यांनी हत्या केली. आज पहाटेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गावात येऊन त्यांची हत्या केली. पोलिसांचा खब-या असल्याचा नक्षल्यांचा संशय  होता. त्यातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे.

Tuesday, July 02, 2013

नक्सलवादियों ने  हमला कर दिया

नक्सलवादियों ने हमला कर दिया

झारखंड के दुमका जिले में नक्सलवादियों ने पुलिस अधीक्षक (एसपी) के काफिले पर मंगलवार दोपहर हमला कर दिया. खबर है कि हमले में पाकुड़ के एसपी अमरजीत बलिहार समेत पांच पुलिस वाले शहीद हो गए हैं. बताया जा रहा है कि अभी नक्सलियों और पुलिस बल के बीच फायरिंग जारी है.एसपी डीआईजी के साथ नक्सलवाद के खिलाफ ऑपरेशन को लेकर मीटिंग कर लौट रहे थे.
हमला दुमका से 35 किलोमीटर दूर काठीकुंड इलाके में किया गया. यहां नक्सली पहले से ही घात लगाए बैठे थे और काफिले के नजदीक आते ही उन्होंने अंधाधुंध फायरिंग शुरू कर दी. पुलिस पार्टी मौके पर पहुंच गई है और शवों को दुमका लाया जा रहा है.
अमरजीत बलिहार मूलतः स्टेट पुलिस के अफसर थे और शानदार रेकॉर्ड के चलते प्रमोट होकर आईपीएस बनाए गए थे. 17 मई को ही उन्होंने पाकुड़ का कार्यभार संभाला था.
पाकुड़ पं बंगाल की सीमा से सटा जिला है और माना जाता है कि यहां नक्सली समानांतर सरकार चलाते हैं. झारखंड के लिए यह जिला इसलिए भी महत्वपूर्ण है क्योंकि यहां से बड़े पैमाने पर राजस्व आता है. यह जिला बीड़ी उद्योग और स्टोन क्रशिंग के लिए मशहूर है. यहां की काले रंग की स्टोन चिप का निर्यात भी किया जाता है. इसी उद्योग के इर्द गिर्द अवैध खनन और वसूली का भी कारोबार चलता है.

नक्सलियों का नाम इस हमले से पहले सिस्टर वाल्सा जॉन के मर्डर में सामने आया था. सिस्टर एक ईसाई मिशन के तहत यहां पढ़ाती थीं. केरल की रहने वाली सिस्टर का यहां जब मर्डर हुआ, तो कहा गया कि नक्सलियों का इसके पीछे हाथ था. हालांकि अभी तक हत्या की यह गुत्थी सुलझ नहीं पाई है.
इससे पहले नक्सलियों ने पनेम नाम की कोल माइनिंग कंपनी के सुरक्षा कर्मियों को मार दिया था और उनकी जेसीबी मशीन और डंफर भी जला दिए थे. बताया गया कि लेवी वसूलने के लिए खौफ पैदा करने को यह कार्रवाई की गई. इसके अलावा कुछ एक मौकों पर लैंड माइन बिछाकर पुलिस टुकड़ियों पर भी हमला किया गया.
नक्सली गतिविधियों को देखते हुए पुलिस के अलावा यहां रिजर्व बटालियन की भी एक कंपनी अमरापाड़ा इलाके में तैनात है. 
डिजिटल मिटरविरूध्द हजारो ऑटोचाकांचे जेलभरो

डिजिटल मिटरविरूध्द हजारो ऑटोचाकांचे जेलभरो


चंद्रपूर :  इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटरची सक्ती करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर ऑटोचालकांनी आज २ जुलै ला समाज सुधारणेचे प्रणेते नितीन पोहाणे यांच्या नेतृत्वात गांधी चौक ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. या मार्चामध्ये हजारो ऑटोचालक व त्यांच्या कुटुंबाच्या समावेश होता.
उद्योगांच्या नावावर कोलडेपोंनी मिळविली २२ कोटीत जागा

उद्योगांच्या नावावर कोलडेपोंनी मिळविली २२ कोटीत जागा

औद्योगिक कायदा धाब्यावर बसवून १५० एकर जमिनीवर ताबा

चंद्रपूर, : औद्योगिक कायद्यानुसार कोणत्याही एमआयडीसी परिसरात केवळ उद्योगांनाच जागा देण्याची तरतूद आहे. मात्र, ताडाळी येथील एमआयडीसी परिसरात सुमारे दीडशे एकर जागा ३६ खासगी व्यापाèयांनी मिळविली आहे. उद्योगांच्या नावावर कोलडेपो चालविणाèया या व्यापाèयांना काही अधिकाèयांनी औद्योगिक नियम धाब्यावर बसवून १७५ रुपये प्रति चौरस मीटर दराने २२ कोटी ५० लाखांत ही जागा मिळविल्याचा आरोप राजू कक्कड यांनी केला.

राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११-१२ मध्ये जिल्हाधिकाèयांना पत्र पाठवून प्रदूषण दूर करण्यासाठी ताडाळी परिसरातील कोलडेपो हटविण्याची कारवाई केली. त्यामुळे खासगी व्यापाèयांचे कोलडेपो बंद पडले. त्यासाठी या ३६ व्यापाèयांनी पर्यायी जागेचा शोध सुरू केला. औद्योगिक कायद्यानुसार कोणत्याही एमआयडीसी परिसरात केवळ उद्योगांनाच जागा देण्याची तरतूद आहे. कोळसा हा उद्योग नसून, नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरात कोलडेपोंना जागा देता येत नाही. असे असतानाही या व्यापाèयांनी मंत्री, अधिकाèयांशी संगनमत करून दीडशे एकर जागा केवळ २२ कोटी ५० लाखांत मिळविली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटपाचे दर निश्चित आहेत. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांत औद्योगिक क्षेत्रासाठी १५५ रुपये प्रति चौरस मिटर, निवासासाठी २४५ रुपये प्रति चौरस मिटर, तर व्यापारासाठी ३०५ रुपये प्रति चौरस मिटर असा दर आहे. ताडाळी एमआयडीसीत औद्योगिकसाठी १७५ रुपये प्रति चौरस मिटर, व्यापारासाठी ३५० रुपये प्रति चौरस मिटर असा दर आहे. असे असतानाही या व्यापाèयांनी उद्योग दाखवून १७५ रुपये प्रति चौरस मिटर दराने १५० एकर जागा बळकावल्याचा आरोप राजू कक्कड यांनी केला आहे. या व्यापाèयांत नरेश जैन, महावीर भट्टड, अग्रवाल कोल इंडिया, जितेंद्र qसग, जिवराज शर्मा, रामदेव अग्रवाल, प्रदीप ठक्कर, बी. चेन्ना क्रिष्णा, सज्जन जैन, दीपक जैन, देव अग्रवाल, राजीव जैन, लिकेंश दोशी, शैलेंद्र अग्रवाल, महावीर मित्तल, वेदप्रकाश अग्रवाल, एन. एन. ग्लोबल मेरकांटील प्रा. लि., के. जनार्धन राव, अंशूल अग्रवाल, नरेशकुमार अग्रवाल, चके्रश जैन, विवेक जैन, विनय जैन, पियूष जैन, हरकिशन जैन, बजरंगदास अग्रवाल, नरेश गुप्ता, हरिष भत्तड, वासुदेव मालू, आशिष जैन, जुगलकिशार अग्रवाल, पवन जैन, हरीभाई शहा यांचा समावेश आहे.
॥जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी ॥

॥जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी ॥

प्रिय वाचक

आपण मराठी असून अजून ज्ञानेश्वरी वाचली नाही?
आपण मराठी असूनही आपल्याला ज्ञानेश्वरी समजत नाही?
अमृतासारखी रसाळ भाषा अजून आपण अनुभवलीच नाही?


महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मराठीचा मानबिंदू म्हणजे संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाचा विषय.
पण होतं काय की कितीही म्हटलं तरी संपूर्ण अर्थ समजून ज्ञानेश्वरी वाचणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. कारण तिची समजायला कठीण जाणारी प्राकृत भाषा. ती सहजासहजी समजतेच असे नाही. प्रयत्नपूर्वक समजली तरी ज्ञानेश्वरीच्या रसाळ काव्याची गंमत घेता येत नाही. ज्ञानेश्वरी हे एक सुंदर काव्य आहे. जितका गहन त्याचा विषय तितकीच सुंदर तिची मांडणी. तिची मजा काही और आहे.
दुसरे म्हणजे अनेकदा होतं काय की लोक ज्ञानेश्वरी, दासबोध आदी पुस्तकं ही निवृत्तीनंतरची पुस्तकं समजतात. खरे तर यांतले जे विचार आहेत ते तरुणांसाठी मार्गदर्शक आहेत. आयुष्य कसे जगावे हे सांगणारे आहेत. ज्ञानेश्वरीची खरी  गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्‍या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.

ज्ञानेश्वरीचे जे ई पारायण आम्ही गेल्यावर्षी चालवले त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद देऊन आम्हाला धन्य केले.
आज आम्ही पुन्हा एकदा आणली आहे श्री विजय पांढरे यांची २१व्या शतकातील मराठीतील ओवीबद्ध ज्ञानेश्वरी. आज सादर आहे पहिला अध्याय. जर आपल्याला पुढचे अध्याय हवे असतील तर कृपया कळवा.
गेल्यावर्षी आम्ही हीच ज्ञानेश्वरी लाखो लोकांपर्यंत नेली. विशेषतः तरुणांपर्यंत. आजही आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात.  ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्‍या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्‍या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातूनही.
ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी  द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.

आज श्री. विजय पांढरे लिखित भावार्थ ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पाठवीत आहोत. पुढील अध्याय हवे असतील तर कळवा. फ़क्त मागणीनुसारच पाठवले जातील. गेल्या वेळचा अनुभव असा की बहुतांश खाजगी कंपन्यांच्या मेलबॉक्समध्ये मेल्स पाठवताना अडचण येते. त्यामुळे gmail, yahoo, rediffmail अशा व्यक्तीगत मेल आयडींनाच या मेल्स पाठवण्यात येतील. कृपया नोंद घ्यावी व असे मेल आयडी कळवावे. हे सर्व अध्याय आम्ही आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान सर्व इच्छुक वाचकांना विनामूल्य पाठवणार आहोत.

दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरीचे ऑडिओ खुप लोकांना आवडले. लोकांनी हे अध्याय आपल्या मोबाईलवर अपलोड करून त्यांचा आनंद स्वतः तर घेतलाच पण जातायेता अनेकांना दिला. तरी सर्व ज्ञानेश्वरी प्रेमींनीwww.ednyaneshwari.com या संकेत स्थळाला भेट देऊन या शब्दसंगीताचा आनंद घ्यावा.

या शिवाय सिडी स्वरूपातही संपूर्ण ज्ञानेश्वरी ( पुस्तक आणि ऑडिओ) उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी लिहा.

Monday, July 01, 2013

अधिका-याअभावी महिला व बालविकासची कामे खोळंबली

अधिका-याअभावी महिला व बालविकासची कामे खोळंबली

स्मिता पौनिकर अद्यापही बेपत्ता : पदाचा प्रभार सोपविलाच नाही

चंद्रपूर, ता. ३०: उत्तराखंड राज्यातील केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेल्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. १२ जूनपासून त्या परत न आल्या नसून, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातातील त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार अद्यापही अन्य अधिकाèयाकडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय कामे खोळंबली आहेत.
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांच्यासह गोंदिया येथील एकात्मिक बालप्रकल्प अधिकारी हेमलता बावणकर, विनोद खुरसमकर, आरती खुरसमकर, प्रदीप गुल्हाणे, क्रिष्णा गुल्हाने, स्वरुपा गुल्हाने आदी जण १२ जून रोजी नागपूर येथून विमानाने दिल्लीला गेले. तिथून खासगी वाहनाने केदारनाथ यात्रेला रवाना झाल्या. १४ जून रोजी दर्शन झाल्यानंतर हे सर्वजण आसपासच्या परिसरात पर्यटनासाठी गेले. श्रीमती पौनिकर यांनी १४ ते २२ जूनपर्यंत शासकीय रजेवर गेल्यानंतर २४ जून पासून त्या सेवेत रुजू होणार होत्या. मात्र, १७ ते १८ जूनच्या दरम्यान केदारनाथ येथे महापूर आल्याने त्या संपर्कातून दूर गेल्या. प्रशासनाने केलेल्या मोबाईल टॉवर ट्रेसनुसार त्यांचा अखेरचा संपर्क सोनप्रयाग येथे झाला. १८ जून रोजी त्या जंगमच्चेटी येथे चहा घेताना दिसून आल्याची माहिती प्रशासनाकडे होती. मात्र, त्या घटनेला १२ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही. काही दिवसांपूर्वीच पौनिकर यांच्या कुटुंबातील एका बालकाचा मृत्यू झाला. या घटनेतून सावरत नाहीतोच महापुराने qचतेत टाकले आहे. श्रीमती पौनिकर यांचे बंधू तुषार पौनिकर हेसुद्धा याच कार्यालयात परिविक्षाधीन अधिकारी आहेत. बहिणीच्या शोधासाठी तेसुद्धा रजेवर गेलेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकाèयांचा गत १५ दिवसांपासून शोध न लागल्याने कार्यालयातील कर्मचारीसुद्धा qचतेत आहेत. शिवाय प्रशासकीय कामांचा खोळंबा झाला आहे. त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार अद्यापही अन्य अधिकाèयाकडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक महत्वाच्या पत्रांवर स्वाक्षरी झालेली नाही.
-----------
बालविकास प्रकल्प प्रभारीकडे

शहरी विभागातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ईश्वर कोवेकर शनिवारी (ता. २९) सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्याजागी गडचिरोली येथील प्रकल्प अधिकारी गणवीर यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. दरम्यान, गणवीर यांच्याकडे पूर्वीपासूनच बल्लारपूर प्रकल्प कार्यालयाचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांना तीन ठिकाणी काम पाहावे लागेल. विशेष म्हणजे नागपूर विभागातील चार-पाच अधिकारी जूनअखेर सेवानिवृत्त झालेत.
कृषी अधीक्षक कुरील यांची बदली

कृषी अधीक्षक कुरील यांची बदली

 
चंद्रपूर : येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांची बदली गोंदिया येथे झाली असून, त्यांच्याजागी रत्नागिरीचे आत्मा प्रकल्पाचे संचालक एम. आर. बनसोड यांची वर्णी लागली आहे. श्री. कुरील हे गत चार वर्षांपासून येथे कार्यरत होते. यवतमाळ येथून बदली झाल्यानंतर त्यांनी चंद्रपुरात कृषीविषयक प्रकल्प हाती घेतले. सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, उस लागवड, qशगाडा शेतीचे प्रयोग शेतकèयांसाठी उपलब्ध करून दिलेत. बियाणे आणि खतांच्या काळाबाजारावर अंकुश लावण्यासाठी त्यांनी मोठी कारवाई केली होती.