काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, August 09, 2013

agrowon

agrowon

प्रस्तावित कृषी विद्यापीठ
मागणी मूलची, जागा qसदेवाहीत!
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर, ता. : अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करून पूर्व विदर्भात नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्याकरिता अभ्यास समितीची स्थापना करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यानुसार नियुक्त केलेली अभ्यास समिती जिल्ह्यातील मूल येथे पाहणी करणार आहे. मात्र, भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाचा विचार करता मूलऐवजी qसदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्र विद्यापीठासाठी सयुक्तिक ठरेल, अशी मागणी आता पुढे येत आहे.
इंग्रज राजवटीत १९११ मध्ये qसदेवाही येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला ऊस लागवड व संशोधन हा केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र, त्यानंतर कृषी हवामान, पर्जन्यमान यांचा विचार करून विभागाच्या निकडीप्रमाणे भात बीजोत्पादन व संशोधनाचे कार्य १९२२ पासून सुरू करण्यात आले. १९७० पासून हे केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आले. विदर्भातील भात संशोधनाचे हे मुख्य केंद्र आहे. पूर्व विदर्भ विभागाकरिता १९८४ पासून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र qसदेवाही येथे स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांतर्गत कृषी संशोधन केंद्र, qसदेवाही, साकोली (जि. भंडारा), नवेगावबांध (जि. गोंदिया), आमगाव (जि. गोंदिया) व सोनापूर (जि. गडचिरोली) या केंद्रांचा समावेश आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्रात पूर्व विदर्भ विभागास उपयुक्त भात (धान) जातींची निर्मिती करणे, धान व धानावर आधारित पीक पद्धतीचे संशोधन करणे व मशागत तंत्रज्ञान विकसित करणे, धानाच्या निरनिराळ्या जातींची रोग व किडीबाबत प्रतिकारकता पडताळून पाहणे, धानावरील रोग व किडीसाठी नियंत्रणाचे उपाय शोधून काढणे, मूलभूत, पायाभूत व सत्यप्रत धान बीजोत्पादन करणे, विकसित कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करणे आदी उपक्रम घेतले जातात.


विद्यापीठ कशासाठी?
भारताचे माजी कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय कृषी आयोगाने भौगोलिक स्थिती, जमीन, हवामान, पर्जन्यमान, पीकपद्धती, या घटकांचा विचार करून देशात शेती विकासासाठी शिक्षण व संशोधन व विस्तारासाठी कृषी विद्यापीठाची स्थापना केली. पूर्व विदर्भात राज्यातील सर्वाधिक क्षेत्र धानपीक लागवडीखाली आहे. या क्षेत्रातील सर्वाधिक जनता भातपीक शेतावर निर्भर आहे. त्यामुळे भविष्यात कृषी संशोधन व आधुनिकीकरणासाठी कृषी विद्यापीठाची गरज आहे. कृषी विद्यापीठातून शेतकèयांना मार्गदर्शन करणे सोईस्कर होईल. त्यासाठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या विस्तारासाठी विभाजनाचा प्रस्ताव ठेवला आहे. अकोला येथील विद्यापीठाचा विस्तार ११ जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्याचे विभाजन करून भात क्षेत्रातील चार जिल्ह्यांसाठी विद्यापीठाची गरज आहे.


qसदेवाहीत उपलब्ध सुविधा
१७५ हेक्टर शेतजमीन
५० हेक्टर जागेवर भात संशोधन केंद्राचे कार्यालय, कृषी तज्ज्ञांचे निवासस्थान, गोदाम, वसतिगृह व सभागृह आहे. कार्यालयाची नवीन इमारत, कृषी तज्ज्ञांचे निवासस्थान, प्राध्यापक व कर्मचाèयांचे निवासस्थान आहे.

कोणत्या सुविधा हव्यात
संशोधन कार्यालयाची अत्याधुनिक इमारत, शेती संशोधन आधारित शेतकरी साहित्य, वस्तू, यंत्र-तंत्रज्ञान संग्रहालय, वाचनालय, माहिती केंद्र, शेतकèयांना ङ्किरते मार्गदर्शन पथक, प्रयोगशाळा, जैवविविधतेवर आधारित कृषी वनशेती, शास्त्र संशोधन केंद्र, कृषी विद्यावन शास्त्र महाविद्यालय, शेतकèयांना प्रशिक्षणासाठी सभागृह, क्षेत्रीय शेतीपूरक व्यवसायासाठी ङ्कळबाग व ङ्कळप्रक्रिया, मशरूम, मत्स्य, रेशीम, लाख, पशुसंवर्धन, वन उत्पादने, शेतीपूरक विकास केंद्र, महिला शेतकèयांना पूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, जिल्हापातळीवर कृषी विद्याविस्तार यंत्रणा, अद्ययावत कृषी माहिती व विक्री केंद्र.

कृषीवर आधारित असलेल्या ग्रामीण जीवन संस्कृतीमध्ये माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत कृषी विषय लागू करणे, कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर उमेदवारांना परवाना शिक्षक म्हणून नियुक्ती व अनुदानेत्तर लाभ हवा.

विद्यापीठाचे उपक्रम.....पश्चिम विदर्भ....पूर्व विदर्भ
संशोधन केंद्रे १४.........
कृषी महाविद्यालये- २७.......
कृषी शेतकी विद्यालये..४४......१६
कृषी विज्ञान केंद्र...............
कृषी विस्तार केंद्र.........
कर्मचारी संख्या- ९००.......५०
---------
विद्यापीठाच्या कार्यावर देखरेख आणि मार्गदर्शन समितीत पूर्व विदर्भातील कार्यकारी सदस्यसंख्या कमी आहे. विद्यापीठात अनेक पदे रिक्त असून, कृषी शिक्षण व संशोधन विस्तारात उणिवा आहेत. विद्यापीठातील पदभरती, कर्मचारी qबदूनामावली, पदोन्नतीत गोंधळ आहे.
-------------------------------
उपलब्ध सुविधा आणि जागेचा विचार करता विद्यापीठासाठी qसदेवाही हेच ठिकाणी योग्य आहे.
- प्रा. अतुल देशकर, आमदार, ब्रह्मपुरी

माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी असलेल्या मूल येथे विद्यापीठ झाल्यास त्यांना आदरांजली ठरेल.
- सुधीर मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर-मूल

चार जिल्ह्यांसाठी विद्यापीठ होत असल्याने ते मध्यवर्ती ठिकाणी असावे. सुविधा लक्षात घेता qसदेवाहीच सयुक्तिक आहे.
- मधुकर भलमे, प्रगतशील शेतकरी, चारगाव


कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात आपले मत अभ्यास समितीपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकèयांनी लिहावे.
पत्ता : सकाळ विभागीय कार्यालय, तिरुपती अपार्टमेंट, छोटा बाजार, चंद्रपूर
-मेल-sakalchandrapur@rediffmail.com

Wednesday, August 07, 2013

आनंदवन' कलावंताच्या 'स्वरानंदवन'साठी पुढे या

आनंदवन' कलावंताच्या 'स्वरानंदवन'साठी पुढे या

'सांगली - बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या "आनंदवन' मधील कलावंताचा "स्वरानंदवन' हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन वरोरा (जि. चंद्रपूर) येथील महारोगी सेवा समितीचे सचिव विकासआमटे यांनी केले. 'समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांचे "आनंदवन' सर्व परिचितआहे. जवळपास अडीच हजारांवर कुष्ठरोगी कुटुंब कबिला आनंदवन सांभाळते. तेथे जवळपास सोळाशे रुग्ण कायमस्वरूपी अंथरुणाला खिळून राहिले आहेत. दुर्लक्षित आणि उपेक्षित अशा या कुष्ठरोग्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करण्यासाठी आनंदवनचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. कुष्ठरोग मुक्त झालेल्यांच्या माध्यमातून 2000 मध्ये स्वरानंदनवन हा वाद्यवृंद कार्यक्रम साकारला. दया नाही तर संधी द्या, असा या कार्यक्रमाचा गाभा आहे. हा केवळ निव्वळ करमणुकीचा कार्यक्रम नाही. अगर निधी उभारण्याचा उपक्रमही नाही. समाजानेच समाजाच्या हितासाठी लढायला हवे. त्यासाठी माणुसकीचा सन्मान करायला शिकवणारा हा कार्यक्रम आहे. विकलांगाच्या या चमूने आत्तापर्यंत हजारावर प्रयोग केले आहेत. जात, धर्म, पंथ या पलीकडे मानव धर्माचे स्वरूप मांडणारा हा कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जावा हा मूळ उद्देश आहे. त्यासाठी पुढे यावे.'' ते म्हणाले, 'जवळपास दीडशे कलाकारांचे पथक आहे. त्यात अंध, अपंग, मूक-बधिर आणि रोगमुक्त झालेले कलावंत आहेत. या कार्यक्रमाच्या निधीतून पाचशे घरांचे हिम्मतग्राम (कलाकारांचे ग्राम), शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन तसेच अद्ययावत सुविधा उभारण्यात येणार आहेत. चार सुसज्ज वाहनांसह हा ताफा सांगलीतयेऊ शकते. परिसरातील नागरिकांनी, संस्थांनी पुढाकार घेऊन चार-पाच कार्यक्रम आयोजित करावेत. त्यातून उभा राहणारा निधी या कामासाठी द्यावा.

Tuesday, August 06, 2013

 संजय देवतळे यांच्या राजीनाम्याची मागणी

संजय देवतळे यांच्या राजीनाम्याची मागणी

चंद्रपूर, : दुष्काळी पॅकेजच्या धर्तीवर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज राज्य शासनाने द्यावेअशी मगणी केलीजी मदत शासनाने जाहीर केलीती अतिशय तुटपुंजी असल्याची टीकाही त्यांनी केलीसोबतच पालकमंत्री संजय देवतळे यांच्या पाहणी दौèयात झालेल्या निरपराध लोकांवरील लाठीमराच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनाम घ्यावाअसे शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते म्हणाले.
अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झालेखासगी मलमत्तेसह सार्वजनिक मलमत्तेचेही मोठे नुकसान झालेया पाश्र्वभूमीवर सेना नेते दिवाकर रावते यांनी मंगळवारी चंद्रपुरातील काही पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केलीलोकांशी संवाद साधलायानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी 
यावेळी त्यांनी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या राजीनाम्याचीही मगणी केलीदेवतळे हे चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करीत असताना मगील रविवारी त्यांच्या ताफ्यावर पूरग्रस्तांनी दगडङ्केक केली होतीत्यानंतर पोलिसांनी अमनुषपणे लोकांवर लाठीमर केलाया प्रकाराचा रावते यांनी निषेध केलापालकमंत्र्यांनी पुराच्यावेळी जिल्ह्यात ठाण मांडून बसायला हवे होतेपणते कुठेच दिसले नाहीत्यामुळेच लोकांचा संताप वाढलायाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी देवतळे यांचा पालकमंत्रिपदाचा राजीनाम घेतला पाहिजेअशी मगणी त्यांनी केलीयावेळी रावते यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मदतकार्याची महिती घेतलीपणही मदत अजूनही पोहोचली नसल्याचे वास्तव समोर आलेत्यामुळे आता रावते शासनाच्या विरोधात कोणती भूमिका घेतातयाकडे पूरग्रस्तांच्या नजरा लागल्या आहेतमित्र पक्ष भाजपसोबतची युती ही qहदुत्वाच्या मुद्द्यावर आहेभाजप जर विदर्भाचे आंदोलन करीत असेलतर ती त्यांची भूमिका आहेते स्वतंत्र आहेतमत्रयुतीचे शासन सत्तेवर आल्यास विदर्भाचा असा विकास करू कीभाजपसुद्धा वेगळ्या विदर्भाची मगणी सोडून देईलअसे रावते म्हणालेपत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळू धानोरकररमेश देशमुखचंद्रपूरचे उपमहापौर संदीप आवारीदीपक कपूरअजय स्वामीरमेश तिवारी उपस्थित होते
पुरामुळे महावितरणला सव्वाकोटीचा फटका

पुरामुळे महावितरणला सव्वाकोटीचा फटका

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2013 

चंद्रपूर - गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीसह अनेक गावांतील घरे पाण्याखाली आली. यात घरगुती वीजमीटर व रोहित्रे निकामी झाली. वीजखांब वाकले, तर वीजतारा तुटून पडल्या. त्यामुळे महावितरणला एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात सव्वाकोटीचा फटका बसला आहे. 

यंदा विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे चंद्रपूरसह, वर्धा, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या पाचही जिल्ह्यांत महावितरणचे सुमारे दोन कोटींच्या वर नुकसान झाले आहे. यात 42 डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍सेस खराब झालेत. 430 उच्चदाब तसेच 1831 लघुदाब खांब पडले. यापैकी 1084 लघुदाब खांब व 380 उच्चदाब खांब उभे करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. 33.41 किमी वीजवाहिनी तुटल्यामुळे ती बदलावी लागली. वीजपुरवठा करणाऱ्या 33 विद्युत रोहित्रांत पावसाचे पाणी गेल्यामुळे ते नादुरुस्त झाले. एकूण एक हजार 266 वीजमीटर पावसाने संपूर्णतः खराब झालेत. यात सर्वाधिक चंद्रपूर विभागाला फटका बसला आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यात चार दिवस पुराचे पाणी होते. त्यामुळे 87 गावे चार दिवस अंधारात होती. शिवाय चार-पाच दिवस शेतात पाणी राहिल्याने 900 शेतीपंप नादुरुस्त झाले. कोठारी-तोहोगाव परिसरातील 66 केव्ही उच्चदाब वाहिनी पाण्याखाली आली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरश: डोंग्यामधून प्रवास केला. 

महावितरणच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या गोंडपिंपरी-आलापल्ली व आलापल्ली-सिरोंचा या महापारेषणच्या जंगलातून गेलेल्या 66 के. व्ही. उच्चदाब वीजवाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे आलापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली या तालुक्‍यांमधील सुमारे 500 गावे अंधारात होती. परंतु, 33 के. व्ही. वीजवाहिन्यांवर झालेले सर्व बिघाड महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लवकरच दूर करीत ग्राहकांना दिलासा दिला. सततच्या पावसामुळे कुठे जंपर कट करण्यात आले, तर कुठे रोहित्रे बंद, कुठे ग्राहकांचे मीटर काढावे लागले. 

वीज कर्मचाऱ्यांनी दाखविली तत्परता 
बिघाड झालेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी शिफ्ट ड्यूटी संपल्यानंतरही त्यांनी रात्री-अपरात्री दुरुस्तीचे काम केले. कुरखेड्यामध्ये तर पावसात विजांच्या कडकडात जीव धोक्‍यात घालून काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी आदर्श प्रस्थापित केला. कोठारी-तोहोगाव परिसरात नावेतून प्रवास करून रोहित्रांची दुरुस्ती केली. या सर्व कामात महावितरणचे पाच अधीक्षक अभियंते व सर्व 13 कार्यकारी अभियंते तसेच उपकार्यकारी अभियंत्यांपासून कनिष्ठ अभियंते व जनमित्रांनी कर्तव्य बजावले. 

42 डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍सेस खराब
430 उच्चदाब खांब पडले
1831 लघुदाब खांब पडले
33.41 किमी वीजवाहिनी तुटली
33 विद्युत रोहित्र नादुरुस्त
1 हजार 266 वीजमीटर खराब
900 शेतीपंपात बिघाड
अन्नधान्याची माहिती "एसएमएस'ने मिळणार

अन्नधान्याची माहिती "एसएमएस'ने मिळणार

चंद्रपूर - अन्नधान्य वितरणाची माहिती संबंधितांना होण्याकरिता पुरवठा विभागाने "ग्रुप एसएमएस प्रणाली' कार्यान्वित केली आहे. जुलै महिन्यात एकूण 33 हजार 442 लाभार्थ्यांना "एसएमएस' करण्यात आला आहे.

जिल्हा दक्षता समितीची बैठक सोमवारी (ता. पाच) घेण्यात आली. या बैठकीत पुरवठा विभागाने याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय देवतळे होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. डहाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, सुभाष रघाताटे आणि मध्यवर्ती बॅंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पुरेशा नियतनाची (धान्य) मागणी करून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, याची खबरदारी घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी जिल्हा पुरवठा विभागाला दिल्या.
जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांना 5 किलो गहू व 30 किलो तांदूळ वाटप केले जाते. परंतु, जिल्ह्याच्या काही भागातील नागरिकांची गहू वाढवून देण्याची मागणी पाहता तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे खराब झाल्या अथवा नष्ट झाल्या. अशा नागरिकांना नव्याने शिधापत्रिका देण्यात याव्यात, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. अंत्योदय योजनेअंतर्गत जिल्ह्यात 16 हजार लाभार्थ्यांची शासनाच्या सूचनेनुसार नव्याने निवड करण्यात आली. मात्र, नियतन जुन्या पद्धतीनेच मिळत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. यावर शासनाला पत्र लिहिण्याचे पालकमंत्री यांनी सुचविले.
स्वतंत्र विदर्भ नकोय -  डॉ. विकास आमटे

स्वतंत्र विदर्भ नकोय - डॉ. विकास आमटे

चंद्रपूर-  वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व  डॉ. प्रकाश आमटे यांनी करावे, अशी विनंती चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली असतानाच छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीला विरोध असल्याचे सांगत वेगळ्या विदर्भ नकोय अशी भूमिका आनंदवनचे जेष्ट समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी स्पष्ट केली.
कोल्हापूर जिल्ह्यात एका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. आम्ही पूर्व विदर्भातील आहोत. आताच विदर्भ जर स्वतंत्र झाला असता तर आम्ही परप्रांतीय ठरलो असतो. त्यामुळे मला हा पुरस्कार दिला गेला नसता, असे सांगत स्वतंत्र विदर्भ करण्याची मागणी चुकीची असल्याचे मत डॉ. विकास आमटे यांनी या वेळी व्यक्त केले.

Sunday, August 04, 2013

पालकमंत्री संजय देवतळे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहाणी

पालकमंत्री संजय देवतळे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहाणी

मूलभूत सुविधा तात्काळ पुरविण्याचे प्रशासनाला आदेश
चंद्रपूर दि.04- अतिवृष्टीमुळे चंद्रपूर शहरात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहाणी आज पालकमंत्री संजय देवतळे यांनी केली.  शुध्द पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा तसेच अन्नधान्य आदी सुविधा तात्काळ पुरविण्याचे आदेश जिल्हा प्रशासन व महानगर पालिका प्रशासनाला दिले.  जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगर सेवक नंदू नागरकर, सुनिता लोढीया व अधिकारी यावेळी सोबत होते.
    पठाणपूरा गेट, विठ्ठल मंदिर वार्ड, मिलींद नगर, हनुमान खिडकी, हवेली गार्डन, सिस्टर कॉलनी, गोपाल पुरी, बालाजी वार्ड व ठक्कर कॉलनी इत्यादी ठिकाणी आज पालकमंत्री यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष  पाहाणी केली.  प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना पुरविण्यात येणा-या सोई सुविधांचा आढावाही या दौ-यात त्यांनी घेतला.  येथील नागरिकांशी पालकमंत्री संजय देवतळे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
    वीज, पाणी व सफाई याबाबत नागरिकांनी आपले म्हणने पालकमंत्री यांना सांगितले.  स्वक्षता व साफसफाई महानगर पालिकेने तातडीने करावी तसेच नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयाव्यात अशा सूचना मनपा आयुक्तांना पालकमंत्र्यांनी दिल्या.  ब-याच भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे घरगुती सामान व दैनंदिन गरजेच्या वस्तु भिजल्या आहेत.  अशा नागरिकांना तातडीनी मदत पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. 
    शहरातील ज्या भागात पुराचे पाणी शिरले अशा ठिकाणी आजाराची साथ पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात.  पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे तातडीने करुन नुकसान ग्रस्तांना शासकीय मदत ताबडतोब दयावी असेही पालकमंत्री यांनी या पाहाणी दौ-यात प्रशासनाला सांगितले. ज्या भागात अदयाप वीज पुरवठा बंद आहे तो तातडीने सुरु करावा व बंद नळ योजनाही सुरु कराव्यात व टँकरने सुध्दा पाणी पुरवठा करावा असे निर्देश देवतळे यांनी विद्युत विभाग व मनपाला दिले.
पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!

पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!

चंद्रपुरात पालकमंत्र्यांना हिसका
चंद्रपूर दि ०४(प्रतिनिधी):
अतिवृष्टीमुळे ङ्कहाय अ‍ॅलर्टङ्कचा इशारा देण्यात आलेल्या चंद्रपूरमधील जनतेच्या मनात निष्काळजी सरकारबद्दल खदखदणा-या असंतोषाचा फटका आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांना बसला. चंद्रपुरातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या देवतळे यांच्या ताफ्यावर दगडफेक करून नागरिकांनी आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.
गेला आठवडाभर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं कहर केला आहे. जराही न थांबता कोसळणा-या पवासामुळे बुलडाणा, अकोला, यवतमाळ, गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेच, पण चंद्रपूरमध्ये तर प्रशासनानं ङ्कव्हेरी हाय अ‍ॅलर्टङ्कचा इशारा दिलाय. अप्पर वर्धा, लोअर वर्धा, गोसेखुर्द आणि इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं तिथली परिस्थिती भीषण झाली आहे. अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकलेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतंय.
या पाश्र्वभूमीवर, संजय देवतळे आज स्थानिक अधिका-यांसोबत चंद्रपुरात पूरपरिस्थितीची पाहणी करायला पोहोचले. पुराचा फटका बसलेल्या काही कुटुंबांची त्यांनी आस्थेनं चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी आधीच मदत जाहीर केलेली असल्यानं त्यांचा हा दौरा तसा औपचारिकच होता. परंतु, चंद्रपूरवासियांनी त्याला भलतंच वळण दिलं.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अद्याप गरजूंपर्यंत पोहोचलीच नसल्यानं नागरिक खवळले होते. तो सगळा राग त्यांनी संजय देवतळेंवर काढला. संतप्त जमावानं मंत्रिमहोदयांच्या ताफ्यावर दगडफेक करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. चंद्रपुरात पूर येऊन पाच दिवस झाले, मग इतके दिवस पालकमंत्री कुठे होते?, असा सवालही नागरिक करत होते. त्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं. त्यानंतर, लवकरात लवकर मदत देऊ, एवढं आश्वासन देऊन देवतळेही माघारी फिरले.
चंद्रपुरात पुरामुळे लाखो हेक्‍टर शेती पाण्याखाली

चंद्रपुरात पुरामुळे लाखो हेक्‍टर शेती पाण्याखाली


चंद्रपूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यात शनिवारी (ता. 3) पावसाने विश्रांती घेतली. इरई धरणातून होणारा विसर्ग शुक्रवारी (ता. 2) दुपारपासून बंद करण्यात आला आहे; परंतु वर्धा, वैनगंगा, इरई, घरपट या नद्यांना पूर कायम आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरालगतच्या गावांत पूरस्थिती कायम आहे. 

गेले पंधरा दिवस सुरू असलेली अतिवृष्टी आणि भंडारा, वर्धा, अमरावती जिल्ह्यांतील धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला असून, नऊ हजार 198 कुटुंबे बाधित झाली आहेत. सात हजार 486 अंशतः तर एक हजार 398 घरे पूर्णतः पडली. जिल्ह्यातील एक लाख 46 हेक्‍टर जमिनीचे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, 70 हजार हेक्‍टर जमिनीचे 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. शेती तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली असून, नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

अप्पर वर्धा, लोअर वर्धा व इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात इरई व वर्धा नदीकाठावरील चंद्रपूर शहरासह बल्लारपूर, राजुरा तालुक्‍यात लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरले. एका महिन्यात तिसऱ्यांदा पुराचा सामना करावा लागत असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत. या पुरामुळे सोयाबीन पिकाचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे.

वरोरा तालुक्‍यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वरोरा- वणी, लाडकी- सागरी- हिंगणघाट, मोकाळा, माढेळी हे मार्ग बंद आहेत. कोठारीतील फुकटनगर वसाहतीत 30 घरांमध्ये पाणी शिरले, तर 35 घरे पडली. कोठारी- कवडशी, कोठारी- काटवली, तोहोगाव, कोठारी- बल्लारपूर मार्ग बंद झाले आहेत. कोठारी, कवडजई, काटोली, बामणी, तोहोगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. येथील 30 कुटुंबांना शुक्रवारी रात्रीपासूनच शाळा- अंगणवाड्यांमध्ये हलविण्यात आले आहे. सास्ती परिसरातील चारली, निरली, धीडशी, कोलगाव, बाबापूर, मानवली, सास्ती, गोवरी या गावांचा संपर्क तुटला आहे. गोवरी, कोलगाव व सास्तीमध्ये अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. भद्रावती तालुक्‍यातील माजरी- वणी, माजरी- वरोरा, माजरी- भद्रावती हे मार्ग बंद आहेत. पिपरी (देशमुख) व कोची ही गावे पुराने वेढली आहेत. भद्रावतीतील डोलारा वार्डात आजही पाणी कायम होते. तालुक्‍यात आतापर्यंत 14 घरे पडल्याची नोंद आहे. माजरी क्षेत्रातील दोन भूमिगत व पाच ओपनकास्ट कोळसा खाणींचे उत्पादन ठप्प पडले आहे. त्यामुळे वेकोलीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

दरम्यान, सलग तिसऱ्यांदा पूर आल्यामुळे नुकसानीचा आलेख आणखी वाढलेला आहे. बल्लारपूर तालुक्‍यातील चारवट, गोंडपिपरी तालुक्‍यातील 13 गावे, पोंभुर्णा तालुक्‍यातील तीन गावे पुराने वेढली असली, तरी अद्याप त्यांचा संपर्क तुटलेला नाही. बोटींच्या साहाय्याने गावकऱ्यांना मदत पुरविली जात आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना 24 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

निम्मी तुझी निम्मी माझी

निम्मी तुझी निम्मी माझी

Inline image 1
एकांकिका संग्रह
.डॉ. मुरलीधर जावडेकर.    


डॉ. मुरलीधर जावडेकरांच्या एकांकिकांचा हा संग्रह आपल्याला देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यातली प्रत्येक एकांकिका नाविन्यातून आणि विचारमंथनातून जन्माला आली आहे. यात कर्ण आणि कृष्णाचा हृदयाचा ठाव घेणारा संवाद आहे. यात “निम्मी” सारखी खुसखूशीत मजेदार एकांकिका आहे. “विमानात लोकशाही” सारखी एकांकिका गंमत करता करता डोळ्यांत अंजन टाकते. वेड्यांच्या इस्पितळाच्या माध्यमातून त्यांची एकांकिका अजच्या राजकीय वास्तबावर टिप्पणी करते. “अपघात” मधून ते उच्च दर्जाच्या नाट्याची अनुभूती देतात. त्यांची राजकीय मतं जरी सर्वांना मान्य झाली नाहीत तरी त्यामागची तळमळ प्रत्येकाला जाणवेल. या सर्वच एकांकिका प्रयोगासाठी उपयुक्त असून दोन ते बारा जणांचे ग्रुप या नाटुकल्या बसवू शकतात. (मात्र यासाठी लेखकाची लेखी परवानगी आवश्यक आहे). एकूणच या एकांकिकासंग्रहातून डॉ. जावडेकरांच्या प्रतिभेचा साक्षात्कार झाल्यावाचून रहात नाही.

Inline image 2

एके काळी मुंबई-पुणेसारख्या शहरांत एकवटलेला मराठी वाचकवर्ग आता जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. ई साहित्य प्रतिष्ठानच्या वाचकवर्गात जसा ओमान, नॉर्वे, कझाखस्थानचा मराठी तरूण वाचक आहे तसा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांतलाही युवा वाचक आहे. मराठी पुस्तकांचं वितरण सर्वत्र शक्य होत नाही. पण स्मार्ट मोबाईल मात्र आता घरोघर पोचले आहेत. आणि त्यावर ई साहित्य प्रतिष्ठानची ई पुस्तकं वाचता येतात. वॉट्स ऍप आणि ब्ल्यु टूथ द्वारे ही पुस्तकं एकमेकांना फ़ुकट आणि सहज देता येतात. त्यामुळे अशा वाचकांची फ़ार मोठी सोय होत आहे. ई साहित्य प्रतिष्ठानची ईज्ञानेश्वरी आणि मोरया सारखी पुस्तकं दशलक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचली. याचं कारण या माध्यमाची सहजता. ई माध्यमातून दर्जेदार सकस वाचनीय साहित्य नव्या पिढीला उपलब्ध करून देण्याचा एक महायज्ञच आम्ही उभारला आहे. आणि त्याला आपली साथ मिळाली तर यातून काही भव्य उभे राहील.
ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े नव्या तरूण वाचकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे हे खरेच. पण त्याला ज्येष्ठ लेखकांची जोड मिळाली तर त्यातून या चळवळीचा फ़ायदाच आहे. डॉ. मुरलीधर जावडेकरांनी आपली सर्व २५ पुस्तकं ई वितरणासाठी मराठी वाचकांना विनामूल्य उपल्ब्ध करून दिली आहेत. डॉ. मुरलीधर जावडेकरांचे उदाहरण घेऊन जर इतर साहित्यिकांनी आपली ग्रंथसंपदा ई प्रसारणासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली तर त्यातून मराठी साहित्याचा फ़ायदाच होईल. सर्व प्रथितयश लेखक-कवींना आम्ही हे आवाहन करतो की त्यांनी या नवीन माध्यमाच्या विस्ताराचा विचार करावा. मुख्य म्हणजे ई पुस्तक हे “नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहती पावकः” असे अविनाशी असल्यामुळे आपल्यानंतरच्या पन्नास पिढ्यांपर्यंत ते सुखरूप असणार याचाही विचार करावा. याच्या निर्मितीचा अत्यल्प खर्च आणि पर्यावरणाची हानी न होता त्याचा प्रसार हा व्यापक विचारही मनात धरावा. आणि या चळवळीला पाठिंबा म्हणून आपली पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावीत. अर्थात विनामूल्य. ई साहित्य प्रतिष्ठान ना पैसे घेत ना देत.
हे व्यासपीठ तरूण नवलेखकांसाठी तर स्वतःचेच मुक्तद्वार आहेच आहे. आपल्या लिखाणात कितपत दम आहे याचा लेखाजोखा घेण्यासाठी याहून अधिक चांगले माध्यम नाही. कारण वाचकांच्या स्पष्ट प्रतिक्रिया इंटरनेटवर जशा मिळतात तशा आणि त्या संख्येने समोरासमोर मिळण्याची शक्यता कमीच. नवीन लेखकांनी स्वतःच्या करियरची सुरुवात ई पुस्तकांतूनच करावी.
वाचकांनीही आपली जबाबदारीचा वाटा उचलावा. आपल्या ओळखीच्या आठ वाचकांचे ई मेल पत्ते आम्हाला कळवावे. त्यायोगे हा वृक्ष बहरत जाईल. आज पावणेदोन लाखांच्या घरात असलेला ई साहित्य प्रतिष्ठानचा वाचकवर्ग लवकरच दहा ते बारा लाखांपर्यंत पोहोचावा हे उद्दिष्ट आहे. बारा लाख म्हणजे फ़ार नाही. बारा कोटी मराठी माणसाचा फ़क्त एक टक्का. तेवढा तरी आपण कव्हर करू या. तेवढे तरी वाचक आपण जमा करू या. त्यांना नवीन आणि जुन्या चांगल्या लेखकांचे भारी भारी साहित्य देऊ या. वाचन संस्कृतीला मोबाईलच्या स्मार्ट युगात नेऊया.
ई साहित्य प्रतिष्ठानचं तिनशेवं ई पुस्तक लवकरच येत आहे. चार साडेचार वर्षांत तिनशे पुस्तकं. पावणेदोन लाख वाचक. साताठ लाख वेबसाईट व्हिजिट्स. बारा लाखांचं उद्दिष्ट.
कोण म्हणतो मराठी भाषेचं काही खरं नाही?
esahity@gmail.com

हे पुस्तक कसे वाटले ते नक्की कळवा.

Saturday, August 03, 2013


गडचिरोलीच्या दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक व कवी, राकाचे जेष्ठ नेते गो. ना. मुनघाटे यांचे आज निधन झाले,,,,,, भावपूर्ण श्रद्धांजली …. !!

बचाव व मदत कार्य पथकाचे प्रशंनिय कार्य

बचाव व मदत कार्य पथकाचे प्रशंनिय कार्य


शहरातील 585 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत
चंद्रपूर दि.03- चंद्रपूर जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराने वेढलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे महत्वपूर्ण कार्य बचाव व मदत कार्य पथकाने व नागरिकांच्या सहकार्याने प्रशासनाने केले असून चंद्रपूर शहरातील 585 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव व मदत कार्य पथकाचे 22 सदस्य अहोरात्र काम करीत आहेत.
बचाव कार्यासाठी नॅशनल डिजास्टर रिस्पांन्स फोर्सचे (NDRF) 40 सदस्यीय पथक चंद्रपूर येथे दाखल झाले असून त्यापैकी काही सदस्य राजूरा येथे तर काही सदस्य चंद्रपूर येथे बचाव कार्य करणार आहेत. या पथकाकडे चार बोटी, 4 वाहन, 30 लाईफ बोट, 55 लाईफ जॉकेट एवढे साहित्य असून पावसाळा संपेपर्यंत हे पथक चंद्रपूर येथेच राहणार आहे.
चंद्रपूर मधील रहेमत नगर, सिस्टर कॉलनी, ओंकार नगर, हवेली गार्डन, विठ्ठल मंदीर वार्ड, बिनबा गेटचा परिसर, भंगाराम वार्ड व राजनगर, बल्लारपूर मधील किल्ला वार्ड, गणपती वार्ड, सिध्दार्थ वार्ड व जुन्या वस्तीमध्ये पाणी सिरले आहे. या भागातील नागरीकांना प्रशासनाच्या तीन चमुने चार बोटीच्या सहायाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. बचाव कार्यासाठी जिल्हयात 14 बोटी, 310 लाईफ जॉकेट, 105 लाईफ बॉय व 432 स्विमररींग उपलब्ध आहेत.
अशोक गर्गेलवार यांच्या नेतृत्वातील बचाव पथकाने जिवती, आरवट, राजनगर, सिस्टर कॉलनी, बाबुपेठ, राजूरा, हवेली गार्डन आदि ठिकाणच्या 900 च्या वर लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. बाबुपेठ येथील एका शाळेच्या 180 मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रशंनिय कार्य या पथकाने केले.
राज्याच्या भौगोलिक रचनेत चंद्रपूर जिल्हा पूर्वभागात आहे. चंद्रपूर जिल्हयाच्या पश्चिमेश यवतमाळ, उत्तरेश वर्धा, नागपूर व भंडारा, पूर्व दिशेला गडचिरोली तर दक्षिणेश आंध्र राज्यातील आदिलाबाद जिल्हा आहे. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा व इरई या चार प्रमुख मोठया नदया जिल्हयातून जातात. या नदीतील परतीच्या पाण्याने नदी काठावरील गावांना पुराचा धोका संभवतो. जिल्हयात झालेल्या पूरपरिस्थितीला हे कारण अधिक प्रमाणात आहे.
इरई, वर्धा, पैनगंगा, उमा व वैनगंगा या नदयांना आलेल्या पूराचा परिणाम चंद्रपूर शहरासह जिल्हयातील मूल, राजूरा, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, भद्रावती या ठिकाणी होतांना जानवते. गोसीखूर्द प्रकल्पातून पाण्याचा अति विर्सग सोडल्यामुळे चंद्रपूर जिल्हयातून वाहणा-या नदयातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे चंद्रपूरातील आठ वस्त्यात पाणी शिरले.
चंद्रपूर शहरातील वस्त्यात पाणी घुसल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव व राहात कार्य पथकाने 585 कुटुंबातील 2251 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. बचाव राहात कार्य सुरुच असून प्रशासनाच्या तीन चमुचे 22 सदस्य हे कार्य करत आहे. बचाव व राहत कार्यात स्वयंसेवी संस्था प्रशासनास मोलाचे सहकार्य करीत आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षात नागरिकांनी फोन केल्यास बचाव पथक तात्काळ उपलब्ध करुन दिल्या जाते.
पूरात अडकलेल्या नागरिकांना शहरातील 22 ठिकाणी स्थलांतरीत केले असून जिल्हा प्रशासनातर्फे त्यांची व्यवस्था पाहली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, तहसिलदार गणेश शिंदे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी स्थलांतरीत नागरिकांच्या शिबीरांना भेटी देवून व्यवस्थेची पाहणी केली आहे.

Friday, August 02, 2013

   चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर दि.02- चंद्रपूर जिल्हयात 1 ऑगष्ट 2013 रोजी अमरावती जिल्हयातून अप्पर वर्धा धरणातून तसेच लोअर वर्धा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वर्धा नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन तसेच इरई नदीवरील इरई धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर जिल्हयातील इरई व वर्धा नदीकाठावरील तालुक्यातील गावांमध्ये तसेच गोसीखूर्द धरण जि.भंडारा येथील सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीचे पाणी पातळीमध्ये झालेली वाढ तसेच इसापूर धरण जि.यवतमाळ येथील पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून पैनगंगा नदी, वैनगंगा, वर्धा तसेच इरई नदी काठावरील तालुक्यातील नागरीकांनी 2 ऑगष्ट 2013 रोजी व पुढील कालावधीकरीता सतर्क राहावे.
    चंद्रपूर शहरातील इरई नदीकाठावरील नागरिकांनी नदीचे वाढते जलस्तर लक्षात घेता ताबडतोब आपले घरातून महत्वाचे साहित्यासह सुरक्षित ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने स्थलांतरीत होण्यास जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.  तसेच नदी व नाल्याचे वाहते पाण्यजवळ कुणीही जावू नये.  तसेच जिल्हयातील कोणत्याही पुरप्रवण भागामध्ये पुराचे पाण्यात अडकलेल्या नागरीकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील दुरध्वनी क्रमांक 07172-251597 व टोल फ्रि क्रमांक 1077 यावर त्वरीत संपर्क साधावा  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले.