गडचिरोली व अहेरी आगाराचे एक लाखाचे नुकसान
| ||
गडचिरोली- नक्षलवादी संघटनांनी आज पुकारलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारातून दुर्गम भागात जाणार्या ५0 बसफेर्या रद्द करण्यात आल्या. यात छत्तीसगड राज्यात जाणार्या आंतरराज्यीय बसफेरीचाही समावेश असून बसफेर्या बंद राहिल्याने दोन्ही आगारांचे प्रत्येकी ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काही बसफेर्या परत बोलाविण्यात आल्याची माहिती आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे दोन आगार आहेत. या दोन्ही आगारातून जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात बसफेर्या सोडल्या जातात. गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यात जाणारी मानपूर व राजनांदगाव या दोन बसफेर्या सोडल्या जातात. आज नक्षलवाद्यांनी बंद पुकारल्यामुळे या दोन्ही बसफेर्यांसह जारावंडी, कुरखेडा, एटापल्ली, भामरागड या गडचिरोली आगारातून सुटणार्या बसफेर्या बंद ठेवण्यात आल्या. मुरुमगाव बसफेरीही केवळ धानोरापर्यंतच सोडण्यात आली. गडचिरोली आगारातून सुटणार्या ३0 बसफेर्या रद्द करण्यात आल्या. तर अहेरी आगारातील अहेरी- भामरागड, कोठी, व्यंकटापूर, छल्लेवाडा, खांदला (राजाराम), झिंगानूर, रेगुंठा आदी बसफेर्या रद्द करण्यात आल्या. एटापल्ली, देचलीपेठा मार्गावरील खासगी वाहतुकही बंद होती. काल भामरागडला गेलेली बस आज सकाळी परत आली. मात्र त्यानंतर एकही बसफेरी या मार्गावर सोडण्यात आली नाही. या आगारातून सुटणार्या २0 बसफेर्या रद्द करण्यात आल्याची माहिती अहेरी आगार प्रशासनाने दिली आहे. एटापल्ली-कसनसूर-जारावंडी, गेदा, गट्टा आदी मार्गही बंद होते. जिमलगट्टा येथील व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. रांगी येथील बाजारपेठही आज बंद ठेवण्यात आली होती. एटापल्ली परिसरात अनेक ठिकाणी नक्षल पत्रके आढळून आली. |
Thursday, January 31, 2013
Wednesday, January 30, 2013
संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा
by खबरबात
चंद्रपूर - वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र, तिथे आज सर्वाधिक दारू विकली जाते. मग दारूबंदीचा उपयोग काय? संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा. अशी मागणी दारूविक्रेत्यांनी शासनाला केली. जिल्ह्यात दारूबंदीचे आंदोलन जोरात असताना त्याला विरोध करण्यासाठी दारूविक्रेत्यांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारोंच्या गर्दीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (ता. 30)मोर्चा काढून आपल्या भावना शासनदरबारी मांडल्या. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी "श्रमिक एल्गार'ने डिसेंबर महिन्यात पदयात्रा काढली. त्यानंतर राज्य शासनाने सकारात्मक आणि नकारात्मक बाबींवर आढावा घेण्यासाठी दारूबंदी समिती स्थापन केली. त्यानंतर जिल्ह्यातील काही संघटनांनी संयुक्त कृती समिती स्थापन करून दारूबंदीची मागणी रेटून धरली आहे. दारूबंदीचे समर्थक एकत्र येत असताना दारूविक्रेत्यांनीही आपली ताकद मोर्चाच्या माध्यमातून दाखविली.
Tuesday, January 29, 2013

नेहरु येवा केंद्राचा युवा पुरस्कार यार्ड संस्थेला
by खबरबात
चंद्रपूर
दि.29-
युवा
कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय
भारत सरकार व्दारा संचालीत
नेहरु युवा केंद्र चंद्रपूरचे
वतीने वरोरा येथील युथ अवेअरनेस
ॲन्ड रुरल डेव्हलपमेंट (यार्ड)
या
संस्थेला युवा दिनानिमित्त
जिल्हा युवा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
संस्थेच्या
वतीने अध्यक्ष अरुण चौधरी
यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या
संस्थेने शासन व युनिसेफ
यासारख्या संस्थांचे मदतीने
आरोग्य,
शिक्षण,
पाणी,
स्वच्छता,
माता-बालसंगोपन,
एडस
जागृती,
कुष्ठरोग
दुरीकरण,
रोहयो,
शेती
विकास यासारखे उपक्रम जिल्हयातील
वेगवेगळया भागात राबविले.
संस्थेने
कार्यक्षेत्रात युवा व किशोरी,
महिला,
शेतकरी
इत्यादीचे संघटन करुन ग्राम
विकासाला चालना दिली आहे.
गुडीया
मॉडेल,
ग्राम
विकास दल,
विधवा
महिलांचे संघटन यासारखे
नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले
आहे.
नेहरु
युवा केंद्र चंद्रपूरचे वतीने
12
जानेवारी
2013
रोजी
विशेष समारंभात यार्ड ला
जिल्हा युवा मंडळ पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे
अध्यक्ष साहित्यीक ना.गो.थुटे,
उदघाटक
समाजसेवक डॉ.विकास
आमटे यांचे हस्ते झाले.
त्यावेळी
प्रामुख्याने वृक्षमित्र
मोहन हिराबाई हिरालाल,
राज्य
पुरस्कार प्राप्त शिक्षक
प्रभाकर माटे,
जिल्हा
युवा समन्वयक जमुना डंगावकर,
डॉ.प्रमोद
गंपावार,
युनिसेफ
सल्लागार उपेंद्र पिल्लई
इत्यादी उपस्थित होते.
सुत्र
संचालन हर्षवर्धन डांगे यांनी
केले.

3 मार्च ला जिल्हाभरात महा लोक अदालत
by खबरबात
*
न्याय
आपल्या दारी
* प्रलंबित
प्रकरणे निकाली काढणार
* कुठलीही
फी आकारली जाणार नाही
चंद्रपूर
दि.29-
महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या
वतीने 3
मार्च
2013
रोजी
चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक
तालुक्यात महा लोक अदालतचे
आयोजन करण्यात आले असून
न्यायालयात प्रलंबित असलेली
व दाखलपूर्व प्रकरणे झटपट
निकाली काढण्यासाठी ही सुवर्ण
संधी असणार आहे.
विशेष
म्हणजे यासाठी कुठलीही फी
आकारली जाणार नाही.
ही
महालोक अदालत,
जिल्हा
न्यायालय,
सहधर्मदाय
आयुक्त न्यायालय,
कामगार
न्यायालय,
औद्योगिक
न्यायालय,
शाळा
न्यायाधिकरण व प्रत्येक
तालुक्याच्या ठिकाणी एकाच
दिवशी म्हणजे 3
मार्चला
आयोजित केली जाणार आहे.
न्यायालयात
प्रलंबित असलेली प्रकरणे आणि
दाखल पूर्व प्रकरणे (प्री
लिटीगेशन)
यांचा
याप्रसंगी निपटारा करण्यात
येणार आहे.
महालोक
अदालतमध्ये जास्तीत जास्त
वाद संपुष्टात यावे यासाठी
तंटामुक्त समितीचे पदाधिकारी
व पोलीस पाटील यांना विधी
न्याय सेवातर्फे माहिती
देण्यात आली असून त्यांनी
आपल्या जिल्हयातील तसेच
परिसरातील नागरिकांनी यासाठी
मदत करावी असे सुचविले आहे.
सामंजस्याने
वाद मिटविणे यातच खरे शहाणपण,
त्यासाठी
तुम्हाला मदत करेल महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरण
असे ब्रिद असलेल्या या महालोक
अदालतमध्ये प्रकरणे मिटविण्यासाठी
न्यायाधिश,
वकील
व सामाजिक कार्यकर्ते यांचे
पॅनल मदत करणार आहे.
यासाठी
कुठलीही फी आकारली जाणार नसून
केवळ एक साधा अर्ज करायचा आहे.
या
संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी
लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायाधिश
श्रीमती उषा ठाकरे व जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाच्या
वतीने करण्यात आले आहे.
Monday, January 28, 2013
कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू- राजनाथसिह
by खबरबात
ब्रह्मपुरी- विदर्भात बेकारी आणि दारिद्य्र आहे. इथला शेतकरी गरीब असूनही तो स्वाभिमानी आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या भ्रष्टाचारामुळे मध्यवर्गीयांसमोर मोठे प्रश्न निर्माण
झाले आहेत. आदिवासींचा विकास खुंटला आहे. पीडित समाजाचा विकास होणार नाही, तोपर्यंत देश महासत्ता होणार
नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू. तसेच
रोजगार हमी योजना शेतीसाठी राबवू. शेतकèयांच्या आत्महत्या थांबल्या
पाहिजेत. शेतक-यांना उत्तम खत,
उत्तम बियाणे
व qसचनाच्या
सोयी उपलब्ध करून देणे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे राजनाथसिह यांनी भाषणात सांगितले.
येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या पटांगणावर भाजपच्या वतीने शेतकरी व
शेतमजूर मेळाव्याचे आज (ता.२८) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मागदर्शक म्हणून
राजनाथqसह उपस्थित
होते. यावेळी मंचावर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नितीन गडकरी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय
अध्यक्ष स्मृती इराणी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अतुल देशकर,
आमदार नाना पटोले,
आमदार शोभाताई ङ्कडणवीस,
आमदार सुधीर पारवे,
जि. प. अध्यक्ष संतोष
कंभरे, अशोक
नेते, नीता
केळकर, वनिता
कानडे आदींची उपस्थिती होती.

...तर हातभट्टीच्या दारूविक्रीवर बंदी नको - आठवले
by खबरबात
चंद्रपूर- दारूबंदी होणार नसेल, तर हातभट्टीच्या दारूविक्रीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाचे दारूबंदी संदर्भातलं आजवरचं धोरण पाहता संपूर्ण दारूबंदी होणं अशक्य आहे. त्यामुळे शासनानं व्यसनमुक्ती कार्यक्रमावर भर द्यावा. आमचा दारूबंदीला पाठिबा आहे. मात्र देशी - विदेशी दारू विक्रीला शासन परवानगी देतं तर, हातभट्टीच्या दारूला बंदी घालते. त्यामुळे शासनाने संपूर्ण दारूबंदी करावी अन्यथा हातभट्टीच्या दारू विक्रीलाही परवानगी द्यावी असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.
चंद्रपुर येथे बोलताना रामदास आठवले यांनी दारुबंदीसंदर्भात विधान केलं. संपूर्ण दारुबंदी अशक्य असल्य़ाचं दिसून येत आहे. त्यामुळे दारू विक्रीला परवानगी मिळणारच असेल, तर फक्त विदेशी दारूलाच का? हातभट्टीच्या दारूला का नाही? असा सवाल रामदास आठवलेंनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाचे दारूबंदी संदर्भातलं आजवरचं धोरण पाहता संपूर्ण दारूबंदी होणं अशक्य आहे. त्यामुळे शासनानं व्यसनमुक्ती कार्यक्रमावर भर द्यावा. आमचा दारूबंदीला पाठिबा आहे. मात्र देशी - विदेशी दारू विक्रीला शासन परवानगी देतं तर, हातभट्टीच्या दारूला बंदी घालते. त्यामुळे शासनाने संपूर्ण दारूबंदी करावी अन्यथा हातभट्टीच्या दारू विक्रीलाही परवानगी द्यावी असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.
चंद्रपुर येथे बोलताना रामदास आठवले यांनी दारुबंदीसंदर्भात विधान केलं. संपूर्ण दारुबंदी अशक्य असल्य़ाचं दिसून येत आहे. त्यामुळे दारू विक्रीला परवानगी मिळणारच असेल, तर फक्त विदेशी दारूलाच का? हातभट्टीच्या दारूला का नाही? असा सवाल रामदास आठवलेंनी केला आहे.

वाहन चालकाचा मृतदेह आढळला
by खबरबात
पडोली येथील एका धाब्यावर कोटेश्वर शंकरराव काळे (वय ४५) या वाहन चालकाचा मृतदेह संशयास्पद आढळला. ट्रकचालक काळे यांनी वर्धेवरून ट्रकने पडोली येथे २७ रोजी आले होते. आज २८ रोजी पडोली येथील धाब्यावर असलेल्या खाटेवर मृत अवस्थेत दिसुन आले.
Sunday, January 27, 2013

कु-हाडीने वार करून निर्घृण हत्या
by खबरबात
बल्लारपूर - क्षुल्लक
वादातून दाम्पत्याने एकावर कु-हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा शेतशिवारात घडली. भाऊजी बाबूला ढोंगे (वय ५५) असे मृताचे
नाव आहे.

दारुबंदीसाठी जेल सत्याग्रह
by खबरबात
चंद्रपूर, जिल्ह्यात दारुबंदीसाठी अॅड. पारोमिता
गोस्वामी यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकत्र्यांनी जेल सत्याग्रह करीत अटक करवून घेतली.
अॅड. गोस्वामी व त्यांचेसह १७७ महिला पुरुषांनी जामीन नाकारल्याने नागपूर कारागृहात
रवानगी करण्यात आली. १२ डिसेंबर २०१२ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महिन्यात
चंद्रपूर जिल्हा दारुबंदीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत शासनाने
आपले वचन न पाळल्याने ता. १३ जानेवारी २०१३ रोजी सत्याग्रहाची शपथ घेत प्रजासत्ताक
दिनाचे दिवशी जेल सत्याग्रह जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज जिल्हा भरातून हजारो महिला
पुरुष जेल सत्याग्रहांसाठी उपस्थित झाले. ता. २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय
ध्वजारोहणासाठी जात असतांना पोलिसांनी सावरकर चौकातच पोलिसांनी अटकाव केला व सत्याग्रहींना
धरपकड सुरु केली. या धरपकडीत व ओढातान झाल्याने २५ ते ३० महिलांना किरकोळ इजा झाली
काही महिलांच्यासाड्या ङ्काटल्यात पोलिसांनी अटक करून सोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र
सत्याग्रहींनी जेलचिच मागणी केली. जामीन नाकारले त्यामुळे पोलिसांनी २७२ सत्याग्रहींना
अटक करण्यात आली. त्यात पुरूष व १९२ महिला आहेत, यातील ९५ महिलांना जामीन दिल्याने
उर्वरित १७७ सत्याग्रहीना जेलमध्ये टाकण्यात आले. महिला सत्याग्रहींना नागपूर कारागृहात
तर पुरुष सत्याग्रहींना चंद्रपूर कारागृहात ठेवण्यात आले. शासनाच्या विवेक बुद्धीला
आवाहन करण्याच्या हेतुने हे आंदोलन करण्यात आले. सत्याग्रहींनी जामीन घ्यावा यासाठी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर.पाटील, यांनी प्रयत्न केले. पृथ्वीराज चव्हाण
यांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचे माङ्र्कतीने सत्याग्रहीचे मन वळविण्याचा प्रयत्न
केला. मात्र अॅड. गोस्वामी यांनी जामीन घेण्यास इन्कार केला. आदोलनाला जेष्ठ सामाजीक
कार्यकत्र्यां डॉ. राणी बंग यानी भेट दिली. चंद्रपूर येथील सामाजीक कार्यकर्ते जयश्री
कापसे, डॉ.
गोपाल मुंधडा, पप्पु देशमुख, प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश्वर दुधपचारे, आदींनी पालक मंत्री संजय देवतळे यांची
भेट घेऊन सत्याग्रहींच्या आंदोलनावर भूमिका घेण्याची विनंती केली. आज जामीन दिलेल्या
९५ महिलांनी घरी जाण्यास नकार देऊन पोलिस स्टेशन मध्येच ठाण मांडून कारागृहात ठेवण्याची
मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रहींना पाठींबा देण्यासाठी धरणे आंदोलन
सुरु करण्यात आले.,

गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं निधन
by खबरबात
वर्धा: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वर्ध्यातील चेतनविकास या त्यांच्या फार्महाऊसमध्ये बंग यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकूरदास बंग ९५ वर्षांचे होते.
ठाकूरदास बंग यांचा अलिकडचा परिचय म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांचे ते वडील होते. बंग यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी चार वाजता राहत्या घरीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ठाकूरदास बंग यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला होता. भारत छोडो, खादी आणि सर्वोदय चळवळीत ठाकूरदास बंग यांचा मोठा सहभाग होता.
स्वातंत्र्य चळवळीतील बंग यांच्या योगदानासाठी १९९२मध्ये त्यांना माजी राष्ट्रपती के.शंकरनारायणन यांच्या हस्ते जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर प्रतिष्ठित नाग भूषण या पुरस्कारानेही त्यांचा २०१२मध्ये गौरव करण्यात आला होता.
ठाकूरदास बंग यांचा अलिकडचा परिचय म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांचे ते वडील होते. बंग यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी चार वाजता राहत्या घरीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ठाकूरदास बंग यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला होता. भारत छोडो, खादी आणि सर्वोदय चळवळीत ठाकूरदास बंग यांचा मोठा सहभाग होता.
स्वातंत्र्य चळवळीतील बंग यांच्या योगदानासाठी १९९२मध्ये त्यांना माजी राष्ट्रपती के.शंकरनारायणन यांच्या हस्ते जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर प्रतिष्ठित नाग भूषण या पुरस्कारानेही त्यांचा २०१२मध्ये गौरव करण्यात आला होता.

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द
by खबरबात
पालकमंत्री ना.संजय देवतळे
चंद्रपूर दि.26- गेल्या 62 वर्षात देशाने
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करुन जगभर नाव लौकिक मिळविला आहे. याच काळात महाराष्ट्र राज्याने जनकल्याणाच्या
विविध योजना आखून व त्याची योग्य अंमलबजावणी करुन सामान्य मानसाला विकासाच्या
प्रवाहात आणले आहे. आपल्या जिल्हयातही
विकासाचे अनेक कामे प्रगती पथावर असून जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन
कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.संजय देवतळे यांनी केले. या विकास
कार्यात जिल्हा वासियांनी सहभागी व्हावे
असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
यावेळी जिल्हा
परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, महापौर संगीता अमृतकर, आमदार सुधीर मुनगंटीवार,
शोभाताई फडणवीस, नाना शामकुळे, माजी खासदार शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी विजय
वाघमारे, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अरुण शिंदे, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर,
निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, उपविभागीय अधिकारी आशितोष सलील व विविध
विभागाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक
दिनाच्या मुख्य समारोहात ते जिल्हा वासियांना संबोधित करीत होते. सर्व प्रथम पालकमंत्री देवतळे यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आपल्या
शुभसंदेशात देवतळे म्हणाले की, शासकीय योजनांचा लाभ
घेण्यासाठी आधार नोंदणी अतिशय महत्वाची
झाली असून चंद्रपूर जिल्हयात पहिल्या टप्प्यात 5 लाख 70 हजार 702 तर दुस-या टप्प्यात 2 लाख 47 हजार 263 असे एकूण 8
लाख 17 हजार 965 नागरीकांची आधार नोंदणी झाली आहे. जिल्हयात हे काम जलगतीने होत असून त्यासाठी 148
मशिन कार्यरत आहेत. नागरीकांनी आपल्या
जवळच्या केंद्रावर जावून नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर येथे शासनाने वैद्यकिय
महाविद्यालय मंजूर केल्याचे सांगून ही जिल्हयासाठी मोठी उपलब्धी असल्याचे देवतळे
म्हणाले. ब्रम्हपूरी , राजूरा, वरोरा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तर
पोंभूर्णा व जिवती येथे 30 खाटांचे रुणालय मंजूर करुन शासनाने नागरीकांच्या उत्तम
आरोग्याची सोय केले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयातील ऐतिहासिक व
पुरातत्विय महत्व असलेल्या स्मारकाचे जतन व दुरुस्तीचे कामे जिल्हयात मोठया
प्रमाणात सुरु असल्याचे सांगून माणिकगड किल्ल्याच्या देखभाल व दुरुस्तीवर 4 कोटी
खर्च होणार असल्याचे देवतळे म्हणाले. जिल्हयातील प्रदुषणाचे गुणांकन कमी
करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाल्याचे
पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या नव्या औद्योगिक
धोरणाचा उल्लेख करुन पालकमंत्री म्हणाले की, या धोरणाचा लाभ लहान उद्योगांना होणार
आहे. जिल्हयात नव्याने येवू पाहणा-या
उद्योगातून जिल्हयात 11 हजार 161 कोटीची गुंतवणूक अपेक्षित असून यातून 6 हजार
लोकांना रोजगार मिळणार आहे.
चंद्रपूर शहर पंचशताब्दी अंतर्गत
शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून पायाभूत
सुविधा, नव्याने विकसित भागात पाणी वितरण व्यवस्था व शहरातील मुख्य मार्गावरील
भुमिगत विद्युत वाहिणीचे काम करण्यात येणार आहे.
यामुळे चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक
विभाग मुंबई विभागा पुरताच केंद्रीत होता. त्याचे विकेंद्रीकरण करुन विभागीय
स्तरावर सांस्कृतिक विभागाचे कार्यालय सुरु करण्यात आले. यात नागपूर, औरंगाबाद व पुणे या शहराचा समावेश आहे. प्रत्येक जिल्हयामध्ये सांस्कृतिक महोत्सव
साजरा करण्यासाठी शासनाने प्रत्येकी 5 लाख रुपयाचा निधी जिल्हयांना मंजूर केला
असून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणा-या सांस्कृतिक पुरस्काराच्या रक्कमेत
दुप्पटीने वाढ केली असल्याचे देवतळे म्हणाले.
जिल्हयाचा विकास आराखडा तयार
करणा-या जिल्हा वार्षिक योजनेतून 112 गावाच्या पेयजल योजनेसाठी 8 कोटी रुपये खर्च
केला असून ग्रामीण व शहरी भागातील
नागरीकांना सामाजिक न्याय विभागाने 8 हजार 500 घरकुलाचे वाटप केल्याचे त्यांनी
सांगितले. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नौबध्द घटकांच्या
स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना सुरु
केली असून याचा लाभ बचत गटांनी घेण्याचे आवाहन देवतळे यांनी केले.
यासोबत कृषी, शिक्षण, महात्मा
गांधी तटामुक्त गाव, शिक्षण हक्क कायदा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आदिवासी
बांधवांचा विकास, आरोग्य, सामुहिक प्रोत्साहन योजना आदिचा त्यांनी आपल्या भाषणातून सविस्तर आढावा घेतला. जिल्हयातील नागरीकांनी या
विकास कार्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या
कार्यक्रमात पोलीस विभाग, होमगार्ड विभाग, शाळा व स्काऊड गाईड आदिनी उत्कृष्ट परेड
संचलन करुन मान्यवरांना सलामी दिली.
त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे, जिल्हा परिषदेची वक्तृत्व स्पर्धा,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, हरित सेना पुरस्कार व वैयक्तिक
स्वरुपाच्या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर जिल्हा पोलीस विभाग
चंद्रपूर तर्फे कराटयाचे प्रात्यक्षिक व जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर व्दारे
खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सामुदायिक कवायतीमध्ये मासपीटी, डंबेल्स व
लेझिमचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. या सोहळयास शहरातील असंख्य नागरीक मोठया
संख्येने उपस्थित होते.
मुख्य समारोहा पूर्वी
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचे
हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Friday, January 25, 2013

बंडु धोतरे यांना ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’
by खबरबात
पुण्याच्या मुक्तांगण संस्थेतर्फे सन्मान
चंद्रपूरः मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डाॅ. अनिता अवचट यांच्या स्मृतीदिनानिमीत्य दवर्षी 10 फेब्रुवारी रोजी मुक्तागंण परिवारातर्फे ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’ दिले जातात. वैयक्तिक आयुष्यात व सामाजीक क्षेत्रात संघर्ष करणाÚया व्यक्तीची यासाठी निवड केली जाते.
चंद्रपूर जिल्हयात इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने पर्यावरण रक्षणासाठी व सामाजीक क्षेत्रात करित असलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी मुक्तागंण संस्था, पुणे च्या विश्वस्त मंडळाने या वर्षीचा पुरस्कार इको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडु धोतरे यांना देण्याचे ठरवीले आहे. मानचिन्ह व रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी साडे दहा वाजता एस. एम. जोशी सभागृहात मुक्तागण संस्था, पुणे व्दारा आयोजीत कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जाईल. यावेळी डाॅ. आंनद नाडकर्णी हे बंडु धोतरे यांचेशी संवाद साधणार आहेत. असे एका पत्रान्वये संस्थेच्या विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर यांनी कळविले आहे.
चंद्रपूरः मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डाॅ. अनिता अवचट यांच्या स्मृतीदिनानिमीत्य दवर्षी 10 फेब्रुवारी रोजी मुक्तागंण परिवारातर्फे ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’ दिले जातात. वैयक्तिक आयुष्यात व सामाजीक क्षेत्रात संघर्ष करणाÚया व्यक्तीची यासाठी निवड केली जाते.
चंद्रपूर जिल्हयात इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने पर्यावरण रक्षणासाठी व सामाजीक क्षेत्रात करित असलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी मुक्तागंण संस्था, पुणे च्या विश्वस्त मंडळाने या वर्षीचा पुरस्कार इको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडु धोतरे यांना देण्याचे ठरवीले आहे. मानचिन्ह व रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी साडे दहा वाजता एस. एम. जोशी सभागृहात मुक्तागण संस्था, पुणे व्दारा आयोजीत कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जाईल. यावेळी डाॅ. आंनद नाडकर्णी हे बंडु धोतरे यांचेशी संवाद साधणार आहेत. असे एका पत्रान्वये संस्थेच्या विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर यांनी कळविले आहे.

खेडुले कुणबी समाज स्नेहमीलन सोहळा
by खबरबात
चंद्रपूर, : खेडुले कुणबी समाजाच्या वतीने स्नेहमीलन सोहळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभ ता. २८ रोजी स्थानिक खेडुले कुणबी समाज भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दहावी आणि बारावीमध्ये ७५ टक्के गुण, तर पदवीधर ६० टक्के गुण प्राप्त विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा होईल. दुपारी एक वाजता हळदीकुंकू कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खेडुले कुणबी समाजाच्या अध्यक्षांनी केले आहे.

