সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 22, 2015

११ प्रजातीचे बेडूक आढळले

चंद्रपूर जिह्ल्यातील बेडकांवर प्राथमिक अभ्यास पूर्ण 

उन्हाळा संपताच सगळीकडे पावसाची वाट आतुरतेने बघतात,तसेच उभयचर प्राणी म्हणजेच बेडूक सुद्धा पावसाची वाट बघत असतात.बेडकांचे जीवनच पावसावरच अवलंबून असल्यासारखे आहे असे म्हटले तरी चालेल,पावसामुळे जीवसृष्टी अगदी न्हाऊन निघतात,सगळीकडे हिरवळ पसरते,झाडांना नवी पालवी फुटते.नद्या नाले,डबक्यात पाणी साचण्यास सुरवात होते व त्याच प्रमाणे बेडकांच्या कारकिर्दीची नव्याने सुरवात होते.

चंद्रपुरातील वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे व त्यांचे सहकारी पावसाला सुरवात होताच बेडकांच्या शोधत त्यांची जंगलातील परिसरात भटकनतीस सुरवात होते.पावसाळ्यात प्रत्येक ठिकाणी पाणी भरल्याने जमिनीतील प्राणी बाहेर निघतात,त्यात बेडूक ,साप ,घोरपड हे प्राणी पावसात जास्त आढळतात,डबक्यात पाणी साचल्याने "डराव....डराव" हा बेडकांच्या विशिष्ठ आवाज त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.
बेडकानबद्दल माहित देतांना वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे म्हणाले कि बेडूक हा उभयचर प्राणी असून ४३ प्रजाती महाराष्ट्रात तर २२४ प्रजाती भारतात आढळतात,त्यापैकी ११ प्रजाती ह्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात त्यात काही दुर्मिळ प्रजातीचा समावेश आहे त्यात fungoid frog (Hylarana malabarica) हा पशिम महाराष्ट्रात प्रामुख्याने त्याच वास्तव्य आहे,हा frog अतिशय देखणा असून त्याचे अस्तित्व चंद्रपुरात जिह्ल्यात सुद्धा असल्याचे ह्या अभ्यासात लक्षात आले,तसेच indian ballon frog (uperodon globulus ) चे अस्तित्व चंद्रपुरात जिह्ल्यात असून हा बेडूक सुद्धा दुर्मिळच असल्याचे लक्षात आले,ह्या बेडकांचे अस्तित्व काही विशिष्ठ ठिकाणी असल्याने यांना दुर्मिळ समजल्या जाते,त्याचे वैशिठ्य असे कि त्यांची शरीराची रचना हि फुग्यासारखी असल्याने त्याला ballon frog असे म्हणतात.
पावसाळा हा बेड्कांसाठीचा मिलनाचा काळ असतो,प्रत्येक बेडूक हा मादीला आकर्षित तो त्या वेळी त्याच्या गळ्याच्या खाल्याचा भागातून तो फुग्यासारख गळा फुगवतो व एक विशिष्ठ प्रकारचा आवाज काढतो त्याला vocal sac म्हणतात.बेडकाची जीवनक्रिया हि सुरवातीला अंडी पाण्यात देतात,त्याच्यानंतर त्याचे tadpol मध्ये रुपांतर होते त्यावेळी ते एका मासोळी सारखे दिसते,त्याच्यानंतर बेडकात रुपांतर होते,ह्या प्रक्रियेला metamorphoses असे म्हणतात.बेडूक हा जमिनीवर आणि पाण्यावर राहतो,सहसा बेडकांना पाणी पिण्याची गरज भासत नाही,जेवढ पाणी बेडकाला लागत तेवढ ते खाध्यातुंच भेटत.बेडकांचे खाद्य हे किडे,छोटे बेडूक,earth warm ,मासोळी,कोळी हे आहे.
चंद्रपूर जिह्ल्यात indian ballon frog ,narrow mouthed frog ,fungoid frog ,क्रिकेट फ्रॉग,स्कीप्पार फ्रॉग ,बुल फ्रॉग ,painted frog ,कॉम्मोन टोड,indian burrowing frog ,tree frog ,skittering frog ह्या जातीचा समावेश प्रथम अभ्यासात आढळले.
झपाट्याने बेडकांची संख्या दिवसेन दिवस कमी होत चालली आहे त्याचे संवर्धन करणे फार गरजेचे आहे,बेडकांवर अजूनही जुजबी सर्वेक्षण व्ह्यायला पाहिजे ,त्यासाठीच वन्यजीव अभ्यासकांनी बेडकांचे अधिवास नष्ट होऊ नये याच्यासाठीचे प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
बेडकांच्या अभ्यास गटात वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे,जितेंद्र नोमुलवार,नयन कुंभारे,प्रशांत श्रीकोतवार,रणवीर सिंग गौतम,सुयोग नागराळे,सोनू माध्यासवार,पूर्वेश गजभे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.