সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 23, 2015

स्पर्धक संपविण्यासाठी केली हत्या

नागपूर- वैरण विक्रीच्या व्यवसायातील स्पर्धा संपविण्यासाठी व्यापाऱ्याच्या मुलाने प्रतिस्पर्धी व्यावसायिक व त्याच्या मेहुण्याचा गळा चिरून हत्या केल्याचे तपासांत उघड झाले. रॉकी ऊर्फ अंकुश प्रभाकर शेंद्रे (वय 27) असे आरोपीचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाचा 24 तासांत तपास करण्यात गुन्हे शाखेला यश आले.

तरोडीत परिसरात पुनात्री हेमराज गौतम व त्याचा मेहुणा सोमेश्‍वर पटेल या दोघांचा शुक्रवारी खून झाला. या प्रकरणी रॉकी ऊर्फ अंकुश प्रभाकर शेंद्रे (वय 27, रा. जुना बगडगंज, धावडे मोहल्ला) याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्‍त रंजनकुमार शर्मा यांनी घटनेची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुनात्री हेमराज गौतम (वय 36, रा. भरतवाडा) हे मूळचे सडकअर्जुनी (जि. गोंदिया) येथील. ते वैरण विक्रीचा व्यवसाय करीत होते. यात त्याच्या पत्नीचा भाऊ सोमेश्‍वर लक्ष्मण पटले (वय 25, रा. पळसगाव डोहा, ता. सडकअर्जुनी. जि. गोंदिया) हा मदत करायचा. रॉकी ऊर्फ अंकुश प्रभाकर शेंद्रे यांच्याही वडिलाचा वैरणाचा व्यवसाय आहे. पूर्वी पुनात्री त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करायचे. पुनात्रीचा व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती आल्याने प्रभाकर शेंद्रे चिडले होते. त्याने मुलगा
रॉकीला व्यवसाय सांभाळण्यास सांगितले. रॉकी शेंद्रे याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो मूळचा आळशी असल्यामुळे नोकरी शोधत नव्हता. वडिलाने कामधंदा करण्यासाठी बजावले. यानंतर तो खापरीतील विजयराज बारमध्ये बाउंसरचे काम करीत होता. वडिलाच्या चिथावणीमुळे त्याने व्यवसायातील स्पर्धक संपविण्यासाठी पुनात्रीचा खून करण्याचे ठरविले. शुक्रवारी दुपारी अडीचला पुनात्रीला फोन करून शेतातील गवत कापायचा ठेका द्यायचे असल्याचे सांगून तरोडी येथे बोलावले. पुनात्री आणि सोमेश्‍वर हे दोघेही तेथे पोहोचले. दोघेही येताच शेत दाखविण्याचा बहाणा करीत रॉकीने सोमेश्‍वरचा मागून चाकूने गळा चिरला. हे दृश्‍य पाहून पुनात्री पळायला लागला. पाठलाग करून लोखंडी रॉडने रॉकीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याचाही चाकूने गळा चिरला. चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडाने ठेचले. सायंकाळी सहाच्या सुमारास मजुरांना दोघांचेही मृतदेह दिसले. त्यांनी नंदनवन पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी तेजराम हेमराज गौतम (भाऊ) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.