সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 11, 2015

परदेशी पक्ष्यांचा परतीचा प्रवासाला सुरवात

चंद्रपुर- गुलाबी थंडीचीचाहूललागताच चंद्रपुरातील पाणवठे आणि जलाशय परदेशी पक्ष्यांनी नटू लागतात दरवर्षी मंगोलिया, पोलंड, सायबेरिया आणि युरोप खंडातून पक्षी आपल्याकडे हिवाळी स्थलांतर करतात  आणि फेब्रुवारी- मार्च दरम्यान मायदेशी प्रस्थान करतात. त्यांच्या दुर्मिळ नोंदी आणि छायाचित्रणा करिता पक्षीमित्रांची एकच धडपड सुरु असते आणि  स्वखर्चाने जिल्ह्यातील विविध संस्थांशी संलग्नीत  कित्येक पक्षिमित्र  हे काम चोखंदळपणे बजावत असतात. सध्या थंडी नुकतीच सरली असून परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्याचे थवे मायदेशी परतण्यासाठी आकाशात सरसावत आहे. सध्या 'परतीचा प्रवास'  झाला असून आपणांस  जलाशायांवर पक्ष्यांची कमी होत असलेली विविधता निदर्शणास येऊ शकते. 
         दिवसें दिवस घसरत असलेली पक्ष्यांची संख्या आणि  नामशेष होत चाल लेल्या त्यांच्या प्रजाती हा जगभरातील पक्षी अभ्यास कां साठी गंभीर विषय आहे. पण २०१४-२०१५ ही वर्ष चंद्रपुर जिल्ह्यातील दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी करिता सुगीची ठरली आहे. यंदा चंद्रपुर जिल्ह्यातील पक्षिमित्र दिनेश खाटे,स्वप्नील कारेकर,पप्पी यादव,प्रसाद चट्टे,निखिल झाडे,वनदीप रोडे,चेतन साव, सुमेध साखरे, विक्की पेटकर इत्यादी वन्यजीव अभ्यासकांनी जिल्ह्यातील पाणपक्षी विविधतेचा आढावा घेतला. त्या करिता अभ्यासकांच्या चमूने सलग चार महिने जिल्ह्यातील विवध पाणवठ्यांवर स्थलांतरित पक्ष्याचे नोंदी घेतल्या. 
          सदर अभ्यासादरम्यान त्यांना युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्ड, पिनटेल, शोवेलर, गडवाल, युरेशिअन टील इत्यादी रानबदके मुबलक संख्येत आढळली तसेच दुर्मिळ असलेली कॉमन पोचार्ड ही या वेळी टिपल्या गेली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात या आधी न पाहिले गेलेले अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचीही प्रथम नोंद सदर अभ्यासातून झाली. प्रथम नोंद झालेल्या पक्षीसुचीत हिमालय ओलांडून मंगोलियाहून येणाऱ्या पट्टकादंब अर्थात बार-हेडेड गूजचा ४०० हून अधिक थवा आढळून आला. तसेच विदर्भात फक्त अमरावती, भंडारा, गोंदिया जिह्ल्यात दिसणारे कलहंस (Grey-lag Geese) या वर्षी चंद्रपूर मध्ये पाहिल्या गेले. मात्र थेट सायबेरिया, रशियन प्रांतातून येणाऱ्या 'क्रौंच' (Eurasian Common crane) पक्ष्याची नोंद ही जिह्ल्यासाठी सर्वोत्तम ठरली. तब्बल दशकानंतर एवढ्या मोठ्या संख्येत क्रौंच पक्षी विदर्भात पहावयास मिळाला. सुमारे ३५ क्रौंच पक्ष्यांनी हल्लीच चंद्रपूर मध्ये हजेरी लावल्याने अभ्यासकांच्या चमूस सुखद धक्का बसला. कारण यापूर्वी सन २००० मध्ये अमरावती येथील कुणा एका पक्षीमित्रास केकतपुर जलाशयावर ३६ क्रौंच आढळल्याचा उल्लेख एका संशोधनपत्रात नमूद आहे. मात्र त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येत क्रौंच विदाभात कुठेच पहिल्या गेले नव्हते. वाढते औद्योगीकरण, अधिवासातील र्हास, अवाजवी कीटनाशकांचा वापर, अवैध मासेमारी यांच्या दुषप्रभावामुळे सर्वत्र क्रौंच पक्ष्यांच्या संख्येत घट दिसू लागली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत क्रौंच जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, पक्षीमित्रांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
       सद्यास्थित स्थलांतर संपले असून पक्षी मायदेशी प्रस्थान करण्यास सुरवात झाली आहे. परंतु अकाली पाउस, वादळ उद्भवल्यामुळे हवामानातील बदलाचा फटका ही यावेळी पक्ष्यांना परतीच्या प्रवासा दरम्यान सोसावा लागणार आहे अशी माहिती पक्षीमित्र दिनेश खाटे यांनी दिली. तसेच   घेतलेल्या सर्व नोंदीचा अहवाल आपण पक्षी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेत सादर केला असून लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षीसुची प्रकाशित होत असल्याची  माहिती त्यांनी दिली. तसेच घेतलेल्या सर्व नोंदिकारिता त्यांनी चंद्रपूर वनविभाग, मार्गदर्शक आणि आपल्या चमूतील सर्व निरीक्षकांचे आभार मानले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.