काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 29, 2017

विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन

विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी  -
गडचिरोली माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील पिडीत आपल्या न्याय मागण्यांना घेउुन विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी  ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता येथील जटपुरा गेट लगतच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाच्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने वादग्रस्त तोतया कर्मचारी ‘मंडळ निरीक्षकावर’ तातडीने एमआयआर दाखल करावा, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील नोंदीत सुरक्षा रक्षकाचे गत २२ महिन्यांचे वेतन व लेव्ही संदर्भातील वसुलीची कारवाई तातडीने करावी, १०३ नोंदीत सुरक्षा रक्षकांना मंडळामार्फत विविध आस्थापनामध्ये तातडीने सुपर्द करावे, बिल्ट पेपर उद्योगातील नोंदित माथाडी कामगारांना मंडळामार्फत कामाच्या आणी लेव्ही व वेतनाच्या संदर्भातील वसुलीची कारवाई करावी, बिल्ट येथील नोंदीत माथाडी कामगारांच्या वसुलीदाव्या संदर्भात जाणीवपूर्वक प्रलंबित दावा सुनावणी संघटनेच्या उपस्थित घ्यावी, चंद्रपूर येथील रेल्वे माल धक्यावरील कामगारांना मंडळ कंत्राटदार व कामगा यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे तातडीने वेतन मिळावे व कराराची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी, मंडळ निरीक्षक कुरेशीद्वारे षडयंत्र करुन कामावरुन काढलेल्या अनिल जुनघरे यांना पूर्ववत मागील वेतन व लेव्हिसह कामावर घेण्याचे निर्देश त्वरीत देण्यात यावे, बेकायदेशीरपणे सेवाजेष्ठता डावलून आणि सुरक्षा रक्षक मंडळाची प्रतिक्षा यादी डावलून कुरेशीद्वारे करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चैकशी करुन रामदास मिलमिले याची अवैधपणे केलेली नियुक्ती तातडीने रद्द करावी आदींसह विविध मागण्यांना घेउुन पिडीत कामगार विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलनावर बसणार आहेत.

गुरुदेव प्रचारक प्रवास

गुरुदेव प्रचारक प्रवास

अड्याळटेकडी येथील गीताचार्य तुकारामदादा यांच्या १०३ व्या जयंती कार्यक्रमनिमित्य वरोरा तालुक्यातील उमरखेडा या छोट्याश्या गावातून गुरुदेव प्रचारक भाऊरावजी वैद्य यांच्या नेतृत्वात ४९ गुरुदेवभक्त मोटारसायकलने वरोरा ते अड्याळटेकडी प्रवास करतांना..  




भाजपचे पंच बंडखोर

भाजपचे पंच बंडखोर

केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध आंदोलनाचे दंड थोपटणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, खासदार राजू शेट्टी, खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे येत्या रविवारी (3 डिसेंबर) रोजी अकोल्यात एकत्र येत आहेत.
अकोल्यात कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषद होत असून या निमित्याने हे दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून हे शेतकरी नेते केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करणार असल्याने या परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कुंडलीत दोष निर्माण झाला आहे. सामान्यत: राहू-केतू संबंधित व्यक्‍तीला जाचदायक ठरत असतात, असे जाणकार सांगतात. या राहू आणि केतू यांचे नाव प्रत्येकाने वर्षानुवर्षे अशा वाईट संदर्भातच ऐकले असल्यामुळे ते दोघे बिचारे चांगलेच बदनाम झाले आहेत.
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कशी ढासळली, महागाई कशी वाढली येथपासून जीएसटीची अंमलबजावणी कशी चुकीची, याचे सध्या भारतात लागू असलेली जीएसटी हे उत्तम उदाहरण ठरावे, असेही यशवंत सिन्हा यांनी  सांगितले. दुसऱ्या “शॉटगन सिन्हा’नीही बिहारमध्ये भोजपुरी भाषेत “गएली सरकार तोहरी’ असे नागरिक आता म्हणू लागले असल्याचे त्यांच्याच भाषेत सांगितले.
वास्तविक दोन्ही नेते पक्षात ज्येष्ठ आहेत.
स्वकियांविराेधातच बंडाचा झेंडा फडकविणारे भाजपचे खासदार नाना पटाेले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे विदर्भात लवकरच नव्या समीकरणांची नांदी हाेणार असल्याचे संकेत अाहेत. सत्ताधारी भाजपविरुद्ध अांदाेलनाचे रान पेटविणाऱ्या ‘स्वाभिमानी’ च्या खांद्याला खांदा लावत साेयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भात लवकरच माेठे अांदाेलने उभे करण्याची रणनिती उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास झालेल्या बंदव्दार चर्चेत घडल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पूर्व विदर्भात खासदार पटाेले हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अाक्रमक भूमिका घेऊन लढणारे नेते म्हणून अाेळखले जातात. तर पश्‍चिम विदर्भात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अाक्रमक अांदाेलने करणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख आहे.
 भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारात त्यांनी मंत्रिपद भूषविले आहे. तांत्रिकदृष्ट्या ते अद्यापही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे सरकार व पक्षाच्या नीती आणि धोरणांसदर्भात काही तक्रार असेल तर पक्षाचे व्यासपीठ त्यांना उपलब्ध आहे. ते आपला मुद्दा मांडू शकतात, चुका दुरूस्त करू शकतात. पण तसे सोडून ते जाहीरपणे सरकारचे वाभाडे काढत आहेत व तेही विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरून! महागाई, भ्रष्टाचार, नागरिकांना नोटाबंदीमुळे झालेला त्रास आणि आता जीएसटी यावरून आम्हाला त्यांची काळजी आहे, हे भासविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणतेही सरकार सत्तेवर असले तर त्यावेळचे विरोधक हे सरकारच्या विरोधात अशीच शाब्दिक आतषबाजी करत असतात आणि जनतेच्या हिताची त्यांनाच चाड असल्याचा आव आणत असतात. कॉंग्रेसने जेव्हा जीएसटीच्या दिशेने पावले उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा खुद्द भाजपनेही अशीच आगपाखड करत कुभांड रचले होते. आज मात्र त्याच पक्षाने जीएसटी आणली व आता त्याची वकिलीही करत आहे. याउलट कॉंग्रेसने विश्‍वामित्री पवित्रा घेतला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी सरकारने सर्व पक्षांशी चर्चा केली होती. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आताही जीएसटीबाबत निर्णय घेण्यासाठी जी प्रमुख समिती आहे, त्यातही सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना काही अयोग्य वाटत असेल तर किंवा काही बदल आणि सुधारणा हवी असेल तर आपल्या नेत्यांच्यामार्फत ते तसे सूचवू शकतात आणि बदल करून घेऊ शकतात. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात एखादी बाब सरसकट लागू करायची असेल तर काही चुका आणि दुरुस्ती होणारच. ते समजले पाहिजे. मात्र, राजकारणच करायचे ठरवले तर केवळ बोंब मारण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. तोच प्रकार सध्या सुरू आहे. सर्व सहमतीने काही करायचेच नाही, हा स्थायीभाव झाला असल्यामुळे आणि काही करत असताना पहिले माझे काय ही वृत्ती असल्यामुळे कोणताही निर्णय खुल्या मनाने स्वीकारला जात नाही. दोन्ही सिन्हांना मोदी सरकारच्या नव्या निकषांनुसार लाल दिवा मिळाला नाही, हे खरे आहे. किंबहुना लाल दिवा तर दूरच अशा तापदायक मंडळींना संसदेतच येऊ द्यायची नाही, अशी चोख व्यवस्थाही त्यांचे तिकीट कापून करण्यात आली होती. मात्र, नंतर दबाव किंवा थोडी सामंजस्याची भूमिका घेत मोदी व शहांनी पडती बाजू घेतली. त्याचा त्यांना जाच होतो आहे. कॉंग्रेस पक्ष असो अथवा अन्य विरोधक आपला वापर करून सोडतील, याची या नेत्यांना कल्पना नाही, अशातला भाग नाही किंवा जनतेला आपली सुप्त इच्छा समजत नसेल असे मानून ते चालले आहेत, अशातलाही भाग नाही. पण बऱ्याचवेळा स्वार्थामुळे अथवा कोणाच्या प्रती द्वेषभावनेमुळे डोळ्यावर जी पट्टी बांधली जाते ती महाभारत सुरू झाल्याशिवाय काही उतरत नाही. सिन्हा मंडळींची ही खदखद भविष्यात भाजपला किती नुकसानदायक ठरते ते पाहावे लागेल.

२९/११/२०१७
गोंडेगाव येथे केंद्र क्रीडा स्पर्धा

गोंडेगाव येथे केंद्र क्रीडा स्पर्धा

पारशिवणी : पंचायत समिती अंतरंगत वराडा केंद्रातील शाळांचा केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक
शाळा गोंडेगाव येथे पार पडला यामध्ये वराडा केंद्रातील ११ शाळांनि सहभाग घेतला वरिष्ट गटांमध्ये गोंडेगाव व कांद्री शाळेच्या खेळाडूंनी विजय मिळविला तर कनिष्ठ गटांमध्ये बखारी व येसंबा खेळाडूंनि विजय मिळविला संस्कृतिक कार्यक्रमामध्ये वराडा शाळेच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळविला या प्रसंगी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून साटक जिल्हा परिषद सदस्य कल्पना चहांदे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोंडेगाव ग्राम पंचायत सरपंच नितेश राऊत तर प्रमुख पाहुणे उपसरपंच विनोद सोमकुंवर,कन्हान नगर परिषदेचे नगराध्यक्ष शँकर चहांदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास वाघाडे,ग्राम पंचायत समस्त सदस्य,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा अगस्ती केंद्र प्रमुख वराडा यांनी केले.संचालन वामन पाहुणे यांनी तर आभार प्रकाश रंगारी यांनी मानले,कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुभाष महादूले,रमेश पाटील,देविदास दामेधर,गुलचंद मोहने,प्रेमचंद राठोड,रेखा पिपरेवार,भावना काळाने,मीना भीमटे,छाया मुसळे,दीपा शेंडे,मेश्राम मॅडम,बेलसरे,
नागपुरे,चंदनखेडे,काकडे,मडावी,कांडलकर सलामें,दांडेकर यांनी सहकार्य केले
पोंभुर्णा कृउबास संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावे

पोंभुर्णा कृउबास संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावे

माजी सभापती कवडू कुंदावार यांची मागणी

पोंभूर्णा प्रतिनिधी : पोंभुर्णा कृउबास संचालक मंडळाचा कार्यकाल पूर्ण होवून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. तरीपण पूर्ववत मुदतवाढ न देता शासन नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी माजी सभापती कवडू उंदरूजी कुंदावार यांनी केलेली आहे.
           पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आल्यानंतर प्रथम सभापती पदावर कवडू कुंदावार हे दि.२४. ८. २००९ ते २६. ४. २०१२ पर्यंत कार्यरत होते. तद्नंतर निवडणूक होवून विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल दि.२६ | ४ |२०१२ ते दि. २६ | ४ | २०१७ पर्यंत पूर्ण झालेला आहे. या मुदतीमध्येच नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडणे गरजेची होती. परंतू विद्यमान संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ ही बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचे मत माजी सभापती कवडू कुंदावार यांनी व्यक्त करून बाजार समितीवर प्रशासक नेमावे अशी मागणी संबंधीताना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
             

"समाजकारण,राजकारण आणि मानव"

"समाजकारण,राजकारण आणि मानव"

या पृथ्वी तलावर अनेक सजीवांपैकी बुद्धिवान प्राणी म्हणून या मानव जातीस ओळखतात,अनेक वर्षांपासून हा मानव स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे,जीवन एक संघर्ष म्हणून सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत धावपळीत जीवन जगत आहे,हा मानव सध्यस्थीतीला मी आणि माझं या दोनच गोष्टींसाठी अतूट प्रयत्न करतांना दिसत आहे.
    समाजासाठी लढणारे,स्वतःच्या अस्तित्वासाठी नाहीतर या समाजासाठी वेळ देणारे लाखतले एक असतात,समाजावर संकट उभारलं तर धाव अनेक घेतील पण त्या धाव घेण्यात वर्चस्व साधणारे,स्वार्थ साधणारे समाजसेवक आज घडीला निमार्ण झाले आहेत,अश्या समाजसेवकांना कोणत्या अंगाने समाजकार्य करतो म्हणावं,एखाद संघटना,संस्था उभारली की त्या संस्थानाच्या छताखाली आपले अनुयायी लादून घेणारं अन आपल्या परीने आपलं बळ निर्माण करणार,वर्चस्व निर्माण करणार,आणि पुढील भविष्यासाठी (स्वतःच्या) लढा देणार हे निर्माण झालेली समाजातील व्यथा,खरतर ही व्यथा "नवऱ्याने मारल अन पावसाने झोडपले, दाद कुणाकडे मागायचं.?"अशीच आहे.

    गावपातळीवर एकदा कार्यकर्ता उभारतो,आपल्या गावासाठी झगडतो, अन वरील पुढारीच्या दावणीला बांधलं जात याला काय अर्थ ?,एक छोटंसं उधाहरण,एका गावात गणपत पाटील आमदार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता,साहेबांसाठी तळमळीने कार्य करतो,गावात एकही मत दुसरी कडे जाता कामा नेये यासाठी तुटून कार्य करतो,मग आमदार साहेब अश्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांकडून आपलं मोठं स्वप्न उभारत,पाच वर्षांनंतर गणपत पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवाव या साठी आमदाराला भेटतो, आमदार म्हणतो तुझं जागा फिक्स,फॉर्म च्या शेवटच्या दिवशी गणपत पाटलाला वाड्यावर बोलावून डाव खेळतो अन गणपत पाटलांचा अर्ज भरणे थांबतो,स्वतःच्या नातेवाईकांतील एकाला उमेदवारी  देऊन पुन्हा गणपत पटलांसारख्या कार्यकर्त्यांना उभारून तेही निवडणूक जिंकतो, असेच क्रम चालू असते, गणपत पाटील पुन्हा पुढच्या पाच वर्षांनी तिकिट विचारतो पुन्हा नातेवाईक येतो पून्हा पक्षासाठी काम करतो,अस चालत चालत गणपत पाटील शेवटी संपला मात्र त्याला न कुठली निवणूक लढवता आलं नाही ना कुशल अस्तित्व,ही परिस्थिती अजचीच आहे, प्रत्येक नेता प्रत्येक पुढारी आमचा वापर करत आहे हे आजचे तरुण वर्ग विसरून चालणार नाही,साहेब साहेब म्हणून आपण आजही या पांढऱ्या पुढाऱ्यांच्या चपला सांभाळत गुलामीत जीवन जगत आहोत,एखाद्या भाकरीच्या तुकड्याची आश्या बाळगून कुत्रा सारख मागे फिरत आहोत,साहेब बी चालाक कुत्रांना कधी उपाशी ठेवत नाही,उपाशी ठेवलं तर दुसरा काही बदल पडणार नाही केवळ झेंडा बदलतो,माणसे तीच विचारसरणी तीच,आश्या तीच.ही मानसिकता कुठून निर्माण झाली या मानव जातीला, का असा स्वार्थपणाला कवटाळून बसलाय हा समाज,कोणी वाली नसेल का याला,मग अस म्हणावं लागेल या देशात माणुसकी नावाचा शब्द कोलमडून गेला,नामशेष झाला,असे म्हणायला काही वावग ठरणार नाही.

    या बुरसटलेल्या विचारसरणीतुन हा माझा समाज(मानव जात) किती दिवस प्रवास करणार अन यात त्यांचं काय साध्य होणार,खायचे आणि दाखवायचे दात वेगळे का असतात,अश्वासनांनी लोकांचे बुद्धी भ्रूष्ट करणारे हे लोक कोण? हा सर्वसामान्य नगरिकांचा प्रश्न आहेत,निःस्वार्थ जीवनाचा स्वास कधी कोणाला मिळाला नाही,ना कधी कोणाला देऊ इच्छितात,हा माझा समाज,हा आपला समाज म्हणत केवळ मिरवून चालत नाही तर त्यास आपलेपणाची उब देणे त्या नेत्यांच, त्या पुढार्यांचं काम नव्हे का..?,खरतर या मानव जातीला पैश्याच वेड ग्रासले आहे,या नोटा साठी आज हा असा जीवन जगत सुटलाय,त्या तुपड्या रुपया साठी हा मानव स्वतःच्या भावाला देखील गजाआड करतोय,मायेचं ममतेच हात म्हणून कधी कुणाच्या खांद्यावर ठेवत नाही,याला कसे म्हणावं माणूस..? बहिणाबाई चौधरी म्हणतात, "माणूस रे माणूस तुझी नियत बेकर,तुझ्या विना बरा गोठ्यातला जनावर",बहिणाबाईंने या माणसांच्या हावेला गोट्यातल्या जनावरांपेक्षा पलीकडची उपमा दिली,जनावरांना दिलेल्या चाऱ्यात गुरे समाधान तर व्यक्त करतात,मात्र हा माणूस कितीही मिळालं तरी आपली झोळी मात्र अजूनही समोरच असते,हीच मानसिकतेतून या देश्यात राजकीय पुढाऱ्यांचा जन्म होत आहेत.

   मग अश्या अवस्थेत या तरुण वर्गाचं कार्य काय, तर तरुणांनी अश्या भ्रष्ट राजकीय व सामाजिक कार्यांच्या नावावर लुबाडणाऱ्या दृष्ट राजकारणी माणसापासून दुरच राहिलेलं बर, दूर म्हणण्यापेक्षा अश्या नेत्यांना वेळीच ठेचून काढणे काळाची गरज आहे,ठेचून म्हणजे वैचारिक दृष्टीने,समाज संघर्षाने आणि युवा शक्तीने,आपल्याला मिळालेल्या अधिकाराणे,आपला लढा केवळ सत्याच्या दिशेने,अहिंसेचा मार्गाने व सामाजिक दृष्टीने एक पाऊल स्वतःपासून सुरवात करु आणि अश्या दृष्ट नेत्यांकडून होणाऱ्या संविधानाचा,अभिव्यक्तीचा ऱ्यास थांबवण्यासाठी लढा देऊ,हेच लढा शाहिद भगतसिंग यांनी दिल होता ,हाच लढा भगवान बिरसा मुंडानी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभारला होता,याच मार्गाने आपलाही लढा असला पाहिजे,समाज कार्य म्हणजे,महापुरुषांच्या झीजलेल्या आयुष्यातून दिसते, स्वतः अस्तित्व मिटवून हा प्रख्यात समाज स्थापने म्हणजे समाजकार्य होय,याच पार्श्वभूमीवर महात्मा फुलेंनी आपल्या पत्नी सावित्रीमाईंना एक सांख्यिक उधाहरण देऊन समाज कार्याची ओळख पटवून दिले,सावित्रीमाई कडून एका ज्वारीचे दाण मातीत रुजवण्यास लावले व त्यास खतपाणी घालून तब्बल सहा महिन्यांनी त्या बियाणाचे रोपट्यात व रोपटीचे झाडात निर्माण होऊन,त्यास एक कनस उगवले ,सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबांनी ते कणस आणण्यास सांगून त्या कनसात सुरवातीचा पेरलेला बियाणे शोधण्यास लावले,यावरून ज्योतिबा म्हणतात सावित्रीमाईंना की जो माणूस या बियांना सारख स्वतः झीजतो आणि कनसरुपी समाजाला उभा करतो न तोच खरा समाजसेवक आणि तोच कार्य मला अपेक्षित आहे,यावरून त्यांनी केलेल्या कार्याची,व उभारलेल्या चळवळीची शोभित चित्र दिसते...
 
लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
              मदनूर जि. कामारेड्डी
              मो.८००७८७००२६

 
पीक विम्याचा लाभ कधी

पीक विम्याचा लाभ कधी


  • संतप्त शेतकऱ्यांच्या तहसीलदारांना प्रश्न ;
  • पीक विमा योजनेचा लवकरच तालुक्यात होणार सर्व्हे : अक्षय पोयाम


पारशिवणी ::
शेतकऱ्याच्या हितार्थ केंद्र शाषणाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधान मंत्री पीक विमा योजनेचे तीन तेरा वाजल्याचे दाखले तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात देत आहेत.या योजने अंतर्गत तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी धान पिकाला विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी १,९०० रुपयांचा प्रीमियम चा भरणा केलेला होता.पिकावर संकट आल्याने पिकाची मोठ्या प्रमानात हानी झाली ज्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनि विमा योजनेकडे डोळे रोखून धरले होते पण ना हाती पीक आल ना पीक विमा योजनेचा लाभ ज्यामुळे तालुक्यातील बोर्डा येथी संतप्त शेतकऱ्यांनी पारशिवणी तहसीलदार अक्षय पोयाम यांची भेट घेतली.

आयसर व ट्रक कंटिनेर अपघातात एक मृत..!

आयसर व ट्रक कंटिनेर अपघातात एक मृत..!

गजेंद्र डोंगरे

कोंढाळी:-  (दि.२९/नोव्हें) राष्ट्रीय महामार्गावरुन गोंडखैरी-हिंगणा वळन रस्त्यावरच गोंडखैरी परिसरात मंगळवारी रात्रीच्या साडेनऊच्या दरम्यान आयसर व ट्रक कंटिनेरच्या धडकेत सेफेक्स कंपनिचे आयसर क्रं.एम,एच.४०-५०३७ आयसर वाहनचालक नरेंद्र रामदास भगत वय ४७ वर्षे राहणार दवलामेठी(हेटी)आठवामैल,वाडी रोड नागपुर हा सेफेक्स टपाल कुरीअर कंपनीचा वाहनचालक असून बुट्टीबोरी मिहान इंडस्ट्रीज मधून येत असतांनी हिंगणा वळन रस्त्यावरच विरुद्ध दिशेने वेगाने येत असलेले ट्रक कंटिनेर क्रं.एच.आर.५५ क्यु.७३०४ या दोघांमध्ये आमने-सामने जब्बर धडक बसल्याने आयसर वाहनचालक नरेंद्र भगत जागिच घटनास्थळी मृत्यू झाले.व ट्रक कंटिनेर वाहनचालकांचे दोन्ही पाय तूटल्याची प्राप्त माहीती असून दोन्ही गाडी भिडल्याने आयसर ट्रक कंटिनेर वेगवेगळी करण्यासाठी  क्रेनच्या मदतीने वेगळे करुन त्यांना गाडीच्या बाहेर काढून त्यांना ताबडतोब  मेडिकल नागपुर येथे उत्तरीय तपासणी करीता ताबडतोब नेण्यात आले. पुढील तपास सूरु आहे.
तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा

तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा

कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण-
अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५) याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत येथील सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. २९) फाशीची शिक्षा सुनावली. तर संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची जिल्हा न्यायालयाच्या आवारात तुडूंब गर्दी जमली आहे.
कोपर्डी येथील नवनीत शिकणारी निर्भया (नाव बदललेले आहे) गतवर्षी १३ जुलै रोजी  सायंकाळी साडेसहा वाजता भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. आपल्या आजोबांच्या घरुन मसाला घेऊन परतत असताना वाटेत तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तिचा निघृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने पोलिसात फिर्याद दिली होती. मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला घटनेनंतर पळताना फिर्यादीने पाहिले होते. त्याची दुचाकीही घटनास्थळी आढळली. तो पुरावा घटनेत महत्त्वपूर्ण ठरला. विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी तिनही दोषींना फाशी देण्याची मागणी केली होती.
या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. न्यायालयाने आज पप्पू शिंदे याला अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार (पोक्सो) दोषी धरले. दोष सिद्ध झाल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांना कट रचणे, गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे या कलमांखाली दोषी धरण्यात आले. त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 
घटनेनंतर १ वर्षे चार महिन्यात निकाल 
नगर येथील  स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या घटनेचा तपास करुन घटनेनंतर ८५ दिवसांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. घटनेनंतर १ वर्षे चार महिन्यांनी निकाल लागला. हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी लढविला़ जितेंद्र शिंदे याच्यासाठी न्यायप्राधिकरणाने अ‍ॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैलुमे याच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी हा खटला लढविला.

Tuesday, November 28, 2017

चंद्रपूर जिल्हा पोलीस वार्तापत्र

चंद्रपूर जिल्हा पोलीस वार्तापत्र


पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीमेतंर्गत अवैध दारूविक्रीच्या जिल्हयात
एकुण 22 केसेस:-
महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याात दिनांक 01/04/2015 पासुन दारूबंदी घोषीत
करण्यात आलेली असुन पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात विशेष मोहीम राबवुन दिनांक
27/11/2017 चे 00ः01 ते 23ः59 वाजता पर्यंत जिल्ह्याात पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर शहर,
बल्लारशाह, दुर्गापुर, वरोरा, भद्रावती, ब्रम्हपुरी, चिमुर, नागभीड, तळोधी, मुल, पाथरी, सिंदेवाही, धाबा,
गोंडपिपरी, गडचांदुर हददीत एकुण 1,05,710/-रू ची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला एकुण 22 गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन 05 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
---------------------------------------------------------------------------------
❖ रोडवर धोकादायक स्थितीत वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करनाऱ्या  वाहन धारकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेषन बल्लारशाह:-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन बल्लारशाह अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
बल्लारशाह येथे अप.क्र.1152/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर
गुन्हयातील 01 आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास बल्लारशाह पोलीस करीत आहे.
--------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन नागभीड:-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत 02 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अश स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
नागभीड येथे अप.क्र. 441/2017 व 442/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील 02 आरोप ना अटक करण्यात आली असुन पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
--------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन चिमुर:-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चिमुर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन चिमुर येथे अप.क्र. 654/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.
--------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन पाथरी:-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन पाथरी येथे अप.क्र. 211/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.
--------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन पडोली:-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन पडोली अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन पडोली येथे
अप.क्र. 420/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01
आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.
--------------------------------------------------------------------------------

पोलीस स्टेशन वरोराः-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत 03 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
वरोरा येथे अप.क्र. 1410/2017, 1411/2017 व 1412/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद
करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 03 आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
--------------------------------------------------------------------------------
❖ मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या  मद्यपी वाहन चालकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहरः-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप.क्र. 1571/2017 कलम
184, 185 मोवाका अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आली असून पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन भद्रावतीः-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत 04 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप.क्र. 1089/2017,
1090/2017,1091/2017 व 1092/2017 कलम 185 मोवाका सह 279 भादंवि अन्वये गुन्हे नोंद
करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास भद्रावती
पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन माजरीः-
दिनांक 27/11/2017 रोजी पोलीस स्टेशन माजरी अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेशन माजरी येथे अप.क्र. 394/2017 कलम 185
मोवाका सह 279 भादवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आली असून पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------
❖ प्रतिबंधक कारवाई:-
दिनांक 27/11/2017 रोजी जिल्ह्यात कलम 107 दंड प्रक्रिया संहिता अन्वये 11, कलम 110 दंड
प्रक्रिया संहिता अन्वये 01, कलम 110/117 मुंबई पोलीस कायदा अन्वये 01, कलम 93 मुंबई पोलीस
कायदा अन्वये 02 असे एकुण 15 ईसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
--------------------------------------------------------------------------------
❖ मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई:-
दिनांक 27/11/2017 रोजी जिल्ह्याात मोटार वाहन कायदा अन्वये अवैद्य प्रवाषी 08,
ओव्हरलोड/ओव्हरसिट 08, रिफलेक्टर/नोपार्किंग 18, दारू प्राषन 06, इतर केसेस 397 एकुण 437
केसेस करण्यात आल्या आहेत. 
 महत्वाच्या घडामोडी

महत्वाच्या घडामोडी

  • नागपूर : आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
  • यवतमाळ : पुसद तालुक्यात कवडीपूर तांडा येथे वीज वितरणच्या पथकावर गावक-यांनी सकाळी हल्ला केला. यात सहायक अभियंता जखमी झाले. वीज कर्मचा-यांनी घटनेचा निषेध केला असून याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
  • गडचिरोली : खुनातील आरोपीची नक्षल्यांकडून हत्या, दोन वर्षांपासून होता फरार.
     
  • अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  नराधमास जन्मठेप
    नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  एका ५५ वर्षीय नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


    • नागपूर विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकांमध्ये शिक्षण मंचाला धक्का
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला.