काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 04, 2019

चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचे महान कार्य केले, आजची स्त्री सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे, आज स्त्रियांची जी प्रगती दिसते ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे, म्हणून सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य जीवनभर स्मरणात ठेवावे असे मनोगत मा. महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिका येथे साजरा करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
 याप्रसंगी विद्येची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर श्री. अनिल फुलझेले, उपयुक्त श्री. गजानन बोकडे, नगरसेविका सौ. डुकरे, श्री. गोस्वामी, डॉ. अंजली आंबटकर,अनिल घुले, आशिष जीवतोडे, गिरीश पात्रीकर, सारंग निर्मळे, तुकड्यादास डुमरे, नामदेव राऊत, दानव, जनबंधू ,अतुल भसारकर उपस्थित होते.
कोंबड्यांसाठी २५ हजार ऑनलाइन अर्ज

कोंबड्यांसाठी २५ हजार ऑनलाइन अर्ज

कऱ्हाड - 
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे कुक्‍कुटपालन योजनेत कुक्‍कुटपक्ष्यांसाठी राज्यातून तब्बल २५ हजारांवर ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यामधील केवळ ७८८ लाभार्थ्यांना कुक्‍कुटपालनासाठी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून कुक्‍कुटपालनासाठी अनुदानावर कुक्‍कुटपक्ष्यांचे वाटप लाभार्थ्यांना केले जाते. हे वाटप अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण व ३३ टक्के महिला अशा वर्गवारीने केले जाते. एक हजार पक्षी पालनासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला या योजनेतील रकमेच्या ५० टक्के, तर राखीव प्रवर्गातील लाभार्थ्याला या योजनेच्या ७५ टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा;आधी वापरून बघा मग विश्वास करा
गेल्या काही वर्षांपासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, शासन त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करत नसल्याच्या तक्रारी आहेत. यंदा या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील ४९८, विशेष घटक योजनेमधून मागासवर्गीय २९० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत मागणीचा वाढलेली आकडेवारी लाखांच्या घरात पोचली आहे. सुमारे २५ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी कुक्‍कुटपालन योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्या तुलनेत मिळणारा लाभ हा हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. कुक्‍कुटपालन योजना अनुदानाचा लाभ देण्यासाठी या वर्षासाठी सर्वसाधारण गटासाठी ७११ लाभार्थ्यांसाठी सात कोटी ९९ लाख ८७ हजार ५०० रुपये, तर विशेष घटक योजनेतून ४१४ लाभार्थ्यांना सहा कोटी ९८ लाख ६२ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून ११२५ लाभार्थ्यांसाठी १४ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, सध्या ३० टक्के निधी कपात केल्याने दहा कोटी ४८ लाख ९५ हजार रुपये उपलब्ध होणार असून, त्यातून ३३७ लाभार्थी कमी झाले आहेत.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा;आधी वापरून बघा मग विश्वास करा 


सोडतही ऑनलाइनच! 
शासनाने यंदापासून कुक्‍कुटपालनासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात केली आहे. त्यात रेशनिंग कार्डावरील सर्वांचीच नावे भरावी लागत आहेत. त्यामुळे आता एका कुटुंबातील एकालाच अर्ज करता येत आहे. संबंधित दाखल झालेल्या अर्जांची सोडतही आता ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहे.

स्त्रोत:सकाळ 
नागपूर;भीषण अपघातात दोघांचा मृत्यू ७ गंभीर

नागपूर;भीषण अपघातात दोघांचा मृत्यू ७ गंभीर

खापरखेडा/प्रतिनिधी:

 राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूलावर जाण्यासाठी वेकोली कर्मचाऱ्यांची बस वळण घेत असताना भरधाव वेगाने वाकी दरबारातून दर्शन घेऊन नागपूर कडे जाणाऱ्या टवेरा कारने जोरदार धडक दिल्याने टवेरा गाडीत बसलेल्या 2 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर इतर 7 जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.30 सुमारास दहेगाव रंगारी राष्ट्रीय महामार्ग परिसरात घडली.

 मोहम्मद रफिक मोहम्मद शफीक अन्सारी वय 18 व शेख नूर मोहम्मद शेख रहीम वय 18 दोघेही राहणार यशोधरा नगर नागपूर अशी मृतांची नावे असून इरफान हबिबल्लाह अन्सारी वय 15, मोहम्मद रईस मोहम्मद सईद अन्सारी वय 20,  रियाजुद्दीन अन्सारी सलाउद्दिन अन्सारी वय 16, शमीम आखतर शफीक अहमद वय 18, ग्यासुदिन अन्सारी सलाउद्दिन अन्सारी वय 18, शेख आसिफ शेख अजीज वय 24,  बाबू उर्फ शोहेब अन्सारी वय 17 सर्व राहणार यशोधरा नगर नागपूर अशी गंभीर जखमींची नावे आहेत वाकी दरबारात दर्शन व गुरुवारी रात्री कव्वालीचा कार्यक्रन बघण्यासाठी सर्व मित्र वाकीला टवेरा कार क्रमांक एमएच-12-जीझेड-1393 गेले होते.
 या  7 जनावर शासकीय रुग्णालय नागपूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे खापरखेडा पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून बसचालक फरार आहे खापरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहे.
मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा 6 रोजी नागपुरात

मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा 6 रोजी नागपुरात

नागपूर/ प्रतिनिधी:
विदर्भातील अनेक ऐतिहासिक मोडी लिपीतील दस्तावेज वाचता यावेत, यासाठी नागपूर येथे मोडी लिपी अक्षर ओळख ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
रविवार, दिनांक  6 जानेवारी ला 11 ते 2 यावेळेत आंबेडकर काॅलेज, दीक्षाभूमी, नागपूर येथे ही कार्यशाळा होइल.
महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाचा वारसा जपणा-या मोडीलिपीरूपाने अस्तित्वात असलेले साहित्य लिहता व वाचता यावे, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती मोडी लिपी अभ्यासक नविनकुमार माळी यांनी दिली.
मोडी लिपी ही देवनागरीची शीघ्र लिपी आहे. अगदी स्वातंत्र्य काळापर्यंतचा सर्व व्यवहार व कागदपत्रे मोडीतून असल्यामुळे मोडीत बराच इतिहास दडलेला आहे. तो जगासमोर आणण्यासाठी या कार्यशाळेचा लाभ होइल.
अधिक माहिती नोंदणीसाठी
8830555199 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आणि म्हणून मका महागला;अन पोल्ट्रीफीड झाले महाग

आणि म्हणून मका महागला;अन पोल्ट्रीफीड झाले महाग

नाशिक/प्रतिनिधी:
आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्‍याला अळीने लक्ष्य केले. ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

जून २०१७ मध्ये लष्करी अळीच्या नुकसानीची नोंद झाली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०१७ मध्ये ही अळी तांदूळवाडी (जि. सोलापूर) येथे आढळली. अळीच्या नुकसानीचा वेग यातून स्पष्ट होतो. विशेष म्हणजे, इंदापूर (जि. पुणे) येथील शेतकऱ्याच्या रब्बी मक्‍याचे या अळीने ७० टक्के नुकसान केले आहे. संसदेत सरकारने कर्नाटकमध्ये ८१ हजार, आंध्र प्रदेशात एक हजार ४३१, तेलंगणात एक हजार ७४०, तमिळनाडूत ३१५ हेक्‍टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याची माहिती दिली. पण महाराष्ट्रातील नुकसानीची पुसटसा उल्लेख झाला नसल्याने शेतकरी, अभ्यासकांत राज्य सरकार, कृषी विभागाच्या एकूण कार्यपद्धतीविषयी नाराजी पसरली आहे. महाराष्ट्रात लष्करी अळीने किती नुकसान केले, त्याची माहिती यंत्रणा-सरकारकडे आहे काय? असल्यास ती केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यात आली का, असे प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 


महाराष्ट्रात दीड हजार हेक्‍टर क्षेत्र
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर महाराष्ट्रात दीड हजार हेक्‍टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाली. याच विभागाच्या संकेतस्थळावर गेल्या महिन्यातील उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ३०८ हेक्‍टर मक्‍याच्या, तर सोलापूर जिल्ह्यातील १२० हेक्‍टर ज्वारीवर अळीने डल्ला मारला. जळगावमधील १४८, सोलापूर ५०, बुलडाणा ११० हेक्‍टर मक्‍याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव जाणवला असून, २१ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना नियंत्रणासंबंधीची जनजागृती करण्यासाठी एसएमएस पाठविल्याचे संकेतस्थळावरील अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुळातच कर्नाटकमधील १३ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी ८१ हजार हेक्‍टर क्षेत्र लष्करीने बाधित केले असल्याने शेजारील महाराष्ट्रासाठी धोक्‍याची घंटा असल्याचे स्पष्ट होते.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

मका उत्पादनात २० टक्के घट
देशात खरिपात यंदा ७९ लाख हेक्‍टरवर मक्‍याची लागवड झाली. त्यापासून १५० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यात मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा या राज्यांचा हिस्सा अधिक असेल. शिवाय रब्बीमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामधील १६ लाख हेक्‍टरमधून ५० लाख टन उत्पादन अंदाजित आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात वीस टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता असल्याने कुक्‍कुटपालन उद्योगाला चढ्या भावाने मका खरेदी करावा लागतो. देवळ्यात एक हजार ६५०, सांगली एक हजार ७५०, इरोड (तमिळनाडू) येथे एक हजार ८५० रुपये क्विंटल, असा मक्‍याचा भाव राहिला.

पोल्ट्री फार्मर हे वारंवार फीड कंपनीला नफा कमवायच्या मागे लागले आहेत व यातून डीलर जास्त नफा कमविणार असल्याचे आरोप करतात.मात्र या संपूर्ण प्रकारावरून पोल्ट्रीफीड का महाग झाले याचे कारण समजू लागले आहे. 
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 
मका-ज्वारी तिथं लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तांदूळवाडी (जि. सोलापूर) येथे मक्‍यावर, घोगाव (जि. सांगली) येथे उसावर आणि कागल (जि. कोल्हापूर) येथे ज्वारीवर या अळीची पहिली नोंद झाली. एखाद्या फवारणीत उसावर अळीचे नियंत्रण करणे शक्‍य आहे. मात्र, मका व ज्वारीवरील किडीच्या नियंत्रणासाठीची बाब गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे.
- डॉ. अकुंश चोरमुले, कीटकशास्त्रज्ञ

लष्करी अळीच्या झपाट्याने होणारा प्रादुर्भाव कसा रोखला जाणार? पुढच्या खरिपाचे काय, असे गंभीर प्रश्‍न तयार झाले आहेत. त्यादृष्टीने सरकार, यंत्रणा आणि विद्यापीठांनी शेतकऱ्यांना धीर द्यायला हवा.
- दीपक चव्हाण, कृषी अभ्यासक
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

स्त्रोत:सकाळ 
सदर वृत्त हे सकाळ वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.
कुक्कुटपालन व्यवसायातून महिला शेतकऱ्याची लाखोची उलाढाल

कुक्कुटपालन व्यवसायातून महिला शेतकऱ्याची लाखोची उलाढाल

नाशिक:
Millennial turnover of women farmers from poultry business | कुक्कुटपालन व्यवसायातून महिला शेतकऱ्याची लाखोची उलाढाल  
शेतीमधून मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही हे बघून त्यांनी पतीसमोर शेतीव्यवसायाबरोबर जोडधंदा करण्याची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही दाखविली. पतीनेही त्यांच्या कल्पनेचे आनंदाने स्वागत केले आणि सुरू झाला पोल्ट्री व्यवसाय. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असलेल्या व्यवसायाने आता मोठे रूप धारण केले असून, आज त्यांची वार्षिक उलाढाल किमान ८ ते ९ लाख रुपये इतकी आहे. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मनीषा भाऊसाहेब जाधव यांची. 

भाऊसाहेब जाधव हे शेती करतात. शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने पतीची ओढाताण होते, हे त्यांची पत्नी मनीषा यांच्या लक्षात आले. त्यासाठी शेतीला जोड व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले.. विचारमंथनानंतर कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय झाला आणि १९९६ साली प्राथमिक स्तरावर त्यास सुरुवात केली. 

विविध ठिकाणी भेटी देऊन व्यवसायाची सखोल माहिती घेतली. मनीषा यांनी शासनाच्या पशुसंवर्धन केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. सुरुवातीस जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ लाख रुपयांचे कर्ज घेत एकूण सुमारे ४ लाख रुपयांची गुंतवणूक करून ३१०० चौरस फूट जागेत शेड उभारले. सुरुवातीला २००० बॉयलर कोंबड्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. कोंबड्यांचे चांगले संगोपन करून त्यांची विक्री केली असता त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

पहिल्या प्रयत्नाला आलेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर व्यवसायाचा व्याप वाढविण्यास सुरुवात केली; मात्र २००२ मध्ये अचानक आर्थिक मंदीमध्ये अडकले. त्यावेळी त्यांनी १ रुपया किलोने कोंबड्यांची विक्री केली होती. त्यावेळी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाने दिलेला मानसिक आधार, इतर नातेवाईक व व्यापारी वर्गाने केलेली आर्थिक मदत या जोरावर मनीषा पुन्हा उभ्या राहिल्या, पुन्हा जोमाने व्यवसाय सुरू केला. आज मनीषा जाधव यांनी २०,००० चौरस मीटर जागेमध्ये आणखी ४ शेड उभे करून २० हजार कोंबड्यांचे संगोपन करत आहेत.

पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य घरी बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यासाठी लागणारे यंत्र खरेदी केले आहे. घरच्या कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य पुरवून आता त्या नाशिक शहर, मुंबई, ठाणे तसेच गुजरात येथेही कोंबडी खाद्य विक्रीसाठी पाठवतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ८ ते ९ लाख रुपये इतके आहे. कोंबडी खताचीसुद्धा त्या विक्री करतात. पुढील काही दिवसात शेडची संख्या वाढवून सुमारे एक लाख कोंबड्यांचे संगोपन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कुक्कुटपालन व्यवसायामुळे स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. कुक्कुटपालन व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहिले तर खरोखरच हा फायद्याचा शेतीपूरक व्यवसाय असल्याचे मनीषा जाधव सांगतात.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा 

सेवा:सदर वृत्त हे लोकमत वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.लोकमत -आकाश गायखे (नाशिक) 
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवा

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
संबंधित इमेज
जिल्ह्यात दारूबंदी कुठेच दुसून येत नाही. उलट महाराष्ट्राव्यतिरिक्त तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश हरियाणा येथील विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच राज्य सरकारने विदेशी दारूवर २५  टक्के उत्पादन शुल्क वाढ व राज्यात १ हजार ५०० परमीट रूम उघडण्याची घोषणा करीत राज्याच्या महसुलात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी चंद्रपूर लिकर असोसिएशनचे सल्लागार दीपक जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.

 जयस्वाल म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी होऊन  चार वर्षे पूर्ण होत आलीत. पण येथे दारूबंदी फसलेली आहे. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचप्रमाणे बनावटी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. पण ही बाब प्रशासनाने लपवून ठेवलेली आहे. त्याच जिल्ह्यात गांजा, अफीम, ब्राऊन शुगर पावडर याचे प्रमाण युवक वर्गात वाढले असून त्याला आळा बसणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासन आपले काम चोखपणे करीत असल्याचे सांगत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसती तर ठाणेदार छत्रपती चिडे यांची हत्या सुद्धा झाली नसती. याला सुद्धा दारूबंदीच कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

राज्यावर ५ लाख कोटी प्रक्षा जास्त कर्ज आहे. त्यातच राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलेली असून त्याचा बोजा तिजोरीवर प्रत्येक वर्षी २१ हजार ५०० कोटींनी वाढणार आहे. तेव्हा हा पैसा आणणार कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याची गंभीर दखल घेण्याची मागणी करीत ज्यामुळे राज्याच्या तिजोरीत ६०० कोटींची वाढ होईल असेही दीपक जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

ऑगस्ट 2018 पासून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित होते. ही वाढ करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आज अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त गाठला. उत्पादन शुल्कातील वाढ आजपासून अमलात आली असून, त्यामुळे व्हीस्की, स्कॉंच, वोडकाचे दर सरासरी 15 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. 

 ऑगस्ट 2018 पासून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित होते. ही वाढ करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आज अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त गाठला. उत्पादन शुल्कातील वाढ आजपासून अमलात आली असून, त्यामुळे व्हीस्की, स्कॉंच, वोडकाचे दर सरासरी 15 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. 

 यावेळी लिकर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा हरविंदरसिंग भाटीया यांच्यासह रामदास ताजने, विलास नेरकर, व्यंकटेश बालसनीवर, संजय रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
कडाक्याच्या थंडीच्या लाटेत  शेतपीके करपली

कडाक्याच्या थंडीच्या लाटेत शेतपीके करपली

कारंजा - काटोल तालुक्याचे शेतकरी पुन्हा हवालदिल
उमेश तिवारी/कारंजा वर्धा:
 राज्याच्या उपराजधानी सह उपराजधानीच्या लगतच्या वर्धा जिल्हा व नागपुर जिल्ह्यातील काटोल -तालुक्याच्या  सालई-नांदोरा खुर्सापार,सबकूंड, वाई -चिखली-कचारी सावंगा,बोरगाव,कोंढाळी,तरोडा;  सह लगतच्या वर्धा जिल्ह्याचे काजळी-जोगा हेटी;धानोली,मेट गरमसुर  या परिसरातील शेतीतील पीकांन वर २८,२९,३०डिसेंम्बर  चे रात्रीला पडलेल्या थंडिच्या कडाक्यात   शेतातिल मुख्यत्वे  करून तूर  -यापिकासह-मिरची--चना-कपाशी-व हळद  पीकांन वर करपा गेल्याने उभे पीक  शेतकर्यांचे हातून गेल्यात जमा आहे. खरीप आधीत हातून गेले,ज्या शेतकर्यांकडे थोडे फार पाण्याचे साधन होते या मुळे  काही पीक तूर हळद मिरची  कपाशी  तर  भाजिपाला बागयती   ०५-१%शेतकर्यांकडे होत्या त्या ही २८-व-२९डिसेंम्बर चे रात्रीच्या कडाक्याच्या थंडी च्या लाटेच्या प्रभावाखाली आल्याने या सर्व पीकांन वर करपा गेल्या मुळे संपुर्ण नागपुर व वर्धा जिल्ह्यालाच  पुर्ण दुष्काळग्रस्त जिल्हे घोषीत करन्याची मागणी कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे व उप सरपंच स्वप्निल व्यास व त्यांचे  सर्व ग्रा. प. सहकार्यांनी  केली आहे.तसेच काजळी चे शेतकरी साहेबराव घागरे यांनी मागणी केली आहे.

उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे जैसे थे : संबंधित विभागाचा अधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर

उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे जैसे थे : संबंधित विभागाचा अधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर

तुमसर (दि. २ जानेवारी) : 

रस्ते सरळ असावेत वळणमार्ग शक्यतो सरळ करावे असा रस्ते महामार्ग खात्याचा नियम आहे, परंतु तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाला जोडणारा रस्ता यु- टर्न करण्यात आला आहे. खापाकडून देव्हाडी रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक वाहने रेल्वे फाटक मार्गाएवजी देव्हाडी गावातील अंडरपास मधून जातात. त्यांना रेल्वे फाटकचा रस्ता दिसत नाही. तुमसर- खापा- गोंदिया रस्त्याचा फलक सुद्धा येथे लावण्यात आला नाही. नियमांना येथे बगल देण्यात आली आहे.

खापा मार्गाने येणाऱ्या वाहनांना देव्हाडी रेल्वे फाटक दिसत नाही. ती वाहने देव्हाडी रेल्वे स्थानकाकडे वळविण्यात येतात. पुढे गेल्यावर चूक लक्षात येते. ती वाहने देव्हाडी अंडरपास मार्गाने रेल्वे फटकाकडे वाळवितात. अंडरपास मधून वाहने बाहेर पडतांना धोका आहे. मार्गावरील वाहने येथून भरधाव वेगाने जातात.

यु- टर्न घेतांनी वाहनांना धोक्याची शक्यता आहे. अनेक लहान- मोठे येथे वहनांना अपघात झाले आहेत. रात्री येथे लाईटची सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन वाहन चालकांना पुढे कोठे जावे असा प्रश्न पडतो. चार रस्ते येथे असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने दुचाकी स्लिप होण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत किमान रेल्वे मार्ग दर्शविणारे फलक संबंधित विभागाने येथे लावण्याची गरज आहे.

सदर दि. ०२ जानेवारी, २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बी. आर. पिपरेवार यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून काम सुरू असलेल्या उड्डाणाच्या ठिकाणी जाऊन अभियंता यांचे लक्ष वेधले गेले तसेच त्यांना उड्डाणपुलाचा दोन्ही बाजूला पोचमार्गाचा आधी तथा जवळ रेडियम, माहिती फलक, किवी रिफ्लेकटर, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऐरोटेक्निन तथा रस्त्यावर आलेले झाडे झुडुपे काटने या मागण्यांचा समावेश होता. यावेळी अभियंत्यांना सुचविलेल्या मागण्या मान्य करून लवकरच पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळामध्ये वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, उपजिल्हाप्रमुख जगदीश त्रिभुवनकर, शिवसैनिक अमित एच. मेश्राम, तालुका प्रमुख गुड्डू डहरवाल, युवासेना तालुका अधिकारी संजू डहाके, शहर अधिकारी प्रवीण गुप्ता, कुणाल कनोजे आदी उपस्थित होते
सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मनोज चिचघरे/पवनी(भंडारा):

विद्या कृषी भुयार येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव घुमे साहेब, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री राऊत सर, लाखे सर,शेळके सर, माणिक मॅडम,यांनी स्थान भूषविले ,अथितींनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवभूषण वानखेडे ,तर आभार प्रदर्शन प्रज्वल गावंडे वर्ग ८वा ,यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कु.सुषमा बांडेबूचे, कु.सुरेखा लाडेकर यानी परिश्रम घेतले.
जांभुळघाट -नवतळा रोडचे बी.बी.एम. निकृष्ट दर्जाचे

जांभुळघाट -नवतळा रोडचे बी.बी.एम. निकृष्ट दर्जाचे

चिमूर /रोहित रामटेके:

ग्रामीण भागातील लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी गावापासून ते शहरापर्यंत जाण्यासाठी शासन रस्त्याची व्यवस्था करत असतो. पण ते रस्ते उत्कृष्ट दर्जाचे बांधण्याचे काम हे त्या कंपनी व ठेकेदाराचे असते,पण चिमूर तालुक्यातील जांभुळघाट ते नवतळा या रोडचे कामाचे अंतर ७ किलो मिटरचे अंतर असून तो रोड मागील अनेक वर्षांपासून खराब झालेला होता, पण आता त्या रोडचे काम करण्याला काही दिवसापासून सुरवात झालेली आहे. पण त्या डांबर रोडचे सुरवातीला बी.बी.एम. हे करावेच लागत असते,पण तेच बी.बी.एम.हे निकृष्ठ दर्जाचे बनवले आहे.
पिंपळगाव - वगळपेठ तसेच नवतळा ह्या गावातील लोक हे कोणतेही काम असले तरी ते जांभुळघाट या ठिकाणीच येत असतात पण रोडचे निकृष्ठ दर्जाचे काम झाल्यामुळे अनेक लोकांना प्रवास करण्यास खूप मोठा अडथडा निर्माण होत आहे. अनेक लोकांच्या गाड्या खराब झाल्या,तर अनेक लोक त्या रोड ने पायदळ सुद्या चालू शकत नाही इतक्या निकृष्ठ दर्जाचे रोडचे बी.बी.एम झालेले आहे.
रोडचे काम करीत असताना बी.बी.एम. हे समांतर अश्या स्वरूपामध्ये असायला पाहिजे, तसेच बी.बी.एम. बनवल्या पासून ते रोडला डांबर पसरवत पर्यंत रोडचे बी.बी.एम.उखडले नाही पाहिजे पण या सर्व गोष्टीच्या उलट झाले ले काम आहे. या सर्व प्रकरनाची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
अनाथांसोबत साजरा केला नवीन वर्ष;श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम

अनाथांसोबत साजरा केला नवीन वर्ष;श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम

चंद्रपूर/प्रतिनिधी:

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर नवनविन उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत असते याच समाजप्रति असलेल्या जानिवेच्या भावनेतून प्रतिष्ठान वतीने नविन वर्षाच्या स्वागत वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजाला वेगळी कलाटणी देण्याच्या अनुशंगाने करण्यात आला. नविन वर्षाच्या औचित्याने 01 जानेवारी मंगळवारला "आश्रय" निराश्रित बालकांचे संगोपन केंद्र या अनाथआश्रमात बालकांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला . सदर कार्यक्रमात मुलांच्या हस्ते श्री साईबाबांच्या फोटोला माल्यार्पण करून त्यांच्या कडूनच आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुलांसोबतच बौद्धीक चर्चासत्र घेऊन नववर्षाच्या उत्साहात सर्वांनी  पिक्चरच्या गाण्यांवर ठेका धरून  मुलां सॊबत सर्व प्रतिष्ठाच्या वरीष्ठ सदस्यापासून ते आश्रमच्या शिपायापर्यंत मनमुराद नृत्य करून त्यांना आपण सर्व एक असल्याची जाणीव करून दिली. नंतर मुलांना यथेच्छ  जेवणाचा आनंद लुटला व भेटवस्तू स्वीकार करून क्रूतध्णता  व्यक्त केली. सदर कार्यक्रमाला प्रतिष्ठाणच्या मार्फत मुलांना जेवणा सोबतच आश्रमाला धान्य, फळांचे दान करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या सचिन गाटकीने, नवीन कपूर, विनोद गोवारदिपे, प्रतीक लाड, सचिन इमले, पवन कामटकर, प्रमोद वरभे, सुरेश सातपुते, रुपेश महाडोळे, पंकज नागरकर, कृनाल खणके, भूषण कल्लूरवार, अँड मेघश्याम पडिशालवर, इंद्रायणी गाटकीने, आशा यादव, रोशनी काल्लूरवार, रीना राजकोंडावर, राधिका यादव, कुंदन त्रिनगरवार, आराध्या गाटकीने, अनिरुध्द यादव यांनी अभक परीश्रम घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीते प्रयन्त केले.प्रतिष्ठानच्या वतीने संचालक मंडळ व श्री थोटे  सर यांच्या आभार व्यक्त करण्यात आले.
 शालेय क्रिडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन

शालेय क्रिडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन

  गजेंद्र डोंगरे/बाजारगाव:

शिवा सावंगा हायस्कूल शिवाच्या प्रागंणात दि. 28/12/2018आणि29/12/2018ला दोन दिवशी विविध खेळाचे व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .यात विद्यार्थ्यांनी माेठ्या उत्साहाने कबड्डी,खो-खो,लंगडी अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला.तसेच सांस्कृतिक स्पर्धात विविध नृत्यांचा आविष्कार पहावयास मिळाला.दि.29/12/2018ला रोज शनिवारला ठिक 5.00वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.स्वागत समारंभानंतर विजेत्या चमूंना सर्टिफिकेटसह पारितोषिके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा सावंगा हायस्कूल शिवा व कै.पा.ना.गावंडे क.महाविद्यालय शिवाचे माजी प्राचार्य श्री.वाघमारे सरांनी केले.या कार्यक्रमाला लाभलेलेप्रमुख अतिथी नागपूर जिल्हा अँथेलेटिकक्स असोशियशनचे सचिव शरदजी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळाचे मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे राजकिय व सामाजिक जाण असलेल काँग्रेस पार्टीचेे प्रदर्श व प्रखर प्रवक्ते अतुलजी लोंढे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगताना भावी काळातील नव आवाहनांना झेलण्यास प्रोत्साहन दिले.विविध वक्त्यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला कृषक कल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री .सुनिलभाऊजी गावंडे,जय महाराष्ट्र चँनलचे पत्रकार तुषारजी कोहळे,शिवा सावंगा हाय.शिवा आणि कै.पां.ना.गावंडे कनिष्ठ महा.शिवाचे माजी प्राचार्य श्री.राऊत सर,इंदिरा गर्ल्स् हाय.कोंढाळीचे माजी मुख्याध्यापक श्री.इंगळे सर,साईनाथ हाय.अडेगावचे माजी शिक्षक मेटांगडे सर,शिवा सावंगा हाय.शिवा आणि कै.पा.ना.गावंडे कनिष्ठमहा.च्या प्राचार्या सौ.बरडे मँडम,साईनाथ हाय.अडेगावचे मुख्याध्यापक श्री.शेंडे सर,मासोद(का.)हाय.मासोदचे मुख्याध्यापक श्री.देशपांडे सर,इंदिरा गर्ल्स् हाय.कोंढाळीचे मुख्याध्यापक श्री.येडके सर,पर्यवेक्षकश्री.एन.एस.शेंडे सर,गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.कार्यक्रमाचे संचालन सौ.नेवारे मँडम यांनी पार पाडले.शाळेच्या शिक्षकाचे सहकार्य मोलाचे ठरले