चंद्रपूर - शहरातील अतिक्रमणदारांना सरंक्षण आणि त्यांचे व्यवसायाला संवर्धन देणारा 'वेंडर अॅक्ट' केंद्र सरकारने मंजूर केला असून, या कायदयाची अमंलबजावणी करण्यात यावी यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज (दिनांक 23 फेब्रु.)घेण्यात येत आहे.
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात श्रमिक एल्गारचे वतीने दुपारी 12 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री. दिपक मैसेकर राहणार आहे. या निमीत्ताने 'वेंडर अॅक्ट' या पुस्तिकेचे प्रकाशन चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास चंद्रपूर मनपाचे आयुक्त सुधिर शंभरकर, कामगार नेते विलास भोंगाडे, प्रा. डॉ. जयश्री कापसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
केंद्र सरकारने 2014 मध्ये शहरातील फुटपाथ व्यावसायीकांसाठी 'वेंडर अॅक्ट' मंजूर केला आहे, मात्र या कायदयाची अमंलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. विशेष म्हणजे या कायदयाची माहीतीही फुटपाथवरील व्यावसायीकांना अजूनपर्यंत नाही. ही माहिती या व्यावसायीकांना मिळावी तसेच या कायदयाचे अमंलबजावणीच्या दृष्टीने महानगर पालीका, नगर पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हयातील फुटपाथवरील व्यावसायीकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिध्दावार, महासचिव विजय कोरेवार यांनी केले आहे.