সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 09, 2012

बाबा आमटेंच्या स्मृतिदिनी आजपासून भारत जोडो अभियान

चंद्रपूर - राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता व पर्यावरण जनजागृतीसाठी देशातील तरुणाईंसमवेत संवाद साधण्यासाठी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "भारत जोडो अभियाना'ला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते काश्‍मीर व अरुणाचल ते गुजरात या दोन्ही "भारत जोडो अभियाना'त सहभागी झालेले सर्व युवक-युवती व संयोजकांचे बाबांच्या स्मृतिदिनी आनंदवनात गुरुवार (ता. नऊ) आणि शुक्रवारी (ता. दहा) 25 वर्षांनंतर सहकुटुंब स्नेहमिलनाचा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी देशातील सर्व प्रांतांचे अभियानातील प्रतिनिधी सहभागी होत आहेत. अभियानातील महाराष्ट्रातील सर्वात जास्त युवक-युवती सहभागी होते, या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अशोक बेलखोडे, अतुल शर्मा, महाराष्ट्राचे समन्वयक नफिसा, दगडू लोमटे, माधव बावगे यांनी केले आहे. तरुणाईला आव्हान देत व देशातील तरुणाईला जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यातील भेद दूर सारून सशक्त अखंड, एकात्म भारत निर्माणसाठी आवाहन करत बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली देशातील तरुणाईचे हात रचनात्मक व अहिंसात्मक कार्याकडे वळविण्यासाठी "हाथ लगे निर्माण में, नही मारने नही मॉंगने' "जोडो भारत जोडो भारत' घोषणा घेऊन ता. 24 डिसेंबर 1985 ते नऊ एप्रिल 1986 या दरम्यान कन्याकुमारी ते काश्‍मीर या 13 प्रांतातून 108 दिवसांत पाच हजार 42 किलोमीटर अंतर पहिल्या टप्प्यात पार केले. दुसऱ्या टप्प्यात ता. एक नोव्हेंबर 1988 ते 26 मार्च 1989 या दरम्यान अरुणाचल ते ओखा (गुजरात) या 15 राज्यांतून 122 युवक-युवतींनी सात हजार 546 किलोमीटर अंतर 148 दिवसांत पार केले.
या दोन्ही अभियानात सहभागी झालेले युवक-युवती देशभर आपापल्या भागात परत जाऊन राष्ट्र निर्माणाच्या सामाजिक कामात गुंतलेले आहेत. भारत जोडो अभियानाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे सर्व अभियानार्थी बाबांच्या स्मृतिदिनी सहकुटुंब एकत्र येऊन ओळखी दृढ करून आपापल्या कार्याचा आढावा घेऊन नवीन उपक्रमाबाबत चर्चा करून पुढील कार्याची वाटचाल निश्‍चित करणार आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.