काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 04, 2019

लाव्हा येथे ६० लक्ष रुपयाच्या विकास कामाचा भूमीपूजन समारंभ

लाव्हा येथे ६० लक्ष रुपयाच्या विकास कामाचा भूमीपूजन समारंभ

नागरीकांनी ग्रामपंचायतचे मानले आभार
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

लाव्हा ग्रामपंचायत अतंर्गत असणाऱ्या सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या व सिमेंट रस्त्याच्या विकास कामासाठी ६० लक्ष रुपयाचा भूमीपूजन समारंभ आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पं .स.उपसभापती सुजीत नितनवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला .लाव्हा येथील साई स्मृती अपार्टमेंटच्या मालकाने अपार्टमेंटचे सांडपाणी बाजुला असलेल्या खुल्या जागेवर सोडल्यामुळे तिथे घाण पाण्याची गटार तयार झाली होती . त्या सांडपाण्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली होती. तेथील रहीवाशांनी आंदोलन सुध्दा केले ही बातमी तरुण भारत मध्ये प्रकाशीत झाली होती .तसेच बकूताई नगरमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत होते त्याचा सुध्दा विषय तातडीने सूटण्याकरिता व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता सरपंच ज्योत्सना नितनवरे व पं .स उपसभापती सुजित नितनवरे यांनी आमदार समीर मेघे यांच्या कडे प्रश्न लावून धरला होता . आ . समीर मेघे यांनी या समस्याकडे तातडीने लक्ष घालून आमदार निधीतून ते काम पूर्ण केले .

व या सुध्दा कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली .साई स्मृती अपार्टमेंट व बकूताई नगर मधील नागरीकांनी ग्रामपंचायतचे आभार मानले .भुमीपुजन समारंभाला आमदार समीर मेघे, खंडविकास अधिकारी किरण कोवे , पं .स उपसभापती सुजित नितनवरे, जि .प. सदस्य प्रणिता कडू,वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे, सरपंच ज्योत्सना नितनवरे,उपसरपंच महेश चोखांद्रे, माजी सरपंच देवराव कडू ,नरेश चरडे,संजय कपनीचोर,पुरुषोत्तम रागीट ,नानाजी ठाकरे, साधना वानखेडे,सुनंदा चोखांद्रे, सुशिला ढोक ,मनोज तभाने,प्रशांत परीपवार,अनिल पाटील,रेखा पटले,मंजूषा लोखंडे,सुनिता मेश्राम,प्रकाश डवरे, पांडुरंग बोरकर , कमलाकर इंगळे, जया पीनकाटे , पुरुषोत्तम गोरे , सुनीता तडोसे प्रामुख्याने उपस्थित होते . संचालन ग्राम विकास अधिकारी विकास लाडे यांनी केले. आभार श्री सहारे यांनी मानले .

निबंधात सलोनी घोडेस्वार तर वक्तृत्त्व स्पर्धेत नंदिनी कुंभरे अव्वल

निबंधात सलोनी घोडेस्वार तर वक्तृत्त्व स्पर्धेत नंदिनी कुंभरे अव्वल


भारत सरकारचा उपक्रम

विमलताई तिडके विद्यालयात स्पर्धा
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:


स्वच्छता व आरोग्य या विषयाबाबतचा प्रचार करण्याचे उद्देशाने सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांचे उपक्रमांतर्गत प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर द्वारा बुधवार २ जानेवारी व गुरुवार ३ जानेवारी रोजी आरोग्य व स्वच्छता या विषयावर निबंध,वक्तृत्त्वकला तसेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता .यामध्ये निबंध स्पर्धेत सलोनी घोडेस्वार,वक्तृत्वकलेत नंदिनी कुंभरे अव्वल ठरल्यात.विजेते स्पर्धकात श्वेता साहरे,श्रुती राऊत,तनु माने,आचल मडामे,आयुष पाटील,गुलशन शेंडे,रश्मी काळे,साक्षी चव्हाण आदी गुणवंत ठरले.विजेता स्पर्धकांना नगर परिषद वाडीचे उपमुख्याधिकारी आकाश सहारे,प्रादेशिक विद्या प्राधिकरण विज्ञान व गणित शिक्षण संस्थेचे अधीक्षक निलेश चव्हाण,स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदचे समन्वयक दिनेश मासोतकर,क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनवणे,राज्य विज्ञान संस्थेच्या प्रा .सरिता मंगेश,क्षेत्रीय प्रचारक संजय तिवारी,मुख्याध्यापिका साधना कोलवाडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले.आयोजनासाठी अनिल धोटे,सुधाकर धिरडे,दिगांबर गोहणे,किशोर गरमळे,श्रावण ढवंगाळे,संदीप लापकाळे,माया रामटेके,शीतल अवझे,अश्विनी फलके,सुरेखा घागरे आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन सुरेश फलके तर आभार वंदना पाटील यांनी मानले .
स्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा

स्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा

महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपमुख्यधिकाऱ्यांना निवेदन 
वाडी(नागपूर)/अरूण कराळे:
\
दत्तवाडी ,काटोल बायपास मार्ग , राष्ट्रीय महामार्गावरील कैलाश पेट्रोल पंप ते एमआयडीसी टी पॉइंट पर्यत कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. चुकीच्या पध्दतीने काम करणार्‍या अशा कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करुन रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे . या खड्डयामुळे दुचाकी वाहन चालकांचे अपघात सुध्दा झाले आहे .वाडी नगर परिषदमधील संबंधित विभागांनी या कडे लक्ष देऊन खड्डयाचा निपटारा करावा अन्यथा महाराष्ट्र वाहतूक सेना द्वारा आंदोलन करण्याचा इशारा वाडी नगर परिषदचे उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांना निवेदनातुन दिला आहे . यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनाचे राज्यचिटणीस किताबसिंह चौधरी, कार्यकारी अध्यक्ष भाऊराव रेवतकर,सचिव अखिलेश सिंह,उपाध्यक्ष राकेश अग्रवाल,तालुका प्रमुख राम सिंह,वाडी शहर प्रमुख अभय वर्मा,लाव्हा शहरप्रमुख संतोष शेंडे,जितेंद्र श्रीवास्तव आदी उपस्थित होते .

पंधरा दिवसानतंर टँकरने पाणी पुरवठा 
स्थानीक नगरसेवकांचे दुर्लक्ष , नागरीकांचा आरोप 
वाडी(नागपूर )/अरूण कराळे:


येथील डॉ .आंबेडकर नगर मध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून पंधरा दिवसानतंर टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे . पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेकडो महीला व पुरुषांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वात बुधवार २८ नोव्हेंबर रोजी वाडी नगर परिषद वर हल्लाबोल केला होता .वाडी नगरपरिषद क्षेत्रातील डॉ .आंबेडकर नगर मध्ये सामान्य व गोरगरीब कुटूंब राहत असून बहुतेकांचा व्यवसाय,मजुरी खाजगी काम करणे आहे.
१५ दिवसांपासून या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. स्थानीक नगरसेवक या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप किशोर नागपूरकर यांनी केला आहे . त्यांनी सांगीतले की दोन दिवसापासून डॉ .आंबेडकर नगरमधील पाणी टंचाई बद्दल मुख्याधिकारी , नगराध्यक्ष , नगरसेवक यांना सांगीतले तरीही त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही .डॉ .आंबेडकर मधील रस्ते अतिशय छोटे असल्यामुळे पाण्याचा टॅकर प्रत्येक चौकात जात नाही त्यामुळे रस्त्यावरील मोठ्या चौकात टॅकर उभा करून पाणी वाटप करीत आहे.

 त्यामुळे येथे पाईपलाईननी पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरीकांची आहे . कामधंदे सोडून पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाडी नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या विरोधात असंतोष पसरलेला दिसून येत आहे
नागपुरात जन्मदात्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपुरात जन्मदात्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लाव्हयातील घटना:आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

मुलगी व वडील या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना लाव्हा गावात घडली असून आरोपी जन्मदात्या कुकर्मी बापाला वाडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीला आजपावेतो तीन पत्नी झाल्या असून तिघीही त्याला सोडून गेल्या आहेत. १४ वर्षीय पिडिता व १२ वर्षाचा मुलगा हे तिसऱ्या पत्नीपासून झालेली अपत्य असून मागील १० वर्षांपासून पत्नी सोडून गेल्यानंतर ५१ वर्षीय नराधम आरोपी बाप व मुले सोबत राहतात.पिडिता आरोपीच्या तिसऱ्या पत्नीची मुलगी असून ती आठव्या वर्गात शिकत असतांना मागील तीन वर्षांपासून जन्मदाता बाप जबरीने शारीरिक संभोग करीत होता .पीडिताने प्रतिकार केल्यास आरोपी मुलीला रात्री-बेरात्री केव्हाही मारहाण करून पीडिताचे शारीरिक शोषण करीत होता.शेजाऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यास मुलगी घरातील कामे करीत नाही म्हणून मारले असे नराधम बाप सांगायचा. परंतु या प्रकाराची कुणकुण परिसरात होती.गावातून कुणीतरी कंट्रोल रूमला या संदर्भात माहिती दिली असता .वाडी पोलिसांनी पीडित मुलगी व नराधम बाप याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता हा प्रकार मुलींनी सांगून तक्रार नोंदविली.पोलीसांनी आरोपीस अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे.

 पतंग उडवा पण...जरा जपून

पतंग उडवा पण...जरा जपून



वीजवाहीनीपासून जीव सांभाळून

चंद्रपूर/प्रतिनिधी:
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडवितांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठयापर्यत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळता येत नाही मात्र शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहीन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अश्यावेळी काहीजण तो अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा पयत्न करतात. अश्याप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते त्यामुळे अडकलेला पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावर उठू शकतो. असा अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही वीजेचा भिषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढतांना एका तारेवर दुस¬या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्कीट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकारही घडू शकतो. सद्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाहीत तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहीत्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहीत होऊन प्राणांतिक अपघाताची दाट शक्यता आहे. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून या उत्सवाला गालबोट लागू नये )याकरिता पतंग उडवितांना पुरेपूर सावधानता बाळगावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
महावितरणतर्फे दिनांक 11 जानेवारी ते17 जानेवारी दरम्यान वीज सुरक्षा सताह पाळण्यात येणार आहे. जीव ही लाखमोलाची देणगी असून संरक्षेच्या माधमातून अपघातापासून बचाव करता येणे शक्य आहे. त्यामुळे वीज सुरक्षा सताह महावितरणच्या सर्व विभागिय, उपविभागिय व शाखा कार्यालयात पाळण्यात येणार आहे.


हे लक्षात ठेवा


१. वीज तारांवार अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
२. तारामध्ये अडकलेला मांजा ओढू नये. 
३. वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
४. तारांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
५. पतंग उडविणा¬या पाल्यांकडे पालकांनी लक्ष दयावे.

 जनसंपर्क अधिकारी
चंद्रपूर परिमंडल, चंद्रपूर
चंद्रपूर मनपाद्वारे १७ प्रभागात पथनाट्याद्वारे जनजागृती

चंद्रपूर मनपाद्वारे १७ प्रभागात पथनाट्याद्वारे जनजागृती

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत स्वच्छतेसंबंधी जनजागृती मोहीम चंद्रपूर शहर महानगरपालिका सतत राबवीत आहे. समाजातील सर्वच घटक यासंबंधी जागृत होण्यास विविध उपक्रम मनपातर्फे आयोजित करण्यात येत आहे यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे स्वच्छतेचे महत्व दर्शविण्यात येत आहे. या अनुषंगाने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील १७ प्रभागात स्वच्छतेवर पथनाट्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर २७ ते ३० डिसेम्बर दरम्यान झालेल्या लायन्स एक्सपो मधे चंद्रपूर महानगरपालिकेचा स्टॉल ठेवण्यात आला होता ज्यात स्वच्छ सर्वेक्षण २०१९ बद्दल माहिती देण्यात आली. या एक्सपो मधे "स्वच्छतेची सायकल" ठेवण्यात आली होती. जी सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरली.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना व पर्यायाने नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी या उद्देशाने केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोंबर, 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. नागरिकांना स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि लहान तसेच मोठी शहरे यांना अधिक राहाण्यायोग्य बनविण्याच्या दिशेने सर्वानी एकत्रित काम करणे यासाठी समाजाच्या सर्व घटकांमध्ये जनजागृती करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दीष्ट आहे 
महापौर सौ. अंजली घोटेकर, आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात मनपा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) श्री. नितीन कापसे, श्री. प्रदीप मडावी, एएसपीएम क्रिएशनचे स्वयंसेवक व मनपा अधिकारी कर्मचारी कार्य करीत असून प्रभागात होणाऱ्या पथनाट्यांसाठी प्रभागातील सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे.
 महावितरणकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

महावितरणकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

नागपूर/प्रातिनिधी:
सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयन्ती निमित्य महावितरणकडून अभिवादन करण्यात आले. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ठ म्हणजे कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर आणि प्रज्वला किरनाके यांनी सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी अभिवादन केल्यावर अन्य अधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

यावेळी मुख्य अभियंता दिलीप घुगल, सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमेश शहारे, हरीश गजबे , कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर,प्रमोद धनविजय, श्रीमती प्रज्वला कन्नाके, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात,व्यस्थपाक (वित्त व लेखा) अतुल राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.

चंद्रपूर 
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात आज  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 188 वी जंयती महिला मुक्तिदिन म्हणून साजरी करण्यात आली. आदयषिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यंाच्या प्रतिमेस चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांनी  माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी कार्यकारी अभिंयता (प्रशासन)श्री. अनिल काळे, प्रभारी वरीष्ठ व्यवस्थापक( वि व ले)श्री. राहूल धाकले,  उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. सुशिल विखार व इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस आदरांजली अर्पण केली.          
    
11 ते 15 जानेवारीला जिल्हा कृषी प्रदर्शनी व सरस महोत्सवाचे आयोजन

11 ते 15 जानेवारीला जिल्हा कृषी प्रदर्शनी व सरस महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीत पिकवलेल्या मालाला खरेदी करण्यासाठी, शेती करण्यास उत्सुक असणाऱ्या नवतरुणांना यांत्रिक ज्ञान संपादन करण्यासाठी आणि जिल्ह्यातील बचत गटांच्या हजारो महिलांनी तयार केलेल्या विविध उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी 11 ते 15 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राउंड येथे जिल्हा कृषी व सरस महोत्सव तसेच सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला स्वयंसहायता समूह वस्तूंची विक्री व प्रदर्शनी लागणार आहे. प्रशासनाने यासाठी तयारी सुरु केली आहे.

मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनीचा लाभ जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी घ्यावा. याठिकाणी कृषी व त्यावर आधारित व्यवसाय, जोडधंदा, यांत्रिकीकरण याबद्दलच्या माहितीचे अनेक दालन तसेच महत्वाचे चर्चा संवाद देखील आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात शेती आहे किंवा ज्यांना शेतीशी ज्यांचा संबंध आहे. अशा सर्वांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

गृहिणीपासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि बागायतदारापासून तर कोरडवाहू शेती सांभाळणाऱ्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीच्या ज्ञान व तंत्रज्ञानाची उपलब्धता या कालावधीत चांदा क्लब मैदानावर राहणार आहे. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाची नोंद आत्ताच आपल्या नियोजनात करावी, असे आवाहनही उदय पाटील व चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.

सदर महोत्सवात आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर असणार आहे. जिल्ह्यातील सर्व शीर्ष नेतृत्व या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असेल. यासोबतच या प्रदर्शनीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य शिक्षण विद्यापीठ नागपूर कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांची देखील उपस्थिती राहणार आहे.

जिल्हा कृषी व सरस महोत्सव, सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला स्वयंसहायता समूह आधारे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात एकूण 274 स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. शेतीचे साहित्य, तंत्रज्ञान, नवनवीन यंत्रसामुग्री यासोबतच कृषी निविष्ठा, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या महिला स्वयंसहाय्यता गटांच्या मार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री दालन,सेंद्रिय शेती व बचत गटांमार्फत उत्पादीत बचत गटाचे दालन, कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन, जलयुक्त शिवार, सेंद्रिय शेती, मधुमक्षिकापालन, पशुसंवर्धन, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय आदींच्या प्रात्यक्षिकांच्या तंत्रज्ञानाची मांडणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच यशस्वी शेतकरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ, विचारवंत यांच्या भेटीचे देखील आयोजन या दरम्यान करण्यात आ-ले आहे. या कृषी महोत्सवात शासनाच्या कृषी व कृषी संलग्न योजनांची आणि कृषी विद्यापीठाकडे अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देखील देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवरावजी भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच कृषी सभापती श्रीमती अर्चना जीवतोडे यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
याशिवाय जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा देखील सहभाग राहणार आहे. 11 ते 15 जानेवारी या दरम्यान शेती करणा-यांनी, शेतीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक परिवाराने याठिकाणी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

Thursday, January 03, 2019

समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांच्या पुढाकाराने गरजुना साहित्य वाटप

समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांच्या पुढाकाराने गरजुना साहित्य वाटप

खापरखेडा/प्रतिनिधी: 

 चिचोली जिल्हा परिषद सर्कल मधील गरजु लाभार्थ्यांना साहित्य  वाटप कार्यक्रम खापरखेडा येथील रोपे कॉलनी परिसरात घेण्यात आला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दीपक गेडाम यांच्या पुढाकाराने 20 टक्के व्यक्तीक निधी मधुन खापरखेडा परिसरातील गरजु लाभार्थ्यांना आवशक साहित्याचा वापट करण्यात आला यावेळी 100 सायकल, 24 शिलाई मशीन, 3 मंडप, 2 झेरॉक्स मशीन, 1 बँड संच , शेतकऱ्यांना शेती साठी पाणी ओढण्याचे डीजल इंजिन आदी साहित्याचे  वाटप करण्यात आले समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांच्या कार्यकाळात हा साहित्य वाटपाचा झालेला हा 7 साहित्य वाटप कार्यक्रम होता या वेळी आपल्या भाषणात दीपक गेडाम यांनी पक्षपात नकरता सामन्यांना साहित्य दिल्याचे सांगितले नव्याने पुन्हा फरवरी मध्ये साहित्य वाटप होणार असून गरजु लाभार्थ्यांनी  आपल्या गावच्या सरपंच यांच्या कडे जास्तीत जास्त अर्ज भरून साहित्या करिता अर्ज करावा  जिल्ह्यात निवडणुका लांबणीवर गेल्या मुळे मिळालेला कार्यकाळ हा एक बोनस पॉईंट आहे

 याचा लाभ घेण्याचे आवाहन केले   कार्यक्रमाचे अध्यक्ष पृथ्वीराज बोरकर प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य बंडू आवळे, सूर्यभान गेडाम, जयंसिग जालंदर, सरपंच पुरुषोत्तम चांदेकर चिचोली, सरपंच वंदना ढगे पोटा, सरपंच उजवला लांडे रोहना, सरपंच प्रमिला बागडे सिल्लेवाडा, माजी उपसरपंच अस्मिता बागडे,  दिवाकर घेर, पृथ्वीराज बागडे, चिट्टू देशभ्रतार, सुरेंद्र सोमकुवर, नीता जालदर, मंगला नखाते,  आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राहुल बागडे यांनी केले आभार धिरज देशभ्रतार यांनी केले
किशोर पंचभाई यांची रेशीम शेतकऱ्यांना मदत

किशोर पंचभाई यांची रेशीम शेतकऱ्यांना मदत

मनोज चीचघरे/पवनी/भंडारा:

  नव्या जोमाने आधुनिक शेती पध्दतीची कास धरणारे जीवन फुंडे व संजय ब्राम्हणकर यांच्या एकत्रित रेशीम शेड आगीत भस्मसात झाले. पिकांसह शेड जळाल्याने त्यांचे स्वप्न हिरावले गेले. त्या शेतकर्याना आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक व भाजप किसान आघाडीचे नेते किशोर पंचभाई यांनी घटनास्थळी भेट देऊन  दहा हजार रुपयांची मदत दिली.
      अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्याचे कोषाचे पिक  अंतीम टप्प्यात होते. ३५० डि एल एफ चे पिक घेणे मोठी उपलब्धी आहे. रेशीम शेतीमध्ये पिकविम्याची सोय नाही. अशा वेळी किशोर पंचभाई यांनी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. ही मदत रोख स्वरूपात देण्यात आली.यावेळी आसगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यादव डोये, राजेंद्र फुलबांधे, राजु सावरबांधे, अमीत डोये, संदीप देशमुख उपस्थित होते.

Tuesday, January 01, 2019

कारंजाच्या सामीक्षा यावलेचे हस्तलेखन परिक्षेत यश

कारंजाच्या सामीक्षा यावलेचे हस्तलेखन परिक्षेत यश

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

समीक्षा सुरेंद्र यावले ही कारंजा येथील मुलगी धनवेट राष्ट्रीय महाविद्यालय नागपूर येथून हस्तलेखन स्पर्धेतील द्वितीय बक्षीस, उद्दिष्ट परीक्षा उत्तीर्ण होणारा दुसरा पुरस्कार,
सर्वोत्तम लायब्ररी विद्यार्थी पुरस्कार म्हणून प्रथम पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार म्हणून प्रथम पुरस्कार,
एमए (मराठी साहित्य) तृतीय विद्यापीठातील टॉपर्समध्ये 70% गुण मिळवले असून कारंजा शहर आणि शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयात सामीक्षाचे कौतुक  होत आहे.