काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 03, 2018

आमदार भांगडिया यांना रेती तस्कराची ट्रकने उडविण्याची धमकी

आमदार भांगडिया यांना रेती तस्कराची ट्रकने उडविण्याची धमकी

 नागपूर - रेती तस्कराने चिमुरात महसूल कर्मचाऱ्यास पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त ताजे असतानाच चिमूर तालुक्यातील भिसी येथील रेती माफियाने चक्क आमदारांनाच ट्रकने उडवून टाकण्याची धमकी दिली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चिमूरचे आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनाच ही जीवे मारण्याची धमकी रेती माफियाने दिली आहे.
 चिमूर विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनी  निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू केला आणि यासोबतच अवैध धंदेवाईकांविरुद्ध एल्गार पुकारला. आमदार भांगडिया आपल्या मतदारसंघात जनसंपर्क दौऱ्यावर असताना ११ व १२  मेच्या मध्यरात्री त्यांना कानपा ता. नागभीड येथे अवैध खनन करीत रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.
शासनाच्या महसुलाची चोरी थांबविण्याच्या दृष्टीने त्यांनी चंद्रपूर व भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षकांना तत्काळ दुरध्वनीवरून सुचना दिली. चंद्रपूर पोलिस अधिक्षकांनीही  लगेच दखल घेत ब्रम्हपुरीचे पोलिस उपअधिक्षक परदेशी यांना  कारवाईच्या सुचना केल्या. त्यांनी कारवाई करीत तेव्हाच १५ ते २० ट्रकसह अवैध खणलेली रेती मुद्देमाल जप्त केला. या घटनेनंतर हा संदर्भ देत रेती कंत्राटदार धनराज मुंगले (रा. भिसी) यांनी आमदार भांगडिया यांचे सहकारी मुंतझीर लखानी (ब्रम्हपुरी) यांच्याकडे ‘आमदारांनी रेती तस्कराच्या तक्रारी करू नये, त्यांचे चिमूर-नागपूर जाणे-येणे असते त्यांना रस्त्यातच ट्रकने उडवून टाकू’ असे सांगून आमदारांना समजाविण्याचा सल्ला दिला.
मुंगले एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी रविवारी १ जुलै रोजी लोकशाही वार्ताचे संपादक भास्कर लोंढे यांना भेटल्यावर पुनश्च तीच धमकी दिली व आमदारांना समजाविण्याचा सल्ला दिला.
धनराज मुंगले यांनी रेतीचे अवैध खनन केल्याने मार्च  २०१८ मध्येही चंद्रपूर जिल्हाधिकाºयांनी कारवाई करून त्यांची पोकलँड मशिन जप्त केली होती. मुंगले यांचा रेतीच्या तस्करीत हात असल्यामुळेच त्यांनी माझ्या सहकाºयांमार्फत धमक्या दिल्या असून यामुळे माझ्या जीवीताला धोका निर्माण झाल्याची तक्रार आमदार बंटी भांगडिया यांनी आज २ जुलैला चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच या गंभीर प्रकाराची माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळविली आहे.
राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर या प्रकरणी शासन काय पावले उचलते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Monday, July 02, 2018

सोशल मिडियावर चंद्रपूर पोलीसांची करडी नजर

सोशल मिडियावर चंद्रपूर पोलीसांची करडी नजर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पसरविण्यात येत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका पोलिसांच्या संपर्कात रहा, असे आवाहन चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने या संदर्भात आज एक निवेदन जारी केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नजीकच्या पोलीस ठाण्यात चौकशी करावी, माहिती दयावी, असे आवाहन केले आहे.केवळ संशयावरून कायदा हातात घेणे आणि निष्पाप व्यक्तींचा छळ करणे हा गुन्हा आहे. राज्यात काही ठिकाणी संशयावरून हिंसक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची कोणतीही घटना यापुढे घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सर्तकतेचे निर्देश देण्यात आल्याचे पोलीस विभागातर्फे सांगितले. यावेळी त्यांनी नागरिकांनीही तथ्यहीन घटनांवर विश्वास ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करून येवून जनतेने अफवा पसरविणाऱ्यांबाबत सर्तक व संवेदनशिल राहावे व कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास त्वरित चंद्रपूर पोलीस कंट्रोल रूमलाला संपर्क साधावा अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच समाज माध्यमांवर, व्हाट्स ॲप, फेसबुक आदी माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 
चंद्रपूर जिल्हयातील सायबर सेल सोशल मेडियावर लक्ष ठेऊन असून अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश

अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश

वाघ पिंजरा  साठी इमेज परिणाम
संग्रहित 
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
६ ग्रामस्थांना ठार केलेल्या दहशदखोर वाघाला पिंजराबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागात सिंदेवाही परिसरात गेले काही दिवस एका वाघाने चांगलीच दहशत पसरविली होती. किन्ही, मुरमाडी , लाडबोरी भागात या वाघाने शेतशिवार कामे करणा-या आणि जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या 6 ग्रामस्थांना ठार केले होते तर ३ ग्रामस्थांना जबर जखमी केले होते. या घटनेनंतर वाघाला पकडण्यासाठी वनविभाग मोठे अभियान राबवित होते. लोकांचा रोष बघता या वाघाला पकडने वनविभागाची महत्वाचे होते,या संपूर्ण घटनेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याने या वाघाचा बंदिबस्त करण्याच्या सूचना वनाधिका-याना दिल्या होत्या.याच प्रयत्नात रविवारी संध्याकाळच्या सुमारास सिंदेवाही जंगलातील कक्ष क्रमांक १३३४ मध्ये वन विभागाच्या पथकाने या वाघाला बेशुद्ध करत त्याचा ताबा मिळविला.विशेष म्हणजे या वाघाला पकडण्यासाठी जंगल परिसरात वनविभागाने कॅमेरे लावून तब्बल ४० वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची या वाघावर पाळत होती.हा दीड ते २ वर्षाचा नर वाघ असून त्याची तातडीने चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यातच या वाघाची दहशत असल्याने स्थानिक नागरिक संतापले होते. वाघ पिंजराबंद झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

देवतारे गुरूजी यांनी संघविचार घराघरांत पोहचविला:चंद्रशेखर देशपांडे

देवतारे गुरूजी यांनी संघविचार घराघरांत पोहचविला:चंद्रशेखर देशपांडे

रामटेक तालुका प्रतिनिधीः
रामटेक येथील श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रा.स्व.संघ,नागपुर जिल्हयाचे माजी संघचालक रामचंद्र मारोतराव देवतारे यांनी या भागात संघविचारांचे सिंचन केले. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ते संघकार्यासाठी झिजले.संघाचा विचार त्यांनी घराघरांत पोहचविला या शब्दांत प.पुश्रीगुरूजी  स्मृती प्रकल्प गोळवलीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांनी देवतारे मास्तरांचा गौरव केला. दिनांक 1 जुलै 2018 रोजी स्थानीक गंगा भवनम् सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न झाालेल्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते .यावेळी मंचावर रास्वसंघाचे जिल्हा संघचालक प्रकाश ताजने ,विभागाचे
कार्यवाह उल्हास ईटनकर सत्कारमुर्ती रामचंद्र देवतारे, सौ.चंद्रभागा देवतारे,नगर संघचालक अधिवक्ता किशोर नवरे आदी मान्यवर हजर होते. नागपुर जिल्हयातील रास्वसंघाचे अधिेकारी पदाधिकारी व देवतारे मास्तर यांचे चाहते मोठया संख्येत  कार्यक्रमाला हजर होतेअमृतमहोत्सव कार्यक्रमात देवतारे यांचा सपत्निक सत्कार चंद्रशेखर देशपांडे व त्यांच्या पत्नी वनिता देशपांडे यांच्या हस्ते करण्यांत आला.रामटेकच्या सार्वजनिक 
क्षेत्रांतील सामाजीक,सांस्कृतीक व राजकीय संघटना व पदाधिकारी यांचेकडूनही त्यांचा यथोचित सन्मान करण्यांत आला.कार्यक्रमांत जुन्या रामटेक तालुक्यातील व सध्या मौदा तालुक्यात असलेल्या खात या गावात सामान्य कुटूंबात रामचंद्रराव यांचा 1 जुलै 2018 रोजी जन्म झालावडील रेल्वेत सिग्नल फीटर होते.मोठे बंधू शामराव यांनी बोट धरून त्यांना संघाच्या शाखेत आणले.अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत रामचंद्रराव यांनी डबल एम ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. व रामटेकच्या श्रीराम विद्यालयांत शिक्षकाची नोकरी धरली.पुढे ते या शाळेचे मुख्याध्यापक झाले.रास्वसंघाचे अतिशय निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव संपुर्ण नागपुर विभागात मोठया सन्मानाने घेतले जाते.विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतांना त्यांनी नागपुर जिल्हा संघचालक या पदावर अनेक वर्षे कार्य केले.रामटेकचे तरूण भारतचे वार्ताहर म्हणूनही त्यांनी सुमारे 25 वर्षे कार्य 
केले आहे.रामटेकच्या संघ कार्यकर्त्यांसह सर्वच सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक आहेत.रामटेकच्या सार्वजनिक क्षेत्रांतील या आधारवडाचा अमृतमहोत्सव हा या सर्वच कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय होता व त्यामुळेच त्यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला नागपुर जिल्हयातुन संघाचे अधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जु न रेड्डी,नागपुर जिल्हा भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख विकास तोतडे,रामटेकच्या श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव डॉप्रशांत पांडे,रामटेक नगरपालीकेच्या माजी उपाध्यक्षा कविता मुलमुले,भाजपाचे संजय  मुलमुले,नगरसेवक संजय बिसमोगरे,सौ रत्नमाला अहिरकर,विवेक तोतडे,माजी उपाध्यक्ष मन्साराम अहिरकर,नागपुर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य राहुल
 पेटकर,समर्थ विद्यालयाचे पर्यवेक्षक दिपक गीरधर,वनवासी कल्याण आश्रमाचे मध्यप्रांताचे संघटन मंत्री प्रविण डोळके,बाजार समीतीचे संचालक चरणसिंग यादव,सुघीर धुळे,राजेंद्र पाठक,योगेश मेडसिंगे ,हितेंद्र चोपकर,चेतन चोपकर,डॉ.मिलींद चोपकर,अरविंदराव तोतडे,केशवराव चित्रिव,सुरेश भगत,मनोहर वांढरे,चंद्रशेखर जोशी,श्रीधर धुळे आदी मान्यवरांसह देवतारे मास्तरांचे चाहते शेकडो कार्यकर्ते यावेळी 
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यांत आले.शुभम चोपकर यांच्या बासरीवादनाने व देवतारे या नातवंडाच्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाचे वातावरण भारून टाकले होते.यावेळी देवतारे मास्तरांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी व त्यांचा गुणगौरव करणारी कुमारी गौरी देवतारे,रमेशराव कोळमकर, विवेकराव आंबेकर,भारती येवतीकर,प्रविण डोळके ,उद्धव यांची समयोचित भाषणे झालीत.कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यांत आलाकार्यक्रमाचे आयोजन भानुप्रताप देवतारे,नागेश देवतारे,भारती देवतारे येवतीकर, मंगेशसिह येवतीकर,योगीता देवतारे कचवे व मनीषसिंह कचवे यांनी केले होते.
वेळी देवतारे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्यावर कार्यकर्ते प्रेम करतात ही आपल्या जीवनातील अमूल्य ठेव असून शेवटच्या श्वासा पर्यत संघकार्य  करण्याचा निश्चय व्यक्त केला.यावेळी त्यांनी खात येथील संघकार्यालयासाठी व रामटेकच्या मागास वस्तीत चालणाऱ्या अभ्यासिकेसाठी प्रत्येकी 35 हजार रूपयांची
देणगी नगदी स्वरूपात दिली.गोळवली येथील प्रकल्पासाठी त्यांनी 5 हजार रूपयांचा निधी चंद्रशेखर देशपांडे यांच्या स्वाधीन केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन त्रिलोक मेहर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे भानुप्रताप देवतारे यांनी आभार मानले.


ताडोबा व्याघ्र प्रकल्प झाले बंद

ताडोबा व्याघ्र प्रकल्प झाले बंद

संबंधित इमेजनागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पट्टेदार वाघांचा हक्काचा अधिवास. या प्रकल्पात वाघांचे नैसर्गिक स्थितीतील दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटकांची वर्षभर रीघ लागते. पावसाळ्यात देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद केले जात असताना ताडोबा मात्र त्याला अपवाद होता. मात्र आता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने पावसाळी पर्यटन बंद करण्याचे कठोर निर्देश जारी केल्यामुळे १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे. गेली काही वर्षे ताडोबातील प्रवेश ऑनलाईन झाले आहेत. यामुळे देशातील शेकडो पर्यटकांनी कित्येक दिवस आधीच ताडोबातील पावसाळी पर्यटनासाठी बुकिंग केले होते. याशिवाय ताडोबा आता पर्यटन नकाशावर असल्याने शेकडोंच्या संख्येत रिसॉर्ट ताडोबाच्या आसपास उभारले गेले आहेत. मोठा गाजावाजा करून ताडोबाचे जागतिक पर्यटन करण्याचा घाट घातला गेल्यावर आता अचानक ताडोबा पूर्ण बंदचा निर्णय झाल्याने रिसॉर्ट मालक आणि पर्यटक हिरमुसले आहेत. यंदा राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. यासाठी येणारे मंत्री , लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना वाघांच्या दर्शनासाठी प्रकल्प सुरु ठेवण्याचा दबाव होता. मात्र एनटीसीए च्या निर्देशांमुळे यावर पूर्णविराम मिळाला आहे. याशिवाय ताडोबाच्या बाह्य भागात सुरु असलेले पर्यटन देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने ताडोबातील एकूणच व्यवहार ३ महिने ठप्प होणार आहेत.

९४ व्या वर्षीही तोच जुनून

९४ व्या वर्षीही तोच जुनून

 आर्वी/राजेश सोळंकी:
आजकाल थोडे जरी जायचे असेल तर आजच्या पिढीतील मुलांना युवकांना गाडीशिवाय जमत नाही मात्र हे व्यक्तीमत्व या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालनारे आहेत .. नाबाद ९४ वर्षाचे वय असूनही ते दुकानात सायकलने येने जाने करतात.आजहि ते मैलोन मैल सायकलनेच प्रवास करतात.त्याचसोबत स्वतंत्रपूर्व काळाचे ते साक्षीदार देखील आहे.मुरलीधर उकंडराव गुल्हाने ( वय ९४) हे या व्यक्तीमत्वाचे नाव .
आर्वीतिल त्या काळातील कसबा येथे १९२४ मध्ये त्यांचा जन्म झाला.. येथील न प शाळेत शिक्षण घेउन त्यांनी १९४३ मध्ये इथिल नेहरू मार्केट जवळ न्यु बोम्बे सायकल स्टोअर्स चे नावाने सायकल चा व्यवसाय सुरु केला त्या काळी सायकल म्हणजे प्रतिष्ठा होती.. नवीन सायकल विक्री टायर्स सायकल रिपिरिंग कलरपेंटिंग सर्व सायकलचे स्पेअर पार्ट विक्रीस ठेउन व्यवसाय सुरु केला त्याकाळी १आना तास प्रमाने सायकल ट्याक्सि किरायाने दिल्या जात होती.त्याकाळी त्यांचेजवळ १४ सायकल ट्याक्सि होत्या.हरकुलर्स बि एस ए सायकल कंपनीचि एजंसि त्यांचेकडे होती.आताही त्यांचा हा व्यवसाय अव्याहतपणे सुरु आहे. मात्र आता या गाड्यांचे काळात सायकल ट्याक्सि किरायाने देने बंद केले आहे या व्यवसाय मध्ये त्याचा मुलगा विकास त्याना मदत सहकार्य करतो . 
आजही अनेक कामे ते सायकलने च करतात.आर्वी परिसरातील स्वातंत्र्यपुर्व काळातील अनेक घडामोडीचे ते साक्षीदार आहेत. 























Sunday, July 01, 2018

वर्ध्यात पार्किंगची समस्या होत आहे गंभीर

वर्ध्यात पार्किंगची समस्या होत आहे गंभीर

'He' road built parking | ‘तो’ रस्ता बनलाय वाहनतळवर्धा/प्रतिनिधी:
येथील ठाकरे मार्केट भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गावर सध्या रस्त्याच्या मधोमधपर्यंत दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून तेथील परिस्थिती बघता हा रस्ता की वाहनतळ असा प्रश्न पडत असून संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
शहरातील हृदयस्थान अशीच ठाकरे मार्केट परिसराची ओळख. याच परिसरात न्यू इंग्लिश हायस्कूल व न्युनिअर कॉलेज आहे. परंतु, सदर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मार्गावर सध्या रस्त्याच्या मधोमधपर्यंत दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. ही वाहने रस्त्याच्या मधोमधपर्यंत उभी केली जात असल्याने या परिसरात बहूदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय शाळा याच मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
वाहतूक पोलिसांच्यावतीने बेशीस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; पण या मार्गावर वाहतूक नियंमाना फाटा देत मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची सुजान नागरिकांसह वाहनचालकांची मागणी आहे. अशीच परिस्थिती शहरातील बजाज चौक, आर्वी नाका, दादाजी धुनिवाले चौक आदी भागातही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस व वाहने वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहे. याकडे संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर/ललित लांजेवार:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वडाळा गावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद श्रीरामे असं आरोपीचं नाव आहे. गावातील दोन लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हे पत्र त्यांच्या नावाने लिहीले होते.
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या महिन्यात मंत्रालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना लक्ष करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नक्षलीविरोधी कारवाई केल्यामुळे ते पत्र आलं होतं. आता हे इतरांना त्रास देण्यासाठी हे पत्र लिहिलं असल्याची प्राथमिक माहिती असली तरी पोलीस याची कसून चौकशी करत आहेत. मात्र अश्या निनावी पात्रांनी खळबळ माजविणाऱ्याना विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी !

लोकचळवळीच्या माध्यमातूनच वृक्षारोपणाची उद्दीष्टपूर्ती शक्य - ना. हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

लोकचळवळीच्या माध्यमातूनच वृक्षारोपणाची उद्दीष्टपूर्ती शक्य - ना. हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

  • सिध्दार्थ नगरात केंद्रीय गृहराज्यमंत्रयांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

चंद्रपूर/प्रतिनिधी:
     ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना वर्षोनुवर्षे मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी राबविली जात आहे. शासन आणि प्रशासन यासाठी कृतीशीलपणे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र हे देशातील असे राज्य ठरले आहे की, या राज्यात वृक्षारोपणाने लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे लोकांनी स्वीकारले आहे. त्यामुळे शासन स्तरावरून राबविण्यात येणा-या वृक्षारोपन कार्यक्रमात लाखो हात पुढे येत वृक्षारोपणाचे उद्दीष्ट साध्य करू लागले आहेत. वृक्षारोपण हे सजीव सृष्टीकरिता उपकारक ठरणार असल्याने प्रत्येकाने या चळवळीचा धागा बनून वृक्षारोपणाच्या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले पाहिजे असे विचार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
  वेकोलि चंद्रपूर क्षेत्र च्या वतीने बायपास मार्गावरील सिध्दार्थ नगर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, वेकोलिचे क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह, भाजप नेते खुशाल बोंडे, नगरसेवक संदीप आवारी, श्याम कनकम, रवि आसवानी, नगरसेवीका कल्पना बगुलकर, ज्योती गेडाम, सामाजिक कार्यकर्ते दामोदर मंत्री, राजू घरोटे, डाॅ. मंगेश गुलवाडे, डाॅ. भुपेश भलमे, संदीप आगलावे, वेकोलिचे गणपत राव, फनेंद्र यांची विशेष उपस्थिती होती.
वृक्ष आपणास मोफत प्राणवायू देतात रूग्णालयात यासाठी आपणास पैसे मोजावे लागतात. वाढते प्रदुषण, उष्मावृध्दी यावर झाडांमुळेच नियंत्रण घालणे शक्य असल्याने समाजातील प्रत्येक व्यक्तीने कर्तव्य भावनेतुन वृक्षारोपण केले पाहिजे व या झाडांची निगा राखली पाहिजे. आज या ठिकाणी होत असलेल्या वृक्षांचे संरक्षण, संवर्धन व निगा राखण्याची जबाबदारी या परिसरातील नागरिकांची व युवकांची आहे. हे कार्य ते पार पाडतील असा विश्वास ना. हंसराज अहीर यांनी याप्रसंगी व्यक्त केला. केवळ एक दिवस वृक्षारोपण करणे ही भुमिका नसावी तर याला सातत्य लाभले पाहिजे. राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यापूर्वी त्यांनी संकल्पपूर्ती केली असून आता हे आव्हानही जनतेच्या सहकार्यातून पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. नानाभाऊ शामकुळे यांनी वृक्षारोपनाचे महत्व विषद करीत वृक्ष हेच आम्हासाठी सगे, सोयरे आहेत असे संतवचन असल्याने प्रत्येकांनी वृक्षारोपनाच्या चळवळीचा भाग बनत वृक्षदुताचे कार्य पार पाडावे, शासनाने वृक्ष चळवळीवर विशेष भर दिला असून आता 13 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य स्वयस्फूर्तीने पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी आपले मौलिक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमात महापौर सौ. अंजली घोटेकर, क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह यांनीही वृक्षारोपण व जनतेचा सहभाग यावर विचार व्यक्त केले. या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी दिलीप सेंगारप, गणेश गेडाम, संजय मिसलवार, तेजा सिंह, रामलु भंडारी, विनोद लभाने, पराग मलोडे, विनोद धकाते, दौलत नगराळे, सोनकुसरे, शुभम दयालवार, कुणाल गुंडावार व सिध्दार्थनगर येथील नागरिकांची उपस्थिती होती.
चिमूर नपला मिळाले चार अधिकारी

चिमूर नपला मिळाले चार अधिकारी

  • नगर परिषदच्या सत्ता बदलानंतर यश 


 चिमूर/प्रतिनिधी
          चिमूर नगर परिषद च्या  स्थापनेला अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजप ची सर्वच स्तरावर सत्ता असताना सुद्धा कायमस्वरूपी ,अनुभवी अधिकारी पद स्थापना रिक्त होती त्यामुळे कामे होण्यास दिरंगाई होत होती परंतु अडीच वर्षाच्या सत्ता बदला नंतर कांग्रेस ची सत्ता आल्यावर वरीष्ठ प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न पत्र व्यवहार करून अखेर चार अधिकारी शासना ने पद स्थापणेवरून भरली आहे
      चिमूर नगर परिषद ची सत्ता भाजप च्या काळात असताना अनेक पद स्थापणेची पदे रिक्त होती परंतु ढिसाळ शासन कार्यकाळ असल्याने पदे भरण्यात किवा शासना कडून रिक्त पदे भरण्यास असफल झाले त्या मुळे शासकीय योजना हया नगर परिषद मार्फत न होता सार्वजनिक बांधकाम विभाग कडून होत होत्या  अडीच वर्षांनंतर सत्ता परिवर्तन होऊन कांग्रेस ची सत्ता चिमूर नगर परिषद वर येताच एका महिन्याच्या कार्यकाळात पत्रव्यवहार करून शासन प्रशासन ने दखल घेत अखेर चार अधिकारी आले त्यात लेखा परीक्षक,संगणक अभियंता विद्युत अभियंता व आरोग्य विभाग चे अधिकारी पदे भरण्यात आले आहे
 कांग्रेसचे    जिप गट नेते डॉ सतीश वारजूकर याचे मार्गदर्शनात व नगराध्यक्ष गोपाल झाडे यांचे नेतृत्वात नगर परिषद मधील इतर शिल्लल्क अधिकारी  आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत चिमूर चा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे नगरसेवक विनोद ढाकुंनकर यांनी सांगितले
मूलाच्या वाढदिवसातून जोपासली सामाजिक बांधीलकी

मूलाच्या वाढदिवसातून जोपासली सामाजिक बांधीलकी

  • अधिकाऱ्यांच्या मुलाचा वाढदिवस अंगणवाडीतील बालगोपाळासह साजरा
  • शैक्षणिक साहित्यासह शालेय गणवेश विद्यार्थ्यांना भेट
  •  उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांचा आदर्शवत उपक्रम


चंद्रपूर (प्रतिनिधी) दि1.7.2018 उच्च वर्गीय असो की मध्यम वर्गीय आज जो तो मुलांचे वाढदिवस थाटामाटात साजरी करण्याची नवीन संस्कृतीच तयार झाली असतांना, अशा संस्कृतीला फाटा देत जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये कार्यरत कर्तव्यदक्ष अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी मुलाचा वाढदिवस पोंभूर्णा तालुक्यातील चेकफुटाणा या गावातील अंगणवाडीच्या मुलांसह साजरा केला.
          उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव संत साहित्याचे गाडे अभ्यासक असून सजह आपल्या कामातून सामाजिक भान राखत सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करीत असतात. वाढदिवस अंगणवाडीत साजरा करून अधिकारी वर्गामध्ये नवीन पायडांच यातून मिळाला आहे. यादव यांची सतत समाजा प्रती काही तरी करण्याची धडपड असते. या धडपडीला खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी बल्लारपूर पंचायत समितीला नव्यानेच रजु झालेल्या गट विकास अधिकारी श्वेता यादव यांची साथ राहते.
  अंगणवाडीत अधिकाऱ्याच्या मुलाचा वाढदिवस हे गावकऱ्यांना व अंगणवाडी व शाळेतील मुलांना जीवनात वेगळा आनंद देणारे व आश्चर्याचा सुखद धक्का देणारेच होते.वाढदिवस निमित्य यादव यांनी अंगणवाडीतील मुलांना व वर्ग एक मधील मुलांना शाळेचा गणवेश व विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करून अनोखा पध्दतीने यादव यांनी चिरंजीव आदित्य यादव यांचा वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधीलकीचा एक नवा संदेश  दिला आहे. वाढदिवस प्रसंगी चेकफुटाणा या गावात यादव यांच्या मातोश्री, पत्नी श्वेता यादव, पोंभूर्णा गट विकास अधिकारी शशीकांत शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मिरगळ, सरपंच तुळशीराम रोहणकर, सीएम फेलो संगिता, अंगणवाडी कार्यकर्ती व शिक्षक व अंगणवाडीचे बालगोपाल व  शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
पोलिसांचे वाहन मेट्रो स्टेशनमध्ये घुसले

पोलिसांचे वाहन मेट्रो स्टेशनमध्ये घुसले


नागपूर/प्रतिनिधी 

 : काल ३० जून रोजी सायंकाळी औरंगाबाद येथून एमएच -20 / सीवी-११३ क्रमांकाचे पोलिसांचे वाहन नागपूरला पोहोचल्या नंतर अचानक दुर्घटनाग्रस्त झाले. पोलिसांचे वाहन बॅरीगेट्सला धडक देत वर्धा मार्गावरील निर्माणाधीन उज्वला नगर मेट्रो स्टेशनच्या आत शिरले. वाहन चालकाचा अचानक तोल बिघडल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कार्यस्तळी कार्यरत डीजी मशीन ऑपरेटर आशीष जाधव जख्मी झाल्याने रुग्णालायत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. वाहन चालकाच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने हा संपूर्ण प्रकार घडला असून वाहन चालकाला तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले. २६ वर्षीय पुरुषोत्तम जाधव असे या वाहन चालकाचे नाव असून तो औरंगाबाद येथे आहे. घटनेची माहिती मिळताच महा मेट्रोतर्फे तात्काळ उपाय योजना करण्यात आल्या असून घटनेची संपूर्ण माहिती सोनेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली.

अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

दोन चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात तर 4 जण गंभीर जखमी 
चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर- शहरातील नेहरूनगर येथील मित्तलवार कुटुंबीय आपल्या सुझुकी बोलेनो या चारचाकी वाहनाने तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होते. याच वेळी सिरोंचावरुन मोहुर्ले कुटुंबीय घरचे सामान घेऊन काळीपिवळी टॅक्सी ने मुरखेडाकडे येत होते. मात्र अचानक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.व या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह सात लोकांचा मृत्यू झाला. कमल मारोती मित्तलवार, मारोती केशवराव मित्तलवार , लता मारोती मित्तलवार , पाच महिन्यांची श्रीनीता कमल मित्तलवार, व दीड वर्षीय सरस संदीप मित्तलवार या एकाच परिवारातील पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच गडचिरोली जवळील मुरखेडाचे रहिवासी असलेले काळीपिवळी वाहनातील निखिल देवराव मोहुर्ले आणि चालक संदीप आनंदराव गडप यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. याशिवाय सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले हे जखमी असून त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.