काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 04, 2018

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक छाननीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक छाननीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

election साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कालच्या शेवटच्या दिवशी दाखल केलेले आठही उमेदवारांचे 12 अर्ज वैध ठरवण्यात आले आहे.
आज नाम निर्देशन करणाऱ्या छाननी समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या 8 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले होते. राज्यात भारत निवडणूक आयोगाने रायगड -रत्नागिरी - सिंधुदुर्ग , नाशिक , वर्धा -चंद्रपूर - गडचिरोली, परभणी -हिंगोली, अमरावती आणि उस्मानाबाद -लातूर - बीड या मतदारसंघात स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे . 
काल ज्यांनी अर्ज दाखल केला आहे, यामध्ये रामभाऊ पुंडलिक मेश्राम-भाराकॉ-अपक्ष, जगदीश अचलदास टावरी-अपक्ष, सौरभ राजू तिमांडे-अपक्ष, रामदास भगवानजी आंबटकर-भाजपा, सुरेश रामाजी मुंजेवार-अपक्ष, चंदनसिंह साधुसिंग चंदेल भाजपा-अपक्ष, इंदकुमार सराफ-भाराकॉ, पांडूरंग रामू जाधव-अपक्ष यांचा समावेश आहे. 7 मे रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे .या निवडणुकीसाठी मतदान दिनांक 21 मे रोजी सकाळी 8 ते सायं.4 वेळात घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 24 मे 2018 रोजी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे
चंद्रपुरात निवडणूकीच्या आचारसंहितेनंतर सुरु होणार दीनदयाल कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात

चंद्रपुरात निवडणूकीच्या आचारसंहितेनंतर सुरु होणार दीनदयाल कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूरात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राची सुरूवात दि. 5 मे 2018 करण्यात येणार होती. चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील गरीब विद्याथ्र्यांना अभिनव प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी मिळाव्या या संकल्पनेतून ना. हंसराज अहीर यांनी 100 टक्के शिष्यवृत्ती असणारे प्रशिक्षण केंद्राची सुरूवात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून साकार करण्यासाठी पुढाकार घेत या प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ दि. 5 मे रोजी ठरली असता विधान परिषदे निवडणुक आचारसंहीतेच्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या कार्यालयातून पत्राकाद्वारे देण्यात आली आहे. 
प्रशिक्षण इच्छुक ग्रामीण युवक, युवतींनी या योजनेसंदर्भात अधिक माहितीकरिता केंद्रीय गृहराज्यमंत्री  यांचे स्वीय सहायक रवि चावरे मो.नं. 9552597392/9923171698 अथवा राहुल बनकर 9422137086 यावर संपर्क साधुन आपले शैक्षणीक कागदपत्रे  व आवश्यक माहितीसह केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या  स्थानिक चंद्रपूर येथील कार्यालयास सादर करावे असे कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.
बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन

बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन

BRSP Manpasamora Movement | बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलनचंद्रपूर/प्रतिनिधी:

 मनपाने अन्यायकारक लादलेला कर आणि शिवशंकर होंडा शोरूम संचालकांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
मनपाने अन्यायकारक कर लागू करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. शोरूम संचालक व मनपा अधिकारी व सीएच्या संगनमताने गैरव्यवहार करण्यात आला. याचे पुरावे देऊनही मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, मोनल भडके यांनी केली. या आंदोलनात संजय बोधे नभिलास भगत, संजय मगर, अनुकुल शेंडे, गुरू भगत, राजु रामटेके,अशोक रामटेके, जे. डी. रामटेके, महेंद्र झाडे, चंद्रकांत माझी,विजय गोंडाने आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तिच्या सोबत महिलाही ठरली अघोरी विद्येला बळी

तिच्या सोबत महिलाही ठरली अघोरी विद्येला बळी

महिला निर्वस्त्र साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
अंगातील भूत बाधा उतरविण्याच्या नावाखाली एका १७  वर्षीय मुलीवर मांत्रिकाने अत्याचार केल्याचे प्रकरण गाजत असतानाच मुली सोबत आलेल्या एका 34 वर्षीय विधवा महिलेवर सुद्धा अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली.  त्यामुळे अटकेत असलेल्या तीनही आरोपींना पोलिस कोठडीत न्यायालयाने ७ मे पर्यंत वाढ केली आहे,या घटनेपासून आणखी  अशेच काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे, या प्रकरणातील आरोपी मांत्रिक  मुन्ना समशेरखान पठाण (४०)राहणार दुर्गा नगर नागपूर, किशोर वाळके शत्रीनगर भद्रावती,आशिष पद्माकर कांबळे गणपती नगर गौराळा भद्रावती यांना पोलिसांनी अटक केली आहे सदर आरोपींनी आपण भूतबाधा होत राहतो अशी बतावणी करून नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातील सातगाव येथील युतीला भद्रावती येथे बोलावले या युवती सोबत   ३४ वर्षीय विधवा महिला सुद्धा आली होती आरोपीने भूत उतरविण्याच्या बहाण्याने सुरुवातीला शास्त्रीनगर भागात किरकोळ किशोर वाळके यांच्या घरी नेल्यानंतर शेतातील एका खोलीत महिलेला विवस्त्र केले म्हणून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सुरवातीला युवतिनेच या प्रकरणाची अत्याचाराची  तक्रार दाखल केली 
हा संपूर्ण प्रकार वाळके यांच्या घरी असलेल्या CCTV   फुटेज मधून समोर आला  CCTV   फुटेज तपासले असता हि  धक्कादायक बाब समोर आली या घटनेतील आरोपींना न्यायालयात दाखल केले असता आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे,या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. 

Thursday, May 03, 2018

पहिले चोरट्याची धुलाई;मग केले पोलिसांच्या स्वाधीन

पहिले चोरट्याची धुलाई;मग केले पोलिसांच्या स्वाधीन

चंद्रपूर/रोशन दुर्योधन:
शहरात दुचाकी चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरीच्या दररोज घडणाऱ्या घटनांवरून दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येते. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान शहरातील जटपुरा गेट येथे तिन दुचाकीचोर भरदिवसा गाडीचोरतांना दिसले. MH ३४ W ७२४० या क्रमांकाची होंडा activa व access ह्या दोन पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्या चोरतांना दिसलेल्या चोरट्यांना तेथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला,या चोरट्यांच्या टोळीत एकून ३ चोर होते मात्र यातील २ चोर पडून जाण्यास यश्वस्वी ठरले.त्यामुळे एका चोरट्याला नागरिकांनी चांगलच बदाडले,या नंतर जटपूरा गेट येथे तैनात असेलेल्या वाहतूक पोलिसाच्या मदतीने रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले, या पोलिसांच्या ताब्यात असेलेल्या चोरट्यांचे नाव वैभव दिलीप जातेगावकर असे सांगण्यात येत आहे. या चोरट्यावर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व गाडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.    




जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूर ६२ व्या स्थानी

जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूर ६२ व्या स्थानी

चंद्रपूर/ललित लांजेवार:
जागतिक आरोग्य संघटने’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वाधिक भारतीय शहरांचा समावेश आहे. या यादीतील २० पैकी १४ प्रदूषित शहरं ही केवळ भारतात आहे. तर या यादीत चंद्रपूरने हि आपला स्थान प्रदूषणाच्या यादीत पक्के केले असून जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूर ६२ व्या क्रमांकावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जगातील १०८ देशांतील तब्बल ४ हजार लोकवस्तींचा अभ्यास केला. यातून ८५९ शहरांतील प्रदूषणाची पातळी अभ्यासण्यात आली. याच यादीत भारतातील ३२ शहरांवर प्रदूषित असा शिक्का बसला आहे. यानुसार धुलिकणांचे पीएम २.५ व पीएम १० असे वर्गीकरण करण्यात आले. यापैकी पीएम २.५ हे अधिक धोकादायक समजले जाते. मोठे धुलिकण नाक व तोंडाद्वारे फुफ्फुसात जाताना गाळले जातात. मात्र प्रदूषित धुलिकण जेवढे सुक्ष्म तेवढे ते प्रकृतीसाठी घातक ठरतात. पीएम १०च्या यादीतील जागतिक महानगरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. धक्कादायक म्हणजे प्रदूषणाबाबतचे सर्वात धोकादायक शहर म्हणून जगाच्या नकाशावर असलेले बीजिंगची हवाही मुंबईहून बरी असल्याचे ही आकडेवारी सांगते. प्रदूषित महानगरांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले मुंबई जागतिक शहरांच्या यादीत ६३ व्या क्रमांकावर आहे. त्याहून वाईट स्थिती नागपूरची (२४) व चंद्रपूरची (६२) आहे.
जागतिक पातळीवरील तापमानात भारतातील चंद्रपूर हे शहर सर्वोच्च स्थानी पोहोचले आणि पुन्हा एकदा प्रदूषणाच्या जागतिक पातळीवर चंद्रपूरचे स्थान ६२ व्या स्थानी आहे,शहरात २०१६ मध्ये प्रदूषण कमी झाल्यामुळे उद्योगबंदी हटवण्यात आली. पण त्यानंतर वर्षभरातच म्हणजे २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जल आणि जमीनीच्या प्रदूषणात चिंताजनक वाढ झाल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला. यानुसार चंद्रपूरच्या प्रदूषणाचा निर्देशांक ५८.६२ वरून ६२.२ वर पोहोचला होता.हि वाढ प्रदूषित  श्रेणीतून अतिप्रदूषित श्रेणीत आहे.
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे आंबटकर तर काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे आंबटकर तर काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ

नागपूर/प्रतिनिधी:
विधान परिषदेसाठी चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.तर चंद्रपूर - वर्धा - गडचिरोली याच मतदारसंघासाठी काँग्रेसकडून वर्धेचे माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ यांना उमेदवारी देण्यात आली. 
सध्या भाजपचे मितेश भांगडिया या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंबटकर यांच्यासह अरुण लखानी, सुधीर दिवे यांची नावे चर्चेत आली होती. तोडीसतोड लढत देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही एकामेकांच्या उमेदवाराची प्रतीक्षा करीत होते.एका निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने भाजपचे उत्साह संचारला आहे. 
रामदास आंबटकर मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यातील वडनेर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील अधिकारी होते. मात्र, संघावर बंदी घातल्याने त्याविरोधात आंदोलन उडी घेतली होती. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरी गमवावी लागली. तेव्हापासून त्यांनी उर्वरित संपूर्ण आयुष्य संघ कार्यासाठी वाहून घेतले. रामदास आंबटकर हेसुद्धा सुमारे ३५ वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. अनेक वर्षे पूर्व विदर्भाचे संघटन सचिव होते. त्यानंतर २००४ ते १५ या काळात भाजपचे संघटन सचिव होते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना भाजपने सरचिटणीस केले. आता त्यांना विधान परिषदेत पाठविण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही आंबटकरांच्या नावाला पसंती दिल्याचे कळते.
माहिती द्या अन व्हा लखपती...

माहिती द्या अन व्हा लखपती...

गडचिरोली/प्रतिनिधी:
 गडचिरोलीत ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहिम उघडली आहे. निष्पाप आदिवासींची हत्या करणाऱ्या पाच जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी १ कोटी ७१ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यात एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच वर्तमानपत्रांना जाहिराती देऊन गडचिरोली पोलिसांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे. 
पोलीस अधिकारी आणि सी-६० च्या जवानांनी गडचिरोलीत नुकत्याच केलेल्या कारवाईत ३९ नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांचं मनोबल वाढल्याने पोलिसांनी थेट जाहिराती देऊनच नक्षलवाद्यांच्या टॉप पाच कमांडरला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी या नक्षलवाद्यांच्या फोटोसह सर्व वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत. 'द्या माहिती, व्हा लखपती' अशा मथळ्याखाली या जाहिराती देण्यात आल्या आहेत. 
या जाहिरातीत मल्लोजुल्ला वेणुगोपाल ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू ऊर्फ लच्छन्ना अभय याच्यावर ६० लाख, दीपक ऊर्फ मिलिंद ऊर्फ सह्याद्री तेलतुंबडे याच्यावर ५० लाख, नर्मदाक्का ऊर्फ उषाराणी किरणकुमार हिच्यावर २५ लाख, जोगन्ना ऊर्फ चिमाला नरसय्या याच्यावर २० लाख तर पहाडसिंग ऊर्फ अशोक ऊर्फ बाबुराव तोफा याच्यावर १६ लाखाचं बक्षीस जाहिर करण्यात आलं आहे. हे सर्वजण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगडमधील आहेत. हे पाचही जण जहाल नक्षलवादी आहेत. त्यांनी गडचिरोलीत अनेक आदिवासींची हत्या केली असून त्यांचा घातापाती कारवायांमध्येही सहभाग असल्याचं पोलिसांनी जाहिरातीत म्हटलं आहे. या नक्षलवाद्यांना अटक केल्यास किंवा त्यांना जीवे मारले तरीही बक्षीस दिले जाणार असून संबंधितांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी या जाहिरातीत स्पष्ट केलं आहे. ०७१३२-२२२३४८, ९४२१६९९८०८, ७२१८८७८१७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गडचिरोली पोलिसांनी केलं आहे.
रेल्वेच्या चहा-कॉफीत मिसळल रेल्वे टॉयलेटचंच पाणी;बघा विडीओ

रेल्वेच्या चहा-कॉफीत मिसळल रेल्वे टॉयलेटचंच पाणी;बघा विडीओ

railway vendor fined rs 1 lakh after in a viral video people were seen bringing out tea coffee cans from inside a train toilet at secunderabadहैदराबाद:(काव्यशिल्प ऑनलाईन):
रेल्वेगाड्यांमधील अन्नपदार्थांच्या दर्जावरून अनेक तक्रारी येत असताना,एका विक्रेत्यानं चहा-कॉफीच्या कॅनमध्ये एक्स्प्रेसमधील टॉयलेटचं पाणी मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं संबंधित चहाविक्रेत्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिकंदराबाद रेल्वे स्थानकात हैदराबाद-चारमीनार एक्स्प्रेसमध्ये हा किळसवाणा प्रकार घडल्याचे रेल्वेनं सांगितलं. विक्रेत्यानं चहा-कॉफीच्या कॅनमध्ये एक्स्प्रेसमधील टॉयलेटचा पाणी मिसळलं होतं. पाणी मिसळल्यानंतर विक्रेता चहा-कॉफीच्या कॅनसह टॉयलेटमधून बाहेर येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी दोषी चहाविक्रेत्याला रेल्वेनं एक लाख रुपयांचा दंड केला आहे. 


  धनगर आरक्षण "अहवाल अंतिम टप्प्यात

धनगर आरक्षण "अहवाल अंतिम टप्प्यात

नागपुर/प्रतिनिधी:
 धनगर समाज संघर्ष समिति (निष्ठावंत) महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख पदाधिकारी यांनी दिनांक 29 अप्रैल 2018 रोजी नागपुर येथे रामगिरी बंगल्यावर माननीय. मुख्यमंत्री यांची भेट घेतली या वेळी मा.मुख्यमंत्री यांनी धनगर समाज संघर्ष समिती (निष्ठावंत) महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाशी सुमारे अर्धातास सविस्तर व शांतपणे चर्चा केली यावेळी शिष्टमंडळाने मा.मुख्यमंत्री याना धनगर आरक्षण लागु करण्यास विलंब होत असल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना तीव्र झालेल्या असून धनगर समाज प्रचंड नाराज आहे. 
हे मा. मुख्यमंत्री यांना सांगितले .यावर मा. मुख्यमंत्री म्हणाले की धनगर समाजाच्या भावनेचा मी आदर करतो .व धनगर समाज सरकार वर नाराज आहे.मी हे मान्य करतो कारण धनगर आरक्षण लागु करण्यास उशिर होत असला तरि धनगर आरक्षण अहवाल कायद्याच्या सर्व पैलूचा अभ्यास करुण तयार केला जात आहे. अहवाल अंतिम टप्प्यात आलेला आहे. लवकरच केंद्र सरकार कडे हा अहवाल व शिफारस पाठवीली जाईल. असे मा. मुख्यमंत्री यांनी ठासुन सांगितले . 
तसेच नंतर अन्यायग्रस्त शासकिय/निमशाकिय कोणत्याही कर्मचा-याला नौकरितुन कमी केले जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितले.महाराष्ट्रातील मेंढपाळ धनगर समाज बांधवांचा चराउ कुरणांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असे सांगितले. तसेच बेरोजगाराना मुद्रा लोन तातडीने वाटप करन्याचे आदेश सर्व बॅकांना दिले असल्याचे मा. मुख्यमंत्री म्हणाले त्यांचा व्यस्त कार्यक्रम असतानाही त्यांनी धनगर समाज संघर्ष समिति (निष्ठावंत) महाराष्ट्र राज्य च्या शिष्टमंडळास अर्धातास वेळ दिल्या बद्यल व मा. मुख्यमंत्री याचे विश्वासु मा. संदीप भाऊ जोशी यांनी पंधरा दिवसात मा.मुख्यमंत्री यांची भेट करुण देतो हे आश्वासन पाळल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले .
 या शिष्टमंडळात धनगर समाज संघर्ष समिती(निष्ठावंत) चे अध्यक्ष देवेन्द्र उगे ,राज्य महासचिव मोरेश्वर झिले, उपाध्यक्ष अरूण माहुरे,प्रदेशसंघटक उत्तमराव चिव्हाने ,प्रसिद्धीप्रमुख अशोक खाडे,कोषाध्यक्ष नंदकिशोर गवारकर,संघटक सचिव वामणराव तुर्के-सिनेट सदस्य संपर्कप्रमुख प्रकाश चिव्हाणे,सहसंपर्कप्रमुख राजू बुधे , इ.उपस्थित होते

Wednesday, May 02, 2018

देशातील चंद्रपूर आणि बल्लारशहा रेल्वे स्टेशनं देशात सर्वात सुंदर, १० लाखांचे पहिले बक्षीस मिळवले

देशातील चंद्रपूर आणि बल्लारशहा रेल्वे स्टेशनं देशात सर्वात सुंदर, १० लाखांचे पहिले बक्षीस मिळवले

chandrapur railway station साठी इमेज परिणाम
नागपूर/प्रतिनिधी:
राज्यातील बल्लारशाह आणि चंद्रपूर ही दोन रेल्वे स्थानकं सौंदर्यीकरण स्पर्धेची विजेती ठरली आहेत. रेल्वेच्या स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत या दोन स्थानकांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. 

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने या दोन स्थानकांवर विदर्भातील प्रसिद्ध तोडाबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेच्या आधारे पेंटिंग्स, मूर्त्यांची कलाकृती आणि भित्तीचित्रांचा वापर करत हे सौंदर्यीकरण केले आहे. 
या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे बिहारमधील मधुबनी स्थानक. स्थानिक कलाकारांनी मधुबनी पेंटिंगने या संपूर्ण स्थानकाचे सौंदर्यीकरण केले आहे. त्याच प्रमाणे तामिळनाडूतील मदुराई स्थानकालाही या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला आहे. 
आज या घोषणेनंतर चंद्रपूरमध्ये आनंद व्यक्त केला जात
असून अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे साठी अभिनंदन केले जात आहे. वनमंत्री म्हणून आपली छाप सोडणारे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बाग-बगीचे निर्माण केले आहे . नैसर्गिक सौदर्याची आवड असणाऱ्या या मंत्र्यांनी अगदी फुलपाखरांच्या बागीच्यापासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक इमारतीमध्ये नैसर्गिक सजावटीवर भर दिली आहे त्याचे देखणेपण वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या चमूने या दोन रेल्वे स्टेशन आकर्षक स्वरूप दिले असून त्याची नोंद या स्पर्धेमध्ये घेण्यात आली आहे .पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील दूरध्वनी करून स्वागत केले आहे. रेल्वे स्टेशनला या स्पर्धेमध्ये मिळालेल्या पुरस्काराबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला असून याचे खरे श्रेय नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या चमूला जात असून त्यांनी या ठिकाणच्या कलेला आणि या ठिकाणच्या वनवैभवाला चित्रात आणि हस्तकलेत अतिशय योग्य पद्धतीने साकारल्यामुळेच हे रेल्वेस्टेशन देशभरात ओळख घेऊन पुढे आले आहे. चंद्रपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असून यापुढे चंद्रपूरची ओळख देशातले सजावटीचे रेल्वे स्थानक अशी असेल असे त्यांनी अभिमानाने सांगितले.



बोगस बियाणे विकणाऱ्या दोघांना अटक

बोगस बियाणे विकणाऱ्या दोघांना अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा अल्प भाव व कमी पर्जन्यमान अशा कारणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता बोगस बीटी बियाण्यांचे संकट घोंगावू लागले आहे. जिल्ह्यातील गोंडपीपरी येथे महाराष्ट्रातील प्रतिबंधित बोगस बियाण्याची वाहतूक करताना २ आरोपींना अटक केली,हि कारवाई गोंडपिपरी येथील तालुका कृषी अधिकारी चेतन जाधव व पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी यांच्या मुसक्या आवरल्या,यात १ लाख ८०  हजारांचे बोगस बीटी बियाने व मुद्देमाल जप्त केले.हे दोन्ही आरोपी तेलंगाणा राज्यातले असल्याचे सांगण्यात येत आहे नरेश खोब्रागडे व प्रवीण खोब्रागडे रा.भालेपल्ली तेलंगणाचे रहिवासी आहे,या जप्त  केलेल्या धनराज २४५५ जातीचे १०० पाकिटे, या सोबत इतर वाणाचे देखील वाण जप्त करण्यात आले आहे.सध्या तेलंगणा, आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात आलेले कापसाचे बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात विकले जात आहे. या बियाणांवर राज्यात प्रतिबंध आहे, बोगस बियाणे खरेदी करू नका, असे आवाहन कर कृषीविभागामार्फात शेतकऱ्यांना केले आहे.  सदरची कारवाई ही गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे व त्यांच्या सहकार्याने पार पाडली.

Tuesday, May 01, 2018

चितळाची शिकार करून मांस विकणाऱ्या 5 आरोपींना अटक

चितळाची शिकार करून मांस विकणाऱ्या 5 आरोपींना अटक

चंद्रपुर/प्रतिनिधी:
वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याचे मांस विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून पाच आरोपींना अटक केली. यात वन्यप्राण्याचा मृतदेह व मांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वन्यप्राण्यांची शिकार करून मांस विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मोहुर्लीचे वनपाल धर्मेद राऊत यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या पथकाने मोहुली वनपरिक्षेत्रातील बफरझोन क्षेत्रात असलेल्या सितारामपेठ येथील एका नागरिकाच्या घरी धाड टाकली. या ठिकाणी चितळ व बेडकीच्या मांसाची विल्हेवाट लावताना आढळून आले. वनविभागाच्या पथकाने पाच जणांना अटक केली.

यावेळी घटनास्थळावरुन चितळाचे मांस व मृतावस्थेतील बेडकी (हरिण), पावशी व सत्तूर जप्त केले. ही कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
रमेश नाथ (४०), भाऊजी उईके (४५), विकास चौखे (३५), संजय मडावी (२३), बंडू मडावी (३०) सर्व रा. सितारामपेठ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर कारवाई वनपाल धर्मेद राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी चिडे, वनमजूर आडे व वनविभागाच्या पथकातील कर्मचाºयांनी केली.