काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 02, 2018

जिल्ह्यातील 45 शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध

जिल्ह्यातील 45 शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध

पात्र शाळा सुरु ठेवा अन्यथा पुरोगामी आंदोलन पुकारेल

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
10 पेक्षा कमी पटसंख्या, आसपास दुसरी शाळा आहे, विद्यार्थ्यांचे समावेशन होत नाही, गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत नाही या कारणास्तव चंद्रपूर जिल्ह्यातील 45 शाळा बंद करण्याचे शासनाकडून आदेश आले आहेत, त्यानुसार कार्यवाही सुरु आहे, या निर्णयाचा पुरोगामी शिक्षक संघटनेने जाहीर निषेध केला आहे तसेच सदर आदेश मागे न घेतल्यास संघटना आंदोलन पुकारून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल.
       बंद होणाऱ्या शाळांमध्ये एकूण 45 शाळांचा समावेश आहे. मात्र यापैकी अनेक शाळा बंद करण्यासाठी ठेवलेल्या निकषात बसत नाही तरीही ऑनलाइन सर्व्हे करून शाळा बंद करत आहेत, प्रत्यक्ष पाहणी करून पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचे अहवाल न घेता बंद चे फर्मान निघाले आहे, तसेच नजीक शाळा उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांचे दूरच्या शाळेत समावेशन करण्यात येत आहे. हि अतिशय गंभीर बाब आहे.
   उदा. राजुरा तालुक्यातील 6 पैकी फक्त 2 शाळा निकषात बसतात, कोरपना तालुक्यातील गेडामगुडा सारखी ISO नामांकित  शाळा, अशी गुणवत्तापूर्ण शाळा बंद करण्यात येत आहे, बंद होणाऱ्यापैकी अनेक शाळा अ ग्रेड मध्ये आलेल्या आहेत, अनेक शाळा 1 कि मी च्या निकषात बसत नाही, तर काही शाळांचा या वर्षी पट वाढला आहे त्यामुळे तडकाफडकी शाळा बंद न करता पुन्हा एकदा सर्व शाळांचे सर्व्हेक्षण व्हावे व निकषात न बसणाऱ्या शाळांसह ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये अश्या आशयाचे निवेदन राज्याचे शिक्षण व ग्रामविकास मंत्री व सचिवांना नागपूर अधिवेशनावेळी पुरोगामी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
तरीही शाळा बंद चा निर्णय झाल्यास गावकरी, पालक व विद्यार्थ्यांसह पुरोगामी शिक्षक संघटना रस्त्यावर उतरेल असे निवेदन पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस विजय भोगेकर, चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस हरीश ससनकर, वहिद शेख, विनोबा आत्राम, जगदीश ठाकरे, बाळू गुंडमवार, गुरुदेव बाबनवाडे, गुणवंत कुबडे, लक्ष्मण खोब्रागडे, संदीप येनुगवार, निरंजन गजबे, विजय कुंभारे, सुधीर कुंभारे, गणपत विधाते, रवी सोयाम, सुनील जाधव, पुंडलिक उरकुडे, रामकृष्ण चिडे, पंकज तांबडे, गणेश आसेकर, नरेंद्र मुंगले, गोविंदा गोहने, केवळराम मैन्द, सुधाकर कोल्हे यांनी केले आहे.शाळा बंद साठी इमेज परिणाम

अंगणवाडीला वॉटर फिल्टरचे वाटप

अंगणवाडीला वॉटर फिल्टरचे वाटप

ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या तीन हजार लोकसंख्या चार अंगणवाडी असणाऱ्या बरडकिन्हीं ग्राम पंचायत चौदा वित्त मधून १०% महिला व बालकल्याण अंतर्गत वॉटर फिल्टर चे अंगणवाडी सेविका याना ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या तर्फे वितरण करण्यात आला.
वितरण करतांना श्री.आर.एस .नागुलवार ग्रामसेवक ग्रा.पं., ग्राम पंचायत चे प्रथम नागरिक सौ.लताताई  बगमारे, उपसरपंच  श्री.तुषारभाऊ तलमले, सदस्य श्री.सहदेवराव दोनाडकर, श्री.टिकारामभाऊ ढोंगे, सौ.विधाताई ठाकरे, सौ.संगीता शेंडे, सौ.गीताताई ढोक, सौ.अनिता निकूरे, अंगणवाडी सेविका श्रीमती अनिता गूरूनूले, श्रीमती सवीता दोनाडकर , सौ.अनिता बोँडगुलवार, ग्राम पंचायत कर्मचारी श्री गुलाब ठाकरे , श्री.गुलाब राऊत  कंम्प्यूटर ऑपरेटर श्री अरविंद झोडे  यांच्या उपस्थितीत वॉटर फिल्टर चे वितरण करण्यात आले.

भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद

भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्ह्यात मुल, सावली , ब्रम्हपुरी ,चिमूर तसेच अनेक ठिकाणी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, टपऱ्या ,पानठेले बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध बंद पाळण्यात येत आहे.  अत्यावश्यक सर्व सेवा सुरळीत सुरू आहेत.
भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक झाल्याने भिमा कोरेगाव गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास ४० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी केलेल्या गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलित समाज जातो. मात्र या कालावधीत दलित समाजातील बांधवांवर कधीच हल्ला कोणी केला नाही की त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये एका परदेशी प्रसार माध्यमातील वेबसाईटने भिमा कोरेगांवच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसिध्द केली. ही बातमी मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पहिल्यांदाच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
     काल रात्री पासूनच हजारो लोक आणि तितकीच वाहने क्रांतीस्तंभापासून जवळच असलेल्या पुलालगत पार्क केलेली होती. तर आज सकाळ पासुनच लाखो लोक या ठिकाणी जमा झाले होते. तर काही लोक भगवे झेंडे बाईकवर लावून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही लोक दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. तर अचानक दुपारी एकच्या दरम्यान भिमा कोरेगाव जवळच्या पार्किंग भागात दगडफेकीला सुरूवात झाली. इमारतीच्या गच्चीवरून समाजकंटक दगडफेक करून पळून जात होते त्यांना काही महिलाही अटकाव करण्यात पुढे आल्या की ते लोक लपुन पळून जात हीच स्थिती वढू गावातही होती.
     दुपारी सुमारे तीनच्या दरम्यान शिक्रापुर पोलिस ठाण्यात तोडफोड करण्यात आलेल्या वाहनासह तक्रारकर्ते दाखल होवू लागले पोलिस ठाण्यात एक दोन कर्मचारी सोडता मनुष्यबळ कमी होते. वाहनावरील निळे व पंचशील झेंडे पाहून दगडफेक करण्यात येत होती. पाठीमागून दगड मारता हिंम्मत असेल समोर या अशा प्रतिक्रीया तक्रार महिलांनी करीत पोलिस ठाण्याला घेरावच घातला. एकेक तक्रारदार येता येता पोलिस ठाण्यात गर्दी वाढू लागताच पोलिस मनुष्यबळही वाढले. तीन वाजल्यापासून परिसरात भगवे झेंडेधारी यांनी दुकाने हॉटेल्स ढाबे बंद करण्याचे आवाहन करताच धडाधड शटरडाऊन झाले. त्यामुळे सकाळपासून आलेल्या लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल झाले. परिस्थिती अद्यापही तणावाखाली असून लोक दहशती खाली आहेत. दगडफेक करीत असलेल्यांना पकडायचे सोडून पोलिस लोकांना पांगविण्यासाठी लाठीचा वापर करीत होते.
अंधश्रद्धेंच्या घटनेची पोलीसांनी दखल घ्यावी. - हरिभाऊ पाथोडे

अंधश्रद्धेंच्या घटनेची पोलीसांनी दखल घ्यावी. - हरिभाऊ पाथोडे

    andhashraddha साठी इमेज परिणाम
  •  सिंदेवाही 
  •  तालुक्यात अंधश्रद्धांचे प्रमाण प्रचंड आहे. तालुक्यातिल नवरगाव येथे भूत उतरविण्याच्या नावाखाली विनोद धकाते नावाच्या शिक्षकाचा बळी घेतला. टेकरी येथे जादूटोण्याच्या संशयावरून खून केला. रत्नापूरात नग्न धिंड काढली. उमरवाहीत अघोरी विद्या बाटविण्याच्या नावावर मुत्र पाजले. आंबोली येथे तथाकथित देविच्या सांगण्यावरून मांत्रीक असल्याचा संशय घेऊन तिन कुटूंबाला बहिष्कृत केले. सावरगाटा येथे एका इसमाचा खून केला. या सर्व ठळक घटना सिंदेवाही पोलीस स्टेशन अंर्तगत झालेल्या आहेत. 
  • या सर्व घटनांचा पाठपूरावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. जनप्रबोधन केले. शासनाने अंधश्रद्धांची दखल घेत 20 डीसेंबर 2013 ला जादूटोणा विरोधी कायदा केला. अभाअंनिसच्या वतिने पोलीस अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले. तत्कालीन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांचे पुढाकाराने जिल्हयातील पोलीस पाटलांनाही प्रशिक्षण दिले. तरीही पोलीस अंधश्रद्धांच्या घटनांची तक्रार आल्याशिवाय दखल घेत नाही. वारंवार नवरगाव परिसरात अंधश्रद्धेच्या घटना उजागर होत आहेत.
    तरी जिल्हयात असणा-या अंधश्रद्धांच्या ठाण्यांची पोलीस विभागाने दखल घ्यावी. असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.
रक्तगट व ब्लड प्रेशर तपासणी शिबीर संपन्न

रक्तगट व ब्लड प्रेशर तपासणी शिबीर संपन्न

 ब्रम्हपुरी/ ग्रामीण प्रतिनिधी:
हितआयु लोकसेवा बहुद्देशीय संस्था,ब्रम्हपुरी अंतर्गत ब्रम्हपुरी रक्त सेवा यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र इन्स्टि. ऑफ फार्मसी,झेप निसर्गमित्र बहू. संस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था,शिवणकर हॉस्पिटल नागभीड यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य रक्तगट तपासणी शिबीरसंपन्न झाला.
मा.संजुभाऊ गजपुरे यांच्या जन्म दिनानिमित्त नागभीड,तळोधी,गायमुख व कोसंबी या गावात आयोजित करण्यात आले होते. यात जवडपास २०००  च्या वरून लोकांनी आपले रक्तगट व रक्तदाब तपासणी  केली.
सध्या कोणत्याही आजार जर उद्भवला तर  सहजासहजी  रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात.रक्त तपासणी करने म्हणजे - रक्तातील रक्तद्रव्य, तांबडया पेशी, पांढ-या पेशींची संख्या व प्रमाण तपासणे.रक्तस्राव किती वेळात थांबेल व रक्त किती वेळात गोठते हे पाहणे.रक्तातील प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ क्षार, प्राणवायू, कार्बवायू, यूरिया,बिलिरुबीन, (काविळीत वाढते ते द्रव्य) आणि इतर अनेक घटकांचे प्रमाण पाहणे.रक्तातल्या प्रतिघटकांची पातळी आणि प्रकार (म्हणजे रोगजंतूंविरुध्द तयार होणारे संरक्षक पदार्थ पाहणे. विषमज्वरासाठी 'विडाल' तपासणी, लिंगसांसर्गिक रोगांसाठीव्हीडीआरएल' तपासणी, एचआयव्ही एड्स तपासणी अशा अनेक तपासण्या आहेत.
रक्तगट (ए, बी, ओ) व आर-एच तपासणे.रक्तातील जंतूंचे पृथक्करण करणे; त्यावर कोठली औषधे चालतात हे पाहणे,विशेषतः दीर्घकाळ ब-या न होणा-या तापात अशी तपासणी करतात.कावीळ, यकृतदाह, प्लीहासूज, हृदयविकार,इत्यादी आजारांत वाढणारीरासायनिक द्रव्ये तपासणे यामुळे गोर गरीब जनता या माध्यमातून  रोगमुक्त होण्यासाठी या शिबिराच आयोजन करण्यात आले असे गजपूरे साहेब यानी व्यक्त केले.
आरोग्यसेवा या शिबिराच्या यशस्वी आयोजना बद्दल मा.संजुभाऊ गजपुरे यांनी हितआयु लोकसेवा बहू. संस्थे चे अध्यक्ष स्वप्नील अलगदेवे,सचिव प्रा.सुयोग बाळबुधे,महाराष्ट्र इन्स्टि. ऑफ फार्मसी चे प्राचार्य प्रा.विशाल लोखंडे तसेच सर्व संस्थेचे मनापासून आभार मानले.
अनाथ मुलांच्या विकासासाठी सदैव तत्पर

अनाथ मुलांच्या विकासासाठी सदैव तत्पर

  • श्रीकांत पाटील अध्यक्ष, पारधी युवा जणक्ल्याण संस्था

ब्रम्हपुरी/ग्रामीण प्रतिनिधी:
आज नववर्षाची सुरुवात युवा जनकल्याण संस्थानी  राजुरा येथील नारायनदा मावानी छात्रवास चुनाळा(अनाथ) मुलांशी हितगुज साधून विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला त्यानंतर त्याच्या विकासासाठी युवा जनकल्याण सदैव तत्पर राहणार असे श्रीकांत पाटील यानी व्यक्त केले.तसेच नवतरुण युवकांना मार्गदर्शन केले त्या युवकांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोहार आणि फळे वाटप करण्यात केले.यात बालगोपालांना खूप आनंद झाल असेच आम्हा ला भेटत राहावं अस इच्छा श्रीकांत पाटील यानी व्यक्त  व्यक्त केल्या. या कार्यक्रम प्रसंगी युवा जनकल्याण अद्यक्ष श्रीकांत पारधी, युवा जनकल्याण संचालक इंजि.नंदकिशोर सिन्हा,प्रकल्प प्रमुख दिलीप म्हैसने, युवा जनकल्याण सद्स्य स्मित ताकसंडे,अजय किरमिरवार,आकाश गीडवानी,हेमराज तनकर,प्रदीप चंदावार,शारदा कोडापे आदी उपस्थित होते.यानंतर पण युवा जनकल्याण च्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम केले जातील अस ठरविण्यात आले.
वीज उपकेंद्राच्या २ ट्रान्सफॉर्मरला भीषण आग

वीज उपकेंद्राच्या २ ट्रान्सफॉर्मरला भीषण आग


चंद्रपूर/प्रतिनिधी : चंद्रपूर येथील वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राच्या  ट्रान्सफॉर्मरला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राचे २  ट्रान्सफॉर्मरमध्ये भीषण स्फोट झाले आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. थंडीच्या दिवसात  ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती सध्यातरी मिळू शकली नाही . 

  • या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले.हि आग जवळच अ सलेल्या मुख्य उपकेंद्रापर्यंत पोहचू नये म्हणून वीज कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
  • आगीचे स्वरूप इतके हि भयानक होते कि हि आग वीजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मंगलवारी सकाळी ६ वाजेपरीयंत मेहनत घ्यावी लागली.
  • या लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील जवळपास ३० ते ३५ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती आहे तर महापारेषण विभागाचे लाखोंचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे
  • हा संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जवळपास ३६ तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या घटनास्थळी ऊर्जाविभागाचे बडे अधिकारी पोहचले असून हि आग नेमकी कशामुळे लागली याचा तपस सुरु आहे.Chandrutur electricity sub-station severe fire, | चंद्रपूरात वीज उपकेंद्रात भीषण आग, ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटाने परिसर हादरला

Monday, January 01, 2018

मनपाच्या शाळेतील २१ विद्यार्थ्यांची निवड

मनपाच्या शाळेतील २१ विद्यार्थ्यांची निवड

  • गणतंत्रदिनाच्या परेडसाठी
    विद्यार्थांना महापौर नंदा जिचकार व 
  • आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते आवश्यक साहित्याचे वाटप

नागपूर,ता.१ : नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिवस परेडसाठी नागपूर महानगरपालिकेच्या चार शाळांतून २१ विद्यार्थी व एका शिक्षकाची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना आवश्यक साहित्य महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते सोमवारी (ता.१) वितरित करण्यात आले.

यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा समिती सदस्य शरद यादव, नगरसेवक पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त आर. झेड. सिद्दिकी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, मुख्याधापक संजय पुंड प्रामुख्याने उपस्थित होते.

दक्षिण-मध्य सांस्कृतिक विभागामार्फत नागपुरातील २७ शाळांमधून १७४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात मनपाच्या चार शाळांमधून २१ विद्यार्थी व एक शिक्षकाची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी २ जानेवारीला दुपारी १२.४५ ला गोंडवाना एक्सप्रेसने दिल्लीला रवाना होणार आहे. गणराज्य दिनाची परेड आटोपून २८ जानेवारी रोजी परत येणार असल्याची माहिती नरेश चौधरी यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुहानी पाल, काजल गुप्ता, दीपक पाल, वाल्मिकी नगर शाळेची माधवी पांडे, काजल झा, खुशबू ठाकूर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे शाळेची शुभांगी बोकडे, प्रथम सायम, गौरव सहारे, वैष्णवी केकारवाडे, शिवकुमार नेवारे, आस्था खंडारे, लालबहादूर शास्त्री शाळेचे आरती यादव, आयुषी शर्मा, अमिषा सिंग, रितेश शर्मा, श्रीकृष्णा लोढी, विनय रक्षक, इंद्रा मारवाडी, रितिक बिऱ्हा हे सर्व विद्यार्थी नवव्या वर्गात आहे. तर कार्तिक कोहली हा वर्ग आठव्या वर्गात आहे. लालबहादूर शास्त्री शाळेतील श्रीमती लता राजकुमार कनाथे या शिक्षिकेची निवड झाली आहे.

मनपाद्वारे विद्यार्थ्यांना यावेळी सुटकेस, एअर बॅग, लॅपटॉप बॅग, ट्रॅकसूट, कॅनवॉज जोडे, मोजे, ब्लेझर आदी आवश्यक वस्तु वितरित करण्यात आले. यावेळी महापौरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. कार्यक्रमाला मनपातील सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.
कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा

कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा

  • महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश 
  •   हनुमाननगर झोनमध्ये घेतली तातडीची बैठक

नागपूर,ता. १ : वारंवार डिमांड पाठवूनही जर कोणी कर भरत नसेल तर आता महानगरपालिकेचे अधिकार वापरा. वारंट बजावून तातडीने जप्तीची कारवाई करा आणि १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

हनुमान नगर झोन कार्यालयात कर वसुलीसंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर नंदा जिचकार यांनी बोलाविलेल्या बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती भगवान मेंढे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, नगरसेविका उषा पायलट, स्वाती आखतकर, लिला हाथीबेड, मंगला खेकरे, विद्या मडावी, श्रीमती ठाकरे, कल्पना कुंभलकर, उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सर्व कर निरिक्षकांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला. ज्या कर निरीक्षकाने त्यांच्याकडे असलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी वसुली केली असेल तर त्याची कारणे काय, याबाबत विचारणा केली. पुढील सात दिवसांत वसुलीचे आणि जप्तीचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. सात दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यावेळी जर समाधानकारक वसुली आणि जप्ती झालेली नसेल तर प्रशासनाला संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

लोकविध्यालय तथा उच्च माध्य. विध्यलयात स्नेह संमेलन

लोकविध्यालय तथा उच्च माध्य. विध्यलयात स्नेह संमेलन

ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी :- गुलाब ठाकरे

ब्रम्हपुरी दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या गांगलवाडी येथील लोक विध्यालयात आज दिनांक :-१/१/२0१८ ला नूतन वर्षाच्या शुभपर्वावर स्नेह संमेलन व  पालक मेळावा संपन्न झाला.
   या मेळाव्यांना मा.श्री.ज्ञानेश्वर भोयर यानी स्नेह संमेलन सोहळ्याच  उद्घाटन  पार पाडण्यात आला.उद्घाटन महोदयानी मार्गदर्शन करताना  शाळेतील  विध्यार्थाना व त्यांच्या पालकांन सोबत संवाद साधताना   सांगितल की शिक्षक आणि पालकांचा एकत्र ताळमेळ होत राहिला तर  त्या विद्यार्थ्यातील सुप्त  कलागुणाना  चांगल्या प्रकारे वाव मिळेल.  शाळांमध्ये प्रत्येक वर्गात पालक-शिक्षक संघ स्थापन करून पालक सभा आपण दर महिन्याला घेत असतो. पालक संघ व्यवस्थापण यांची कामे कोणती हे सुद्धा सांगितले की विध्यार्थी घरून शाळेत येतो की नाही ,  अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचविणे, अभ्यासाशी पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यास सहाय्य मिळविणे, सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे, शाळेतील शैक्षणिक शुल्क, सत्र फी व शालेय उपक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांसंबंधी माहिती घेऊन पालक-शिक्षक संघाच्या समितीपुढे ते मांडणे अशी पालक-शिक्षक संघाची कर्तव्ये ठरवून देण्यात आली आहेत.स्नेह संमेलन आपण आज ठेवला विध्यार्थ्याच्या अंगी चौदा विधा चौसष्ट कला यांच्या पैकी एक ना एक कला घेऊन येत असतो ती कला सांस्कृतिक कार्यक्रमातून दिसली "भूक " या नाटकातील अप्रतिम अशी कलापथनाट्य विध्यार्थ्यानी सादर करून पालकांचे विध्यार्थ्याँचे तसेच प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतल.न्रुत्य सुद्धा खूप सुंदर या विध्यार्थ्यानी सादर केला.असे मा.श्री .भोयर सरपंच साहेब यानी व्यक्त केले.तसेच स्नेह संमेलनाचे अध्यक्ष मा .श्री .विष्णुजी तोंडरे यानी अध्यक्षीय संभाषण करताना सांगितले की शिक्षक पालक संघाच्या सभेत
 पालकांची उपस्थिती अशीच ठेवत राहिला तर  विध्यार्थ्याच्या  शिक्षण गुणवत्तावाढीसाठी मदत होईल असे सांस्कृतिक कार्यक्रम राबवून मोठा कलाकार किंवा उच्च शिक्षित व्यक्ती होण्यासाठी  अडचणी येणार नाही. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची चांगले मिळाव व वीध्यार्थ्याना चांगल्या दिशने प्रगती करने याचे संस्कार शिक्षकच घडवू शकतो पण पालकांची साथ लाभली तर हे शक्य होणार असे मा.श्री.तोंडरे सर दी.रु.ए.सो.ब्रम्हपुरी यानी व्यक्त केले.
त्याच प्रमाणे प्रमुख उपस्थितीत मा.कुथे सर माजी शिक्षक, श्री.धारने सर माजी शिक्षक , श्री.सेलोकर साहेब गुरुकृपा क्लॉथ सेंटर गांगलवाडी , ठाकरे साहेब डोर्ली, तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकोत्तर विध्यार्थी बहूसंख्य प्रेक्षक यांच्या उपस्थितीत स्नेह संमेलन व पालक मेळावा संपन्न झाला.
कमिशनच्या हव्यासापोटी कामगारांचा बळी

कमिशनच्या हव्यासापोटी कामगारांचा बळी

पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन 

चंद्रपूर -जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील 8 ते 10 वर्षांपासून काम करणाऱ्या 137 कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले.अपंग  प्रमाणपत्र,जन्म-मृत्यू नोंदणी,जननी शिशू सुरक्षा योजना,स्वयंपाकी ,सुरक्षा रक्षक अशा विविध व संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढल्याने दवाखान्यातील अत्यावश्यक सेवा प्रभावित झालेल्या आहेत.
  जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणार्‍या कंत्राटदाराच्या कंत्राटाची मुदत मागील मार्च 2017 मध्ये संपलेली होती. त्यानंतर कंत्राटदारास मुदतवाढ देण्यात आली. मध्यंतरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  श्री मोरे यांनी नव्याने निविदा काढून 236 कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेतले.विशेष म्हणूजे जुन्याच कंत्राटदाराला  नविन काम देण्यात आले.मात्र  8-10 वर्षांपासून काम करणाऱ्या जुन्या कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा विचार करण्यात आला नाही.जिल्हा सामान्य रुग्णालय हे आधी शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत काम करीत होते.आता रूग्णालय मेडिकल कॉलेज म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्रालय अंतर्गत अस्थायी स्वरूपात म्हणजे तिन वर्षांसाठी काम करणार आहे.सध्या या रूग्णालयातील परमनंट कर्मचारी-  अधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निधीतून पगार घेतात व वैद्यकीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या मेडिकल कॉलेज ला  सेवा देतात.अशाच प्रकारे  जुन्या कंत्राटी कामगारांचे समायोजन  करणे शक्य होते.परंतु शासकीय वैद्यकीयाचे डीन व सामान्य रुग्णालयाचे जिल् 
हा शल्यचिकित्सक यांच्या चुकीमुळे 137 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली निघल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा प्रहार चे नगरसेवक  पप्पू देशमुख यांनी दिला आहे.
मुख्य प्रषासक कोल्हेंची गच्छंती अटळ

मुख्य प्रषासक कोल्हेंची गच्छंती अटळ



नोकर असल्याने पदावर राहण्यास अपात्र?

रामटेक /तालुका प्रतिनिधी- रामटेक कृशि उत्पन्न बाजार समीतीचे अषासकीय प्रषासक मंडळाची नुकतीच राज्य सरकारने घोशणा केली.तसे अधिकृत आदेष नागपुर जिल्हा उपनिबंधक सतीष भोसले यांनी जारी केले व त्यानुसार मुख्य प्रषासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रषासक किषोर रहांगडाले व अन्य प्रषासकांनी दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी कार्यभार स्विकारला.मात्र अलिकडेच आकोट कृशि उत्पन्न बाजार समीतीच्या अतुल माधवराव म्हैसने या संचालकांना अकोल्याचे जिल्हा निबंधक यांनी ते नोकरी करीत असल्याने अपात्र घोशित केल्याने व अषाच कारणांसाठी आकोटच्या बाजार समीतीच्या सभापतीसह सात संचालकांनाही अपात्र घोशित केल्याने रामटेकच्या बाजार समीतीचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्यप्रषासक अनिल कोल्हे हे पदावर कसे काय राहू षकतात असा प्रष्न उपस्थित झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की रामटेक व मौदा अषी दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेली रामटेक-मौदा कृशि उत्पन्न बाजार समीतीचे अलिकडेच राज्या सरकारने विभाजन केले व या दोन्ही बाजार समीत्यांवर स्वतंत्र अषासकीय प्रषासकीय मंडळे नियुक्त केली आहेत.रामटेकच्या या विभाजीत बाजार समीतीवर मुख्य प्रषासक या पदावर रामटेकच्या स्थानीक आदर्ष विद्यालयांत षिक्षक या पदावर कार्यरत असलेले अनिल कोल्हे यांची व अन्य 16 असे एकूण सतरा सदस्यांची नेमणूक केली आहे.‘‘महाराश्ट्र कृशि उत्पन्न पणण (विकास व विनियम) नियम 1967 चे नियम 41(1) जी च्या तरतुदीनुसार षासकीय सेवक किंवा स्थानीक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी हा असेल व त्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन षेती नसेल तर अषी व्यक्ती संचालक पदासाठी अपात्र ठरते’’ त्यामुळे आकोटच्या म्हैसने यांना जो न्याय लावला तोच अनिल कोल्हे यांना लावला तर ते मुख्य प्रषासक या पदासाठी अपात्र ठरतात अषी चर्चा केली जात आहे.कारण की म्हैसने हे षासकीय अनुदानीत खाजगी षिक्षण संस्थेचे कर्मचारी आहेत व त्यामुळे ते पब्लिक सर्वंट या व्याख्येत बसतात.अनिल कोल्हे हे देखिल रामटेकच्या सरकारतर्फे अनुदानीत खाजगी षाळेत षिक्षक आहेत.
रामटेक कृशि उत्पन्न बाजार समीतीच्या मुख्य प्रषासक पदावर अनिल कोल्हे यांची नियुक्ती झाल्याबरोबर रामटेकच्या राजकीय वर्तुळांत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.पुण्यनगरीने तर याबाबत बातमी प्रकाषीत करून षिक्षक कसा काय बाजार समीतीचा मुख्य प्रषासक होवू षकतो असा प्रष्न उपस्थित केला होता.मात्र पदासाठी आसुसलेल्यांना त्याची काहीच पर्वा नसल्याचे दिसून येते.
उपरोक्त बाबतीत नागपुरचे जिल्हा उपनिबंधक सतीष भोसले यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की,रामटेक बाजार समीतीवर अषासकीय प्रषासक मंडळ राज्य सरकारच्या सुचनेनुसार व त्यांनी दिलेली नावे आम्ही राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली आहेत.यासाठी संबधित सर्वांचे षपथपत्र घेण्यांत आली आहेत.या षपथपत्रामध्ये हे सर्व षेतकरी असल्याचे त्यांनी षपथेवर जाहीर केले आहे व त्यांचेषी संबधित सातबाराचा उतारा जोडल्याने ते षेतकरी असल्याचे दिसून येते.हे सर्व षेतकरी आहेत त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्याचे आदेष आपण काढले आहेत.अनिल कोल्हे यांनी आपल्या षपथपत्रांत ते कुठेही षासकीय नोकरीत नाहीत असा उल्लेख केला आहे.मात्र ते रामटेकच्या षासन अनुदानीत खाजगी षाळेत षिक्षक असल्याचा उल्लेख केलेला नाही.याबाबत आपल्याकडे अद्याप कुणाचीही तक्रार नाही त्यामुळे आपण याची चैकषी केली नाही.तक्रार आल्यास नक्कीच चैकषी करणार असल्याचे त्यांनी स्पश्ट केले आहे.
उपरोक्त पाष्र्वभूमीवर मुख्यप्रषासक असलेल्या अनिल कोल्हे यांची गच्छंती अटळ मानली जात असून अकोला जिल्हा उपनिबंधक यांचे अलिकडील आकोट येथील संचालक अपात्र करण्याचे आदेषाचे पाष्र्वभूमीवर रामटेकच्या बाजार समीतीचे मुख्य प्रषासक अनिल कोल्हे यांचे काय होते याकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष वेधले आहे.
कामगाार 4 डिसेंबरपासून संपावर

कामगाार 4 डिसेंबरपासून संपावर


ठेकेदाराकडून माॅईल कामगारांचे षोशण,



रामटेक/प्रतिनिधी-रामटेक तालुक्यांतील मनसर माईन येथे माॅईलची अंडरग्राउंड खाण असून येथील 40 कामगारांचे संबधित ठेकेदाराकडून षोशण केले जात असल्याने त्यांनी दिनांक 4 डिसेंबर 2017 पासून संप पुकारला आहे.ठेकेदार नियमाप्रमाणे कामगारांना संबधित रकमेची पावती देतात मात्र त्यांच्या खात्यात पुर्ण रक्कम जमा केली जात नसल्याचा आरोप कामगारांचे नेते भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष धर्मेंद्र षुक्ला यांनी पत्रपरीशदेत केला आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,उपरोक्त माईनमध्ये मे.बी.आर.हुल्डे हे कंत्राटदार आहेत.त्यांचे अधिनस्त सुमारे 40 कर्मचारी असून त्यांना वेतन देणे व त्यांची भविश्य निर्वाह निधीची रक्कम पीएफ कार्यालयांत जमा करण्याची जबाबदारी ही बी.आर.हुल्डे यांची आहे मात्र त्यांनी गेल्या दोन ते तिन वर्शांपासून या 40 कामगारांची पीएफ ची संपुर्ण रक्कम जमा केली नाही.प्रत्यक्षात अतिषय कमी रक्कम त्यांनी जमा केल्याने कामगारांनी त्यांना याबाबत वारंवार विचारण केली मात्र ते ऐकत नसल्याने अखेर कामगारांनी संपावर जाण्याचे षस्त्र उपसले.
ठेकेदार उपरोक्त प्रकारे कामगारांचे षोशण करीत आहेत.एवढेच नव्हे तर वेळेवर कामगारांना वेतन न देणे,नियमानुसार बोनसची रक्कम न देणे व भविश्य निर्वाह निधीची रक्कम वेळेच्या वेळी संबधित कार्यालयांत जमा न करणे यामुळे कामगार बेजार झाले आहेत.माईन प्रबंधक दिलीप डेकाटे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की असा प्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.कामगारांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय,अत्याचार आपण खपवून घेणार नाही व त्यांची संपुर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आपण लक्ष देवू.
ठेकेदाराकडे काम करणाÚया कामगारांना माॅईलने ओळखपत्र द्यावे व त्यांना त्यांच्या वेतनाची अधिकृत पावती द्यावी कारण कामगारांकडे कुठलाच रेकाॅर्ड राहात नसल्याने त्याला संबधित कंत्राटदार हे माॅईल अधिकारी यांच्याषी संगनमत करून अन्याय करतात.पत्रपरीशदेत सर्वश्री अमोल खोब्रागडे,निखील ठवरे,अमोल कुर्जेकर,विक्रमसिंग बुंदेल,कैलास अडमाची,महेष रौतेल,सागर कठौते,ओमप्रकाष उईके व अन्य कामगार उपस्थित होते.