काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 23, 2017

महत्वाचे

महत्वाचे

  • आमदार रवी राणा यांच्या गाडीवर वाडीजवळ दगडफेक करून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न
  • यवतमाळ : तेलंगणातून अकोला येथे जाणाऱ्या गांजा तस्करीची कडी गवसली. यवतमाळ शहर पोलिसांनी पांढरकवडा बाय पास वर सापळा रचून कार घेतली ताब्यात. कारमध्ये सापडला 1 क्विंटल गांजा. चालकासह एका महिलेला अटक.
  • नागपूर : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचा मोर्चा. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पेट्रोल 80 रुपयांवर पोहोचले, हेच का अच्छे दिन, शिवसैनिकांचा सवाल.
  • पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा
चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच पोलीसात तक्रार

चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच पोलीसात तक्रार

चिमूर/प्रतिनिधी -
चिमूर एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या शासकिय आदीवासी मुलांच्या वस्तीगृहात गृहपालाच्या अनागोंदी कारभाराविषयी वस्तीगृहातील नियमीत विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्रकल्प अधिकाऱ्या कडे चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच चिमूर पोलीसात तक्रार केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला असुन यामुळे मुलांचे शैक्षणिक आयुष्य उद्धवस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे .

चिमूर येथील शासकीय आदीवासी मुलांच्या वस्तीगृहात प्रवेशा विषयी अनियमितता , गृहपालाचा पक्षपाती पणा आणी सोयी सुविधा विषयी वस्तीगृहातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी सन विद्यार्थी संघटना चिमूर यांचे कडे अर्ज केला होता.न्याय मिळवुन देण्याच्या उद्देशाने या तक्रारी वरुन सन संघटने द्वारा एकात्मीक आदीवासी प्रकल्प अधिकारी यांचे कडे या अनागोंदी कारभारा विषयी चौकशी करून गृहपालास निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. यामुळे प्रशासनाने निवेदका सोबत चर्चा न करता सरळ निवेदन देणाऱ्या विद्याथ्र्या विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याविषयी चिमूर पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आल्याने विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने मानसीक तणावात आहेत.

या वस्तीगृहात मागील सत्रात झालेल्या तांत्रीक चुकीमुळे तिन विद्यार्थी वस्तीगृहाच्या प्रवेशा पासुन वंचित राहावे लागले होते. गोरगरीब आदीवासी विद्यार्थांना आर्थीक तान  पडू नये व त्यांना वस्तीगृहात सामील करण्यात यावे अन्यथा आंदोलन करू अशी भुमीका सन विद्यार्थी संघटनेने घेतल्याने तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांनी संबधित विद्यार्थी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या तिन विद्यार्थ्यांना वस्तीगृहात राहु देण्याचे व उपलब्ध सोयी सुविधा देण्याची सुचणा गृहपालास केली होती. त्याप्रमाणे विद्यार्थी वस्तीगृहात राहत होते .  

मात्र त्या प्रकल्प अधीकाऱ्याची बदली झाली. नवीन प्रकल्प अधीकारी रुजु होवून दोन महीन्याचा कालावधी झाला तरी ते विद्यार्थी वस्तीगृहातच राहत होते. प्रकल्प अधीकाऱ्याने वस्तीगृहमध्ये प्रवेशीत असनाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दयावे बाहेरील विद्यार्थ्यांना होस्टेल मध्ये प्रवेश देवू नये अशी नोटीस काढली. होस्टेल मधील समस्ये विषयी निवेदन देताच या मुलांना बाहेर जाण्याचे फर्माण सोडण्यात आले. वस्तीगृहातील समस्या ज्या मुलांनी सामोर आनल्या अशा मुलांवर मानसीक दडपण अधीकारी गृहपाल टाकत आहे.त्यांना वस्तीगृहातुन बाहेर करण्याची धमकी देण्यात आली. त्यामूळे विद्यार्थी प्रंचड मानसीक तणावात विद्यार्थी आहेत. चिमूर येथील होस्टेल मध्ये पहील्यांदाच असा प्रका.
आणखी एका बाबाला अटक:बाबा फलहारी

आणखी एका बाबाला अटक:बाबा फलहारी


जयपुर:
राजस्थानमधील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी कौशलेंद्र प्रपन्नचारी फलाहारी महाराज यांना बलात्कार प्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राजस्थानमधील अलवर येथे फलाहारी बाबाचा आश्रम आहे. बाबाचे लाखो अनुयायी असून बाबाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप छत्तीसगडमधील एका २१ वर्षीय तरुणीने केला होता. तरुणी बाबाची भक्त होती. बाबावर निस्सीम श्रध्दा असल्याने पहिला पगार बाबाला अर्पण करण्यासाठी ती ७ ऑगस्टला त्याच्या आश्रमात गेली होती. पण बाबाने खोलीत बोलवून आपल्यावर बलात्कार केला व याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी राजस्थानमधील अलवर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले. तक्रारीची माहिती मिळताच तब्येत बरी नसल्याचे कारण सांगत हा बनेल बाबा आधीच रुग्णालयात दाखल झाला. पण बाबाची तब्येत व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र रूग्णालयाने दिल्याने शनिवारी त्याला अटक करण्यात आली.
मराठी मराठी खेळू

मराठी मराठी खेळू

चल राजकारण्या आपण
मराठी मराठी खेळू

स्वार्थापायी मराठीला नग्न तुम्ही केलं
सत्तेपायी मराठीला भग्न तुम्ही केलं
भावनेचा खेळ हा भावनेशी खेळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

हिंदी माझी माय आणि मराठी माझी मावशी
ना घर कि ना घाट कि मावशी आजच्या दिवशी
देशोधडी लावू तिला अशी हळूहळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

परप्रांतीयांचा येथे वाहतो सुसाट वारा
माय माउली मराठीला नाही येथे थारा
मुकेपणी मराठीचे आसू लगे गळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी अस्मितेचा भगवा हा रंग
राजकारणात मग झाला की हो दंग
पाठीमागे मराठीची पाठ लागे पोळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी नेत्यांचा हा जुनाच आजार
मराठी मतांचा मराठी बाजार
राजकारणाचा धागा लोका लागे कळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

राजकारणात जसा शिरकाव झाला
मराठीचा नवा सुरु लपंडाव झाला
त्यांचा झाला खेळ आणि देश लागे जळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी जपून मनी अरमान करू
मराठीच ही नव निर्माण करू
मराठीचा गड आता लागलाय ढळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू



                                    भिमराव तांबे
                              आदर्शगाव दानोळी,कोल्हापूर
                             📱 8691918025
निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

प्रतिनिधी/नांदेड :- सोशियल मीडिया वरून साहित्य क्षेत्रात जनप्रसिद्धि मिळविलेल्या साहित्य स्पंदन,कुही या साहित्याकांच्या व्हाट्स अँप ग्रुपने गेल्या काही वर्षांपासून साहित्य क्षेत्रातील विविध स्पर्धेचे आयोजन करत आलेत,तसेच जगतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिना निमित्त ,"ऐसें कैसे झाले भोंधु",या विषयांवर लेखमाला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतें, तर नुकतेच प्रसिद्धी पत्राद्वारे निकाल जाहीर करण्यात आला.
जागतिक अंधश्रध्दा निर्मूलन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऐसे कैसे झाले भोंदू याविषयावरील निबंध स्पर्धेचा निकाल नुकतेच जाहिर करण्यात आले ,या स्पर्धेत महाराष्ट्र भरतील अनेक नामवंत लेखकांनी सहभाग नोंदवला होता. ज्यात नागपुरच्या अंकुश शिंगाडे यांच्या निबंधास सर्वोत्कृष्ट तर स्नेहलता कुलथे यांचे निबंध उत्कृष्ट ठरले. सदरील निबंध स्पर्धेत स्तंभलेखक नागोराव सा.येवतीकर यांच्या निबंधास प्रथम तर अनिल चांडक, हनुमंत सोपान, मनिषा क्षिरसागर यांच्या निबंधास अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले असल्याचे साहित्य स्पंदन समुहाचे मुख्य संचालिका प्रा. वैशाली देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. सर्व विजेत्या साहित्यकांना ग्राफिक्सकार संतोष शेळके यांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या विजयी प्रमाणपत्र ऑनलाइन देऊन गौरविण्यात आले. सदरील स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी समूह संयोजिका वृषाली वानखेडे, सहसंयोक कवी अनिल रेड्डी आणि कवी निखिल खराबे यांनी अथक परिश्रम घेतले.
 पुगलिया- वडेट्टीवार गटात  हाणामारी

पुगलिया- वडेट्टीवार गटात हाणामारी



प्रतिनिधी/चंद्रपूर : नेहमी वादाच्या भोव-यात राहणा-या चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसने आज कमालच केली. कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी निवडणुकीसाठी आलेल्या पक्ष निरिक्षकासमोर पुगलिया- वडेट्टीवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. त्यात हाणामारी करीत सभागृहाची काचेदेखील फोडण्यात आली. शनिवारी दुपारी हेल्थ क्लब समोरील इंटकच्या कार्यालयात घडली. जिल्हा कार्यकरणीची निवड लोकशाही मार्गाने करा, अशी पुगलिया गटाची मागणी होती. तर आमदार वडेट्टीवार यांनी निरीक्षकाला आपल्या गटाच्या बैठकीत नेल्याने पुगलिया समर्थक संतापले. तिथे जावून प्रचंड गोंधळ करीत नारेबाजी केली.


त्या 27 तरुणांना नोटीसा

त्या 27 तरुणांना नोटीसा


त्या 27 तरुणांना नोटीसा
मुंबई प्रतिनिधी:
मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात फेसबुकवर देव गायकवाड या नावाने आक्षेपार्ह लिखाण एका तरुणाविरुद्ध विनयभंग, बनावट अकाऊंट उघडून फसवणूक आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याचबरोबर अधिक चौकशीसाठी त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या तरूणांना सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा पाठविल्या आहेत.

फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या  २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे स्पष्ट करून सोशल मीडियावर याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे.

Friday, September 22, 2017

 वेकोलीच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेउन आत्महत्या

वेकोलीच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेउन आत्महत्या



प्रतिनिधी/ चंद्रपूर  स्वत:च्याच राहत्या घरी गळफास घेउन एका 28 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना पटाणपुरा वार्डात घडली . निखील अडगूलवार असे मृतकाचे नाव आहे. सदर युवक हा युवक वेकोलीत कार्यरत होता. आत्महतेचे कारण अद्यापही  कळू शकले नाही.

निखील हा दररोज प्रमाणे कामावर जाण्यासाठी सकाळी उठला नसल्याने त्याच्या घरच्यांनी त्याच्या खोलीचा दरवजा खटखटवला मात्र बराच वेळ हाऊन सुद्धा त्याने दरवाजा उघड़ला नाही. त्यामुळें त्याच्या घरच्यांनी खिडकीतून डोकाऊन बघितले असता सदर घटणा उघडकीस आली. या घटणेची माहीती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटणास्थळ गाठून शव ताब्यात घेत शवविच्छेदन प्रक्रिये करीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून त्याने आत्महत्या का केली या दिशेने तपास सुरु केला
विजेच्या धक्याने 17 वर्षीय युवकाचा मृत्यु

विजेच्या धक्याने 17 वर्षीय युवकाचा मृत्यु



चंद्रपूर प्रतिनिधी:
सार्वजणीक शारदा देवीच्या मंडपात झोपण्याकरीता गेलेल्या 17 वर्षीय युवकाला टेबल फॅनचा जबर शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत झाल्याची दूर्देवी घटणा गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घग्घुस येथे घडली असून सर्वेश होकम असे सदर युवकाचे नाव आहे. तो चंद्रपुर येथील सरदार पटेल महाविदयालयातील 11 वीचा विदयार्थी होता. सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धुम सुरु आहें. नवरात्र निमीत्य जिल्हात शारदा आणि दुर्गा मातेची 10 दिवसांकरीता प्रतिस्थापणा करण्यात आली आहे. घूग्घूस येथेही सार्वजणीक मंडळात देखील शारदा देवी विराजमान झाली आहे. येथील मंडळातील सदस्यांने देखील काल मातेची प्रतिस्थापणा केली रात्रीची पुजा करुन सर्व सदस्य व पदाधिकारी आपआपल्या घरी गेले मात्र सर्वेश हा मंडळातच झोपणार होता. रात्री 12.30 वाजताच्या सुमारास त्याने मंडळात खाली गादी टाकली व झोपण्याची सोय केली. या दरम्याण तिथे असलेल्या टेबल फॅनच्या हवेने देवीच्या घटाचा दिवा विजेल यासाठी तो टेबल फॅंन बंद करण्याकरीता गेला मात्र यातच त्याचा जबर शॉक लागला व त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. या घटणेनंतर परिसरात शोककाळा पसरलेली आहे.
मिनी मंत्रालयाला लागली आग

मिनी मंत्रालयाला लागली आग

ब्रेकिंग न्यूज़..

चंद्रपूर प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कक्षाला आज रात्री 9.30 च्या सुमारास अचानक आग लागण्याने खळबळ उडाली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही, मात्र या आगीत जिल्ह्याभरातील शैक्षणिक दस्तावेज जळून खाक झाल्याची भिती वर्तविण्यात येत आहे.घटनास्थळी विझविण्याचे काम सुरु असून रामनगर पोलिस तपास करीत आहेत.
गळफास लाऊन आत्महत्या

गळफास लाऊन आत्महत्या


चंद्रपूर (प्रतिनिधी) - घरात कोणी नसताना गळफास घेउन नवव्या वर्गात शिकत असलेल्या अनुराग शिल याने आत्महत्या केली.
अनुराग हा भिवापूर वार्डातील प्रांतिक बंगाली कॉलनी येथील रहिवासी होता. तो न्यु इंग्लिश हॉयस्कुल येथे नवव्या वर्गात शिकत होता. काल त्याचे वडिल बाहेरगावी गेले होते. तर आई बाजूच्या घरी गेली होती. त्याची बहिण शाळेत गेली होती.  घरी तो एकटाच होता. दरम्याण त्याची बहिण सायंकाळी पाच वाजता शाळेतून घरी परतली. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे घर शेजा-यांना आवाज दिला. यावेळी बराच वेळ दरवाजा खटकावला असता अनुरागने दरवाजा उघडला नाही.  अखेर दरवाजा तोडण्यात आला.  यावेळी घराच्या लाखडी फाट्याला मृतदेह लटकून होता. या घटनेची माहिती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Thursday, September 21, 2017

महाकाली दर्शन लाईव्ह

महाकाली दर्शन लाईव्ह

शक्तिरूप महाकाली मातेची महती मनी बाळगत यंदाच्या देवी नवरात्री निमित्त घटस्थापनेने पुरातन देवी महाकाली मंदिरात उत्सवाचा प्रारंभ झाला.


महाकाली मंदिरातुन दर्शन थेट तुमच्या मोबाईलवर ,बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://cdn.app3.ivb7.com/IVB7UserPortal?userid=347512



Wednesday, September 20, 2017

संजीवनीला हवी नवसंजीवनी

संजीवनीला हवी नवसंजीवनी


ललित सुनिल लांजेवार
चंद्रपूर - नाव संजीवनी उसरेटी. वय जेमतेम १६ वर्षे, दहावीला शिकतेय . घरची परिस्थिती अतिशय बेताची.  वडील एका खाजगी दुकानांत संगणक चालक, आई गृहिणी. जन्मापासून आजवर अतिशय आनंदाने  जगल्यानंतर अचानक एक दिवस तिच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्यात ती आणि तिच्या घरचे चिंतेत गेले.
जुलै महिन्यातील अखेरचे दिवस. संजीवनी नेहमीप्रमाणे शाळेला जायची-यायची. यंदा तिचे दहावीचे वर्ष होते. ती अभ्यासात हुशार होती. एक दिवस अचानक तिची प्रकृती बिघडली. तिच्या पाठीवर व मांड्यावर खाज येत होती. सुरवातीला याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.  मात्र त्रासही वाढत गेला. प्राथमिक उपचारासाठी तिला चंद्रपूर येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ विनीत दुबे यांच्याकडे दाखल करण्यात आले. उपचारही सुरु झाला. बरेच दिवस उपचार सुरु असतानादेखील संजीवनीच्या शरीरावर कोणतीच औषध-उपचार काम करत नाही, असे निदर्शनात येत होते.
त्याच दरम्यान दोन्ही पाण्याच्या गूढघ्याला हिरव्या निळ्या रंगांच्या गाठी येऊ लागल्या होत्या. संजीवनीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. आईवडील देखील दिवसेंदिवस चिंतेत पडत होते, घरची परिस्थिती देखील बेताची होती , एक हातावर कमविणे आणि दुसऱ्या हातावर खाणे,अशी परिस्थिती होती. यातच संजीवनीच्या वडिलांनी डॉ.  इंगळे नामक खाजगी डॉक्टरकडे या रोगाविषयी माहिती केली. त्यांनी त्यांना लगेच रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला. संजीवनीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले, ते तपासण्यात आले. त्याचा रिपोर्ट आल्यावर संजीवनीच्या वडिलांना बोलवून काहीही न सांगता त्यांना नागपूर येथील हिमोटोलॉजिस्ट डॉ. रिया बल्लीकर यांना भेटावयास सांगितले.
आता इथून सुरु झाली होती संजीवनीला नवसंजीवनी देण्याची तिच्या घरच्यांची धडपड. संजीवनीचे वडील तिला घेऊन व्होकार्ड रुग्णालयात नागपूर येथे आले. तेव्हा तिची प्रकृती बघता तिला २ दिवस रुग्णालयातच भरती ठेवण्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तिला "ब्लड कॅन्सर" झाल्याचे निष्पन्न केलं. हे सांगताच वडिलांना धक्काच बसला. आईदेखील वर डोळे करून बसली होती. इतक्या मोठ्या शहरात आणि इतक्या मोठ्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता भासणार होती. आईवडील दोघेही चिंतेत होते. आजवर जेही थोडं फार कमावलं होते, ते  वडिलांनी तिच्या प्राथमिक महागड्या उपचारासाठी खर्च केले होते. दोन दिवस रुग्णालयात भर्ती केल्यानंतर तिचे बोनम्यॅरो तपासणी करण्यात आली. त्यात तिच्या शरीरातले ब्लडसेल्स निष्क्रिय होत होते, असे सांगण्यात आले. ज्यामुळे तिची प्रकृती ही खालावत होती. त्यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी महागडी उपचार पद्धती कीमोथेरेपी सुरु होणार होती. या उपचार पद्धतीत कीमोथेरेपीचे इंजेक्शन अतिशय महागडे असतात, आता आणखी पैश्याची आवश्यकता भासणार होती. १ इंजेक्शन देऊन झाले होते आणखी तिला बरे होण्यासाठी २ इंजेक्शन घेण्याची आवश्यकता आहे.
तेव्हा इतके पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न संजीवनीच्या वडीलांना पडला. ही बाब चंद्रपूर येथील तिच्या परिसरात माहित झाली. अनेकांना तिच्या घरची परिस्थिती माहित असल्याने तिला आर्थिक मदत करण्याचे ठरविले. त्यात संजीवनी ज्या शाळेत शिकत होती त्या विद्या विहार शाळेतील शिक्षक, परिसरातील  नागरिक, तुकूम येथील तुकूम युवक गणेश व क्रीडा मंडळ यांनी गणपती उत्सवासाठी लागणारी मदत देखील संजीवनीच्या उपचारासाठी केली. संजीवनीचे नातेवाईक, शासकीय स्थरावर पाठपुरवठा करत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी, चंद्रपूर येथील साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देखील हजारो रुपयांची आर्थिक मदत केली.
मात्र ही सर्व मदत आजही संजीवनीच्या उपचारासाठी अपुरी पडत आहे. तिच्या वडिलांची मदतीसाठीची पायपीट ही सुरूच आहे. आज तिला इतरांसारखे सामान्य जीवन जगायचे आहे .


आणखी तिच्या उपचारासाठी जवळपास ७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तेव्हा तिच्या मदतीसाठी शहरभर अनेक पोस्टर्स लागले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र तुकूम शाखेच्या खाता क्रमांक- ६०२५८२६७०९९, IFSC -MAHB0000618 या खात्यात माणुसकीच्या नात्याने मदत करा
तुमची हीच मदत संजीवनीला नवसंजीवनी देण्यास उपयुक्त ठरू शकते .