काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 15, 2010

सात लाखांच्या गुंतवणुकीत 15 लाखांची कमाई

सात लाखांच्या गुंतवणुकीत 15 लाखांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, May 14, 2010 AT 12:15 AM (IST)

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - कुष्ठरोग्यांचे नंदनवन असलेल्या आनंदवनात श्रमाचे मोल शिकायला मिळते. ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या गावाची यशोगाथा जगापुढे आहे. त्याच आनंदवनात "आमच्या गावात आम्ही सरकार'च्या माध्यमातून गावकऱ्यांनी सात लाखांच्या गुंतवणुकीतून 15 लाखांची कमाई केली. सिमेंट, मातीच्या विटा आणि रोपविक्रीतून हा आदर्श घडविला आहे.

जलस्वराज्य प्रकल्पाच्या वतीने "आमच्या गावात आम्ही सरकार' या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी आनंदवन ग्रामपंचायतीने ही योजना यशस्वीरीत्या राबविली. एप्रिल 2004 पासून या योजनेच्या कामांना सुरवात झाल्यानंतर सहा वर्षांमध्ये विविध उद्योगांतून यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीला प्रोत्साहन क्षमता निधी 50 हजार रुपये वितरित करण्यात आल्यानंतर ग्रामसभा घेण्यात आली. गावनिहाय विकास समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती गठित करण्यात आली. या समितीने यवतमाळ जिल्ह्यातील जामगाव, सेंद्रिय (डोलारी) या हागणदारीमुक्त गावांना भेटी दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील दत्तापूर येथील दूधसंकलन केंद्राची पाहणी करण्यात आली. या अभ्यासदौऱ्यातून गावकऱ्यांना उद्योगविषयक माहिती मिळाली. अभ्यासगटाची चमू गावात परतल्यानंतर गावविकास आराखडा आणि पंचायत विकास आराखडा तयार करण्यात आला. यात गाव विकासासाठी सात लाख रुपये आणि पंचायत विकासासाठी एक लाख 74 हजार 200 रुपये मिळाले. लोकवाट्यातून दीड लाख रुपये जमा झाल्यानंतर एकूण 10 लाख रुपयांच्या निधीतून विकासकामांना सुरवात झाली. गावविकास आराखड्यात सिमेंट वीटभट्टी आणि सिमेंट खांब निर्मितीचा उद्योग सुरू झाला. यात दोन लाख 48 हजार 400 रुपयांची गुंतवणूक करून उद्योगाची पायाभरणी करण्यात आली. 100 विटांना दोन हजार रुपये असा खर्च यायचा. तयार झालेला माल आनंदवन संस्थांसाठी दोन हजार 200 रुपयांना, तर अन्य लोकांसाठी दोन हजार 200 रुपयांना 100 विटांप्रमाणे विक्री करण्यात आली. आठ मजुरांच्या भरवशावर एक दिवसात आठ हजार विटांची निर्मिती होते. आतापर्यंत पाच लाख 12 हजार 432 रुपयांचे उत्पन्न झाले आहे. सिमेंटशिवाय मातीच्या लाल विटाही तयार करण्यात आल्या. यासाठी तीन लाख 50 हजार 600 रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. एक हजार विटांसाठी एक हजार 200 रुपये खर्च यायचा. त्याची विक्री एक हजार 600 ते दोन हजार रुपयांपर्यंत करण्यात आली. उद्योगात 25 मजूर कामाला आहेत. डिसेंबर ते मे अखेरपर्यंत सहा लाख 13 हजार 603 रुपयांचे उत्पन्न मिळाले. चार मजुरांच्या भरवशावर रोपविक्री केंद्र सुरू झाले. यात एक लाखांची गुंतवणूक होती. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात तीन लाख 94 हजार 840 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रोपविक्री केंद्रातून सायपाम, एरिकापॉम, विद्यालहान, टेबलपॉम, आवळा, जाम, डाळिंब, फणस, अशोका मोठा, चाफा, सुपारीपॉम, ड्रेसिनया, सदाफुली, गुलाब आदी फुलाफळांच्या जाती घेण्यात आल्या.

पंचायत विकास आराखड्यात एक लाख चार हजारांच्या गुंतवणुकीतून झेरॉक्‍स मशिन सुरू करण्यात आली. अवघ्या चार महिन्यांत 29 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. या कामाशिवाय गावाच्या विकासासाठी सांडपाणी नालीद्वारा तलावात सोडून मत्स्यपालन, चारा उत्पादन, भाजीपाला घेण्यात आला. मासेमारीतून तीन लाख, तर भाजीपाल्यातून दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मिळालेल्या एकूण नफ्यातील 80 हजार रुपये खर्चून आनंदवन येथे पथदिवे लावण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे

प्रतिक्रिया
On 5/14/2010 5:57 PM sarang said:
या बातमी मुले लोकांमुळे समूह भावना निर्माण होऊन गाव विकासाची वाट शोधण्यास मदत झाली आहे. अशाच प्रकारे शाशकीय योजनामध्ये यशस्वी झालेल्या कामांना प्रशिद्धी दिल्यास लोकांमध्ये विकासाची भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. कृष्णकांत खानझोडे -९८५०६१२९१३ सारंग काकडे जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद -चंद्रपूर

Thursday, May 13, 2010

ब्रह्मपुरीचा ४८.3 चंद्रपुर ४७.7

ब्रह्मपुरीचा ४८.3 चंद्रपुर ४७.7

विदर्भात मे महिन्यात दिवसागणिक चढत जाणाऱ्या तापमानाच्या आकडेवारीने जनजीवन प्रभावित झालेले असून; 25 में 2010 ला ब्रह्मपुरी येथील पारा ४८.३ वर पोचला होता . चंद्रपुराचा परा ४७.७ होता। जिल्ह्यातील या उष्णतेच्या खालोखाल इतर जिल्ह्यांतही उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांचे हाल होत आहेत.
चंद्रपूर - यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाच्या आकड्यांचा विक्रम मोडत चंद्रपूर शहरात आज (ता. 11) 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

एक मे रोजी 40.6 अंश तापमान होते. त्यानंतरच्या दहा दिवसांत तब्बल सहा अंशांनी वाढ झाल्याने चंद्रपूरकर हैराण झाले आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत 40 ते 44 अंशांपर्यंत तापमान असायचे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली होती.

या हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात पाच जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. वरोरा तालुक्‍यातील भेंडाळा येथे कुणाल लोंढे, चिमूर येथे सखाराम भैसारे, पडोली येथे कैलास भलावी यांचा चालू आठवड्यात, तर अन्य दोघांचा या वर्षाच्या उन्हाळ्यात उष्माघातामुळे मृत्यू झाला.

मे महिन्यात चंद्रपुरातील चढता पारा
एक मे -40.6
दोन मे-40.3
तीन मे - 41.6
चार मे- 42.2
पाच मे -43.2
सहा मे -44.8
सात मे - 43.9
आठ मे -44.9
नऊ मे- 46.1
10 मे - 46.2
11 मे- 46.6

Wednesday, May 05, 2010

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघिणीची शिकार

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघिणीची शिकार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, May 05, 2010 AT 12:28 AM (IST)
चंद्रपूर - वाघांचे संवर्धन आणि रक्षणाची जबाबदारी असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वर्षभरापूर्वी एका वाघिणीची शिकार झाल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. वाघिणीच्या शिकार प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी वाघाची नखे विकताना चिमूर येथे दोघांना वनाधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर या शिकार प्रकरणाचे बिंग फुटले आणि ताडोबा व्यवस्थापन हादरले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोळसा येथील पाच आणि जामणी या गावातील एकाचा या शिकार प्रकरणात सहभाग आहे.

या व्याघ्रप्रकल्पात 40 वाघ असल्याची नोंद वनविभागाकडे आहे. या प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. विशेषत: मे आणि एप्रिल महिन्यात पर्यटकांची वर्दळ जास्त असते. यावेळी वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी गस्तही वाढविली जाते. मात्र, गतवर्षी मे महिन्यातच वाघिणीची शिकार झाली. कोळसा येथील दलपत गुरू गेडाम, भाऊजी खतूजी मडावी, खुशाल सुकरू तोडासे, साईनाथ तुकाराम शेडमाके, गुलाब चिटपुरा तोडासे व जामणी येथील मंगलदास गोमाजी मडावी यांनी शिकारीचा बेत आखला. त्यासाठी त्यांनी कोळसा येथील विश्रामगृहापासून तीन किलोमीटर अंतरावरील हिरडी नाल्याजवळची जागा जाळे लावण्यासाठी निवडली. त्यांचा हेतू हरणाच्या शिकारीचा होता. मात्र, यात वाघीण अडकली. दोन दिवसांनंतर जाळ्यात अडकलेली शिकार नेण्यासाठी आलेल्या या सहाही जणांना धक्काच बसला. जाळ्यात अडकलेली वाघीण मृत झाली होती. त्यांनी तिथून पळ काढला. याची कुठेही वाच्यता केली नाही. पंधरा दिवसांनंतर पुन्हा त्या ठिकाणी आले. वाघिणीचे मांस गळालेले होते. त्यांनी मृत वाघिणीची नखे काढली आणि गावात परतले.

दरम्यान, या शिकार प्रकरणाचा या सहा जणांशिवाय कुणाला थांगपत्ता लागला नाही. तब्बल एका वर्षानंतर दोन दिवसांपूर्वी यातील मंगलदास मडावी आणि दलपत गेडाम हे चिमूर येथे नखे विकण्यासाठी आले. आधीच याची माहिती मिळालेल्या वनखात्याने सापळा रचला. यात ते अलगद अडकले. त्यांच्याकडून वाघिणीची तीन नखे गोळा करण्यात आली. तोवर वनकर्मचाऱ्यांना वाघिणीच्या शिकारीची माहिती नव्हती. चौकशी केल्यानंतर मात्र वनकर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काल सोमवारी दुपारी या दोन्ही आरोपींनी शिकारीची कबुली दिली. त्यानंतर ब्रह्मपुरी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक ए. एन. धोटे, चिमूरचे वनाधिकारी व्ही. एस. पडवे यांनी कोळसा गावातील भाऊजी खतूजी मडावी, खुशाल सुकरू तोडासे, साईनाथ तुकाराम शेडमाके, गुलाब चिटपुरा तोडासे या चार आरोपींना ताब्यात घेतले. नंतर या सर्वांना घटनास्थळी नेण्यात आले. तिथे वाघिणीची हाडे सापडली. ही सर्व हाडे जप्त करण्यात आली आहे. या सहाही आरोपींना आज चिमूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. ही घटना घडली त्यावेळी वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. नंदकिशोर होते. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. शेषराव पाटील, तर कोळशाचे वनाधिकारी म्हणून दीपक चोंढीकर कार्यरत होते. इन्फो बॉक्‍स काही अनुत्तरित प्रश्‍न मे महिन्यात पर्यटकांची वर्दळ असते. याच काळात गस्त वाढविली जाते. कोळसा येथील विश्रामगृहापासून वाघिणीच्या शिकारीचे घटनास्थळ फक्त तीन किलोमीटर आहे. विश्रामगृहावर पर्यटक आणि वनाधिकाऱ्यांची नेहमीच ये-जा असते. असे असतानाही तब्बल पंधरा दिवस वाघिणीचे शरीर कुजत असताना हा प्रकार कुणाच्याच लक्षात कसा आला नाही? वाघांची नोंद ठेवण्यासाठी ट्रॅपिंग कॅमेरे लावण्यात आले आहेत. यातून मिळणाऱ्या छायाचित्रातून प्रत्येक वाघाची ओळख पटविली जाते. एक वाघीण वर्षभर गायब असताना ही बाब तत्कालीन ताडोबा क्षेत्र संचालकांच्या लक्षात कशी आली नाही?

Tuesday, May 04, 2010

मस्की दाम्पत्य बेड्या घालून निघाले नागपूरला

मस्की दाम्पत्य बेड्या घालून निघाले नागपूरला

Tuesday, May 04, 2010 AT 12:30 AM (IST)

चंद्रपूर - वेगळ्या विदर्भासाठी लढा देणाऱ्या शोभा मस्की व बाबाराव मस्की यांनी हातापायात बेड्या घालून नागपूरपर्यंतच्या पदयात्रेस सुरवात केली असून, त्यांचे आज (ता. तीन) शहरात आगमन झाले. त्यांनी राजुरा येथून एक मेपासून पदयात्रा सुरू केली आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी देशप्रेमी संघटनेच्या माध्यमातून मस्की दाम्पत्याने वेळोवेळी विविध आंदोलने पुकारून शासनाचे लक्ष वेधले आहे. शोभा मस्की यांनी राजुरा येथे टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा देत प्रशासनाच्या नाकीनऊ आणले होते. त्यानंतर विदर्भ बंदमध्ये बसची तोडफोड केली. विदर्भाच्या मागणीसाठी लढताना त्यांच्यावर आजपर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रदिनाचा निषेध करीत या दाम्पत्याने एक मेपासून विदर्भ पदयात्रा राजुरा ते नागपूर असे आंदोलन सुरू केले आहे. दोन तारखेला बल्लारपूर पार केल्यानंतर आज (ता. तीन) दुपारी त्यांचे चंद्रपुरात आगमन झाले. महाकाली मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर शहरात प्रवेश केला. रस्त्यावरील नागरिकांना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची पत्रके वाटली. उद्या (ता. चार) भद्रावती येथे पोचणार असून, त्यानंतर वरोरा, खांबाडा, समुद्रपूर, हिंगणघाट, अलिपूर, वर्धा, सेलू, सिंदी, बुटीबोरी, हिंगणा, साईमंदिर नागपूर, गणेश मंदिर आणि 17 मे रोजी ताजबाग नागपूर येथे समारोप होईल

Sunday, May 02, 2010

चंद्रपुर समृद्ध जिल्हा

चंद्रपुर समृद्ध जिल्हा

ताडोबा राष्ट्रीय उद्यान, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, देशातील प्रमुख कागद कारखाना, खनिजदृष्ट्या समृद्धी, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक असलेले वनक्षेत्राने चंद्रपूर जिल्हा समृद्ध आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या अतुलनीय कार्य आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कठोर समाज तपस्येने पावन झालेली भूमी म्हणून चंद्रपुर जिल्हा प्रसिद्ध आहे

इतिहासाच्या पानातील चंद्रपूर

१९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले. प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा आणि त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. नवव्या शतकात या प्रदेशावर प्रथम नागवंशीय राजांची आणि त्यानंतर गोंड राजांची सत्ता होती असे ऐतिहासिक दाखले आढळतात. नागवंशीय बौद्ध राजा गहलू याने भद्रावतीपासून ८०कि.मी. अंतरावर माणिकगड हा किल्ला बांधला असे म्हणतात. पुढे अठराव्या शतकाच्या आसपास या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. नागपूरच्या भोसले घराण्यातील राजे रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस नसल्याने ते राज्य खालसा करून कारण दाखवून हा प्रदेश ब्रिटिश साम्राज्यास जोडला गेला.

भूगोलावर एक नजर

चंद्रपूरच्या उत्तरेस भंडारा आणि नागपूर, दक्षिणेस आंध्रप्रदेशातील अदिलाबाद, पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, असे हे जिल्हे वसलेले आहेत. २६ ऑगस्ट, १९८२ पर्यंत चंद्रपूर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठा तर भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा जिल्हा होता. याच दिवशी या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या दोन स्वतंत्र जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याच्या नैऋत्य कोपर्‍यात डोंगर पसरलेले आहेत. उर्वरित जिल्हा मंद उताराचा असून अधूनमधून डोंगररांगा आणि टेकड्या आहेत. प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे मूल-चिमूर टेकड्यांचा प्रदेश, वर्धा-वैनगंगा खोर्‍याचा प्रदेश आणि चांदूरगडचा डोंगराळ प्रदेश असे तीन विभाग पडतात.


वनक्षेत्र -
चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक भाग जंगलांनी व्यापला आहे. वनांचा विचार करता गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांनंतर चंद्रपूर हा राज्यात तिसर्‍या क्रमांकाचा महत्त्वाचा जिल्हा ठरतो. उत्तम प्रकारचे सागवान, तेंदूची पाने, बांबू, मोहाची फुले ही येथील प्रमुख वनउत्पादने आहेत. चिरोल आणि नवेगाव टेकड्यांवर असलेला परिसर ‘आलापल्ली अरण्य’ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २१टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासी जमातींची आहे. त्यामुळे हा जिल्हा ‘आदिवासी जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. येथील दाट जंगलांच्या आणि डोंगराळ भागात कोळंब (कोलाम) जमातीचे लोक रहातात. परधान या जमातीचे लोकही काही प्रमाणात येथे आढळतात. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या ‘माडिया गोंड’ या आदिवासी जमातीचे लोकही या जिल्ह्यात आहे.

समृद्ध खनिजसंपत्ती -
महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीच्या मुख्य क्षेत्रांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो. राज्यातील तांब्याचे सर्वाधिक साठे या जिल्ह्यामध्ये आहेत. वर्धा खोरे दगडी कोळशाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. चंद्रपूर तालुक्यात घुगुस आणि बल्लारपूर; राजुरा तालुक्यात साष्टी; भद्रावती तालुक्यात माजरी आणि वरोरा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी, आणि असोला (गुंजेवाही) येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर आणि लोहार डोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. जिल्ह्यात मुख्यतः वरोरा तालुक्यात चुनखडक सापडतो. तसेच राजुरा तालुक्यातही बर्‍याच भागांत चुनखडकाचे पट्टे आहेत. तसेच ग्रॅनाइट, वालुकाश्म, जांभा यांसारखी खनिजे आणि खडकही जिल्ह्यातील काही भागांत आढळतात.

जलस्त्रोत -
बारमाही पाणी असलेली वर्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. पुढे ही नदी पैनगंगा आणि वैनगंगा या दोन नद्यांना जाऊन मिळते. इरई ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर मूल ही वैनगंगेची महत्त्वाची उपनदी आहे. राजुरा, घुगुस आणि बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण इरई नदीकाठी वसले आहे. सिंदेवाही तालुक्यात असोलमेंढा येथे, नागभीड तालुक्यात नळेश्वर आणि घोडेझरी येथे तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे काही धरणे आहेत. महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश होतो. या जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा ताडोबा तलाव आहे. तसेच घोडेझरी तलाव आणि असोलमेंढा तलावही आहेत.

प्रशासन

चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, मूल, ब्रह्मपुरी, वरोरा या सात नगरपालिका, चंद्रपूर ही जिल्हापरिषद, राजुरा, चंद्रपूर, वरोरा, नागभीड, सिंदेवाही, मूल, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, सावली, गोंडपिंपरी, पोंभूर्णा या १४ पंचायत समित्या आणि एकूण १४७२ लोकवस्ती असलेल्या गावांपैकी ८४८ गावांमध्ये ग्रामपंचायती आहेत. सध्या चंद्रपूर जिल्हा १५ तालुक्यांचा मिळून बनला आहे. त्यातील मे, २००२ मध्ये जिवती हा तालुका अस्तित्वात आला आहे. त्यातील १४ तालुके त्यांचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या.

क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या

१ वरोरा ८८९.६ १६५,८४३

२ चिमुर ९५७.० १५६.७७२

३ नागभिर ५१८.० १२४,४२५

४ ब्रह्मपुरी ५९३.९ १५३,४८६

५ सावली ४९४.० १०४,६८६

६ सिंदेवाही ३७४.० १०६,२७५

७ भद्रावती ७८४.० १५६,९९५

८ चंद्रपूर ५७६.० ४४०,८९७

९ मूल ४८६.२ ११०,१०९

१० पोंभूर्णा २७२.० ४७,९०६

११ बल्लारपूर २०९.५ १३३.७२२

१२ कोरपना ८२९.१ १४३,२१०

१३ राजुरा १,०७७.८ १५२,२१६

१४ गोंडपिंपरी ४४३.० ७४,५५९

राजकीय पटलावर

लोकसभा मतदारसंघ (२) :
१. चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, अर्णी हे विधानसभा मतदारसंघ मिळून चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.

२. गडचिरोली - चिमूर - ब्रम्हपुरी आणि चिमुर चंद्रपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले आहेत.

विधानसभा मतदारसंघ (६) :

राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर आणि वरोरा असे आहेत.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे ५७ मतदारसंघ असून पंचायत समितीचे ११४ मतदारसंघ आहेत.

शेती आणि उद्योग

संपूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते. वर्धा नदीच्या खोर्‍यात कापूस पिकवला जातो. याशिवाय तीळाची लागवडही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण हे १२१४ मि.मी. इतके आहे

देशातील सर्वांत मोठे औष्णिक केंद्र चंद्रपूर औष्णिक केंद्र (चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन -CSTPS) आहे. २३४० मेगावॅट इतकी उर्जा निर्मितीची क्षमता असलेल्या या केंद्रात राज्यातील २५% उर्जेचे उत्पादन होते. जगातल्या १०० सर्वात मोठ्या कागद उत्पादन करणार्‍या कारखान्यांपैकी एक भारतातील सर्वात मोठा असलेली बल्लारपूर इंडस्ट्रीज (बील्ट) याच जिल्ह्यात आहे. चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दगडी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे येथे दगडी कोळशाच्या आधारे औष्णिक विद्युत निर्माण करतात. चंद्रपूर आणि भद्रावती येथे चिनी भांडी तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. याचबरोबर भद्रावती येथे युद्धनिर्मिती साहित्याचा कारखाना आहे. भातगिरण्या हा देखील जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. नागभीड आणि सावली येथे कोशाच्या कापडाचा उद्योग विकसित होतो आहे येथील सुरया देखील प्रसिद्ध आहेत. तसेच नागभीड तालुक्यातील विसापूर येथे लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे. राज्यातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे प्रस्तावित आहे. वरोरा येथे पी. व्ही. सी. पाईप आणि रेफ्रीजरेटर (फ्रीज) यांची निर्मिती केली जाते. याशिवाय जिल्ह्यात चंद्रपूर, घुगुस आणि मूल येथे औद्योगिक वसाहती आहेत.

इथे कसे पोहचाल

चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली - चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे. चंद्रपूर, नागभीड, तडळी आणि मांजरी ही जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.

काही शहरापासूनचे अंदाजे अंतर

...पासून अंतर(कि.मी.)

मुंबई ९५०

नागपूर १५२

औरंगाबाद ५३२

रत्नागिरी ९६८

पुणे ७५८

कुठे फिराल

ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) - ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले. हे वाघ संरक्षित क्षेत्र आहे. ताडोबा हे पानझडीचे वन आहे. या उद्यानात मोर, धनेश, गरूड, नीळकंठ, चंडोल, सुगरणी इत्यादी साधारण २५० प्रकारचे पक्षी आहेत. तसेच वाघ, सांबर, नीलगाय, गवा, अस्वल, चितळ, भेकर असे अनेक वन्यप्राणी आहेत. याशिवाय ताडोबातले ‘मगरपालन केंद्र’ आशिया खंडातले एक महत्त्वाचे आणि उत्तम मगरपालन केंद्र आहे. येथील ताडोबा सरोवराचा परिसर अतिशय रमणीय आहे. संध्याकाळी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येथे येतात. या सरोवराशिवाय अनेक लहान-लहान पाणवठे येथे आहेत. उद्यानात एका सुंदर झोपडीत वन्य प्राण्यांचे संग्रहालय आहे. संग्रहालयात अस्वल, रानडुक्कर इत्यादी प्राण्यांचे सांगाडे आहेत. पक्ष्यांनी विणलेली सुंदर घरटी ठेवलेली आहेत. अनेक पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे येथे आहेत. पाखरे आणि वन्यप्राणी यांचा मुक्त संचार असलेले आणि हिरव्या झाडांच्या सौंदर्याने बहरलेले हे ताडोबाचे उद्यान स्थानिक पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांचेही आकर्षण ठरले आहे.

चंद्रपूर - एक ऐतिहासिक शहर अशी चंद्रपूर शहराची ओळख करून देता येईल. येथील गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे. गोंड राजा ‘खांडक्या बल्लरशहा’ याने हा किल्ला बांधला असे म्हणतात. तसेच येथे असलेले महाकाली आणि अचलेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध आहे. अलीकडे हे शहर औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत आहे.

नागभीड - नागभीडजवळील सर्व परिसर अतिशय निसर्गसमृद्ध आहे. येथील सातबहिनी, मुक्ताबाई आणि महादेव टेकड्यांवरील निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. येथे जवळच घोडेझरी हा तलाव आहे. तलावाच्या शेजारीच पूर्वी तलावात सापडलेल्या घोड्याचे मंदिरही आहे.

बल्लारपूर - गोंड राजवटीत बल्लारपूर हे काही काळ राजधानीचे ठिकाण होते. वर्धा नदीच्या काठावर ४०० वर्षांपूर्वी बांधलेला येथील किल्ला प्रसिद्ध असून तो बांधण्याचे श्रेय गोंड राजा खांडक्या बल्लर शाह यास दिले जाते. या किल्ल्यातील राणीमहाल हा प्रेक्षणीय मानला जातो.

भद्रावती - येथील भद्रनाथ मंदिर आणि पार्श्वनाथ मंदिर पाहण्यासारखे आहे. येथून जवळ असलेल्या विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत.

सोमनाथ - सोमनाथ हे मूल तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असून येथे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. अपंग आणि कुष्ठरोगी यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा आमटेप्रणीत प्रकल्प येथे ही कार्यरत आहे.

सामाजिक बांधणी

राजुरा आणि गोंडपिंपरी, मूल आणि चंद्रपूर या तालुक्यांच्या काही भागांत महाराष्ट्र राज्य शासनाची ‘विशेष कृती योजना’ कार्यान्वित केली आहे. ही योजना राबवताना जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, तेथील जीवनपद्धती, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण या बाबींचा प्रकर्षाने विचार केला आहे. जिल्ह्यातील नक्षलवादाचा प्रभाव वाढत असताना आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या मार्गाने उत्तर देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणून या योजनेकडे पाहता येईल.

मार्च-एप्रिल च्या काळात चंद्रपूर येथे महाकाली मंदिराची यात्रा प्रसिद्ध आहे. घोडा जत्रा ही बालाजी मंदिराची जत्रा चिमूर येथे जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भरते.

वरोरा येथील आनंदवन - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. याच ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचे सेवाकार्य गेली ५७ वर्षे चालू आहे. बाबा आमट्यांनी जून १९५१ मध्ये महारोगी सेवा समितीच्या वतीने कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी ‘आनंदवन’ ह्या प्रकल्पाची स्थापना केली. आणि आता या कार्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे आणि सून डॉ.भारती आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या आदर्श सेवाकार्याची जागतिक पातळीवर आवर्जून नोंद घेतली जाते.

शिक्षण:
चंद्रपूर येथे सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स महाविद्यालय कार्यरत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयात वनउत्पादने (लाकूड वगळता), वन संरक्षण, वन-धोरण, वन्य प्राण्यांचे जीवन आणि वन व्यवस्थापन या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अलीकडच्या काळात महिलाही येथे प्रशिक्षण घेऊन वनाधिकारी बनत आहेत. चंद्रपूर जिल्हा नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. जिल्ह्यामधे सुमारे ६१ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात ‘सिंदेवाही’ येथे ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.

मानबिंदू

आमटे कुटुंबीयांची (बाबा, डॉ. विकास, डॉ. भारती) कर्मभूमी असे या जिल्ह्याला म्हणता येईल. सामाजिक सेवा प्रकल्प उभे करून आमटे परिवाराने (विशेषत: बाबांनी) चंद्रपूरचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले.

दादासाहेब कन्नमवार - यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० साली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली गेली आणि नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.

*************************************************************

गडचिरोली

गडचिरोली म्हटलं की जंगलाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर येतो तो आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन्‌ त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे आणि डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग हे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या समाजकार्याने आदिवासींचे जीवनमान काही प्रमाणात का होईना उंचावले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. प्राचीन काळात गडचिरोली परिसर नाग आणि माणवंशीय राजांच्या अधिपत्याखाली होता. सध्याच्या आरमोरी तालुक्यातील वैरागड आणि धानोरी तालुक्यातील टिपागड ही पूर्वीच्या काळातील राजवटींची प्रमुख केंद्रे होती. आजही या भागात जुन्या राजवटींच्या अस्तित्वाच्या खुणा आढळतात. शाह या राजाने चंद्रपूरची स्थापना केली. नागवंशीय, गोंड, माणवंशीय यांच्यासह राष्ट्रकूट, यादव आणि चालुक्य राजांचीही सत्ता चंद्रपूर - गडचिरोली भागांवर होती. विविध काळांतील विविध राजवटींनंतर १८५३ पर्यंत हा भाग मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. १८५४ मध्ये चंद्रपूर- गडचिरोली हा भाग बेरार प्रांतात होता. याचवेळी चंद्रपूर हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. १९०५ मध्ये ‘गडचिरोली’ हा स्वतंत्र तालुका ब्रिटिशांनी निर्माण केला. पुढील काळात प्रशासकीय सोयींसाठी गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हाच अस्तित्वात आला. गडचिरोली पूर्वेकडील जिल्हा असून त्याच्या उत्तरेला गोंदिया जिल्हा, पूर्वेला छत्तीसगड राज्य, दक्षिणेला आणि नैऋत्येला आंध्र प्रदेश राज्य, पश्चिमेला चंद्रपूर आणि वायव्येला भंडारा जिल्हा अशी याची भौगोलिक रचना आहे.
भामरागड हा महाराष्ट्रातील पूर्वेकडील सर्वांत शेवटचा तालुका आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सिरोंचा तालुक्याला छत्तीसगड आणि आंध्रच्या सीमा जोडलेल्या आहेत. जिल्ह्यातील ७५ टक्के भाग जंगलांनी व्यापलेला असल्याने हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. वनसंपत्ती -
जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७५.९६% क्षेत्र वनांखाली आहे. इटापल्ली, अहेरी, धानोरा आणि कुरखेडा या तालुक्यांतील वने तुलनेने अधिक दाट आहेत. जिल्ह्यातील चपराळा अभयारण्य चामोर्शी तालुक्यात विस्तारलेले आहे. इथल्या जंगलांमध्ये १००वर्षांपेक्षा जास्त जुने आणि ३५ ते ४० मीटर उंचीचे सागाचे वृक्ष आहेत आणि त्याबरोबर बांबूही मोठ्या प्रमाणात आढळतो. येथील जंगलांमध्ये वाघ, अस्वल, तरस, गवा, सांबर, हरीण आणि नीलगाय हे वन्यपशू आणि मोर, पोपट आदी पक्षी आढळतात. सागाचे लाकूड, बांबू , मोह, डिंक, लाख, काही औषधी वनस्पती ही येथील वनोत्पादने आहेत.

गडचिरोलीमध्ये वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी ह्या प्रमुख नद्या आहेत. आढवी, खोब्रागडी, काठाणी, सिवनी, पोर आणि दार्शनी या अन्य नद्या जिल्ह्यातून वाहतात. ह्या भागात दीना नदीवरचे दीना धरण, पोटफोडी नदीवरचे कारवाफा आणि खोब्रागडी नदीचे तुलतुली धरण ही मुख्य धरणे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ‘इटियाडोह’ या धरणाचा लाभही काही प्रमाणात या जिल्ह्याला झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतेक नद्या बारमाही वाहणार्‍या आहेत. त्यामुळे उपसा जलसिंचनाचे अनेक प्रकल्प या जिल्ह्यात राबवले गेले आहेत. याशिवाय नैसर्गिक आणि कृत्रिम असे अनेक तलाव ह्या जिल्ह्यात आहेत. आग्नेयेला गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांचा संगम जिल्ह्याच्या आग्नेयेला सिरोंचा तालुक्यात झालेला आहे. तसेच जिल्ह्याच्या पश्चिमेला वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमानंतर प्राणिहिता हा एकत्रित प्रवाह जिल्ह्याच्या पश्चिमेकडून वाहतो. प्राणिहिता पुढे जिल्ह्याच्या नैऋत्य टोकाला गोदावरीला जाऊन मिळते.

इंद्रावती नदीच्या प्रवाहाचा उपयोग सागाचे मोठे ओंडके वाहून नेण्यासाठी केला जातो.

खनिजे -
खनिनदृष्या अतिशय संपन्न जिल्हा होय. जिल्ह्यात लोह, चुनखडी, दगडी कोळसा आणि तांबे ही खनिजे प्रामुख्याने सापडतात. सुरजागड, भामरागड, दमकोट आणि पडवी येथे उत्तम प्रतीचे लोह-खनिज सापडते. गडचिरोली-देऊळगाव परिसर लोह खनिजासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. चामोर्शी जवळ मारोडा, रेगडी, शिरकाटोला येथे तांब्याचे साठे आढळतात. तसेच सिरोंचा तालुक्यात चुनखडकाचे साठे आहेत. गडचिरोली तालुक्यात, कठाणी नदीच्या परिसरात दगडी कोळशाचे साठे आहेत.

समुद्रकिनारा वजा केलेले कोकण म्हणजे गडचिरोली असे हवामानाच्या दृष्टीने म्हणता येईल. पण गडचिरोलीतील उन्हाळा अतिशय कडक (सुमारे ४५-४७ अंश से.) असतो. येथील हवामान उष्ण, दमट आणि काहीसे विषम असते. येथील थंडीही कडक (४-५ अंश से.) असते. जिल्ह्यात दमदार पाऊस पडतो. पर्जन्यमान सरासरी १४५-१५० से. मी. (वार्षिक) इतके आहे.

प्रशासन :

१२ तालुक्यांची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ

क्र. तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या

१ देसाईगंज (वडसा) २४९.७ ७६,१५४

२ आरमोरी ४१९.० ९०,८४६

३ कुरखेडा ६८६.० ७७,९३६

४ कोरची ५९३.० ४०,७३६

५ धानोरा १,३८९.० ७७,३४६

६ गडचिरोली ६४९.३ १,२६,३१३

७ चामोर्शी ८०७.० १,६५,५१४

८ मूलचेरा २२०.० ३९,६११

९ इटापल्ली १,८४१.० ७०,६२७

१० भामरागड १,३१३.० ३१,६७९

११ अहेरी ९६६.० १,०३,७५९

१२ सिरोंचा ४०३.० ६९,७७३

नागरी आणि ग्रामीण प्रशासन :-

गडचिरोली आणि देसाईगंज (वडसा) या दोन नगरपालिका आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज-वडसा, चामोर्शी, मूलचेरा, कुरखेडा, कोर्ची, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, धानोरी या बारा पंचायत समित्या प्रशासकीय जबाबद-या सांभाळता. लोकवस्ती असलेली १५२१ जिल्ह्यात एकूण गावे असून ४६७ ग्रामपंचायती आहेत.

राजकीय पटलावर

लोकसभा मतदारसंघ -: गोंदिया जिल्ह्यातील आमगांव तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, चिमूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे विधानसभा मतदारसंघ मिळून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.

विधानसभा मतदारसंघ - (३) : आरमोरी, गडचिरोली, अहेरी
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५१ मतदारसंघ असून पंचायत समितीचे १०२ मतदारसंघ आहेत.

शेती आणि उद्योग

जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे. भात (धान) हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा आणि धानोरा हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याच बरोबर ऊस, तंबाखू आणि शिंगाड्याचे उत्पादनही जिल्ह्यात घेतले जाते. आंबा, सीताफळ, काजू, पेरू, जांभूळ ही फेंळेही जिल्ह्यात काही प्रमाणात पिकवली जातात. आरमोरी, कुरखेडा आणि कोरची भागात प्रामुख्याने आंबा घेतला जातो. अलीकडच्या काळात आंब्याचे क्षेत्र वाढते आहे.

शासनाने हा जिल्हा उद्योगविरहीत घोषित केल्याने जिल्ह्यात उद्योगांची संख्या अतिशय कमी आहे. तरी वडसा आणि देसाईगंज येथे औद्योगिक वसाहती आहेत. आरमोरी येथे हातमाग उद्योग असून आरमोरीमधील कोशा कापड (रेशीम) प्रसिध्द आहे. याच बरोबर वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत. जंगल अच्छादीत भाग असल्यामुळे लाकूडकटाई मोठ्या प्रमाणात केली जाते. अल्लापल्ली, गडचिरोली, चामोशी, कुरखेडा देसाईगंज येथे लाकूडकटाई हा उद्योग चालतो. देसाईगंज आणि आष्टी येथे कागद गिरण्या आहेत. जिल्ह्यातील आमगाव, कोटगल, इंदाळा इत्यादी ठिकाणी घोंगड्या बनवण्याचा उद्योग चालतो.

इथे कसे पोहचाल

जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. जिल्ह्यात एकही रेल्वे स्थानक नाही. परंतु चंद्रपूर-गोंदिया हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातो. सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक चंद्रपूर हे आहे.

काही महत्त्वाच्या शहरांपासूनचे अंदाजे अंतर

...पासून अंतर (कि.मी.)

मुंबई १०३३

नागपूर १७०

औरंगाबाद ६१५

रत्नगिरी १०५१

पुणे ८४१

कुठे फिराल

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा हे प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. येथे विलक्षण नाजूक कोरीव काम असलेले, महादेवाचे हेमाडपंती देऊळ आहे. येथील देवास मार्कंडदेव असेही म्हणतात. याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.

गोदावरी आणि प्राणहिता नद्यांच्या संगमावरील सिरोंचा हे एक पवित्र स्थान आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ पर्वानिमित्त एक मोठी यात्रा भरते. देशभरातून अनेक नागरिक ह्यामधे सहभागी होत असतात. जिल्ह्यातील शिवणी येथे वैनगंगा आणि वर्धा या नद्यांचा संगम झाला असून सिरोंचा तालुक्यातच सोमनूर येथे इंद्रावती आणि गोदावरी या नद्यांचा संगम झालेला आहे.

अलापल्ली येथील ‘वनवैभव’ हे जंगल प्रसिद्ध आहे. या जंगलासह जिल्ह्यातील घनदाट जंगले ही वन्यप्राणी - पक्षांच्या अभ्यासकांना आणि धाडसी पर्यटकांना नेहमीच खुणावतात.

चपराळा हे चामोर्शी तालुक्यातील, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले पवित्र क्षेत्र आहे. यास प्रशांतधाम असेही म्हणतात. येथील हनुमानाचे मंदिर प्रेक्षणीय आहे. येथे हनुमान जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो.

महाल आमगाव हे चामोर्शी तालुक्यातील ठिकाण असून येथे उत्कृष्ट शिल्पकला असलेली अनेक मंदिरे पाहायला मिळतात. वैरागड हे आरमोरी तालुक्यातील ऐतिहासिक गाव आहे. येथे गोंड राजा विराट याची राजधानी असलेला वैरागड किल्ला आहे. तसेच येथे भंडारेश्वर आणि गोरजाईची हेमाडपंती देवालये आहेत. या भागात खोदकाम आणि बांधकाम करताना येथील प्रशासनाची विशेष परवानगी घ्यावी लागते. कारण पुरातत्त्वकालीन महत्त्वाच्या वस्तू किंवा मौल्यवान वस्तू सापडण्याची शक्यता या भागात आजही अधिक आहे.

भामरागड - इंद्रावती, पामुलगोतम आणि परलेकोटा या नद्यांचा त्रिवेणी संगम झालेले हे स्थान आहे. बिनागोंडा येथे धबधबा असून हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.

आमटे कुटुंबीयांचा लोकबिरादरी प्रकल्प आणि बंग दांपत्याचा शोधग्राम प्रकल्प ही आधुनिक काळातील - जरूर भेट द्यावीत अशी - पर्यटन स्थळेच आहेत.
सामाजिक बांधणी

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ३८.३१% लोकसंख्या आदिवासी जमीतीची आहे. आदिवासी लोकसंख्येच्या टक्केवारीचा विचार करता राज्यातील हा दुसर्‍या क्रमांकाचा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असणार्‍या या जिल्ह्यात मुख्यतः सातनाला, टिपागड, चिरोली, भामरागड आणि सुरजागड येथील वनव्याप्त डोंगराळ प्रदेशात आदिवासी लोक बहुख्येने राहतात. गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, धानोरा आणि सिरोंचा हे तालुके आदिवासी तालुके म्हणूनच ओळखले जातात. माडिया गोंड, राजगोंड, हळबा, कोलाम, कोया आणि परधान ह्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमाती होत.
गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या घराला ‘टोळा’ असे म्हणतात. गोंड वस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते. याला ‘गोटूल’ असे म्हणतात. या ‘गोटूल’ मध्ये तरुण - तरुणी एकमेकांना भेटतात, गावकरी एकत्र येतात, तसेच समूहातील समस्या - भांडणेही सोडवली जातात. गोंडांच्या ग्रामप्रमुखास ‘गायता’ असे म्हणतात.

गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगू, बंगाली आणि छत्तीसगडी या सात भाषा ह्या जिल्ह्यात बोलल्या जातात.
हा जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ४० विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात एकूण १०० आदिवासी आश्रमशाळा आहेत.

मानबिंदू

गडचिरोली म्हटलं की जंगलाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर येतो तो आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे गेली ३५ वर्षे चालवत आहेत. ह्या प्रकल्पांतर्गत माडिया आणि गोंड आदिवासींना वैद्यकीय उपचारांची सेवा दिली जाते आणि मुलामुलींकरीता आश्रमशाळा चालवली जाते. ह्याचबरोबर जवळपासच्या जंगलात असलेल्या प्राण्यांचा सांभाळदेखील केला जातो. या अनौपचारिक प्रकल्पाला ‘प्राण्यांचे अनाथालय’ असे नाव दिले आहे.

महाराष्ट्रात होणा-या बालमृत्यूंचा सखोल अभ्यास करणारे आणि त्या संदर्भात अनेक उपाययोजना राबवणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांची कर्मभूमी गडचिरोली जिल्हाच होय. शोधग्रामच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोली येथे प्रकल्प उभा केला आहे. शोधग्राममध्ये ग्रामीण रुग्णालय, व्यसनमुक्ती केंद्र असून आरोग्याबद्दल संशोधनही येथे चालते. डॉ. बंग दांपत्याने स्थापन केलेल्या सर्च या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातीलच स्त्रियांना आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुमारे ४० स्त्री आरोग्यदूत आणि १५० प्रशिक्षित सुईणी बाळंतपणानंतर स्त्रियांची काळजी, नवजात अर्भकाचे आरोग्य, गर्भवती स्त्रियांचे आरोग्य... आदी बाबतीत दर्जेदार कार्य करत आहेत. डॉ. अभय आणि डॉ. राणी त्यांच्या कार्यकर्त्यांसह गेली सुमारे २० वर्षे येथे कार्यरत आहेत.

धानोरा तालुक्यात लेखा-मेंढा येथून श्री. देवजी र्तोफा आदिवासींमध्ये आत्मविश्र्वास जागृत करण्याचे कार्य करीत आहेत. ‘आमच्या गावात आम्ही सरकार’ ही संकल्पना घेऊन ते वाड्यावस्त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Friday, April 23, 2010

200 झोपड्यांवरून जाणार रिंगरोड

200 झोपड्यांवरून जाणार रिंगरोड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 22, 2010

चंद्रपूर - शहराच्या बाहेरून होऊ घातलेल्या रिंगरोडमुळे नेहरूनगर परिसरातील सुमारे 200 झोपड्या हटविण्यात येणार आहेत. या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असून, या परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. दरम्यान, या झोपड्या हटविण्यासंदर्भात कोणतीही सूचना पालिकेने दिलेली नाही. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

औद्योगिक क्षेत्रातून होणारी जडवाहतूक शहरातून असल्याने अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने शहराबाहेरून रिंगरोड निर्मितीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपूर्वी आखण्यात आला. मात्र, कंत्राटदार काम सोडून पळाल्याने रस्त्याचे बांधकाम अर्धवट राहिले. गेल्या महिन्यापासून ते पूर्ववत करण्यात आले असून, विधी महाविद्यालय ते वनराजिक महाविद्यालयापर्यंत रस्ता बांधकाम केला जात आहे. नेहरूनगरातून जाणारा हा रस्ता अगदी झोपडपट्टीतून जातो. त्यामुळे येथील सुमारे 200 झोपड्यांना हटविल्याशिवाय पर्याय नाही. येथे असलेल्या नाल्यावर पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे झोपड्या उद्‌ध्वस्त होतील, हेही तितकेच सत्य आहे. मोलमजुरी, घरकाम आणि भांडीधुणी अशी कामे करून उदरनिर्वाह करणारी सुमारे 200 कुटुंबे नेहरूनगरात आहेत. कुडामातीने बांधलेल्या झोपड्यांमध्ये ते गेल्या 11 वर्षांपासून जीवन जगत आहेत. गृह, पाणी आणि वीज या करांचा भरणाही गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडे केला जातो. मात्र, येथे कोणत्याही मूलभूत सुविधा आलेल्या नाहीत. रस्ता, वीज आणि पाणी यापैकी कोणतीही व्यवस्था येथे करून देण्यात आलेली नाही. असे असतानादेखील येथील नागरिक जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच हा रिंगरोड झोपड्यांना उद्‌ध्वस्त करणार आहे. त्यामुळे राहायचे तरी कुठे? असा प्रश्‍न येथील लक्ष्मण ठाकरे, गुलाब डुकरे, श्रीधर पेंदोर, शंकर बोरकर, उत्तम साखरकर, ऋषी नागोसे यांना पडला आहे. झोपड्या पाडण्यात येणार असल्याचे सत्य असले तरी झोपडपट्टीवासीयांना कोणतीही लेखी सूचना पालिकेने दिली नाही. केवळ कंत्राटदाराच्या तोंडी सूचनेतून त्यांना घर खाली करण्याचे बजावले जात आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी वॉर्डाचे नगरसेवक विठ्ठल डुकरे यांच्याकडे धाव घेतली. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
ताडोबा वाचवायचे असेल,तर...

ताडोबा वाचवायचे असेल,तर...

ताडोबा वाचवायचे असेल,तर...
Thursday, April 22, 2010
माहिती संकलन प्रमोद काकडे, चंद्रपुर

उन्हाळ्यामध्ये ताडोबा अभयारण्याकडे पर्यटकांची रीघ लागते. येथील दाट झाडी असलेले जंगल, फुले व फळांचे विविध प्रकार, अनेक जातींचे पक्षी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील वाघ हे पर्यटकांचे आकर्षण. मात्र, ताडोबाचे जंगल, वाघ, तेथील आदिवासी व वनाधिकारी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. अभयारण्यातील या प्रत्येक घटकाच्या आजच्या स्थितीचा व भवितव्याचा हा आढावा...

वनरक्षकांच्या समस्याही महत्त्वाच्या!
वनरक्षकांच्या प्रयत्नांमुळे जंगलातील वाघ सुरक्षित.
जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रणासाठी प्रयत्न.
शिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवल्याने वाघांचे संरक्षण.
आदिवासींना कायदा समजावून सांगत जंगलाचे रक्षण करण्याचा प्रयत्न.

साधनसामग्री अपुरी
संरक्षणास पुरेसे कर्मचारी नाहीत.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा अनुशेष.
अंतर्गत भागात काम करण्यास चांगल्या अधिकाऱ्यांची तयारी नाही.
अभयारण्यात राहण्यास वन कर्मचारी धजावत नाहीत. या कर्मचाऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न.
गस्ती पथके पुरेशी नाहीत.
ताडोबातील जखमी वन्य जीवांवर उपचारासाठी सोय नाही. पशुवैद्यकीय अधिकारी नाही.
वेळप्रसंगी हिंस्र जनावरांना बेशुद्ध करून ताब्यात घेण्यासाठी "टर्नाक्‍युलायझर' नाही.
ताडोबा व्यवस्थापनाकडे वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही.

काय करायला पाहिजे?
वनरक्षकांना अधिक अधिकार.त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सोयी.
वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठीची अद्ययावत यंत्रणा.
गस्ती पथकांच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ.

वाघ वाचला, तरच...
२००७च्या प्रगणनेनुसार ४३ पट्टेदार वाघ, २२ बिबटे.
वाघांच्या वाढीसाठी बांबूचे वन उपयुक्त. त्यामुळे त्यांची संख्या टिकून.
जंगलामध्ये मोठे चढ-उतार नसल्याने वाघ सहज दृष्टीस पडतात व हेच पर्यटकांचे आकर्षण.

... पण शिकार येते मुळावर
वाघांच्या संख्येच्या मानाने खाद्याचे प्रमाण कमी.
शिकारीमुळे तृणभक्षक जनावरांची संख्या कमी होत आहे. याचा थेट परिणाम वाघांवर.
जंगलातील नैसर्गिक जलसाठे कोरडे पडल्यावर शिकार आणि पाण्यासाठी वाघ मानवी वस्तीकडे येतात.
पाणवठ्यांवर अधिकार गाजविण्याच्या प्रयत्नात मानव आणि वाघांचा संघर्ष.
अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, त्या काळात वाघ पाण्यासाठी कोठे येऊ शकतात, याचा शिकारी टोळ्यांना अंदाज. त्यामुळे शिकारींत वाढ.

काय करायला पाहिजे?
शिकाऱ्यांपासून वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न.
वर्षभर पाणी मिळण्यासाठी पाणवठे वाढविणे.
मनुष्याचा हस्तक्षेप होणार नाही यासाठी प्रयत्न.

जंगलाला दृष्ट लागतेय...
प्राणी वैज्ञानिकांना, वन्य जीव अभ्यासकांना, तसेच हौशी पर्यटकांनादेखील ताडोबा अभयारण्याचे आकर्षण.
भारतीय वन कायदा ७ अन्वये, फेब्रुवारी १८७९पासून "संरक्षित वन'.
१९९५पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता.
अभयारण्याची व्याप्ती ५७८.५१ चौरस किलोमीटर (११६.५५ वर्ग किलोमीटर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ४६१.९६ वर्ग किलोमीटर अंधारी वन्य जीव अभयारण्य)
वन्य प्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी कोलसा येथील तलावाखेरीज १० तलाव.
उच्च दर्जाच्या बांबूची पैदास.
स्थानिक आदिवासींच्या मते, "तारू' नावाचा त्यांचा पूर्वज येथे वाघाशी लढताना मारला गेला. त्याच्या स्मरणार्थ या भागाचे नाव ताडोबा.
अभयारण्यातील नैसर्गिक जलाशयाच्या काठावर "तारू'चे मंदिर.

कशामुळे?
सध्या उपलब्ध क्षेत्र वन्य जीव व वाघांसाठी पुरेसे नाही.
मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्य जीव असताना पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकलेले नाही.
बांबू तस्करीत वाढ. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्‍यात.
पर्यटकांसाठी सोयींचा अभाव.
तीव्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता मर्यादित.

काय करायला हवे?
वन्य प्राण्यांच्या वावरासाठीची जागा वाढविणे.
जंगल वाढण्यासाठी प्रयत्न.
जंगलांना वणवे लागू नयेत यासाठी योजना.
बांबूची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न.
जलसाठा वाढविण्यासाठी योजना.

मूळ रहिवाशांवर अन्याय का?
ताडोबातील मूळ रहिवासी असल्याने जंगलावर अधिकार.
पैसा ही गरज नाही, तर शिकार करून मांस खाणे ही नैसर्गिक गरज.
जंगलावर प्रेम असल्याने जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न.
जंगलावर आयुष्य अवलंबून असल्याने त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न.

वन विभागाशीच वादाचे प्रसंग
१९९६मध्ये संरक्षित क्षेत्र घोषित झाल्याने आदिवासींना जंगलापासून दूर व्हावे लागले.
काम मागण्यासाठी गेलेल्या आदिवासींचे व्यावसायिकांकडून शोषण.
शाळा, वीजपुरवठा, रस्ते व पाण्यापासून वंचित.
रानमेवा मिळविण्यासाठी आदिवासी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे बांबू व तृणभक्षक जनावरांसाठी आवश्‍यक झाडांची राखरांगोळी.
जंगलाला लागलेल्या आगींचा परिणाम तृणभक्षकांच्या वाढीवर व वाघांच्या संख्येवर.
ताडोबा अभयारण्य झाल्यानंतर परिसरातील आदिवासी आणि वन विभागाचा संघर्षात वाढ.
रानडुकरे व नीलगाईंमुळे पिकांचे नुकसान.
वनहक्क कायद्यानुसार आदिवासी आपल्या अधिकारांचा वापर करतात, तर याच कायद्याचा आधार घेऊन त्यांच्या नावाने इतरांकडून वनांचे नुकसान.याचा त्रास आदिवासींना. त्यामुळे आदिवासींमध्ये वन विभागाप्रती नेहमीच असंतोष.
रानमेव्यातून मिळणारी खनिजे कमी झाल्याने आदिवासींचे कुपोषण.

काय करायला पाहिजे?
आदिवासींच्या प्रगतीसाठी जंगलातील संपत्तीमध्ये त्यांना भागीदार करवून घेणे गरजेचे.
विस्थापित आदिवासींच्या प्राथमिक गरजा शासनाने पूर्ण कराव्यात.
जंगलातील संपत्तीवर आदिवासींचा हक्क हवा.
अभयारण्यासंदर्भातील कायद्यांची योग्य माहिती त्यांना द्यावी.
जनावरांमुळे पिकांची हानी झाल्यास त्वरित भरपाई मिळावी.
रानमेवा मिळणे अशक्‍य झाल्याने त्यांच्या पोषणासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
पर्यटकांसाठी गाइड म्हणून काम करणे, वनातील फुले, फळे व मधासारख्या गोष्टी विकण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे.

पर्यटक तर यायलाच हवेत..
सोयी, गैरसोयी
अभयारण्यामध्ये चढ-उतार नसल्याने वाघांना पाहणे सोपे.
ताडोबाचा प्रमुख जलाशय पक्षिनिरीक्षकांचे आवडते ठिकाण. संपूर्ण जलाशयाला परिक्रमा करता येईल, असा जीपने प्रवासयोग्य मार्ग.
ताडोबापासून १८ किलोमीटरवर असलेल्या मोहर्ली येथे काही खासगी रिसॉर्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राहण्याची व्यवस्था.
"मगर प्रजनन केंद्रा'तून सोडलेल्या मगरी काठावर पहुडलेल्या पाहायला मिळतात.
ताडोबाच्या आतील पर्यटकांसाठी असलेले रिसॉर्ट व्याघ्रसंरक्षणासाठी आता बाहेर.
खासगी रिसॉर्ट सामान्य पर्यटकांना परवडत नाही.
चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून ताडोबाचे अंतर ४५ किलोमीटर. ताडोबाला जाण्यासाठी वन विभागातर्फे सोय नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस. त्यांच्या वेळा सकाळी आणि सायंकाळी. (ताडोबामध्ये पर्यटकांना सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ या वेळात प्रवेश.)
खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट.
ताडोबाच्या पर्यटकांसाठी सुरू केलेली डेक्कन ओडीसी ही रेल्वेसुद्धा सेवाग्रामपर्यंतच.
ताडोबाच्या आत पर्यटकांना फिरविण्यासाठी खासगी वाहने आहेत; मात्र त्यांचेही दर ठरलेले नाहीत.
व्यवस्थापनाने सर्वसामान्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वाहतूक आणि राहण्याचा प्रश्‍न प्रथम सोडविण्याची गरज.
बस आणि रेल्वे स्थानकांवरून पर्यटकांना ताडोबाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचविण्याची व्यवस्था नाही.

... पण, हे तारतम्यही हवे
जंगलातील झाडे व फुलांना बाधा पोचवू नये.
वन्य प्राणी बिथरतील असे वर्तन करू नये.
मोठ्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आदिवासींच्या सहवासात राहिल्यास त्यांना रोजगार मिळेल.
अभयारण्यामध्ये प्लास्टिकचा कचरा करू नये.

प्रश्‍न बफर झोनचा
ताडोबा अभयारण्य वाचविण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनभोवती बफर झोन प्रस्तावित. हे ११०१.७७ चौ.कि.मी क्षेत्र राखीव. यात ७९ गावांचा समावेश.
व्याघ्रप्रकल्पाच्या प्रस्तावित क्षेत्रात मोठी खनिजसंपत्ती. या खाणी झाल्यास त्याचा परिणाम सरळ व्याघ्रप्रकल्पावर.
बफर झोन झाल्यास वन्य जीव सुरक्षित.

संकलन : प्रमोद काकडे संबंधित बातम्या
राज्यात वृक्षतोडीवर बंधन आणणार!
लोणारा येथील जंगलात वनाधिकाऱ्यांकडून अवैध वृक्षतोड!
वनहक्क कायद्याबाबतच्या अडचणी दूर करणार - वनमंत्री
बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगले उजाड
वृक्षतोड रोखणाऱ्या वनरक्षकांना धक्काबुक्की

प्रतिक्रिया
On 4/22/2010 10:36 AM Jitendra Kulkarni said:
धन्यवाद प्रमोद... अतिशय माहितीपूर्ण आणि मुद्देसूद लेख आहे. मी ताडोब्याला गेली २५ वर्षे जात आहे आणि लेखातील सगळेच मुद्दे तेव्हापासून पाहत आहे. कदाचित त्याच्या हि आधी पासून ते तसेच असतील. माझा इ मेल सोबत दिला आहे. जर काही योजना ताडोब्या साठी आखली जात असेल तर कृपया संपर्क करणे हि विनंती.
On 4/22/2010 9:54 AM Dr.Manoj Prabhavat said:
थान्क्स प्रमोद ! हा लेख वाचून ताडोबा प्रकल्पाची पूर्ण कल्पना आली ! खरच वाघांना वाचावाय्साठी खूप काही करायचं आहे आणि मला वाटत कि सरकार ने ह्या बाबत लवकरच काही तरी उपाय करायला पाहिजेत.
On 4/22/2010 9:15 AM Bhagyesh Jain said:
धन्यवाद ! प्रमोद, यासाठी काही योजना आखल्या गेल्यास, आमच्यासारखी सर्व तरुण मंडळी या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत.
On 22/04/2010 08:57 प्रशांत said:
वरील सुचविलेल्या उपायांपैकी काही उपाय सोपे आहेत कमीतकमी ते तरी पूर्ण व्हावेत एवढी सरकार कडून अपेक्षा आहे. मागील अंकात जंगल तोडी बद्दल ऐकून फार वाईट वाटले होते. मिझी सरकारला विनंती आहे कि माणसांची नाही तर कमीतकमी जंगली प्राण्यांची तरी काळजी घ्या. काही तरी निर्णय (दिल्लीला विचारून नाही) घ्या.
On 4/22/2010 8:14 AM Rupesh Pansare said:
खूप छान प्रोजेक्ट. सरकारने याकडे लक्ष्य द्यायला हवे.... धन्यवाद प्रमोद.
On 4/22/2010 5:26 AM atul kumthekar said:
ताडोबा प्रकल्प पुण्यात आणावा ! मग बिल्डर्स हळू हळू त्याचे कोन्क्रेतिज़तिओन करतील आणि पर फमिली एक वाघ पाळलाच पाहिजे असा नियम राष्ट्रवादी सरकार करेल !
On 4/22/2010 4:50 AM sandeep said:
धन्यवाद ! मुद्देसूद लेख वाचून लवकर व प्रखरपणे समजले.
On 4/22/2010 1:34 AM satish patil said:
केंद्रीय पर्यावरण मंत्र्याच्या पासून , झाड तोडणार्या गुन्हेगारापर्यंत ची भ्रष्टाचाराची लिंक नष्ट केली तरच भारतातले झाड वने विसरा झाड वाचेल . व्याघ्रप्रकल्प वागिरे लांबच्या गप्पा आहेत .

^^^^^^^^^^^^^^^^^^
'ताडोबा'चे संवर्धन होणे गरजेचे

चंद्रपूर - वनांचा होणारा ऱ्हास व त्यामुळे धोक्‍यात आलेले वन्यजीव यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वन्यजीव वाचले तर वने वाचतील. याच दृष्टीने "ताडोबा'चे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी आज (ता. 22) "सकाळ'जवळ व्यक्त केले.

सातपुडा फाउंडेशनेचे किशोर रिठे म्हणाले, ताडोबा हे केवळ वाघाचेच जंगल नाही, तर परिसरातील नागरिकांच्या जगण्याचा आधार आहे. ताडोबामुळे हवा, पाणी आणि आर्थिक स्रोत उपलब्ध होत आहेत. पिकांसाठी पोषक वातावरण असलेल्या ताडोबाला वाचविण्यासाठी तशी यंत्रणा राबविण्याची गरज आहे.
फ्रेंड्‌स ऑफ ताडोबा नेचर क्‍लबचे नीरज पोतदार म्हणाले,

माणसांमुळे वन्यप्राण्यांना त्रास होत असेल तर ताडोबातील गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. वन्यजीव क्षेत्रातील संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात यावा, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी आणि पर्यावरण अभ्यासकांना ताडोबातील प्रवेश नि:शुल्क करण्यात यावा. व्याघ्रप्रकल्प ताडोबा, मोहुर्ली, कोळसा अशा तीन क्षेत्रांत असल्याने पर्यटकांना एकाच वेळी पाहता येत नाही. त्यामुळे वाहनांची प्रवेशसंख्या वाढविण्यात यावी. जंगलाच्या सीमावर्ती भागातील रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे वाहनांना त्रास होतो, त्यांची सुधारणा व्हावी. ताडोबातील पदभरती करताना स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या पर्यावरण अभ्यासकांना प्राधान्य दिल्यास वन्यजीवांच्या संरक्षणात मोलाची मदत होऊ शकते.

इको-प्रो.चे निखिल तांबेकर म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस असल्याने ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वादविवाद होऊन कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडतात. आता वाहनांची संख्या 40 करण्यात आली. याच प्रकल्पातील कोळसा क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने चांगले आहे. ही वाहने कोळशाकडे वळविल्यास विकास होईल. दरम्यानच्या काळात कोळसा प्रवेशद्वारावर प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो. वाहने वापस पाठविण्यात येतात, ही प्रथा आता बंद केली पाहिजे.
ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे योगेश दुधपचारे म्हणाले,

ताडोबा व्याघ्रप्रकल्प वाचविण्यासाठी बफर झोन लागू करून प्रस्तावित कोळसा खाणींची हकालपट्टी करण्याची गरज आहे. त्यामुळे जंगलाचे रक्षण होऊन वाघांवर आलेली संक्रांत थांबेल.
बछड्यांना जन्म

बछड्यांना जन्म

दोन बछड्यांना जन्म

Friday, April 23, 2010

चंद्रपूर - पाथरी (ता. सावली) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मेहा (बुजरुक) बिटात एका मादी बिबट्याने दोन पिल्लांना जन्म दिला. मेहा-मंगरमेंढा मार्गावरील नाल्यात ती पिल्लांसह दोन दिवसांपासून आहे.

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या पाथरी वनक्षेत्रात मेहा (बुजरुक) घनदाट जंगलाचे बीट आहे. जंगलातील पाणवठे आणि गावतलावही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे येत असतात. या जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे वाघाचा धुमाकूळ सुरू असून, मनुष्यहानी झाली नसली, तरी शेकडो जनावरांचा बळी गेला आहे. जंगलात चरावयास जाणाऱ्या गुराढोरांवर हल्ले होण्याच्या घटना दररोज घडत असतात. मेहा बुजरुक बिटातील मंगरमेंढा मार्गावरील नाल्यात मादी दोन नवजात बछड्यांसह दिसून आली. दोन दिवसांपूर्वीच तिने पिल्लांना जन्म दिला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनास्थळी वनरक्षक मोडक आणि वनपाल चौधरी यांनी पाहणी केली. वनविभागाने पथक या बिबट्याच्या संरक्षणासाठी तळ ठोकून आहे. दरम्यान, बिबट्याने दोन बछड्यांना जन्म दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच तालुक्‍यातील नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, कोणतीही अनुचित घटना होऊ नये, म्हणून वनविभागाने बंदोबस्त लावला आहे. याच आठवड्यात ताडोबातील एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. वाघ-बिबट्यांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त होत असतानाच बछड्यांच्या जन्मामुळे वनविभागात आनंद व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया
On 4/23/2010 5:32 PM Rajesh S Jadhav said:
१४११+२=१४१३

------------------------
ताडोबात वाघिणीचा चार पिल्लांना जन्म
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 15, 2010
चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात एका वाघिणीने चार पिल्लांना जन्म दिला. त्यांच्या सुरक्षेसाठी "कॅमेरा ट्रॅपिंग'द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
बोटेझरी बिटात गुरुवारी सायंकाळी वनरक्षकांना एक वाघीण चार पिल्लांसह जंगलात दिसली. ताडोबाचे क्षेत्र संचालक संजय ठाकरे यांनी पिल्ल अडीच ते तीन महिन्यांचे असल्याचे सांगितले.
------------------------------------------

Thursday, April 15, 2010

जलस्रोत कोरडे

जलस्रोत कोरडे

अग्रो १ स्पेशल
ताडोबातील जलस्रोत कोरडे

चंद्रपूर - वनांतील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. सध्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात नऊ टॅंकरद्वारे 86 पाणवठ्यांवर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
एकूण 625 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात वाघांशिवाय इतरही प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. 20 ते 25 चौरसमीटर वनक्षेत्रास पाण्याचे एक स्रोत गृहीत धरून प्रकल्पात पाणीपुरवठा केला जात आहे. या वर्षी सरासरी पावसाच्या तुलनेत 60 टक्केच पाऊस कोसळल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेले अनेक नैसर्गिक जलस्रोत जानेवारीपर्यंतच तग धरू शकले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच वन्यप्राण्यांसाठीच्या पाण्याचे नियोजन केले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा ही तीन प्रमुख वनक्षेत्रे येतात. या क्षेत्रात अनुक्रमे 23, 13 आणि 23 असे एकूण 59 नैसर्गिक पाणवठे आहेत. याशिवाय ताडोबा क्षेत्रात पाच आणि कोळसा क्षेत्रात आठ पाणवठ्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. मोहर्ली क्षेत्राच्या सीमेवर असलेले आणखी पाच छोटे पाणवठे आहेत. सद्यःस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 77 नैसर्गिक पाणवठे आहेत. तथापि हे पाणवठे पुरेसे नसल्याने मागील काही वर्षांपासून टप्प्या टप्प्यांत एकूण 55 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यात ताडोबातील 21, तर मोहर्ली आणि कोळसा क्षेत्रातील प्रत्येकी 17 पाणवठ्यांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यातच नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागल्याने वनविभागाने या वर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 14 पाणवठे नव्याने तयार केले. सद्यःस्थितीत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात 86 कृत्रिम पाणवठ्यांत सात टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. यासोबतच 60 नैसर्गिक पाणवठ्यांत वन्यप्राण्यांची तहान भागू शकेल, इतके पाणी आहे. 20 ते 25 चौरस किमी वनक्षेत्रास एक पाणवठा याप्रमाणे वनविभागाने पाण्याचे नियोजन केले आहे.

Monday, April 12, 2010

समाजाची शिकार बनलेलं जगणं!

समाजाची शिकार बनलेलं जगणं!

पारध्यांना अद्यापही किती भयानक परिस्थितीत जीवन जगावे लागते, याचं आणखी एक वास्तव चित्रण 'दर कोस दर मुक्काम' या कादंबरीच्या रूपाने अशोक पवार यांनी वाचकांपुढे सादर केले आहे. त्यांच्या 'बिराड' या आत्मकथन पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीसमवेत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 'बिराड'चा पुढचाच भाग म्हणजे 'दर कोस दर मुक्काम' आहे. 'बिराड' हे पवार यांचे आत्मचरित्र आहे, त्यात बेलदार जमातीचे चित्रण केलेलं आहे. चरितार्थासाठी दगड फोडण्याचे काम करणारे लोक या बेलदार जमातीचे आहेत. तीही भटकीच जमात आहे.

बेलदार जमातीप्रमाणेच पारध्यांनाही धड माणसांप्रमाणे नाही आणि जनावराप्रमाणेही नाही, अशा अत्यंत भयानक प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगावे लागते. दोन दिवस आश्रयाची सावली मिळेल या अपेक्षेने त्यांना एका गावांहून दुसऱ्या गावात आपला बिराडांचा मुक्काम हलवावा लागतो. परंतु, आश्रयाची सावली टप्प्यात येत नाही, तोच त्यांच्यावर अनेक आरोप करून त्यांना हुसकावून लावण्यात येते. माणसाने माणसाला केवळ माणूस म्हणून नव्हे तर जनावराप्रमाणे तरी आश्रय मिळावा, इतकीही अपेक्षा या पारधी समाजाला करता येत नाही. या समाजाने जगावे म्हटले तरी गावकरी, पोलीस, लोकप्रतिनिधी आणि मीडिया जगू देत नाहीत. शिक्षण व सुधारणा तर बाजूलाच राहिल्या.

लेखकाने पारध्यांवर होणाऱ्या अनेक अत्याचारांचे वर्णन कादंबरीच्या रूपाने चव्हाट्यावर आणले असून, ते वाचून वाचकांचे मन सुन्न होते. पारधी समाजातील चालीरीती, बायापुरुषांच्या मनातील स्पंदने त्यांच्याच भाषेत अचूक व्यक्त करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

तळेगावच्या गोदरीत असलेल्या पारध्यांच्या सातआठ बिराडांतील वडील माणूस, लकसीमन बुढा, हिवाळा आला म्हणून बिराडे हलविण्यास निघाला. तेव्हा बिराडातील नाम्यानं नव्या मुक्कामाच्या गावाबाबत शंका काढली, 'शाहर गाव हाय, तितं पोलिसाईचा तरास भारी असतुया. खेड्यापाड्यात चला, तितं पोलिसाईचा तरास नसतुया.'

त्यावर लकसीमन बुढा, आपल्या अनुभवाचे बोल त्यांना सुनावतो, 'आता कितीभी नादर म्हणाल, तरी पोलीस तिवढ्यापुरता तरास दिनारच. पोलिसाची जात अन कुतऱ्याची जात सारखीच असतीया. कुतरं कवा भुकंल याचा नेम नसत, आन् पोलीस कवा आपली धरपकड करील, याचा नेम नसतं, हे ठाव न्हाई काय आपल्याला?'

पोलिसांबाबत आलेल्या अनुभवातून लकसीमन बुढा सर्वांना ऐकवतो व संपूर्ण कादंबरीत वाचकांनाही या सत्याचा प्रत्यय वारंवार येत जातो. एका खोट्या प्रकरणात पारध्यांना अडकवून पोलीस ठाण्यात नेत असताना लकसीमन बुढास पोलीस जीपमध्येच इतके मारहाण करतात, की तो बिचारा प्रवासात जीपमध्येच मरून जातो. मरण पावल्यावर पोलीस त्याचे प्रेत जंगलात फेकून देतात, आणि जीपमध्ये सांडलेले बुढाचे रक्त इतर कैद्यांना धुवून काढायला लावतात. इतकंच नाही तर कुठेही 'ब्र' न काढण्याचा त्यांच्याकडून शब्द घेतात.

दर कोस मुक्काम बदलत बिराडे फिरत असतात. मुक्कामच्या ठिकाणी उपजीविकेसाठी शिकार केली तर पोलीस व वनरक्षक पकडतात. अटक करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील छोटीमोठी शिकार लुटतात. भिक्षेसाठी दारोदार फिरणाऱ्या बायकांना कोणी दारापुढे उभे करीत नाहीत. इतरांप्रमाणे दारू बनवून विकली तर स्थानिक गावगुंड व लोकप्रतिनिधी फुकट दारू पितात. पैसे मागितले तर मारझोड करून उलट पोलिसांत तक्रार करतात, असे प्रसंगही कादंबरीत आहेत. हा अर्थातच पारध्यांचा नेहेमीचा अनुभव.

अशा या अत्याचारांत पिचून निघालेल्या पारध्यांना कांबळे नावाचा एकमेव पोलीस इन्स्पेक्टर देव म्हणून भेटतो. तो या पारध्यांवर होणाऱ्या अन्यायातून त्यांची सुटका करतो, पारध्यांच्या मुलांना आश्रम शाळेत प्रवेश मिळवून देतो. परंतु, गावगुंड व लोकप्रतिनिधी या इन्स्पेक्टवर पारध्यांकडून पैसे खाऊन त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करून त्या इन्स्पेक्टरची गडचिरोलीला बदली करण्यास गृहखात्यास भाग पाडतात. त्यात स्थानिक आमदाराचा भाऊ आघाडीवर असतो. त्याने एका सहकारी बँकेचे लाखो रुपये बुडविलेले असतात, परंतु, कांबळे यांच्या जागी आलेले नवे इन्स्पेक्टर त्याला अभय देतात आणि पारध्यांवर तुटून पडण्याचा आदेश पोलिसांना देतात.

चोरीच्या खोट्या तक्रारीवरून पारध्यांना पकडणारे, रात्री त्यांच्या बिराडांवर छापे टाकून त्यांचे पाल उद्ध्वस्त करून, महिलांवर लैंगिक अत्याचार करणारे, पारध्यांना पिटाळून लावणारे पोलीस हे सर्व परिणामकारक चितारले आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिकून सुखाने जगण्याचं स्वप्न बघणाऱ्या गुलब्या या मुलाचे स्वप्नही पोलिस उद्ध्वस्त करतात.

स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटून गेली आहेत आणि पुरोमागित्वाचा टेंभा मिरवणारे आपले राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. तरीही पददलित, भटक्या जमातीस किती उपक्षेने जगावं लागत आहे, याचे वास्तव दर्शन घडवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.

...जॉन कोलासो
.................................................................

बिराड : (चौथी आवृत्ती)

पाने : १८८ किंमत : १८०

दर कोस दर मुक्काम

पाने : १९६ किंमत : १९० रुपये

दोन्ही पुस्तकांचे लेखक : अशोक पवार

मनोविकास प्रकाशन, पुणे आणि मुंबई

Saturday, April 10, 2010

रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच

रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच

प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
दंतेवाडा - शहीद जवानांचे मृतदेह ताब्यात घेत ते सुरक्षितस्थळी हलविण्याचे जिकरीचे काम सुरू झाले असून, रक्ताने भिजलेले 41 मृतदेह घटनास्थळापासून 70-80 किलोमीटरवरील सुकमा येथे नेण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले उर्वरित छिन्नविच्छिन्न मृतदेह हेलिकॉप्टरने हलविण्याचे काम उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते.

नक्षलवाद्यांनी केलेल्या रक्तपातानंतर परिसर दहशतीखाली असून, पोलिस यंत्रणा जोमाने मदतकार्यात लागली आहे. घटनास्थळावरून पोलिसांची सर्व शस्त्रे नक्षलवाद्यांनी पळविली असून, केवळ एकच रायफल पोलिसांना मिळाली. सुकमा परिक्षेत्रातील जंगलाचा विस्तार 3448 वर्ग किलोमीटर असून, पर्वतीय क्षेत्र असल्याने प्रामुख्याने मदतकार्य करण्यात अडचणी येत आहेत.

जखमींना जगदलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत जवानांपैकी काहींची नावे कळली असून, यात सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट सत्यवानराव व बाबूलाल मीना यांचा समावेश आहे. सियाराम हा जवानही शहीद झाला आहे. उपचार सुरू असलेल्यांमध्ये हेडकॉन्स्टेबल राज बहादूर, सीमालाकर, आदित्य त्यागी, प्रमोद कुमार, अरविंदकुमार, बलजित, रमेश यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात ओरिसात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 13 जवान शहीद झाले होते. त्या घटनेनंतर पोलिस सतर्क झाले असले तरी आजच्या घटनेने पोलिस यंत्रणा चांगलीच हादरली आहे.


प्रतिक्रिया
On 09/04/2010 01:01 Rk said:
लाज वाटावी आणि आपल्याच मूर्ख पणाची कीव करावी अशी हि गोष्ट आहे. ओरिसा काय किवा गडचिरोली काय सगळे एकाच. याला जबाबदार आहेत ते आपले नालायक राजकारणी. जे स्वत: च्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी थेट लष्करी/निम लष्करी मोहीम करू देत नाहीत. नक्षल्वद संपवणे मनावर घेतल्यास एवढे अवघड नाही हे नक्कीच. मूढभर नक्षलवदि तेथील जनतेस व सरकारला जर एवढे जेरीस आणत असेल तर आपल्या शूर पोलिसांनी किवा लष्कराने बांगड्या भरल्या नाहीत. एकदाचे हे नक्षल्वदि संपवले तर परत हे होणार नाही. पण आपल्या राजकारण्यांनी बांगड्या भरल्यात
'वेलकम टू हेवन'च्या मागे दडला भेसूर चेहरा

'वेलकम टू हेवन'च्या मागे दडला भेसूर चेहरा

by Pramod kakade, Repoter(chandrapur)
सुकमा (जि. दंतेवाडा) - चिंतलगुफा घटनास्थळापासून 12 किलोमीटर अंतरावर केंद्रीय राखीव पोलिस दलाचा कॅम्प आहे. या कॅम्पच्या प्रवेशद्वारावरच "वेलकम टू हेवन' असे लिहिलेले आहे. इथून पुढे प्रवेश केल्यानंतर दुर्दैवाने येथील स्वर्गाऐवजी नरकसदृश स्थितीची कल्पना येते. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या परिसराला नक्षलवादी आणि पोलिसांच्या वास्तव्याने अक्षरश: नरकाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

मंगळवारला चिंतलनारपासून पाच किलोमीटर अंतरावरील मरकानाच्या जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 76 जवानांचा नक्षलवाद्यांनी बळी घेतला. त्यानंतर हा परिसर निर्मनुष्य झाला. पोलिस आदिवासींकडे संशयाच्या नजरेने बघत आहेत. चिंतलगुफा येथील कॅम्पमध्येच काही दिवसांपूर्वी शहीद झालेल्या जवानांचे वास्तव्य होते. या घटनेनंतर या कॅम्पमधील वातावरणच बदलले. स्तब्ध झालेले प्रश्‍नार्थक चेहरे इथे बघायला मिळतात. याही परिस्थितीत ते आपले कर्तव्य बजावत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक नव्या चेहऱ्याला संशयाने बघितले जाते. या कॅम्पच्या समोर एका दगडावर इंग्रजीत "वेलकम टू हेवन' असे लिहिलेले आहे. या दगडाच्या मागे तीन वर्षांपूर्वी माओवाद्यांशी लढताना शहीद 12 जवानांचा स्मृतिस्तंभ आहे. याला लागूनच मोठा तलाव आहे. तिथे शेकडो कमळे फुललेली आहेत. प्रथमदर्शनी कुणीही बघितले तर येथे नंदनवन असल्याचा साक्षात्कार होतो; मात्र तो फसवा आहे. याची कल्पना थोड्या दूर अंतरावर गेल्यावर लक्षात येते. ओबडधोबड रस्ते, तुटलेले पूल, जागोजागी नक्षलवाद्यांनी खोदलेले खड्डे याशिवाय येथे दुसरे काहीच नाही.

चिंतलगुफानंतर कांकेरलंका, पोलमपल्ली आणि शेवटचा चिंतलनार कॅम्प आहे. चितलनार कॅम्पमधील जवान शहीद झालेले आहेत. येथे भेट दिली असता जवानांच्या चेहऱ्यावरील संताप ओसंडून वाहत होता.

रस्ताही मृत्यूकडे नेणारा
"स्वर्गात या' म्हणून स्वागत करणाऱ्या चिंतलगुफा ते चिंतलनार यादरम्यान 12 किलोमीटरचा रस्ता "मृत्युमार्ग' झाला आहे. नक्षलवाद्यांनी जागोजागी भूसुरुंग पेरून ठेवलेला आहे. त्यामुळे कधी स्फोट होईल याचा नेम नाही. झाडांलगत प्रेशरबॉम्ब लावलेले आहेत. आज पोलिसांना चार जिवंत बॉम्ब मिळाले. त्यामुळे या मार्गावरून चालताना कधीही मृत्यू समोर उभा राहू शकतो, हे लक्षात घेऊनच गावकरी आणि जवान येणाऱ्यांना सावध करीत आहेत.

गाव की स्मशान?
या घटनेनंतर चितलगुफा, चिंतलनार, कांकेरलंका, पोलमपल्ली ही गावे अक्षरश: निर्मनुष्य झालेली आहेत. गावांत घरे होती; पण दिसत नव्हती ती माणसं. जनावरे मात्र रस्त्यावरच चरत होती. एखादंदुसरे लहान मूल दृष्टीस पडले तेवढेच. या चारही गावांनी हा थरार अनुभवला. पोलमपल्ली येथील लालूसिंग म्हणाले, "उभ्या आयुष्यात अशी घटना अनुभवलेली नाही. दिवाळीच्या फटाक्‍यांचे मोठे आवाज कानावर पडत होते. आम्ही मात्र घरात बसूनच हा थरार अनुभवला. मदत केली तर नक्षलवाद्यांचा त्रास होतो.
आता संशयित म्हणून पोलिसांचा त्रास सुरू होईल.' लालूसिंगशिवाय एकानेही अनोळखी व्यक्तीशी बोलण्याची हिंमत केली नाही.

जागोजागी खुणा
चितलगुफा ते चिंतलनार या मार्गावर नक्षलवाद्यांनी केलेल्या विध्वंसाच्या खुणा स्पष्टपणे जागोजागी दिसतात. रस्त्यावर बांधलेले पूल, शासकीय कार्यालये आणि शाळा स्फोटात छिन्नविच्छिन्न झाल्या आहेत. जमीनदोस्त झालेल्या या इमारती इथल्या नरकस्वरूप परिस्थितीची कल्पना देतात.

प्रथमच 'मोलोटीव-काकटेल'चा वापर
दंतेवाडा जिल्ह्यातील ताडमेटला येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करताना प्रथमच "मोलोटीव-काकटेल' या नावाचे रसायन वापरल्याची माहिती समोर आली आहे.

ताडमेटला येथील नक्षल्यांच्या दलात 76 शहीद झाले होते. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी बंदूक, ग्रेनेड, तिरकमठ्यांचा वापर केला होता. मात्र, या जवानांचे मृतदेह हाती लागल्यानंतर त्यांच्या अंगावरील जखमा बघता या हल्ल्यात वेगळे काही वापरले असावे, अशी शंका व्यक्त केली जात होती. ज्या हेलिकॉप्टरने जवानांचे मृतदेह उचलण्यात आले, त्या पायलटच्या सेवेत असणाऱ्या छत्तीसगड पोलिस दलातील ओ. पी. साहू या शिपायाने मृतदेह प्रत्यक्ष बघितले. त्यांनीही यात हा प्रकार वेगळा असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले होते.
मोलोटीव काकटेल नावाच्या रसायन पेट्रोल आणि पेट्रोलियम जेलीपासून तयार केले जाते. काचेच्या बाटलीत भरून त्याला आग लावून हवेत फेकले जाते. याचा स्फोट होऊन अंगावर पडले की व्यक्ती भाजते. याचाच वापर नक्षलवाद्यांनी या हल्ल्यात केला. बहुतेक जवानांच्या शरीरावर पोळल्याच्या खुणा होत्या. संबंधित बातम्या
रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच
निमलष्करी फौजा परत पाठवा
कोंदावाही जंगलात पोलिस-नक्षलवाद्यांत चकमक

प्रतिक्रिया
On 4/9/2010 2:45 PM मराठी मन said:
अशा घटना घडल्यानंतर काय करावं तेच कळतं नाही...आपले ७६ जवान शहिद झाले, वाटते आता तरी शासन जागे होऊन ठोस कार्यवाही करुन नक्षलवाद्यांचा बिमोड करेल....देशाचे रक्षण करण्यासाठी लष्करात भरती व्हायचे आणि देशातील या शक्तींशी सामना करतच मरायचे. आज ७६ तर उद्या १०० शहिद होतील, आपण फ़क्त ’आत्म्यांना शतश प्रणाम’ म्हणायचे आणि पुढील ’आत्म्यांना शतश प्रणाम’ म्हणण्यासाठी तयार व्हायचे. सरकार आश्वासन देत राहणार आपण ते घेत राहणार... बाकी काय! काय करणार...नुसतीच मत मांडून काहीच होणार नाही, काय करायला हवं?????
On 4/9/2010 12:02 PM PRADIP said:
सर्व शहीद जवानांना शतशः प्रणाम! शतशः प्रणाम! शतशः प्रणाम! शतशः प्रणाम!
On 4/9/2010 11:37 AM masum said:
मन सुन्न झालं हे सर्व वाचून ! communist ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे.हिचा समूळ नायनाट होण आवश्यक आहे. अजून किती जवानांचे आम्ही बळी देणार आहोत?आणि कुठे कुठे?सर्व शहीद जवानांना शतशः प्रणाम!
On 4/9/2010 10:20 AM dipti said:
आमच्या पोलिसांना सलाम ज्यांनी तिथे आपला प्राण गमावला...नक्षल वादी लोक तुम्ही भ्याड आहात..आम्ही तुमचा धिक्कार करतो.....तुम्ही अशा निष्पाप लोकांचे बळी आणि शाप घेतल्यानंतर कधीही सुखी राहू शकणार नाही.
On 4/9/2010 8:47 AM Sachin Arvind Sonawane said:
do we have political will to get out of this mess, are we really going to help our troopers.
On 4/9/2010 4:19 AM aai said:
मन सुन्न झालाय.त्या सगळ्या जवानांच्य आत्म्यांना शतश प्रणाम.. त्या सर्वांच्या कुटुंबियाच्या दुख्खात आम्ही सामील आहोत.एकच वाटते व्यर्थ न हो हे बलिदान
On 09/04/2010 00:54 Ashish said:
काय प्रतिक्रिया देऊ, ह्या सरकारने देशाचे पूर्ण वाटोळा केला आहे. हे साध्या नक्षल् वाद्यांना नाही रोखू शकत, हे काय चीन आणी पाकीस्थान शी लढतील. स्वार्थाची पोळी भाजून झाली की झाले, कोणी मरो की जलो.... सांगा त्या ८३ विधवांना की आमच्या हातून काही चूक घडली ते... ह्यांना देश सांभाळता येत नाही म्हणूनच आज पर्यंत काश्मीर भारतात नाही आहे. देव ह्या देशाचे भला करो...
Thank you.
Your Comment will be published after Screening.
नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग

नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग

नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग
प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
सुकमा (जि. दंतेवाडा) - बस्तरच्या घनदाट जंगलातून जाताना रस्त्यात काय पेरलेले असेल, याचा नेम नाही. येथील प्रवास धोकादायक आहे. या प्रवासात वाटेत लाकडाचे ओंडके टाकून वाट अडविली तर..? या परिसरात येणाऱ्या कोणत्याही नवख्या माणसाच्या काळजाचा ठोकाच चुकेल; मात्र तो काही क्षणांसाठीच! कारण वाट अडविणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणींच्या उत्सवाचा तो एक भाग आहे. याला 'माटी तिहार' या नावाने येथे ओळखले जाते. दोन-चार रुपये दिले की ते वाट मोकळी करून देतात. पैसे दिले नाहीतर दगडफेकीला सामोरे जावे लागते. नक्षलवाद्यांच्या दहशतीची छाया असताना मात्र त्यांच्या उत्साहात तिळमात्र फरक पडलेला नाही.

चार दिवसांपूर्वी सुकमापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडमेटला जंगलात माओवाद्यांनी 76 केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या जवानांचा बळी घेतला. त्यानंतर या भागात "हाय अलर्ट' घोषित करण्यात आले आहे. रोजच मृत्यूला सामोरे जाणाऱ्या आदिवासींच्या लेखी या "अलर्ट'ला कवडीचीही किंमत नाही, ते आपल्याच मस्तीत जगत आहेत. येथील आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधन मुख्यत: शेती आणि शिकार आहे. शेतीत प्रामुख्याने गव्हाचे पीक घेतले जाते. आता हंगाम संपलेला आहे. त्यानंतर "माटी तिहार' या उत्सवाला सुरवात होते. सामूहिक शिकार करायची किंवा त्यांच्या भागातून जाणाऱ्या व्यक्तींची वाट अडवून त्यांच्याकडून पैशाच्या स्वरूपात "कर' वसूल करायचा. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून मौजमजा करायची, असे या उत्सवाचे एकूण स्वरूप आहे. या उत्सवाला प्राचीन अशी परंपरा आहे.

जंगलात आता केवळ आदिवासी शिल्लक आहेत. घनदाट जंगल असूनही चिटपाखरू दिसत नाही. त्यामुळे "सामूहिक शिकार' हा विषय आता मागे पडला. आदिवासी भागातून आता चांगले डांबरी रस्ते झाले आहेत. वर्दळीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर रस्त्यात ओंडके टाकून वाहने अडवून पैसे वसूल केले जातात. या कामात आदिवासींची मुले, तरुण-युवतींचा पुढाकार असतो. यावेळी ज्येष्ठ मंडळी मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात लपून असतात. वाहन थांबले की आदिवासी तरुणी वाहनांभोवती फेर धरून नाचतात. या भागातील आदिवासी मुळातच लाजाळू असल्यामुळे पैशाची मागणी स्वत: करीत नाहीत. जेवढे हातावर ठेवाल तेवढ्यात ते समाधान मानतात. पैसे दिले की रानफुले देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतात. मात्र, पैसे देण्यास नकार दिला की लपून असलेली आदिवासी ज्येष्ठ मंडळी वाहनावर दगडफेक करण्यासही मागेपुढे बघत नाही. पोलिसांनाही या भागातून जाताना पैसे द्यावे लागतात. जुन्या काळी राजाची वाट अडवून पैशाची मागणी केली जात होती. हा उत्सव शेतीचा हंगाम सुरू होईपर्यंतच असतो.

चहुबाजूंनी पोलिसांची गस्त आणि माओवाद्यांची छाया असताना त्यांच्या उत्सवाच्या उत्साहात काहीच फरक पडलेला नाही. या मार्गाने जाताना मात्र आदिवासींचे असे वेगळ्या प्रकारचे आदरातिथ्य मनावरील ताण हलका करण्यास हातभार लावते<

विश्रांतीसाठी नियमितपणे एकाच ठिकाणी येणे भोवले

प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
सुकमा (जि. दंतेवाडा, छत्तीसगड) - मोठ्या घातपातासाठी ओरिसा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षली एकत्र आले आहेत, या गुप्तचरांच्या सूचनेकडे केलेले दुर्लक्ष आणि विश्रांतीसाठी जंगलात सातत्याने एकाच ठिकाणाची केलेली निवड या दोन ठळक चुकांमुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 62 व्या बटालियनचे 76 जवान शहीद झाल्याचे बाब समोर आली आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 62 व्या बटालियनचे 82 जवान दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार ठाण्यात गत सहा महिन्यांपासून तैनात आहे. येथून 80 किलोमीटवर चितलनार आहे. रविवारी हे 82 जवान गस्तीवर निघाले होते. दोन दिवस गस्त घातल्यानंतर मंगळवारला ताडीमेटला या गावाच्या बाहेर विश्रांतीसाठी एकत्र आले. ज्या ठिकाणी हे एकत्र आले, ते खुले मैदान आहे. बाजूला दोनशे मीटर उंचीचे डोंगर आहे. या जवानांचे विश्रांतीचे हे नेहमीचेच ठिकाण होते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी सुनियोजितरीत्या काल मंगळवारला (ता. 6) डाव साधला. डोंगरावर दबा धरून बसलेल्या जवळपास तीनशे नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर चारही बाजूनी अंदाधुंद गोळीबार केला. पहाटे साडेचारच्या सुमारास जवान विश्रांती घेत असताना हा अचानक हल्ला झाला. जवांनाना सावरायलाही वेळ मिळाला नाही. काही जवानांच्या बंदुकाही त्यांच्यापासून दूर ठेवलेल्या होत्या, तर काहींनी "लॉक' करून ठेवल्या होत्या. त्यामुळे सुरवातीला जवानांकडून नक्षलवाद्यांचा प्रतिकार होऊ शकला नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक जवान काही वेळातच शहीद झाले. ज्यांनी स्वत:ला सावरत झाडाच्या मागे आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जवान झाडाच्या मागे आडोसा शोधतील, हे गृहीत धरूनच नक्षलवाद्यांनी आजूबाजूला प्रेशरबॉम्ब लावले होते. यामुळे बळींची संख्या आणखी वाढली. ग्रेनेड, हातबॉम्ब यासोबतच नक्षलवाद्यांनी तीरकमठ्यांनी बेसावध जवानांवर हल्ला चढविला.

काही जवानांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू असतानाच काही जवानांनी चिंतलनार आणि चिंतागुफा या पोलिस ठाण्यात वायरलेसवरून संपर्क साधला. त्यानंतर या जवानांच्या मदतीसाठी भूसुरुंगरोधक वाहन पाठविण्यात आले. मात्र, चकमक सुरू असलेल्या घटनास्थळापासून पाच किमी अंतरावर स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी हे वाहन उडविले. सुदैवाने यात केवळ चालक ठार झाला. दरम्यान, ताडीमेटला गावाजवळ जवानांना ठार केल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्रे लुटली. केवळ एके-47 रायफल्स पोलिसांच्या हाती लागली. काही जखमी जवान ठार झाले, असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने बोटावर मोजण्याइतके जवान या कारवाईत बचावले.

हालचालीचा सूक्ष्म अभ्यास
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या हालचालीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतरच नक्षलवाद्यांनी कारवाईचे नियोजन केल्याचे घटनाक्रमावरून स्पष्ट होते. जवान विश्रांतीसाठी एकच ठिकाणी थांबतात, या एकाच सूत्राचा आधार घेऊन नक्षलवाद्यांनी कारवाईची आखणी केली. जवान मोकळ्या मैदानावर थांबत असल्याने सभोवताल असलेल्या भौगोलिक स्थितीचा नक्षलवाद्यांनी पुरेपूर लाभ घेतला. कारवाई सुरू केल्यानंतर जवानांपर्यंत मदत पोहोचू नये, यासाठी घटनास्थळापर्यंत पोचणारे मार्ग खोदून ठेवण्यात आले होते तसेच भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले होते. पहाटे साडेचार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत घटनास्थळाच्या पाच किलोमीटरच्या परिसरावर संपूर्णपणे नक्षलवाद्यांचे नियंत्रण होते. नक्षलवाद्यांचा मोठा डाव यशस्वी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जवानाचा मृत्यू गस्तीवर असताना झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात जवान विश्रांती घेत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला. त्यामुळेच मोठी जीवितहानी झाल्याचे घटनास्थळाला भेट दिल्यानंतर स्पष्ट होते.

कालच्या भीषण हल्ल्यामुळे या भागात संतापाचे वातावरण असून, आज कोटा, दोरनापाल, सुषमा या भागात लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.

बस्तरमधील नक्षली घटना
14-15 मार्च 2008 - रानबोदली पोलिस कॅंपवर हल्ला - 55 जवान शहीद
9 जुलै 2008 - उत्पालमेटा पोलिस पथकावर हल्ला-22 जवान शहीद
9 मे 2009 - धमतरीरिसगाजवळ पोलिस पथकावर हल्ला- 12 जवान शहीद
11 जुलै 2009 - राजनांदगाव - मदनवाडा पोलिस मदत केंद्रावर हल्ला - 29 जवान शहीद
6 एप्रिल 2010 - ताडमेटला - सुरला जवानांवर हल्ला - 76 जवान शहीद संबंधित बातम्या
हल्ल्याचा सूत्रधार कटकम सुदर्शन?
नक्षलवाद्यांनी केली 76 जवानांची हत्या
अंगाला हळद लागण्यापूर्वीच हौतात्म्य
'सीआरपीएफ'ने केली पोलिस संरक्षणाची मागणी

प्रतिक्रिया
On 4/8/2010 1:40 PM Mihir said:
यात अटल मृत्यू होणार तो जंगल जपण्यार्या आदिवास्याचा.. आणि विजय होणार भांडवल-दरांचा.. हा प्रश्न फारच वेगळ्या पद्धतीने हाताळला पाहिजे.. या operation मध्ये आदिवासी एक तर मारल्या जातील, किवा भीतीने गाव सोडून शहरात पळतील आणि झोपडपट्टी करून राहतील... जे कि या मोठ्या companies ना हवय.. यात खरच कुणाचा विकास आहे का ?? असेल तर तो नक्कीच या मोठ्या विदेशी कंपन्या आणि इथल्या industrialist चा.....!!!!!!!
On 4/8/2010 1:34 PM Mihir said:
आताच्या घटनेत जे जवान मारले गेलेत , त्यांचे प्राण अमुल्यच आहेत , पण त्यांच्या वर झालेल्या या हल्ल्या मुळे इतर अधिकारी हाच विचार करणार.. कि या नक्षलवाद्यांना गावातल्या लोकांनी माहिती किवा मदत केली.. त्या मुळे निर्दोष आदिवास्यान बद्दल चीड निर्माण होऊन रागाने target केल्या जाणार. आणि दुसर्या बाजूस , जर जवानान कडून काही नक्षलवादी मारल्या गेलेत तर तेही या आदिवासी गवान वरच राग काढणार, या शंके ने कि तुम्हीच पोलीसा ना मदत केलीत.
On 4/8/2010 9:26 AM jaydeep said:
194 lives and counting... hopeless government still waiting for talks...