সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 05, 2014

रामाळा तलावात इकाॅर्नीया

   रामाला तलावास पुन्हा इकाॅर्निया चे ग्रहण 
रामाला तलाव स्वच्छता अभियानाची गरज

चंद्रपूरः शहरातील ऐतीहासीक रामाळा तलावात पुन्हा ‘इकाॅर्नीया’ वनस्पतीने थैमान घातले आहे. या वनस्पतीने पुन्हा संपुर्ण तलावाचा भाग व्यापलेला आहे. वर्ष 2009 प्रमाणे तलावाचे दुषीत पाणी सोडुन इकाॅर्नीया वनस्पतीपासुन तलाव मुक्त करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी जिल्हाधिकारी दिपक म्हैसेकर यांचेकडे एका निवेदनातुन केली आहे.
मागील काही वर्षात चंद्रपूरची अस्मिता असलेल्या रामाळा तलावात जल वनस्पतीने घर केले असुन, अत्यंत झपाटयाने वाढणाÚया या वनस्पतीमुळे रामाळा तलावाचे सौदर्य धोक्यात आले आहे तसेच प्रदुषणातही भर पडत आहे. यापुर्वी वर्ष 2009 मध्ये याचप्रकारे इकाॅर्निया वनस्पतीने रामाला तलाव पुर्णपणे व्यापलेला होता. इकाॅर्निया मुक्तीकरिता इको-प्रो संस्थेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येऊन तत्कालील जिल्हाधीकारी प्रदीप काळभोर यांना अभ्यासपुर्ण माहीतीचे निवेदन सुध्दा सादर करण्यात आले होते. या वनस्पतीचे दुष्परीणाम व पर्यावरणास घातक असल्याबाबतचे मुद्ये नमुद करण्यात आले होते. याअनुषंगाने वर्ष 2009 च्या उन्हाळयात जिल्हा व नगर प्रशासनाच्या मदतीने ‘रामाळा स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले होते. यावेळी संपुर्ण तलावाचे पाणी सोडुन देण्यात आले होते. तलाव सुकल्यानंतर इकाॅर्निया वनस्पती पुर्णपणे काढण्यात आली होती. या कार्यात विवीध संस्था-संघटना सोबत पोलीस विभाग व वन विभागाच्या प्रशिक्षणार्थीनी श्रमदानातुन वनस्पती काढण्यास सहकार्य केले होते. सोबतच जिल्हातील विवीध उदयोगांनी यांत्रीकी, मशीनरी पाठवुन सहकार्य केले होते.

संपुर्ण तलाव स्वच्छ झाल्यानंतर सदर वनस्पती परत वाढु नये म्हणुन वेळीच नियंत्रण ठेवण्याकरिता मच्छीमार सोसायटी व रामाळा उदयान यांस सुचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु, मागील 4-5 वर्षाच्या काळात याकडे संबधीत विभागाने सुध्दा दुर्लक्ष झाल्याने सदर इकाॅर्निया ची समस्या पुन्हा उभी झाली आहे. मागीलवेळेस प्रमाणे पावसाळयाच्या तोंडावर तलावाचे पाणी सोडुन उपाययोजना करण्यापेक्षा आतापासुन इकाॅर्निया निर्मुलनासाठी प्रयत्न करण्याकरिता तलावाचे पाणी सोडण्याची मागणी इको-प्रो ने केली आहे.

निवेदनातुन रामाला तलावात इकाॅर्निया वनस्पतीच्या वाढीमुळे तलावाचे सौदर्य लयास गेलेले आहे. तलावास पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे शहरातील सांडपाणी वाहुन नेणारा नाला आहे. हेच दुषीत पाणी या तलावात जमा होत असल्याने, सदर तलावात दुर्गधीयुक्त पाणी असुन यामुळे आरोग्याची सुध्दा समस्या निर्माण झालेली आहे. सदर दुषीत पाण्यामुळे मच्छरांची पैदास होऊन मलेरीयाची समस्या सुध्दा निर्माण होत आहे. इकाॅर्नियामुळे मासेमारीचा व्यवसाय सुध्दा बंद पडलेला आहे असे असले तरी, सदर तलावातील मासे सुध्दा खाण्यायोग्य नसल्याचे बोलले जात असल्याने ते प्रयोगशाळेत तपासुन त्याबाबत कार्यवाही करावी असे सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांना जिल्हाधीकारी यांनी प्रशासन सकारात्मक असुन त्या दिशेने पावले उचलण्यात येत असल्याचे सागीतले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.