সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 21, 2014

रेल्वे मालधक्क्यावरील कंत्राट रद्द करा

रेल्वे मालधक्क्यावरील कंत्राट रद्द करा

प्रहार संघटनेची मांगणी

चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर आलेले धान्याची पोती पाऊस सुरु असतांना जमिनीवर ठेवण्याचा प्रकार दि.१७ जून रोजी निर्देशनास आला. ओल्या धान्याची पोती गोदामात ठेवल्यानंतर हे धान्य सडते. गोर-गरिबांकरिता आलेले हे सडलेले धान्य चांगल्या धान्यात भेसळ करण्याचा गैरप्रकार यामुळे घडतो. या सर्व प्रकारासाठी धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदार जबाबदार असल्यामुळे सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मांगणी प्रहार संघटनेने केलेली आहे.

Tuesday, June 17, 2014

दहावीतही मुलींची बाजी.

दहावीतही मुलींची बाजी.

दहावीतही मुलींची बाजी. 
एकूण मुलींपैकी ९०.५५ टक्के तर 
मुलांमध्ये ८६. ४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.

कोल्हापूर- ९३.८३ टक्के,
औरंगाबाद- ८७.०६ टक्के,
नागपूर- ८२.९३ टक्के,
पुणे- ९२.३५ टक्के,
अमरावती - ८४.११ टक्के,
कोकण - ९५.५७ टक्के,
लातूर - ८१.६८ टक्के,
नाशिक - ८९.१५ टक्के
चंद्रपूरच्या प्लास्टिकमुक्तीसाठी सामाजिक संघटना सरसावल्या

चंद्रपूरच्या प्लास्टिकमुक्तीसाठी सामाजिक संघटना सरसावल्या

  • चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या प्लास्टिकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या चंद्रपुरातील सामाजिक संघटनांनी वर्षभर उपक्रम राबविण्यासाठी कंबर कसली आहे. याच उपक्रमातील पहिले पाऊल म्हणून काल १५ जूनला स्थानिक आयएमए सभागृहात पर्यावरण दिन पार पडला. त्यात लोकसहभागावर भर देवून महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाच्यावतीने या कामी पुढाकार घेण्याची तयारी उपस्थित लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी दर्शविली.

Sunday, June 08, 2014

रागाच्या भरात युवकाची आत्महत्या

रागाच्या भरात युवकाची आत्महत्या

वरोरा : पावना येथे राजू विनायक नन्नावरे असे या २५ वर्षीय युवकाने सासर्‍याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पेवरा (दिंदोडा) येथील रहिवासी असणारा राजू नन्नावरे पत्नीला घेऊन काही कारणास्तव सासरी (पावना) आला. परंतु आज दुपारच्या सुमारास त्याला त्याची पत्नी घरी आढळून आली नाही.

Wednesday, June 04, 2014

'वॉट्‌सअप' वर सायबर क्राइमची करडी नजर

'वॉट्‌सअप' वर सायबर क्राइमची करडी नजर


वॉट्‌सअप, फेसबुक, ट्विटर, ऑर्कूट, यू-ट्यूब इत्यादी सोशल नेटवर्किंगद्वारे अश्‍लील चित्रे, चित्रफीत, अश्‍लील संदेश किंवा आक्षेपार्ह मजकुराची देवाण-घेवाण केल्यास पोलिसांचा सायबर क्राइम विभाग तत्काळ कारवाई करणार आहे. सायबर क्राइमने असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रत्येक स्मार्टफोन धारकाच्या हालचालींवर सायबर क्राइमची करडी नजर आहे.

Tuesday, June 03, 2014

गोपीनाथ मुंडे यांचे  अपघाती निधन

गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन

श्रद्धांजली 


केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला दिल्लीत झालेल्या अपघातानंतर त्यांना आलेल्या हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले.