সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 01, 2014

सर्वस्व हरविले; १३७ कुटुंब आभाळाखाली



गडचांदूर: निसर्गाच्या प्रकोपाने गडचांदुरला आज शनिवारी जोरदार हादरा दिला. अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये काम करून आपल्या आयुष्याला आधार देवू पाहणार्‍या गरीबांचे संसार नियतीने आज चुटकीसरशी पायदळी तुडविले.तब्बल १३७ झोपड्यांना गिळून ही आग शमली असली तरी त्यानंतर सुरू झालेला गरीबांचा आक्रोश मात्र न थांबणारा आहे. 
दुपारी ४वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने अवघ्या काही वेळात सारी वस्ती आपल्या कवेत घेतली. 
आगीचा डोंब उसळला. नागरिक स्वत:चा जीव वाचवित मिळेल त्या वाटेने पळू लागले. महिला आपल्या चिल्यापिल्यांना घेवून घराबाहेर पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत प्राणहाणी झाली नसली तरी वित्तहाणी मात्र मोठय़ा प्रमाणावर झाली. 
एकीकडे वस्तीने पेट घेतला असताना घरातील सिलिंडर वाचविण्यासाठी काही लोक शर्तीचे प्रयत्न करीत होते. तर काही लोक याचा गैरफायदा घेत हातात मिळेल ती वस्तू घेवून पळत होते.
या संपूर्ण वस्तीत मजूरांची वास्तव्य आहे. घाम गाळून मिळविलेला पैसा आणि त्यातून तयार केलेले सोन्याचे दागिने या आगीत भस्मसात झाले. आयुष्याची पुंजी नियतीने हिरावली. त्याचे दु:ख काळजात घेवून या वस्तीतील माणसे आता सैरभैर झाली आहे. जगायचे कसे, राहायचे कुठे या यक्ष प्रश्नाने सारेच हादरुन गेले आहे. 
आज दुपारपर्यंत जी वस्ती डौलात उभी होती. ती क्षणार्धात उद्ध्वस्त झाली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.