সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, July 09, 2011

ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांचे निधन

निसर्गाने अन्याय केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलवणारे आणि त्यांच्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून जगण्याचे बळ देणारे थोर समाजसेवक मुरलीधर ऊर्फ बाबा आमटे यांच्या पत्नी ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांचे आज (शनिवार) दुपारी प्रदीर्घ आजाराने आनंदवन येथे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
शनिवारी चंदपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील 'आनंदवन' येथे निधन झाले. कृतिशील समाजसेवेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या थोर समाजव्रतीच्या महानिर्वाणाने वंचितांचा एक आधारवड लयास गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमटे यांच्यावर आनंदवनातच उपचार सुरू होते. शुक्रवारनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.  विकास व प्रकाश ही मुले, सुना भारती व मंदा, तसेच कौस्तुभ, दिगंत, अनिकेत व शीतल ही नातवंडे असा त्यांचा परिवार. सारेच डॉक्टर आणि सगळ्यांनीच बाबांचा समाजसेवाचा वसा घेतलेला. त्यासोबत आनंदवन (वरोरा), सोमनाथ (मूल-चंदपूर), अशोकवन (नागपूर), हेमलकसा आदी ठिकाणच्या विविध प्रकल्पांतील हजारो वंचित, व्याधित लोकांशी त्यांचे आतड्याचे नाते जुळलेले. या विशाल कुटुंबावर बाबांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
चंद्रपूर उद्या (रविवार) त्यांच्यावर आनंदवन येथे अंत्यसंस्कार होणार आहे,
गेल्या तीन महिन्यांपासून साधनाताई आजारी होत्या. त्यांच्यावर आनंदवन येथे उपचार सुरू होते. परंतु, आज (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे गेल्या kahi  दिवसांपासून साधनाताईंनी अन्नग्रहण करणे सोडले.  दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅंसर झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. 86 वर्षीय साधनाताईंच्या किडनीवर गतवर्षी सूज आल्याने त्यांना 29 एप्रिलला नागपूरच्या धंतोली येथील अवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर डॉ. श्रीखंडे व डॉ. एस. एम. पाटील यांनी उपचार केले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे त्यांना नऊ मे रोजी सुटी देण्यात आली. तेथून आनंदवनात परतल्यानंतर आनंदवनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ हे त्यांची देखरेख करीत.

""आज बाबा नसले तरी मंदाताई आणि कौस्तुभने आनंदवन छान सांभाळले आहे. बाबांच्या सुंदर समाधीपुढे जाताच सर्व श्रम गळून पडतात, नवी ऊर्जा मिळते. साधनाताई क्षीण झाल्या आहेत; परंतु त्यांच्या आठवणी तगड्या आहेत.'' 
_ medha patkar


Sadhana Amte, the wife of the late social worker Baba Amte, died on Saturday at Anandwan, near Warora in Chandrapur district. She was 85. She is survived by sons Dr Vikas, and Magsaysay Award winner Dr Prakash Amte. Family sources said that she was not keeping well for the last one month. Popularly known as Sadhana-`tai', she supported her husband actively when he started a rehabilitation colony for leprosy patients, `Anandwan', several decades ago. Her mortal remains would be laid to rest tomorrow morning at Anandwan, family sources said.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.