সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 28, 2011

'जलस्वराज्य'ला गैरव्यवहाराची गळती

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 28, 2011 AT 02:15 AM (IST)
Tags: jalswarajya project, corruption, chandrapur, vidarbha


चंद्रपूर - जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामांचा दर्जा आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहार, याबाबत नेहमीच साशंकता राहिली आहे. याच संशयाला पुष्टी देणारी घटना आता दोन वर्षांनंतर समोर आली असून, काम पूर्ण होण्याच्या आधीच कंत्राटदाराला लाखो रुपयांची रक्कम दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.  याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणात सामील तिघांवर शासकीय रकमेच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंदेवाही तालुक्‍यातील मौजा कळमगाव (तुकूम) येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामातील हा लाखो रुपयांचा गैरव्यवहार आहे. या प्रकरणात कंत्राटदार व मे. नारायणा इंटरप्रायजेसचे संचालक चेतन बजाज, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष संतोष रामदास चौके व सचिव बेबी अशोक मगरे यांच्यावर शासकीय निधीच्या अपहाराचा गुन्हा सिंदेवाही पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यातील चौके हे कळमगावचे (तुकूम) सरपंच आहे. या तिघांविरुद्ध खुद्द जलस्वराज्य प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच तक्रार दिली आहे.
कळमगाव येथे 2008 -2009 मध्ये जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले. या योजनेकरिता जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या योजनेची योग्यप्रकारे अंमलबजावणी तसेच नियमानुसार आर्थिक व्यवहार करण्याची जबाबदारी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची असते. कळमगावच्या या समितीचे अध्यक्ष सरपंच संतोष चौके व सचिव बेबी मगरे आहेत. योजनेचे अंदाजपत्रक 56 लाख 80 हजार 353 रुपयांचे होते. या कामाचे कंत्राट माहे फेब्रुवारी 2008 मध्ये वरोरा येथील मे. नारायण इंटरप्रायजेसचे संचालक चेतन बजाज यांना मिळाले. या कामात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जलस्वराज्य कार्यालयात प्राप्त झाल्यात.
त्यानंतर या पाणीपुरवठा योजनेच्या आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद प्रकल्प कार्यालयाने तपासला; तेव्हा त्यांनाच धक्काच बसला. पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झालेली नसताना कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम अदा करण्यात आलेली होती, असे निदर्शनास आले. संबंधित बातम्या

गैरव्यवहार झाला... मग बोलते व्हा!

तुमची प्रतिक्रिया लिहा


* Name: * Email: ---------------------------------------
* Comment: ---------------------------------------------

Thank you.
Your Comment will be published after Screening.





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.