সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 23, 2011

संरक्षित व्याघ्रप्रकल्पात जिप्सी 'विनापरवाना'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 23, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: security, tiger project, gypsy permission, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना "ताडोबा दर्शन' घडविणाऱ्या जिप्सी विनापरवाना असल्याची माहिती समोर आली आहे. यातही यातील बहुतेक वाहने आंधप्रदेशातील असून यातील बहुतेकांकडे पर्यटन परवानासुद्धा नाही. याच्या माध्यमातून शासनाचा महसूलही बुडविला जात आहे.
देशभर ख्याती असलेल्या ताडोबातील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना जंगलभ्रमंती सोयीची व्हावी म्हणून येथे 40 टुरिस्ट जिप्सी आहेत. स्थानिक आणि बाहेरच्या काही लोकांनी जिप्सी खरेदी करून आपला व्यवसाय सुरू केला आहे. यात आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून 9 ते 10 जिप्सी येथे आल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणताही पर्यटन परवाना नाही. परप्रांतातून आलेल्या वाहनांची हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्यात आलेले नाहीत. परिवहन खात्याचे नूतनीकरण झालेले प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही. 40 पैकी 36 जिप्सी खुल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे परवाना आणि कागदपत्रांचे नूतनीकरण नियमित होणे आवश्‍यक आहे. यातील अनेक वाहने सिलिंडरवर चालतात. प्रदूषणमुक्त असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा यातील बहुतेक वाहनांकडे नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे संरक्षित असलेल्या या व्याघ्र प्रकल्पात या वाहनांच्या रूपाने प्रदूषणाचा शिरकाव होत आहे.
येथे चालविण्यात येणाऱ्या सारस, सारई आणि ताडोबा रिसॉर्ट यांच्याकडेही जिप्सी आहेत. मात्र, त्यांच्याकडेही परिवहन खात्याचे पत्र नसल्याचे समजते. यासंदर्भात उपपरिवहन अधिकाऱ्यांनी दोनदा छापा टाकला होता. मात्र, छाप्याची चुणूक आधीच लागत असल्याने जिप्सीमालक आणि चालक सापडलेले नाही. दरम्यान, यानिमित्ताने स्थानिकांवर अन्याय होत आहे. ताडोबात स्थानिक मोहुर्ली आणि बाहेरील व्यक्तींच्या जिप्सी आहेत. परजिल्ह्यातील आणि आंध्रातील जिप्सीमालक इंटरनेटच्या माध्यमातून आधीच पर्यटकांची नोंदणी करून घेतात. त्यामुळे स्थानिक जिप्सीमालकांना पर्यटकच भेटत नाहीत. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जात आहे.

बांधवगड, कान्ह्यात निर्बंध
मध्यप्रदेशातील बांधवगड आणि कान्हा अभयारण्यात पर्यटकांना भ्रमंती करण्यासाठी असलेल्या जिप्सीची तपासणी करण्यात आली असून, एक जानेवारीपासून विनापरवाना फिरणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे जे बांधवगड आणि कान्हात झाले ते ताडोबात का नाही? असा सूर पर्यावरणप्रेमींमध्ये उमटत आहे.

जिप्सी वाहनांची तपासणी करण्यासाठी ताडोबाच्या क्षेत्र संचालकांना पत्र पाठविले आहे. जिप्सी असोसिएशनसोबत संयुक्‍त बैठक बोलाविण्यात येणार आहे. यावेळी सर्वांना ताकीद दिली जाईल.
- स्टिफन अल्वारिस आरटीओ संबंधित बातम्या


प्रतिक्रिया

On 23-01-2011 10:52 AM Santosh said:

नियम बाह्य जिप्सी वाहनांवर कडक कार्यवाही होणे गरजेचे आहे. परवाना व प्रदूषण माणकांचे निकष पूर्ण करणाऱ्या वाहनांनाच रीष्ट्रीय उद्यानात प्रवेश द्यायला हवा.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.