সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 12, 2011

संशोधकांनी शोधले महापाषाणयुगीन अवशेष

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 12, 2011 AT 01:39 PM (IST)
Tags: chandrapur, chimur, deccan, history, vidarbha
चंद्रपूर - चिमूर तालुक्‍यातील हिरापूर येथे पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी उत्खनन सुरू केले असून, येथे महापाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. यात दगडी शवपेट्या, अवजारं, बांगड्या आहेत. या संशोधनातून प्राचीन इतिहास उलगडण्याचा शक्‍यता आहे.
जिल्ह्यातील चिमूर तालुक्‍यात हिरापूर नावाचे छोटेसे गाव आहे. याच गावापासून काही अंतरावर माळरानावर दगडी झोपडी बांधलेली काही स्थानिकांना दिसली. याची माहिती डेक्कन कॉलेज पुण्याच्या इतिहास संशोधन विभागाला मिळाली होती. प्रा. कांतिकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाने येथे येऊन पाहणी केली. तेव्हा हा प्राचीन इतिहास पुढे आला. येथे उत्खनन सुरू करण्यात आले, तेव्हा चार दगडी शवपेट्या आढळून आल्या. सोबतच काचेच्या आणि तांब्याच्या बांगड्या, लोखंडी आणि दगडी अवजारे इथे आढळली. सोबतच भाजलेल्या मातीच्या विटाही आढळल्या. या विटा प्राचीन काळात वापरल्या जात असल्याचा हा मोठा पुरावा असून, तो पुरावा या उत्खननाच्या निमित्ताने सापडला. देशातील हे एकमेव उदाहरण आहे, जिथं या विटा सापडल्या. या ठिकाणी दोन स्वतंत्र खोल्या आहेत. त्यामध्ये उत्खनन केल्यावर दगडी शवपेट्या सापडल्या. मृत्यूनंतर प्रेत या दगडी पेटीत ठेवलं जायचं, असं संशोधक सांगतात. या शोधामुळे इतिहास संशोधनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा संशोधकांना आहे.
या उत्खननात डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. नव्या आणि अनोख्या इतिहासाची साक्ष येथे पटल्याने त्यांच्यातही उत्साह संचारला आहे. संशोधनाच्या दृष्टीनं अतिशय मौलिक असा हा शोध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणी ठरली आहे.
मध्यभारतात प्रथमच दगडी शवपेटीचे उत्खनन केले जात आहे. यात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास केला जाईल. यातून प्राचीन ठेवा आणि संस्कृतीची माहिती होईल.


- प्रा. कांतिकुमार पवार



प्रतिक्रिया

Chintu said:

मिलिंद साहेब, खरा बोला तुम्ही असा काळा धंदा केला असेल, म्हणून तुम्हाला माहित आहे काय होणार आहे. थोडा तरी विचारून बोला, सकाळ ने हि खूप छान बातमी दिली आहे. सकाळ चा अभिनंदन.

Milind Arge said:
सापडलेल्या बांगड्या नक्की पितळेच्या आहे का नाहीतर सोन्याच्या सापडून पितळेच्या सापडल्या आसे सांगण्यात येईल आणि देशाची संपत्ती काळ्या नजरेआड लुतारूच्या घशात जाईल.

Suhas said:

Very Good

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.