काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 05, 2018

रेल्वेच्या धडकेत उंटाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत उंटाचा मृत्यू

चंद्रपुर/प्रतिनिधी:
गोंदिया वरून चंद्रपुर जाणाऱ्या गोंदिया-बल्लारशाह रेल्वेच्या धडकेत सिंदेवाही समोरील- राजोली मार्गावरील मध्यंतरी रेल्वे रूळ परिसरात उंट रेल्वेच्या समोर आल्याने रेल्वेच्या धडकेने उंटाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना ही सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. रेल्वेचा वेग जास्त असल्याने त्याला वाचविणे शक्य नव्हते.या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रवाशांच्या मदतीने मृत उंटाला रूळावरून बाजूला सारण्यात आले. प्रवाशासह रेल्वेने प्रवासाचा पुढचा प्रवास गाठला. घटनेतील मृत पावलेला उंट कुणाचा आहे हे अद्यापही कळू शकले नाही.सध्या राजस्थान येथून शेळया वाले महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आले आहेत,त्यांच्यासोबत काही उंट देखील आहेत,त्यांच्याच पैकी असलेला हा उंट असला पाहिजे अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.

जि.प.अध्यक्षांचा जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

जि.प.अध्यक्षांचा जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

विद्यार्थ्यांना दिले वृक्षरोपण व संवर्धनाचे धडे;वृक्ष माझा सांगाती एक अभिनव उपक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
लहान मुल ही देवा घरची फुले असे म्हणतात. शाळेतील बालगोपाळांवर सुध्दा शालेय जीवनापासून वृक्षाचे महत्त्व पटवून दिल्यास उद्याची वृक्षसंवर्धन करणारी संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वच्छता व वृक्षदिंडीसह जिवती तालुक्यात भ्रमंती करतांना, जिवती तालुक्यातील चिखली या गावातील शालेय विद्यार्थ्यांशी हितगुज करून वृक्षाचे आपल्या जिवनात काय महत्त्व आहे हे पटवून देण्यात आले. 
जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांचा वृक्षारोपण मोहिमेत शाश्वत सहभाग वाढावा व खऱ्या अर्थाने वृक्षाची जोपासणा व्हावी यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून ̎̎वृक्ष माझा सांगाती ̎̎ हा अभिनव उपक्रम राबवित असून, या उपक्रमाद्वारा शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करून एक वृक्ष चार वर्षाकरीता दत्तक म्हणून जबाबदारी दिल्या जाणार आहे. यासह प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा वृक्षाचे निरीक्षण करून, वृक्षाची होणारी वाढ या विषयाच्या नोंदी चार वर्षाच्या रिपोर्ट कार्ड मध्ये नोंदवायच्या आहे. या विशेष उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कार्यानूभव या विषयात पाच गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 
भावी पिढीला पर्यावरण पुरक वातावरण निर्माण करण्याकरीता आजचा शालेय विद्यार्थी वृक्षसंवर्धन मोहिमेतील महत्त्वाचा घटक आहे. माणसाच्या जन्मापासून तर जिवनाच्या शेवटच्या घटकापर्यंत वृक्ष कसा साथ देतो या विषयी विविध उदाहरणांचे दाखले देत अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्हयात स्वच्छता व वृक्षलागवडीच्या वातावरण निर्मीती करीता जिल्हा परिषद अध्यक्ष गावा-गावात जावून विविधांगी मार्गाने ग्रामस्थानांना वृक्षलागवडी विषयीची विनंती करीत आहेत. जिवती तालुक्यात दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी स्वच्छता व वृक्षदिंडीसह महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ. अर्चना जिवताडे, जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकाने, सुरेश केंद्रे, पोंभूर्णा पंचायत समितीचे सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, July 04, 2018

महावितरण मीटर्सची उपलब्धता करणार वेबसाईटवर

महावितरण मीटर्सची उपलब्धता करणार वेबसाईटवर

वीज मीटर साठी इमेज परिणामचंद्रपूर /प्रतिनिधी:
महावितरणने सर्व वर्गवारीतील संभाव्य वीजग्राहकांना मीटर्सची उपलब्धता आता महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वर्गवारीतील ग्राहकांना लागणाऱ्या मीटर्सच्या उपलब्धतेबाबत उपविभागीय कार्यालयापर्यन्त समावेश करण्यात आला आहे. 
महावितरणचा कारभार लोकाभिमूख आणि पारदर्शी व्हावा यासाठी महावितरणच्या सोयी सुविधांची माहिती वीजग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून संभाव्य ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वर्गवारीतील मीटर्सबाबतची उपलब्धता महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोणत्याही ग्राहकाला नवीन विद्युतपुरवठा हवा असल्यास त्यासाठी लागणाऱ्या मीटर्सबाबतची सद्यस्थिती ते घरबसल्या महावितरणच्या वेबसाईटवर बघू शकणार आहेत. 
महावितरणच्या वेबसाईटवर शाखा कार्यालयांपर्यन्त मीटर्सबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे येथून पुढे आता ग्राहकांना मीटर्स नाहीत या सबबीखाली त्यांची गैरसोय होणार नाही. मीटरच्या पुरवठ्याबाबत व सद्यस्थितीबाबत ते स्वत: महावितरणच्या वेबसाईटला भेट देऊन मीटर्सच्या उपलब्धतेबाबत खातरजमा करू शकणार आहेत. त्यामुळे मीटर्सच्या उपलब्धतेबाबत आता कोण्त्याही संबंधित अधिकाऱ्याला टाळाटाळ करता येणार नाही. महावितरणच्या टोलफी क्र. 1800 102 3435 व 1800 233 3435 यावर संभाव्य वीजग्राहक नवीन वीजपुरवठा, त्वरित जोडणीकरिता किंवा नादुरुस्त मीटर बदलणेकरिता संपर्क साधू शकतात. 
मीटर्सच्या उपलब्ध्‍तेबाबत माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्याने महावितरणने ग्राहकाभिमूख सोयीकरिता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

चंद्रपुरात हत्येचा थरार;एकाची धारदार शस्त्राने हत्या

चंद्रपुरात हत्येचा थरार;एकाची धारदार शस्त्राने हत्या

हत्या साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळील ढाब्या जवळ एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.  प्रवीण पेंडाने राहणार नेहरू नगर  असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ५ ते ६ युवक लोहारा गावातील एका धाब्यावर पार्टी करण्याकरिता आले होते.हे सर्व दारूच्या नशेत होते आणि काही क्षुल्लक कारणांवरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले.व त्यात एकावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली, वृत्तलिहित परियंत मृतकाचे नाव कळू शकले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शव आपल्या ताब्यात घेऊन शव शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक दीपक गोतमारे करीत आहेत.


ए.टी.एम कार्ड बदलवुन खातेदाराची फसवणूक गुन्हा दाखल

ए.टी.एम कार्ड बदलवुन खातेदाराची फसवणूक गुन्हा दाखल

रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):
शहरातील गांधी चौक येथिल स्टेट बॅक अाॅफ इंडीया येथे खातेदार लोकेश शरणागंत रा. डोंगरी हा ए.टी.एम.मध्ये दिनांक ०३ /०७/२०१८ दुपारी १२ वाजताच्या सुमारास पैसे काढण्याकरीता गेला असता त्यांला अपरिचित युवकांनी त्यांचा ए.टी.एम कार्ड बदल केला. सदर आरोपी हे ए.टी.एम. सी.सी.टी.व्ही कॅमेरा कैद झाले अाहे . जाभंळा शर्ट घातलेला व त्यांचे मागे निळे पांढरे पट्टे
असलेला शर्ट घातलेल्या मजबूत बांधा असलेली अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे ए.टी.एम कार्ड बदलुन त्यास चुकीचे ए.टी.एम.कार्ड देऊन फीर्यादीचा अकाउंट मधुन १५०००/- रू.काढुन फसवणूक केली. फिर्यादी लोकेश शरणागंत यांचा तक्रारी वरुन अज्ञात अारोपी विरोधात पोलीस स्टेशन येथे कलम ४२० भा.द.वी. अन्वेय गुन्हा दाखल करण्यात अाला असुन पुढिल तपास पी. आय. दिपक वंजारी करीत आहे.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी ४ ऑगस्ट पर्यंत नांव नोंदणी करण्याचे आवाहन

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी ४ ऑगस्ट पर्यंत नांव नोंदणी करण्याचे आवाहन

कामगार साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतीनिधी:
 बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणा-या कामगारांची नोंद घेऊन त्यांना अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत 21 प्रकारचे काम करणा-या कामगारांना या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील 6 जिल्हयाची निवड करण्यात आली होती. दुस-या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्हयाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हयाचा समावेश करण्यात आला असून या जिल्हयातील स्त्री, पुरुष सर्व कामगारांची नोंदणी करण्याकरीता विशेष नोंदणी अभियान 4 जुलै ते 3 ऑगष्ट 2018 या कालावधीत जिल्हयात राबविण्यात येत आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्हयात बहुउदेशीस समाज मंदीर व डॉ.कल्लुरवार हॉस्पीटल समाज भवन बल्लारपूर, मेजर स्टोर गेट दुर्गापूर, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी इमारत बंगाली कॅम्प चंद्रपूर व एकोरी वार्ड श्री.टॉकीज चौक चंद्रपूर या ठिकाणी नाव नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले. त्यामुळे जिल्हयातील सर्व विविध क्षेत्रात काम करणा-या कामगारांनी आपल्या नावांची नोंद करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त उ.सु.लोया यांनी केले आहे.
शासनाने 18 ऑगष्ट 2017 च्या अधिसुचनेव्दारे समावेश होणारे खालील कामगार यामध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामध्ये दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे, लादी किंवा स्टाईल कापणे, पॉलीश करणे, रंग, वारनीश लावणे, सुतारकाम करणे, गटार व नळ जोडणी, वायरींग, वितरण तावदान बसविने इत्यादी विद्युत कामे, अग्नीशमन यंत्रणा बसविने, दुरुस्ती करणे, वातानुकुलीत यंत्रणा बसविणे व दुरुस्ती करणे, उदवाहने, स्वयंचलीत जिणे बसविणे, सुरक्षा दरवाजे उपकरणे बसविणे, माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे किंवा बसस्थानक, सिंग्नल यंत्रणा इत्यादी 21 प्रकारचे बांधकाम करणा-या कामगारांची नोंद करण्यात येणार आहे. 
या 21 प्रकारच्या कामात कार्यरत असलेल्या किंवा मागील वर्षात 90 दिवसापेक्षा अधिक दिवस काम केलेल्या कामगारांची नोंदणी 4 जुलै ते 3 ऑगष्ट 2018 कालवधीत जिल्हयातील प्रत्येक महापालिका, नगरपालिका, ग्राम पंचायत क्षेत्राच्या ठिकाणी तसेच प्रत्यक्षात कामगार काम करीत असलेल्या ठिकाणावर विशेष शिबीर आयोजित करुन नाव नोंदणी करणे व त्यांना ओळखपत्र वाटप करणे असा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या शिबीरामध्ये शासनाने नियुक्त केलेले नोंदणी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून पात्र कामगारांची नोंदणी करणे व त्याच वेळी डाटाएन्ट्री करुन रेकार्ड तयार करणे अशी कामे करणार आहेत.
ज्या कामगारांची नाव नोंदणी झालेली आहे, अशा कामगारांना विविध प्रकारचे लाभ व कल्याणकारी योजना लागू करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गीक प्रसुतीसाठी 15 हजार व शस्त्रक्रीयेसाठी 20 हजार आर्थिक सहाय्य, 2 पाल्यास इयत्ता 1 ते 7 साठी प्रतीवर्षी 2500 रुपये तर 8 वी 10 वीसाठी प्रतीवर्षी 5 हजार एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य, 10 वी 12 वी मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त झाल्यास 10 हजार प्रोत्साहनात्मक रक्कम, तर 11 वी 12 वीच्या शिक्षणासाठी प्रतीवर्षी 10 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य, पदवीच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतीवर्षी 20 हजार रुपये, व्यवसायीक व वैद्यकीय शैक्षणिक साहित्यासाठी प्रती वर्षी 60 हजार तर शैक्षणिक सहाय्यासाठी 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी 20 हजार तर पदवीत्युतर शिक्षणासाठी 25 हजार रुपयाचे सहाय्य करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या विविध 19 बाबीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदनी पात्र कामगारांना लाभ देण्यात येत आहे. 
त्यामुळे जिल्हयातील पात्र स्त्री, पुरुष कामगारांनी या महिनाभर सुरु असलेल्या अभियाना दरम्यान नियोजित केंद्रावर आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून स्वत:ची नोंदणी करुन कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्वत: व आपल्या कुटुंबीयांना मिळवून देण्यासाठी शासनाच्या या महत्वाकांशी प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूरचे सहायक कामगार आयुक्त उ.सु.लोया यांनी केले आहे.

सापाचा कोंबडीशी पंगा;कोब्रा सापाने गिळले कोंबडीचे 9 अंडे

सापाचा कोंबडीशी पंगा;कोब्रा सापाने गिळले कोंबडीचे 9 अंडे

चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात एका सापाने पिल्ले फोडण्यासाठी बसविलेल्या 2 कोंबड्यांशी पंगा घेत चक्क कोंबड्यांची 9 अंडी गिळल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील मरेगाव येथे ही घटना बघायला मिळाली.
कोब्रा सापाने उबविण्यासाठी बसलेल्या दोन कोंबड्यांना दंश करून ठार केले आणि कोंबड्या उबवत असलेली टोपलीतील चक्क नऊ अंडी त्याने एका पाठोपाठ एक गिळली. 9 अंडी गाळप केल्यानंतर हा साप सुस्त अवस्थेत तिथेच होता. या संपूर्ण प्रकारची माहाती सर्पमित्रांना देण्यात आली . मुल नागपूर मार्गावरील शामराव चुधरी यांच्या घरी हा संपूर्ण प्रकार बघायला मिळाला.विशेष म्हणजे हि अंडी साप बाहेर काढतांना उपस्थित लहानग्या मुलांना कुतूळ वाटत हेते व ते गीळलेल्या अंड्यांची सख्या साप बाहेर काढत असतांना मोजत होते.या घटनेची वार्ता परिसरात पसरता बरोबरच बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी बघायला मिळाली.



Tuesday, July 03, 2018

 नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

dead body found in nagpur mla hostelनागपूर/प्रतिनिधी:
राज्य विधीमंडळाचं नागपूर इथं होणाऱ्या पावसाळी अधिवेशन एक दिवसावर असतानाच येथील आमदार निवास भवनात एक मृतदेह आढळून आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले.मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्ती ही मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव यांची स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचं सांगितलं जातं. विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणी पोलिसअधिक तपास करीत आहेत.

पशुसंगोपन कार्यशाळेला ग्रामवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पशुसंगोपन कार्यशाळेला ग्रामवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकरी तथा बेरोजगार युवकांना शेतीपूरक जोडधंद्याच्या माध्यमातून आर्थीकरित्या सक्षम करण्यासाठी स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने वेंडली येथे आयोजीत केलेल्या चार दिवसीय पशुसंगोपन अभियानाला बेरोगार व शेतक-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत तीन दिवसात जवळपास 380 मुलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे. गुरुवारी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे. 
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकरी संकटात सापडत असतो. यातून मार्ग काढत त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून या तीन दिवसात शास्त्रोक्त शेळीपालन व्यवसाय, कुक्कुटपाल व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारला दुग्ध व्यवसाया बाबत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. शहरात दुध, शेळी, मासे, यांची मोठी मागणी आहें. ही मागणी पुर्ण करण्यासाठी बाहेर राज्यातून मासे आणि शेळ्या चंद्रपूरात पुरवील्या जातात ही बाब लक्षात घेता शहराला लागुन असलेल्या ग्रामीण भागात शेती पूरक जोडधंदे केल्यास येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो तसेच येथील बेरोजगार युवकांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळू शकतो या उद्देशाने स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आणि किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने या चार दिवसीय पशुसंगोपन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून दत्ता इंस्टियुट ऑफ कृषी तंत्रज्ञान व पशुसंगोपन संवर्धन प्रशिक्षण विभाग नागपुर येथील तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.


 महा मेट्रो:हिंगणा मार्गावर(रिच – ३) मेट्रोचे ६५ टक्के कार्य पूर्ण

महा मेट्रो:हिंगणा मार्गावर(रिच – ३) मेट्रोचे ६५ टक्के कार्य पूर्ण

नागपूर/प्रतिनिधी:
शहरात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गिकांवर मेट्रो प्रकल्पाचे वेगाने कार्य पूर्ण होत आहे. ज्याप्रमाणे वर्धा मार्गावरिल रिच-१ कॉरिडोरचे कार्य पूर्ण केले जात आहे त्याचप्रमाणे हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे कार्य वेगाने पूर्ण होताना दिसत आहे. याठिकाणी कार्याचा आढावा घेतला असता ६५ टक्क्याहुन अधिक कार्य आतापर्यंत पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर पर्यंत अश्या १०.३ किमीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन प्रस्तावित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एमआयडीसीमुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणारच. सध्या याठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. या भागात मेट्रोच्या कार्याला नागरिकांचा देखील उत्तम सहकार्य याठिकाणी महा मेट्रोला मिळत आहे.

महावितरणने एचव्हीडीएस योजनेतील 804 कोटींच्या कामांच्या मागविल्या निविदा

महावितरणने एचव्हीडीएस योजनेतील 804 कोटींच्या कामांच्या मागविल्या निविदा

नागपूर/प्रतिनिधी:
विदर्भातील 50 हजारावर कृषीपंपांना उच्चदाबाचा शाश्वत वीजपुरवठा मिळण्याची प्रक्रीया सुरु झाली असून
शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) तील कामांची ऑनलाईन निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. सुमारे 804 कोटी रुपयांच्या कामांच्या या पारदर्शी निविदा प्रक्रीयेतून विदर्भातील तब्बल 50 हजार 365 कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीजजोडणीची प्रक्रीया सुरु झाली आहे.
या योजने अंतर्गत यापुढे एका वितरण रोहीत्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतक-यांची आता कायमची सुटका होणार आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात सुमारे 804 कोटी रुपये मुल्याच्या विविध कामांची निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली असून या योजनेसाठी लागणा-या वितरण रोहीत्रांची खरेदीची निविदा प्रक्रीया महावितरण मुख्यालयाकडून यापुर्वीच सुरु करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत 31 मार्च 2017 पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती या अनुषंगाने राज्यस्तरावर सर्व्हेक्षण करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली. यानुसार महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात 31 मार्च 2017 सोबतच 31 मार्च 2018 पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतक-यांसह नव्याने मागणी करणा-या ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या 65 व 100 केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून 20 ते 25 कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. सोबतच आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वीजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे.
या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलाने निविदा प्रक्रीया सुरु केली आहे.
‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेमध्ये विदर्भातील अकराही सुमारे 804 कोटीच्या विविध कामांची 231 पारदर्शक निविदांमार्फ़त ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली असून यात विदर्भातील तब्बल 50 हजार 365 कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्याचे उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आले असून या योजनेतील कामे जलदगतीने पुर्ण व्हावीत यासाठी उपविभागनिहाय कामांची आखणी करण्यात येऊन त्यानुसारच विविदा प्रक्रीया राबविण्यात येत आहे. या योजनेत अकोला जिल्ह्यासाठी 132 कोटी 45 लाख, बुलढाणा जिल्ह्यासाठी सुमारे 127 कोटी 16 लाख, यवतमाळ 107 कोटी 87 लाख, वाशिम जिल्ह्यासाठी 99 कोटी 5 लाख, अमरावती 87 कोटी, नागपूर 58 कोटी 78 लाख, चंद्रपूर 55 कोटी 22 लाख, भंडारा 49 कोटी 22 लाख, वर्धा 35 कोटी 76 लाख, गोंदीया 32 कोटी 54 लाख तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

उच्चदाब वितरण तंत्र

या तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होल्टेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मर्यादीत ठेवत शेतकर्-यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. शेतकर्-यांना थेट वितरण रोहित्रावरून वीज दिली जाणार असल्याने वीज हानी रोखण्यास मदत मिळणार असून, कृषी पंपांनाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

वृक्षसंवर्धनाचा विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहचवा - देवराव भोंगळे

वृक्षसंवर्धनाचा विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहचवा - देवराव भोंगळे

चंद्रपूर (प्रतिनिधी):
बदलते ऋतूचक्राचा विचार केल्यास पर्यावरणाचा मोठया प्रमाणात ऱ्हासहोत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेत तर, वृक्षरोपण व संवर्धन हे सर्वांनी करण्यासाठी वृक्षसंवर्धनाचाविचार प्रत्येकाच्या मना पर्यंत पोहचवा. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्वच्छता ववृक्षदिंडीच्या गावस्तरीय सभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.स्वच्छता व वृक्षदिंडी पाचव्या दिवशी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, इटोली तर राजुरातालुक्यातील चुनाळा व विहिरगाव या गावात जावून जनजागरण सभा घेण्यात आली. या सभेला मार्गदर्शक म्हणूनजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्थ व बांधकाम सभापती संतोषतंगडपल्लीवार उपस्थित होते. दिंडीचे स्वागत प्रत्येक गावात वरूण राजाच्या आगमनापासून होत असून, भरपावसात देखील स्वच्छता व वृक्षदिंडीला ग्रामस्थांना मोठया स्वरूपात प्रतिसाद मिळत आहे. बल्लारपूर तालुक्यातवृक्षदिंडीचे स्वागत ग्रामस्थांनी मोठया उत्साहात साजरे करून दिंडीद्वारा ग्रामस्था समवेत रॅली काढून अध्यक्ष देवरावभोंगळे सर्व ग्रामस्थांना वृक्षरोप करण्याची विनंती करीत होते. यानुसार स्वच्छता व वृक्षदिंडीला इतरही गावांमध्येअसाच वाढता प्रतिसाद मिळत असून जिल्हयात उदिदष्टा पेक्षा अधिक वृक्षरोपन होण्याची संकेत प्रत्येक गावातमिळत आहे. वृक्षसंवर्धनासाठी छोटया पासून मोठया पर्यंत सर्वच ग्रामस्थ स्वत:हून समोर येत आहे. अध्यक्ष देवरावभोंगळे गावा-गावात स्वत: हजर राहून रॅली, सभा, बैठका घेवून स्वच्छता व वृक्षलागवड व सवंर्धनाचे महत्त्वग्रामस्थांना पटवून सांगताना दिसत आहे.
बल्लारपूर तालुक्यात स्वच्छता व वृक्षदिंडीचे स्वागत पंचायत समिती बल्लारपूरच्या सभापती गोविंदा पोडे
यांनी केले. यावेळी गट विकास अधिकारी श्वेता यादव, उपसभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्य हरिश
गेडाम, वैशाली बुददलवार, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर मदगिरवार, विद्या गेडाम, नांदगाव पोडे ग्रामपंचायत
सरपंच प्रमोद देठे व उपसरपंच मल्लेश कोठारी उपस्थित होते.राजुरा तालुक्यात स्वच्छता व वृक्षदिंडीचे स्वागत राजुरा पंचायत समितीच्या सभापती कुंदाताई जेणेकरयांनी केले. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, गट विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, जिल्हा परिषदसदस्य नलगे, पंचायत समिती सदस्य मानुसमारे उपस्थित होते.
वृक्ष लागवड प्रसिध्दी मोहिमेसाठी‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’चॅनल

वृक्ष लागवड प्रसिध्दी मोहिमेसाठी‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’चॅनल

नागपूर/प्रतिनिधी:
 वृक्ष लागवड मोहिमेचे लघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप तसेच वृक्षारोपणाबाबत तयार केलेल्या चित्रफित प्रत्येक नागरिकांना पाहता यावी, यासाठी वन विभागाच्या वतीने यु-ट्यूब या संकेतस्थळावर ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरु केले आहे. 
शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिक हरित महाराष्ट्र चळवळीत सहभागी होऊन वनसंपदा वाढविण्यास सहकार्य करीत आहे. व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती जनमाणसापर्यत पोहोचविण्यासाठी वनविभागाव्दारे ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरु केले आहे.www.mahaforest.nic.in या संकेत स्थळावर नागरिक राज्यातील विविध भागात होत असलेल्या वृक्ष लागवड अभियानाची माहिती घेऊ शकतील.
हरित महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती वृक्षारोपणासंबंधी लघुचित्रपट, माहितीपट,व्हिडीओgreentube.mfd@gmail.com या मेलव्दारे गुगल ड्राईव्हवर पाठवू शकतात. नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अपर आयुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.