काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 03, 2018

भीमा कोरेगाव घटनेचा चंद्रपुर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

भीमा कोरेगाव घटनेचा चंद्रपुर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

जिल्हाभरातील भीमसैनिक उतरले रस्त्यावर
Image may contain: 17 people, people smiling, people standing, crowd and outdoor
चंद्रपूर/प्रतिनिधी:
सोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते.ज्यांनतर भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद आज राज्यभरा सह चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, बल्लारशा,नागभीड,वरोरा, चिमूर, जिवती सिंदेवाही , राजुरा सह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तसेच गावात देखील उमटले.चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर तसेच मूल गडचिरोली मार्ग, चंद्रपूर नागपूर मार्ग, चंद्रपूर बल्लारशा मार्गावर ठिकठिकाणी टायर जाळून मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी सरकार विरोधात नारेबाजी केली. 

चंद्रपूर - शहरात सकाळपासूनच भीमसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करत शहरातील अनेक ठिकाणी मोर्चे काढून टायर जाळत निषेध केला तसेच जटपुरा गेट परिसरात  पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा पुतळा जाळण्यात आला. तसेच स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांचे जनसंपर्क कार्यालय आंदोलकांनी फोडले स्थानिक गंज वॉर्डात असलेल्या कार्यालयावर आंदोलकानी हल्लाबोल केला. शहरातील बाबुपेठ, जुनोना चौक, जटपुरा गेट, बंगाली कॅम्प, रामनगर, बागला चौकात भीमसैनिकांनी एकत्रित येत सरकार विरोधात नारेबाजी केली.

सिंदेवाही - भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज सिन्देवाही तालुका बंदचे आयोजन केले होते. सकाळपासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले  होते तर सिन्देवाही बसस्थानकावर आलेल्या सर्व बसेस बसस्थानकावर जमा करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी ऑटो, कालीपीली गाडी इत्यादी साधने बंद करुन वाहतुक ठप्प केलेली आहे. या सर्व घडामोडीवर सिन्देवाही पोलीस कडक पहारा देत अाहेत।
दुपारी १ वाजता बुद्धविहारापासुन हा  निषेध मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील ३० ते ४० गावातील नागरीक मोर्च्यामध्ये सहभागी होत आहेत.

पोंभुर्णा - शौर्य दिनि  मानवंदना कार्यक्रमात गेलेल्या बांधवांवर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ पोंभुर्णा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळ पासूनच पोंभुरणात शुकशुकाट पसरला आहे,बस सेवा,दुकाने,शाळा ,महाविद्यालये बंद ठेवण्यात आली .
पोंभुर्णातील भारतीय बौद्ध महासभाचे पोंभुर्णा तालुका अध्यक्ष ऍडोकेट रणजित खोब्रागडे ,भारिप बहुजन महासंघ चे अध्यक्ष थेरकर,महासचिव उराडे ,जेष्ठ नागरिक गिरिधर शिंह बैस व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रॅली चे नियोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढली व तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे शांततेत जाऊन तहशीलदारांना निवेदन देण्यात आले .
कुठेच अनुचित प्रकार ,जाळपोळ,घडले नाही.

ब्रम्हपुरी -  भिमाकोरेगाव घटनेच्या निषेधार्थ ब्रम्हपुरी शहरात कडकडित बंद पाळन्यात आला असून ब्रम्हपुरी शहरातील संपूर्ण शाळा महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली त्याच प्रमाणे ब्रम्हपुरी शहरातील व्यापार पेठ पूर्ण रित्या बंद होती यात वस्ती विभाग,व इतरही विभागातील व्यापाऱ्यानी बंद ला पूर्ण पाठीम्बा जाहिर केला यासोबतच बंद चा परिणाम ब्रम्हपुरी शहरातील शासकीय व निमशासकिय कार्यालयावरही जांणवला यादरम्यांन ब्रम्हपुरी शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसले.महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी शहरातील   डॉ.बाबासाहेब आबेडकर स्मारक परिसरात हजारों आंबेडकरी अनुयायी तसेच आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ घोषणा देवून रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेची उपस्थिति होती.ब्रम्हपुरी बंदच्या यशस्वी करण्यासाठी येथील अनेक सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले ब्रम्हपुरी बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ब्रम्हपुर पोलिस विभागानी उत्कृष्ट सहकार्य केले व सायंकाळी उशिरा पर्यन्त बंद पाळ न्यात आला.

बल्लारपूर - घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात बंद पाळन्यात आला. भिमाकोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बल्लारपुर शहरात कडकडित बंद पाळन्यात आला असून बल्लारपुर शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली त्याच प्रमाणे बल्लारपुर शहरातील व्यापार पेठ पूर्ण रित्या बंद होती यात डेपो विभाग, वस्ती विभाग, व इतरही विभागातील व्यापाऱ्यानी बंद ला पूर्ण पाठीम्बा जाहिर केला यासोबतच बंद चा परिणाम बल्लारपुर शहरातील शासकीय व निमशासकिय कार्यालयावरही जांणवला यादरम्यांन बल्लारपुर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसले. महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर बल्लारपुर शहरातील नगर परिषद समोरील डॉ. बाबासाहेब आबेडकर स्मारक परिसरात हजारों आंबेडकरी अनुयायी तसेच आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ घोषणा देवून रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेची उपस्थिति होती. बल्लारपुर बंदच्या यशस्वी करण्यासाठी बल्लारपुर शहरातील मा. राजू झोड़े, मा पवन भगत, प्रशांत झामरे, नरेन्द्र सोनारकर, पवन मेश्राम विशाल डुम्बेरे, बाळकुणाल आमटे, प्रा. वासुदेव कांबळे, प्रा महेन्द्र बेताल, प्रा मिलिंद जाभूळकर, अड़ मिलिंद भसारकर, अड़ विशाल मून ई चे सहकार्य लाभले बल्लारपुर बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बल्लारपुर पोलिस विभागानी उत्कृष्ट सहकार्य केले व सायंकाळी उशिरा पर्यन्त बंद पाळ न्यात आला.

सावली - हल्याच्या निषेदार्थ सावली सर्वत्र कळकळीत बंद ठेवण्यात आले आहे. सावली शहरातील विविध पक्ष संघटनांनी व बौद्ध समाज सावलीच्या वतीने १ जानेवारी २०१८ ला भिमा कोरेगाव येथे समाज बांधवांवर जो हल्ला करण्यात आला त्याचा निषेध म्हणून देशभरासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीतही संपूर्ण दुकाने, मार्केटलाईन बंद ठेवण्यात आले. बंद दरम्यान कोणतेही चुक होऊ नये म्हणुन सावली पोलीस निरीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उपनिरीक्षक, शेख व उपनिरीक्षक चिंचुलकर यांच्या नेतृत्वात सावली पोलीस सर्वत्र काटोकाट बंदोबस्त ठेवण्यात आला. 
     तसेच बी एस पी,  बी आर एस पी, भा रि प बहुजन महासंघ आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी अश्या विविध पक्षाकडून स्थानिकांना पाठिंबा दर्शवुन बंद ठेवण्यात आले.

चिमूर- भिमा कोरेगाव दंगल व जाळपोळ प्रकरणी,महाराष्ट्र बंदच्या हाकेला दाद देत,चिमुर तालुक्यात सुद्धा बंदला मजबूत प्रतिसाद मिळाला. 
चिमुरात विविध आंबेडकर व ईतर संघटनेच्या माध्यामातून,भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी मोर्च्या काढण्यात आला व हा मोर्च्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.उपविभागीय अधिकारी चिमुर यांना दिलेल्या निवेदनात,भिमा कोरेगाव दंगल व जाळपोळ प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदने,मा.महामहिम राष्ट्रपती,मा.प्रधानमंत्री,महाराष्ट्र राज्याचे मा.महामहिम राज्यपाल, मा. मुख्यमंत्री यांना पाठवीण्यात आली आहेत.
चंद्रपूर-जुनोना-बल्लारपूर बायपास मार्गावर रसांदोलनकर्त्यांनी रस्ता धरला रोकुन त्यामुलेले जवळपास १ तास परिसरात  निर्माण झाले होते   
चंद्रपूर शहरात ठिकठिकाणी टायरची जाळपोड करून रस्ता वाहतूक केली बंद  


सावरकर चौक  चंद्रपूर येथे आंदोलनकर्त्यांनी  केली गर्दी
टायर  जाळून  केला निषेध 





वरोरा:बंदचा फटका शालेली विद्यार्थ्यांना देखील बसला जिल्ह्यातील वरोरा शहरातील बस स्थानकावर रोज पेक्षा बस ५ तास उशिरा आल्याने विद्यार्थी टांगणीला आले होते बस येताच विद्यार्थ्यांनी जागा मिळविण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती   






भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज सिन्देवाही तालुका बंदचे आयोजन केले होते. सकाळपासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले  होते





Image may contain: 1 person, outdoor
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात देखील टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला 
Image may contain: 10 people, crowd and outdoor
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चंद्रपूर येथे आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मढीमध बसून आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्यांची
चांगलीच गर्दी बघायला मिळाली 
Image may contain: 6 people, people standing, crowd and outdoor
वरोरा: कोरेगांव- भीमाच्या विजयादिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचाराचे आज वरोरा येथे पडसाद उमटले. काही आंदोलकांनी नागपूर - चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ सिन्देवाही तालुका बंदचे आयोजन केले होते. सकाळपासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले  होते, चौक येथे आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला 
ताडोबा रोडच्या नामातंराविरोधात महापौरानां निवेदन

ताडोबा रोडच्या नामातंराविरोधात महापौरानां निवेदन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर ते ताडोबा या राज्य माहामार्गाचे चंद्रपूर महानगरपालीकेच्या वतीने नव्याने नामांतर केले जात आहे. महानगरपालीका चंद्रपूर ने तसा ठराव पारीत केला आहे. आणि  ४ जानेवारी ला सकाळी एक समारंभ घेवनू या मार्गाचे निर्मला माता असे नामकरणक केले जाणार आहे, तशा निमंत्रन पत्रिका शहरात वाटल्या गेल्या आहेत. पण चंद्रपूर ते ताडोबा हा रोड जगप्रसिध्द रोड आहे. ताडोबाला जाणारे सर्व पर्यटक याच मार्गावरून जातात. एकीकडे ताडोबा हा जागतिक दर्जाचा पर्यटन केंद्र व्हावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर  सारख्या लोकांना ताडोबाचे ब्रॉडींग करण्यासाठी बोलावले  जात असतांना दुसरीकडे ताडोबा रोड चे नामकरण निर्मला माता रोड असे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे चंद्रपूरातील तुकूम परिसरातील नागरीक, शहरातील पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी आज चंद्रपूर च्या महापौर अंजली घोटेकर यांची भेट घेवनू त्यांना एक निवेदन देण्यात आले. चंद्रपूर ते ताडोबा रोड अत्यंत महत्वाचा आहे, हा राज्य महामार्ग असल्याने त्याचे नामकरण महापालकेला करता येते काय? ताडोबा इतका महत्वाचा असल्याने त्याचे पुन्हा नव्याने नामकरण करायची गरज आहे काय? आणि करायचे असेल तर  धार्मीक वा संप्रदायाचे नांव देणे उचीत नाही, असे निवेदनकर्त्या लोकांचे म्हणने होते.
महापौर अंजली घोटेकर यांनी याबद्दल मला काही माहिती नव्हती याशिवाय आमदार, पालकमंत्री  तसेच गृहराज्यमंत्री यांना सुध्दा याबाबत काहीच माहिती नाही असे सांगितले  तसेच महानगरपालीकेची एक विशेष बैठक घेवनू हा ठराव रद्द करू आणि सामान्य नागरीकांना जे नांव माहिती आहे ते ताडोबा रोड हे नावच या रोडला दिले जाईल. असे महापौर यांनी सांगितले.शिष्टमंडळात प्रा. सुरेश  चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, प्रमोद काकडे, मझहर अली, सूर्यभान  झाडे,अंकुश दाते, अनिल चिताडे, अशोक चिताडे, संजय चिताडे, रामकृष्ण बेलवे, संजय चांदेकर, डॉ. विद्याताई बांगडे यांचा समावेश  होता. 
 
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ashutosh salil साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 भिमा कोरेगाव येथील सोमवारच्या घटनेनंतर जिल्हयात कुठेही अनुचित घटना घडू नये , यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे .
       जिल्हयात या घटनेनंतर पोलीसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे .जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये . आवश्यक तेथे पोलीस प्रशासनाला मदत करावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे . काही संघटनांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे .आपल्या मागण्या संविधानिक मार्गाने शासनापर्यत पोहचवण्यास शासन तत्पर आहे . त्यामुळे बंद काळात सार्वजनिक वाहन व्यवस्था व मालमत्तेचे नुकसान होणार नाही , याबाबत काळजी घ्यावी , सहकार्य करावे , असे आवाहनही त्यांनी केले आहे .
अफवा पसरविणाऱ्यांवर  सायबर सेलची नजर  सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून समाजजीवन बिघडवणाऱ्या समाजकंटाकांवर जिल्हयातील सायबर सेलचे लक्ष असून कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .व्हाटस अॅप ग्रुपवरून चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले गेले असून जनतेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत करण्याचे आवाहन केले आहे .
माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांचे निधन

माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांचे निधन

नागपूर: ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, म्हाडाचे सदस्य व वेगळ््या विदर्भाचा पुरस्कार करणारे अग्रणी नेते मधुकरराव किंमतकर यांचे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना ३० डिसेंबरपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. ते ८६ वर्षांचे होते.
  • रामटेक येथे १० आॅगस्ट १९३२ साली त्यांचा जन्म झाला. १९८० मध्ये त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव साठे, अ‍ॅड. मुरलीधर भंडारे यांच्या पुढाकाराने काँग्रेस (आय) चे तिकीट मिळाले आणि ते त्या निवडणुकीत विजयी झाले. वेगळ््या विदर्भाची मागणी १९८० पासूनच त्यांनी लावून धरली होती. 
  • १९८२ साली बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मंत्री म्हणून समावेश झाला. वित्त व नियोजन, कामगार, विधी व न्याय या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. म्हाडाच्या अध्यक्षपदीही त्यांची १९९२ साली नेमणूक करण्यात आली. विदर्भ वैधानिक महामंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • रामटेक परिसरातील नागरिकांची सेवा करण्याचा त्यांचा वसा अखेरपर्यंत कायम होता. अलीकडेच त्यांना रामटेक भूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
जिल्हास्तरीय चाचा नेहरु बालोत्सवाचे उद्‌घाटन

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बालोत्सवाचे उद्‌घाटन

चंद्रपूर : येथील जिल्हा स्टेडियमवर जिल्हा महिला व बालविकास विभागाअंतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय बालोत्सवाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. ढोले उपस्थित होते. सुरवातीला महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी बालोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. पापळकर यांनी जिल्ह्यातील बालगृहातील लाभार्थ्यांना तसेच सहभाग घेतलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. सर्वांनी कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घ्यावा असे आवाहन करीत, स्पर्धा जिंकून प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस मिळाले, त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी आशितोष सलील यांनी विविध खेळांत सहभाग घेण्याकरिता आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संचालन उज्वला पोईनकर यांनी केले, तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल यांनी मानले.
सरकारी जागेत केले रस्ता बांधकाम

सरकारी जागेत केले रस्ता बांधकाम

सरपंच योगीता गायकवाड यांचेवर भ्रष्टाचार आरोप

रामटेक /तालुका प्रतिनिधी-ग्रामपंचायत सितलवाडी(परसोडा) च्या सरपंच कु.योगिता गायकवाड यांनी खाजगी भुखंड मालकास लाभ पोहचविण्याच्या हेतूने जिल्हा परिषदेच्या च्या मालकीच्या जागेतून रस्ता बांधकाम करून गैरप्रकार केल्याचा आरोप या ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद चंद्रभान सावरकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी व सितलवाडी येथील नागरीक बलवंतराव माकोडे यांनी नागपुरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना लेखी तक्रार केली आहे.
रामटेक तालुक्यांतील सितलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील,मौजा सितलवाडी प.ह.नंबर 38 येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जनपद कार्यकाळातील शासकीय जागा सर्व्हे नंबर 86,एकूण अराजी 2.74 हेक्टर आर असून ही जागा जनपद सभा कार्यालय व रामटेक विकास सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था ,रामटेक यांचे नावे सातबारावर नमूद आहे.ही जागा रामटेक -मनसर या महामार्गालगत आहे.या जागेला लागुण मागच्या बाजुला शेतजमीनी विकत घेऊन काही ले-आउट पाडण्यांत आले आहेत .मात्र रामटेक -मनसर या मुख्य मार्गाला पोचमार्ग नसल्याने या ले-आउटमधील भूखंड मागील सुमारे 15 वर्षा पासून विकले जात नव्हते.
सन 2003 ते 2008 या काळांत येथे उपसरपंच असलेल्या उदयसिंग यादव यांनी या लेआउट मालकांना शासकीय जागेतून पोचरस्ता देण्यास विरोध केला होता.यासाठी त्यांना काही रक्कमही त्यांनी देऊ केली होती. मात्र शासनाच्या जागेतून असा नियमबाहय रस्ता देण्यात येणार नाही असे यादव यांनी ठणकावून सांगीतले होते .त्या नंत रच्या काळा ंत धर्म राज राहाटे सरपंच झालेत त्यांच्या कार्यकाळातही अशा च प्रकारचा प्रयत्न झाला मात्र त्यांनीही असा रस्ता करण्यास स्पष्ट नकार दिला होता.मात्र सध्याच्या सरपंच योगीता गायकवाड यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत या शासकीय जागेतून तेही ग्रामपंचायतच्या निधीतून व जागेचे मालक असलेल्या जिल्हा परिषदेची कुठलीही परवानगी न घेता लेआउट धारकांना फायदा पोहचविण्यासाठी रस्ता तयार करून दिला.व यासाठी मोठी आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप ग्राम.पंचायतसदस्य विनोद सावरकर यांनी उपरोक्त तक्रारीत केला आहे.काही ग्रामपंचायत सदस्यांनाही यात लक्ष्मीदर्शन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.शासकीय जागा व शासअसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सितलवाडी व परसोडा येथे अनेक ले आउट आहेत.मोठी लोकवस्ती असलेल्या लेआउटमधे मागील सुमारे 25 वर्षापासून रस्ते व नाल्यांची सोय नाही.विकास कामे ठप्प पडली आहेत.
भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड

भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड


 चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपुरात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु असतांनाच काही आंदोलनकर्त्यांनी चंद्रपूरचे भाजपचे आमदार नाना शामकुळे यांच्या गंजवॉर्ड स्थित कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असल्याची ताजी बातमी हाती येत आहे .जवळपास ४० त्यांच्या कार्यालयाकडे आले यात २० महिला व २० युवकांचा समावेश होता. काल भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.या आंदोलनाने चंद्रपुरात हिंसक वळण घेत येथील आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.यात तेथे राहणाऱ्या शहरातील प्रसिद्ध व्यापारी सारडा यांच्या गाडीच्या काचा  देखील फोडण्यात आल्या. तोडफोड सुरु असतांना मात्र आमदार नाना शामकुळे आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते , (सविस्तर वृत्त काही वेळातच )


Tuesday, January 02, 2018

चौगान कृषक विध्यालय येथे स्नेह संमेलन

चौगान कृषक विध्यालय येथे स्नेह संमेलन

ब्रम्हपुरी /तालुका ग्रामीण प्रतिनिधी :/

चौगान येथील कृषक विध्यालय तथा उच्च माध्य.विध्यालयात नवीन वर्षानिमित्त  स्नेह संमेलन व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाला.
  स्नेह संमेलन व व्यवसाय शिबिराच्या उद्घाटीका सौ. प्रणालीताई मैँद सभापती पं.स.ब्रम्हपुरी तर अध्यक्षस्थानी श्री.वा.कृ.ठेंगरे अध्यक्ष टिचर्स करीयर एज्युकेशन सोसायटी चौगान यांच्या उपस्थितीत पार पडला तर प्रमुख उपस्थितित नासिर शेख संपादक  ""ऊँची उड़ान"" वडसा, सौ.दीपाली मेश्राम जी.प.सदस्या चंद्रपूर,वि.ह.भागडकर सचिव टी.क.एज्यु.सो. चौगान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
 या कार्यक्रमात शालेय क्रीडा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा, बचाव स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्थाक्षर स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, पाककला स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा ,  वैयक्तिक नृत्य स्पर्धा व विविध स्पर्धा घेण्यात आल्या.क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच  विध्यार्थ्यान संस्काराची गरज असते.बुद्धी वृदिंगत करण्यासाठी समाज, पालक, शिक्षक यांची भूमिका महत्वाची असणे आवश्यक आहे तेव्हाच भविष्यात आपल्या विकास घडवू शकतील एक जरी घटक कमी झाला तर ज्ञानार्जनासाठी बुद्धी विकास खूंटला जाईल असे प्रतिपादन सौ. मैँद मँडम यानी व्यक्त केले.
या कार्यक्रमात कु.साक्षी मडावी व कु.अवंती बनपूरकर यांचे समूह नृत्य या कार्यक्रमाच विशेष आकर्षण ठरले.आकाश बुराडे, आयुष मदन मैँद व वैभव मैँद हे उदयोन्मुक वक्ते तयार झाले.त्यांच्या धाडस वक्तृत्वशैलीमुळे सर्वांच्या मनाला पाझर फोडले.मा.श्री.श्रीकांत बुराडे संचालक स्पार्क स्पर्धा परीक्षा नागपूर, संदीप धोटे स्पार्क अकॅडमी नागपूर यांच्या या विविध स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातुन व्यवसाय शिबिर घेण्यात आला.अशा विविध स्पर्धेतून विध्यार्थ्याँचे जीवन फुलत असते असे मत ना.सी.जुम्मन शेख यानी केले.संस्थेचे संस्थापक
संस्थेचे व्यवस्थापक कै.अण्णाजी गीरमकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून यु .के.प्रधान उपाध्यक्ष टी.क .एज्यु.सोसायटी चौगान यांचे अध्यक्षतेखाली व श्री.अनंता बोबडे जिल्हाधिकारी चंद्रपुर , सौ .सवीताताई नन्नावरे सरपंच ग्रा.पं.चौगान , यांचे प्रमुख उपस्थितीत विजेत्या  स्पर्धकाना  बक्षीस वितरण सोहळा पार पाडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.गोपालजी भानारकर मुख्याध्यापक कृषक विध्यालय चौगान बेहेकार सर व सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी  यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाच संचालन श्री .महादेव सहारे शिक्षक तर सर्व प्रमुख मान्यवरांच  आभार  श्री.प्रमोद मैँद प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम यानी मानले.
ब्रम्हपुरी येथे बुथ प्रमुख अभ्यास वर्ग

ब्रम्हपुरी येथे बुथ प्रमुख अभ्यास वर्ग

ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण प्रतिनिधी :-
    आज दि.२/१२/२०१८ ला स्थानीक लोकमान्य टिळक वाचनालय ब्रम्हपुरी येथे भारतीय जनता पार्टी तालुक्यातील १०८ बुथ प्रमुखांचा अभ्यास वर्ग घेण्यात आला. या अभ्यास वर्गाला प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी विधासभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर,तसेच तालुका अध्यक्ष नानाजी तुपट, चंद्रपूर जिल्ह्याचे ओ. बी.सी.सेल चे अध्यक्ष प्रा.प्रकाशजी बगमारे,विधानसभा प्रमुख शेख सर,भाजपा नगर अध्यक्ष जगदिशजी तलमले,भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे,ब्रम्हपुरी प.स. सभापती सौ.प्रणालीताई मैद,उपसभापती विलासजी उरकुडे व मुख्यमंत्री वार रूम मुंबई चे सदस्य निकेश कुकडे मंचावर उपस्थित होते.या वर्गाचे संचालन मा.रामलालजी दोनाडकर तालुका अध्यक्ष भाजयुमो यांनी केले तर प्रास्ताविक शेख सरांनी करताना बुथ प्रमुखाचे महत्त्व व त्यांच्यावर असलेल्या जवाबदारी बद्दल समजावून सांगितले,तसेच प्रा.प्रकाशजी बगमारे यांनी भारतीय जनता पार्टी ची पार्श्वभूमी व इतिहास जनसंघा पासून ते भाजपा पर्यंत चा इतिहास समजावून सांगत बुथ विस्तारावर भर दिला,तसेच निकेशजी कुकडे यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजने अंतर्गत राबवत असलेल्या महाविस्तार अभियानात बुथ प्रमुखांच्या कार्यप्रणाली बद्दल विस्तृत माहिती दिली व बिजेपी महाआप्स बद्दल समजावून सांगितले,तसेच मा.अतुलभाऊ देशकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व बुथ प्रमुखाचे मनोबल वाढविताना २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी साठी कशा पद्धतीने बुथ प्रमुख महत्वपूर्ण ठरेल यावर भर दिला.या कार्यक्रमाचे आभार मा.मनोजजी भुपाल शहर महामंत्री तथा नगरसेवक न.प. ब्रम्हपुरी यांनी मानले.
 निषेधार्थ तीन तारखेला कन्हान बंदची हाक

निषेधार्थ तीन तारखेला कन्हान बंदची हाक

  • भीमा कोरेगाव सणसवाडीतील घटनेचा कन्हान येथे निषेध


पारशिवणी/ तालुका प्रतिनिधी ::
सोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते.ज्यांनतर भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभरा सह कन्हान येथे देखील उमटले.कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे  बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर शहरातील समाजबांधवांनी एकत्रित येऊन
कोरेगाव येथील घटनेचा निषेध करत नारेबाजी केली दर्यम्यान शहरातील राष्ट्रीय महामार्गावर देखील ठिय्या मांडून वाहतुक प्रभावित करण्यात आली निषेधाला विद्रोहाचा चेहरा येऊ नये म्हणून कन्हान पोलीस स्टेशन चे ठाणेदार काळे यांनी आपल्या पोलिसांच्या ताफ्या सह मोर्चे कऱ्यांन कडे कूच केली.या वेळी शहर भरातून रोष व्यक्त करत आक्रमक्तेने कोरेगाव दगड फेकीचा निषेध दाखविला तर आंदोलकांनी ठाणेदार काळे यांना हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करन्या संदर्भात निवेदन दिले या नंतर अस काही होऊ नये या संदर्भाची हाक शासना पर्यँत पोचवण्याची मनीष भिवगड़े, अखिलेश मेश्राम,बाळा मेश्राम,निखिल बागड़े,स्वप्निल नितनवरे,मैयुर पौनिकर,आशीष बागड़े,अभिजीत शेंडे, चंचलेश यादव,सोनू मेश्राम,अल्पेश पौनिकर,आर्यन शेंडे मागणी केली.सोबत ता ३ ला संपूर्ण कन्हान बंद ची हाक देखील देण्यात आलेली आहे.
न.प.करवाढीच्या निर्णयाने सत्ताधा-यांचा खरा चेहरा उघड

न.प.करवाढीच्या निर्णयाने सत्ताधा-यांचा खरा चेहरा उघड

  • सत्तेत येण्यपुर्वी करवाढ न करण्याचे दिले होते आष्वासन

  •  सत्तेत येताच आष्वासनाचा विसर पडला,ठराव घेण्याचे टाळले

रामटेक/ तालुका प्रतिनिधी-रामटेक नगरपालीकेने षासनाच्या करनिर्धारणाच्या संबधीत प्रक्रियेतील अनिवार्य असलेले कलम 119(1) अन्वये दिली जाणारी नोटीस मालमत्ताधारकांना न देता रामटेकरांवर लादलेली नियमबाहय करवाढ अन्याय्य असल्याने व ही करवाढ केल्याने रामटेकच्या जनतेवर अतिरीक्त 80 लक्ष रूपयांचा बोजा येणार असल्याने रामटेक नगरपालीकेने तसा ठराव करावा. रामटेकच्या जनतेला निवडणूक काळांत दिलेले आष्वासन पाळावे व दिलासा द्यावा असे आवाहन करदाता संघर्श समीतीचे संयोजक अष्विन ठाकुर यांनी नगराध्यक्ष दिलीप देषमुख यांना दिलेल्या निवेदनांतून केले आहे. न.प.करवाढीच्या निर्णयाने सत्ताधाÚयांचा खरा चेहरा उघड झाला असुन त्यांना सत्तेत येण्यापुर्वी करवाढ न करण्याच्या आष्वासनाचा विसर पडला असून असा ठराव घेण्याचे सौजन्यही नगराध्यक्ष व सत्तापक्षाने पाळला नसल्याचा आरोप ठाकूर यांनी बातमीदारांषी बोलतांना केला.
सत्तेत येताच आष्वासनाचा विसर सत्तापक्षाला पडला. वर्शभराचा कालावधी होवूनही तसा ठराव न करणे ही
रामटेकच्या जनतेषी बेईमानी करण्यासारखे असल्याचेही ठाकूर म्हणाले.असा ठराव 31/12/2017 पुर्वी करणे व तसे पत्र नागपुरच्या जिल्हाधिकारी यांना दिले असते तर रामटेकच्या जनतेवरील अन्याय्य करवाढ रोकता आली असती मात्र तसे करण्यात आलेले नाही. ठराव तर सोडा साधे पत्रही नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांना पाठविले नाही. रामटेक भाजपाचे षहराध्यक्ष आनंदराव चोपकर यांनी आमदारांना याबाबत पत्र दिल्याने आमदारांनी पुढाकार घेत नियमबाहय पद्धतीने करण्यात आलेल्या करवाढीस मान्यता देवू नये असे पत्र जिल्हाधिकारी नागपुर यांना दिले मात्र जिल्हाधिकारी यांनी आमदार रेड्डी यांच्या उपरोक्त पत्राला केराची टोपली दाखविली हे विषेश. करवाढ होवू नये यासाठी रामटेकच्या जनतेने उत्स्र्फुपणे बंद पाळला होता.
करनिर्धारण हे नियमाने झाले पाहीजे व वाजवी झाले पाहीजे.कोणाची किती करवाढ झाली याबाबत रामटेकच्या मालमत्ताधारकांना कलम 119(1) अन्वये नोटीस न देणे म्हणजे मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार असल्याचा ठपकाही संघर्श समीतीने ठेवला व विद्यमान सत्ताधारी हे केवळ खुच्र्या उबविण्यासाठी नगरपालीकेत गेले आहेत काय?असा सवाल उपस्थित केला आहे. करवाढ करावी मात्र वाजवी व नियमानुसार,मालमत्ताधारकांना त्यांचे म्हणने मांडण्याची संधी देणे अतिषय गरजेचे आहे व तसा कायदाही आहे.मात्र कायदा न पाळता करवाढ खपवून घेतली जाणार नाही असा ईषाराही ठाकूर यांनी दिला आहे.
भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज चंद्रपूर येथे सर्वपक्षीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन हि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक झाल्याने भिमा कोरेगाव गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास १५० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी केलेल्या गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलित समाज जातो. मात्र या कालावधीत दलित समाजातील बांधवांवर कधीच हल्ला कोणी केला नाही की त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये एका परदेशी प्रसार माध्यमातील वेबसाईटने भिमा कोरेगांवच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसिध्द केली. ही बातमी मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पहिल्यांदाच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
      अचानक दुपारी एकच्या दरम्यान भिमा कोरेगाव जवळच्या पार्किंग भागात दगडफेकीला सुरूवात झाली. इमारतीच्या गच्चीवरून समाजकंटक दगडफेक करून पळून जात होते त्यांना काही महिलाही अटकाव करण्यात पुढे आल्या की ते लोक लपुन पळून जात हीच स्थिती वढू गावातही होती. या घटनेत अनेक निष्पापांचा बळी गेला तसेच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या करिता सर्वपक्षीयांनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन हि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
लिंगभेदावरून कामाची समानता नाकारणाऱ्या वनविभागाच्या मुख्य वनसरंक्षकांसह संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार

लिंगभेदावरून कामाची समानता नाकारणाऱ्या वनविभागाच्या मुख्य वनसरंक्षकांसह संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडसोबत लिंगभेद करून कामाची समानता नाकारणाऱ्या मुख्य वनसरंक्षकांसह उपवनसंरक्षक व आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यप्राणी संरक्षण समिती अध्यक्षाविरुद्ध महिला गाईडने दूर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली. सदर मुख्य वनसंरक्षकांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही तक्रारीत केली आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.
कामाच्या ठिकाणी महिला-पुरूष असा भेदभाव करता येत नाही. भारतीय संविधानाचे अनुच्छेद १४ नुसार लिंगभेद करता येत नाही. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडना काम देताना महिला-पुरूष असा भेदभाव करून कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही तक्रारीतून केली आहे.

यापूर्वीच केली होती तक्रार...
महिला गाईड म्हणून काम करताना या कामात आधीपासून असलेल्या पुरूष गाईडनी महिला गाईडना सन्मानाची व समानतेची वागणूक दिली नाही. या महिलांचा अपमान होईल, अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी बोलणे व वागणे सुरू केले.
याबाबत त्याचवेळी भद्रावती पोलिसात तक्रार केली होती. तत्कालीन ठाणेदार यांनी याची दखल घेत पुरुष गाईडना याबाबत तंबी दिली होती. तरीही महिला गाईडना पुरूष गाईडसारखी वागणूक व कामे न दिल्याने या असमानतेबाबत १९ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्य वनसरंक्षक कार्यालयाला लेखी पत्र दिले आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वारंवार या कार्यालयाशी व उपसंचालक (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
उपसंचालक मानकर यांनी याबाबीची गंभीर दखल घेत असल्याचे सांगून आश्वस्त केले होते व पुरूष गाईडप्रमाणेच महिला गाईडनाही कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही, अशी माहिती अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिली.

श्रमिक एल्गारचे धरणे...
या प्रकाराच्या विरोधात महिलांनी सोमवारी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. महिला-पुरूष असा गैरकायदेशीर भेदभाव दूर करण्याबाबत श्रमिक एल्गारने वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अधिकाऱ्यांनी या महिलांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणणे सुरू केल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले. आंतराष्ट्रीय दर्जाच्या व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड असल्याचा अभिमान वनविभागाला असायला हवा होता. मात्र या महिलांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचा या महिलांचा आरोप आहे. धरणे आंदोलनात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार तसेच महासचिव घनश्याम मेश्राम व महिला गाईड सहभागी झाले होते.