कामठीतील अवैध कत्तलखाणा हटण्यिात यावा
कामठी : शहरात सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण असून, रोज सायंकाळी पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे कामठीतील नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील अवैध कत्तलखाणा हटण्यिात यावा, या मागणीला घेऊन पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष प्रा. मनीष वाजपेयी यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी सात वाजता शहरातील नागरिकांनी हा घेराव केला. कत्तलखाण्यात होणारी मोठ्या जनावरांची कत्तल थांबवावी, कत्तलखाना शहराबाहेर हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश कंतेवार, पोलिस निरिक्षक सतीश गोवेकर, यांना नागरिकांनी जाब विचारून मागणी रेटून धरली.