সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 03, 2014

विद्यार्थांची भूक वरण-भातावरच

ग्रामीण भागात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने घरगुती आहारासह निवासी आश्रमशाळांतून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून भाजीपाला गायब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थांची भूक वरण-भातावरच भागात आहे.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सुधारित शासकीय परिपत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांना दररोज भाजीपालायुक्त आहार शिजवून देणे गरजेचे आहे. शासकीय परिपत्रकामध्ये भाजीपाल्यात पालक, मेथी, टमाटर, आलू, हिरवा वाटाणा, घेवडा, तोंडले, गाजर व कोबी यापैकी स्थानिक उपलब्धतेनुसार दररोजच्या आहारात भाज्यांचा समावेश करायचा आहे. परंतु, महाग झालेल्या भाजीपाल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या घरचे आर्थिक बजेट बिघडले आहेत. हिंगणा तालुक्‍यात खासगी आश्रमशाळांचे प्रमाण जास्त असल्याने शेकडो दलित आदिवासी व भटक्‍या जमातीच्या गोरगरिबांची मुले या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. शासनाकडून संचालकांना प्रतिविद्यार्थी 900 ते 1000 रुपये मिळतात. परंतु, त्यामानाने तेथील विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन दिले जात आहे. पालकांनी मोठ्या विश्‍वासाने आपल्या पाल्यांना चांगले भोजन व दर्जेदार शिक्षण मिळणार या अपेक्षेने निवासी आश्रमशाळेत पाठविलेले आहे. या मुलांना आठवड्यातून एकदा मटणसुद्धा नियमानुसार देणे गरजेचे आहे. दूध, केळी, चहा, चांगला नाश्‍ता फक्त कागदावरच बघायला मिळतो. प्रत्यक्षात यांना साखर नसलेला काळा चहा दिला जात आहे.
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हे पोषण नसून कुपोषण असल्याची जाणीव होत आहे; आणि त्यामुळेच त्यांचे "मिशन कमिशन' जोरात सुरू आहे. शालेय पोषण आहारात सोमवार व गुरुवारी भाजीपालायुक्त वरण किंवा आमटी देणे आवश्‍यक आहे. बुधवार आणि शुक्रवारी भातासोबत भाजीपालायुक्त हरभऱ्याची उसळ, मंगळवार आणि शनिवारी वाटाणा उसळ देण्याची तरतूद आहे. मात्र, भाजीपाला महाग झाल्याने शासकीय पत्रकातील "भाजीपालायुक्त' हा शब्दच गायब झाला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.