সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 31, 2014

वन-वन्यजिवांच्या सुरक्षावर संकट

वनरक्षक-वनपाल बेमुदत संपावर वनमंत्र्यानी तोडगा काढावा-बंडु धोतरे
                        बेमुदत संपामुळे विदर्भातील वन-वन्यजिवांच्या सुरक्षावर संकट

चंद्रपुरः महाराष्ट्र राज्य वनरक्षक व वनपाल संघटना व्दारे वेतनवृध्दी
करीता 25 आॅगष्ट पासुन बेमुदत संपावर गेल्याने राज्यातील वनक्षेत्रातील
वन व वन्यजीव यांच्या सुरक्षेवर संकट निर्माण झाले आहे. या आंदोलनावर
तात्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे, याकरिता मा. वनमंत्री डाॅ. पतंगराव कदम
यांनी स्वतः पुढाकार घेऊन संप मिटवावा अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष
बंडु धोतरे यांनी केली आहे.
वनरक्षक-वनपाल यांच्या बेमुदत संपामुळे संपुर्ण राज्यात विशेष करून
विदर्भातील वन-वन्यजीवांना याचा मोठा फटका बसला आहे. सदर संप असाच पुढे
चालु राहीला तर वनसंपत्ती ची चोरी व वन्यप्राण्यांची शिकारीच्या घटनेत
वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भात ताडोबा, मेळघाट, पेंच
व्याघ्र प्रकल्प तर बोर, नवेगाव-नागझीरा आदी अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने
मोठया प्रमाणात आहे. याव्यतिरीक्त विदर्भातील अन्य वनक्षेत्रात
वन्यजिवांचे प्रमाण सुध्दा मोठया प्रमाणात आहे. संपकाळात वनरक्षक, वनपाल
व वनमजुर सुध्दा बेमुदत संपात सहभागी झाल्याने संरक्षणाची गंभीर समस्या
सुध्दा निर्माण झाली आहे. अलिकडेच विदर्भात वाघांच्या शिकारीचे अनेक
प्रकरणे समोर आलेली आहेत. अशा परिस्थीतीत जंगलक्षेत्र रक्षकाशिवाय असणे
शिकाÚयासाठी फावणार आहे.
विदर्भातील वनक्षेत्रात विशेष करून चंद्रपूर जिल्हयात वन्यप्राणी-मानव
संघर्ष परिस्थीतीत अशा संपामुळे मोठया संकटाना तोंड दयावे लागत आहे.
वाघ-बिबटच्या हल्ल्यात जख्मी-मृत्युु पाळीव प्राण्यांचे पंचनामे वेळेवर न
होत असल्याने त्याची भरपाई गावकÚयांना देणे शक्य होत नाही. तसेच
वनसंपदेचे नुकसान, वन्यप्राण्यांच्या शिकारी आदी अनेक समस्या निर्माण
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनरक्षक-वनपाल अशा परिस्थीतीत
गावकÚयासोबत समन्वय साधुन परिस्थीती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
त्यामुळे सदर संप लवकरात लवकर संपवीणे हे वनमंत्री व राज्यसरकारची
जबाबदारी आहे. यावर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी बंडु धोतरे यांनी केली
आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.